डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

अतल्या, लेका कुठे फेडशील ही पापं?

7 Comments


तुम्हाला सांगतो, काही लोकं असतात ना, खरंच जन्मतः तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेली असतात. आणि आयुष्यभर इतके सुखात जगतात ना, की इतर जण (माझ्यासारखे) बघणारे जळुन जळुन खाक होतात.

आता आपला हा आतल्या बघा ना!!, ’अतुल कसबेकर’ हो!! हो हो.. तोच तो किंगफिशर कॅलेंडरवाला. काय नशीब घेउन जन्माला आला आहे राव तो.

आजकाल फार कमी लोकं अशी असतात ज्यांना त्यांना ज्या कामात आवड आहे, तेच काम करीयर म्हणुन मिळते. अतुल त्यातलाच एक.

मला सांगा, हातामध्ये असले लाखो रुपायांचे कॅमेरे, त्याला तितक्याच लाख रुपायांच्या लेन्स, आजुबाजुला सौदर्यवतीचा गराडा, शिवाय नयनरम्य लोकेशन्स!! असे असताना कुणाला काम करायचा कंटाळा येईल? आणि परत हे करुन, आपली आवड जोपासली जात असताना तितकाच लाखो रुपायांचा पगार पण!.. छ्या.. काय नशीब आहे कार्ट्याचे.

नुकतेच संपलेले किंगफिशर कॅलेंडरच्या आठवणी मनातुन जात नाहीत तर हा पठ्या आता ’महिंद्रा झायलो’ची ही जाहीरात घेउन आलाय. बघीतली असेलच तुम्ही.. नसेल तर घ्या पाहुन एकदा..

जाहीरातीच्या सुरुवातीच्या काही सेकंदातच हे साहेब हातात भलीमोठ्ठी लेन्स घेउन (बहुदा १००-४०० एम.एम.. जाणकारांनी खुलासा करावा) दर्शन देतात आणि नंतर पुर्ण जाहीरात भर.. ’स्माईल हॅपी लेग्स’ म्हणत सौदर्यवतींचे फोटो काढत फिरतात. त्या कुचकट महींद्र वाल्यांनी सुध्दा जाहीरातीत ’झायलो’ कमीच दाखवली आहे, निम्या वेळा ते ’फोटोसेशन्सच’ दाखवले आहेत.

मी म्हणतो किती पापं करणार हा? कित्ती जळवणार आहे हा अजुन आम्हाला?

थांब आता.. देवालाच एक साकडं घालतो आणि माझी विश-लिस्ट इथे चिकटवतो.. चुकुन माकुन बघीतलाच देवाने हा ब्लॉग तर…

Canon Lens

Advertisements

7 thoughts on “अतल्या, लेका कुठे फेडशील ही पापं?

 1. ती मोठ्ठी लांबलचक लेन्स 70-200 f/2.8L IS आहे. बाकी नशीब म्हणजे सोन्याचा चमचाच घेऊन आलंय बाळ. काय त्या कमनीय ललना. बाय द वे, तू ‘मेकिंग ऑफ किंगफिशर कॅलेंडर’ पाहतोस का रे?

  • २.८! आणि परत एल. सीरीज आणि त्यात २००एम.एम. (२x क्रॉप) जबर्‍याच.
   हो पहातो ना मेकींग. सर्वच गोष्टींसाठी 😉

   त्याचे लायटींग, ऍन्गल्स, लोकेशन्स, सामुग्री, नखरे आणि माज आणि मॉडेल्स सर्वच काही पहाण्यासारखे 🙂

   बाय द वे, तो पण पी.पी. करत असेल का रे?

 2. I was about to suggest you to take up commercial photography. Give it a thought..:)

 3. नशीब नशीब म्हणतात ते हेच!

 4. hehehehehhe
  खरच काही लोक जन्मातच खूप नशीबवान असतात.
  त्यातला मी देखील एक आहे .
  🙂

 5. he he he …. ekdum barrobar….. 😀 😀

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s