अवनी – ५


मंडळी, तुमच्या प्रतिक्रिया वाचुन लिहायचा हुरुप वाढत आहे. तुम्हाला वाचताना जेवढी मजा येते आहे तितकीच मजा मला लिहीतानाही येते आहे आणि भितीचे म्हणाल तर तुमच्यापेक्षा कांकणभर मलाच जास्त वाटत आहे. तुम्ही दिवसा कथा वाचून मोकळे होता, पण रात्री एकच दिवा चालु असताना, सर्व झोपलेले असताना एकांतात ही कथा लिहिताना आणि नंतर सर्व दिवे मालवुन झोपायला जाताना मला कसे वाटते हे सांगायलाच नको. सर्व काही अगदी आजुबाजुला घडते आहे असेच वाटते आहे.

असो.. कथेच्या उत्तरार्धाला सुरुवात करतो…..

भाग ५ पासुन पुढे>>

उर्वरीत रात्र शांततेत गेली. त्या प्रकरणानंतर नविन काही घडलं नाही. आकाश आणि जयंत रात्रभर जागेच होते, झोपं लागणं शक्यच नव्हतं. जे आजपर्यंत केवळ ऐकलं होतं, चित्रपटांतुन पाहीलं होतं ते आज डोळ्यांदेखत घडलं होतं. शरीराला पुन्हा पुन्हा चिमटा काढूनही ते एक वाईट्ट स्वप्न नसून सत्य होतं ह्याची कटू जाणीव दोघांना सतत होतं होती.

सकाळी सुर्याची किरणं बंद खिडकीच्या फटींमधून आतमध्ये आली खरी, पण त्यातही एक प्रकारचा मलूलपणा होता जणु काही सुर्याचे तेज त्या किरणांमधुन कोणीतरी हिरावुन घेतले होते.

शाल्मली अजुनही झोपलेलीच होती, तिच्या चेहर्‍यावर थकवा दिसुन येत होता, तिचं शरीरसुध्दा तापाने फणफणलं होतं. फरक इतकाच होता की ह्यावेळेस त्याचे कारण जयंत आणि आकाश दोघांनाही माहीती होतं. बिचार्‍या शाल्मलीला मात्र त्याची तिळमात्र कल्पना नव्हती. जयंता आणि आकाशने तिला ह्याबद्दल काहीच न सांगण्याचे ठरवुन टाकले.

थोड्यावेळाने जयंताने खोलीचे दार उघडले. बाहेर थर्मल कॅमेरा अजुनही ’रेकॉर्डींग मोड’ मध्ये चालु होता. जयंताने कॅमेराचा स्विच ऑफ केला आणि कॅमेरा घेउन आतमध्ये आला.

जयंताच्या हातातला कॅमेरा बघुन आकाश जागेवरुन उठुन बसला. दोघांनी एकवार शाल्मलीकडे पाहीले. ती झोपलेली आहे ह्याची खात्री झाल्यावर दोघंही सावकाश खोलीच्या बाहेर आले आणि त्यांनी खोलीचे दार लोटुन घेतले. मग दोघंही बाहेर व्हरांड्यात येऊन बसले.

आकाशने कॅसेट रिवाईंड केली आणि मग प्ले चे बटन दाबुन रेकॉर्डींग चालु केले.

पहिला बराच वेळ कॅमेरात नुसताच काळोख होता. कॅमेराच्या एल.सि.डी. स्क्रिनवर वेळेची नोंद दिसत होती. दोघंही जण त्या स्क्रिनसमोर डोकं खुपसुन काही दिसते आहे का ह्याचा पहाण्याचा प्रयत्न करत होते. कॅसेट पुढे पुढे जात होती आणि शेवटी ती वेळ जवळ येऊन पोहोचली.

आकाश आणि जयंत अधीक बारकाईने त्या स्क्रिनकडे पाहु लागले. थोड्यावेळाने तोच तो घसटत घसटत पुढे सरकण्याचा आवाज येउ लागला, परंतु स्क्रिनवर कोणीच दिसत नव्हते. हळु हळु तो आवाज दुर गेला. कालांतराने दुसरवरुन एक जोराने ओरडण्याचा आवाज आला आणि मग पुन्हा तो घसटत चालण्याचा आवाज जवळ जवळ येउन स्तब्ध झाला.

काही क्षण गेले आणि नंतर एक अंधुकशी आकृती वेगाने सरकत कॅमेराच्या इथुन खोलीकडे वळलेली दिसली. साधारण मानवाच्याच आकाराची निळ्या, पिवळ्या, तांबड्या, हिरव्या रेघांची किनार असलेली ती आकृती क्षणार्धात आली आणि दिसेनाशी झाली.

जयंताने पटकन कॅमेरा स्टॉप केला, थोडा रिवाईंड केला आणि मग स्लो-मोशनमध्ये प्ले केला. परंतु त्या रेघांव्यतीरीक्त तेथे पहाण्यासारखे काहीच नव्हते.

त्या दृश्याने आणि नंतर घडलेल्या घटनाक्रमांच्या आठवणींनी दोघांच्याही अंगावर काटा आला.

जयंताने कॅमेरा बंद केला आणि मग दोघांनीही एक दीर्घ श्वास घेतला.

 

“काय करायचं आता?”, बर्‍याच वेळानंतर आकाशने जयंताला विचारले

“आय विश आय नो…”, हताशपणे जयंत म्हणाला

“मला वाटतं अजुन इथे वेळ घालवण्यात अर्थ नाही, आपणं जे पाहू नये ते काल पाहीलं. अजुन विषाची परीक्षा कश्याला पहायची? शाल्मलीच्या जिवाला धोका आहे हे तर स्पष्ट आहेच, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण सुरक्षीत आहोत…”, आकाश हवेत हात हलवत म्हणाला.

“हो, ते तर आहेच, पण इथुन गेल्यावर प्रश्न मिटतील कश्यावरुन? ज्यावरुन शाल्मलीच्या शरीरात ’ते’ जे कोण आहे त्याला प्रवेश मिळत आहे, कश्यावरुन ’ते’ आपल्याला शाल्मलीला घेउन जाऊ देईल? कश्यावरुन आपली ही घाई-गडबडीत केलेली कृती शाल्मलीच्या जिवावर उठणार नाही?”, जयंत

“पण मग करायचं काय? च्यायला कॉलेजमध्ये बरं होतं, कधी, कुठं, काही अडलं की आपण गुगल उघडुन बसायचो…”, आकाश

“हे.. दॅट्स अ गुड आयडीया… तुझ्याकडे लॅपटॉप आहे, नेट कनेक्शन आहे.. लेट्स ट्राय गुगल.. व्हॉट से?” जयंताच्या चेहर्‍यावर एक आनंदाची लकेर उमटली.

“अरे काही काय? इथे कुठे गुगल? अश्या गोष्टी थोडं नं गुगल वर मिळणार आहेत?”, जयंताचा मुद्दा खोडुन काढत आकाश म्हणाला.

“अरे बघायला काय हरकत आहे? झाला तर फायदाच आहे ना!!, जा उठ, घेउन ये तु लॅपटॉप आणि नेटकार्ड”, आकाशच्या हाताला धरुन जवळ जवळ उठवतच जयंता म्हणाला.

 

थोड्यावेळाने आकाश लॅपटॉप घेउन आला. लॅपटॉपच्या कडेला असलेल्या यु.एस.बी.नामक खाचेत त्याने नेट-स्टीक लावली. बर्‍याच वेळ नेटवर्क सर्च केल्यावर शेवटी नेट कनेक्ट झाले.

संगणकातील ब्राउझरची विंडो उघडुन आकाशने ’गुगल.कॉम’ चे संकेतस्थळ उघडले. थोड्यावेळाने संगणकाच्या पडद्यावर रंगीत अक्षरात गुगल असे लिहीलेले गुगल चे संकेतस्थळ उघडले.

“हम्म.. बोल काय शोधु इथं?”, आकाशने विचारले

“अम्म.. शोध ’हाऊ टु स्केअर घोस्ट?’ किंवा ’हाऊ टू गेट रिड ऑफ घोस्ट्स’, भूतांना कसे घाबरावे.??”, जयंत म्हणाला..

“खरंच का?”, जयंता आपली थट्टा करतो आहे असं वाटुन आकाशने विचारले.

“अरे हो.. खरंच सांगतो आहे.. बघ काही माहीती मिळते आहे का…”, जयंत म्हणाला

आकाशने सर्च बारमध्ये तसे टाईप करुन सर्चचे बटन दाबले आणि थोड्याच वेळात तशी माहीती उपलब्ध असलेल्या अनेक संकेतस्थळांचे पत्ते संगणकाच्या पटलावर अवतरले…

“आयला.. हे गुगल गम्मतच आहे बाबा.. खरंच आहे, काहीच्या काही माहीती मिळते इथे…”, असं म्हणुन आकाश त्या एक एक लिंक उघडुन वाचु लागला. जयंतासुध्दा आकाशच्या जवळ येऊन ती माहीती वाचु लागला

पहीली पहीली माहीती फारशी उपयुक्त नव्हती. बहुतेक ठिकाणी तेंन तेच प्युअर / होली वॉटर, ख्राईस्ट क्रॉस वगैरे माहीती उपलब्ध होती. ती माहीती खरी का खोटी हा मुद्दा दुर होता, परंतु त्यापैकी कुठलीही गोष्ट इथं लगेच उपलब्ध नव्हती.

दोघंही जणं एकामागोमाग एक संकेतस्थळं पालथे घालत होते आणि एका ठिकाणी ते अचानक थांबले…

“हे बघ.. इथं काय लिहीलं आहे…”, आकाश संगणाककडे बोट दाखवत म्हणाला..”त्यांनी गार्लीक सुचवले आहे…”

“म्हणजे.. रामुकाका म्हणाले ते बरोबर होते तर..”, जयंत म्हणाला..

“अरे, पण मग जर हे खरं असेल तर…. तर काल रात्री ’तो’ प्रकार का झाला? आपण ज्या खोलीत होतो, तिथे तर लसणाच्या कित्तीतरी माळा होत्या”, आकाश म्हणाला.

“हो, बरोबर आहे… पण म्हणजे बघ ना.. त्या माळा कधी काळी लावल्या होत्या आपल्याला कुठे माहीत आहे? कदाचीत त्या माळा ३०-४० वर्षांपूर्वी लावलेल्या असतील.. कदाचीत त्यातली तिव्रता कमी झाली असेल….”, जयंत

“हम्म, ते ही आहेच म्हणा… बर बघु पुढे अजुन काय लिहीलं आहे…”, असं म्हणुन आकाश पुढे वाचु लागला.

“हे बघ.. मीठ.. लिहीलं आहे…”, आकाश पुढच्या बुलेट पॉंईंटपाशी थांबत म्हणाला..

“मीठ?? का? म्हणजे त्याचे कारण काय सांगीतले आहे?”, जयंताने विचारले..

“मीठ हे जमीन, पाणी आणि हवा ह्यांचबरोबर सुर्यापासून निघालेल्या उष्ण्तेपासुन अर्थात एक प्रकारची आग निर्माण झालेले असते. हे सर्व घटक पंचमहाभूतांपैकीच आहेत. त्यांच्यापासुन मीठ निर्माण होते तेंव्हा ह्या घटकांची शक्ती त्यामध्ये अंतर्भुत होते असं इथं लिहीलं आहे. आणि त्यामुळेच जर तुम्ही मीठाने बॉर्डर आखलीत तर भूतं ती बॉर्डर पार करुन तुमच्यापर्यंत पोहोचु शकणार नाहीत…”, आकाश त्या संकेतस्थळावरील माहीती वाचत म्हणाला.

“हम्म.. हे सुध्दा खरं का खोटं माहीत नाही, पण जे काही लिहीलं आहे, ते पटण्यासारखं आहे…”, जयंता म्हणाला

“हो.. आणि आपल्याकडे मिठ पण आहे…”, आकाशने त्याचं वाक्य पुर्ण केलं.

आकाशने पुढे वाचण्यासाठी मान खाली वाकवली पण दोघांचेही लक्ष विचलीत झालं ते बंगल्याच्या गेटपाशी झालेल्या अचानक हालचालीने.

दोघांनीही चमकुन कुंपणाकडे पाहीले. गेटपाशी एक आकृती स्थिर उभी होती. दोघांनीही एकमेकांकडे पाहीलं.

आकाशने लॅपटॉप खाली ठेवला आणि तो उठुन उभा राहीला. जयंतासुध्दा जागेवरुन उठुन उभा राहीला आणि दोघंही कुंपणाकडे पहात राहीले.

त्या आकृतीने बंगल्याचे गेट उघडले आणि ती हळु हळु दोघांच्या दिशेने येऊ लागली. ती आकृती जवळ आल्यावर तिचा चेहरा स्पष्ट दिसु लागला तसा काहीश्या अविश्वासाने आकाश म्हणाला.. “रामुकाका?/?????”

 

रामुकाका सावकाश पावलं टाकत दोघांच्या जवळ येऊन उभे राहीले. त्यांच्या खांद्याला एक पिशवी होती तर दुसर्‍या हातात एक चुळबुळ करणारा मांजराचं छोटंस पिल्लु.

“रामुकाका? अहो होतात कुठे तुम्ही? असे अचानक कुठे निघुन गेलात? काही सांगुन जायची पध्दत…”, आकाशने प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली.

“सांगतो.. सांगतो.. जरा मला आतमध्ये तरी येऊ द्यात…”, रामुकाका पायर्‍या चढुन व्हरांड्यात येत म्हणाले…

“अहो काय सांगतो?? इथे काय परिस्थीती ओढावली आहे तुम्हाला माहीत आहे का? आम्ही कुठल्या संकटातुन जात आहोत…”, आकाश

“काय झालं?”, रामुकाकांनी विचारले..

मग आकाशने रामुकाका गेल्यानंतर थोडक्यात घडलेल्या घटना त्यांना ऐकवल्या.

थोडावेळ जाउ देऊन रामुकाका म्हणाले…”मी सांगीतलं होतं तुम्हाला.. तुमचाच विश्वास बसला नाही माझ्यावर…”

आकाशला तेंव्हा रामुकाकांची केलेली अवहेलना आठवली आणि त्याने खजील होऊन मान खाली घातली.

“बरं ते जाऊ द्या.. जे झालं ते झालं.. शाल्मली ताई कुठे आहेत?” रामुकाका म्हणाले

आकाशने समोरच्या खोलीकडे बोटं दाखवलं.

रामुकाका जागेवरुन उठले आणि त्या खोलीत गेले. दोन क्षण थांबुन त्यांनी खोलीत सर्वत्र नजर टाकली आणि मग निर्धास्त मनाने ते शाल्मलीजवळ गेले. मग त्यांनी खांद्याच्या पिशवीतुन एक कागदाची पुडी काढली आणि त्यात असलेली राखाडी भुकटी शाल्मलीच्या कपाळाला लावली.

आकाश काही बोलण्यासाठी पुढे झाला, पण जयंताने त्याला हाताने थांबण्याची खुण केली.

मग रामुकाकांनी ती भुकटी मोहीतच्या कपाळाला लावली, नंतर ते आकाश आणि जयंताच्या जवळ आले आणि दोघांच्याही कपाळाला ती भुकटी लावली आणि नंतर स्वतःच्याही कपाळाला ती भुकटी लावुन घेतली.

“रामुकाका? काय आहे हे? ह्या असल्या भुकटीने भुतबाधा वगैरे उतरते असा तुमचा समज आहे का?”, आकाशने न रहावुन विचारले.

रामुकाका त्याच्या खांद्यावर हात ठेवुन म्हणाले, “हे बघ आकाश.. जेंव्हा चांगले काही घडत असते ना, तेंव्हा नेहमी वाईटाची तयारी ठेवावी आणि त्याला धैर्याने सामोरे जायला खंबीर व्हावे. त्याचबरोबर, जेंव्हा एखाद्याचा वाईट काळ चालू असतो तेंव्हा चांगुलपणावर विश्वास ठेवावा. जशी दिवसानंतर रात्र आहे, तसेच रात्रीनंतर दिवस येणारच आहे, फक्त तो दिवस पहायला आपण डोळे उघडे ठेवायला हवेत.

प्रयत्न करणे आपल्या हाती आह्रे. हातावर हात घेऊन बसलो तर काहीच होणार नाही. आपण काही मांत्रीक, तांत्रीक नाही, कुठला उपाय रामबाण ठरेल हे आपल्याला माहीत नाही. गावच्या मंदीरातील हा अंगारा आहे. तो लावल्याने कोणाचे वाईट तर नक्कीच होणार नाही, झालं तर चांगलंच होईल नाही का???”

रामुकाका बोलत होते तोच शाल्मली आतल्या खोलीतुन अंगाला शाल गुंडाळुन बाहेर आली. पहील्यापेक्षा तिचा चेहरा आता बराच बरा दिसत होता. अंगात अशक्तपणा होता, पण निदान ताप उतरायला सुरुवात झाली होती.

रामुकाका आणि आकाशने एकमेकांकडे पाहीले..

“रामुकाका??? अहो कुठे होतात तुम्ही???”, रामुकाकांना पहाताच शाल्मली म्हणाली.

“सांगतो.. या.. बसा इथं.. तुमच्याशी बरंच काही बोलायचं आहे..”, असं म्हणुन रामुकाका व्हरांड्यातील एका खांबाला टेकुन खाली बसले. बाकीची मंडळीही त्यांच्याशेजारी कोंडाळं करुन बसली.

सर्वांच्या नजरा रामुकाकांकडे लागल्या होत्या.

रामुकाकांनी आपल्या पिशवीमधुन एक लाल रंगाची लांबट पुस्तीका काढुन सर्वांच्या मध्ये ठेवली, त्याला मनःपुर्वक नमस्कार केला आणि ते म्हणाले, “मला इथं आल्यापासुनच खरं तर काहीतरी विचीत्र वाटतं होतं. मलाच का? तुम्हाला का नाही? ह्याच उत्तर माझ्याकडे नाही. पण पहील्यापासुनच आपल्या व्यतीरीक्त अजुन कुणाचं तरी इथं अस्तीत्व आहे जे कदाचीत आपल्या डोळ्यांना दिसत नाहीये पण त्याला आपण दिसतो आहोत.. कोणीतरी आपल्यावर, आपल्या हालचालींवर सतत लक्ष ठेवुन आहे असंच मला वाटत होतं. पण तुमचा माझ्यावर विश्वास बसला नाही.”

रामुकाकांनी आपल्या सदर्‍याच्या आत हात घालुन आपली गळ्यातली रुद्राक्षाची माळ बाहेर काढली. उजव्या हाताने त्या माळेचे मणी त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांना लावले, मग ती माळ आपल्या कपाळावर टेकवली आणि ते पुढे म्हणाले, “त्या रात्री मी इथेच शेजारच्या खोलीत झोपलो होतो. किंबहुना झोपण्याचा प्रयत्न करत होतो असं म्हणा. पण मला झोप लागलीच नाही.

खोलीच्या एका कोपर्‍यात मी अंगाची कोंडाळी करुन पडुन होतो. रात्री हवेतला गारवा अचानक वाढला. दातावर दात वाजायला लागले आणि मला एका विचीत्र जाणीवेने ग्रासले. खोलीत नक्कीच कोणीतरी होतं माझ्या.. सर्वांगावरुन एक सरसरुन काटा येऊन गेला. त्या अंधारात एक आकार तयार होत होता. कोणासारखा?, कश्याचा?, कश्यासाठी?… काहीच कल्पना नाही. त्या आकाराला एक न दिसणारे, ओळखु न येणारे डोळे होते जे माझ्याकडे रोखुन बघत होते.

त्या गोठवणार्‍या थंडीतही मला दरदरुन घाम फुटला. हातपाय लटपटायला लागले. वाटलं आयुष्याचा हाच तो शेवट.. आपला मृत्यु अटळ असल्याची जाणीव होऊ लागली. तिथुन उठुन निघुन जावेसे वाटत होते, पण शरीर साथच देत नव्हते. सर्व संवेदना बोथट झाल्या होत्या.

तो विचीत्र आकार काही पावलं (!?) माझ्या दिशेने आला आणि मग तिथेच थांबला. इतक्यावेळ त्याचे ते अदृश्य डोळे माझ्या डोळ्यांकडे रोखले गेले होते, पण आता ती नजर माझ्या डोळ्यांवरुन हटुन माझ्या गळ्याकडे लागली होती. संतापलेली, क्रोधीत, जळजळवणारी नजर…

नकळत माझा हात माझ्या गळ्याकडे गेला आणि माझ्या हाताला ही रुद्राक्ष्याची माळ लागली. तो आकार ही माळ बघुनच थांबला होता. त्याच्या संतापाची झळं मला जाणवत होती. तो आकार हळु हळु दोन पावलं मागे सरला आणि तेथील कपाटाला टेकुन बसला. त्याचे डोळे (!), त्याचा चेहरा (!) माझ्याकडेच बघत होता. खुप वेळ आम्ही दोघंही समोरासमोर बसलो होता.

शेवटी मी ती माळ हातात घट्ट धरली आणि डोळे मिटुन आठवतील त्या देवांचा जप करु लागलो. मी किती वेळ डोळे बंद करुन होतो मलाच ठाऊन नाही, पण जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा समोर कोणीच नव्हते. खरं तर आधीही कोणींच नव्हते. मला कोणी दिसलेच नव्हते, पण.. पण अंधारात.. अंधाराचाच एक आकार झालेला मला जाणवला होता.

सकाळ होताच मी कुणाचीच पर्वा न करता घरातुन बाहेर पडलो आणि वाट फुटेल तिकडे चालत सुटलो. खुप अंतर दुर गेल्यावर मग शरीराचे एक एक अवयव काम करु लागले, संवेदना पुर्ववत होऊ लागली. मी त्या बंगल्यापासुन खुप दुर आलो होतो, पण तुम्ही अजुनही तिथेच होतात आणि तुम्हाला झाल्या प्रकाराची कदाचीत जाणीव सुध्दा झालेली नव्हती. तुम्हाला एकट्याला सोडवुन ही जाववेना आणि परत माघारी फिरायची सुध्दा इच्छा होईना.

मग मी भोर गावात गेलो. तेथे अनेक लोकांशी बोललो, अनेकांना माझा अनुभव सांगीतला. काही लोकांनी वेड्यात काढले तर काही लोकांनी न बोलणेच पसंद केले. परंतु शेवटी एक गृहस्थ भेटले आणि त्यांच्याकडुनच ह्या बंगल्याबद्दल, इथल्या लोकांबद्दल, इथल्या घटीत/ अघटीत घटनांबद्दल ऐकायला मिळाले आणि बर्‍याचश्या गोष्टींचा उलगडा झाला.”

रामुकाका दोन क्षण थांबले, त्यांनी आळीपाळीने सर्वांकडे पाहीले. सर्वजण न बोलता रामुकाकांकडे टक लावुन पहात होते.

“बरं मग काका, आता इथुन बाहेर पडण्याचा काही मार्ग?”, आकाशने विचारले.

“त्या आधी, इथे काय घडले होते? आत्ता जे घडते आहे ते का घडते आहे हे आपण जाणून घेणे महत्वाचे आहे. एकदा ते कळाले की इथुन बाहेर कसे पडायचे ह्याचा आपल्या सर्वांना विचार करुन मार्ग काढता येईल..”, रामुकाका.

“रामुकाका.. आकाश.. नक्की काय घडले आहे इथे? मला काहीच कशी कल्पना नाही? कश्याबद्दल बोलत आहात तुम्ही?”, शाल्मली म्हणाली.

“काही नाही शमु.. मी सांगतो तुला नंतर.. रामुकाका तुम्ही बोला पुढे…”, आकाश शाल्मलीचा प्रश्न टाळत म्हणाला..

“नाही आकाश.. शाल्मली ताईंना काय घडलं होतं हे माहीत असणं गरजेचे आहे. कदाचीत दोन्ही वेळेस जेंव्हा हा प्रकार घडला तेंव्हा त्यांचे मन, त्यांचा अंर्त-आत्मा बेसावध होता. जर घडला प्रकार त्यांना सांगीतला तर त्या मनाने अधीक सक्षम होतील, कदाचीत पुढच्या वेळेस त्या मनाने खंबीर रहातील..”, रामुकाका म्हणाले.

“दोन वेळेस?? नाही रामुकाका, फक्त एकदाच झालं हे काल….”,आकाश म्हणाला..

“नाही आकाश.. मी बरोबर म्हणालो दोन वेळेस. त्या दिवशी रात्री.. ती शाल्मली नव्हती आकाश.. ती.. ती नेत्रा गोसावी होती…”, रामुकाका कापर्‍या आवाजात म्हणाले.

शाल्मली गोंधळलेल्या नजरेने सर्वांकडे बघत होती.

आकाशने एकवार प्रश्नार्थक नजरेने जयंताकडे पाहीले. जयंताने मानेनेच त्याला संमती दिली. मग आकाशने घडलेला प्रकार शाल्मलीला ऐकवला.

क्षणाक्षणाला शाल्मलीच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. आकाशचे बोलुन झाल्यावरत ती बर्‍याच वेळ सुन्न बसुन राहीली. मग अचानक अंगावरची शाल झटकुन ती उभी राहीली आणि सर्वांगावरुन तिने जोरजोराता हात फिरवला जणु काही अंगावर ५०-१०० झुरळं चढली असावीत. लगोलग ती बांथरुममध्ये गेली आणि बर्‍याचवेळ नळाने हात, पाय, तोंड धुवुन ती बाहेर आली.

शाल्मली परत त्या कोंडाळ्यात बसली तेंव्हा तिच्या डोळ्यातुन अश्रुंच्या धारा लागल्या होत्या.

रामुकाकांनी शाल्मलीच्या खांद्यावरुन, पाठीवरुन हात फिरवुन तिला शांत केले आणि मग पुढे म्हणाले… “तर आता मी तुम्हाला ह्या बंगल्याचा, इथल्या लोकांचा आणि आपल्यात वावरणार्‍या नेत्रा आणि त्रिंबकलालचा इतिहास ऐकवणार आहे…”

त्यांनी पुन्हा एकदा सर्वांच्यामध्ये ठेवलेल्या त्या लाल रंगाच्या लांबट पुस्तकाला नमस्कार केला आणि ते पुढे बोलु लागले…………………………..

 

[क्रमशः]

53 thoughts on “अवनी – ५

 1. Sneha

  he क्रमशः madhech ekdum aala 😦
  Kay asel bara ha itihas!!!
  Lavkar yeu dya, utsukata lagun rahiliye

  Reply
 2. Rahhul...

  nice one dude…..
  it’s really horrible…now it’s 1:30 am in my clock…& i am really scare..
  every night ..i switch off lights while sleeping…but today i think ..it will be better if i keep them 0n..
  waiting for 6th part…lol..

  Reply
 3. Vishwas Bhagwat

  Kaal ratrich tuzhi post inbox madhe pop zali….
  Pan tya magchya velchya visuals mule vachayacha dhir nahi zala….(Mi mazya Flat madhe Ekta Vachat Hoto)
  Sakali Uthlya Uthlya vachun kadhli….
  Kyaa Yaar Tumhi pan kamal Kartat….
  Vaachayachi Utkantha+Bhiti=Aniket’s Writing..
  Tithe Netracha bhoot tyanna chalte aani ithe Kramash: cha bhut aamhala chalte…! 😛
  Next Post Laukar yevu dya..! 🙂

  Reply
  1. अनिकेत Post author

   Vaachayachi Utkantha+Bhiti=Aniket’s Writing..
   I just loved this, thank you so much. Next or may be the next-next part will be scary of all

   Reply
 4. ओंकार माणगावकर

  मला शाळेत इतिहासामध्ये कधी interest नव्हता…
  पण मी या इतिहासाची आतुरतेने वाट पाहतो आहे!!!!
  I’m Loving it…!!!
  Awesome buddy!!!

  Reply
 5. Ranjita

  आनिकेत, अतिशय उत्कंठावर्धक भाग, मस्त जमलाय. पुढचा भाग लवकर टाका, वाट बघू शकत नाही.

  Reply
 6. Tulsidas kadu, uran

  mala ‘Ramukaka’chi entry jabardast avadli.
  गावच्या मंदीरातील हा अंगारा आहे. तो लावल्याने कोणाचे वाईट तर नक्कीच होणार नाही, झालं तर चांगलंच होईल नाही का???” Great writing.

  vicharanchya sagratun motyansarkhe shabd
  baher kadhnara lekhak aahes tu.
  tula shatashhaa aabhar.
  well done job.keep it up,& t.c.

  Reply
 7. vaishali

  Khup chhan !!!madhe mi gavi gele hote ani tikade internet cafe ajun etake popular nahi ki ek mulagi javu shakate , tyatach office madhil collegue tumhi next post takliy evadhech sangayachi. Tyamule ase zale hote kadhi punyat yevun tumachya story wachatey.
  3rd post pasun aaj sarya ekdam wachun kadhalya . jabardast ani bhannat ideas ahet tumachyakade. wachatana jam bhiti watat hoti.
  Tumachya pudhil likhanala khup khup shubhechha.

  Reply
  1. अनिकेत Post author

   वैशाली.. तुझी प्रतिक्रिया वाचुन खुप छान वाटले. नविन पोस्ट टाकलेली तुमची कलीग फोन करुन आवर्जुन सांगायची ह्यावरुन तुम्हाला माझा ब्लॉग कित्ती आवडतो हे लक्षात येते.

   ब्लॉगवरील लोभ असाच कायम राहु द्या 🙂

   Reply
  1. अनिकेत Post author

   नाही गं.. ते खुप उंचीवर आहेत, तेथपर्यंत पोहोचायचं ह्याचा विचार करणं सुध्दा फार मोठं काम आहे..

   Reply
 8. ketaki

  काय तुफान चालू आहे गोष्ट. एकदाची संपवून टाका. ते क्रमश: दिसलं की कॉम्प्युटर वर दगड घालायची इच्छा होते. ताणलेली उत्कंठा एकदम भुस्स..
  लवकर टाका पुढचा भाग. 🙂

  Reply
  1. अनिकेत Post author

   हा हा हा… धन्यवाद केतकी, पण जरा सांभाळुन, संगणकावर असा अघोरी प्रकार करु नका. पुढचे भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न करतो..

   Reply
 9. patya

  थर्मल कॅमेरा… मिठ …लसणाच्या माळा… khupachya abhyas karato aahes assa disat aahe… patyek goshtich etyambhut varanan aani vaparach karan chan jamal aahe….this time no one can say “END” the story… ready to read 20 more parts in this story….. khupach chan lihito aahes.. murrabbi lekhaka sarakha… i am reding ur blogs from more than year … so far this is the best writing… keep it up.. waiting 4 next part……

  Reply
  1. अनिकेत Post author

   खरं आहे… उगाच बिनबुडाच्या संकल्पना मांडायला आणि वाचायलाही नको वाटतात त्यामुळे खात्री करुनच लिहीलेले बरे असते. विकी, हाऊ स्टफ वर्क्स, हाऊ टु गेट रिड ऑफ ह्यासारख्या अनेक साईट पालथ्या घालुन माहीती गोळा करण्याचे काम चालु आहे 🙂

   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पुढचा भाग लवकरच

   Reply
  1. अनिकेत Post author

   हो अनुप्रिता, पुढचे भाग लवकरच टाकतो

   Reply
 10. NAVAT KAY

  me tar story ardhvat vachli ani browser band karun takla… far bhiti vatat hoti.. jevha mazya ajubajula, mala disanari 30-35 loka hoti office madhali tevha.. pan vachalya shivay rahavat navhata mhanun punha open keli site ani vachunach kadhali..farach dangerous ahe.. lagechch sarva mitra ani maitrinini na link pathavli ani asa sangitla ki.. himmat asel tar ratri vachun paha 😀 😀
  1 number story ahe aniket.. bhari lihitos.. 🙂

  Reply
  1. अनिकेत Post author

   व्वा.. मस्त कमेंट.. आवडली.

   कथा आवडते आहे हे वाचुन आनंद झाला, रात्रीची जाग्रणं सार्थकी लागल्याचे समाधान मिळते..

   असो.. ब्लॉगवर स्वागत..

   Reply
   1. NAVAT KAY

    are ratri tap ala hota mala..yevdhi ghabarli hote mi .. adhich gharbat ahe..

    ani tyat tu madhech kahi images takya ahet 4th part madhe.. tya ratra bhar dolya samor yet hotya..

    mahit nahi nantar che parts vachayachi himmat hote ka nahi.. pan vachlya shivay rahavat pan nahi na 😦 😦

    Reply
 11. bhagyashri

  Uttarardha chi suruvat pan ek number ch zaliye….keep it up…..but I cant wait 4 nxt part…its very hard…lavkarach yeudya…:)

  Reply
  1. अनिकेत Post author

   धन्यवाद भाग्यश्री, पुढचे भाग लवकरच येणार

   Reply
 12. aruna

  हे बरे नव्हे. गोष्ट इतकी रंगवायची आणी मग वाचणार्याला लटकवून ठेवायचे!
  पुढचा भाग लवकर येऊ द्या.

  Reply
 13. s.k.

  I”m awed that you take so much trouble to make the story interesting for us…. writing at night with one lamp..i could never think of doing it… thanks a lot !!! i really appreciate your efforts…

  Reply
 14. umakant navghare

  खरच खुपच खतरनाक आहे कथा. अण खर मणजे खुप करी अण एखाद्या चित्रपटासारखि वाटते. हि कथा मणजे खरतर 1 चित्रपटच आहे.भयाणक चित्र डोळयासमोर उभे रहातात. खुपच सुंदर.मनापासुन आवडली.

  Reply
 15. sameer

  aniket bhau mast aahe katha…atta paryantr 4 parts vachun jhalet…mala.ashya rahasyamay katha bagayla kiva vachayla khup avadte….manat bhiti aste..attahi vatachat ahe..ani jast karun ratrichya vachayla horrible vatte i like this 🙂

  Reply
 16. kajal tingare

  Hii… khup chhan , susangat, manala adkun thevnare, najrela kilvun thevnare, kal-velache bhan harapnare, vastaviktecha ,styacha visar padun tumchya duniyet rangayla lavnare shabd najresmor ubhe rahtat… apn janu tya vishwat ahot yachi janiv hote… khup sundar.. me pahilyanda vachtey tumche blogs.. itki adhirta hote ki jyacha marathi reading cha speed kami ah to palt sutel vacht vacht.. atisundar.. mala khup avdl.. joprynt sampat nh toprynt read karavese vatat.. atrkya.. gudh.. agamya..anakalniya.. amanvi.. awesummm..

  Reply
 17. aditi kambli

  “दोन वेळेस?? नाही रामुकाका, फक्त एकदाच
  झालं हे काल….”,आकाश म्हणाला..
  “नाही आकाश.. मी बरोबर म्हणालो दोन
  वेळेस. त्या दिवशी रात्री.. ती शाल्मली
  नव्हती आकाश.. ती.. ती नेत्रा गोसावी
  होती…”, रामुकाका कापर्या आवाजात
  म्हणाले.
  hi itki personal goshta ramu kakana Kashi Ky kalli?? he samjal nahi.. baki writing khup chaan ahe..

  Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s