इंद्रजाल कॉमीक्स


बालपणी शाळांना उन्हाळी सुट्या लागल्यावर पहीला उद्योग असायचा तो पुस्तकांची लायब्ररी लावुन त्यातुन पुस्तक आणणे. ह्यात बहुदा पहीला नंबर असायचा तो “इंद्रजाल कॉमीक्स” चा. वेताळ, मॅन्ड्रेक्स आणि लोथार ह्यांच्या साहसी कथांनी भरलेली चित्रमय कथानकं म्हणजे जीव का प्राण होते. असं म्हणतात गुगलवर सर्वकाही मिळते म्हणुन जरा गुगला-गुगली केली आणि हिंदी आणि इंग्रजी भाषेतुन संगणकावर उतरवुन घेता येतील अशी अनेक इंद्रजाल कॉमीक्स मिळाली.

खरं तर मराठीमधुन मिळाली असती तर मज्जा आली असती, पण हे ही नसे थोडके. दुधाची तहान ताकावर भागवली म्हणा.

खालील दुव्यांवर टिचक्या मारुन तुम्ही त्या त्या भाषेतल्या कॉमीक्सच्या वेबसाईट्सवर जाऊ शकता.

हिंदी भाषेतुन कॉमीक्स
इंग्रजी भाषेतुन कॉमीक्स

Advertisements

6 thoughts on “इंद्रजाल कॉमीक्स”

 1. अरे लय भारी….मी तर किती भांडायचो लेका ह्या कॉमिक्ससाठी . एक वेगळीच झिंग यायची हे वाचताना…जसा काही एखादा स्लिक खजाना सापडलाय. नंतर थोड्या दिवसानंतर फिरोज खानचे पिक्चर बघताना अशी झिंग यायची..उदा…कच्चे धागे, कुर्बानी,धर्मात्मा ते दयावान पर्यंतच..नंतर त्याचा तो खास टच झम्प्यासाठी ह्या इंद्रजाल कॉमिक्स सारखाच गायब झाला.
  एनीवे ही तुमच्या ब्लॉगवरची माझी पहिलीच कमेंट….तुमची व झम्प्याची थीम शेम टू शेम आहे.पण तुम्ही येथे झ्म्प्याचे खापरपणजोबा आहात. झम्प्याचा नुकताच आठवड्यापूर्वी जन्म झालय अगदी तुमच्या धाकट्यासारखा.त्यामुळे त्यालापण तुमच्या आशीर्वादांची व शुभेच्छांची खूप गरज आहे..
  कळावे आपला झम्प्या झपाटलेला…

  1. ब्लॉगवर स्वागत आणि आपल्याला लेखनासाठी शुभेच्छा 🙂

 2. jhakaas….
  sampoorna lahanpan ya comics madhe gela ahe 🙂 ha kajina best ahe. he online milel asa kadhi watala suddha navhata. thanks!!

 3. मला मराठी इंद्रजाल ह्या लिंकवर मिळाले
  http://indrajal-online.blogspot.com/2010/07/blog-post.html
  तुम्ही दिलेल्या लिंक मुळे मला हिंदीतून का होईना पण इंद्रजाल वाटायला मिळाले हा आंनंद व्यक्त करायला शब्द नाही. त्याच लिंकमध्ये वर दिलेल्या लिंकचा पत्ता सापडला. इंद्रजाल मुळे आमच्यासारख्या शेतकरी माणसाचा चांगला टाइमपास होईल.
  आपले पुन्हा एकदा आभार ……….
  मुलगा झाला त्याबद्दल अभिनंदन चांगले नाव ठेवा … आमच्या मुलाचे नांव युगंधर आहे.

 4. अरे scribd.com ह्या साईटवरून मी चक्क ३ जीबी कॉमिक्स डाउनलोड केले आहेत… तुम्ही पण शोध आणि डाउनलोड करा..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s