लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ९)


भाग ८ वरुन पुढे >>

“जे काही करायचे आहे ते १०-१५ मिनीटांमध्ये उरकायला हवे. जास्त वेळ कुठे जाता येणार नाही. रोशनीने विचारले तर काय उत्तर देणार..” फॉर्च्युन कॅसीनोमध्ये जाताना जोसेफ विचार करत होता.

चेहर्‍यावर तिरपी टोपी ओढुन आणि गळ्याभोवती एक जाडसा मफलर गुंडाळुन जोसेफने आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी काहीही झालं तरी तो रोशनीचा नवरा होता.. त्याची लायकी असो वा नसो, तो रोशनी एन्टरप्रायझेसचा एक हिस्सा होता आणि असे असताना एका चिल्लर कॅसीनोमध्ये त्याचे असणे मिडीयाच्या किंवा इतर कुणाच्या नजरेसमोर येणे धोक्याचे होते. जोसेफने धोका पत्करला होता, पण त्याचा नाईलाज होता.

इतरत्र न घुटमळता जोसेफ सरळ वरच्या मजल्यावरील रुम नं १०३ मध्ये आला. जोसेफच्या दृष्टीने जे.के. म्हणजे कोणीतरी एक पोरगेल असा प्ले-बॉय किंवा अगदीच झालं तर ३०-३२शीतला तरूण असावा जो तरूणींना फसवुन, आपल्या पौरुषत्वाच्या अमलाखाली त्यांचे सिक्रेट्स काढुन घेउन त्यांना ब्लॅकमेल करत असावा. दोन चार झापडा दिल्या आणि जरा दम भरला तर सुतासारखा सरळ होईल ह्या विचाराने जोसेफ खोलीपाशी आला.

खोलीचे दार उघडेच होते. जोसेफ सावध पावलं टाकत आतमध्ये आला. आत संपुर्ण अंधारच होता. खोलीत कुणाचीच चाहुल लागत नव्हती. आपल्याकडे एखादे छोटे पिस्तुल असते किंवा निदान एखादे हत्यार, तर बरं झालं असतं असा एक विचार जोसेफच्या मनामध्ये तरळुन गेला.

त्याने अंधारातच चाचपडत काही वस्तु हाताला लागते आहे का ह्याचा तपास करायला सुरुवात केली. सुदैवाने जवळच त्याला एक लोखंडी रॉड सदृष्य काहीतरी हाताला लागले.

“अगदी काहीच नसण्यापेक्षा हे ठिक!!”, असे म्हणुन जोसेफने ती वस्तु उचलली आणि तो अंधारात पुढे सरकु लागला.

खोलीचे पडदे लावलेले होते. खिडकी बाहेरुन येणार्‍या चंद्राचा प्रकाशात ते पडदे उजळुन निघाले होते. त्या पार्श्वभुमीवर खोलीत कोणी उभे असलेच तर त्याची काळी आकृती दिसुन आली असती. परंतु गोल नजर फिरवुनसुध्दा त्याला कोणीच दिसेना.

म्हणजे एक तर खोलीत कोणीच नव्हते किंवा जे कोणी होते ते खाली खुर्चीत अथवा सोफ्यावर बसुन जोसेफच्या हालचालीची वाट पहात होते.

“आपण जे.के.च्या बाबतीत ओव्हर-कॉन्फिडंट तर झालो नाही ना?” असा एक दुबळा विचार जोसेफच्या मनात चमकुन गेला. इथे अंधारात घुटमळत फिरण्यात अर्थ नाही, असा विचार करुन तो हळुवार भिंतीकडे सरकला. चाचपडतच त्याने दिव्यांच्या बटनांचा स्विचबोर्ड शोधला आणि बटन दाबले.

लाईटच्या प्रकाशाने खोली उजळुन निघाली आणि समोरचे दृष्य बघुन जोसेफ जागच्या जागी थिजुन गेला.

समोरच्या बेडवर एक तरूणी अस्ताव्यस्त स्थीतित मृत अवस्थेत पडली होती. तिच्या डोक्यातुन रक्ताचा पाट वाहत जमीनीवर पसरला होता आणि जोसेफ त्यामध्येच उभा होता. त्याचे लक्ष हातातल्या लोखंडी रॉडकडे गेले जो त्या तरूणीच्या रक्ताने माखला होता. ह्याच रॉडने त्या तरूणीचा खुन झाला होता हे कुठलंही शेंबड पोरगं सांगु शकले असते. भिंतीवर दिव्याच्या बटनांचा शोध घेताना लागलेले रक्ताने माखलेले जोसफच्या हाताचे ठसे विखुरले होते. हा सर्व प्रकार पाहुन जोसेफ भांबावुन गेला. त्याने तो रॉड टाकुन दिला आणि तो सावकाश त्या तरूणीपाशी गेला. हळुवार त्याने त्या तरूणीचा चेहरा वळवला आणि नकळत त्याच्या तोंडुन उद्गगार बाहेर पडले…”सोनी!!!”

आश्चर्याचा, भितीचा तो धक्का सावरत होता तोच त्याला मागे हालचाल जाणवली. जोसेफ पटकन मागे वळला. त्याच्या मागे नैना आणि ख्रिस उभे होते.

“नैना .. तु…?? हा काय प्रकार आहे?? जे.के. कुठे आहे??”, जोसेफ म्हणाला..

“ओव्व….. पुअर बेबी…बिच्चार्‍याची एक्स..एक्स.. न जाणो कितवी एक़्स गर्लफ्रेंड इथे मरुन पडली आहे आणि बिच्चारा जे.के. नामक कुठल्या व्यक्तीला शोधतोय..” नैना म्हणाली..

जोसेफ आळीपाळीने एकदा नैना-ख्रिसकडे तर एकदा सोनीकडे बघत होता.

“..कोण जे.के. रे जोसेफ? मला तर अश्या नावाचं कोणीच माहीत नाही. मी आणि ख्रिस इथे आलो तेंव्हा आम्ही पाहीलं की तु तुझ्या ह्या गर्लफ्रेंडचा खुन केला आहेस.. कारण ती तुला कुठल्यातरी कारणावरुन ब्लॅकमेल करत होती. तुझ्यासमोर रोशनी आणि तिच्या संपत्तीची हाव होती. सोनीने जे काही गुपीत होते ते व्यक्त केले असते तर कदाचीत तुला सगळ्यावरच पाणी सोडावे लागले असते, अर्थात जे तुला नको होते.

तिने तुला गप्प रहाण्याबद्दल पैसे मागीतले आणि ते देण्यासाठी तुला भेटायला इथे बोलावले. तु इथे आलास आणि तिचा निर्घुणपणे खुन केलास.”, नैना

“हे साफ खोट आहे..तु मला जे.के.बद्दल सांगीतलेस म्हणुन मी इथे आलो. मी सोनीचा खुन नाही केला.. तुम्ही.. तुम्हीच मारलंत तिला..” जोसेफ रागाने थरथरत म्हणाला..

“होss?? आम्ही मारले? सांगुन बघ पोलीसांना. सोनी तुझी एकेकाळची प्रेमीका होती हे तु नाकारु शकत नाहीस जोसेफ. पोलीस ते शोधुन काढतीलच. ह्या रॉडवर, भिंतीवर तुझ्याच हाताचे ठसे आहेत जोसेफ, त्याचे काय करशील.. खोलीभर तुझ्या बुटांचे ठसे आहेत, त्याचे काय करशील?? घरात तुला पकडायला आलेले पोलीस बघीतल्यावर रोशनीला काय वाटेल जोसेफ?? तु निर्दोष सुटलास तरी तुला वाटते रोशनी नंतर तुझ्याशी संबंध ठेवेले???”, नैना..

“का?? का केलेस तु असे..?”, जोसेफ

“जोसेफ!!.. हा ख्रिस आहे ना, फार वाईट्ट माणुस आहे बघ. त्यानेच माझ्या डोक्यात हे भरवले की तु म्हणे रोशनीच्या प्रेमात वगैरे पडला आहेस आणि तु आम्हा दोघांना डच्चु देऊ शकतोस. तसेही तुझे रोशनीशी लग्न झाले आहे… मग आम्ही बिचारे काय करु शकलो असतो..

मग त्यानेच सोनीला इथे आणले. बिच्चारी! तु भेटणार म्हणुन कित्ती खुश होऊन इथे आली होती.. पण तु भेटायच्या आधीच….” असं म्हणत रोशनीने आपले बोट वरती केले..

“त्यामुळे आता एक तर तुरुंगात जायची तयारी ठेव.. नाही तर शहाणा हो, आणि आपला प्लॅन पुर्णत्वास न्हेण्याचे बघ..”. नैना

“काय मुर्खपणा आहे..!! कोण कुठला तो ख्रिस, त्याच्या बोलण्यावर तु विश्वास ठेवतेस?? तुला वाटलेच कसे मी असं करेन म्हणुन??”, जोसेफ सारवासारव करत म्हणाला..

“असुही शकेल.. तसे असेल तर उत्तम. पण मला रिस्क घ्यायची नव्हती. तेंव्हा रोशनीला हटवायचे काम ह्या आठवड्यातच करायचे, नाही तर तुला ह्या खुनात कसे अडकवायचे ते ख्रिस योग्य प्रकारे जाणतो…”

“..पण.. पण ह्या पुराव्यांचे??”, जोसेफ भिंतीकडे हात दाखवत म्हणाला..

“त्याची काळजी तु नको करुस…ते सर्व सांभाळायला ख्रिस समर्थ आहे.. फक्त एक आठवडा जोसेफ.. एका आठवड्यात काम पुर्ण झालं पाहीजे, नाहीतर काय होईल हे वेगळे सांगायला नकोय..” गंभीर होत नैना म्हणाली आणि तेथुन बाहेर पडली.

जोसेफने एकवार ख्रिसकडे बघीतले. त्याचे नरभक्षक वाघासारखे डोळे जोसेफकडेच रोखुन पहात होते.

जोसेफसुध्दा लगेच घाई-घाईत बाहेर पडला.

*********************************************

जोसेफ आपल्या लायब्ररीमध्ये डोक्याला हात लावुन बसला होता. व्हिस्कीचे दोन-चार पेग रिचवुनसुध्दा त्याला ह्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता.

उद्या जर खरंच मला ह्या प्रकरणात गोवले तर रोशनी माझ्यावर कित्ती विश्वास ठेवु शकेल. पहिल्यापासुनच तिच्या डोक्यात हे आहेच की जो-तो तिच्यावर नाही, तर तिच्या पैश्यावर प्रेम करतो. अश्यातच ह्या खुनाच्या प्रकरणात मी अडकलो तर??

आणि समजा तिने दाखवला विश्वास, सुटलो निर्दोष, तरी नैना आणि ख्रिस गप्प बसणार नाहीत.

नैनाला मार्गातुन दुर करायला कदाचित वेळ लागणार नाही. पण तो आडदांड काळाभिन्न ख्रिस? त्याचे काय? त्याला कसा उडवणार?

ख्रिस खरंच महाभयंकर माणुस आहे. पुढे-मागे तो माझा खुन करायलासुध्दा मागे-पुढे पहाणार नाही. त्यापेक्षा योग्य मार्ग हाच आहे की प्लॅन-अनुसार रोशनीचा खुन करायचा. नैना आणि ख्रिसला त्यांचा हिस्सा देउन मोकळे करायचे आणि उरलेला पैसा आपलाच आहे.

जोसेफला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. फक्त एक आठवडा आणि त्यातच त्याला रोशनीचा खुन करायचा होता. प्लॅन सगळा ठरलेला होता. फक्त तारीख ठरवायची होती.

जोसेफने टेबलावरचे कॅलेंडर चाळले आणि तारीख आणि वार ठरवला.. येत्या शनिवार..

त्या दिवशी रोशनीला संध्याकाळच्या फारश्या अपॉंईंट्मेंट्स नव्हत्या. शनिवारी संध्याकाळी रोशनीला आणि जोसेफला एका पार्टीचे आमंत्रण होते. रोशनीला त्या पार्टीला जायचेच होते आणि ’शनिवारी संध्याकाळी वेळ ठेव’ असे जोसेफला अनेकदा बजावुन सुध्दा झाले होते.

“हीच संधी साधता येईल..”, जोसेफ विचार करत होता..”काही तरी फालतु कारणं सांगुन आपण पार्टीला येऊ शकत नाही असे रोशनीला सांगुन बघायचे. बोलता बोलताच तिला प्रेमाने औषधाच्या गोळ्या घातलेला ज्युस प्यायला लावायचा. ती पहील्यांदा प्रेमाने हट्ट करेल. त्यावरुन आपल्यात भांडण घडवुन आणायचे आणि घरातुन निघुन जायचे आणि ठरल्याप्रमाणे थोड्यावेळाने परत यायचे.

येताना ठरलेल्या ठिकाणावरुन नैनाला बरोबर घ्यायचे. नैना गाडीच्या डीक्की मध्ये लपुन बसेल. ती घरात येऊन रोशनीचा ड्रेस घालेल. रोशनी त्यावेळेस गुंगीत असेल. तिला गाडीच्या डिक्कीत टाकायचे आणि गाडीत लपुन बसायचे. नैना गाडी घेउन सरळ ’लोट्स हिल्स’ वर येईल. तिथे रोशनीला गाडीच्या ड्रायव्हींग सिट वर बसवुन गाडी ढकलुन द्यायची.

त्यानंतर लगेचच पार्टीचे ठिकाण गाठायचे. बोलता बोलता पार्टीला यायचा आपला मुड नव्हता आणि त्यामुळेच रोशनीबरोबर आपले भांडण झाले होते. परंतु नंतर आपला विचार बदलला आणि रोशनीला पार्टीत सर्प्राईझ द्यायला आपण आलो असे दोन-चार लोकांना सांगुन द्यायचे. मात्र रोशनी तेथे पोहोचणारच नाही. थोड्यावेळ वाट बघुन रोशनी सापडत नाही म्हणुन पोलीस कंम्लेंट करायची. नंतर जे होईल ते बघता येईल..”

जोसेफच्या मनात सगळा प्लॅन तयार होता.

*************************************************

रोशनीचा खुन करायचा हाच एक मार्ग त्याच्या डोळ्यासमोर असला तरीही त्याने सर्व पर्याय खुले ठेवले होते. ऐनवेळेस संधी मिळालीच तर तो नैना आणि ख्रिसला मारुन टाकायला मागे पुढे पहाणार नव्हता.

जोसेफचे कामातुन लक्षच उडाले होते. एकीकडे रोशनीच्या वागण्यातला बदल, तिचे बदलेले रुप त्याला आकर्षीत करत होते, तर दुसरीकडे नैना आणि खिसचा खुनशी चेहरा त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता.

एक एक दिवस पुढे सरकत होता आणि शेवटी तो दिवस उजाडलाच.. शनिवार….

 

असे म्हणतात, ’नं करत्याचा वार शनिवार’. शक्यतो प्लॅन केलेली कामं शनिवारी करण्याचा प्रयत्न केला तर ती पुर्णत्वास जात नाहीत, असा एक रुढी समज आहे. जोसेफ-नैनाच्या बाबतीत काय होणार? रोशनीच्या खुनासाठी निवडलेला दिवस- शनिवार त्यांच्यासाठी अपशकुनी ठरणार का? कोण जिंकणार? कोण हारणार? वाचत रहा “लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह” भाग-९

[क्रमशः]
भाग १०>>

26 thoughts on “लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ९)

 1. अनिकेत Post author

  फुल्ल टु बिझी आणि टेन्स्ड दिवसानंतर खरं तर पुढचा भाग पुर्ण करायचे जिवावर आले होते. परंतु नुकतेच आमचे ब्लॉगर मित्र श्री विक्रांत देशमुख ह्यांनी पुढचा भाग आजच टाकण्याची विनंती केली.

  त्यांच्या विनंतीस मानाचा मुजरा करुन पुढचा भाग समर्पीत.

  This is for you my friend Vikrant..

  Reply
 2. mipunekar

  अनिकेत,

  आम्ही सगळे समजू शकतो पण पुढे काय होणार याची उत्कंठा आम्हाला पण स्वस्थ बसू देत नाही ना ..
  तरी पण सवड काढून हा भाग टाकल्या बद्दल धन्यवाद…

  Reply
 3. RUCHA

  Mast… Story chavi chavi ni vachayla maja yet….
  Roz sandhyakali pahile kam navin post aahe ka pahne hech aste….
  Mast suspence tayar zala aahe hya post madhe…
  Pudhchi post kadhi?????????

  Reply
 4. sushma

  Aniket dada,
  khup interesting aahe sarv plz pudhl bhag lavkar taka (thumala wel nahi samzu sakte pan pudhe kay honar ya wicharane dokyatil bhuga sarkha bhun bhun karto)…….

  Reply
 5. Rup

  Aniket tumhi khupach mast lihita. Shevat kay hoil kon jane pan shevati satyacha vijay nakki asnar ase vatate. Ha bhag khupach sundar aahe. Pudha bhag lavkau yevu de.

  Reply
 6. Ek Vachak

  Plsssssssssssssssss pudhcha bhaag lavkarat lavkar post kara…….utsukata far tanali geli aahe………………

  Reply
 7. Vikas Adhav

  O praji balle balle!!

  Plz. Pudhacha Bhag Lavakar Prakashit Kara.

  Mala Ekda Tumhala Bhetayeche Aahe. Jar Tumachi Anumati Asel Tar.

  Reply
 8. विक्रांत

  अरे.. कालची माझी कॉमेंट इथे दिसतच नाहीये… (पुन्हा लिहीतो)

  “धन्यवाद मित्रा….. ही विनंती माझी एकट्याची नसून तुझा ब्लॉग अतिशय रस घेऊन वाचणार्‍या लाखो (हो लाखो…. २ लाख हिट तर झाल्याच आहेत की) वाचकांची आहे. अश्या कथा लिहीण्यात तुझा एकदम हातखंडा आहे बघ. कोण म्हणतं की आयटीच्या या युगात मराठी साहित्याला घरघर लागलीये? एकदा हा ब्लॉग, याचे वाचक आणि प्रतिक्रीया पहा म्हणावं… एवढ्या मोठ्या संख्येने लोक उड्या मारत आहेत ते काही उगाच नव्हे.
  अभिनंदन मित्रा. आणि ’पुणेकर’ आहेस म्हणून उगाच लोकांना तिष्ठत ठेवू नकोस. उत्कंठा तुटायची वेळ आली आहे. पटापट पुढचे भाग टाकत रहा. आम्हाला तुझी प्रतिभा माहित आहे. त्यामुळे कथा कशी लवकर लवकर लिहीत जावीस अशी इच्छा आहे.
  वाचकांच्या या विनंतीचा विचार व्हावा.”

  Reply
 9. guddu

  jar Roshanila laiposkshan chi mahiti hoti,aani tichakade paisa hota tar tine aadhich ka sarjari keli nahi? ti Naina aani tichaya figar var itki varsha jalat ka rahili? I want an answer.

  Reply
  1. अनिकेत Post author

   मला वाटतं कथेमध्ये ह्या प्रश्नाचे उत्तर मी दिलेले आहे 🙂

   Reply
  1. अनिकेत Post author

   गोष्टीचे नाव सुध्दा तेच आहे “लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह”, रोशनीची एकच इच्छा होती, तिच्यावर जर कोणी प्रेम करावं तर ते त्याने रोशनीवर कराव, तिच्या पैश्यावर किंवा कृत्रीम सौदर्यावर नव्हे.

   हरकत नाही, आपणास पटले नसेल तरी. मला जे वाटलं, पटलं ते मी लिहीलं, ते सगळ्यांनाच पटले पाहीजे असे माझ्यासाठी बंधनकारक नाही

   धन्यवाद

   Reply
 10. ngadre

  लिही लिही मित्रा.. लवकर पुढचं लिही आणि कादंबरी छापून नव्या युगाचा अर्नाळकर हो..

  Reply
 11. guddu

  mag tine kayam ashich rahave ase nahi vatat ka tumhala? jar prem khare asel tar yachi garajch navhti.aani tumchaya mahitisathi sangate ki ek stree tevhach kurup rahu shakte,jevha sundar disayche sare marga banda hotil.ugach konaci vat baghat koni ugly rahanar nahi

  Reply
  1. अनिकेत Post author

   tumcha kahiteri gairsamaj hotoy. She was not waiting for somebody. She just wanted to be like that. But since when Joseph emerged into her life, she felt that happiness in the life, the world was beautiful to her and that time she felt to be pretty and nice and good looking so that she can match joseph and the beautiful world. Her uglyness was then hurting her more.

   Anyways, everybody have their own opinions and i respect that. If you don’t liked it, that is still fine with me.

   Reply
 12. Monal

  hi aniket

  tumhi kharch khup chan lihita mi tumchya saglya katha wachlya aahe. khupch aavadlya.pudchya
  bhagachi vat pahtey lavkar post kara hi apeksha aani tumcha busy scheduled madhun aamchya sathi vel kadhlyabaddal khup dhanyawad.

  Reply
 13. विक्रांत

  गुड्डु,
  मुळात मला तुमचे मुद्देच पटले नाहित. त्यावर चर्चा नंतर पण….
  कथा ही कथा असते. त्यात वास्तवाचं प्रतिबिंब उमटायलाच हवे हा अट्टाहास कश्यासाठी? आणि तसेही ते लेखकाचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नावाचा प्रकार असतो की नाही? सिनेमात नाही का आपण पटत नसल्या तरी काही गोष्टी या ’सिनेमॅटीक लिबर्टी’ म्हणून स्वीकारतोच … तसेच ना?
  अनिकेत अतिशय सुंदर पद्धतीने कथा फुलवतोय… मला तर भयंकर आवडतेय त्याची ही रहस्यकथा….

  Reply
 14. gayatri

  Hi .
  Roshani madhil badal tar apekshit hotach,
  pan soni !!!!!!!!!!!!!!!
  madhech ali aani punha storymadhe navin palti…….
  interest vadhat chalala aahe,maja yetey
  asach pravas chalu dya.aamhi ahotach sobtila……….

  Reply
  1. gayatri

   Hi .
   Vikrantne guddusathi dilela reply mazyamate barobar aahe. mala tari story madhe kontihi atishayokti watli nahi……any way,

   Roshani madhil badal tar apekshit hotach,
   pan soni !!!!!!!!!!!!!!!
   madhech ali aani punha storymadhe navin palti…….
   interest vadhat chalala aahe,maja yetey
   asach pravas chalu dya.aamhi ahotach sobtila……….

   Reply
 15. sushma

  I agree with vikrant & gayatri….story madhe ji palti marli geli aahe thi palti khup interesting aahe…….pahikya peksha mala tar jast interesting watal sagal wachayla…
  Aniket dada…..
  pudhil bhag lavkar taka wat pahti aahe aturtene……

  Reply
 16. hemlata

  katha chhan ahe. pan ek gosht khatkate. ekhada baap paishya sathi swatachya porila kasa maru shakel? to jatanna paisa var gheun janar kay?

  Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s