नागपंचमी


नागपंचमी
नागपंचमी

पुराणकाळातील “कालीया मर्दनाची कथा” ते अगदी परवा-परवा पर्यंत रौद्र रुपात भेटीस येणारा “ऍनाकोंडा” अश्या अनेक रुपातुन सर्पाची आपल्याला ओळख आहे.

इतकेच काय पण नव्याने येऊ घातलेल्या मल्लीका शेरावतच्या “हिस्स” चित्रपटाची उत्सुकताही प्रचंड ताणली गेली आहे. परंतु श्रावण सुरु होतो आणि श्रावण महीन्यातील शुद्ध पंचमीला येणारा, पहीला महत्वाचा सण म्हणजे “नागपंचमी” च्या दिवशी हाच नागराज घरोघरी देवतेच्या रुपात विराजमान होतो. ह्या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात.

आज नागपंचमी, त्यानिमीत्त जाणुन घेऊ यात ह्या सणाबद्दल –

नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणु नये, शेतामध्ये नांगर चालवु नये असेही म्हणले जाते.

श्रावणातील बहुतेक सणांना इतिहास आहे आणि तो इतिहास कथांच्या स्वरुपातुन पिढ्यांपिढ्या पुढे पोहोचवला जातो. नागपंचमीच्या बाबतीत सुध्दा अशीच एक कथा प्रचलीत आहेत ति आपण पाहु.

एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते. त्या शेतकर्‍याला दोन मुले व एक मुलगी होती. एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकर्‍याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला. त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकर्‍याविषयी सूडाची आग धगधगू लागली. एके दिवशी तिने शेतकर्‍याचा सूड घ्यायचे ठरवले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागीण शेतकर्‍यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली.

दुसर्‍या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्‍याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागीणीला पाहताच शेतकर्‍याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकर्‍याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिणीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा. या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणार्‍या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते.

नागपंचमीच्या दिवशी केल्या जाणार्‍या विविध कृती व त्या करण्यामागची कारणे

 • उपवासाचे महत्त्व
 • पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. `भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्‍ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख व संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो व त्याचे रक्षण होते.

 • नागाची पूजा करण्यामागील शास्त्र
 • सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

 • नवीन वस्त्रे व अलंकार घालण्याचे कारण
 • सत्येश्‍वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्‍वर समाधानी झाला. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात.

 • मेहंदी लावण्याचे महत्त्व
 • सत्येश्‍वर नागराजाच्या रूपात सत्यश्‍वेरीच्या पुढ्यात उभा राहिला. `तो निघून जाईल’, असे वाटून तिने त्याच्याकडून, म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले. ते वचन देतांना सत्येश्‍वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वत:च्या हातांवर मेहंदी काढते.

 • झोका खेळण्याचे महत्त्व
 • दुसर्‍या दिवशी सत्येश्‍वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती जंगलात सैरावैरा भटकू लागली व शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्‍वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश असतो – `जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दु:खे खाली जाऊ देत.’

`नागपंचमी’ श्रावण शुद्ध पंचमीलाच का येते ?

अ. पुराणांमध्ये एक कथा आहे. तक्षक नागाने केलेल्या अपराधाबद्दल सजा म्हणून राजा जनमेजयान सर्पयज्ञ सुरू केला. या सर्पयज्ञात त्याने सर्व सर्पांच्या आहुती देणे सुरू केले. तक्षक नाग मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. राजा जनमेजयान मग `इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा: ।’ असे म्हणत इंद्राचीही आहुती तक्षक नागाबरोबरच देऊन टाकली. आपल्या या कृतीतून राजा जनमेजयान अपराध्याइतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच अपराधी हे दाखवून दिले. आस्तिकऋषींनी राजा जनमेजयाला तप करून प्रसन्न करून घेतले. जनमेजयान आस्तिकऋषींना `वर मागा’ असे म्हटले आणि मग आस्तिकऋषींनी सर्पयज्ञ थांबवावा, असा वर मागितला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण येतो. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी हा होता. या दिवशी हळदीने किंवा रक्‍तचंदनाने पाटावर नवनागांच्या आकृत्या काढतात. त्यांना हळदकुंकू वाहून पूजा करतात. नंतर दूध- लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.

आ. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.

कालानुरुप समाजाने अनेक विधी, घटना कालबाह्य, थोतांड ठरवल्या. नागपंचमीच्या दिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्व जाणुन गारुडी लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सर्प दुध पितच नाही, किंबहुन पित असला तरी दारोदारी येणारी सापांची तोंड शिवलेली असतात त्यामुळे नैवेद्य म्हणुन दिलेले दुध हे त्यांना मिळतच नाही आणि काही दिवसांनी हे साप मृत्युमुखी पडतात. ह्यासाठीच सरकारने नागपंचमीच्या दिवशी ’नागोबाला दुध’ म्हणत फिरणार्‍या लोकांवर बंदी घातली. सर्पमित्रांनी अश्या अनेक सापांची गारूड्यांच्या तावडीतुन सुटका केली आणि त्यांना परत अरण्यात सोडुन दिले.

अर्थात खरे सर्प उपलब्ध नसले तरी बहुतेक ठिकाणी नागदेवतेच्या प्रतिमेची पुजा केली जाते. दुध, भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवला जातो.

माहीती स्त्रोत / अधीक माहीती

Advertisements

9 thoughts on “नागपंचमी”

   1. तो सर्प मित्र आहे म्हणून.. साप चांगला पकडतो तो.
    बाकी लेख छान झालाय. त्या झोक्या बद्दलचे विचार पटले. प्रत्येक गोष्टीमागचा बॅकग्राउंड समजून घेता आला असता तर किती बरं झालं असतं नाही?

 1. श्रावण म्हणजे आनंदिआनंद . म्हणूनच जेंव्हा श्रावणात निसर्गदेखील नटलेला सजलेला असताना ह्या दिवसात आपणही निसर्गाशी एकरूप व्हावे. त्याच्याबद्दल कृतज्ञ व्हावे म्हणून आपल्या पूर्वजांनी खूप विचारपूर्वक या सणांची निर्मिती केली आहे..आपले सण हे फक्त आनंदसोहळा नसून कर्तव्याची जाणही आहेत. ज्याच्याप्रती आपण कायम ऋणी असतो त्यांच्याबद्दल आदराने कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे दिवस आहेत.
  आज नागपंचमीला नागाची पूजा करण्यामागील खरे उद्दिष्ट हे आहे की वर्षभर सर्प शेतकऱ्याचे उंदीर,घुस यापासून रक्षण करतो.म्हणजे तो एक क्षेत्रपालाचेच काम करतो म्हणूनच त्याच्या उपकारांची जाण ठेवण्यासाठी त्याला पूजण्यात येते. जरी तो स्वत:च्या सरक्षणासाठी आपल्याला चावत असला तरीही त्याला पूजणे हेच खरे आपल्या माणुसकीचे लक्षण नव्हे का?
  बाकी शहरात आणी हल्ली गावागावातही सापाला जें दूध पाजले जाते ते एक थोतांड आहे. मनापासून सापाविषयी आभार व्यक्त करणे हाच खरा उद्देश आहे…बाकी जें सगळे आपण करतो ते आपल्या समाधानासाठी.

 2. Hi Aniket

  Dhanyawad chan mahiti dilyabaddal.Pratyek san aapan ka sajra kartoy he aaplyala mahit asaylach
  have.Pratyekch sanancha mage ashach katha aahe.mala thodi far mahiti hoti bakichi tu dili.
  Tu hi mahiti kuthun milvali…

  1. मोनल, पोस्टच्या शेवटी त्या संकेतस्थळाचा दुवा दिलेला आहे, तेथुनच मला ही माहीती मिळाली. तेथे अजुन बरीच माहीती आहे

 3. aniket ,
  good information!!!

  yaat dilelya ghatana, vidhi kaalbahya zale aahet..he sarvana mahit aahech. tarihi ek gosht madavishi vatate. jevha kevha ya goshti madalya gelya astil , tevha tya vicharanchya kasotivar kadhee tyavelchya lokanee ka tapasoon pahilya nasavyat? yaat ji shetkarychi gosht aahe, tyat ti nagin tya lokana dasate ani nantar jivant karate….mag jar nagin manasanaa jivant karu shakate, tar ti tichya pillana ka jivant karat nahi?
  asalya goshti visarat chalaya tari tya punha punha sangitalya gelya tar punha tyancha prasar hou shakato, lok tyache soyiskar arth kadhu shakatat..punha andhshraddhechya margavar….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s