ती…..


Umbrella-inspired-photographs20कॉलेजचे लेक्चर ऑफ मिळाल्याचा आनंद क्षणभंगुरच टिकला कारण गाडी काढेपर्यंत आकाश काळ्या ढगांनी भरुन गेले होते. घरी जाईपर्यंत पाऊस पडणार हे खचीतच होते. वैतागुन गाडी काढली आणि शक्य तितक्या वेगाने घराकडे गाडी पळवली.

चांदनी चौक पार करुन गाडी एन.डी.ए वरील माळरानाकडे वळवली.

काही आठवड्यांपुर्वीचं उन्हानं रापलेल पिवळधम्मक गवत पावसाच्या आगमनाने हिरव्याकंच शालुत लपेटलं गेलं होतं. पिवळ्या, गुलाबी रंगाची फुलं त्या गवताआडुन डोकावुन डोकावुन आपलं अस्तीत्व सिध्द करत होत्या. वार्‍याच्या झोक्याबरोबर झाडांच्या फांद्या बेधुंद होऊन झुलत होत्या. पण माझं लक्ष मात्र वेधुन घेतलं ’ति’नं. ’ती’ आमच्या कॉलेजमधली.. प्रत्येकाला आपलीच व्हावी अशी वाटावी अशी ती…

दोन्ही हात पसरवुन ती डोळे मिटुन आकाशाकडे पाहात दुरवर उभी होती.

मी गाडी कडेला लावली आणि शक्य तितक्या तिच्या जवळ जावुन तीला न्हाहाळु लागलो.

काळ्याभिन्न मेघांच्या पार्श्रवभुमीवर तिचा तो पांढरा सफेद चुडीदार उठुन दिसत होता. तिच्या चेहर्‍यावर पावसाचे रुपेरी, टपोरे थेंब बसले होते. मला पावसाचा इतका हेवा वाटला ना.. तिच्या अंगाला घट्ट बिलगुन बसला होता तो, तिच्या चेहर्‍यावरील पावसाचे थेंब सुध्दा तिच्या गालावरुन उतरायला तयार नव्हते, स्वतःच्या आगमनाने इतरांना अडकवुन ठेवणारा तो इथे मात्र तिच्या काळ्याभोर केसांमध्ये अडकुन बसला होता. मोठमोठ्या झाडांना हेलावुन सोडणारा तो सोसाट्याचा वारा इथे मात्र तिच्या केसांमध्ये मंद मंद रुंजी घालत होता.

तिच्या पापण्यांची होणारी नाजुक हालचाल मनाला कावरं-बावरं करत होती. तिच्या श्वाच्छोश्वासांचा आवाज ढगांच्या गडगडाटातही मला स्पष्ट ऐकु येत होता.

वार्‍याची पुन्हा एक लहरं आली आणि तिच्या केसांची बट तिच्या चेहर्‍यावर जाऊन विसावली. परंतु तिने चेहर्‍यावरचे केस बाजुला घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही.

वाटलं, तिच्या जवळ जावं, तिच्या चेहर्‍यावरुन ओघळणारे पाण्याचे थेंब ओंजळीत भरुन घ्यावेत..पावसाच्या शिडकाव्याने हवेत पसरलेल्या भिजलेल्या मातीच्या सुखंदापेक्षाही जास्त सुखद, जास्त मादक, मनावर आनंदाचे तरंग निर्माण करणारा तिच्या केसांमधला तो तजेलदार सुगंध श्वासामध्ये भरुन घ्यावा. तिच्या शरीराची उब, थंडगार पडलेल्या माझ्या शरीरावर ओढुन घ्यावी.

नुसत्या विचारांनीच अतीव सुखाने डोळे मिटले गेले आणि शांतपणे झाडाला टेकुन उभा राहीलो.

डोळे उघडले तेंव्हा ती माझ्या समोरच उभी होती. तिची नजर माझ्या डोळ्यांना भेदत आरपार हृदयाला जाऊन भिडली. अचानक तिच्या सामोर्‍या येण्याने मी भेदरुन गेलो. काय बोलावे काहीच सुचेना.. सारवासारव करण्यासाठी तोंड उघडले, पण शब्द घश्यातच अडकले.

ती माझ्याकडे बघुन खुदकन हसली आणि हृदयाचा एक ठोका चक्क क्षणभर थांबुन गेला.

तिने माझा हात धरला आणि मला हळुवारपणे पावसात ओढले. तिचा तो स्पर्श…… अंगावर काटा आला… मानेवरचे केस उभे राहीले. मी हिप्नॉटाईझ झाल्यासारखा तिच्या मागोमाग चालत गेलो.

जमीनीवरील हिरवीगार गवताची पाती पावसाच्या आगमनाने जितके प्रफुल्लीत झाली नसतील तितकी तिच्या ओढणीच्या स्पर्शाने ती मोहरुन जात होती. गुलाबी फुलं तिच्या गालावर पसरलेल्या लालीशी बरोबरी करण्याचा असमर्थ प्रयत्न करत होती. जमीनीवर साठलेल्या तांबुस-चॉकलेटी पाण्याला झालेला तिच्या पावलांचा स्पर्श त्याला बेभान करुन टाकत होता.

मी कुठे वहावत चाललो होतो, माझं मलाच ठाऊक नव्हतं.. डोंगरावरुन सुरु झालेल्या पावसाच्या धारेला तरी कुठं माहीत असतं ते कुठे जाणार आहे ते.. ते नुसत वहावत जातं.. वसुंधरेच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने.. बेफाम होत, हिंदकळत, ठेचाळत… माझंही तस्संच झालं होतं..

माळरानाच्या एकदम कडेला मी तिच्याबरोबर येऊन पोहोचलो. समोर धुक्यात हरवलेलं माझं गाव होतं.. पावसांच्या सरीत भिजलेले रस्ते होते, नखशिखांत नटलेले डोंगर होते.

ति एका खडकावर बसली, मी तिच्या शेजारीच.. तिला खेटुन बसलो..

माझी मान आपसुकच तिच्या खांद्यावर विसावली. पावसाच्या थेंबाने भिजलेला वारा सर्वांगाला झोंबत होता. भिजलेले शरीर त्या थंड वार्‍याने शहारत होते.

तिने माझ्या हातावर तिची ओढणी पांघरली.. इतक्यावेळ धडधडणारे हृदय आता शांत झालं होतं. आसमंतातले सर्व आवाज जणु माझ्या कानापर्यंत येऊन परत गेले होते. स्पेस.. अवकाशातली शांतता जणु आजुबाजुला विखरुन पडली होती.

मी जड झालेले डोळे उघडुन तिच्याकडे पाहीले.. साखरेसारखे तिचे गोड डोळे मी कित्तेक वेळ पहात राहीलो.

तिने तिच्या बोटाचे नख माझ्या मनगटापासुन खांद्यापर्यंत फिरवले. तो स्पर्श मला अंगावर हजारो मोरपिस फिरवल्यासारखा भासला. नकळत माझा हात तिच्या मानेवरुन फिरत तिच्या नाजुक गळ्य़ापर्यंत आला.

आवेगाने तिने मला घट्ट मिठी मारली….. तिचा गरम श्वास माझ्या मानेवर रोमांच निर्माण करत होता. तिच्या हृदयाची धडधड माझ्या हृदयाला जणु काही सांगु पहात होती.

सुखाच्या त्या परमोच्च क्षणात बुडालेले असतानाच मागे उभा राहीलेला पोलीस म्हणाला…”ओ लैला मजनु.. चला उठा इथंन.. आपल्या घरी जाऊन रोमान्स करा.. उठा………………………………..”

टिप: लेख काल्पनीक आहे, वाचकांनी उगाचच कश्याचा कश्याला संबंध लावु नये ही विनंती…….

Note : I am not the owner of the image. Image courtsey from google search.

54 thoughts on “ती…..

 1. काल्पनिक???????? नक्की का?
  पण मस्त आहे……..
  आणि जळवा आम्हाला…… चोळा जखमेवर मीठ……. तुम्ही कसले मित्र रे असले !!!!!!!

  1. अनिकेत

   Manyawar.. aaho kal ABK 700 chi pavsachi gani aiktana utsfurt suchle mhanun lihile…

   Salil-Sandeep efffect 🙂

 2. s.k.

  टिप: लेख काल्पनीक आहे, वाचकांनी उगाचच कश्याचा कश्याला संबंध लावु नये ही विनंती……. 😀 very true… 🙂 lol

  1. अनिकेत

   सिया.. हो उगाच कुणाचा गैरसमज नको.. बायको पण अधुन मधुन येते आजकाल ब्लॉगवर म्हणुन तळ-टीप टाकलेली बरी असते 🙂

   1. Ashutosh Tilak

    Hahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahaha
    Don’t stop me
    Hahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahaha

 3. आल्हाद alias Alhad

  एण्डाला काही सुचलं नाही म्हणून असं का???

  “तिने माझ्या हातावर तिची ओढणी पांघरली.. इतक्यावेळ धडधडणारे हृदय आता शांत झालं होतं.”

  हे झ्याक…

  ते नख बिख फिरवतानाचं वाचून वाटलं काय ड्रॅक्युला वगैरेचा ट्विस्ट देताय की काय!!

   1. अनिकेत

    अहो ते खालच्या कमेंटात कुणालातरी व्हॅम्पायर वगैरे वाटलं होतं.. मला ती कमेंट आठवुन अज्जुन हसु आवरत नाहीय.. ते कसं आवरायचं??

  1. अनिकेत

   चमारी.. फिरुन फिरुन लोकं एन्डालाच का नावं ठेवत आहेत???

 4. charu

  वाह …..मस्त लिहिले आहेस रे अनिकेत…..काल्पनिक असली तरी आम्हाला खरीच वाटली तुझी स्टोरी … 🙂

 5. sheetal sharad shinde

  vah aniket

  Chaan lihils re…Kshanbhar dur eka dongravar..kahrokharchya paavsaat bhijat aslyacha anand milala…….evhya garmit..chaan pavsaachi sar yaavi ani… tyat chimb bhijun java…

  how sweet…………..

  kadhi kadhi khup horror ,susoense vachlyanantar asa kahitari vachla na ki chaan gaar varychi zuluk agal sparshun geli.

  bas ata jast lhit nahi

  Monday aahe ani……kaam pan ahe..ugach kamat man nahi lagnaar………

  pls asa kahi lihitana …vel kaal pan baghat ja…… tuza nahi pan itarancha laksh vihalit hota na…..

  1. अनिकेत

   He he he.. thanks sheetal
   May be will try to post romantic story next time. Suspense, thriller, murder, robbery khoop zalya… nahi ka?

 6. Wa..wa…. Nagpur chya ranranyatya unhaat tumhi aamhala kalpit paavsane chimb karun taakla….(Tasehi aami ghamani chimb cha asto…);)
  Sundar varnan…. “TI” la vachun agadi Mazya “TI” chi aathvan aali….! 🙂 ❤

 7. sharad

  Aniket
  Khupach chhan, Aaj Office la dupari alo, duparchya garmine kasavis zhalo hoto allya allya mail check kartani tuzhi mail vachali aani evadhya garmitil garmi door jaune pavsatil Thandagar premal vicharani bhijun nighalo akdam thanda thanda cool cool jhalo aani college chya aathavani jaghya zhally
  asech lihit raha
  Sharad

 8. Prabha

  Aniket ,
  khup chan lihil aahes re . evdhya garmit pavsat chimb bhijlyachi ek mast feeling jhali very nice . i m waiting for ur next post .

  Thanks.

  1. अनिकेत

   प्रभा.. धन्यवाद.. ब्लॉग्स रेग्युलर पोस्ट करण्याचा प्रयत्न करीन..

  1. अनिकेत

   तळटीप.. तळटीप…..

   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अंजली

 9. Mrunal

  आवेगाने तिने मला घट्ट मिठी मारली….. तिचा गरम श्वास माझ्या मानेवर रोमांच निर्माण करत होता. Mala Vatle ki atha pune thi thiche dath Maneth kupsnar ani nantar mannar ki thuhe atha amchyatla ek zalela ahes.? pan thase kahi zale nahi,very nice story.

 10. Aarti

  “साखरेसारखे तिचे गोड डोळे” ……… साखरे सारखे हि उपमा डोळ्यासाठी मी पहिल्यांदाच वाचत आहे. आणि ते डोळे जर मोठे असते तर काय खडीसाखरेसारखे असे लिहले असेते काय?

  1. अनिकेत

   चुकताय तुम्ही. मी साखरेचे विशेषण तिच्या गोडव्याबद्दल वापरले, आकाराबद्दल नाही.

 11. अगदी खरं वटन्याईतके काल्पनिक! मस्त
  mastch ,,, ekdam sundar ,,,office madhe ata bilkul laksh lagat nahie . khupach surekh varnan an kalpana

  1. अनिकेत

   मला ह्या कमेंट्स वर वाचल्यासारख्या का वाटतं आहेत??

 12. विशाल जाधव

  त्या दोघांबरोबर वाचकांनाही भिजवलत तुम्ही पावसात.खुप भिजायच होत पण ते पोलीस कडमडल ना मधेच.पण तरीही भन्नाट.नाहीतर एक आमची येडी.पावसात भिजू म्हणालो तर म्हणते आजारी पडायचय का ?
  अनिकेत तुम्ही खुप छान लिहीता.तुमच आडनावच नाही तर प्रत्यक्षात तुमच्याकडे प्रतिभेचा समुद्र आहे.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  1. aruna

   विशाल,
   आडनावावरचा श्लेष आवडला.तुमच्या येडिला संदीप खरेचि कविता ऎकवा—देवा मला रोज एक अपघात कर.
   अनिकेतची प्रतिभा खरोखरच चतुरस्त्र आहे.

   1. विशाल जाधव

    नक्कीच अरुणा.आणि गंमत म्हणजे अरुणा ह्या अनिकेत समुद्रात फक्त भरतीच चालु असते ओहोटी नसतेच कधी.

  2. अनिकेत

   विशाल.. धन्यवाद..
   बाकी पावसाच्या बाबतीत मी सुध्दा तसा हेकेखोर आहे. मला नाही आवडत फारसं पावसात भिजायला. म्हणजे कधी खास भिजायचेच म्हणलं तर चालत, पण उठसुठ जाता येता पाउस लागलेला मला नाही आवडत. बाकी अरुणा म्हणाल्या त्याप्रमाणे संदीप खरेंची ती आणि त्याचबरोबर त्यांच्या अनेक पावसावरच्या कविता ऐकव. नक्की फरक पडेल.

   हा लेख लिहीण्याची प्रेरणा पण संदीप खरेच.. त्यांचाच कार्यक्रम ऐकत होतो आणि हे उत्स्फुर्तपणे सुचले.. 🙂

   1. विशाल जाधव

    अहो अनिकेत तुम्हाला काही उत्स्फुर्तपणे सुचल आणि वाचकांना नाही रुचल अस कधी झालय का ?संदीप खरे महान कवी आहेत अगदी (खरे-खुरे) .त्यांचा मौनाची भाषांतरे हा कवितासंग्रह ही आहे माझ्याकडे.अप्रतिम काव्यरचना.पण तुम्ही वेळात वेळ काढून तुमचा लेखनप्रपंच एवढा वाढवा कि तुमचा ही एखादा कार्यक्रम ऐकन्याची संधी या ब्लॉगप्रेमींना येवू द्या की………….

    1. अनिकेत

     अहो का लाजवता.. मला आवडेल त्या उंचीवर जाऊन बसायला.. पण सध्यातरी पायथ्याशीच छान आहे.. समोर शिखर दिसत असले की कसं छान कार्य घडतं हातुन.. बाकी तुमच्यासारखे अनेक वाचक मला ह्या ब्लॉगला भेटले हेच माझं भाग्य आणि हीच माझी कमाई..

 13. Patya

  pavasachi ek sar aali ani… chimb chimb karun geli…………. saala kai life asate………… bhari vatal vachatana…….. asa kahi vachal ki athavani jagya hotat… bhalehi tya ektyane bhijalelya asot va doghanni!!

  1. अनिकेत

   भावना पोहोचल्या प्रताप.. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

 14. PRINCE

  Aniket, tujya blog cha khar tar mi navinach vachak asalyane, tujya junya likhanala ushira pan manapasun dad detoy. Tu kharach khup apratim lihitos. Atacha aalela BLAMAIL cha navin bhag suddha uttam vatla. Ya lekhat je varnan kelayas khup mast vatla. Ekvel tar malahi majya tichya sobat aslyacha bhas zala. Pan shevat as kahi kelayes ki bhanavarach yaav lagla. TUJA LIKHANALA PUNHA EKADA MANAPASUN HARDIK SHUBHECHHA!!!!!

 15. Nitesh D

  hI Aniket….. Barech diwas jhale…… blackmail nanatr tujhi kuthlich navin story nahi aali ahe… mhanun tujhe june blogs vachat aahe….. aani atach ha “tee” vachala….. kay romantic hota mhaun sangu…… majhy angavar romanch ubhe rahile vachatana…. kharach.. khup chan….. ani ho tujha photo hi bahitala… tujya diet chya blog var….. jithe tu vajan kami kele aahes….. im sudha sakali dhavnycha pakka kele aahe….. ani office madhe majhya team madhe eka barobar challenge lavale aahe…. 90 diwsat 85kg varun 60kg var yenar mhanun… thanks…. you r my inspiration.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s