भटकंती लिमीटेड: पाबे खिंड


॥ श्री पंकज बाबा प्रसन्न ॥

माझा डी.एस.एल.आरचा मालक होण्याचे स्वप्न श्री पंकजबाबांच्या उपासनेनंतर त्यांच्या कृपेने सफळ झाले. परंतु त्यानंतर मात्र नेहमीच्या कामात व्यस्त झाल्यानंतर फोटो काढायला जमेनासे झाले. घरातच, आजुबाजुला काढलेले फोटो असा कितीसा आनंद, समाधान देणार? त्यात पंकजबाबांचा ब्लॉग आणि फ्लिकर अकांऊंट ’भटकंती अन-लिमीटेड’ नवनविन फोटोंनी भरभरून वाहत होता.

मिशीवाला पंक्या नामक पोस्ट लिहून मी मनातली जळफळ व्यक्त केलेली होतीच. परंतु पंकजबाबांची अघाध करणी बघा, ती पोस्ट लिहीतानाच मला साक्षात्कार झाला आणि फोटो मिळवण्यासाठी घरात बसुन उपयोग नाही तर त्याला भटकंती गरजेची आहे ह्याचे ज्ञान झाले.

मग थोडेफार फिरलो, चांगले फोटो मिळाले आणि उत्साह वाढीस लागला. अश्यातच माझ्या दोन मित्रांनी माझ्या पावलावर पाऊल टाकुन डी.एस.एल.आर खरेदी केला आणि मला प्रथमच भटकंतीला कंपनी मिळाली.

ह्या शनिवारचा मुहुर्त साधुन अनलिमीटेड नाही, पण लिमीटेड भटकंतीची मुहुर्तवेढ रोवली आणि ’पाबे खिंडीला’ धावती भेट दिली.

’पाबे खिंड’, सिंहगडाच्या पायथ्यापासुन खानापुर/पानशेतचा रस्ता धरायचा आणि तेथुन डावीकडे वळुन तोरणा / राजगडाकडे जाणारा चिंचोळा घाट रस्ता पकडुन ’पाबे खिंड’ गाठावी. येथुन दोन महाकाय किल्ले- तोरणा आणि राजगडाचे विहंगम दृश्य घडते.

वेळेअभावी जास्ती न लिहीता काही निवडक फोटोंची मालीका इथे जोडत आहे, आश्या आहे ते आपल्या पसंतीस उतरतील.

ह्युंदाई आय-२०, ड्राईव्ह युअर वे –

नॉट ऑल रोड लिड्स टु रोम, सम लिड्स टु डिव्हाईन नेचर –
(तोरणा आणि राजगड दोन महाकाय किल्ले कॅमेरामध्ये टिपण्याचा एक केविलवाणा प्रयत्न)

व्हेन स्काय हॅज टु ऑफर सो मच… क्लिक इट..

राजगड –

तोरणा –

येताना भेटलेले शेतकरीबाबा, ज्यांनी त्यांच्या शेतीची, पेरणीच्या कामांची सर्व माहीती स्वतःहुन दिलीच आणि परत त्यांचे काही फोटो आणि त्यांच्या बैलजोडीचे (राजा आणि प्रधान) फोटो सुध्दा काढायला लावले. एवढेच नाही तर पंधरा दिवसांनी भातलावणीच्या वेळी पुन्हा एकदा भेट देण्याचे आमंत्रण सुध्दा दिले –

17 thoughts on “भटकंती लिमीटेड: पाबे खिंड”

  1. येस्स सर!, तुमचे प्रत्येक सजेशन आमलात आणले जाईल. धन्यवाद!!!

   1. Dear Aniket

    It’s so nice photos. Realy you are doing good job. Also I have insterested to surfing in nature.
    I would like to join with you ( If you don’t have any problem )
    Please reply on shaan164@gmail.com
    Regards
    Shankar

  1. हो रे मित्रा, त्या शिवाय पर्याय नाही 🙂

  1. अगदी खरं आहे अरुणा. सत्य परीस्थीतीत निसर्गाचा जो भव्य पणाचा, उत्तुंगपणाचा अनुभव येतो तो फोटोंमधुन व्यक्त करण्याचा कितीही प्रामाणिक प्रयत्न केला तरी तो कमीच पडतो.

   1. अनिकेत,
    खरे तर मला असे म्हणायचे होते कि कधि कधि सत्य हे कल्पनाशक्तिच्याही पुढे जाते. आपण कल्पनाही नाही करुशकत असल्या सौन्दर्याची. आणी म्हणुनच निसर्ग हा श्रेष्ठ राहतो कधीही.
    तुमचे फोटो सुन्दरच आहेत.

 1. ary wa chan aahet phots

  pan photoshopping nahi na kel????

  kel nasel tar faaaaaaaaarrrrrrrrrrrrrrraaaaaaaaaaaaaaccccchhhhhhhhhhh chan

 2. झटक्का…….. असेच रानोमाळ फिरा आणि फोटो काढा !!!!!!! बाकी पंकू काय आणि तू काय… एकदम कलाकार लोक… आम्हाला बसल्या जागी ब्रम्हांडाचं दर्शन घडवता….. जियो !!!!!!

 3. बाजूच्या FLICKR PHOTO STREAM मध्ये दिसणारा ओजसचा फोटो एकदम सुरेख! बाकी आपण आणखी काय बोलणार, फोटोज मस्तच आलेत, ह्म्म, पण लाइट ऍडजस्टमेण्ट जरा नजर-आड केलेलं दिसतंहेस… त्यामुळेच का काय, पण फोटोजमध्ये DSLR वाल्यांकडून पाहिजे ती जादू दिसली नाही… पंक्याने सजेस्ट केलेले तू फॉलो करशीलच!

  राग नको येऊ देऊ, बस्सं एवढंच भौ! 😛

  1. त्याचं काय झालय, माझ्या मॉनीटरची काहीतरी गडबड झाली आहे त्यामुळे फोटो प्रोसेस करताना तो अती ब्राईट किंवा अती डार्क झालाय हे कळत नाहीये, कदाचीत त्यामुळेच तुला तसे वाटले असेल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s