वेगळा वेगळा


“मराठीब्लॉग्सविश्व.नेट”, एक अत्यंत सुंदर व्यासपिठ आहे तुमचा ब्लॉग लाखो वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. असंख्य विचार, असंख्य विषय, अनेक व्यक्तीमत्व आणि त्यांना शब्दात बांधण्याचा प्रयत्न करत त्यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलु मांडणारे तितकेच असंख्य ब्लॉग.

माझ्यासाठी, एक काळ असा होता जेंव्हा ह्या संकेतस्थळावर गेलो की वेळ कसा जायचा समजायचे नाही. पण काळानुरुप हेच संकेतस्थळ मला कंटाळवाणे वाटु लागले. नव्याची नवलाई, एक कारण असु शकेल. पण माझे परखड मत असे पडले की आजकाल काहीच्या काही पोस्ट असतात. आहे ब्लॉग म्हणुन काहीही कश्यावरही लिहावं का? माझ्या मते हे प्रत्येकाचे वैयक्तीक मत आहे आणि त्याचा मी आदर करतो. परंतु ह्या फोरमवर जेंव्हा मी जातो तेंव्हा काही निवडक ब्लॉग्स सोडले तर, बहुसंख्य ब्लॉग्स मी न वाचताच पुढच्या पानावर जातो. खरं सांगायचे तर वाचनीय असं काही दिसतच नाही. विक्रांतची “आवरा” ची पोस्ट वाचल्यावर वाटले बहुतांश ब्लॉगर्सना “आवरा” म्हणण्याची वेळ आलेली आहे. (आणि कदाचीत त्यात मी सुध्दा असेन)

हाच विचार मनामध्ये चालु असताना मनात आले, जसे इतरांचे ब्लॉग्स मला कंटाळवाणे वाटतात, कश्यावरुन माझा ब्लॉग इतरांना कंटाळवाणा वाटत नसेल? बस्स..हाच तो विचार होता जो मला असह्य झाला. सर्वजण असतात, त्याप्रमाणेच मी सुध्दा माझ्या ब्लॉगच्या बाबतीत भयंकर पॅशनेट आहे आणि त्यामुळेच कदाचीत हा विचार मनाला झोंबुन गेला. मग ठरवले, बास, माझा ब्लॉग “मराठीब्लॉगविश्वाच्या” यादीतुन काढुन टाकायचा. जेणेकरुन त्या लाखो ब्लॉग्समध्ये निदान माझा ब्लॉग असणार नाही. मला जशी काही ब्लॉग्सचे विषय बघुन चिडचिड होते, तशी निदान कुणाला माझा ब्लॉग बघुन होत असेल तर होणार नाही.

त्याचबरोबर दुसराही विचार, जो सतत माझ्या मनात असायचा की “मी पब्लीक फोरम वर लिहीतो आहे” त्यामुळे कित्तेक गोष्टी.. लिहायची इच्छा असुनही लिहील्या नाहीत.

आज हा ब्लॉग मराठीब्लॉगविश्वाच्या यादीतुन काढुन टाकल्यामुळे इथुन पुढे माझा ब्लॉग हा स्वतंत्र राहील, स्वतःच्या पायावर ठाम उभा, स्वतःच्या विचारांशी घट्ट जोडलेला राहील. आणि म्हणुनच, ह्या भुंग्याने एका फुलावर बसवलेले बस्तान हलवण्याचा निर्णय घेतला. आशा करतो की ही, आणि इथुन पुढे इतर कुठलीही पोस्ट मराठीब्लॉगविश्वाच्या यादीतुन दिसणार नाही. वाचकवर्गाने उजवीकडे दिलेला पर्याय वापरुन ब्लॉगला सबस्क्राईब करुन घेतल्यास नविन पोस्टची माहीती तुम्हाला तुमच्या ई-मेल पत्यावर पोहोचती होईल.

तुम्ही हा ब्लॉग “बुकमार्क” करुन ठेवु शकता किंवा जर तुम्ही माझ्याशी ट्विटर किंवा फेसबुकवर जोडले गेलेले असाल तर नविन पोस्टची माहीती तेथे प्रकाशीत होतेच.

चला तर मग, इथे भेटत राहुच.

24 thoughts on “वेगळा वेगळा”

 1. आजकाल काहीच्या काही पोस्ट असतात. आहे ब्लॉग म्हणुन काहीही कश्यावरही लिहावं का? >>> असे तुला वाटत आहे तर आपण हातभार लावून ते अधिक चांगले करायला हवे… ते सोडून जाण्यात काय हशील??? असो… शेवटी तुझा निर्णय… हा ब्लॉग सबस्क्राईब करुन घेतलेला आहे तेंव्हा वाचन होईलच… शुभेच्छा …!!

  1. तसे नाही रे, तेवढे एकच कारण नाही. पब्लीक फोरमचा प्रश्न आहे. इथे आता माझा ब्लॉग independant झाला. तसेच आधी लिहीताना का कुणास ठाऊक मी वाचकांचा विचार करुन लिहायचो, काय चांगले वाटेल, काय वाईट वाटेल. आता कदाचीत तसे नाही होणार

   1. अस… ठीक आहे. तुझ्या पुढच्या कथेची वाट बघतोय… 🙂 कामेंटात नसलो तरी मी सर्व भाग वाचतोय 🙂

 2. hi aniket
  toozya bolg varchi ekahi post mi vachlyashivay sodat nahi………toozya pudhil likhana sathi toola manapasun shubhechha ……….swatantra blog kelyavar baraych gostinchi mahit kiva lekha toozya blog var mala apkeshit ahet ani mala khatri ahe ata paryant vachle tyapekshahi nakkich ajun jast chan chan vachayla milel

  1. धन्यवाद साधना, ब्लॉगची क्वालीटी उत्तरोत्तर सुधारण्यावरच भर राहील

 3. Hi Aniket

  Tu tuza blog wegla kela he farach chan karn aata tu purn swatantra aahes lihinyasathi.
  Tyamule ajun barch kahi changle vachayla milel hi apeksha aahe ani kharch lihina thambvu nako
  tu khup chan lihitos.Mi tuzya blog chi kiti addict zali aahe he gelya don divsat mala kalal karn mi
  office la gele navte ani ghari net nahi tyamule don divsat blog ch ajibat darshan zal nahi.
  kahich navin vachayla milal nahi.khup boared zal mala.
  All The Best tuzya navin surwatisathi.

  1. धन्यवाद मोनल. तुझ्यासारखेच अनेक वाचक माझा उत्साह द्विगुणीत करत आहेत. तुम्ही लोकांनी ब्लॉगवर दाखवलेले प्रेमच मला हा निर्णय घ्यायला मनोबल देऊ शकले.

   ह्यापुढेही अधीकाधीक चांगले लिहीण्याचा प्रयत्न राहील.

 4. कुणितरी म्हटलच आहे..

  एका विशिष्ट उंचीनंतर कोणताही प्रतिकार होत नाही.. ती उंची गाठली की सगळं सोप होत…

  शुभेच्छा…

 5. अस कसं वाटलं तुला? तुझ्या नोंदी खरंच खूप छान असतात. आणि तसेच म्हणायचे झाले तर तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मी बोर करतो सगळ्यांना. पण बघ, प्रत्येकाचे मत, विचार प्रत्येकाला आवडतील किंवा नावडतील हे त्या व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असते. तुला माहिती आहे का, एकदा माझ्या इमेलच्या चुकीमुळे एकीने मला ‘मुर्ख आयटीवाला’ म्हटले होते. आणि कोणीतरी योगेश म्हणून होता. तो त्याच्या खोट्या इमेल आयडी ने रोज माझ्या नोंदीवर ब्लॉग लिहायचेच बंद कर असे म्हणायचा. आता ब्लॉग लिहितांना दुसर्याला ते आवडेल का हा प्रश्न प्रत्येक ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनात येणारा प्रश्न आहे. पण मला तरी वाटते तू अजून एकदा तुझा निर्णयांवर विचार करावं. तुझा ब्लॉग आणि नोंदी दोन्ही खूप छान असतात.

  1. धन्यवाद हेमंत. मी निर्णयावर नक्की विचार करेन, पण तुर्तास पहातो कसे वाटते आहे ते 🙂

 6. अनिकेत भाउ ,तुम्ही इतक छान लिहता कि तशीही तुम्हाला मराठीब्लॉगविश्वाच्या आधाराची गरज नाहिये….मी सुरुवातीपासुनच सब्सक्राईब केलेला आहे….स्वातंत्र्यदिनाच्या ५ दिवस आधीच स्वातंत्र्य मिळवलत …अभिनंदन…भुंग्याची भुर भुर मात्र अशीच चालु राहु द्या…

 7. ढोबळमानाने जगातले जवळ जवळ ८०% लोक बिनकामाचे आहेत..२०% क्वालिटी लोकांमुळेच जगाला तसा अर्थ आहे. कुठेही गेलो तरी, कितीही शोधले तरी असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे क्वालिटीचा हा रेशिओ ह्यापेक्षा जास्त बदलत नाही…उद्या ऑफिसमध्ये इतर लोक किंवा कलिग्स बरोबर नाहीत म्हणून नोकरी सोडणार का? या जगात आपल्या आजूबाजूला कित्येक नालायक लोक सतत आढळतात म्हणून काय जगणे……..नाही ना…

  इतर फलंदाज चांगली फलंदाजी करीत नाहीत म्हणून सचिन भारतीय टीम सोडणार का?का उलट त्यांना ते कुठे चुकतात ते मोठ्या संयमाने शिकवणार,सांगणार ? त्यांच्यातल्याच एकात नवीन सचिन तो नाही का तयार करणार?

  आजकाल काहीच्या काही पोस्ट असतात. आहे ब्लॉग म्हणुन काहीही कश्यावरही लिहावं का? >>>खरं सांगायचे तर वाचनीय असं काही दिसतच नाही. विक्रांतची “आवरा” ची पोस्ट वाचल्यावर वाटले बहुतांश ब्लॉगर्सना “आवरा” म्हणण्याची वेळ आलेली आहे.>>>>>
  हे कारण होवूच शकत नाही…आवरा म्हणायची वेळ आली तर ते तिथेच त्यांच्या जागेवर जावून सांगायचे..आपल्या अंगणात येवून त्रागा करण्याचा काय फायदा…

  स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे…उत्तमच निर्णय आहे. अभिमान अशा विचारसरणीचा…..

  पण तू जें कारण सांगितले आहे त्याने मी थोडा निराश झालो..स्वत:चा आदर्श निर्माण केला आहेस तू..आणी जेंव्हा नेमकी इतरांना तुझ्या मार्गदर्शनाची गरज असताना.. पळणार तेही इतक्या जाहीरपणे..नाही आवडले आपल्याला.
  कारण प्रत्येकाला नाही पण काहीजणांना तरी तू आपल्यापरीने मदत/मार्गदर्शन करू शकतोस…तिथे आता खूप नसतील चांगले ब्लॉगर्स पण थोडे अजून आहेत तरी..तेही धडपडताहेत आपल्या परीने…..मराठीसाठी हेही नसे थोडके जेंव्हा आपण मराठीत बोलायला लाजतो तेंव्हा ब्लॉग मराठीत काढायचा.. चालू ठेवायचा किती अवघड आहे हे तुझ्या इतके चांगले कोण जाणणार?आणी असा कोणी नवोदित जेंव्हा तुझी ही मते ऐकेल तेंव्हा किती निराश होईल ह्याचा अंदाज आहे तुला ?…
  मी असे नाही म्हणत की तू ह्या नवीन ब्लोगर्सचा गुरु,मसीहा वा तत्सम काही हो. तुला शक्य नसेल तर काहीही करू नकोस…पण चुकीचा पायंडा तर पाडू नकोस….मी अजूनही मराठीब्लोग विश्वाचा सदस्य नाही..पण ती मराठी ब्लॉगर्स साठी खूप चांगली संकल्पना आहे हे तू ही मान्य करतोस….एकेकाळी मराठीब्लोग विश्वाने तुला खूप भरभरून दिले आहे..आता तुझी परतफेडीची वेळ आलेली असताना माघार का घेतोस…विचार कर तुझ्यासारखे सगळेच चांगले वा यशस्वी ब्लॉगर्स असा स्वत:पुरताच विचार करू लागले तर कसे होईल.
  मला स्वतःला तुझ्यासांरखे (चांगले) फक्त ५/६ ब्लॉग आवडले असतील व जें बघून मला स्वत:ला मराठी ब्लॉग काढावा असे वाटले.( माझे लेख वाचण्यासारखे असतात असे मी म्हणत नाही..पण माझा हेतू तर इतरांना माझ्या ब्लॉगमुळे काही मदत वा उपयोग व्हावा हाच आहे…)आणी ह्याचे श्रेय तुमच्यासारख्या ४/५ जणांनाच आहे…बाकीचे लाखो मराठी ब्लॉग्स अजूनही माझी व मी त्यांची भेट होयची वाट बघताहेत..

  असो ही तुझी पोस्ट व विचारसरणी म्हणजे एक टिपिकल पुणेकराची विचारसरणी आहे..आमची इतर कोठेही शाखा नाही.
  आणी याच एका दुराभिमानामुळे मराठी जास्त प्रगती करू शकला नाही..करणार नाही..

  अजूनही खूप काही बोलू/लिहू शकतो…पण एवढ्यावरच थांबतो….

  रागावू नकोस..तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणून एवढे हक्काने बोलू शकलो…नाहीतर कशाला हा एवढा त्रास घेतला असता…कोण तो अनिकेत काय फरक पडणार आहे त्याने एकट्याने अशी अचानक EXIT घेतल्याने…
  तर त्याला एवढेच सांगायाचे आहे..फरक पडतो… खूप फरक पडतो…

  वेगळा…जर तू चार चौघात असशील व काहीतरी दखल देण्याजोगे वेगळे करत असशील तर वेगळा उठून दिसशील..एकटा आहेस म्हणून तुला कोणी वेगळा म्हणणार नाही.

  चुकून कमीजास्त काही बोलले असेल काही तर मोठ्या मनाने माफ कर…शब्दांना महत्व देवू नकोस त्यामागच्या भावना समजून घे..

  1. झंम्प्या, मी लाख कुणाला सांगायला जाईन, पण समोरची व्यक्ती समजुतदार असेलच असे नाही रे. उद्या एखादा म्हणाला माझा ब्लॉग आहे, मला काय पाहीजे ते मी लिहीन. काय लिहावे आणि काय लिहु नये हे सांगणारा तु कोण? मग आली का पंचाईत. आणि कदाचीत माझा ब्लॉग त्याच्या लेखी बकवास असु शकतो ना!

   आणि मराठीची प्रगती, ब्लॉगींग हे काही केवळ मराठीब्लॉग्सविश्ववरच तर अवलंबुन नाही ना? तसेच माझ्या काय किंवा इतर कुणाच्या काय, ब्लॉगची व्याप्ती आणि वाचकवर्गापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तो एकच नाही. ह्या ना त्या मार्गाने तो इतरांपर्यंत पोहोचेलच. शेवटी माझं ब्लॉगींग तर चालुच आहे. अर्थात तुझा मुद्दा मी नाकारत नाही.

   ब्लॉग सुरु केल्यापासुन लिहीताना प्रत्येक वेळेला मनामध्ये एक आड-काठी असायची.. जे लिहीतो आहे ते पब्लीकली प्रकाशीत होणार आहे त्यामुळे लिहीताना आपसुकच मुरड घातली जायची. शेवटी ब्लॉग माझा असला तरीही सार्वजनीक जागी लिहीतानाचे काही एटीकेट्स सांभाळावे लागतातच ना. मग हे बंधन कश्यासाठी?

   शेवटी प्रत्येकाची जशी मत असतात, तशीच माझी आहेत, (अनेक वेळा इतरांच्या दृष्टीकोनातुन ती सायकीक असतात, पण हरकत नाही) आणि त्यामुळे माझ्याच मतांचा मी अनादर नाही करु शकत.

   मी EXIT वगैरे काहीही घेतलेली नाहीये. फक्त वाचकवर्गापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करतो आहे. आज ७०च्या वर लोकांनी ब्लॉगला सबस्क्राईब केले आहे, उद्या ७०० होतील ह्याची खात्री बाळगुनच तर हा निर्णय घेतला आहे.

   बाकी मराठी, ब्लॉगींग संबंधीत कुठल्याही गोष्टीसाठी तु किंवा इतर कोणीही कधीही आवाज द्या, मदतीला हा भुंगा नक्की हजर असेल

 8. Aniket,

  I am extremely sorry because I am writing in English.
  Once in office review meeting the point came about usage of official mail ID. The fact which was put by all of us was the mail is being used as time pass. So many people forward jokes, movies, pictures etc. So can we think of taking some action or putting some filter?

  Boss calmly said – ‘Mail is my business software. I get connected to my customer only with this software. Forget 80% nuisance, at least that 20% authentic use of mail brings us business to feed all of us. So we have to accept this nuisance for 20% of business value addition.

  I am also doing same thing about marathiblogs.net now days. I feel people like you quitting the platform will just make one good initiative weak. Marathi people are known for not supporting each other. Lets not underline it.

  1. Minanath,

   I never said, i’m stopping my blogging, nor i said i won’t co-operate / support anybody. I said i don’t want to publish my posts there for the reasons i mentioned. Marathi peoples are also known for their sticking to their decisions.. मराठी बाणा!!!, and i’m doing just that.

 9. aniket dada ………….
  mi tuza pratek lekh wachla aahe………………..mala tuza blog khup aavdto……………..
  yapudhe manat aad-kathi n thuwata chagle lekh wachayla bhetil yacha aanand hotoy……………
  ………BEST LUCH………………….

 10. मी तुमचा ब्लॉग नियमित पाने वाचतो – जरी कमेन्ट नाही केलि कधी तरी सुद्धा पण आजचा ब्लॉग वाचून काही सांगावासा वाटल म्हणून लिहितो आहे – मी फक्त एक वाचक आहे . मज़ा स्वताच ब्लॉग नाही – लेखनी हे माजा कम नाही हे माला माहित आहे – मी उपलब्ध वेळात कही चांगले मराठी वाचावे या साथी मी काय करतो ? मराथिब्लोग्विश्वा वर जातो – तिथे माला सगले ब्लॉग एकत्र दिसतात – त्यातले काही बारे दिसतात ते वाचतो बकिच सोडून देतो – आनंद घेतो अनागला चिक्तावुन घेत नाही कोंताच ! कही शिक्न्य जोगे असेल तर ते मात्र घेतो !

  तुमच्या सारखेच कही ब्लॉग वाचावे असे आहेत – कामित कमी १०-१२ तरी – तय सगल्याच बुक मार्क Is not practicle . अणि एवढ्या भार्म्भर मेल येत असतात अजुन नविन मेल invite करायची इच्छा नाही .

  अणि पब्लिक फोरम – आहो तिथे राहिला नाहीत म्हणून ब्लॉग हा पब्लिक फोरम नाहीये ? दुनिया वाचानार्च न ?? लोक पुस्तक विकत घेवुन वाचतात अणि मग त्या वर हाणामारी करतात न ?
  सो मी तरी त्या पोर्टल कड़े सोय – इंडेक्स/टेबल ऑफ़ कंटेंट पेज इन वर्ड doc असच बघतो – अणि माज्या मते बरेच से तसाच बघतात –

  बॉस जास्ती सोचने का नाही – जादा सोचने से इरादे कमजोर होते है असला काहीतरी तुमाला संगवासा वाटते – I थिंक the वे यू लुक at it – एक्सिट करुन तुमि लोकका पर्यंत पोच्न्याचा सहज उपलभ असलेला पर्याय सोडत आहात असा वाटत आहे .
  आज ७०च्या वर लोकांनी ब्लॉगला सबस्क्राईब केले आहे. उद्या ७०० व्हावे म्हणून एक्सिट ? असा पोलिटिकल विचार नाही न ?

  बघा कसा काय जमते ते

  मराठी टाइप कधीच केला नाही, सो शुदा लेखंबद्दला अणि अगवु पाना बद्दल माफ़ी असावी .

 11. Well Just a suggestion..If people can start using google reader then they can follow any blog without having their mailbox flooded with mails.
  @ Aniket: U need not have removed your blog from marathiblogs.net, U sure write one of the best blog around . By doing this you are actually preventing some new people from getting to your blog,which is definitely a loss for those people.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s