अवनी – ६


भाग ५ पासुन पुढे>>

१९३० साली तत्कालीन इंग्रज कलेक्टर जॉनाथन हेअडी ह्यांनी हा बंगला बांधला. सुट्टीसाठी किंवा हवापालट म्हणुन आपल्या कुटूंबाबरोबर ते इथे रहायला येत यायचे. त्यांच्याकडे घरकामासाठी पार्वतीबाई नावाची एक महीला आणि त्यांची ३ वर्षांची छोटुकली नेत्रा दोघीजणी येत असत. १९४७ साली हिंदुस्तान स्वतंत्र झाल्यावर जॉनाथनचे कुटूंब आपल्या मातृदेशाकडे, इंग्लंडकडे परतले.

जॉनाथनच्या जाण्यानंतर विष्णूपंत आचार्य ह्यांनी हिंदुस्तान सरकारकडुन हा बंगला विकत घेतला. इंग्रजी कुटुंब परत गेले, परंतु त्यांची मोलकरीण, पार्वतीबाई आणि त्यांची मुलगी नेत्रा इथेच राहील्या. नेत्रा एव्हाना २० वर्षांची झाली होती. पार्वतीबाई थकलेल्या असल्याने विष्णूपंतांच्या घरी नेत्राच कामासाठी येऊ लागली.

 

नेत्रा.. दिसायला अत्यंत सुंदर होती. केवळ ती एक मोलकरीण होती आणि तिचे रहाणीमान, कपडे साध्यातले होते म्हणुन, नाही तर उंची कपड्यांमध्ये ती एखादी परीच भासली असती. तिचा गौरवर्ण, निळसर डोळे आणि सोनेरी छटा असलेले लांबसडक केस पाहून कुणी म्हणायचे एखाद्या गोर्‍यानेच पार्वतीबाईंना फळवला असणार, नाहीतर एका सर्वसाधारण रुप असणार्‍या पार्वतीबाईंना असे कन्या रत्न कुठून प्राप्त होणार? तसेही नेत्राचे वडील कोणं होते? कुठे होते? हे कुणालाच माहीत नव्हते.

नेत्राला आईशिवाय दुसरं कोणीच नव्हतं आणि त्यामुळेच तारुण्यात येताच तिचे पाय जमीनीवर टेकेनासे झाले.

नेत्रा खरं म्हणाल तर काळाच्या काही वर्ष आधीच जन्माला आली होती. तिचे वागणं त्या कालावधीला साजेसे नव्हतेच. कदाचीत ती सध्याच्या कलयुगाच्या काळात चपखल वाटली असती. तारुण्यात हातात खुळखुळणारा पैसा, मदमस्त तारुण्य आणि बंधन कुणाचेच नाही असे असताना नेत्रासारखी भटकभवानी घसरली नसती तर नवलच.

ज्या काळात बायका पुरुषांसमोर मान वर करुन बघत नसत, चेहर्‍यावरुन पदर घेऊन फिरत असत त्या काळात नेत्रा अनेक तरूणांशी दिवसाढवळ्या नेत्रपल्लवी करत असे. अनेक तरुण केवळ तिच्या नजरेनेच घायाळ झाले होते.

नेत्राला आपले कौमार्य गमवायला फार वेळ लागला नाही आणि पहील्या पहील्यांदा एखादं-दुसर्‍यांदा घडलेला शरीरसंबंध नंतर मात्र वारंवार घडु लागला.

अश्यातच नेत्राची नजर विष्णूपंतांचे थोरले चिरंजीव त्रिंबकलालवर पडली. उंचापुरा, घार्‍या डोळ्यांचा, विलायतेत शिक्षण झाल्याने बोलण्या-चालण्यात एक प्रकारचा आब असलेला, गंभीर-घोगर्‍या आवाजाचा आणि बक्कळ संपत्तीचा मालक असलेला त्रिंबकलाल नेत्राला मनापासुन भावला.

अडचण फक्त एकच होती आणि ती म्हणजे त्रिंबकलाल विवाहीत होता.

परंतु काय अघटीत घडले कुणास ठाऊक, पण त्रिंबकलालची नजर वाकडी पडु लागली. नकळत घडणारी नेत्राबरोबरची नजरानजर कालांतराने वारंवार घडु लागली आणि काही दिवसांतच त्या नजरांना एक अर्थ प्राप्त झाले. सर्वांदेखत बोलणे शक्य नसल्याने दोघं जणं नजरेच्या भाषेत बोलु लागले.

उघड उघड दोघांच्या संबंधांना मान्यता मिळणे शक्यच नव्हते आणि म्हणुनच ते दोघं जणं लपून-छपून भेटु लागले. बहुतांशवेळी रात्री-अपरात्रीच तर कधी कधी दिवसा-उजेडी परंतु दुर निर्जन स्थळी.

परंतु अश्या गोष्टी लपुन थोड्या नं रहातात. ५०-१०० कि.मी.वस्ती असलेल्या त्या छोट्याश्या गावात बातम्या पसरायला वेळ लागला नाही आणि पहाता पहाता ही बातमी विष्णूपंतांच्या कानावर गेली.

विष्णूपंतांनी त्र्यंबकलालला बोलावुन घेतले. लोकं म्हणतात, विष्णूपंत त्या वेळेस रागाने थरथरत होते. त्यांच्या चेहर्‍यावर पसरलेली तांबुस छटा त्यांच्या कानातल्या भिकबाळीच्या रंगाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करत होती. त्र्यंबकलाल पंतांच्या खोलीत गेले तेंव्हा घरातल्या बायका माजघरातुन पडद्या आडु लपुन बाहेरची चर्चा ऐकण्याचा प्रयत्न करत होत्या.

त्र्यंबकलालला पाहून पंतांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता सर्वप्रथम त्र्यंबकलालच्या श्रीमुखात भडकावुन दिली. पंतांचा तो आवेश पाहून त्र्यंबकलाल सत्य नाकारु शकले नाहीत, परंतु स्वतःची बदनामी टाळण्याकरता त्यांनी सर्व दोष नेत्रावर ढकलला.

’नेत्रा काळी जादू करण्यात पटाईत आहे, तिने तसेच काहीसे अघोरी करुन मला वश करुन घेतले’ असा धादांत आरोप त्याने केला.

शेवटी काहीही झाले तरी त्र्यंबक पंतांचा पोटचा पोरगा. पंतांनी त्याचे म्हणणे उचलुन धरले.

नेत्रा काळी जादु करते ही बातमी वेगाने गावात पसरली.

ज्या तरुणांना नेत्राने शैय्यासोबत नाकारली होती त्यांनी संधीचा फायदा घेऊन नेत्राला अधीकच बदनाम करायला सुरुवात केली. नेत्रामुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे, तिला गावाच्या हद्दीतुन बाहेर काढावे अशी मागणी जोर धरु लागली आणि शेवटी प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचले.

गावाच्या मध्यावर असलेल्या पिंपळाच्या पाराभोवती पंचायत न्यायनिवाडा करायला बसली. सर्व पुरुषांमध्ये नेत्रा एकटी उभी होती सर्वांच्या वासनेने बुरसटलेल्या, बरबटलेल्या नजरांना नजर देत.

पंचायतीने नेत्राला दोषी ठरवले आणि तिला शिक्षा दिली ’अवनी’ची.

पतीच्या निधनानंतर स्त्रियांचे केशमुंडन करुन त्यांना कुरुप केले जात असे आणि त्यानंतर त्यांना लाल-रंगाच्या साडीत गुंडाळले जात असे. त्याकाळी अश्या विधवा स्त्रियांना ’अवनी’ म्हणत असतं. अश्या स्त्रियांना मरेपर्यंत त्याच वेशात विधवेचे आयुष्य घालवावे लागे.

नेत्रा विधवा नव्हती, तिचे कुणाशीही लग्न झाले नव्हते. परंतु जिच्या रुपाला भुलुन तिने अनेक तरुणांना फितवले तेच रुप नष्ट करण्याचा विडा सर्वांनी उचलला.

सर्वांसमोर तिचे मुंडन करण्यात आले. असं म्हणतात त्यावेळी नेत्रा कमालीची शांत होती. ती ना ओरडली, ना रडली. परंतु ज्यांनी तिच्या नजरेत पाहीले त्यांच्या सर्वांगाचा थरकाप उडाला.

नेत्रात्या घटनेनंतर नेत्रा स्वतःहुनच गावाबाहेर निघुन गेली. गावाबाहेरच्या जंगलात एका झाडाखाली ती बसुन असायची. ती कधी कुणाशी बोलली नाही आणि कोणी तिच्याशी बोलायला गेले नाही. चार-पाच दिवसांनंतर गावातल्याच एका विहीरीत तिचा मृतदेह सापडला. नेत्राने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली होती.

नेत्राच्या मृत्युची बातमी समजताच त्र्यंबकलालचा धीर सुटला. तो अचानक वेड्यासारखाच वागु लागला. त्याने स्वतःच्या चुकीची कबुली आणि नेत्रावर केलेल्या खोट्या आरोपांची माहीती पंतांना सांगीतली. परंतु आता बोलुन काय फायदा होता? वेळ केंव्हाच निघुन गेली होती.

नेत्राच्या आईने नेत्राच्या देहाचा ताबा घेण्यास नकार दिला. आपल्या ह्या कुलक्षणी मुलीचे तिच्या मृत्युनंतरही तोंड बघायची त्यांची इच्छा नव्हती. शेवटी पंतांनी नेत्राच्या देहाला स्व-खर्चाने अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली. तशी रीतसर परवानगी पंचायतीकडुन घेऊन त्याची एक लेखी प्रत त्यांनी गावातील पोलीस पाटलाकडे सुपुर्त केली होती.

जुजबी वैद्यकीय तपासणी आणि नेत्राचा खून नसुन आत्महत्याच आहे ह्याची खात्री पटल्यावर पोलीस पाटलांकडुन पंतांना नेत्राचा देह सुपुर्त केला जाणार होता. पंतांनी ब्राम्हणांना बोलवुन दशक्रियाविधीची तयारी करुन घेतली. दर्भाच्या जुड्या, हळद/कुंकु/गुलाल, सुगंधी उदबत्या, यज्ञासाठी लागणारे सामान हे सर्व तर होतेच, पण दोन दिवस मंत्र-पठण करवुन पंतांनी तांदळाचे, काळे तिळ घातलेले पिंड सुध्दा करवुन घेतले होते. पण आदल्या रात्रीच गुढरीत्या नेत्राचा देह पोलीस पंचायतीतुन नाहीसा झाला. पोलीसांनी सर्वत्र शोध घेतला परंतु हाती काहीच लागले नाही.

 

त्या रात्रीनंतर अजुन एक विचीत्र गोष्ट घडली. त्र्यंबकलालने स्वतःला ह्या बंगल्याच्या तळघरातील एका खोलीत कोंडुन घेतले. त्याने सर्वांशीच बोलणं तोडून टाकले. पहील्या-पहील्यांदा इतरांनी ह्या घटनेकडे दुर्लक्ष केले, परंतु दोन आठवडे उलटुन गेले आणि त्र्यंबकलालच्या खोलीतुन कुबट, कुजलेला वास यायला सुरुवात झाली तशी घरातल्या लोकांची चुळबुळ सुरु झाली.

घरातल्या लोकांना आधी वाटले की त्र्यंबकलालनेच स्वतःच्या जिवाचे काही बरे वाईट करुन घेतले की काय? परंतु जेंव्हा लोकं दरवाजा तोडायला आली तेंव्हा आतुन त्र्यंबकलालने ओरडुन त्यांना तसं न करण्याबद्दल ऐकवले. तसेच दार उघडले गेले तर तो खरंच स्वतःचं काही करुन घेईल अशी धमकी वजा सुचना सुध्दा त्याने केली. अनेकांनी त्याला समजावुन सांगायचा प्रयत्न केला, पंतांनी आवाज चढवुन पाहीले परंतु त्र्यंबकलालवर काडीचाही फरक पडला नाही.

त्र्यंबकलालसाठी खोलीच्या बाहेर ठेवलेले जेवणं, खाणं दिवसेंदिवस बाहेरच पडून राही. मधूनच कधी तरी दोन-चार दिवसांनी ताटातले अन्न संपलेले दिसे.

साधारण महीनाभरानंतर, एकदा तळघरातुन कुणाचातरी घसटत घसटत चालण्या/फिरण्याचा आवाज ऐकु येऊ लागला. तळघरात कोणी मांजर बिंजर अडकली की काय म्हणुन एक महीला तळघरात गेली आणि थोड्याच वेळात तीची एक जोरदार किंकाळी ऐकु आली.

घरातले सर्वजण धावत तळघरात पोहोचले. ती बाई अत्यंत भयभीत झाली होती. भितीने तिच्या सर्वांगाला काप सुटला होता, तिच्या तोंडातुन बारीक बारीक फेस येत होता. भेदरलेल्या नजरेने ती समोर बघत होती.

अंधुकश्या प्रकाशात घरातल्या लोकांना एक आकृती बसलेली दिसली. जवळुन पाहील्यावर सर्वांना धक्काच बसला. त्र्यंबकलाल खोलीच्या बाहेर येऊन बसला होता. त्याचा चेहरा पुर्णपणे बदलेला होता. चेहर्‍यावरचे तेज नाहीसे झाले होते. गालफडं खप्पड झाली होती, केस पांढरे फटक झाले होते, डोळे सुजुन खोबणीतुन बाहेर आल्यासारखे वाटत होते. हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. त्याला धरुनही उभं रहावत नव्हते, जणू काही पायातला जोरच निघुन गेला होता. तो हळु हळु खुरडत खुरडत कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करत होता.

त्या स्त्रीची नजर मात्र त्र्यंबकलालवर नाही तर दुरवर अंधारात कुठेतरी दुसरीकडेच लागली होती. सर्वांनी तिला आणि त्र्यंबकलालला उचलुन तळघराच्या बाहेर आणले.

बाहेर येताना ती स्त्री स्वतःशीच पुटपुटत होती.. ’अवनी….’… अवनी….

 

त्र्यंबकलाल अंथरूणाला खिळुन होता. वैद्य झाले, आयुर्वेदीक औषधं झाली, मंत्र/तंत्र झाले पण त्याच्या प्रकृतीवर यत्कींचीतही फरक पडला नाही.

बर्‍याच वेळ तो झोपुनच असायचा आणि जेंव्हा जागा असायचा तेंव्हा तळघराच्या दाराकडे पहात रहायचा. काही आठवड्यांनंतर त्याचे तळघराकडे बघणे बंद झाले आणि मग तो भिंतीकडे, छताकडे तासंतास पहात रहायचा. त्याचे डोळे अज्जीबात हालायचेपण नाहीत.

हा प्रकार साधारणपणे एक महीनाभर चालला आणि त्यानंतर त्र्यंबकलालची ज्योत मालवली. शेवटच्या दिवसांत तो फक्त “नेत्रा.. मला माफ कर.. नेत्रा मला माफ करं.. असंच म्हणत बसायचा.

त्र्यंबकलाल गेला आणि घरातली शांतताच जणू भंग पावली. लोकांना चित्र-विचीत्र भास होऊ लागले. कधी कुणाला रात्री घसटत चालण्याचा आवाज येई, तर कधी कुणाला तळघराच्या दाराशी नेत्रा दिसे. तसा नेत्राने कधी कुणाला त्रास दिला नाही, पण तिच्या नजरेला नजर देण्याची कुणाचीच हिंमत नव्हती. स्वयंपाकघरात जावं, दिवा लावावा आणि समोर कोपर्‍यात डोळ्यांतुन निखारे घेऊन बसलेली नेत्रा दिसावी. कपाटाचं दार बंद करुन शेजारी बघावं तर संतापलेली नेत्रा नजरेस पडे. पहिल्यांदा हा केवळ मनाचा खेळ असेल असं समजुन दुर्लक्ष व्हायचे, परंतु जेंव्हा घरातले नोकरदार घरं सोडुन जाऊ लागले, बायका स्वयंपाकघरात, माजघरात एकट्या दुकट्याने जायला घाबरु लागल्या तेंव्हा मात्र पंतांनी बंगला सोडुन दिला आणि दुसर्‍या ठिकाणी आश्रय घेतला.

पंतांनंतर ह्या बंगल्यात कोणीच फिरकलं नाही. हळु हळु गावकर्‍यांनीसुध्दा त्यांचा जाण्या-येण्याचा रस्ता बदलला आणि तेंव्हापासुन अनेक वर्ष हा बंगला असाच, एकाकी उभा आहे…….

 

बोलुन झाल्यावर रामुकाकांनी सर्वांकडे आळीपाळीने पाहीले. सर्वजण आपल्याच विचांरात गुंतले होते.

रामुकाकांनी शेजारचा पाण्याचा तांब्या उचलला आणि दोन-चार घोटं पाणी तहानलेल्या घश्यात ओतले.

“आता बोला, कुणाला काही प्रश्न, शंका?”, रामुकाकांनी थोड्यावेळानंतर विचारले.

“मला आहेत…”, आकाश म्हणाला.. “सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात आली नाही ती म्हणजे, फक्त आणि फक्त त्र्यंबकलालच्या चुकीच्या आरोपामुळे नेत्रा अडकत गेली. तेंव्हाच जर त्याने नेत्राची बाजु घेतली असती, तिला आधार दिला असता तर कदाचीत पुढची वेळ आली नसती.

मग असं असताना नेत्राने तिच्या मृत्यु पश्चात त्र्यंबकलालचा सुड का नाही उगवला?”

“हो ना, आणि तिने घरातल्या कुणालाही कसं काहीच केलं नाही?”, जयंता आकाशच्या प्रश्नात आपला प्रश्न मिळवत म्हणाला.

“हम्म.. तो एक छोटासा, पण महत्वाचा भाग सांगायचा राहीला. विष्णूपंतांचा त्या गावात फार मोठा दरारा होता, सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती होती. नेत्रा सुध्दा त्याला अपवाद कसा असेल? पंतांनी तिचा सांभाळ केला होता, तिला ओसरी दिली होती हा एक प्रकारचा तिच्यावर केलेला उपकारच होता.

नेत्राच्या मृत्युनंतर जेंव्हा खुद्द तिच्या आईने नेत्राचा देह स्विकारण्यास, त्याला तिलांजली देण्यास नकार दिला तेंव्हा पंतांनी स्वतःहुन ती जबाबदारी स्विकारली होती. नेत्राच्या आईची सर्व व्यवस्थाही त्यांनी चोख प्रकारे लाऊन दिली होती. कदाचीत त्यामुळेच की काय.. नेत्राने पंतांच्या कुटुंबापैकी कुणाला हात लावला नाही.

त्र्यंबकलालचं म्हणाल, तर तो एक मोठा गुढ प्रश्न आहे. नेत्राच्या मृत्युनंतर तो खालच्या खोलीत काय करत होता हे कुणालाच ठाऊक नाही. त्र्यंबकलालला तळघरातुन वरती आणल्यानंतर कोणी खाली गेलेचं नव्हते त्यामुळे त्या खोलीत नक्की काय होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. तेंव्हा सर्वात प्रथम आपण त्याचा शोध लावणं गरजेचं आहे, कदाचीत त्यानंतरच ह्या प्रश्नाची उकल होऊ शकेल.

ह्या बंगल्याच्या बाजुला आलेल्या काही हौशी तरुणांनी त्याकाळी आपला जिव गमावल्याचेही लोकं बोलतात. पण काहींच्या मते त्यांच्यावर कोणा हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला होता, तर काहींची मतं थोडी वेगळी आहेत.”

 

“बरं रामुकाका, पण आता ह्यातुन बाहेर कसं पडायचं?”, शाल्मलीने विचारले.

“आपल्याला सर्वप्रथम नेत्रा किंवा वैज्ञानीक भाषेत बोलायचे झाले तर तिचा आत्मा अजुनही का भटकतो आहे ह्याचा छडा लावणं गरजेचं आहे. जर केवळं बदला, संताप म्हणुन ती इथं येणार्‍या प्रत्येकाचा जिव घेणार असेल तर… परीस्थीती थोडी कठीणच आहे…”, रामुकाका म्हणाले.

“पण म्हणजे नक्की काय करायचं?”, शाल्मलीने पुन्हा विचारले…

“… म्हणजे आपण तळघरात जायचं.. जेथे त्र्यंबकलाल इतके दिवस स्वतःला खोलीत बंद करुन बसला होता, तो तेथे नक्की काय करत होता ह्याचा शोध घ्यायचा, आपण तेथे जायचे, जेथे सर्वप्रथम त्या कामवाल्या बाईला तळघरात नेत्रा दिसली होती… हो.. आपण तेथे जायचे……”, रामुकाका कापर्‍या आवाजात म्हणत होते………………..

 

[क्रमशः]

तळटीप: मंडळी, त्या विधवा, केश मुंडन केलेल्या, लाल साडीतल्या स्त्रियांना ’अवनी’ म्हणायचे असा माझा समज होता, पण आताशा असं वाटतं आहे की ते ’अवनी’ नसुन ’अलवनी’ आहे. कोणी जाणकार त्याचा खुलासा करु शकतील काय?

70 thoughts on “अवनी – ६

  1. Vishwas Bhagwat

    बरा झाला पोस्ट थोडि लौकर टाकलि…. नाहितर पुन्हा सकाळि वाचावी लागली असती..! 😛

    Reply
  2. Vikram

    It’s turning out really interesting…the pace is really good and constant…after many days reading a good horror story…once you are done with this story check out for marathi horror stories of Narayan Dhaarap…the way he creates the atmosphere is just amazing.

    Reply
    1. अनिकेत Post author

      धन्यवाद.. हो नारायण धारपांची थोडी वाचली आहेत पुस्तक शाळेत असताना.. मस्त लिहितात, ह्या विषयांत हातखंडा आहे त्यांचा

      Reply
  3. onkark

    मुलींना ‘अवनी’ हे नाव ठेवतात त्यामुळे ते नक्कीच विधवा ,केशवपन केलेल्या स्त्रियांना दिले जाणारे नाव नसावे .अवनी म्हणजे “धरती”किंवा सृष्टी असे काहीतरी आहे .
    बाकी कथा भारीच !!

    Reply
  4. Prasad

    Aniket tya striyanna “Alwani” Mhanat asawet karan tya lal kapdala “आलवण” mhanat.

    you are taking the story at a preety intresting stage… Keep it up ani hya nantar ekhadi dirgha kadambari lihi U can create great plot…

    Reply
    1. अनिकेत Post author

      Hmm watlech mala, kaal just strike zal.. anyways, you can read the story name as alavani, instead of avani 🙂

      Reply
    1. अनिकेत Post author

      हा हा हा.. खरंय 🙂 बघु आता काय होतं तळघरात!

      Reply
  5. Swapnil Chalke

    Aniket, Prasad boltoy te barobarch aahe, mi pan Rau, Panipat ashya peshave kalin kadmabarit wachale aahe. Bayaka jo lal kapada gundalayachya tyana “AALAWAN” mhantat. Mhanun “AALAWANI” hach shabd yogya watato.
    Baki stori mhanshil tar ekdum zakkkkkkaaaaaaaasssssssss………….

    Reply
    1. अनिकेत Post author

      हम्म.. मला खात्री नव्हती नक्की काय म्हणतात.

      Reply
    1. अनिकेत Post author

      धन्यवाद सिताराम, ब्लॉगवर इतरही काही कथा आहेत, आशा करतो की त्या सुध्दा तुम्हाला आवडतील

      Reply
  6. Aarti

    तळघरात काय असेल याची उसुकता लागली आहे ? पुढचा post लवकर पाठवा.

    Reply
    1. अनिकेत Post author

      तळघराची मला सुध्दा उत्सुकता आहे 😉 बघु काय होते पुढे.. पुढचा भाग लवकरच..

      Reply
  7. ketaki

    जुन्या काळी विधवा स्त्रियांना केशवपन करून लाल साडी नेसावी लागे आणि डोकं झाकून पदर घ्यावा लागे. त्या लाल साडीला “आलवण” म्हणत. त्यामुळे कदाचित अशा स्त्रीला “आलवणी” च म्हणत असावेत. कारण अवनी हे मुलीचं नाव आहे, आणि कुणीही असा रेफरन्स असलेलं नाव आपल्या मुलीचं म्हणून ठेवणार नाही.

    Reply
    1. Rohini

      nivdak picture takanyachi idea mast ahe.. tyamule imagine karnya peksha real pahilyane farach bhiti watte…mast turn ghetala ahe story ne…keep it up

      Reply
    1. अनिकेत Post author

      श्रध्दा, काय करु? दिवसाचे २४ तास कमी पडत आहेत, वेळ मिळेल तसे लिहीतो त्यामुळे क्रमशः ला पर्याय नाही 😦

      पुढचा भाग लवकरच..

      Reply
  8. TULSIDAS KADU,URAN

    navat kay aahe yaar….
    story itki bhannat chalali aahe na.
    mhanje ya kathet tech tech ratalwane kahi nai sarva kahi navin mhanje yapudhe kay asel yachi kalpana suddha
    nahi.so vachayala kup maja yete.aani
    navach manshil tar mala “aalvani” peksha
    “AVANI” NAV KHUP AVADTE.
    iiits hhhorrableeeeeeee…….

    Reply
    1. अनिकेत Post author

      Kharay, maza toch prayatna hota. Mhanje horror story mhanle ki kahi goshti common yenarach, pan tarihi nehmichacha ten tech faltu gurhal chalvnyapeksha thoda vegle lihaycha prayatna kela aahe.

      Shevat sudhha thoda veglach asnar aahe.. 🙂

      Reply
  9. bhagyashri

    Good going…..now eagerly waiting for next part…means shevat vegla kay asnar yaachi utsukta lagli aahe….:)

    Reply
  10. koushal

    You can consolidate your stories and try to make a book out of it 🙂
    My manager recently did that… His book is published, if you may know Focus Sam.

    Reply
    1. अनिकेत Post author

      कौशल, इच्छा तर तिच आहे, बघु.. पब्लीशर तर मिळायला हवा ना 🙂

      Reply
    1. अनिकेत Post author

      स्वराली, पुढचा भाग नुकताच लिहायला घेतला आहे, झालं की लगेच टाकतो, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

      Reply
  11. Vikram

    अवनी म्हणजे पृथ्वी हे मला नक्की माहित आहे. माझ्या एक संस्कृत शिक्षक आत्या च्या मुलीच नाव अवनी आहे.

    Reply
  12. विशाल जाधव

    कथा खुप चांगल्या वळणावर आहे.पुढचा भाग लवकर येवू दया.

    Reply
  13. Ritulika

    Good going!!
    I found the picture in this part a bit funny and not scary since it looks so digital and techie…does not take you back to an old era…hehe
    But simply great narration.

    Reply
  14. Onkar

    Avai mhanje Pruthvi (Earth) asa hoto. Avani he naav Sita che hote. Sita hi Janak rajala Pruthvi ne dileli kanya ahe ase mhantle jate. tyamule Sitala Avni ase pan mhantle jate… Ani Keshvapan karun Laal kapde ghatlele vidhwa striya ya Aalwani mhantat… Ha prakar Konkanat Jasti pahayala milto.

    Reply
    1. अनिकेत Post author

      हम्म बरोबर, माझं थोडं कन्फ्युजन झालं..

      Reply
    1. अनिकेत Post author

      धन्यवाद प्रियांका.. पुढचा भाग लवकरच..

      Reply
    1. अनिकेत Post author

      हो मित्रा, कामात बिझी होतो, त्यात लॉंग विकेंड त्यामुळे.. असो.. पुढचा भाग लवकरच..

      Reply
  15. shweta

    Mr. Aniket I cna’t tell you how terrific writer you are…..!

    “AVANI” Me javal javal 3vela vachun jhali aahe …………. ani tumchya phudchya postchi arvajun VAT pahat aahe,…………

    Reply
  16. Manasi

    hi… from last 4 days m waiting for the new post…
    its nail biting mystery…. good work aniket…
    post it asap…

    Reply
  17. Prabha

    hi Aniket sorry me tumchya avani chya post thodya late vachalya kamat busy hote jara ektra serv vachalya aani khupach aavdalya mala tya really interesting aata next post sathi aaturtene vat pahat aahe .

    Thanks

    Reply
  18. Rajashree

    Hi Aniket.. u r realy a great writer!! This is a very interesting story taking mysterious turn. i m eager to read next part. please post it soon..

    Reply
  19. Kanchan Karai

    अनिकेत, या भागाच्या शेवटी मांडलेला अंदाज खरा आहे. ’अवनी’ म्हणजे धरती आणि केश मुंडन केलेल्या, लाल साडीतल्या स्त्रियांना आलवण म्हणत नाहीत तर त्या जी लाल रंगाची साडी नेसतात तिला आलवण असे म्हणतात. बाकी कथा तर उत्कृष्ट आहेच. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढतेय.

    Reply

Leave a reply to अनिकेत Cancel reply