डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १)

23 Comments


गुन्हेगारी कथांचे लेखक ‘जेम्स हैडली चेस’ ह्यांच्या एका फार पूर्वी वाचलेल्या कथेवर आधारीत. कथेत मला भावतील तसे बदल केलेले आहेत. कथेचे नाव काही केल्या आठवत नाहीये, कुणी चेस ह्याच्या कथांचा वाचक असेल आणि त्याला नाव आठवले तर जरूर कमेंटा.


’पैश्यासाठी खुन करु शकशील?’, छतावर लावलेल्या आरश्यात शेजारी झोपलेल्या नैनाचा विवस्त्र देह पहाण्यात गुंग झालेल्या जोसेफची तंद्री नैनाच्या त्या विचीत्र प्रश्नाने भंग पावली.

अंगावर थंडगार साप पडावा तसा दचकुन उठत तो म्हणाला, “काय??”

“हे बघ जोसेफ..”, नैना आपला आवाज स्थिर ठेवत म्हणाली.. “हे असे अजुन किती दिवस चालवायचे? तुला पैसे देऊन देऊन मी कंटाळले आहे. महागड्या गाड्यांची फ्रॅन्चायजी घ्यायचे तुझे स्वप्न सत्यात कधीच उतरणार नाही ये का?” किती दिवस जुगार आणि लॉटरीतुन मिळणार्‍या तुटपुंज्या उत्पन्नाच्या मोहापायी तु माझे कष्टाचे पैसे असे बरबाद करणार आहेस? किती दिवस मी तीच कंटाळवाणी नोकरी करत रहायची? आयुष्यभर नोकरी करुन असे कितीसे पैसे हाती लागणार? आय नीड फास्ट मनी.. ऍन्ड इझी मनी.”

“अगं पण म्हणुन खुन? आणि कुणाचा? तु काय सुपारी वगैरे घ्यायला लागली आहेस की काय?” हसत हसत जोसेफ उद्गारला

“जोक्स अपार्ट जोसेफ..आय एम सीरीयस. थोडेसे व्यवस्थीत प्लॅनींग आणि फक्त एक योजनाबध्द रीतीने पार पाडलेला खुन आणि आपण दोघंही करोडपती होऊ..” नैना त्याच थंड सुरात म्हणाली.

जोसेफ उठुन बसला आणि त्याने नैनाकडे निरखुन पाहीले. नैनाचा तो मोहक, मादक भासणारा चेहरा पुर्ण बदलला होता. डोळ्यातला तो फ्रेंडली भाव डोळ्यात दाटलेल्या क्रुर गडद करड्या छटेने व्यापला गेला होता.

नैना रंग बदलणार्‍या सरड्यासारखी होती.. बिनभरवश्याची. तीचे कधी कुठले रुप पहावयाला मिळेल हे सांगणे कठीण. आणि तितकीच ती लिथल होती. त्यामुळे पहिल्यांदा जरी जोसेफने तिचा तो प्रश्न हसण्यावारी घेतला असला तरी आता मात्र तो हे जाणुन होता की नैनाच्या मनात नक्कीच काहीतरी शिजत आहे आणि पुर्ण विचार केल्याखेरीज तिने हा प्रश्न विचारला नसणार.

करोडपती??” जोसेफ विचार करत होता..“नैना बोलते तसे खरंच होईल? माझं इंप्म्पोर्टेड कार्स चे शोअरुमचे स्वप्न!!, आत्ताच्या हिशोबानेच पैसे जमवत राहीलो तर स्वप्न पुर्ण व्हायला म्हातारपणच उजडायचे. खरंच करोडो रुपये मिळाले तर काही महीन्यात सर्व काही सुरु करता येईल.. प्लॅन ऐकायला काय हरकत आहे? पटलं तर हो, नाही तर चालले आहे ते काही वाईट नाही.

“काय प्लॅन आहे? कुणाचा खुन करायचा आहे? आणि त्यात रिस्क किती आहे? पकडले गेलो तर?.. आणि..” जोसेफ म्हणाला

“सांगते!!, सगळं सांगते”, नैना अंथरुणातुन उठत म्हणाली.. “पण त्याआधी मी वॉश घेऊन येते, तो पर्यंत तु व्होडकाचे दोन लार्ज पेग बनवुन ठेव आणि खालुन एक ट्रिपल फाईव्ह चे पाकीट..!”

जोसेफ काही बोलायच्या आधीच नैनाने पर्स मधुन एक पाचशेची नोट जोसेफकडे फेकली आणि ती बाथरुम मध्ये निघुन गेली.

“..च्यायला काय बाई आहे?” जोसेफ स्वतःशीच पुटपुटला..”५०-७० रुपायासाठी ५००ची नोट देते..!”

जोसेफ सहा फुटाच्या आसपास, पिळदार शरीरयष्टीचा गोरापान तरूण होता. पैश्याअभावी विरलेले, मळलेले आणि चुरगळलेले कपडे, जुनाट बुट वापरुन आणि बहुतेक वेळा वाढलेली दाढी ह्यामुळे तो एखादा बेवडा किंवा भुरटा चोरच वाटायचा. परंतु जेंव्हा त्याकडे पैसे असायचे आणि तो त्याच्या ’बेस्ट’ मध्ये असायचा तेंव्हा मात्र एखाद्या फॅशन एजन्सीसाठी काम करणारा मॉडेलच वाटायचा.

नैनासारख्या कित्तेक तरूणींनी त्याच्याशी शैय्यासोबत केली होती, पण तो मात्र नैनाकडेच आकर्षीत झाला होता ते तिच्या ’डॉमीनन्स पॉवर’ मुळेच..

नैना आली तेंव्हा जोसेफने व्होडकाचे पेग्स बनवुन ठेवले होते आणि सिगारेट शिलगावुन तो टेबलावर पाय पसरवुन बसला होता.

नैनाने लावलेला इंम्पोर्टेड परफ्युम आणि महागड्या शॅम्पुंचा सुगंध जोसेफला उद्दीपीत करुन गेला. खुना-बिनाचा प्लॅन गेला भो**त, नैनाला पुन्हा एकदा बिछान्यात ओढण्याची तिव्र इच्छा त्याच्या मनात तरळुन गेली.

नैना शांतपणे त्याच्या समोर बसली. व्होडकाचा एक लार्ज सिप तिने घेतला. तो घोट घश्यापासुन पोटापर्यंत जळजळत उतरतानाचा तो फिल तिने डोळे मिटुन अनुभवला. मग दुसरा एक घोट घेऊन ती म्हणाली..

“जोसेफ, मला तुझ्याकडुन प्रथम होकार अथवा नकार हवा आहे. तु आत्ताच ह्या प्लॅन मधुन बाहेर पडु शकतोस. तु नसशील तर मी दुसर्‍या कुणाची तरी मदत घेईन. पण एकदा तु हो म्हणल्यावर ह्यातुन माघार नाही..”

आपणाशिवाय नैना दुसर्‍याकुणाचा विचारच कसा करु शकते..??” जोसेफ मनोमन बोलला.. त्याचा इगो जागा झाला आणि त्याने दुसरा तिसरा विचार न देता होकार देऊन टाकला..”आय एम इन नैना, बोल प्लॅन काय आहे!”

नैनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती बोलु लागली….

[क्रमशः]
भाग २ >>

पुणेरी तळटीप – कथेचा लेखक व्यवसायाने पुर्णवेळ साहीत्य क्षेत्रात कार्यरत नसुन एक नोकरदार संगणक अभियंता आहे. त्यामुळे कामाचा व्याप संभाळुन पुढचे भाग पोस्ट होत असल्याने कथेच्या दोन भागांमध्ये असह्य होणारा वेळ असु शकतो त्याबद्दल लेखक दिलगीर आहे. कृपया सहकार्य करावे.

Advertisements

23 thoughts on “लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १)

 1. अनिकेत, सर्वप्रथम तुझं अभिनंदन या नव्या, चकाचक template बद्दल. एकदम काटाकीर्रर्रर्रर्र….. नादखुळा.
  वाईट्ट डोळ्यात भरते रे….
  आणि मित्रा, शाब्बास. बरं झालं तू परत तुझी रहस्यकथा घेऊन आल्याबद्दल. तुझा एकदम हातखंडा आहे रे यात. रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर वगैरेंच्या रांगेत तू आधीच जाऊन बसला आहेस !!!!! लगे रहो.

  • अहो मालक, काय चेष्टा करता, जोड्याने मारा हवे तर पण असे टोचुन टोचुन मारु नका 🙂

 2. Dear Aniket,

  Mi tuzach compnit kam karto. Mala mahit aahe tu kiti BUSY aahes te.
  Patakan pudhcha bhag post kar baghu.

 3. ary thanks tumche navin post aamhala milale mhanun.

  lavkar kahitari mumbai pune mubai var tumhi lihav as mala tari vatat aahe tumhala kay vatat aahe tyach prash aahe pan

  • कुमार, मी अजुन तो सिनेमा पाहीलेला नाही, पाहीला की नक्की लिहीन

  • amiket m to wants to read something on Mumbai Pune Mumbai from you…..

 4. अरे विक्रांत म्हणतो ते खर आहे …
  मी खुप नोंवेल्स वाचल्या आहेत सुहास शिरावालाकरांच्या …
  मी तोच अनुभव घेते तुझे ब्लॉग वाचताना….
  अगदी पटापट तुझे सगळे articles वाचून काढले…
  अगदी थोड्याच दिवसांपूर्वी मला गूगल ला ही साईट मिळाली…

  आणि तुझा …सावधान, बायको गाडी शिकत आहे ……… हा ब्लॉग वाचला ..
  एकदम भन्नाट……….
  keep it up

  • विक्रांत वेडा आहे श्रेया, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.. ब्लॉगवर स्वागत. आशा करतो की बाकीच्या पोस्ट आणि ह्यापुढील पोस्ट सुध्दा आपल्या पसंतीस उतरतील.

  • Khoop ch chaan ahet all stories mee kaal pasun vachat ahe …khoop awdlya mala stories saglya… 🙂 thank you

   Surabhi

 5. नवीन कथा सुरु केल्याबद्दल अभिनन्दन. पुढच्या भागासाठी फ़ार वाट पहायला लावू नका.

  • धन्यवाद अरूणा, पुढचे भाग लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न राहील

 6. mast eakdam far sahi jamle aahe…
  lage raho .. aani lavker kara pudcha bhag publish..

  • हो रे मित्रा, शक्य तितक्या लवकर पुढचे भाग टाकत जाइन

 7. किती दिवसापासुन वाट बघत होते तुमच्या नविन पोस्ट ची.
  नविन पोस्ट ती पण रहस्यकथा..
  एक विनन्ती आहे पोस्ट लवकर टाकत जा…

  • धन्यवाद अस्मिता, लवकरात लवकर पोस्ट टाकण्याचा नक्कीच प्रयत्न राहील

 8. हा भुंगा चांगलाच भुण भुणणार ……पुढे उडण्यासाठी ……. शुभेच्छा

 9. aniket bhau mastermind nantar bahrpur time ghetla navin blog lihayala..lage raho…

 10. hi Aniket,

  Tumachya sagalyach katha khupach chan aahet, pratyek post utsukata vadhavat asate, khup chan, kahitari wegal vachalyacha aanand milato. Khas karun alwani katha wachalyawar 2 diwas zop aali navhati bhitine.
  best luck for future stories. i wish very soon we will get new, interesting story .

 11. Hi Aniket… Kharach yar tu great aahes, maza competitive exam cha study sodun don divasapasun tuzi @ ISHQ hi Katha Wachali. Khup bhavali Manala… Suhas Shirval Kar yanchya nantar tujich Katha start to end Wachali MI …

 12. Khp chhan lihita nice…..gele 3 Days vachtey me sundar ahe likhan. Tyat kamacha vyap sambalun lihin mhanje tarambal udat asel. Pn lihin hi tumchi hobby asavi n tyasathi kasahi ka hoina vel apoap nighto

 13. Story complete ka nahi…delete ka keli???😢😢😢

 14. #ishq# superb sir vachtana agdi veglya duniyet gelyasarkh vatla.. kharach tumchya likhana madhe jaadu aahe

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s