लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ७)


भाग ६ पासुन पुढे>>

दिवसेंदिवस रोशनी जोसेफच्या नाटकी प्रेमाच्या जाळ्यात ओढली जात होती. प्रत्येक गोष्टींत त्याचे इतरांपेक्षा असलेले वेगळेपण रोशनीला जाणवत होते.

म्हणजे.. एकदा तिने जोसेफला फोन केला तेंव्हा तो ’हेल्पलाईन’ मधील मुलांबरोबर खेळत होता..फोन वर तो म्हणाला होता..’नाऊ दॅट आय एम अर्नींग वेल, आय वॉंट टु डु समथींग फॉर दीज लिटील ऍन्जल्स..’ आणि रोशनी मनोमन हासली होती.

एकदा रोशनीने त्याला ऑफीसमध्ये बोलावले होते आणि तरीही तो चक्क ३० मिनीट उशीरा, हातातले काम संपवुन आला होता. केवळ रोशनीची मर्जी संपादण्यासाठी नाटकीपणे तिचे शब्द झेलणार्‍या माणसांपेक्षा ह्या वेळेस जोसेफ तिला खुप वेगळा वाटला होता.

रोशनीबरोबर त्याचा वावर नेहमी कॉन्फीड्न्ट, सेल्फ रिस्पेक्ट जपणारा असायचा. मात्र त्याच्यापेक्षाही मोठ्या पोस्टवर असणारी माणसं आदर नसतानाही उगाचच हाजी-हाजी करत रोशनीभोवती फिरायची. जोसेफला पाहुन रोशनी मनोमन म्हणायची, ’इफ़ आय एम टु गेट मॅरीड, आय वॉंट माय ह्जबंड जस्ट लाईक जोसेफ, विथ अ हेड हेल्ड हाय, अ मॅन विथ सेल्फ प्राईड ऍन्ड सेल्फ रिस्पेक्ट, यट केअरींग.. नॉट फॉर मनी, बट फॉर पिपल्स..’

रोशनीच्या त्या एकाकी जिवना जोसेफच्या रुपाने एक नविन पहाट उगवली होती. तिच्या वागण्यात, बोलण्यात खुप फरक पडला होता.. निदान जोसेफबरोबर तरी. त्याच्याबरोबर ती स्वतःला खुप मोकळे फिल करत होती.

शेवटी एके दिवशी तिने जोसेफला घरी बोलावले आणि फारसे आढेवेढे नं घेता सरळ सरळ लग्नाची मागणीच घातली..

“पण मॅम.. आपल्या दोघांमध्ये खुप मोठ्ठी दरी आहे. तुमच्या मागे ’रोशनी एन्टरप्रायझेस’ आहे. माझ्याकडे काय आहे? तुम्ही माझ्यादृष्टीने खरंच एक उत्कृष्ठ बॉस आहात आणि तुमच्याबरोबर काम करणं हा माझ्यासाठी एक फार सुंदर अनुभव ठरत आहे..”, जोसेफ नम्रपणे म्हणाला..

“कमॉन जोसेफ!, लग्नानंतर ’रोशनी’ आणि ’रोशनी एन्टरप्रायझेस’ तुझीच तर होणार आहे. मग कुठे उरते दरी? माझ्यादृष्टीने माणसाला महत्व आहे, त्याच्या भौतीक मालमत्तेला नाही. आपल्या दोघांचे वैचारीक पातळीवर सुर जुळले आहे, मग मन जुळायला कितीसा वेळ लागणार?

आजपर्यंत अनेकांनी माझ्यावर प्रेम दाखवले, पण त्या प्रेमामागे त्यांचे माझ्या पैश्यावरील प्रेमच दिसत होते. त्यांच्या नजरेत मला प्रेम कमी आणि संपत्तीची लालसाच जास्त दिसली. तुला ते गाणं माहीती आहे जोसेफ.. ’लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह?’ बास्सं.. माझी तेवढीच अपेक्षा आहे, आणि ती अपेक्षा मला तुझ्याकडुन पुर्ण होइल ह्याची खात्री आहे.

हो म्हण जोसेफ..मला अजुन काही नको. आजपर्यंत मी आयुष्य एकटीनेच जगले आहे. हा इतका पैसा असुनही तो कधी अनुभवला नाही. आणि त्याची आजपर्यंत कधी गरजही वाटली नाही. पण आज वाटते आहे. मला माझे उरलेले आयुष्य आनंदाने घालवायचे आहे आणि त्या आयुष्यात तु असशील तर मला खुपच बरं वाटेल.. प्लिज जोसेफ..”

जोसेफची शांतता रोशनीला सलत होती. श्वास घेणे सुध्दा तिला जड होऊ लागले. लाचारपणे ती जोसेफच्या उत्तराची वाट बघत होती.

रोशनीच्या “उरलेले आयुष्य” ह्या शब्दाला जोसेफ मनोमन हासला.

“यु आर डिसगस्टींग, यु आर अग्ली, यु आर जस्ट अ रिच फॅट पिग”, हे किंवा असेच काही तो म्हणणार होता, पण शेवटी तो म्हणाला,..”येस रोशनी..! लेट्स गेट मॅरीड”

*************************************

रोशनी आणि जोसेफचे लग्न जोसेफच्या विनंतीनुसार अगदी साधेपणाने, रजिस्टर पध्दतीने झाले. अर्थात जोसेफला कोणत्याही प्रकारची प्रसिध्दी नको होती हा स्वार्थ होताच.

लग्न झाले आणि रोशनी म्हणाली,

“जोसेफ.. मला खुप वाईट वाटते आहे, पण तुला सांगावेच लागेल… मला निदान एक महीन्याकरता तरी अमेरीकेला जावे लागणार आहे. खरंच कामच तसं महत्वाचे आहे. मी शक्य तितका टाळण्याचा प्रयत्न केला पण आय एम रीअली सॉरी.. मला जावंच लागेल..” चेहरा पाडुन रोशनी म्हणाली..

“ओह..नो..रोशनी.. आत्ताच तर आपलं लग्न झालं आहे, कित्ती स्वप्न पाहीली होती मी.. ४-५ दिवस ह्या गर्दीपासुन आपण खुप लांब, कुठे तरी गेलो असतो…”, जोसेफ निराशेचा स्वर आणत म्हणाला..

“आय नो.. जोसेफ.. माझी पण तिच इच्छा होती.. पण खरंच रे, नाही टाळता येणार.. जावंच लागेल मला, प्लिज तु चिडु नकोस..” रोशनी म्हणाली..

“नाही गं, चिडत वगैरे काही नाही. मला का कळत नाही कामाचे महत्व. तु निर्धास्तपणे जा, मी तुझी वाट पाहीन..” रोशनीचा हात हातात घेत जोसेफ म्हणाला.

लग्नाच्या रात्री तिच्याबरोबर झोपायचा विचारही त्याच्या अंगावर काटे आणत होता. रोशनीच्या ह्या निर्णयाने तो प्रचंड खुश झाला होता. ’चला एक महीना तरी कटकट नाही..’, रोशनीला एअरपोर्टला सोडुन येत असतानाच तो मनाशीच म्हणाला.

“आपल्या” अलिशान मोटारीतुन घरी परतत असतानाच त्याचा मोबाईल किणकिणला..

“जोसेफ.. नैना बोलतेय..”.. कित्तेक दिवसांनंतर नैनाच्या आवाजात तो पुर्वीचा मधाळ मादकपणा होता…

“बोला.. काय कामं काढलंत..?” जोसेफ…

“बिच्चारा जोसेफ.. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासुनच एकटं रहावं लागणार..”, खट्याळ स्वरात नैना म्हणाली..

“काय तु पण?? बरं झालं उलट ती गेली ते…आता ह्या अलिशान महालात निदान पुढचा एक महीना तरी मीच..” गाडी रस्त्याच्या कडेला घेत जोसेफ म्हणाला..

“हम्म.. आणि जर मी तुझी साथ द्यायला ’तुमच्या’ लग्नाच्या पहिल्या रात्री आले तर?” नैना..
“व्हॉट?”.. काहीसा दचकतच जोसेफ म्हणाला..

“येस जोसेफ.. आय मिस्स यु सो मच.. आय वॉट टु मेक लव्ह विथ यु.. आणि ते पण त्या कुत्रीच्या बेडमध्ये.. इट विल बी नथींग लाईक इट.. माय फॅन्टसी समज हवं तर.. पण तिच्याच घरात, तिच्याच बेड वर, तिच्याच नवर्‍याबरोबर प्रेम करण्यात मला जे सुख मिळेल ना जोसेफ.. पुढचे सर्व आयुष्य मी तिला बघुन मनोमन हासेन ह्या रात्रीचा विचार करत..”, नैना बोलत होती.

“अगं पण, तिथे सेक्युरीटी असते, कुणी पाहीलं तर?”, जोसेफ काळजीच्या स्वरात म्हणाला..

“अरे य्यार.. तुझ्यापेक्षा तिचे घर मला जास्त माहीती. त्याची काळजी तु सोड. आणि तसेही तिच्या सर्व गाड्या काळ्या काचेच्या आहेत. तु मला पिक-अप कर. गाडी नेहमीच्या जागी न लावता, मागच्या गेटकडुन पुढे गेल्यावर एक गार्डन आहे तिकडे लाव. रोशनी बर्‍याच वेळेला.. जेंव्हा तिची कुणालाच भेटायची इच्छा नसते, किंवा आलेल्या गेस्टना चुकवायचे असते तेंव्हा गाडी तिकडेच लावते. त्या बाजुला कुणी नसते..रात्री तर नक्कीच नाही..” नैना म्हणाली.. “मी वाट बघतेय जोसेफ.. मला व्हिक्टोरीया सर्कलला पिक-अप कर..” असं म्हणुन नैनाने फोन ठेवुन दिला.

*************************************

रोशनीच्या त्या रॉयल बेडवर नैना आणि जोसेफ एकमेकांना बिलगुन पहुडले होते.

“वॉव, व्हॉट अ फन राईड इट वॉज..”, नैना म्हणाली…”त्या रोशनीला कळालं नं हे, तर मला कच्चे खाईल ती..” स्वतःशीच हसत ती म्हणाली, “बिच्चारी, लग्न झालं नाही की लग्गेच जावं लागलं तिला आणि ते पण थोडे थोडके नाही, एक महिन्यासाठी..

असो..रोशनी इथे नसताना तिचे वकील.. मि. फर्नांडीस ह्यांना एकदा भेटुन घे. त्यांच्याशी ओळख करुन घे. त्यांना सांग रोशनीची विमा पॉलीसी काढायची आहे. त्यांना दाखवुन दे की तुझे रोशनीवर कित्ती प्रेम आहे. ते इथे असतानाच रोशनीला एकदा फोन कर, तिच्याशी गोड गोड बोल. तसेच त्यांच्याकडुन इतर काही माहीती जसे रोशनीचे काही मृत्युपत्र आहे का?, इतर लिगल बाबी काय आहेत वगैरे जाणण्याचा प्रयत्न करुन घे..”

“येस.. डार्लींग.. आपका हुकुम सर आखोंपर..”, जोसेफ म्हणाला..

“आता पुढचा प्लॅन.. रोशनीला टपकवायचा. अतीशय धुर्तपणे आपल्याला हे करावं लागणार आहे. कुणाला जरासासुध्दा संशय येता कामा नये. तिचा मृत्यु पुर्णपणे अपघाती वाटला पाहीजे, नाहीतर संशयाची सुई पहीली तुझ्याकडेच येईल. एक रस्त्यावरचाअ मेकॅनिक रोशनीचा नवरा होतो काय, दोन महीन्यात तिचा मृत्यु होतो काय आणि तोच कफल्लक मेकॅनीक रातोरात करोडपती होतो काय..”.. नैना..

“हम्म, बरोबर आहे तुझं म्हणणं.. बर सांग आता, काय प्लॅन आहे?”, जोसेफ

“वेल.. फुल प्रुफ प्लॅन अजुनही तयार होत नाहिये.. माझा विचार चालु आहे.. पण ढोबळ मानाने असा विचार आहे..

हे बघ… रोशनी डिप्रेशनची शिकार आहे. एखादी मनाविरुध्द गोष्ट झाली की तिला मध्येच नैराश्य येते. डॉक्टरांनी तिला नैराश्यावर काही गोळ्या दिलेल्या आहेत. परंतु त्या गोळ्यांचे अतीसेवन ड्रग्सचा परीणाम करते.

त्या दिवशी कुठल्याश्या छोट्या गोष्टींवरुन तुझ्या आणि रोशनीमध्ये भांडण होईल, आणि तेच भांडण बघता बघता वाढत जाईल. तु ह्याची काळजी घ्यायचीस की तुमच्यातले हे भांडण घरातील गडी माणसे आणि इतर शक्य तेवढी लोकं ऐकतील.

तुमचे भांडण झाले की तु तणतणत मुख्य गेटातुन बाहेर पडशील. परंतु गाडी एका ठिकाणी लपवुन तु परत येशील.. कुणाच्याही नकळत आणि मागच्या गेटमधुन तु परत घरी येशील. भांडण सुरु व्हायच्या आधी तुला तुमच्या बेडरुम मध्ये रोशनीसाठी असलेल्या पाण्याच्या जग मध्ये, ज्युसमध्ये किंवा आणखी कश्यातही जे ती झोपण्याआधी खाईल, किंवा पिईल त्यात तिच्या गोळ्या टाकुन ठेवायच्या.

साधारणपणे एक तासाने तु बेडरुम मध्ये येशील. ह्या गोळ्यांच्या ओव्हरडोसने रोशनी गाढ झोपली असेल. तिला उचलुन तिच्याच गाडीत बसवुन तु पुन्हा बाहेर पडशील. आज जसे इतरांच्या नकळत मी आतमध्ये आले, तसेच त्यादिवशी सुध्दा असेन. मागच्या सिटवरच रोशनीला गाडीत ठेवुन तु तिच्या शेजारी लपुन बसशील. मी ड्रायव्हींग सिटवर रोशनीचाच कुठलातरी ड्रेस घालुन बसेन. आपण गाडी वेगाने मुख्य गेटातुन बाहेर काढु. गेटवरील गार्ड रोशनीला गाडी घेउन जाताना पाहेल.

तिला घेउन आपण लोटस-हिल च्या घाटात जायचे. रात्रीच्या वेळेस हा घाट पुर्ण सुनसान असतो. तेथेच तिला ड्रायव्हींग सिटवर बसवुन ती गाडी आपण घाटात ढकलुन द्यायची. बस्स.. रोशनी खतम..” टाळी वाजवत नैना म्हणाली..”शवतपासणीमध्ये रोशनीला गोळ्यांचा ओव्हरडोस झाला आणि त्यामुळे एका अवघड वळणावर आलेल्या ग्लानीमुळे गाडी दरीत कोसळली आणि तिचा अपघाती मृत्यु झाला हे स्पष्ट होईल..”

“वॉव, दॅट्स ब्रिलीयंट…जिनीयस आहेस तु…” जोसेफ म्हणाला..

“अर्थात ह्यात काही खाच-खळगे आहेत जे पुर्ण करायचे आहेत.. जसे की तुझ्यासाठी अलेबी.. तु घरी नव्हतास तर मग रोशनीचा अपघात झाला तेंव्हा कुठे होतास? ह्याचा पुरावा. त्यावेळेस तु दुसर्‍याठिकाणी देखील असणे गरजेचे आहे, आणि तु तेथे होतास, ह्याचा पुरावा देखील असणे गरजेचे आहे. ह्या मुद्याला एकदा का उत्तर सापडले की आपला प्लॅन रेडी-टु-गो..”, घड्याळात बघत नैना उठुन बसत म्हणाली..

समोरच्या आरश्यात बघत आपले केस एकसारखे करत नैना म्हणाली.. “चल मला जायला हवे..”

नैनाच्या लांबलचक उघड्यापाठीकडे बघत जोसेफ म्हणाला…”इतक्यात कुठे चाललीस डीअर.. हनीमुनची रात्र आहे, इतक्या लवकर थोडी नं पहाट होणार..” आणि तिला पुन्हा एकदा आपल्या बाहुपाशात ओढुन घेतले..

[क्रमशः]

भाग ८ >>

33 thoughts on “लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ७)

 1. अनिकेत Post author

  मंडळी, रोशनी-जोसेफचे प्रेम आणि त्यांचे लग्न लवकर आटोपल्यासारखे वाटेल कदाचीत, पण खरं तर मला ही कथा उगाचच पाल्हाळ लावत अनेक भागांत लांबवायची नाही. मर्डरचा प्लॉट आणि त्याचे ऍप्लीकेशन ह्याची अनेकजण वाट बघत आहेत त्यामुळे तो निरर्थक भाग मी थोडक्यात आटोपला आहे.

  त्या भागाच्या असण्याने आणि नसण्याने कथेला फार काही फरक पडेल असे वाटत नाही. एका दीर्घ कथानकासाठीच तो भाग उचीत आहे, लघुकथेसाठी नाही ह्या विचाराने कथा थोडी पुढे सरकवली आहे ह्याची नोंद घ्यावी.

  आशा आहे, कथेच्या इतर भागांप्रमाणे हा भाग सुध्दा तुम्हाला तितकाच आवडेल.

  धन्यवाद

  Reply
  1. Anita Patil

   Hi Aniket,

   Katha Khup khup chan aahe, pudhcha Part kadhi vachayla milel, utsukata vadhat chalaliy re,
   kharach mala hi site khup aavdali.

   Reply
 2. मकरंद

  घड्याळात बघत “रोशनी” उठुन बसत म्हणाली” व “रोशनीच्या” लांबलचक उघड्यापाठीकडे बघत जोसेफ म्हणाला.
  मला वाटते रोशनी ऐवजी नैना असायला हवे होते.

  कथा नेहमी प्रमाणे उत्कृष्ट.
  पुढचा पोस्टची वाट बघतो आहे. 🙂

  Reply
  1. अनिकेत Post author

   अनवधानाने झालेली चुक निदर्शनास आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य तो बदल केलेला आहे

   Reply
   1. kumar

    aankhi eka thikani he chuk zali aahe

    “आता पुढचा प्लॅन.. रोशनीला टपकवायचा. अतीशय धुर्तपणे आपल्याला हे करावं लागणार आहे. कुणाला जरासासुध्दा संशय येता कामा नये. तिचा मृत्यु पुर्णपणे अपघाती वाटला पाहीजे, नाहीतर संशयाची सुई पहीली तुझ्याकडेच येईल. एक रस्त्यावरचाअ मेकॅनिक रोशनीचा नवरा होतो काय, दोन महीन्यात तिचा मृत्यु होतो काय आणि तोच कफल्लक मेकॅनीक रातोरात करोडपती होतो काय..”.. रोशनी..

    chuk dhakhavinyat vait hetu( chuka kadhnyacha nahi)

    changli gosht adhik chagali asavi ha aahe

    yachi krupya nond ghyavi

    Reply
 3. आल्हाद alias Alhad

  मंडळी, रोशनी-जोसेफचे प्रेम आणि त्यांचे लग्न लवकर आटोपल्यासारखे वाटेल कदाचीत, पण खरं तर मला ही कथा उगाचच पाल्हाळ लावत अनेक भागांत लांबवायची नाही. मर्डरचा प्लॉट आणि त्याचे ऍप्लीकेशन ह्याची अनेकजण वाट बघत आहेत त्यामुळे तो निरर्थक भाग मी थोडक्यात आटोपला आहे

  good

  Reply
 4. प्रसन्ना

  कथा अतिशय रंगतदार होते आहे फक्त या सातव्या भागात शेवटच्या २-३ ओळीं मध्ये रोशनी च्या ऐवजी नैना नाव पाहिजे आहे.

  Reply
  1. अनिकेत Post author

   धन्यवाद. योग्य तो बदल केलेला आहे

   Reply
 5. अनिकेत Post author

  मंडळी,
  प्रतिक्रियांबद्दल आणि चुका निदर्शनास आणुन दिल्याबद्दल शतशः धन्यवाद

  Reply
 6. ARUNAA ERANDE

  अगदी योग्य निर्णय. कारण ते सगळ्याना अपेक्शित आहे. मग त्यात पल्हाळ लावायची गरज नाही.
  रोशनी त्य दोघाना red handed पकड्णार क?

  Reply
 7. nagesh

  जाम रंगतेय कथा पण मज्जा येईल जर जोसेफ ने रोसनी ऐवजी नैना चा खून केला ..आणि क्रिश ला नैनाचा मर्डर मध्ये तुरुंगात घालून सुखाने जीवन जगू लागला ……… कारण शाहरुख खान म्हणाला “अगर कहाणी कि Happy ending नही होती है, तो picture अभी बाकी है मेरे दोस्त “

  Reply
 8. Vijayanand

  मित्रा नेहमी प्रमाणेच … भन्नाट आहेत तुझी हि पण कथा.

  एक सूचना/विनंती: मित्रा खूप इंग्रजाळलेल मराठी आहे यार. असं वाटते की इंग्रजी मराठी मध्ये वाचतोय.
  वाचातानी प्रत्येक वेळी तीच गोष्ट खटकत होती…
  .
  .
  बाकी तुमच्या लिखाणाबद्दल काय बोलावे …. अप्रतिम !!!

  Reply
  1. अनिकेत Post author

   मान्य आहे, पण मला वाटते कथेची गरज म्हणुनच काही ठिकाणी मी इंग्रजी वापरेलेले आहे जे इतर कथांमध्ये नाही.

   जश्या शिव्यांना मराठीबाज आला की त्याची मजा वाढते, तसेच काही शब्द इंग्रजीतुनच चपखल बसतात असे वाटते.

   बाकी, इतर कुणाला खटकले असल्यास कळवावे, पुढच्या भागात कमी शब्द वापरेन.

   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मित्रा

   Reply
   1. Tulsidas kadu

    YES……….mala sudhaa khatkale te english shabd thode kami keles tari chalel.tujhya likhanabaddal shanka bilkul nahi.great…writting
    next part jaldi chahiye.

    Reply
 9. sushma

  mi 3 diwsapurvi thumchya blogsi join zale mala kalatch navt kutun suruvat karu wachayla…march 2009 thumchya pahilya post pasun wachan suru keli……… wachanachya nadat kiti wajale kalatch nahi ekda aai ordali jevan tari kar nantar wachat bas mi saddya computr samor basunch jevan karte…
  ek wachal ki dusari post wachavi vatate…khup enjoy karti aahe mi thumchi pratek post……

  thumcha blog manje mazyasathi 1khajina aahe aanad,anubhav,kathancha…….thanks thumchyamule mi khup haste…………

  thumchya ya aanokhya karya sahi mazyakadun “MANAPASUN SUBECCHA”

  Reply
 10. Ritesh

  baryach diwasa nantar tumchya blog var aalo, eka damat satahi bhaag wachun takale 🙂
  utkantha wadhali ahe ki pudhe kay honar..
  Collage madhe maza atyant jawal cha mitra hota, tyache naav pan Aniket ahe.. to ghatana ashach details madhe sangayacha.. ani tumhi chan lihita… barech samya ahe tyat ani tuzyat…

  Reply
 11. gayatri

  mi 1st time ha blog open kela aani ekach zatkyat sarv story vachli. mast vatle pan ustukata jast aahe ki nemke kai hoil ? जोसेफ रोशनीच्या premat padnar ki tila marun taknar ………….? pudhachya bhagachi aturtene wat pahat aahe

  Reply
 12. sony

  pudhcha 8va bhag kadhi prakashit honar ahe mitra.
  me far vat pahat ahe tya bhagachya shevtachi
  tar pls next part lavkar prakashit kar…………

  Reply
 13. Anjali

  Hi Aniket,
  tuzya sarvch story khup chaan astatat…ani tuze likhan aprtim ahe really…mhanoon ch ek sangavese vatte khare tar tumhala sangave evdhi me mothi nahi pan mala vatte ki tumhi Live Attmcharitrye kivha Nathe-Sabhandavar likhan karave……i know tumhi khup chaan lihu shakata…..!!

  Thank You
  Anjali

  Reply
  1. अनिकेत Post author

   आज टाकण्याचा प्रयत्न करतो. माफ करा मंडळी, काही अपरीहार्य महत्वाच्या कामांमुळे पुढचा भाग टाकायला वेळ लागतो आहे.

   Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s