स्वप्नपुर्ती….


तीन वर्षांपुर्वी जेंव्हा हा ब्लॉग सुरु केला होता तेंव्हा हा ब्लॉग मला कुठंवर घेऊन जाईल ह्याची यत्कींचीतही कल्पना तेंव्हा नव्हती. परंतु पहील्या दिवसांपासुनच वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तो अजुनही कायम आहे.. किंबहुना यत्कींचीतही वाढलाच आहे.

ह्या ब्लॉगने मला असंख्य मित्र-मैत्रीण दिल्याच शिवाय स्टार-माझा तर्फे ‘ब्लॉग-माझा’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवुन देऊन टी.व्ही. वर झळकण्याची संधीसुध्दा दिली. बघता बघता ब्लॉगला भेट देणार्‍या वाचकवर्गाची संख्या सुध्दा आता १२ लाखाच्या वर जाऊन पोहोचली आहे.

हे कमी की काय म्हणुन आता अजुन एक मानाचा तुरा खोवुन घेण्याचा योग ह्या ब्लॉगच्या रुपाने मला मिळतो आहे.

आज माझी ओळख केवळ एक ब्लॉगर म्हणुन न रहाता एका कमर्शीयल नाटकाचा लेखक म्हणुन होऊ पहात आहे.

साधारण एक महीन्यांपुर्वी मुंबईस्थीत ‘निलमंगल एंन्टरटेंमेंट’ ह्या प्रॉडक्शन हाऊसने माझा ब्लॉग वाचुन संपर्क केला. ते एका रोमॅन्टीक-कॉमेडी नाटकाच्या शोधात होते आणि त्यांच्या पुढच्या नाटकाची स्क्रिप्ट मी लिहावी असा जणु आग्रहच त्यांनी धरला.

आजपर्यंत केवळ कथा-लेखनच केलेले असल्याने आणि माझं नाटकं पहाणं तसं कमीच असल्याने एकुणच मला जमेल की नाही ह्याबद्दल साशंकता होती, पण सुरुवात केली आणि बघता बघता एक छोटंस उगवलेले रोपट आज नाटकाची स्क्रिप्ट म्हणुन पुर्णत्वास येत आहे. नाटक अर्थात सर्व टीमच्या पसंतीस पडले आहे आणि लवकरच कास्टींग पुर्ण होईन रिहर्सल्स सुध्दा सुरु होतील.

केवळ स्वप्नातच पाहीलेले आज प्रत्यक्षात उतरताना पाहुन कोण आनंद होतो आहे आणि हे केवळ शक्य होते आहे ते तुम्हा सर्वांनी ब्लॉगवर दाखवलेल्या प्रेमामुळे, वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रियांमुळेच. तुम्हा सर्वांचे शतशः धन्यवाद.

नाटकाची प्रोग्रेस, कास्टींग, रिहर्स्लल्स च्या गमती जमती सर्वकाही मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेच पण त्यासाठी ‘फेसबुकावरील’ डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा पेज नक्की लाईक करा म्हणजे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील.

अर्थात ही केवळ एक सुरुवात आहे, अजुन अश्या काही गोष्टी पाईपलाईनमध्ये आहे ज्या मला एक प्रतिथयश लेखक म्हणुन प्रसिध्दी देतील, अर्थात त्याबद्दल आत्ताच सांगणे योग्य ठरणार नाही.. योग्य वेळ आली की सांगेनच…

परंतु त्यापुर्वी एक टिझर…….

नोंद – चित्रं, महाजालावरुन साभार. नाटकाचे फोटोशुट व बॅनर बनेपर्यंत एक प्रतिकात्मक म्हणुन हे चित्र इथे जोडले आहे ह्याची नोंद घ्यावी.

56 thoughts on “स्वप्नपुर्ती….

 1. Gouri Bhagwat (Teju)

  Aniket, abhinandan mitra!! pagdi mothe havi tuzi ata manache ture khowayla bharpoor scope hawa! Khoop khoop abhiman watato ase wachle ki. God Bless You!!

 2. Sanjay A Pawar

  काय ? कुठे ? केव्हा ? सर ………. खरच ?? मला नाटकाला बोलवाल ना सर ???

  खूप साऱ्या शुभेच्छा……

 3. Prasad

  HEartiest Congrats Aniket.. Wish U all the best.. hopefuly tu lawkarach ek prathityash lekhak aani patkathakar mhanun disashil

 4. savitarima

  Solid News दिलीय तुम्ही ! अभिनंदन ! एक प्रश्न मनात येतोच…..नवीन कथा कधी लिहिणार ब्लॉग वर 😉

  1. अनिकेत

   प्रश्न चांगला आहे.. पण बहुदा इतक्यात नाहीच.. 🙂

 5. aruna

  wow, congratulations.one more feather in your cap.
  तुमच्या येणार्‍या सगळ्या प्रकल्पांना शुभेच्छा.

 6. वाह! अनेक शुभेच्छा.. तुमच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा .. नाटकाची आतुरतेने वाट पाहतोय.

 7. Shrikant

  Awesome……अभिनंदन अनिकेत… आजवर तूझ्या लिह्लेल्या कथा खूप अवाडल्या ….या नाटकाची आम्ही आतुरतेनी वाट बघतो आहे ….

 8. manapasun abhinandan aniket tumhala ……….. amhala tumacha khup abhiman vatato ani ho natakache updates kalavayala visaru nakat……… tumachya pudhil pravasasathi sadichha ………… parat ekada abhinandan …………….

 9. Dipali

  अभिनंदन सर ! 🙂 🙂
  पण नवीन कथा कधी मिळणार वाचायला ???? नवीन कथेची आम्ही आतुरतेनी वाट बघतो आहे …..

 10. Purnima

  Khup Khup ABHINANDAN SIR……… divsen divas ashich tumachi pargati hot raho hich ISHWAR charni prarthna…. 🙂 & Dusari script hi lavkar milot……

 11. Dipti

  BIG BIG BIG congratulations Aniket. I am sure its just a start, you have a long way to go..Gr8 news..and all the best on new venture 🙂

 12. kirti

  अनिकेत,
  मी तुझ्या ब्लॉगची नियमित वाचक आहे. यापूर्वी एक- दोनदा तुझ्याशी संपर्क साधायचा होता; पण योग आला नाही. ही पोस्ट वाचून मात्र आवर्जून संपर्क करायचा ठरवलं.
  मी ‘महाराष्ट्र टाइम्स- पुणे आवृत्ती’मध्ये काम करते. तुझ्या या पोस्टसंदर्भात बोलायचं आहे. तू माझ्या इ-मेलवर तुझा फोन नंबर पाठवलास, तर उद्या फोन करून सविस्तर बोलेन.
  थँक्स आणि अभिनंदन.

  कीर्ती

  1. अनिकेत

   धन्यवाद कीर्ती, माझा फोन नंबर तुला इ-मेल केला आहे

 13. अनिकेत

  Thank you each and every one of you. I really need your love, blessings and best wishes. Thank you once again…

 14. kalyani

  हार्दिक अभिनंदन !! आता या नाटकची आतुरतेने वाट पाहत आहोत..पुढील वाटचालीसाठी
  खूप सदिच्छा

 15. Nitesh

  Wow….. Aniket….. mi ajibat surprise nahi jhalo…. karan mala khatri hoti ki kunitari tujhya hya katha vachel ani tujhya eka stroies var film vagaire banvel…… pan Natak… hi ek khup changalli gosht ahe….. mhanje ata tujhi ek navin story natkachya rupane baghavayas milnar ahe.. I am waitng for it……. & all the best…

 16. Vikram

  खूप खूप अभिनंदन !!
  तुम्ही म्हणाल हा जेव्हा लिहितो तेव्हा सूचनाच करतो . पण मी एक नियमित वाचक आहे आणि प्रेमापोटी सूचना करतो .. No offense meant , Hope none taken.
  तर सूचना अशी आहे की “होतं असं कधी कधी” नावाचा एक चित्रपट ४-५ वर्षा पूर्वी येऊन गेला आहे .. तो चालला नाही चालला , किती लोका पर्यंत पोचला हे काही माहित नाही – पण ह्या नावाचा चित्रपट येऊन गेला आहे .. तरी ते copy write चे काही प्रोब्लेम येणार नाहीत ह्याची काळजी घ्या !
  शुभेच्छा !

  1. अनिकेत

   yes sir आलं लक्षात ते, नाटकाचं नाव आधीच बदलले आहे 🙂
   धन्यवाद…

 17. Arpana

  Hi,,, Aniket….

  me Tumcya sagalya story vachlya aahet. Khup Chan Lihita tumhi. Asech Chan Chan Lihit raha…All the best ………..

 18. shreekant nimbhorkar

  sir mala tmcha blog khup awadala .please mala tumcha mobail no. send karal ka majhya mobail war . majha mob. no. -9730107241

Leave a Reply to अनिकेत Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s