प्यार मे.. कधी कधी (भाग-१८)


भाग १७ पासुन पुढे>>

“संध्याकाळी घरी ये..”, हॉटेलमधुन निघताना प्रिती म्हणाली..
“प्लिज यार.. घरी नको.. तुझी आई परत खायला घालत बसेल…”
“नाही नाही.. आय प्रॉमीस.. तु ये ७ वाजता, मी वाट बघतेय ओके?”

 

ठरल्यावेळी मी प्रितीच्या घरी पोहोचलो.. दार उघडेच होते. कसलातरी मस्त, मंद सुगंध पसरला होता. बाहेर कोणीच नव्हते..

“प्रिती..”, मी हलकेच हाक मारली..
“आले आले.. बसं.. दोनच मिनीटं..”, प्रिती आतुन म्हणाली.

मी सोफ्यावर बसलो, दोन मिनीटांत प्रिती बाहेर आली. पुर्ण अवतारात होती. केस विस्कटलेले.. हाताला, गालाला, नाकाला पिठ लागलेलं.
“ओह प्लिज.. आता तु नको पराठे करुस..”, मी घाईघाईने सोफ्यावरुन उठत म्हणालो..
“नाही रे.. पराठे नाही करत आहे.. केक करतेय तुझ्यासाठी..”, प्रिती

मी दचकुन इकडे तिकडे बघीतलं. “घरी नाहीये का कोणी?”
“नाहीये.. “, प्रिती हसत म्हणाली.
“मी लगेच हातातले पुस्तक खाली ठेवले आणि प्रितीकडे गेलो..”
“नो.. वेट.. आत्ता नाहीए.. आई शेजारीच गेलीय दुकानात.. येईलच एव्हढ्यात…”
“ओह डॅम्न..”, वैतागुन मी परत जागेवर जाऊन बसलो…
“आलेच मी केक ओव्हनमध्ये ठेऊन..”, असं म्हणुन प्रिती आतमध्ये गेली.

दोनच मिनिटं झाली असतील इतक्यात फोन वाजु लागला…
“प्लिज.. नो सपोर्ट कॉल..”, वैतागुन मी फोनवरचा नंबर बघीतला.. आणि चकीतच झालो..

नेहाचा फोन होता.

मला काय करावं काहीच कळेना.. बर्‍याच वेळ फोन वाजत राहीला..

“तरुण.. फोन वाजतोय.. झोपलास का?”, प्रिती आतुन ओरडली..
फोन वाजुन बंद झाला..आणि परत काही वेळाने वाजु लागला..

“अरे फोन घे ना..”, प्रिती बाहेर आली.. माझ्या चेहर्‍यावरचे भाव बघुन काही तरी गडबड आहे तिच्या लक्षात आलं.
“कुणाचा फोन आहे?”
“नेहाचा…”

एव्हाना फोन वाजुन बंद झाला आणि परत वाजु लागला..
“घे फोन.. बघ काय म्हणतेय..”

मी फोन उचलला..

“हाय नेहा.. व्हॉट अ सर्प्राईज..”
“हाय तरुण, कसा आहेस?”
“मी मस्त, बोल.. कशी आठवण काढली?”
“तरुण, मला तुला भेटायचं होतं.. इनफ़ॅक्ट तुला आणि प्रितीला दोघांनाही.. त्या दिवशी जे झालं त्याबद्दल.. आय वॉन्ट टु अपॉलॉजाइज..”
“इट्स ओके नेहा.. मी विसरुन गेलोय ते.. अ‍ॅन्ड आय एम शुअर.. प्रिती सुध्दा विसरली असेल”

प्रिती समोरुन मला काय बोलती आहे नेहा विचारत होती.. पण मी तिला थांबायची खुण केली..

“नो तरुण.. खुप गिल्टी वाटतं रे.. शेवटी आपण सगळे मित्र आहोत.. मित्रांना असं कोण बोलतं का..? कुठे आहेस तु? आपण कुठे भेटु शकतो का? म्हणजे मग तसं मी प्रितीला पण फोन करुन विचारते.”, नेहा

मला काय बोलावं तेच सुचेना.. मी एकदम बोलुन गेलो.. “मी प्रितीच्याच घरी आहे..”
“ओह दॅट्स ग्रेट .. ठिक आहे.. मी येते १५-२० मिनीटांत..”

मी पुढे काही बोलायच्या आधीच नेहाने फोन बंद केला..

“अरे तिला कश्याला सांगीतलंस तु इथे आहेस..”, प्रिती वैतागुन म्हणाली..
“तिने विचारलं कुठे आहेस. मला एकदम सुचलंच नाही कुठे आहे सांगावं..”

“बरं, काय झालं? काय म्हणत होती?”
“काही नाही.. तिला आपली माफी मागायची आहे.. त्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल.. आणि म्हणुन..”
“म्हणुन काय?”, प्रिती डोळे मोठ्ठे करत म्हणाली..
“म्हणुन मग ती इथेच येतेय.. म्हणजे ती म्हणाली होती.. बाहेर कुठे तरी भेटु.. तुला पण फोन करणारच होती. पण मी इथेच आहे म्हणल्यावर..”

प्रितीचा चेहरा खर्र्कन उतरला..

“फ*.. तरुण, ही संध्याकाळ मी फक्त तुझ्यासाठी प्लॅन केली होती..काही गरज होती का तिला सांगायची? तुला माहीती आहे ना कशी आहे ती..”
“बरं ठिके.. मी करतो तिला फोन सांगतो, मी निघतोच आहे इथुन.. पाहीजे तर उद्या बोलु..”, मी फोन उचलत म्हणालो..
“नको प्लिज.. वाईट दिसेल तसं.. उगाच तिला वाटेल मीच सांगीतलं म्हणुन..”, प्रिती मला थांबवत म्हणाली

काही क्षण शांततेत गेले. ओव्हन आत मध्ये बिप-बिप करत होता.

“ईट्स ओके प्रिती.. शेवटी आपण मित्रच आहोत ना.. मे बी तिला खरंच पश्चाताप झाला असेल.. मे बी.. ही संध्याकाळ एक चांगलं फ्रेंडली गेट-टू-गेदर होईल.. हु नोज?”, मी सारवासारव करत म्हणालो.

“हम्म..”, प्रिती म्हणाली

खरं तर माझी चुक होती. माझ्या लक्षात नाही आलं. नेहा माझ्यासाठी आता फक्त एक मैत्रिण असली तरी, शेवटी काहीही झालं तरी प्रितीसाठी ती माझी ‘एक्स’ होती. आणि कुठल्याही मुलीला खास तिच्या बॉय-फ्रेंड्साठी प्लॅन केलेल्या संध्याकाळी त्याची ‘एक्स’ तेथे असणं पटलंच नसतं.. पण आता काय उपयोग.. माझा मुर्खपणा नडला होता.

१० मिनीटांतच दाराची बेल वाजली.

मी आणि प्रितीने एकमेकांकडे पाहीलं. प्रितीने मला दार उघडायची खूण केली आणि ती आत, किचनमध्ये निघुन गेली. तिच्या चेहर्‍यावरुन तिचं बिनसलं आहे हे कळत होतं.

मी दार उघडलं.

“हाय तरुण..”, नेहाने मला पाहताच मला दारातच मिठी मारली.. नेमकं त्याच वेळी प्रिती किचनमधुन बाहेर आली..
“ओह वॉव.. प्रिती.. केक बनवते आहेस?, मस्त वास येतोय..”, थोड्याश्या खवचटं सुरात नेहा म्हणाली..

प्रितीने माझ्याकडे बघीतलं.

“ऑन्टी नाहीयेत घरी?”, नेहाने जाणुन बुजुन प्रितीला विचारलं..
“नाहीये.. दुकानात गेलीय.. येईलच इतक्यात…”

“उह्ह्ह.. म्हणजे दोघं एकटेच की काय घरी..?”, डोळे मिचकावत नेहा म्हणाली..
प्रिती काही न बोलता किचनमध्ये निघुन गेली..

“काय झालं? मी इथे येण आवडलं नाही का प्रितीला?”, नेहाने मला विचारलं..
“नाही.. तसं काही नाही.. मे बी त्या दिवशी जे झालं.. ते अजुन मनात असेल तिच्या.. तु सॉरी म्हण तिला.. शी विल बी ओके..”

“सॉरी? माय फुट..”, अचानक गेअर बदलत नेहा म्हणाली.. “मी उगाचच इतके दिवस स्वतःला गिल्टी वाटुन घेत होते.. पण आता इथे काय चालंल आहे ते पाहील्यावर वाटतंय मी बरोबरच होते..”

“अच्छा? काय चाललं आहे इथे?”, प्रितीने बाहेर येऊन विचारलं
“ऑन्टी घरी नाहीत.. दोघंच एकटे.. त्यात केक बनतोय.. ह्याचा अर्थ काय समजत नाही का मला?”
“सो? तुला काय करायचं आहे त्याच्याशी?”, प्रिती
“मला काहीच करायचं नाहीये.. पण आय गेस.. यु बोथ शुड से सॉरी टु मी.. त्या दिवशी मी बरोबरच होते..”
“सॉरी कश्याबद्दल नेहा… मी काय गुन्हा केलाय?”
“आय टोल्ड यु.. तु माझा बॉयफ्रेंड..”

“ओके स्टॉप.. प्लिज डोन्ट स्टार्ट अगेन..”, मी मध्यस्थी करत म्हणालो.
“तरुण.. यु स्टॉप.. तु प्रितीबद्दल सांगीतलं आहेस घरी?”,नेहा

मी काहीच बोललो नाही.

“ओह.. सो म्हणजे.. हिला पण असंच फिरवुन सोडुन देणार का माझ्यासारखं?”, नेहा
“वॉच आऊट प्रिती.. तुझी मैत्रीण आहे म्हणुन मला तुझ्याबद्दल काळजी वाटते बाकी काही नाही..”
आय कुड सी, प्रिती वॉज रिअली डिप्रेस्ड..

मी पुढे बोलणार होतो इतक्यात दाराची बेल वाजली.. प्रितीने दार उघडले.. प्रितीची आई आली होती.
नेहाला बर्‍याच दिवसांनी बघताच त्यांना आनंद झाला..

“अरे नेहा बेटा.. खुप दिवसांनी.. कशी आहेस..”, आपुलकीने त्या म्हणाल्या..
“मी छान ऑन्टी.. घरचे सगळे छान..”

मी आणि प्रितीने एकमेकांकडे बघीतलं. दोघांच्याही मनात कुठेतरी धाकधुक होती. नेहाने आमच्याबद्दल इथे काही बोलु नये म्हणजे झालं.

“प्रिती.. केक ठेवला आहेस का ओव्हनमध्ये…”, आईने विचारलं..
“नाही आई.. मी आपलं.. असंच एक्सपरीमेंट करत होते.. पण सगळंच खराबं झालं..”, माझ्याकडे बघत प्रिती म्हणाली.. “एक काम कर, ड्स्ट-बिन मध्ये टाकुन दे तो केक..”

प्रितीचं नाक लालं झालं होतं..

“ओके ऑन्टी.. मी निघते.. भेटु परत सावकाशीत..”, नेहा म्हणाली आणि मला आणि प्रितीला काही न बोलताच निघुन गेली.
“तरुण.. बस ना.. तु का उभा..”, त्यांनी मला विचारलं..
“आई.. तो पण चाललाच आहे घरी.. सहजच आला होता…”, प्रिती म्हणाली..

क्लिअरली, तिचा मुड ऑफ झाला होता…

“आय एम सो सॉरी प्रिती फ़ॉर ऑल धिस…तुला आयुष्यात पुन्हा कध्धी.. कध्धी दुःखी होऊ देणार नाहि..”, मनातल्या मनात मी म्हणालो
प्रिती माझ्या चेहर्‍यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होती. कदाचीत माझ्या मनात काय चालु आहे तिला कळलं असावं.

चेहर्‍यावर उसनं हसु आणुन तिनं मला बाय केलं आणि मी तेथुन बाहेर पडलो.

 

दुसर्‍या दिवशी ऑफीसला सुट्टीच होती. घरी बसुन डोक्याची पार मंडई झाली होती. कालच्या घटना क्रमाक्रमाने डोळ्यासमोरुन जात होत्या. प्रितीचे पाणावलेले डोळे ह्रुदयाला यातना देत होते.

“ईट्स्स पे-बॅक टाईम..”, मी विचार केला. नेहाला फोन करुन चार शिव्या घालायच्याच ह्या विचाराने फोन उचलला आणि नेहाचा नंबर लावला.

“हाय तरुण.., गुड मॉर्नींग”, दोन रिंग मध्येच नेहाने फोन उचलला..
“गुड मॉर्नींग माय फुट..”, मी चिडुन म्हणालो
“का? काय झालं? तुझ्या नविन गर्लफ्रेंडशी भांडण झालं का तुझं?”, हसत हसत नेहा म्हणाली
“शट अप नेहा…”
“नो.. आय वोंन्ट. बोल तरुण काय झालं? फालतु कारणावरुन भांडली का ती तुझ्याशी? मला माहीती होतं हे होणार.. तशीच आहे ती तरुण.. यु वोन्ट बी हॅप्पी विथ हर..”

“आय डोन्ट बिलिव्ह.. यु आर द सेम नेहा.. जिच्यावर मी प्रेम केलं होतं?”
“होतं?? नाही तरुण.. होतं नाही.. आहे.. तु अजुनही प्रेम करतोस माझ्यावर.. काल मी तुझ्या डोळ्यात ते पाहीलं आहे..”, नेहा
“व्हॉट? आर यु आऊट ऑफ़ युअर हेड?”
“बघ तरुण तुच बघ.. आपण दोघं एकत्र होतो, तेंव्हा कधी तरी तु इतका चिडला होतास का? हाऊ हॅप्पी वुई वेअर टुगेदर? मग आता काय झालं?”

“नेहा यु आर मॅरीड नाऊ.. अ‍ॅन्ड वुई ब्रोक-अप..”
“मॅरीड? अ‍ॅग्रीड.. पण ब्रोक-अप? कधी.. तु असं कधीच म्हणला नाहीस, आणि मी म्हणल्याचही मला आठवत नाही..”
“ओह कमॉन.. त्यात म्हणायची काय आवश्यकता आहे.. यु आर मॅरीड.. पिरीएड..”
“सो व्हॉट? कान्ट गर्ल्स हॅव एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर्स? वुई डीसाईडेड वुई वोन्ट गेट मॅरीड.. विच इज ओके, पण आपण असं कधीच म्हणलं नव्हतं की आपण परत एकत्र..”
“हो.. पण एकत्र येऊ असंही म्हणलो नव्हतो..”
“मग मी म्हणतेय ना आता? आय मिस्स यु तरुण..”

“नेहा, मी तुझ्याशी वेगळ्याच विषयावर बोलण्यासाठी फोन केला होता.. पण आय गेस.. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. ठिक आहे.. जर मी आधी म्हणालो नसेन तर..आय वॉन्ट टु ब्रोक-अप विथ यु.. गेट लॉस्ट नेहा.. नेव्हर टु सि यु अगेन..”

“आय नो तरुण, यु लव्ह मी.. आय नो यु आर इरीटेटेड विथ प्रिती अ‍ॅन्ड हर इमोशनल ड्रामा.. माझं लग्न झालं तेंव्हा तु पुर्ण कोलमडुन गेला होतास.. मे बी प्रिती ऑफर्ड हर शोल्डर.. मे बी समथींग एल्स.. तु अश्या मुलींना ओळखत नाहीस तरूण, प्रिती इज नो लेस दॅन अ व्होअर.. जस्ट अ स्लट..”

“इनफ नेहा..”, मी शक्य तितक्या जोरात किंचाळलो… आमच्याच मजल्यावर काय.. अख्या बिल्डींगला माझा आवाज ऐकु गेला असेल. “आज मी तुला प्रॉमीस करतो नेहा.. इकडचं जग तिकडं झालं तरी चालेल, पण मी प्रितीशी लग्न करुन दाखवेनच.. आणि देवाच्या आधी पहीली पत्रीका तुला पाठवेन.. बर्न इन हेल नेहा…”

“तरुण प्लिज.. ऐक..”

नेहा पुढे काही तरी बोलत होती, पण त्याआधीच मी फोन बंद करुन जमीनीवर फेकला होता.
काही वेळातच फोन पुन्हा वाजु लागला. मी सोफ्यावरच्या दोन चार उश्या.. सेन्टर टेबलवरचे मॅगझीन्स चिडुन त्या फोनवर फेकले. नेहाचा फोन घ्यायची मला अज्जीबात इच्छा नव्हती.

दोन तिनदा फोन वाजला आणि मग बंद झाला.

मी अजुनही संतापाने थरथरत होतो. प्रितीला असं म्हणुच कसं शकते नेहा…

५-१० मिनीटं झाली आणि दाराची बेल वाजली. नेहा असण्याची शक्यता कमीच होती, इतक्या कमी वेळात ती घरी येणं अशक्य होतं. आई मावशीकडे गेली होती, तिच्या मुलीच्या मुलीची बारश्याची तयारी करायला. ती इतक्या लवकर येणही शक्य नव्हतं.. मग?

“जर आत्ता सेल्समन असेल बाहेर.. तर आज त्याचं काही खरं नाही..”, मनाशी विचार करत मी तडफडत उठलो आणि दार उघडले.

टु माय सप्राईज.. बाहेर प्रिती उभी होती. फिक्क्ट पिवळ्या रंगाचा पंजाबी, पिकॉक रंगाची कॉन्ट्रास्टींग ओढणी, गोलाकार मोठ्ठ कानातलं, हातात बांगड्या, फिक्क्ट गुलाबी रंगाचं लिपस्टीक.

मी तिच्याकडे बघतच राहीलो.

“मी आत आले तर चालेल ना?”, हसत प्रितीने विचारलं..
“ओह.. सॉरी.. प्लिज.. कम इन..”

प्रितीने हॉलमधुन एक नजर फिरवली.. मोबाईल त्याचं कव्हर सोडुन जमीनीवर पडला होता. सोफ्यावरच्या उश्या, मॅगझीन्स, पेपर्स इतरत्र विखुरले होते. फ्लॉवर-पॉट टेबलावर आडवा पडला होता..

“आई नाहीये घरी?”, प्रितीने इतरत्र बघत विचारलं..
“अं..? आई?.. नाहीये..”

“काय झालंय इथं?”, प्रितीने न बोलता जमीनीवर पडलेल्या उश्या उचलुन सोफ्यावर व्यवस्थीत ठेवल्या.. मोबाईलला कव्हर लावुन टेबलावर ठेवला. पेपर्स, मॅगझीन्स उचलुन टेबलावर ठेवली.. फ्लॉवर-पॉट सरळ केला.

मी अजुनही बधीरासारखा नुसता उभा होतो.

प्रितीने तिच्या पर्समधुन केशरी रंगाचं जर्बेरा फुल् काढुन माझ्या हातात दिलं. किती आकर्षक फुल असतं ते जर्बेराचं.. पण प्रितीच्या हातात त्याला काहीच रुप वाटत नव्हतं.. मी ते फुल घेऊन नुसताच उभा होतो.

प्रितीने हसुन ते फुल माझ्या हातातुन परत काढुन घेतलं आणि फ्लॉवर-पॉटमध्ये ठेवलं. मग मला सोफ्यावर बसवलं, आणि सोफ्याच्या हॅन्डलवर बसुन म्हणाली, “काय झालं शोनु? का डिस्टर्ब्ड आहेस एव्हढा?”

“नेहाला फोन केला होता..”, सांगावं का न सांगाव अश्या द्विधा स्थितीत मी म्हणालो.

तिच्या कपाळावर एक हलकीशी आठी उमटुन गेली.

“आय नो.. तुला आवडणार नाही.. पण काल ज्या पध्दतीने ती तुझ्याशी वागली.. मला राहवलं नाही.. म्हणुन..”
“काय फरक पडला तरुण त्याने.. शेवटी डिस्टर्ब तुच झालास ना? सोड ना.. विसरुन जाऊ तिला..चल तु रेडी हो.. तुला कुठेतरी घेऊन जायचं आहे..”
“इतक्या सकाळी? कुठे?”
“तु चल तर.. कळेल तुला.. आणि प्लिज जिन्स-टी शर्ट वगैरे घालु नकोस.. कुर्ता असेल ना तो घाल ओके?”

मला न विचारताच तिने टीव्ही लावला.. ड्रॉवर मधुन रिमोट घेतला आणि टी.व्ही बघत बसली..

तिला माझ्या घरात इतकं कंम्फर्टेबल बघुन, मनाला खुप बरं वाटत होतं. सगळं काही व्यवस्थीत झालं तर काही महीन्यात प्रिती माझ्या घरी असेल.. मिसेस प्रिती तरुण…

स्वतःशीच हसुन मी कपडे बदलायला बेडरुम मध्ये गेलो..

 

साधारण तासाभरानंतर आम्ही गुरुद्वारासमोर उभे होतो. प्रितीने सॅन्डल्स काढुन कोपर्‍यात ठेवल्या, ओढणी डोक्यावर घेतली आणि डोळे मिटुन हात जोडुन बराच वेळ उभी राहीली. मी वेड लागल्यासारखा कित्तीतरी वेळ तिच्याकडे बघत तिथेच उभा होतो.

एन्जल्स असेच दिसतात का?

गेटमधुन आतमध्ये आलो आणि का कुणास ठाऊक मनाला प्रचंड शांतता मिळाल्यासारखे वाटले. एका कोपर्‍यातुन थंडगार पाणी खाचेतुन वाहात होते. त्यात पाय बुडवुन आम्ही आतमध्ये गेलो. नक्की काय करायचे हे माहीत नसल्याने मी प्रितीच्या मागोमाग, ती जसं करेल तसंच करत होतो.

नमस्कार करुन बाहेर आल्यावर, प्रिती कोपर्‍यातील एका विशाल झाडाखाली एक पुजारी बसले होते त्यांच्याकडे गेली. मी ही तिच्या मागोमाग गेलो.

प्रितीला बघताच त्यांच्या चेहर्‍यावर एक हास्य उमटले.

“त्व्हाडा की हाल है जी”, त्या पुजार्‍याने प्रितीला विचारले.
“मेरा हाल ठिक है”, मान वाकवुन प्रिती म्हणाली आणि मग माझ्याकडे बोट दाखवत म्हणाली.. “धिस इज तरुण..”
“सत श्री अकाल”, माझ्याकडे बघत ते म्हणाले

मी नुसतंच हसुन त्यांना नमस्कार केला.

प्रिती गुडघ्यांवर खाली बसली आणि त्यांच्या कानात तिने हळु आवाजात काही तरी सांगीतलं. त्या पुजार्‍याने एकदा माझ्याकडे हसुन बघीतलं आणि मग शेजारच्या पेटीतुन एक पिवळ्या तांबड्या रंगाचा धागा काढला. डोळे मिटुन, कपाळाला लावुन त्यांनी तो धागा प्रितीच्या हातात बांधला. मग परत अजुन एक धागा काढला आणि तसंच करुन माझ्या हातात बांधला.

आम्ही परत खाली वाकुन त्यांना नमस्कार केला आणि मग तेथुन थोडं दुर एका हिरवळीवर जाऊन बसलो.

“हे कश्यासाठी..?”, हातातल्या त्या धाग्याकडे बघत मी प्रितीला विचारलं..
“असंच.. धिस विल प्रोटेक्ट यु फ्रॉम बॅड थिंग्ज..”, हसत प्रिती म्हणाली..
“बॅड थिंग्ज? म्हणजे…”
“म्हणजे.. द-वन-हु.शुड-नॉट-बी-नेम्ड..”, हसत प्रिती म्हणाली.. “बरं, सांग काय झालं मगाशी? का चिडला होतास एव्हढा?”

मी प्रितीला सगळं सांगीतलं. मला वाटलं ती डिस्टर्ब होईल, पण तिने शांतपणे ऐकुन घेतलं.

“असो.. खरं तर तु तिला फोनच नको होतास करायला..”, प्रिती म्हणाली..
“असं कसं.. तिने काल जे माझ्या गर्लफ्रेंडला केलं.. त्याची भरपाई नको करायला?”, चिडुन मी म्हणालो
“मला त्रास झाला म्हणुन तुला राग आला?”, प्रितीने माझ्या डोळ्यात बघत विचारलं..
“ऑफकोर्स..”

“मै तेनु प्यार करना..”, प्रिती खाली बघत.. हिरवळीवरचं गवत एका हाताने खुरडत लाजत लाजत म्हणाली..
“आत्ता? इथे?”, शॉक बसल्यासारखा मी म्हणालो.
“काय आत्ता इथे?”, प्रिती
“तेच जे तु म्हणालीस.. मै तेनु प्यार करना.. आय मीन.. आय वॉन्ट टु मेक लव्ह टु यु.. ना?”, न कळुन मी म्हणालो…
“अरे यार.. म्हणजे.. आय लव्ह यु.. माझं तुझ्यावर प्रेम आहे.. तु पण ना..”, हसत हसत प्रिती म्हणाली

प्रिती गालातल्या गालात हसत खुप वेळ माझ्याकडे बघत होती..

“नाऊ व्हॉट?”, मी न रहावुन विचारलं..
“काही नाही..”, प्रिती
“काही नाही नाही.. बोल काय..”
“कसला गोडु आहेस रे तु…”, हसुन मान हलवत प्रिती म्हणाली..

कोण म्हणतं मुलांना लाजता येत नाही म्हणुन.. जस्ट लुक अ‍ॅट मी गाईज.. आय एम ब्लशींग…

35 thoughts on “प्यार मे.. कधी कधी (भाग-१८)

 1. सुशिल

  अस का वाटतय, की नेहा वाईट्टपणा घेउन त्यांना इन्सपायर करतीये?
  बाकी तुझ्या लिखाणा विषयी काय बोलावं??
  .
  .
  .
  .
  .

  तू सिम्बि मध्ये पण असाच होतास का रे? की ही वहिनींची कमाल??

  Reply
  1. अनिकेत Post author

   असा म्हणजे कसा? पण मी बदललो नाहीये… असाच आहे मी.. चांगला म्हण नाहीतर वाईट 🙂

   Reply
 2. Nitin

  Superb Aniket da aani itakya fast eka mogo maag ek part jabardasdt saare jakhmo par paani hava ki lehar cha gayi dil main ek baar superb hats of u da

  Reply
 3. Neha

  Nehmipramane mast part….

  Gelya kahi bhagamadhe Preetichya poshakhabaddal lihile navte te mi miss kel hot…gelya 2 bhagapasun punha lihilay…vachtana nehmi dolyasamor chita yetatach…pan kapadyanche ani tyanchya rangache suudha varnan kelyamule chitra ajun rangeet hotat…
  🙂

  Reply
   1. Neha

    Nusta okay nahi ़़़़़ zakaaaassssch asta warnan…ekun sagla likhan mastach asta…..mhanun tar amhi fan ahot tumchya likhanache……:)

    Reply
 4. Ganesh

  Awesome…………… pan asach lavkar bhag takat ja, jasta vaat baghayla lavu nako…………..
  likhan khup masta ahe…………..

  Reply
 5. priyanka

  Hye khup chan aahe part mustch romantic ter aahech pan aata tarun tyachya aai vadilana kadhi sangnar aahe yenarya part madhe asu det

  Reply
 6. Prajakta

  Nehacha nakki lagna zhalay na? Ka kahitari Neha ani Preeticha paln ahe Tarunla addal ghadyala?
  kiwa Preetila patun dyacha asel….je ti surwatila mhnat hoti. kadhi sampnar gosta..

  Reply
 7. Vishakha

  Hi Aniket
  majhya eka friend hi link dili mala, mi tumchya saglya stories vachlya all are fantastic ur thoughts are really amazing etakya different different subjects var Horror,Love and suspense stories ahet all are just amazing, mastach ahe tumcha blog i like it very much and my favorite is ‘Avani’ mala tar vatat tyavar movie kadhla tar khup hit hoel

  Reply
 8. nilesh patil

  ri8 vishakha alavni movie banayla havi… mala avani hi story khup avadte n aniket bhauuu mastach likhan ahe awsome………. vachun vatat aply pn life madhe asavi priti sarkhi konitari……

  Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s