४९८ (अ)


आजही आपली संस्कृती ही पुरूष-प्रधान म्हणली जात असली तरीही निदान शहरी परीस्थीती तितकीशी खरी नाही. आज बहुतेक सर्व क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत, अगदी पुरुषांसाठी बनवल्या जात असलेल्या कंडोमच्या जाहीरातीत सुध्दा स्त्रियांचा शिरकाव आहे. हुंडा-बळी, विवाहीतेचा सासरी पैश्यासाठी छळ वगैरे बातम्यांमध्ये लक्षणीयरीत्या घट झालेली आहे. स्त्रिया सक्षम होऊ लागल्या आहेत जे नक्कीच स्वागतार्ह आहे, पण त्या अनुषंगाने काही घटनांचा उल्लेख करावासा वाटतो ज्याचा उपयोग काही स्त्रिया स्वतःच्या स्वार्थासाठी करुन सासरच्या लोकांवर खोटारडे गुन्हे दाखल करत आहेत आणि ह्याला कारणीभुत आहे कायद्यातील कलम ४९८ (अ)

सर्वप्रथम आपण ४९८ (अ) कलम काय आहे ते पाहु.

४९८अ, हे कलम १९८३ साली अस्तित्वात आले. त्यामध्ये विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्यास पती व नातेवाईकांना कारावासाची शिक्षा होऊ शकते.

४९८ (अ) कलमानुसार कोणत्याही स्त्रिने जवळच्या पोलीस ठाण्यात हुंडा-बळी किंवा घरगुती छळाविरुध्द तक्रार केली तर कोणतीही पोलीसचौकशी न करता ज्यांच्या विरुध्द तक्रार दाखल झालेली आहे त्यांना पोलीस-कठडीमध्ये टाकण्याचे हक्क पोलीसांना देण्यात आलेले आहेत. परंतु ९९% वेळा असे लक्षात आलेले आहे की ह्या कायद्याचा दुरुपयोगच जास्त होत आहे. कित्तेक वेळा जाणुन-बुजुन तर कधी नकळतपणे.

काही प्रकरणांमध्ये, पतीच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, त्याचा काहीही संबंध नसला तरीही अटक करण्यात येते. बऱ्याच प्रकरणांमध्ये इतर कुठल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी ह्या कलमाचा दुरुपयोग केला जातो. अनेक प्रकरणांमध्ये क्षणिक रागामुळे, केसेस केल्या गेल्या, आणि त्यामुळे, अनेकांचे संसार कायमचे उध्वस्त झाले. जरी घटस्फोटाचा खटला चालू असला, तरी ४९८अ बिगर समजुतीचा असल्यामुळे ४९८अ चा खटला चालूच राहतो.

४९८(अ) विरुध्द दाखल झालेला गुन्हा हा दखलपात्र गुन्हा आहे आणि ह्यात तत्काळ कारवाई करुन आरोपी(??)ला तुरुंगवास घडवुन आणला जातो. ह्यामुळे तक्रार खरी आहे की खोटी ह्याची शहानीशा न करता सरळसोटपणे तुरुंगवास भोगावयाला लागतो. तक्रार खोटी असेल तरीही ती केस कोर्टात उभी राहुन, आरोपातुन निर्दोष मुक्तता होईपर्यंत कोठडी नशीबी येतेच. त्याकाळात सामाजीक जिवन तर उध्वस्त होतेच, परंतु निर्दोषत्व मान्य झाल्यावर सुध्दा कळत-नकळत पणे समाजाचा ’त्या’ व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन बिघडुन जातो. हा प्रकार म्हणजे थोडक्यात “तोंड दाबुन बुक्यांचा मार’ प्रकार होऊ लागला आहे. पिडीत व्यक्तींच्या मदतीसाठी सुध्दा अजुन तरी कुठल्या संस्था स्थापन झाल्याचे ऐकिवात नाही. स्त्रि-मुक्ती साठी पदर सरसावुन पुढे येणार्‍या सामाजीक संस्था सुध्दा अश्या वेळेस मुग गिळुन गप्प का बसतात हे मला न सुटलेले कोडं आहे.

मानवाच्या शरीरात, त्याच्या हार्मोन्समध्ये पिढी-दर-पिढी बदल होत असतात, त्यांचे संक्रमण होतच असते. त्याचाच परीणाम म्हणुन की काय स्त्रिच्या अंगी कठोरपणा आला, स्त्री चुल आणि मुल सोडुन घराच्या चौकटीबाहेर पडली, त्या विरोधात पुरुष मात्र हळवा झाला. निडर छातीने समाजाशी लढणारा पुरुषाच्या एकांतात का होईना डोळ्याच्या कडा पाणावु लागल्या.

हे सर्व लिहीण्याचे कारण की गृहमंत्रालयाने ४९८(अ) कायद्याचा पुर्नविचार करावयाचा ठरवले आहे. ४९८(अ) कायद्यान्वये दाखल होत असलेले खोटे गुन्हे आणि त्याचा गैरवापर गृहमंत्रालयाने मान्य केला आहे आणि त्याचीच दखल घेत गृह-मंत्रालयाने ४९८-अ विरोधात दाखल होणार्‍या गुन्ह्यात सरळसोट अटक न करता पुर्व चौकशी करुनच कारवाई करण्याचे आदेश राज्य-पोलीसांना दिले आहेत.

ह्या पुर्वीसुध्दा न्यायालयाच्या निकालांचा आधार घेत, ह्या कलमामध्ये दुरुस्तीचा प्रयत्न केला गेला, पण महिला संघटनांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने, असे म्हटले आहे कि ” ४९८अ चा गैरवापर .. हा विवाह संस्थेच्या मुळावर आघात करीत आहे, आणि सामाजिक स्वास्थासाठी हा कायदा अयोग्य आहे” त्याचीच री ओढत पुन्हा एकदा ह्या कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी एक पाऊल सरकारने पुढे टाकले आहे.

“भारतीय कायदा अंधळा आहे” ह्या विधानाला धक्का देत सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याचे स्वागत करावे तितके कमीच आहे

Subscribe to डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा by Email

8 thoughts on “४९८ (अ)”

 1. त्या विरोधात पुरुष मात्र हळवा झाला. निडर छातीने समाजाशी लढणारा पुरुषाच्या एकांतात का होईना डोळ्याच्या कडा पाणावु लागल्या. navhe tar ashya anek PURUSHanvar dhasa dhasa radanyashivay dusara parayaay shillak rahilela naahi hi satya paristhiti aahe. Sasuravaas sampun aata SUNAVAS suru jhala ahe.Jya Ghari sadaiv Aanand khelat ase tya ghari Mulachya vivahanantar Ek Bhayan savat pasaraleel pahayala milat aahe. Sun shikali savaraleli,sasu sushikshit,samjutdar,paapbhiru,sunela aapalya mulisarakhi mananaari, ticha kodkavatuk karanyat aanand maananaari asun hi sunecha vagan atishay uddhat aani padoapadi apamaan karanaar asalyache pahanayat yetey. aapan sahaj aajubajula pahila tar hi ashi paraisthiti sarras pahayala milat aahe.
  Yaa kalamaacha Durupayog tar hot aahecha pan yaatun maarag kasaa kaadhava te tharavan aavashyak aahe.
  NY-USA

  1. खरं आहे, मी स्वतः काही उदाहरणं पाहीली आहेत आणि पेपरमध्ये तर असंख्य पिडीतांच्या कथा येतच असतात (उदा. मुक्तपिठ मध्ये काही महीन्यांपुर्वी अश्याच एका सासु/नवर्‍याची कहाणी आली होती) 😦

 2. सर्वप्रथम…ह्या थीममुळे ब्लॉगला एकदम सिरीअस लुक आलाय. कदाचित त्यामुळेच की काय दोन्ही पोस्ट्सही थोड्या सिरीअस आल्यात.

  असो पोस्ट महितीयुक्त आहे…व म्हणूनच कदाचीत अजूनपर्यंत एकही प्रतिक्रिया आलेली नाहीये..(नॉर्मली एवढ्या वेळात येतात म्हणून म्हटले.)

  .

 3. होय या कायद्या मध्ये बदल तरी नक्कीच गरजेचा आहे…

  एक साईट आहे(सध्ध्या आठवत नाही) ज्या वर उच्च वर्गातल्या लोकांनी त्यांच्या कथा मांडल्या आहेत…(त्यांच्या बायकांनी जे दुरुपयोग केले ते)

 4. Hi Aniket

  Mala ya kaydyavishyi kahi mahit navt.Mahiti dilya baddal Dhanyawad.kayda badlayla pahije
  he barobar aahe tuz karn nirdosh vyaktila shiksha vhavi he malahi patat nahi.pn ek sangu….
  Muli khup sahanshil astat,tya kadhi tokache nirnay lavkar ghet nahit.kontyach mulila as vatat
  nahi aapla sansar viskalit vhava.ani Purushottam kakana sangte suniche kitihi lad kautuk
  kele tarihi mulgi ani sun ha bhedbhav ajunhi aahech.

  1. धन्यवाद मोनल. स्त्रियांच्या प्रतिमेला छेद देणार्‍याच घटना घडु लागल्या आहेत आणि त्या सर्वसामांन्यांपर्यंत न रहाता त्याची महीती गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणुनच तर ह्या कायद्याचा गैरवापर मान्य करण्यात आला आहे.

   बाकी सुन-सासु हे अजुनही बाळबोध अवस्थेतच आहे आणि ते पुर्णपणे सुधारेल असे आश्वासक चित्र सध्या तरी दिसत नाहीये. शेवटी सासु म्हणजे “सारख्या सुचना” आणि सून म्हणजे “सूचना नकोत” 🙂

 5. hi aniket….
  खुप चांगला विषय आहे अणि सध्या ह्या कायदाचा miss use ( सर्व जन नही पण maximum आहेत ) करत आहे असे वाटत आहे..

 6. आनिकेत,
  हा विषय एवढा साधा नाही. जेव्हा इकायदा बनवला, तेन्व्हा स्र्तीया एव्हद्या शिकलेल्या नव्हत्या आणी त्यान्ना काहीतरी आधाराची जरूर होती. आता महिलाना त्यान्च्या अधिकारान्ची जाणीव आहे. आणी त्या या अधिकाराचा वापर करू शकतात. पण तुम्ही जे प्रमाण सन्गितले आहे ते उलते आहे. १०% महिला अशा अधिकाराचा दुरुपयोग करतात. कोणीही स्त्री स्वत आपला कमीपणा चव्हात्यावर आणायला कचरते.आजही आपल्या पुरुश प्रधन समाज व्यवस्थेत स्त्रीचे स्थान दुय्यम्च आहे.
  just imagine if a woman is ready to tell all in public, she must have suffered a lot before taking such a drastic step!
  of course there are exceptions. there are women that i know of who have made it a regular business of earning money . if the boy’s people are good, they worry about their good name. these girls take advantage and demand exorbitant amounts to let go, and not make a scene! i personally know two such girls! they make the life of their in laws hell. for such kinds, the change in the law is really welcome. the law must not take sides. so i agree the change is welcome.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s