माझी मुलाखत “साहीत्य सूची” मध्ये


कसं असतं ना, एखाद्या गोष्टीची जेंव्हा आपण सुरुवात करतो तेंव्हा ती गोष्ट किती उंचीवर जाऊन पोहोचेल ह्याची आपल्याला कल्पनासुध्दा नसते.

माझी मराठी ब्लॉगींगची सुरुवात अगदी अश्शीच. ब्लॉगींग इंग्रजी भाषेतुन करत होतोच, मग मराठीतुन का नको? म्हणुन ह्या ब्लॉगचा उदय झाला आणि बघता बघता दीड वर्षातच ह्या ब्लॉगच्या माध्यमातुन खुप काही साध्य झाले.

असंख्य मित्र-मैत्रीणी भेटलेच परंतु विशेष नोंद करावी असे म्हणजे श्रीयुत विक्रांत देशमुख, श्रीयुत पंकज झरेकर आणि श्रीयुत दिपक शिंदे. परंतु ह्याबरोबरच इतरही अनेकजण भेटले आणि मेसेंजर, ऑर्कुट, फेसबुकच्या माध्यमातुन भेटत राहीले. ह्याच ब्लॉगमुळे आणि त्यासंबंधीत घडामोडींमुळे अनेकवेळा वर्तमानपत्रात नाव छापुन आलेच परंतु त्याचबरोबर स्टार-माझा कडुन हा ब्लॉग गौरवला गेला आणि त्या ओघाने दुरचित्रवाणीवर सुध्दा झळकायची संधी मिळाली. अर्थात ह्याला सर्वस्वी कारणीभुत वाचकवर्गच आहे. तुम्हा लोकांच्या प्रतिक्रियांमुळे, प्रोत्साहनामुळेच ह्या ब्लॉगवरील लेखन कायम आहे.

हे सांगण्याचे कारण म्हणजे माझी एक मुलाखत ऑगस्ट महीन्याच्या साहीत्य सूचीच्या अंकात छापुन आलेली आहे. ह्या लेखाच्या लेखिका ’मानसी आपटेंन’ मी गडबडीत, अस्ताव्यस्त शब्दात दिलेली मुलाखत नेटक्या आणि सुंदर शब्दात मांडलेली आहे. त्याचीच एक प्रत इथे जोडत आहे.

अर्थात हे सांगण्यामागे कुठेही ’मी’ पणा, इगो किंवा स्वतःची प्रौढी मिरवण्याचा यत्किंचीतही हेतु नाही तर हे सर्व साध्य होत आहे ते केवळ तुमच्यामुळेच आणि त्यामुळेच हा आनंद तुमच्याबरोबर वाटुन घेण्यासाठीच ह्या लेखाचे प्रयोजन. कौतुक करणारे अनेक असतात, पण आपल्यांकडुन मिळालेली कौतुकाची थाप त्या सगळ्यांपेक्षा काकणभर वरचढच ठरते म्हणुन…!

तुमच्या भरभरुन येणार्‍या प्रतिक्रियांपुढे माझा प्रत्युत्तर करण्याचा वेग खुपच कमी आहे. परंतु प्रत्येक प्रतिक्रियामात्र मी आवर्जुन वाचत असतो हे सांगणे न लागे. तुमची प्रत्येक प्रतिक्रिया अंगावर मुठभर मास चढवतच असते.

हा आनंद, केवळ तुमच्या मुळेच…

आभार,
अनिकेत

Share

Advertisements

12 thoughts on “माझी मुलाखत “साहीत्य सूची” मध्ये

 1. अनिकेतच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला गेला……… अभिनंदन…… (अवांतर – तुर्‍यांच्या वाढत्या संख्येमुळे मुकुट भरून वहायला लागला असेल नाही?????)

 2. मनपूर्वक अभिनन्द, अनिकेत. अशीच तुमची प्रतिभा ’दिन दूनी और रात चौगुनी’ बहरत राहो.
  भुन्ग्याचि भुन भुण आता जास्त वाढायला पाहिजे.

 3. सर्वप्रथम मनापासून अभिनंदन!!!

  चला तर मराठी प्रिंट मिडिया ने मराठी डिजीटल मिडीयाची दखल घेतली एकदाची..(द्वक-श्राव्य म्हणजेच टी.व्ही.मिडीयाने याआधीच घेतली)…
  आणी भुंग्याइतके दखल घेण्याजोगे खूप कमीच आहेत…जें आहेत त्यांचीही वेळ आल्यावर दखल घेतलीच जाईल.

  पण यावरच समाधान न मानता पुढे सशक्त असे काहीतरी केले पाहिजे. अनिकेत आम्हा इतर ब्लॉगर्ससाठी तू एक आदर्श आहेस…(एकेरीवर आलो..असे जास्त हक्काचे वाटते म्हणून)..त्यामुळे तुझ्यावर जबाबदारीही वाढली आहे.आणी तुझ्यासारख्याने जर काही करायचे ठरविले तर त्याला चांगला प्रतीसाद्पण मिळेल…

  …प्रत्येक मराठी ब्लॉगरने इतर मराठी साहित्यसृष्टीला असलेला संकुचितपणाचा शाप आपल्याला लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे..नाहीतर सर्वात जास्त नुकसान मराठी भाषेचेच होईल. इग्रंजी ब्लॉगिंग ही एक मोठी इंडस्ट्री आहे. करोडो डॉलर्सची उलाढाल तिथे होते ती सहकाराच्या मंत्रानेच…
  आपणही (मराठी) ब्लॉगर्स इथे काहीतरी करू शकतो असे झम्प्याला वाटते…एक खूप मोठे दालन आपण येणाऱ्या पिढीसाठी उघडे करू शकतो….

  …नाहीतर हजार प्रती विकल्या गेल्यावर सेलिब्रेशन करणाऱ्या मराठी प्रकाशकांसारखी कुपमंडक वृती ब्लॉगर्समध्ये बोकाळायला वेळ लागणार नाही…

  ..असे बरेच अस्ताव्यस्त विचार माझ्या मनात चालू असतात…आज तुझे मनापासून अभिनंदन करताना शेअर करावेसे वाटले….

  …बोलू सविस्तर कधीतरी जर तुला वेळ आणी इंटरेस्ट असेल तर….

  तोपर्यंत असाच छान छान लिहीत राहा…..

  1. हरकत नाही, सवडीने बोलु नक्की ह्या विषयावर

 4. मनपूर्वक अभिनंदन…………
  मराठी पाउल पडती पुढे …………………

 5. तुमची मुलाखत म्हणजे ब्लॉगवरील साहित्याला आता
  हळूहळू वजन प्राप्त व्हायला लागले याची नांदी ठरावी.
  अभिनंदन…!!!

 6. अभिनंदन…!!!अभिनंदन…!!!अभिनंदन…!!!अभिनंदन…!!!अभिनंदन…!!!अभिनंदन…!!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s