डबल-क्रॉस (प्रस्तावना)


१५० करोडचा खेळ होता तो. शेखर, एक प्रतिथयश गुन्हेगारी कथा लेखक, ज्यांची अनेक पुस्तक ‘बेस्ट-सेलर’ ठरली होती, माऊथ-पब्लिसिटीवरून कथेचा शेवट माहित असूनही लोकांनी पुस्तक विकत घेऊन वाचली होती. का? कारण त्यांचं लिखाण हा एक जगावेगळा अनुभव होता. वाचकांना क्षणार्धात टाईम-ट्रॅव्हल करवणारा. अनेक वाचक त्या पात्रांच्या जागी स्वतःला अनुभवायचा आणि एक विलक्षण, थरारक अनुभव मिळवायचे.

ह्यावेळी, शेखर एका टीव्ही वरील सस्पेन्स-थ्रिलर मालिकेसाठी लिखाण करणार होते. अजून त्यांनी एक शब्दही लिहिला नव्हता आणि टीव्ही कंपनीने आधीच राईट्स विकत घेतले होते. प्री-प्रोडक्शन काम देखील सुरु झाले होते. अनेक प्रतिथयश कलाकार साईन झाल्याच्या वावड्या उठल्या होत्या. प्रॉडक्शन हाऊसने कुठेही हात आखडता न घेता बिग-बजेट, लाईफ-साईझ सिरीयल बनवायचे मनसुबे आखले होते. खूप पैसापणाला लागला होता. आणि हे सगळं ऑन-द-गो होणार होते. जसा जसा शेखर एक एक भाग लिहून हातावेगळा करतील, तसं-तसा तो भाग शुट होऊन प्रक्षेपीतही होणार होता.

कथा लेखनात अडथळा नको म्हणून शेखर त्यांच्या पत्नीला घेऊन त्यांच्या दुर्गम भागात असलेल्या एका व्हिलावर रहायला जाणार होते.

अर्थात ह्यात रिस्क होती. शेखरच्या जिवाला काही बरे-वाईट झाले तर इन्व्हेस्ट झालेला सगळा पैसा मातीमोल होण्याची शक्यता होती आणि म्हणूनच त्यांच्या जीवाची इन्शोरंन्स पॉलिसी उतरवण्यात आली होती. १५० करोड रुपयांची. नॉमिनी होते प्रॉडक्शन हाऊस आणि शेखरची पत्नी शैला.

इन्शोरन्स कंपनीने केलेल्या सर्च रिपोर्ट नुसार ‘शैला वौज क्रॅक इन हेड’. अर्थात तसा कुठला वैद्यकीय पुरावा नव्हता. इन्शोरन्स कंपनीने उगाच धोका नको म्हणून त्यांचाच एक माणूस प्रॉक्सी बनवून त्यांच्याबरोबर पाठवला.

पुढे काय होते? त्या व्हिलावर काही अनपेक्षित ‘पाहुणे’ येऊन धडकतात. काय बेत असतो त्यांचा. शेखरच्या जीवावर टपलेले अनेक लांडगे आजूबाजूला आहेत. काय होईल शेखरचे? ते कथा लिहून पूर्ण करू शकतील?

अनेकजण आपल्या परीने फासे टाकू पाहत आहेत. काय घडणार त्या व्हिलावर? कोण कुणावर विश्वास ठेवणार? कोण कुणाचा विश्वास सार्थ ठरवणार का? का होणार डबल-क्रॉसची गेम?

लवकरच येत आहे, उत्कंठावर्धक “डबल-क्रॉस”

तळटीप – मंडळी, खूप वेळ लागला नवीन कथा चालू करायला, पण निदान पहिले १-२ भाग तरी तयार आहेत आणि पुढचेही हळू हळू येतील. अधून मधून उशीर होईल, सो धीर धरा 🙂

23 thoughts on “डबल-क्रॉस (प्रस्तावना)

 1. Trupti

  WowW… खूप दिवसांनी माझा डोक्यातला भुंगा परत भुणभुनायला लागेल….. Thnku.😃

 2. दत्ता उतेकर

  प्रस्तावना वाचूनच डोक्यातील भुंगा भुणभुण करायला लागला आहे… एकदम जबरदस्त प्रस्तावना… पहिल्या भाग वाचण्यासाठी उत्कंठा वाढली आहे.

 3. Vandita

  New story with new thoughts… Khup divas wait kart hoto… So excited for this story… Pls try to post next part as soon as possible.

 4. Mayuri SJadhav

  waah suruvat khatarnak.. ajun barech khatarnak anubhav vachayche aahet..
  lavakar post kara.. All the best.👍👍👍👍

  2018-02-06 21:47 GMT+05:30 डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा :

  > अनिकेत posted: “१५० करोडचा खेळ होता तो. शेखर, एक प्रतिथयश गुन्हेगारी कथा
  > लेखक, ज्यांची अनेक पुस्तक ‘बेस्ट-सेलर’ ठरली होती, माऊथ-पब्लिसिटीवरून कथेचा
  > शेवट माहित असूनही लोकांनी पुस्तक विकत घेऊन वाचली होती. का? कारण त्यांचं
  > लिखाण हा एक जगावेगळा अनुभव होता. वाचकांना क्षणार्धा”
  >

 5. उन्मेष

  चला आता काही दिवस तरी उत्कंठा वाढवून वेगवेगळे सरप्राईज आणि छान वाचल्याचे समाधान हे मिळणार … 🤗

 6. Vivek Thombare

  First of all thank you so much sir. khup divsanni Navin kahitri vachyla dilya baddal. Survat Ekdam dhadak aahe.. Vachyla khup Majja yeil as wattay. ..lavkarat lavkar post Kara. We are waiting for the thrill…

Leave a Reply to Sonali Rewale Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s