“थेऊरची पार्टी”, खरंच इतकं काय वाईट झालं?


“थेऊरची पार्टी” अनेक कारणांनी रंगली. युवतींचा लक्षणीय सहभाग, त्यांचे तोकडे कपडे, दारूचा साठा वगैरे वगैरे. त्यावर अनेक लोकांनी भाष्य करुन आजची पिढी कशी बिघडली आहे ह्यावर फुकटची मतं ऐकवली. पण मला अजुन कळत नाही खरंच ’ते’ इतकं गैरे होते का?

ह्या बद्दलची माझी वैयक्तीक मतं इथं मांडत आहे. कदाचीत पुर्णपणे चुकीची असतील, पण ती माझी मतं आहेत आणि माझ्या मतांचा मी आदर करतो.

– माझ्या दृष्टीने एकमेव गैर प्रकार ज्यावर पोलीसांनी कारवाई केली तो म्हणजे अनाधीकृतरीत्या मद्य विक्री. कायदा ह्याला मान्यता देत नाही आणि त्यामुळे पोलीसांनी केलेली कारवाई ही योग्य आहे.

– कॉलेजमध्ये शिकत असताना दारू पिऊन धांगडधिंगा घातला ह्यावर मिडीयाने आणि अनेक लोकांनी टीकेची झोड उठवली. मला वाटतं ह्या गोष्टीला दोन पैलु आहेत आणि ह्याचा दुसरा पैलु समजावुन घेणे देखील महत्वाचे आहे.

वर्षाऋतुमध्ये माळशेज घाट, ताम्हीणी घाट, लोणावळा सारख्या ठिकाणी अनेक विकृत मद्यपिंचा दंगा चालतो. काही दिवसांपुर्वी तर ताम्हीणीच्या थोडं पुढे काही मद्यपी नग्नावतारात बेधुंद होते. ह्याचा त्रास तरूणींबरोबरच सहकुटुंब आलेल्या परीवारांनादेखील होतो. पण असल्या प्रकाराची मिडीयाकडुन कितीशी दखल घेतली जाते?

ह्या उलट मी म्हणेन ह्या विद्यार्थ्यांनी पुणे शहराबाहेर एखाद्या फार्महाऊसमध्ये ’फ्रेंडशीप डे’चे औचित्य साधुन पार्टी केली तर बिघडले कुठे? समाजाला त्याचा पहील्याउदाहरणाइतका तर त्रास नाही ना झाला? जो काही गोंधळ त्यांनी केला तो त्यांच्या त्यांच्यात केला. नाही कुणाची छेड काढली नाही कुणाला त्रास दिला.

ह्या पार्ट्या रोज रोज खचीतच होत नसणार अन्यथा रोजच ८०० लोकांना पकडल्याच्या बातम्या झळकल्या असत्या. मग एखाद्या खास दिवशी एकत्र जमुन केली पार्टी तर बिघडले कुठे?

मान्य आहे तुम्ही शिकण्यासाठीच आला आहात, पण म्हणुन सर्व काही सोडुन देवुन केवळ शिक्षणच घ्यायचे असा त्याचा अर्थ होतो का? आणि कुठल्या शिक्षणाच्या आपण गप्पा मारतोय? ते शिक्षण जेथे केवळ जातीमुळे एखाद्याला ६०% ला प्रवेश मिळतो आणि ९०%वाला डावलला जातो? शैक्षणिक वर्षात शिकलेल्या किती गोष्टी आपण व्यवहारात आणतो? च्यायला डावीकडुन एक रेल्वे इंजीन येते आहे, नैऋत्येकडुन दुसरी रेल्वे येत आहे. मध्ये एक खांब् आहे, त्यावर एक पक्षी बसला आहे तो काही काळाने ताशी २० कि.मी. प्रती/तास वेगाने उडाला तर जेंव्हा ह्या दोन रेल्वे गाड्या एकमेकांना क्रॉस करतील तेंव्हा पक्ष्याची दिशा सांगा!!.. असली गणीत किती जणांना व्यवहारात उपयोगी पडतात?

मला वाटतं आजची पिढी रिअलॅस्टीक आहे. कामाच्या वेळेला काम आणि एन्जॉयमेंटच्या वेळेस एन्जॉयमेंटचे तंत्र त्यांना चांगले जमलेले आहे.

मी दारू पिण्याचे समर्थन करत नाहीये, पण एन्जॉयमेंट म्हणजे दारू पिणे हे त्यांना कुणी शिकवले? ड्र्ग्ज घेणे हे कदापी समर्थनीय नाही, कायदा सुध्दा त्यावर बंधन घालतो. पण दारु ही बहुतांश सर्वसामान्यांच्या जिवनात विराजमान झालेली आहे हे आता आपण मान्य करायलाच हवे. आणि दारू पिणे पाप आहे तर नॉन-व्हेज खाण्याचं काय? निदान दारू मुळे कुठल्या मुक्या प्राण्याचा जिव तरी जात नाहीये? सणासुदीला कित्तेक लोकं मुक्या प्राण्यांच्या जिवावर आनंद साजरा करतात. ते योग्य का?

“…अरे मग आधी शिका, कमवायला लागा आणि मग स्वतःच्या पैश्याची प्या वाट्टेल तेवढी दारू..” असंच ना?
मला एक सांगा, नोकरीला लागल्यावर, संसारात रमल्यावर ह्या पार्टीत जी मज्जा होती ती मिळु शकेल? कश्यावरुन ह्या पार्टीतली सर्वच्या सर्व मुले बापाच्या पैश्यावरच पार्टीत आली असतील? कश्यावरुन त्यांच्यामधलं कुणी पिझ्हा हट, बिपीओ, कॉल-सेंटरसारख्या ठिकाणी काम करत नसेल?

– तोकडे कपडे.. कुणी शिकवले त्यांना हे? आपल्या आधीच्या पिढीनेच ना? हेलन, किमी काटकर, मंदाकीनी, झिनत अमान ह्यांचे नाचतानाचे, पाण्यात चिंब भिजलेले गरम शॉट्स आधीच्या पिढीनेच तर ’खो’ देऊन आपल्या पिढीला दिले आहेत ना?
.. म्हणे तरूणाई पाश्चात्यांचे अनुकरण करते… का? आधीची पिढी नव्हती करत? साहेबांनी कोट, टाय घालायची पध्दत काय आपल्या राजा महाराजांकडुन आली? बेलबॉटम पॅन्ट्स, मोठ्ठे गॉगल्स, लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह गाड्या हे कोणी आणले. राजेश खन्ना किंवा अमीताभ बच्चन सारखी हेअर स्टाईल आधीच्या पिढीने केलीच ना? मग ह्या पिढीने त्यांच्या लाडक्या सुपर-स्टार्सचे अनुकरण केले तर कुठे बिघडले?

तोकड्या कपड्यांची कुणी सक्ती करत नाही. ज्याला पाहीजे तो घालेल, ज्याला नाही, तो नाही घालणार. जर घालणार्‍याला त्याचे काही कौतुक नाही, जर बघणार्‍याला त्यात विशेष वाटत नाही तर बाकीच्या लोकांनी का म्हणुन ओरड करावी? पुर्वापार चालत आलेली नऊ-वारी साडीची जागा सहावारी साडीने घेतलीच ना? अनेक महीला सहावारी साडीकडुन सलवार-कमीज घालु लागल्याच ना? फॅशन बदलतच असते.. त्याचा इतका का बाऊ करायचा?? मला तरी कळत नाही!!

– परप्रांतीय, काही झालं की परप्रांतीयांवर खडे फोडुन मोकळे व्हायचे. हे म्हणजे ’आमचा तो बाळ्या, दुसर्‍याचे ते कार्ट’ प्रकार झाला. मला वाटतं दोष परप्रांतीयांचा नाही, दोष असलाच तर तो स्वातंत्र्याचा आहे. मी स्वतः ’सिंम्बायोसिस महाविद्यालयाचा’ विद्यार्थी होतो. आपल्याच प्रांतातुन नागपुर, सांगली सारख्या ठिकाणांहुन आलेली मुलं अभ्यासाला दुर्लक्ष करुन ’इतर’ गोष्टींमध्ये रमलेली पहात असतानाच, नेहमी टीकेचा विषय ठरलेले ’बिहार’ सारख्या ठिकाणांवरुन आलेली मुल आणि मुली अभ्यासात वरचढच नव्हे तर पहील्या पाच क्रमांकामध्ये येत असताना पाहीलेले आहे. उद्या आपली मुलं दुसर्‍या ठिकाणी राहील्या गेल्यावर, आई-वडीलांचा धाक नाही म्हणल्यावर थोडी का होईना वहावत जाणारच.

– परदेशी नागरीक त्यांची संस्कृती आपल्या इथे आणतात म्हणुन आपण ओरडतोय, पण आपणही नाही का आपली संस्कृती तिकडे जाऊन रुजुवायला बघत. त्यांची संस्कृती आपल्या नजरेतुन वाईट असेल त्यांच्या नाही.

– आजच्या पिढीला ’करीयरची’ पुर्ण जाण आहे, आपल्या पेक्षा किंवा आपल्या आधीच्या पिढीच्या पेक्षा जास्तच. एके काळी ग्रॅज्युएट आणि बॅकेत नोकरी हा एकमेव करीयरचा मार्ग होता. पण आज करीयरच्या कक्षा विस्तारल्या आहेत आणि त्याची चांगली जाण विद्यार्थ्यांना आहे. सिंम्बायोसीसच्या बिझीनेस मॅनेजमेंटच काय परंतु इतरही अनेक विभागातुन कॅम्पस मधुन नोकरी मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचे पगार पाहीलेत तर डोळे पांढरे होतील. नोकर्‍या देणार्‍या कंपन्यांना पैसे जास्त झालेले नाहीत कि ते उगाचच्या उगाच अश्या वाया गेलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवसायात समावुन घेतील. त्यामुळे मला नाही वाटत बहुतांश विद्यार्थ्यांना आपल्या फुकटच्या सल्यांची गरज असावी.

काय चांगले काय वाईट हे वडीलधार्‍या नात्याने ज्याने त्याने आपल्या पाल्यांना जरुर सांगावे. परंतु सरसकट सर्वच पिढी वाया गेलेली आहे हे म्हणणे चुकीचे आहे. ४०-५०वर्ष वयाची माणसं सुध्दा दारु पिऊन रस्त्याच्या कडेला बेवारस पडलेली असतात म्हणुन ती संपुर्ण पिढीच दारूडी, वाया गेलेली होती म्हणणे चुकीचे आहे.

सर्वात शेवटी दोन छोट्या गोष्टी आठवल्या त्या सांगतो ..
एक पुरातन गोष्ट – एका गावात एका पापी स्त्रीला गावाच्या चौकात उभे केलेले असते आणि गावकरी तिला दगडं मारत असतात. त्याचवेळेस तेथे कोणी एक संत येतात आणि ते म्हणतात की ह्या स्त्रीला दगड मारण्याचा अधीकार फक्त त्याच व्यक्तीला आहे ज्याने आयुष्यात कधीही पाप केलेले नाही. त्यानंतर एकही दगड त्या स्त्रीवर फेकला जात नाही.

एक नवयुग (का काहींच्या मते असलेले कलयुग)तील गोष्ट – एका विमानतळावर एक माणुस हातामध्ये बिअरचा कॅन आणि सिगारेट घेउन विमानाची वाट बघत असतो.

एक सभ्य गृहस्थ त्याला म्हणतो.. “तुम्ही तुमचा पैसा सिगारेट किंवा बिअरमध्ये नसता घालवला तर तुम्ही खुप काही करु शकला असता.”

तो माणुस म्हणतो.. “जसे? काही?”
तो सभ्य गृहस्थ मिस्कीलपणे म्हणतो.. “जसे ते सर्व पैसे वाचवुन एक दिवस तुम्ही ते समोर उभे असलेले विमान विकत घेऊ शकला असता..”

तो माणुस, त्या सभ्य गृहस्थाला विचारतो…”मग? ते विमान तुमचे आहे का?”
तो सभ्य गृहस्थ नाही म्हणतो.

हातातली सिगारेट पायाखाली चिरडुन, बिअरचा एक घोट घेउन तो माणुस म्हणतो.. “गुड, तुमच्या माहीतीसाठी सांगतो, ते विमान माझे आहे..”

त्या माणसाचे नाव असते “विजय मल्या”….

अनेकांच्या दृष्टीने माझे मुद्दे पुर्णपणे चुकीचे असतील, थोतांड असेल, हरकत नाही, शेवटी मनात जे आले ते लिहीलं…

83 thoughts on ““थेऊरची पार्टी”, खरंच इतकं काय वाईट झालं?”

  1. धन्यवाद मैथीली. एकाही पॉझीटीव्ह उत्तराची अपेक्षा मी केली नव्हती. परंतु १० लोकं म्हणतात म्हणुन तेच बरोबर असे मानणार्‍यातला मी नाही.

 1. मित्रा अनिकेत, खरे आहे. पुर्ण सहमत.
  या गावातल्या दादाला किंवा राजकारण्याला हप्ते मिळाले नसतील. या गावकर्‍यांना अडवणुक करायला एक निमित्त मिळाले. आणि पोलिस तरी उत्पन्नाची अशी सुवर्णसंधी कशी सोडतील?
  मला एक गोष्ट कळत नाही. नेमकी तक्रार कश्याची होती? ध्वनीप्रदुषण म्हणाल तर जयंत्या-पुण्यतिथ्या-लग्ने- निवडणुका-वाढदिवस अश्या अनेक प्रसंगी कान फाटतील अश्या संगीतावर हीच नाटकी मंडळी बीभत्सपणे नाचत असतात. आत्ताच काय यांना त्रास? पार्टीचे निमित्त साधून पाण्यासकट सगळ्या वस्तूंचे भाव यांनीच अव्वाच्या सव्वा केले असणार, त्याचे काय? आणि मुळात गावाबाहेर पार्ट्या करायच्या नाहीत तर काय शनिवारवाड्यावर करायच्या? आजकाल सर्वच क्षेत्रात ’सांस्कृतिक सेन्सॉरशिप’ आलेली आहे. कोणीही उठते आणि कश्याविरूद्धही कंप्लेट करतात. कुठे चाललाय हा देश?

  1. हो.. सगळ्यात पहील्यांदा माझी प्रतिक्रिया हीच होती, की कंम्लेंट नक्की कश्याबद्दल आहे? जर खाजगी ठिकाणी दारू पिऊन संगीतावर नृत्य केले तर बिघडले कुठे? आणि कुठे होतं नाही? इतर कोणी करत् नाही?

   एक म्हण ऐकली होती.. “तुम करे सो चमत्कार, हमने किया तो बला*र???”

   ड्रग्स घेत म्हणलेले “हरे कृष्णा हरे राम” डोक्यावर उचलुन धरले पण “चोली के पिछे..” माधुरीच्या गाण्याला कोण धिंगाणा!! मला वाटतं कुठ्ल्या गोष्टीवर कसे रिऍक्ट करावे याबाबतीत काही तरी प्रोटोकॉल करणे गरजेचे आहे

 2. Nothing wrong has happened at all except for noise if that has upset villagers.

  Rest all is just blown out of proportion.

  Couldn’t agree with anything so much.

  You have written absolute truth.

  Agreed agreed agreed..

  Nachiket

 3. त्यांनी गैर केलंय हे नक्की. –
  १) कर्कश्श आवाजात संगीत लावणे – याचा बाजूच्या रहिवाशांना त्रास होतो. त्यांना असले काही प्रकार करायचेच होते तर त्यांनी पबमध्ये जायला हवे होते. पब साऊंड प्रुफ़ असतात. त्यातील आवाज कितीही मोठा असला तरी त्याचा बाहेर च्या लोकांना त्रास होत नाही. सहाशे लोकांना पबचा काय प्रचंड खर्च येईल हे जाणून केवळ पैसे वाचविण्या करिता त्यांनी खेडेगावात ही पार्टी केली असणार.
  २) तरूणींनी असल्या पार्ट्यांना व असल्या कपड्यांत जायचे आणि नंतर काही प्रकार (विनयभंगासारखा) झाला म्हणजे पुन्हा पोलिसांनाच कामाला लावायचे हे नेहमीचेच झाले आहे. मागे एकदा नववर्षाच्या रात्री दोन वाजता तोकड्या कपड्यातील दोन महिलांचा मुंबईत विनयभंग झाल्याचे आपल्याला ठाऊक असेलच. मुळात रात्री दोन वाजता मद्यधुंद अवस्थेत तिथे हजर असणे ही त्या महिलांची चूक नव्हती काय? पोलिसांना इतर काही उद्योग आहेत की नाहित?

  1. १. कर्कश्श आवाज काय फक्त तरूणाईच्या पार्ट्यांचेच होतात का? गावाकडच्या लग्नात काय होते? माईकवरुन कुठल्या नातेवाईकाने काय प्रेझेंट दिले हे सांगणे आणि ते सुध्दा हजारो लोकांचे.. ह्याने नाही का ध्वनी प्रदुषण होत? घोड्यावरुन मिरवणुक, फटाके, बॅन्ड-बाजाचा ताफा रस्त्यावरील वाहतुकीला नाही का अडथळा ठरत? राजकारणी लोकांच्या सुरक्षेमुळे कित्तेक क्रिटीकल लोक रुग्णालयापर्यंत पोहोचु शकत नाहीत आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागतात. नजिकच्या काळातच अश्या घटना घडल्या आहेत, त्याचे काय?

   २. दुसरा मुद्दा मान्य!

 4. सर्वप्रथम मी महेंद्रजीन्च्या ब्लॉगवरील माझी प्रतिक्रिया येथे देतो..व नंतर आणखी काही मुद्दे मांडतो…
  ————————————————————————————————————————-
  “””चांगले वाईट यां सापेक्ष गोष्टी आहेत…त्यांची एक ठराविक व्याख्या नाही..
  ह्यातील कितीतरी मुलेमुली कदाचित अशी असतील जी पुढे जाऊन नक्की काहीतरी करतील.(चांगल्या अर्थाने) वर महेंद्रजी बोलल्याप्रमाणे सहवासाचा खूपच परिणाम होतो घरातल्या वातावरणापेक्षाही जास्त..ही सर्व मुले उच्च मध्यमवर्गीय घरातील आहेत बहुतेकांचे भविष्य उज्वलच असावे… त्यामुळेच ही सोंगे त्यांना सुचत असतील तर काही अंशी तेही बरोबरच आहे..पण निन्म मध्यमवर्गीयाची मुलेपण त्यांच्या बजेट व कुवतीनुसार एन्जॉय करतातच की…हे वयच असे आहे..
  इथे प्रॉब्लेम हा झाला असावा की बोलतात न मॉबला डोके,चेहरा नसतो…त्यामुळे होते काय की एकटेपणे जी गोष्ट करायला माणूस घाबरतो ती अशा ठिकाणी बिन्धास करतो. असो..मोठा विषय आहे…

  मला फक्त एवढेच म्हनावेशे वाटते तुम्हाला जशी मजा करायची असेल तशी करा. फक्त काळजी एवढी घ्या की दुसऱ्या कोणालाही वा स्वत:लाही कसलाही त्रास होता कामा नये. नाहीतर मजेचे रुपांतर सजेत होयला वेळ लागत नाही. आशा करुया की ह्यातून ते सगळे काही बोध घेतील…

  ……आणी नाही घेतला तरी कोणाच्या बापाचे काय जाणार आहे.”””
  ————————————————————————————————————————-
  लोकशाही असल्याने प्रत्येकाला आपली मते मांडायचा एक आगाऊ अधिकार मिळालाय..जरी त्यात कसलाही विचार आचार नसला तरी चालेल…प्रत्येकजण उपदेशासाठी घोड्यावर स्वार..असो…
  अशा गोष्टी घडतात घडणार..त्यात काय चांगले काय वाईट हे प्रत्येकजण आपल्या अनुभवातून/दृष्टीकोनातून/कुवतीतून ठरवत असतो…
  माझ्या दृष्टीने ह्या बातमीत एवढे काही विशेष नव्हते….आणी मिडीयाने/पोलीसांनी तिला एवढे उचलून धरले असेल तर त्यातही मला काही विशेष वाटले नाही.(प्रत्येकाला चघळायला काहीतरी हाडूक पाहिजेच असते.)..मला तर ही बातमी ब्लॉगवरच समजली…असो…

  मला असे वाटते की जी निरर्थक न्यूज इतरांनी चघळ चघळली तिच्या नादाला लागण्यापेक्षा (ज्यातून काही साध्य होईल असे वाटत नाही.) इथे असलेल्या आपल्या मित्रांच्या कामाची काही बातमी असेल व तिच्यावर काही चर्चा घडतील तर ते जास्त चांगले…

  अजूनही काही लिहू शकतो…पण वर मी जे मत मांडलंय त्यावरच मु*ल्यासारखे होईल म्हणून आवरतो…

  1. बरोबर आहे झंम्प्या.. कदाचीत मलाही माझ्या पोस्टमधुन तेच म्हणायचे आहे. ह्या बातमीत उगाचच चर्चा करु, आजची पिढी कशी बिघडली आहे हे ओरडण्यापेक्षा काहीतरी कंस्ट्रक्टीव्ह करावं

 5. अनिकेत ,
  मला तुझे म्हणणे काही अंशी पटते . मागील पिढी आपल्यातील चांगले वाईट सर्व पुढे हस्तांतरित करते आहे .खरेच वर्षा सहल , तिरुपती बालाजी ला जाने , शिर्डीच्या साई बाबाच्या दर्शनाला जाऊन परत येताना हीच मागची पिढी दारू पिऊन येते .याच पिढीतील वारी च्या वेळी कंडोम ची आवश्यकता पंढरपुरात आणि वारीच्या मार्गावरील गावात वाढते . हीच पिढी चटक मटक सिनेमे पाहते .हीच पिढी मॉंल मध्ये वीकेंडला मजा करते .मग नवीन पिढीचे चुकले कुठे ?असे वाटणे स्वाभाविक आहे .
  ही नवीन पिढी देखील विचार करते . आज मी या विषयावर माझ्या विद्यार्थांशी चर्चा केली . मुलांनाही ही बातमी पटली नाही . मी विचारले , तुम्हाला वाटते का? तुमच्या आजूबाजूला असे प्रकार (मालवण ) घडतात का ? तर उत्तर हो असे आले …मग तुम्ही यावर काय करणार ? या प्रश्नावर मुलांनी खूप साकारात्मात्क उत्तरे दिली …म्हणजे सगळी पिढी वाईट नाही …तेही विचार करतात , ठरवतात , काळजी करतात ….आणखी ही बरेच काही चांगले आहे …

  1. सुमेधा, धन्यवाद. वारीचा मुद्दा चांगला मांडलात आणि तो पटला देखील.

 6. पार्टी अरेंज करताना दारू बाळगण्याचा परवाना लागतो. तो त्या मुलांकडे नव्हता.

  पोलिसांनी कारवाई केली ती त्यांच्या धिंगाण्यामुळे त्रासलेल्या गावकरयांनी तक्रार केल्यावर.अशा तक्रारी येऊर, पनवेल सारख्या ठिकाणी भरपूर येतात. त्यामुळे अशी तक्रार नवी नाही. इथे मोठ्या प्रमाणावर मॉबची धरपकड झाली , तो पण तरूण-तरुणींचा हेच त्याचं वेगळेपण आणि न्यूज-वॅल्यू.

  कुठल्याही ’सन्माननीय’ वृत्तपत्रात ’तोकडे कपडे’ हा इश्श्यु नाही. गॉसिप पेपर मध्ये असेल तर त्यात किती पाणी आणि तिखट घातलेले असते आणि टी.आर.पी साठी न्यूज-चॅनल्स कोणत्या थराला जातात हे हे सुज्ञास सांगणे नलगे. सजग पत्रकरीता हा एक वेगळा मुद्दा आहे. आपला विषय वेगळा आहे.

  आपल्या शिक्षणपद्धतीत घोटाळे आहेत म्हणुन रिलॅक्स व्हायला जमून दारू प्या हे काय लॉजिक मला कळले नाही.आणि त्यात काय हरकत आहे असं तुम्ही विचारता हे कसं काय?

  दारु कोणी का प्यावी, दारू पिण्याचं समर्थन करता येतं का हा खूप दूरचा मुद्दा आहे. २५० मुलं तितक्याच मुली जमलेल्या ठिकाणी दारू असणार, सगळे मिळून मौजमजा करणार आहेत अशा ठिकाणी ‘तुम्ही’ जाल का? तुम्ही पालक असाल तर ‘आपल्या मुलाला’ पाठवाल का? आणि मुलगा अशा ठिकाणी पार्टीला गेल्यावर ‘तुमची’ प्रतिक्रिया काय असेल? या तिन्हीही प्रश्नांची उत्तरं ’नॉर्मल’पणे नाही-नाही-संतापाची असते.आणि जर असं असेल तर ’अशी पार्टी केली तर बिघडलं कुठे?’ हा मुद्दा नल ऍंड व्हॉईड.

  सपोज पार्टी करताना दारु पितात, त्यांनी प्यायली तर बिघडलं कुठे हे काही काळाकरता ’ठिक आहे’ असं म्हटलं तरी कुठं थांबावं, आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय का हे पाहणं याचे संकेत मद्याच्या अंमलाखाली कोण आणि कस पाळणार? आणि नवनव्या प्रयोगांना उत्सुक फ़सफ़सणारी तरुणाई असल्यावर ते होणार तरी कसं?

  त्रासाची दखल कुठल्याही प्रकारच्या तक्रारीनंतर घेतली जाते. कायदा आणि सुव्यवस्था ही प्रत्येक धबधब्यावर आणि पिकनिक स्पॉट वर असावी अशी अपेक्षा जरा अवाजवीच नाही का? हा..तक्रार घेतल्यानंतर दखल घेतली नाही तर तो वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण एका दिवसाच्या पिकनिकमध्ये कोण तक्रार करणार आणि पोलिसांची झंझट मागे लावून घेणार? असा विचार बरेच जण करतात. त्यामुळे कारवाई होत नाही.एकदा का तक्रार लॉज केली गेली की मग त्याचं दळण दळायला मिडीया आहेच.

  ’मोरॅलिटी’/ नैतिकतेच्या कल्पना व्यक्तिसापेक्ष असतात. जे मला इम्मॉरल वाटतं ते आज आधुनिकतेच्या नावाखाली सहज खपून जाईल कदाचित. मला फ़क्त एव्हढंच म्हणायचंय की जी गोष्ट विद्यार्थीदशेत असताना आपण केली नाही, किंवा ती करणं अयोग्य आहे असं आपल्याला वाटत आलेलं आहे किंवा जी आपण उत्सुकतेपायी केली आणि ज्यामुळे कायमची रुखरुख लागून राहिलेय अशा गोष्टींचा तिरहाईत म्हणून सुद्धा पुरस्कार करू नये.

  1. मला नाही वाटत मी माझ्या मुलांना अडवीन. जर मीच माझ्या मुलांवर विश्वास दाखवला नाही तर त्यांच्या ठायी आत्मविश्वास यावा किंवा इतर कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवावा ही अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल. आणि मी आडकाठी केली तरी कश्यावरुन उद्या खोटं नाटं सांगुन माझी मुल अश्या ठिकाणी जाणार नाहीत. उलट विश्वास दाखवला, तर विश्वासाला तडा न जाऊ देण्याची जबाबदारी आणि त्याचे भान मुलांना राहील असं “मला” वाटत.

   आपल्या शिक्षणपद्धतीत घोटाळे आहेत म्हणुन रिलॅक्स व्हायला जमून दारू प्या असे लॉजिक मी मांडलेच नाहीये. मी म्हणतो आहे की तुम्ही लाखो रुपये खर्च केले, मुलांना शिक्षणाला घातले वगैरे ऐकवुन मुलांनी अश्या पार्ट्या करु नये जे म्हणता आहात ते चुकीचे आहे. शिक्षण घ्यावे, पण त्याचा बाऊ करुन इतर सर्व काही सोडुन द्यावे असे वाटत नाही कारण आपली शिक्षण पध्दती तितक्या कॅलीबरची नाही असे मी म्हणतो आहे.

   अधुन मधुन अश्या पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायला माझी ना नाही, परंतु कर्तव्य, करीयर, सामाजीक आणि वैयक्तीक सुरक्षा ह्या मध्ये सांभाळली जावी इतकेच एकमेव मागणे माझे असेल.

   मी पुरस्कार करत नाही, कदाचीत माझ्या लेखातुन तसे वाटले असेल. माझे म्हणणे आहे, ज्याला जे पाहीजे ते करु द्यावे. आजची तरूण पिढी सक्षम आहे.. त्यांना त्यांच्या भविष्याची जाण आहे तेंव्हा प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांच्यावर टीका करु नये. व्यसनं म्हणुन कुठलीही गोष्ट वाईटच, परंतु अधुन-मधुन पार्टी करणे चुकीचे नाही निदान जितका हाईप ह्या गोष्टीचा केला गेला तितका नक्कीच नाही. हीच पार्टी ड्रग्स साठी असती तर नक्कीच कारवाई आणि टीका उचीत आहे

   1. अनिकेत, तू कितीही नीट मुद्दा मांडलास तरी यावर गैरसमज होणारच. तू जे म्हटले आहेस ते परफेक्ट आहे.

    मी ही याच विचारांचा आहे कि मुलांवर वॉच ठेवणे, कंट्रोल करणे अशा मार्गांनी मुले फक्त खोटारडी होतील. डिटॅच होतील.

    त्यांच्यावर विश्वास टाकला की त्यांना तो तोडणे शक्य नसते. मी स्वत: हे अनुभवले आहे. मला घरून कधीच कोणी कशासाठीच “नाही” म्हटले नाही. पण बरे वाईट स्वत:चे स्वत: ओळखायला आणि जबाबदारी घ्यायला शिकवले. म्हणून मी अशा सर्व वातावरणात जाऊनही कधी “स्वत:” आखलेल्या मर्यादान्बाहेर गेलो नाही आणि व्यसनी झालो नाही किंवा इतरांना त्रासदायक वर्तन केले नाही.

    1. सेम हीअर. महाविद्यालयापासुन माझ्या आजुबाजुला, मित्रपरीवारातले बहुतांश जण हे सिगारेट आणि दारू दोन्हीचे भोक्ते होते. पण मला अभिमान आहे की मला दोन्हीचेही “व्यसन” नाही. सिगारेट तर मी कधीच ओढली नाही. दारू जी वर्षातुन फार-तर फार ५-६ वेळा होते ते पण आपली थोडक्यात आटोपलेले असते.
     शेवटी किती वहावत जायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.

 7. विनापरवाना मद्यपान करणे गुन्हा आहे या कायद्याची माहिती तुम्हाला नसावी अन्यथा काय बिघडले यावर भलामोठा लेख तुम्ही लिहिला नसता. गुन्हे दोन होते. बेकायदेशी रित्याची दारूचा साठा करणे व विनापरवाना मद्यपान करणे.
  आपण मद्यपान इतकं सहजपणे घेत आहोत की असे काही कायदे आहेत याची जाण ९९% लोकांना नाही.
  बाकी इतर विचारांशी सहमत. एवढा गदारोळ करण्यासरखे काही नाही. प्रक्षोभक भाषेत निवेदन करण्याइतके हे गुन्हे काही गंभीर नव्हते.

  1. बरोबर ’विनापरवाना मद्यपान करणे गुन्हा आहे’च, परंतु मग ह्या ८०० विद्यार्थ्यांवरच आरोप आणि मिडीया हाईप का? हजारो काय लाखो लोक रोज मद्यपान करतात त्यातील किती जणांकडे हा परवाना असेल? कायदा पाळायचाच तर सरसकट पाळा ना!

 8. ekdam mast… ek funny goshat aathavali… Egypt chya Pyramid var hi “Pudhchi Pidhi purna vaya geli aahe… kahi kaam karat nahi… Dharma bhudnar aata” Ashya arthachi sentences aahet… so the fact of blaming next generation is universal and ofcourse never true…

  but media ne jitka aarada-orada kela to phakt TRP and “Sansanit Khabar” sathi ch hota ase vatate

  1. जे चॅनलवाले व्हीडीओ क्लिपींग्ज अगदी मुलींच्या तळव्यापासुन चेहर्‍यापर्यंत दाखवुन कसे तोकडे कपडे घातले आहेत हे सिध्द करण्याचा प्रयत्न करत होते ते स्वतःच्याच चॅनलवरचे इतर कार्यक्रम, तेथील ऍन्करचे कपडे पहात नाहीत की काय? असा एक प्रश्न मनामध्ये तरळुन गेला

 9. दारू पिऊन धिंगाणा तर गणेशोत्सव आणि इतर तत्सम मिरवणुकीत सुद्धा घालतात.. त्याच काय करणार? मिडिया काय आणि इतर राजकारणी काय.. ज्या गोष्टीमुळे प्रसिद्धी मिळेल.. त्या पुढे आणण्यात ह्यांना धन्यता वाटते..
  मांडलेले मुद्दे पटलेले आहेत.. पण प्रत्येकाने बेताल न वागता एन्जोय करता येत हेही ध्यानात घेतलं तर बरे होईल…

  – मुक्त कलंदर

  1. नक्कीच, वर प्रतिक्रियेत म्हणल्याप्रमाणे कर्तव्य, करीयर, सामाजीक आणि वैयक्तीक सुरक्षा ह्या मध्ये सांभाळली जात असेल तर कुठल्याही गोष्टीत गैर काही नाही

 10. I agree ‘Saheb’… You are really an open minded person..

  Though I have somewhat strong opinions on the kind of clothes the gals wear.. their is also the fact of democracy here.. gals wearing less clothes doesn’t mean that guys have got the license to behave badly with them..

  There is also the matter of trust here.. if the gals do trust the guys they go out with.. if they feel they are in safe hands.. it shouldn’t matter to the villagers or the media or the policemen or the MNS/Shivsena people (who I am sure will have more than 1 comments on the incidence)..

  I also do not agree to the villagers complaint for noise… the same villagers I am sure are louder than this at the times of Ganesh Festival..

  I also would like to say that I felt very proud when I read that you will trust you kids; coz if u don’t, why would others..
  My parents have the same trust in me.. It makes me feel more responsible for myself and I also strive to keep on deserving that trust..

  Its time now that people get over the ‘आजची पिढी कशी बिघडली आहे’ thing.. Todays generation is so strong mentally and financially that virtually they don’t need the previous generation alongside them… yet they do everything and sometimes more for their families than what the elders have done.. they still listen and behave the way their elders want them to behave like..
  Trust them.. at least listen to them before complaining how wrong they are..

  1. Perfectly said Prajakta. I feel the same. Should have added it in the post to make it outstanding 🙂

   About ‘mis-behaving’ thing, i don’t think so it usually happens. We have a example right. You know about whom i am talking about.. the one who cannot be named publicly. No matter how she dress (!?), people behave nicely, isn’t it? 🙂

  2. Prajakta,

   Absolutely correct. Well said.

   Nothing so grossly wrong with new generation.

   We are absolutely fine. Aal ij well.

   Being just a “good boy” or “good girl” doesn’t build the nation.

   We need little bad girls and boys who have atleast some potential of being a rebel and take us ahead..

   vrudhhaani trifalaa choorn khaub jhopaave..

   Only part I dont agree is noise. Any noise which troubles others is principally wrong.

   Let it be Ganeshotsav/ Weddings in Villages or anything else.

   We should not do it just because others do it.

   1. You are right Nachiket.. noise which troubles others is definitely wrong..
    What I am saying is that, the people who make such noise themselves, don’t have the right complain when others do it..

 11. बरोबर ’विनापरवाना मद्यपान करणे गुन्हा आहे’च, परंतु मग ह्या ८०० विद्यार्थ्यांवरच आरोप आणि मिडीया हाईप का? हजारो काय लाखो लोक रोज मद्यपान करतात त्यातील किती जणांकडे हा परवाना असेल? कायदा पाळायचाच तर सरसकट पाळा ना!

  baar vaale haupte detat mhanun ki tya baar cha malak koni tari motha aasami asto mhanun tithe कायदा पाळायचा nahi ! thithe kayada jasta aavashk aahe.

  कर्तव्य, करीयर, सामाजीक आणि वैयक्तीक सुरक्षा ह्या मध्ये सांभाळली जात असेल तर कुठल्याही गोष्टीत गैर काही नाही

  म्हणजे सगळी पिढी वाईट नाही …तेही विचार करतात , ठरवतात , काळजी करतात

  he naki cha barobar aahe !!!!!!!!!

 12. अनिकेत दादा…

  तुमची बहुतेक मत पटतात….

  मिडीयासाठी ती फ़क्त त्या दिवसाची ब्रेकींग न्युज होती…पोलीसांसाठी उत्तम छपाइ झाली….तथाकथित समाजसुधारक व संस्कृती रक्षकांसाठी तर आयत कोलीत होत…”ही पिढी कशी बिघडली…समाजाचा र्‍हास झाला इ..इ. पण हे सगळ तेवढ्यापुरत …प्रत्येकजण आप आपल्या सोयीने स्वार्थासाठी उपयोग करुन घेतोय…..

  उद्या यापैकीच एखाद्या विद्यार्थ्याने जागतिक पातळीवर किर्ती मिळवु दे…आज शिव्या घालणारे उद्या त्यालाच डोक्यावर घेउन नाचतील.

  मी विद्यार्थ्यांच्या कृतीच समर्थन करत नाही पण त्यांनी खुप गंभीर असा गुन्हा पण केलेला नाही…त्यांच्याकडुन चुक झाली असेल तर त्यांची चुक दाखवुन सुधारणा करण हे कर्तव्य आहे.

  1. धन्यवाद मनमौजी. पकडण्यात आलेला दारूचा सर्व साठा सरकारजमा झाला असावा काय? 🙂

 13. अरे यार. मद्य परवाना..मद्य परवाना.. हेच धरून बसण्यात काही मुद्दा आहे का?

  नुसती लीगल भाषा सगळी.

  मद्य परवाना कोणत्याही प्रौढ व्यक्तीला फी भरून मिळतो. तो देण्यामागे पिण्यापासून परावृत्त किंवा कंट्रोल करणे हा उद्देश अजिबात नसतो. तो फक्त रेव्हेन्यूचा (अबकारी) मार्ग आहे. दुकानातही हे परवाने उपलब्ध केले जातात. पार्टी साठी एकत्रित मद्य परवाना सुद्धा मिळतो. तो मद्य परवाना घेऊन मग दारू प्यायली की मग बाकी सगळे योग्य झाले असते असे वाटते का?

  या परवान्यावर “मला आरोग्यासाठी देशी तसेच विदेशी दारूची गरज आहे असे लिहिलेले असते.” फारच हास्यास्पद.

  मुद्दा काय ? विरोध कशाला. काही कळत नाही बुवा.

  1. Right.. I don’t think half the elder generation has this so called “मद्य परवाना”.. still they don’t back off from drinking when they get any chance to do so…

 14. Hi Aniket,
  Barobar…sagale points patatat…pan!
  1. Party keli tar kay bighadale? – party jar 400-500 lokanmadhe honar asel tar nakkich lokanche, Polisache, Media che laksh janar…mag Permission kadhayala kay hote? hya sarvanche Aayate savaj bananyat kay point?
  2. Read reaction of one of the party member in Mirror, He said “We dont know about permission” – Maze mhanane ‘MBA che student asun jar mothypravanavar jar Event arrange karayacha asel tar kay kay goshti MANAGE karavya lagtil he nako ka kalayala’ ani ho kahi kalaadhich ghadalelya Rave party che udaharan samor astana

  Amol

  1. मला वाटतं तुमची प्रतिक्रिया थोडीशी ऑफ-टॉपीक आहे. मुद्दा हा आहे की जे झालं ते खरंच इतकं वाईट्ट आहे का जितकं मिडीयाने दाखवलं.

   आजच्या पिढीचा मंत्राच हा आहे की जे करायचे, ते बेधडक करायचे, मन मोकळं करायचे, कुणाच्या ’बा’ ची पर्वा करायची नाय!! आणि जे करायचे ते Larger than life करायचे 🙂

 15. There is some sort of ambiguity regarding what we call ‘enjoyment’. There are many asking ‘Is drinking is only enjoyment?’. even though I have problem with kind of students who organize such parties, wear some objectionable clothes or consume drugs, I see that provoking ‘value judgment’ or ‘moral stands’ to prove them wrong is not without contradiction. you have pointed out such contradictions well.
  Sometimes I see that such sort of freedom expression, which many will say not really free, are other side of the coin. The good side of freedom, entrepreneurship, students excelling in technology and sciences is what we want. But somehow it cannot be separated with first side. New breakthrough in sciences or technologies, which very few will say meaningless, come with change in our attitude towards values. Values are not very defined and their interpretation changes easily.
  I like the way you expressed your points. And I must agree they generate uncomfort and hence makes reader think.

 16. I totally agree with you, everything is depend upon us, so whats the limit we have to decide that. & I dont think drinking occasionaly drinking s not bad. baki vijay malya cha kissa khup aavdla thats new genaration, with lots of work load, money nd enjoyment

  1. धन्यवाद अंजली, मला वाटतं आजच्या पिढीने स्वतःच्या लिमीट ओळखलेल्या आहेत. मागील पिढीने त्यांचा आदर करावा, विनाकारण पिढी बिघडली आहे म्हणुन बोंबाबोंब करु नये

 17. Hi aniket

  mala pn tuze sagle mudde patle khup mast ani barobar lihils tu.saglyancha pratikriya pn chan
  ani patnya sarkhyach ahe.specily aai vadilancha vishvasacha mudda.tula sangte maza bhau L & T copony la Jr. Engg. astana nehmich ratri ushirapryant office parties attend karaycha mhanun to kadhi
  drink karun ghari nahi aala.Tu pn ek Engg ahes tula mahitch asel office parties kashya astat te.mazya parents ni tyala kadhi adavale nahi tarihi.karn tyana vishvas ahe.
  jo saglyancha parents la asayla hava.shivay occasionaly drink karn kahi vait pn nahi.police na office parties chaltat fakt student parties chalat nahi vatate.
  je kahi zal te chukich hot he matra nakki.to tyancha personal event hota.

  1. असे खुप जणं आहेत मोनल जे प्रवाहाबरोबर वहावत जात नाहीत. थोडा-थोडक्यांमुळे अख्खी पिढीच वाया गेलेली आहे हे म्हणणे चुकीचे आहे

 18. there are a lot of things which are objectionable and are tolerated or ignored. some times certain incidents do get out of proportion treatment.may be they are ‘ making an example’ kind. —just a thought.
  what is your take on the number of young couples sitting on bikes by the road side, mostly in the late hours of evening chatting and —-
  most of them are not locals, but many of them are too. do the parents know that their precious children,( who say they know what they are doing)0 , really know where their children are and what they are doing?

 19. त्यांच चुकलंय आणि अश्या चुका रोज शेकड्यात होतात.. इतकं व्हॅल्यु देण्याजोगं नक्कीच नव्हतं..
  अनिकेत बहुतेक मतं पटली…

 20. सगळे किती सहज बोलून गेलेत नाही, अगदी सहजपणे सगळ्यांनी ह्या गोष्टीचे समर्थन केले आहे. करा पार्ट्या प्या दारू आज पोलिसांनी अडवलं म्हणून उद्या काही अनैतिक प्रकार घडला असता कि झोपलेत का पोलीस? आणि प्रशासन व्यवस्थेला दोष दिला असता तुम्ही-मी सगळ्यांनीच. मिरवणुकीत दारू पिऊन धिंगाणा करतात ते हि चुकीचेच आहे आणि हे हि तितकेच पण मिरवणुकीमध्ये किती पोरी असतात हो? असल्या तर किती मुली तोकड्या कपड्यात असतात? आणि दारू पिऊन झिंग झालेल्या मुली पहिल्यात का मिरवणुकीत?
  नाही का?
  असे लेख वाचून दिसतील अशा मुली मिरवणुकीत पण दिसतील हो लवकरच. कारण पालक नको तिथे ढील देऊन विश्वास आहे म्हणून आपल्या पाल्यांना ह्या गोष्टी करणे म्हणजे काहीच गैर नाही हेच दाखून देतोय न? अरे काय करतोय आपण. अजून १००० लोक जरी म्हणाले न तरी हि पार्टी म्हणजे चूकच आहे.

  1. मिरवणुकीत तोकड्या कपड्यात दिसत नाहीत कारण तो एक पारंपारीक सण आहे. प्रत्येक प्रसंगानुरुप कपडे घातले जातात. तसे नसते तर उद्या मयताला लोकं नटुन थटुन, साजश्रुंगार करुन आले असते ना.

   मला नाही वाटत हा लेख वाचुन मिरवणुकीत मुली दिसतील तुमच्या म्हणण्यानुसार. माझ्या लेखाने इतके चमत्कार होत असते तर सर्व जग केंव्हाच बदलुन टाकले नसते का?

   पार्टी चुक होती का बरोबर हा दुसरा आणि वादाचा मुद्दा आहे. लेखाच्या प्रारंभी म्हणल्याप्रमाणेच ह्या घटनेला दुसरा ही एक पैलु होता जो मला मांडावासा वाटला तो मांडला. हे माझे वैयक्तीक मत आहे ते कुणावर बांधील असावे आणि माझे म्हणणेच सत्य समजावे अशी कुठलीही अवाजवी अपेक्षा मी धरत नाही.

  2. आणि माझ्या पहाण्यात तरी जे क्लिपींग्स दाखवले गेले त्यात कुठलाही युवक किंवा युवती झिंगलेल्या स्थीतीत पाहील्याचे आठवत नाही. ह्यावरुन बहुतेक सर्व जण लिमिट मध्ये होते. मद्यपान केले म्हणजे लगेच मद्यधुंद झाला असा होत नाही. त्यामुळे “दारू पिऊन झिंग झालेल्या मुलीं”चा तुमचा मुद्दा मला पटलाच नाही..सॉरी!

 21. baba re tumacha mulane he kela asta tar chalal ast ka ??
  ek bap jyachavar he wel ali to fakt sangu shakto
  chayla 12-12 tas kask karayce ,hani college cha nava khali he dhande karayche
  kuthe amche sanskar kami padle
  kamyala lagllyawar kay aie chalaychi ti galu det na
  bapachya pishawar kashala maja
  ani tumche pille lahan ahet mhanun thumi kara blog war charcha
  pan he thambavnya sathi kahich karu naka

  1. बेसीकली, मलाच ह्यात इतकं काही गैर वाटत नाहीये, त्यामुळे काही “लिमीट” मध्ये राहुन जर माझ्या मुलाने एन्जॉयमेंट (तुमच्या भाषेतील धंदे) केली तर मला त्याची ना नाही. कॉलेज जिवनात मजा नाही करायची तर कधी करायची? नोकरी धंद्याला, संसाराला लागल्यावर आहेच तें तेच रुटीन.

   मला पुर्ण खात्री आहे, आज ज्या मुला-मुलींवर ताशेरे ओढले गेले त्यातले निम्मी लोकं तर काही वर्षांतच मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर रुजु होतील आणि एक जबाबदार नागरीक बनतील. १२-१२ तास काम / कष्ट करुन बाप उपकार करतो असे वाटत असेल तर मला वाटतं ते चुकीचे आहे. उपकार करायचे असतील तर नका नं जन्म देऊ पोरांना. बापाने कष्ट करुन मुलांना कसं वाढवलं हे दहा वेळा ऐकवायचे आणि म्हातारपणी पोरगा एखाद्यावेळेला बापाला बोलला तर लगेच मुलगा सांभाळत नाही म्हणायचे ह्याला काय अर्थ?

   मला वाटतं जरा स्वार्थीपणा कमी करायला हवा.

   1. घडलेली घटना आणि दाखवली गेलेली घटना यात आरक असू शकतो .ती रेव पार्टी नव्हती .
    त्यात ड्रग्स वगैरे गोष्टी नव्हत्या. त्यामुळे मिडिया ला एक स्टोरी मिळाली एवढेच

 22. अस फक्त आपल्या इथंच घडू शकत. म्हणजे विषयांतर करतो. पुण्यात कसाही वागले तरी चालत. आता त्यांनी पार्टी केली. आणि गोंधळ घातला. आता जर ते योग्य म्हटलं तर गणपतीत दहाच्या पुढे बंदी असते. मग गणपती मिरवणुका किंवा अजूनही काही म्हणा ते सुद्धा दहाच्या पुढे पार्टी अस समजून सोडून दिल तर ते देखील चालणार नाही. मुलींनी कोणते कपडे घालावे किंवा घालू नये हा त्यांचा प्रश्न. उरला प्रश्न तुमच्या परप्रांतिय हुशार गुणी विद्यार्थ्यांचा. तर तेच जे हुशार विद्यार्थ्यांचा पगार पाहून डोळे पांढरे होतात. ते यामुळे की, त्यांना कोणत्या बेसिस वर इतका पगार दिला यामुळेच. माझा गेल्या साडे तीन वर्षांचा अनुभव आहे, की परप्रांतिय सिनिअर/ ज्युनिअर, मित्र ह्यांचे नॉलेज आणि काम बघितले तर नेमका इतका पगार ह्यांना का दिला हाच खूप मोठा प्रश्न आहे. परप्रांतीयांना फक्त ‘बोलबच्चन’ येत. काम नाही. मला परप्रांतीय लोक आवडत नाही. हे जरी खर असले तरी माझ्या अनुभावरून फक्त त्यांना ‘चमचेगिरी’ जमते. काम कधीच करतांना त्यांना पहिले नाही. माझे आत्तापर्यंतचे सर्वच सिनिअर म्हणजे ते बंगाली, मध्यप्रदेशी, यूपी आणि बिहारी होते. सर्वांचे एक साम्य, सगळे दारू आणि सिगारेटचे व्यसनी आहेत. दुसरे साम्य, कुठलाही काम फ़क़्त ‘ताबडतोप करतो’ किंवा ‘वेळेत मी करून टाकील’. म्हणण्याची सवय. तिसरे, त्यांना दुसऱ्यावर काम कसे ढकलायचे हे एकदम उत्तम जमते. आणि चूक घडून देखील ‘चूक माझी नाही’ हे रेटून बोलायची सवय आहे. आपला बाळाच का? ह्याच हेच उत्तर आहे की, आपले अस कधीच खोटे बोलत किंवा थापा मारत नाहीत. आपले मराठी चूक नसतांना ही चूक मान्य करतात. आणि आणखीन एक गोष्ट, मराठी लोक व्यसन करतात. पण अस नाही की जे पाहून इतरांना किळस येईल. मी फक्त माझा अनुभव सांगितला. बस्स! बाकी पार्टीला इतका जो अवाजवी महत्व दिल तितक दिल नसते तर खरंच खूप आनंद झाला असता..

  1. कारणं काही असो, ते व्यवसायात, नोकरी धंद्यात यशस्वी होतात. खोटं बोलुन, चमचेगिरि वगैरे मला वाटतं तुम्ही शोधलेल्या पळवाटा आहेत. तुम्हाला असं म्हणायचं आहे का आपणं कध्धीच खोटं बोलत नाही, कधीच चमचेगीरी करत नाही? बोलण्याचे म्हणाल तर ज्याचे बोलते त्याचे विकते हाच प्रकृतीचा नियम आहे तो त्यांनी पाळला तर गैर काय?

   ह्या पार्टीमध्ये कुठली गोष्ट तुम्हाला किळसवाणी वाटली? मराठी लोकांच तंबाखु, पान खाऊन रस्त्याने पचापच थुंकण्याचे व्यसन काय तुम्हाला कौतुकाचे, जिव्हाळ्याचे वाटते का? सार्वजनीक ठिकाणी वॉश-बेसीनवर, लग्न कार्यालयात घश्यात बोटं घालुन उलट्या काढत तोंड धुणे तुम्हाला प्रशंसनीय वाटते का?

 23. Tumchya Mulane he asa waglels tumhala adel ka?

  saglay manya , ajchya mulana carrerchi jaaniv aahe, they know what is good and wht is bad, pan…asha veli …mulinsathi fakta career chi jaaniv aahe mhanun tyani asa waglela barobar aahe asa nasta ..tyancyabarobar kahihi wait ghadu shakta jyamule tyancha future dhokyat yeil..mag kasla career ani kasla kay? Je kahi karaychay te pramanaat karava. Tyanchya aai-vadilaanchya iccha astat, apeksha astat . Ata he je kahi zalay tymule kiti tari aai-vadil kaljit asatil ki amhi amchya mulana kuthe thevaycha. Kasa aahe na shevti pratekjan aapaaply manaane wagto, saglya goshti janun asto. pan ashyamwagnya mule aai-vadilaanchi badnaami hote. obviously…evdha vel kunakadech nahiye ki amkya-tamkyacha mula, mulinchaya goshti lakshat thevtil..pan mulinchay baabtit kay….daaru chya nashe jar ekhdya mulane kuna eka mulivar jabardasti ( balatkar) karnyacha nusta prayanta jari kela kinwa kharokhar kela tar …tumhi mula asha mulinshi lagna karayla tayar whal???????????????
  mag kay nantar aai-vadilanchya jivala ghor laavun ghari basyach ……..ka careershi lagna laavaycha. ani jari pudhe javun kitihi sucesseful zali ti mulgi tari aayushyabhar tee swtahala tari fasavu shaknaar nahi na. mag te mansik depression….. ani kiti tari kahi. mahnje mulinchya baabtit tari tyani swataha japun rahayla pahije. maja -maja, kadhitarich akartoy na mag kay hotay? ashi manasikata pratyek goshtit mulina karun chalat nahi. Jag kiti pudhe gela na tari ” Men are always men” they don’t change their metality. ek mulga , eka mulivar prem karto.pan tya muline dusrya kunbarobar sadha bolalel pan tyana aawdat nahi. kahi lagna zalele purush baaykone dusrya purusha vishayee boalela aawadat nahi, pan he lekachi office madhe asalelya mulinwar line maraycha sodat nahi.

  Maza pramanik mat aahe: Konihi asu de, kontya hi mothya positionwar asude…je kaahi karyachay te pramanaat karawa. swatahachya maryada swtaha tharvavya…pan he lakashat ghyava ki aapan je wagto je karto te changla aso kinwa waait tyache parinam aaplyasobat aaple aai-vadil, baayko-mulaanwar sudha honar. jaast changulapna hi bara nhave, pan tumchya wagnyaane konala trass honar nahi ani tumchya mula-muleena samajat vavrayla jaaga urnar naahi asa kadhi wagu naye. Life is ‘BOOMRANG’. jevdha dukha, badnaami, kashta tumhi dusryana dyal, tevdha boomrang hovun tumchyakade part yeil.aani he mait astana je lok chukicha waagtat te MURKH astat.

  1. – मला वाटतं माझ्या मुलांबद्दलचे मत मी आधीच प्रतिक्रियेमध्ये दिलेले आहे

   – तुम्हाला असं का वाटतं आहे की ही पार्टी प्रमाणाबाहेर झाली? तुमचा नक्की कश्याला आक्षेप आहे? दारू? (कोण पित नाही? मागच्या पिढीकडुनच तर पुढची पिढी शिकते ना?), मोठ्या आवाजात गाणी? (कोण लावत नाही? गावातल्या सरपंचापासुन राज्यातल्या मंत्र्यांपर्यंत, प्रत्येकाच्या एन्जॉयमेंटच्या वेळेस मोठ्या आवाजात गाणी असतातच.), मुलींचे तोकडे कपडे? (तो त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे आणि मला नाही वाटत तो दखलपात्र गुन्हा आहे किंवा टी.व्ही, न्युजपेपर मध्ये त्यांचे फोटो येण्याइतपत गंभीर बाब आहे. तसे असेल तर सुरुवात बॉलीवाडुन हिरॉइन्सवर गुन्हा लावुन करायला हवी.)

   – मुलगा मुलगी, मेन आर मेन वगैरे मला वाटतं तुम्ही फारच ऑफ टॉपीक गेलात. त्या विषयावर मी काहीच बोललो नाहीये इथे, तो मोठ्ठा आणि वेगळा चर्चेचा विषय आहे.. नाही का?

   बाकी बरंच काही सांगण्यासारखे आहे, पण तुम्ही प्रतिक्रिया आणी प्रत्युत्तर वाचलेत तर बरेचसे मुद्दे कळतील.

   शेवटी तुमची प्रतिक्रिया हे तुमचे वैयक्तीक मत आहे. तुम्हाला जे वाटते ते तुम्हाला किंवा ह्या पोस्टच्या प्रतिक्रियांमध्ये पोस्टला सपोर्ट करणार्‍यांना पटेलच असे नाही!

 24. गैरसमज टाळण्यासाठी पुन्हा स्पष्ट करु इच्छीतो, मी असं म्हणत नाहीये की ह्यात काहीच गैर नव्हते, पण पोस्टचे शिर्षक वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की मी म्हणतोय ज्या पध्दतीने कारवाई झाली ते पहाता त्या पार्टीत इतकं असं काय गैर घडले?

  मदीरापान आणि गाणी लावुन नाचगाणीच चालु होती, तर पोलिसांनी तेथे जाउन थोडं समजावुन, थोडं धाक देऊन सांगीतले असते तरी चालले असते. मिडीयाने तेथे जाऊन तेथील लोकांचे क्लिपींग्स टी.व्ही. वर दाखवणे, त्यांचे फोटो न्युज-पेपरमध्ये फ्रंट पेज वर छापणे म्हणजे जरा जास्तच होते असं माझ प्रांजळ मत आहे;

 25. Hi aniket

  Malahi as watate shital chi mat thodi off toppic aahe.aaj kal cha muli manani vichar nahi kart
  dokya ni vichar kartat.shivay muli tyach mulansobat baher jatat jyancha var tyancha vishwas
  asel rastyavar cha konahi mulacha hat pakdun parties la nahi janar.fakt mulini thodi kaljini rahayla hav
  yevdhach.
  aani sarkh sarkh he lok kay vichart ahe tumche mul as kartil tr tumhala he chalel kay?
  as kay kel tyani? Te lok kay shudh harpanya etki pyayli hoti ka?aani saglech kahi drink karun navti n.
  kuthlyahi aai vadilana aapla mulga mulgi dolat ghari aaleli nahich aavadnar pn eka limit pryant thik aahe.
  jast restiction ghatle tr kashyavarun mul baher he karnar nahi.ti fasvnuk chalel ka parents na?
  asu de ha wishay jast lambvinyat kahi arth nahi shevti pratyekachi aapli mat aahe.

  1. मोनल, शब्द ’न’ शब्दाशी सहमत. मलाही हाच प्रश्न आहे की असं काय केले आहे त्यांनी? टी.व्ही वर कुठलाही मुलगा किंवा मुलगी झिंगलेल्या अवस्थेत, पडलेले किंवा विवस्त्राअवस्थेत नाही दिसले ह्यावरुन एकच सिध्द होते की सर्व जणं आपल्या आपल्या लिमीटमध्येच होते.

   आणि माझी मुलं लिमीट मध्ये राहुन ह्या गोष्टी करणार असतील तर त्याला माझी नक्कीच हरकत नाही. माझी मुलं परीक्षेमध्ये नापास झाली, कमी मार्क मिळवले तरीही माझी हरकत नाही. कारण शैक्षणीक यश हेच आयुष्याच्या यशस्वीतेचे सुत्र नाही. आपण अनेक उदाहरणं ऐकली आहेत ज्यात शाळेतुन काढुन टाकलेल्या मुलांनी आयुष्यात दैदीप्यमान यश मिळवले आहे.

   असो.. प्रवाहाबरोबर डोळे झाकुन अनेक जण वाहवत जातात. एक जण वाईट म्हणाला की कसलाही विचार न करता आपली मतं बायस्ड करतात. प्रवाहाविरुध्द वाहणारे फार कमी असतात हेच मी मानतो.

 26. शीतलताई – पहिली गोष्ट, मराठी टायपिंगचे सॉफ्टवेअर डाउनलोड करा. ते रोमन लिपीतलं अतिभयानक मराठी वाचण्यास अमाप कष्ट पडतात. त्यामुळे कितीही मुद्दे मांडले तरी १०० तले ९९ लोक ते वाचणार नाहीत.

  राहिला प्रश्न तुमच्या मतांचा. इथे वर इतके वेळा हेच चर्चिले गेले आहे. हा सर्व प्रसंग इतक्या मुर्खपणे हाताळला आहे मीडीयाने आणि सरकारने की त्याच्यामागचे खरे प्रश्न झाकोळले गेले. मुळात ज्या मुली तिथे गेल्या त्यांना कल्पना असणार ना की आपल्या वटपौर्णिमेच्या पूजेला नाही तर ओपन पार्टीला बोलावले आहे. आणि त्या सर्व सज्ञान होत्या. तिथे दारू, सिगारेट असणार हेही त्यांना माहित होते. मुलींचा ’सिक्स्थ सेन्स’ तर जबरदस्त असतो असे म्हणतात. त्यामुळे त्याबद्दल उगाच त्रागा करण्यात अर्थ नाही. मीही तो व्हीडीओ पाहिला. कोणी अगदी दारू पिऊन गटारात लोळलाय असे दिसत नाही.
  मूठभर गावकर्‍यांनी कम्प्लेंट केली नसती तर कदाचित पार्टी सुखेनैव आटपून मंडळी पहाट व्ह्यायच्या आत आपापल्या घरी गेली देखील असती. असं काय नेमकं आक्षेपार्ह घडत होतं तिथं? काय होण्याची शक्यता होती? जितका धोका मुलींना अश्या ठिकाणी असतो तेवढाच निर्मनुष्य आडवाटेवर, गर्दीच्या ठिकाणी, एखाद्या वासनांध बॉसकडून, विकृत मनोवृत्तीच्या लोकांकडून असतोच ना?

 27. हनुमानाच्या शेपटीसारखी ही प्रतिक्रियांची शेपटी वाढतच चालली आहे…वाईट याचे वाटते… इतक्या फालतू विषयावर इतकी उथळ मते दोनतीनदा दिली जातात पण इतर कितीतरी महत्वाच्या विषयांवर एकदाही मत व्यक्त करायचा त्रास कोण घेत नाही..हीच का आहे आपली मराठी मानसिकता…NON-PRODUCTIVE विषयावर बोल बोल बोलायचे व जिथे गरज आहे तिथे शेपूट आत घालून तमाशा बघत बसायचे?

  1. झंम्प्या, प्रत्येक गोष्ट productive का non-productive ठरवुनच बोलण्याइतपत भांडवलशाही आपल्यात आलेली नाही. आपण अजुनही जे आपल्या मनाला पटेल, आवडेल त्यावरच बोलतो. त्याचबरोबर कोणत्या गोष्टीवर मत व्यक्त करावे आणि कोणत्या नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. तसेच तुझ्या दृष्टीने एखादी गोष्ट महत्वाची असेल ती इतरांच्या दृष्टीने असलीच पाहीजे असे नाही ना.

   आणि ह्या प्रतिक्रियांमधल्या काही सोडल्या तर बहुतेक सर्व प्रतिक्रिया अनेक लोकांची मत, त्यांचा ह्या फक्त ह्याच गोष्टीकडे नव्हे तर ह्या अंगाने जाणार्‍या इतर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन कळतो. आज ही पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचुन एक जण जरी सच्चा मनाने अंतःर्मुख झाला असेल तरी आपण भरुन पावलो.. नाही का?

 28. भांडवलशाही आलेली नाही १०० % मान्य.
  पटलेले, आवडलेले व्यक्त करावे हेही १००% मान्य.
  प्रत्येकाचे वैयक्तिक मत वेगळे, महत्वाचे विषयही वेगळे हेही १००% मान्य.

  पण तरीही वाईट याचे वाटते की..
  आपली दुसऱ्याच्या चुकांवर मोठ्या तावातावाने बोलायची वृत्ती…
  दुसर्यांना उपदेशाचे डोस पाजायची वृत्ती..
  आमचे संस्कार किती योग्य..बाकीचे कसे बिघडलेले हे दाखवून द्यायचा अट्टाहास…
  दुसर्यांच्या भानगडी मोठ्या चवीचवीने चघळायाच्या हीही सडकी मनोवृत्ती…

  हे बघून/वाचून खरोखरच वाईट वाटते..

  आणी जर ह्या इतक्या शुद्र वा निगेटीव घटनेवर(माफ करा पण हेच माझे मत आहे.) इथे इतकेजण बोलू शकतात तर एखाद्या चांगल्या घटनेवर (PRODUCTIVE शब्द मागे..) प्रतिक्रिया देताना हे लोक आपली मते का जपून ठेवतात. (का त्यांना चांगल्या घटनांवर मतच नसते वा व्यक्तच करता येत नाही?) आणी त्यांनी ते व्यक्त करावे अशी जर मी अपेक्षा केली तर त्यात काही चुकले असे मला नाही वाटत.

  बाय द वे तू म्हणतोस त्याप्रमाणे ह्या प्रतिक्रियेंवरून लोकांचा कोणत्या प्रकारच्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे बर्यापैकी लक्षात आलेले आहे.

  राहिला प्रश्न एखाद्याने अतर्मुख होण्याचा..जर असे खरोखर घडत असेल तर आनंदच आहे…

  1. आता तुझेच उदाहरण घे. कालपरवाच्या साहित्य सूचीमध्ये तुझी मुलाखत या पोस्टवर किती प्रतिक्रया आल्या? कितीजनानी तुझे अभिनंदन केले..काल काय हे सगळे झोपले होते…नाही ना?

   इतक्या चांगल्या गोष्टीवर ह्यांना काहीच मत व्यक्त करता येत नाही की यांच्या मनात याबद्दल काही येतच नाही.काय समजायचे? आणी ह्याच मनोवृत्तीचे मला जास्त वाईट वाटले..म्हणून एवढी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.

   असो ह्यावेळेस तरी माझ्या भावना पोचल्या असतील..

   1. 🙂 मग तेच् म्हणतो आहे ना मी, ती पोस्ट माझी वैयक्तीक कामगीरीची होती त्यामुळे जे मला ओळखतात त्यांनी अभीनंदन केले, बाकीचे स्वतःला रिलेट नसतील करु शकले. त्यामुळे नाही दिली त्यांनी प्रतिक्रिया.

    अर्थात तुझा मुद्दा लक्षात आला माझ्या आणि त्याच्याशी मी सहमतही आहे आणि म्हणुनच मागच्या पिढीच्या लोकांनी जी त्या पार्टीनंतर आजच्या पिढीवर स्तुतीसुमनं उधळली त्याचा निषेध करायला आणि ह्याच घटनेची दुसरी बाजु मांडायला मी ही पोस्ट टाकली.

 29. वाचल्यावर पहिले मी सुद्धा प्रतिक्रिया देणारच होतो, पण हि प्रतिक्रियांची हनुमान शेपटी त्यामुळे जास्त न लिहिता थोडच लिहितो, कारण बरीचशी मते इतरांनी मांडली आहेतच.
  १. जे झालं ते चूकच होते, तुम्ही कदाचित पिल्यावर तोल सांभाळू शकतात पण मला नाही वाटत बाकीचे पण तेवढेच सांभाळू शकतात…
  २. तिथे मुली अर्थातच कीर्तन-भजन करण्यासाठी नव्हत्या गेल्या..मटा कि लोकमत मध्ये मुलींच्या अवस्था काय होत्या हे सांगितले आहेच ते सांगायची गरज नाही…

  अशा कित्येक गोष्टी वर चर्चिल्या आहेत…आणि त्या बरोबरच आहेत…!
  तुम्हाला आधुनिक लोकांना स्वातंत्र्य(वेगळ्याच प्रकारचे) हवं असतं.. पण त्याचे दुष्परिणाम ???

  पुण्यात कित्येक IT मधल्या मुला-मुलींचे मर्डर झाले … रात्री अपरात्री रेप झाले…कशामुळे ???

  आज थांबवलत तर नशीब … उद्या हातातून सगळे निघून गेले तर काय ???

  1. परत परत तेच नाही सांगत, पण एका ओळीला प्रतिक्रिया द्यायला हवी-

   “पुण्यात कित्येक IT मधल्या मुला-मुलींचे मर्डर झाले … रात्री अपरात्री रेप झाले…कशामुळे ??”

   ही लोकं रात्री-अपरात्री पार्टी करतात म्हणुन त्यांचे मर्डर/रेप झाले आणि ही चुक त्यांची आहे असं तुला म्हणायचे आहे का? हे म्हणजे चोर सोडुन संन्याश्याला फाशी देण्यासारखे झाले. जो खुनी/रेपीस्ट आहे त्याला घाबरुन जिवनातला आनंद घ्यायचा नाही का? तुम्ही अश्या लोकांवर आळा घाला ना!, तुम्ही पब्लीक सेक्युरीटी घट्ट करा. अमेरीकेचे तुणतुणे नाही वाजवत, पण तेथे घटनास्थळी सोडा, गुन्हा घडत असतानाच पोलीस किती वेळात पोहोचतात हे आता सांगायची गरज नाही.

   अजुन बरंच काही आहे बोलण्यासारखे, पण इथे लिहीत बसण्यापेक्षा प्रत्यक्षच बोलु ना.. after all you are just 4 cubes away from my desk 🙂

 30. Aniket ,

  I completely agree to your opinions & you whole article. I just liked it.

  I still don’t understand why people create such unnecessary issues & publish the same in the front page of news paper.
  Everybody has its own space & can enjoy. There are so much other issues need to focus on.

  1. Exactly Prachi, that is what i wanted to portray, many people just went off-topic instead of understanding the root cause of this post.

   Thanks anyways!!

 31. Mala tumcha mhana patay Aniket je kahi tumhi bolat te agadi barobar ahe ani naveen pidhila dosh denya peksha Juni pedhe kay kartey hyachya kade koni ka laksha det nahi mothe politicians jeva sana sudina bayaka nachavtat (sorry to tell this fact thsi way)teva tyancya var actions ghetlela me tari vachlela nahi plus media ne he news fakta ekdach dahkavun bandh kele teva ka nahi koni kahi action ghetle sarakha apla naveen pedhe daru pite naveen pedhe dhingana ghalte chukicha vagte aree pan hyach naveen pedhela koni valna lavle ahet jeva ekhdaya mulala tyache vadelach bribe deun admission ghetat te nahi chukat ka mala vaata apan khup parctical ahot nidaan rastya var dhingana tar nahi ghalat jasa kahi mothi loka mhalshej ghatat jaun dhabdhaya kahli daru piun ghaltat ani dusranya tras detat tasa tar kahi nahi zala na
  mag baas tar mala kalat nahi lokana tras kasla ahe ani ata ka te loka adavtat……..

 32. अनिकेत माझ्या छोट्याशा ब्लॉग भ्रमणाचे खालील पोस्टमध्ये मी एक विश्लेषण केले आहे..व माझी अशी विनंती आहे वेळात वेळ काढून ते तू वाचावेस व त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावीस.
  लिंक इथे आहे.
  http://wp.me/p10n1c-5h

 33. sarv mudde kahi patat nahit, tokade kapade ghalun ani daaru piunach fakta party karata yete ka? apan kase vagtoy yache bhaan asaayalaach have. nidaan changanvaad tari kiti karaava? zalya prakaarache 99% lok samarthan karnaar naahit hech khare.

 34. ‘friendship day’ nimittane masti-enjoy kele ithparyant thik aahe, he malahi manya aahe.
  pan he ‘days’ enjoy karnyasathi daru lagtech ka?, mulinni tokade kapade ghatalech pahijet ka?(yere udyoga aani bas khandyawar).yanchya mule ‘hi aajachi tarun pidhi’ aase sambodhale jate.(gavha barobar kidehi rengasale jat aahet)
  aani ha sagala prakar ‘chintamani mandira’ jawalch karayala have hote ka?
  aniket,mi theur jawalch rahate.aani tuzya mahiti sathi sangate ya ‘dhiganyat’ jevadhe sapadale te sagale “AMIR BAAP KI BIGADI AULAD’ hote.(jar garib aasate tar lagechach sutale nasate -remember it)

  2 practical questions:

  1) samaja ha prakar eka khedegavat tuzya ghara jawal (jithe aasale prakar kadhich ghadat nahit) ghadala aasata tar?
  OR
  2) samaja ya dhiganyat tujhich bahin sapadali aasati tar?
  you must comment on this I am waiting…………..

  1. Thanks neha for your comment. I am completely busy in some hard dead-line work. In a day or two i will definitely reply to your comment.

 35. aniket,aata dusara mudda ya prakarachi ji jahirat zali aani jya prakare zali te ayogya aahe he mala 100% manya aahe.
  ulat mi tar mhanate, jase theur che party shots,videos.photos media ne dakhawale agadi tasech “AAPLYA DESHATALYA MAHAN-MAHAN RAJKARANI HASTINCHE PITAL MEDIA NE UGHADE PADAVE”.
  Media saglyat mothi takat aahe,

  jara tochak shabdant mi mat vyakt kele aahe, koni gairsamaj karun gheu naye .mat mandanyache swatantr prattekala aahe.

 36. aniket, tuzya lekhat tu ‘parprantiyancha’ ullekh kela aahe.
  for info :
  Loni kalbhor,kunjirwadi,Naigaon,Peth,Kakdemala,gunjalmala,Hanumantnagar
  ya sarv thikani 3 sept pasun 9.30 vajlyapasun ekachveli chor yet aahet.
  ya choranchi 20-25 jananchi toli aahe, ya sarv gavanmadhe he at a time split hotat.
  hi gav shejari – shejari aahet.ekach veli sarv thikani chor yet asalyamule konihi konachya madtila jau shakat nahi.3 sept pasun konihi ratriche zoplele nahi. sarv lok vastichya madhyavarti thikani jama houn pahara detat.sarvanchya ya prayatnala yash aale aahe.20-25 paiki 2 chor sapadale aahet.aani te “PARPRANTIY” aahet.(Bihari aahet -disanyawarun te maharashtriyan watatach navhate-Khup chop dilyawar samajale te Bihari aahet.)
  hi comment post karnyacha uddesh ha:”Parprantiyancha kad odhanaryani aata tari krupa karun jaage vha!

 37. phar chan ahet tumchya posts mala phar avdalya.
  pan tumhi lihilelya eka story cha second part kasa vachava he nahi kalal. story phar juni ahe ti mhanje PREMACHA AJAB TRIKON. phakt ekch part disat ahe dusra part kasa vachava plz sanga

  thanks

  1. Thanks Ratika. Unfortunately, i haven’t completed that story, so there are no next parts to it 😦

 38. Smita,

  Aniket tu agdi parkhad mate mandli ahesh, ajachi tarun pidhila vastavch bhan ahes, tychakade paisa ahes lublak, arthach tyachya kastchey ahe. pan he sagal eka limit madhye karayala pahijhe.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s