डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

सटवाई

26 Comments


सटवाईची पुजा

॥श्री॥ सटवाई प्रसन्न

तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आमचे धाकटे अपत्य रुग्णालयातुन काल सुखरुप घरी आले.

आज त्याचा ह्या सुंदर जगातला पाचवा दिवस. ह्या दिवशी ’सटवाई’ची पुजा केली जाते. ह्या पुजेनंतर एक रिकामा कागद आणि पेन पुजेच्या ठिकाणी ठेवले जाते. ह्याबद्दलची महाजालावरुन मिळालेली अधीक माहीती अशी –

सटवाईची पुजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक सर्व हिंदू लोक शिशू जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा करतात. बालकच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो.

असं म्हणतात, ह्या वेळेस सटवाई कुठल्या तरी रूपाने येऊन बाळाच्या कपाळावर त्याचे भविष्य लिहिते. त्यासाठीच एक कोरा कागद आणि पेन पुजेच्या ठिकाणी ठेवतात. व्ह्याच वेळेस बाळाच्या ललाटीची रेखा आखली जाते.

जेंव्हा बाळं मधुनच जागेपणी किंवा झोपेत हसते तेंव्हा आजी लोकं म्हणतात, सटवाई आली. तिचं बाळाला हसवते असते.

सटवाई बद्दलची एक पौराणिक कथाही ह्यावेळेस सांगीतली जाते, अर्थात ही कथा मला आजच कळाली. ती कथा अशी –

रोज रात्री आपली आई कोठे जाते, असा प्रश्‍न सटवाईच्या मुलीला पडला, तेव्हा तिने आईला याबाबत विचारले. आईने उत्तर देण्याचे टाळले; परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाइलाज झाला. मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते, असे उत्तर दिल्यानंतर ती मुलगी सटवाईला म्हणते, “तू दुसऱ्याचे भविष्य लिहितेस, मग माझे काय भविष्य आहे, ते मला सांग.” सटवाई यावर म्हणते, “तुझे लग्न तुझ्यापोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल.” हे भविष्य ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ही मुलगी घेते. काही दिवसांनंतर एक रात्रपुत्र तिच्या झोपडीजवळील नदीवर पाणी पिण्यासाठी येतो. योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते. त्यामुळे तिला दिवस जातात.

कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ते ती जंगलात टाकून देते. ते मूल एका राजाच्या हाती लागते. तो त्या मुलाचे पालनपोषण करतो. मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो. तेथे त्याला त्याची माहीत नसलेली आई भेटते; तो तिच्या प्रेमात पडतो. आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आईचे, म्हणजेच सटवाईचे भविष्य खोटे ठरले आहे, असे समजून ती युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते. दोघांचे लग्न ठरते; परंतु मूल टाकताना त्याच्याभोवती गुंडाळलेले कापड युवकाने जपून ठेवलेले असते. हे कापड पाहिल्यानंतर, आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात येते.

थोडक्‍यात, सटवाई सांगत असलेले भविष्य कधी खोटे ठरत नाही, असा या कथेचा आशय आहे.

॥ बाळाला उदंड निरोगी आयुष्य लाभो, त्याला आयुष्यभर भाग्याची साथ राहो आणि त्याच्या नशीबी एक सुखी, समृध्द आणि समाधानी दीर्घायुष्य येवो हीच सदीच्छा ॥

मी येतोच आहे महाजालावर झळकायला :-)

मी येतोच आहे महाजालावर झळकायला 🙂

Advertisements

26 thoughts on “सटवाई

 1. congrats Aniket

 2. तुमच्या बाळाला उदन्ड आशीर्वाद.

 3. माझ्याकडून एक पापी.

 4. अनेक आशीर्वाद

 5. balala god god papa……….

 6. ॥ बाळाला उदंड निरोगी आयुष्य लाभो, त्याला आयुष्यभर भाग्याची साथ राहो आणि त्याच्या नशीबी एक सुखी, समृध्द आणि समाधानी दीर्घायुष्य येवो हीच सदीच्छा ॥ 🙂

 7. सटवाईची पूजा हा वैदिक संस्कार नसला तरी निगमशास्त्राने रूढ केलेला पारंपारिक संस्कार आहे. हिंदूधर्मात वेदांइतकेच महत्त्व निगमशास्त्राला उर्फ परंपरेला आहे. वेदाना -आगमाना न मानणारे, म्हणून पाखंडी म्हटले जाणारे बौद्ध व जैन हे संप्रदायदेखील निगमशास्त्राला मान्यता देतात. याद्वारे वेदपूर्वकाळापासून मानववंशाने केलेल्या ज्ञानसंचयाशी बाळाचे नाते जोडले जाते. बाळावर या ज्ञानसंचयाचा वापर करण्याची सक्ती असत नाही, पण त्याने या त्रानसंचयाचा अनादर करू नये अशी या विधीमागची भूमिका असावी.

 8. Abhnandan… Balala ek Papi…. Chala atta pasun Junior Aniket chi vaat pahne suru……..

 9. “योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते. त्यामुळे तिला दिवस जातात.”

  Thank god aaj-kal ase kahi hot nahi; nahi tar population control chi fulltu vat lagli asti…

 10. आपल्या मुलाला अनेक आशिर्वाद…

  तो सुपारी आणि कागद पेनाचा फोटो आवडला.

 11. hi aniket
  he kay purn photo tak n balacha.baghu tr de junior aniket kas distoy te.
  balala khup khup aashirwad ani god papa.

  • मोनल,

   अगं रहस्यकथा लिहुन लिहुन लोकांची उत्सुकता ताणुन लावायची सवय लागली आहे त्यामुळे पुढच्या पोस्टपर्यंत ही एक झलक 🙂

   धन्यवाद.

 12. khupach channn…
  photos suddha chan aahet…….

 13. दोघाचे ही हादि क अभिन द न. बाळाला निरोगी आ णि उदंड आयुष्य ला भो.

 14. मंडळी,

  प्रतिक्रियांबद्दल आभार

 15. hardik abhinandan satvaichya kathe baddal mala dekhil aaj tujhya kadun kalale

 16. Dear Aniket, Congratulations!!!!!!!!!!!
  Tumchya balacha photo post kara aani nav pan kalva.

  Once again Cogratulations.

 17. Congratulations and loads of wishes. 🙂

 18. Malahi aajach kalal ya baddal dhanyavaad

 19. Abhnandan…

 20. Bachacha yek photo lavkar yevu de?????????

 21. Abhinandan……………..
  balache naav kay thevles………….?

 22. Congrtaaasss Aniket khup khup shubhecha 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s