डबल-क्रॉस (भाग ६) पासून पुढे >>
१५-२० मिनिटांतच पावसाने रौद्र रूप धारण केले. बादल्या बादल्या भरून पाणी काचेवर एकदम ओतावे तस गाडीच्या विंडशिल्डवर पाणी पडत होते. करणने व्हायपर्स पूर्ण वेगात चालू केले पण त्याचा म्हणावा तास उपयोग होत नव्हता. अनोळखी रस्ता, त्यात तुफानी पाऊस आणि मिट्ट काळोख त्यामुळे करण गाडी हळुवारच चालवत होता.
साधारणपणे अर्धा तास ड्राइव्ह झाला असेल तसं अचानक शैला म्हणाली, “पुढे एक उजवीकडे कच्चा रस्ता गेलेला दिसेल तिथून गाडी आतमध्ये घे”
करण स्वतःच्याच विचारात आणि त्या कठीण परिस्थितीत गाडी चालवण्यात इतका गुंग होऊन गेला होता कि बरोबर शैला आहे हे तो पूर्ण विसरलाच होता. शैलाच्या आवाजाने काहीसा तो दचकलाच. धुरकटलेल्या काचेतून करणने तो रस्ता बघितला. रस्ता कसला, खरंतर ती जणू एक चिंचोळी पायवाटच होती. करणने आरशातून मागे बघितले, रस्ता पूर्ण रिकामाच होता. करणने सावकाश गाडी वळवली आणि त्या कच्च्या रस्त्याने तो फार्म-हाऊस कडे जाऊ लागला. दोन्ही बाजूने गर्द झाडी होती, रस्त्यावर पाण्याची मोठ्ठी डबकी साठली होती, गाडी ५० मीटर पण नसेल गेली तोच गाडीला जोरदार हादरा बसला. गाडीचे उजव्या बाजूचे पुढचे चाक एका मोठ्या खड्यात गेले होते.
करणने गाडी रिव्हर्स गेअर मध्ये टाकली आणि जोरात अक्सिलेटर दाबला. गाडीची मागची चाक वेगाने फिरली, परंतु रस्त्यावर चिखल असल्याने त्याचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. त्या निसरड्या रस्त्यावर दोन्ही चाक जणू जागच्या जागीच फिरली. करणने ४ x ४ ड्राईव्हचे बटण दाबले आणि पुन्हा अक्सिलेटर दाबला. ह्यावेळी खड्यात अडकलेली पुढची दोन्ही चाक सुद्धा फिरली पण खड्यात साठलेल्या त्या चिखलाचे फवारे उडण्याव्यतिरिक्त फारसे काही घडले नाही.
करणने शैलाकडे बघितले. ती निर्विकार चेहऱ्याने बाहेर बघत बसली होती.
करण चरफडत खाली उतरला. बाहेर प्रचंड पाऊस कोसळत होता. गाडीचे चाक खड्यात अर्ध्याच्यावर बुडले होते. करणने अंधारात चाचपडत दोन चार मोठे पण आकाराने चपटे दगड गोळा केले आणि खड्यात बुडलेल्या त्या चाकाच्या मागे अंदाजाने ठेवले. मग तो मागच्या चाकांपाशी गेला. तेथेही चाकं फिरून फिरून छोटा खड्डा पडला होता. करणने तिथली माती एकसारखी केली आणि परत तो गाडीत येऊन बसला.
गाडी सुरू केली आणि पुन्हा एकदाअक्सिलेटर दाबला. त्या चपट्या दगडांवरून खड्यातले ते चाक किंचितसे हलले परंतु पूर्ण बाहेर नाही आले. करणने चांगली ५-१० मिनिटं प्रयत्न केले, पण सगळेच व्यर्थ गेले. त्या कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजातही गाडीच्या इंजिनचा वाढलेला आवाज ऐकू येत होता. एव्हाना क्लच आणि टायरचा तो जळका वास सर्वत्र पसरला होता.
गाडी बाहेर निघणं तर सोडाच उलट अजून चिखलात रुतत चालली होती.
“गाडी राहू देत इथेच, सकाळी पाऊस थांबला कि घेऊन जाऊ..”, अचानक शैला म्हणाली
“शैला.. बाहेर बघ, मिट्ट काळोख आहे, काही फुटांवरच पण दिसत नाहीए. त्यात इतका पाऊस, आजूबाजूला जंगल, चालत जायचं म्हणजे..”, करण
“ऑलराइट, ट्राय युअर लक, मला वाटत नाही गाडी निघेल, मी जातेय चालत”, असं म्हणून शैला उतरली सुद्धा.
करणने एकवार चारही बाजूने गाडी न्याहाळली. शैला म्हणत होती त्यात तथ्य होत. ४ x ४ मोड ड्राईव्ह ऑन होता, पजेरोचं शक्तिशाली इंजिन होतं तरीही १५-२० मिनिटांच्या प्रयत्नानंतरही गाडी खड्यातून बाहेर आली नव्हती. शिवाय क्लच केबल तुटली असती तर नसता व्याप वाढला असता. त्यापेक्षा सकाळी येऊन गाडी काढणं कधीही सोईचं होतं.
करणने इग्निशन बंद केलं, दिवे बंद केले आणि गाडी लॉक करून टाकली. दिवे बंद होताच थोडाफार उजळलेला रस्ताही अंधारात बुडाला. काही म्हणजे काही केल्या रस्त्याचा अंदाज येत नव्हता. पाऊस रपारप अंगाला लागत होता. शैला मात्र लख्ख सूर्य प्रकाशात चालल्यासारखी चालत होती, तर करण चाचपडत तिच्या मागोमाग चालला होता. ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठली होती, वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या अंगावर आदळत होत्या.
“शैला… तुला खात्री आहे आपण बरोबर रस्त्याने चाललोय?” साधारण पंधरा मिनिटं चालल्यावर करण म्हणाला
“ऑफकोर्स”
“पण इथे काही म्हणजे काही दिसत नाहीये, हाऊ कॅन यु बी सो शुअर?”
“मी स्लिप-वॉक करते करण..”, शैला म्हणाली
“यु व्हॉट? काहीही ऐकू येत नाहीए”
शैला चालायची थांबली आणि करण जवळ आल्यावर म्हणाली, “मी डोळे झाकून झोपेत चालू शकते, तर ह्यात काय अवघड?”
त्या पावसाच्या आवाजात दोघांनाही बोलणं नीट ऐकू जात नव्हतं, दोघांनाही जोर-जोरात ओरडूनच बोलावं लागत होतं.
“वैताग झालाय नुसता, इतक्यात काही हा पाऊस थांबेल असे वाटत नाही”, करण
“वैताग? आर यु मॅड? मला तर खूप आवडतो पाऊस, खूप मस्त वाटतेय इथे… “, शैला
करणला शैलाच्या ह्या विचित्र मुडी स्वभावाचं आश्चर्य वाटू लागले होते. कधी हि स्वतःशीच गुंग असते तर कधी एकदम मोकळ्या स्वभावाची. काही मिनिटांपर्यंत हि गाडीत तोंड फुगवून बसली होती आणि आता इथे.. एकदम स्वछंद..
अचानक आकाशात वीज कडाडली. त्या निव्वळ काही सेकंदाच्या प्रकाशात करणला शैला दिसली. तिचे सोनेरी हायलाईटेड केस चेहऱ्यावर विखुरले होते, चिंब पावसाने भिजलेले तिचे कपडे तिच्या अंगाला घट्ट चिकटून बसले होते. पावसाच्या त्या माऱ्याने तिच्या पापण्या वेगाने उघडमीट करत होत्या.
विजेच्या आवाजाने दचकून तिने करणचा हात पकडला आणि जणू ती आकाशात कडाडलेली वीज करणच्या नसानसांतून वहावत गेली.
करण काही न बोलता स्तब्ध उभा राहीला.
शैलाने हळुवार करणचा हात सोडला आणि म्हणाली, “मला माहिते तुझ्या मनात काय चाललंय, पण आपण ऑलरेडी त्याबद्दल बोललोय..”, आणि ती माघारी वळली. करणने तिला थांबवायचा प्रयत्न केला पण शैलाने पुढे चालायला सुरुवात केली होती
“शैला… थांब..”, करण जोरात ओरडला
“नाही.. नो.. नेव्हर..”, शैला हसत हसत म्हणाली आणि तिने अजून भराभर चायलायला सुरुवात केली.
करणनेही चरफडत आपल्या चालण्याचा वेग वाढवला.
“करण, गप्प बस हं…”, असं म्हणून शैलानेही आपल्या चालण्याचा वेग वाढवला
काही अंतर पुढे गेल्यावर दूरवर त्या घरातला दिवा करणला दिसला.
“शैला.. ऐक तर खरं …”
“मला माहिते तुला काय म्हणायचेय आणि काय करायचेय..”, शैला दुरूनच ओरडून म्हणाली
आडवाटेचा तो रस्ता संपून आता तो सपाट पूल सुरु झाला होता तसं शैलाने धावायला सुरुवात केली आणि करणंही तिच्या मागोमाग धावला. पण शैलाला रस्ता ओळखीचा असल्याने ती आधी घरापाशी पोहोचली.. धावतच तिने दार उघडले, आणि मागोमाग करणंही धावतच घरात शिरला.
दोघांनाही पळत आल्याने धाप लागली होती..
शेखर हॉलमध्येच त्यांची वाट बघत बसला होता. बाजूलाच बियरचे दोन कॅन आणि व्होडकाची एक रिकामी क्वार्टर पडली होती.
भिंतीचा आधार घेत शेखर कसाबसा उठून उभा राहीला.
“खूप वेळ लागला तुम्हाला? कुठे मेला होतात इतक्या वेळ?”, शेखर तोल सांभाळत म्हणाला
“सर, गाडी चिखलात अडकून पडली, शेवटी आम्हाला चालत यावं लागलं”, करण
“शक्यच नाही, पजेरो इज अ बिस्ट, इतक्याश्या चिखलात कशी अडकून पडेल ती?”, एकदा शैलाकडे आणि एकदा करणकडे संशयाने बघत शेखर म्हणाला
शेखरची ती नजर शैलाला अस्वस्थ करून गेली. तिने विस्कटलेले केस एकसारखे केले, धावताना गुडघ्याच्या वर गेलेला आपला ड्रेस एकसारखा केला.
“सर, खूप प्रयत्न केला, इतका जोरात पाऊस आहे एक तर काहीच दिसत नव्हते, परत उगाच क्लच प्लेट वगैरे तुटली असती तर..”, करण समजावणीच्या सुरात म्हणाला
“ऑलराइट, ऑलराइट..”, शेखरच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, “दे तो चार्जर इकडे आणि तो तंदूर आण लगेच गरम करून, खूप भूक लागलीय मला..”
करणला अचानक जाणीव झाली कि ते पार्सल आणि तो चार्जर गाडीतच राहिला होता. तो विसरला होता हि एक गोष्ट, पण लक्षात जरी असतं तरीही ह्या पावसातून तो चार्जर आणि ते खाण्याचं पार्सल आणता आलंच नसतं, पावसात पूर्ण खराब होऊन गेलं असतं.
करणने शैलाकडे पाहिलं.
“शेखर, दोन्ही गाडीतच आहे, ह्या पावसातून शक्य नव्हते आणणे. पावसात भिजून चार्जर तर वाया गेलाच असता, पण खायचं पण खराब झालं असतं, सो उद्या पाऊस थांबला की …”..
पण शैलाच बोलणं अर्धवटच राहीलं. शेखर ताडताड पावलं टाकत शैलाजवळ पोचला होता आणि त्याने शैलाच्या एक सणसणीत कानफडात लावून दिली होती. त्या अनपेक्षित आघाताने शैला बाजूच्या सोफ्यावर कोसळली.
शेखरने तिच्या दंडाला धरून उभे केले आणि ओरडला, “तुला मध्ये बोलायला सांगितले होते? विचारले होते तुला? जा आत्ताच्या आत्ता तो चार्जर आणि खायचं घेऊन ये..”
शैलाच्या त्या नाजूक, गोऱ्यापान गालावर शेखरच्या बोटांचे वळ उमटले होते.
“सर प्लिज, मॅडम म्हणतायेत ते खरं आहे, खरंच नाही आणता येणार आत्ता..”, करण म्हणाला
शेखरने शैलाला बाजूला ढकलले आणि तो करणसमोर येऊन उभा राहीला, “तुला फार काळजी रे मॅडमची? करण, आय वॉंट दॅट चार्जर नाऊ.. ”
“सॉरी सर.. उद्या पाऊस थांबला कि..”
शेखरने संतापाने करणवर हात उगारला, पण करण सावध होता, त्याने तो हात वरच्यावर झेलला, आणि त्याच प्रतिक्षिप्त क्रियेने दुसऱ्या हाताने शेखरच्या कानफडात लगावून दिली. खरं तर करणचा उद्देश फक्त शेखरचा हात रोखणे एवढाच होता, पण केवळ प्रतिक्षिप्त क्रियेने त्याचा दुसरा हात शेखरवर बरसला होता.
शेखरने अविश्वासाने करणकडे बघितले.. “उद्या पाऊस थांबल्या थांबल्या आपली बॅग भरायची आणि निघायचं इथून…… गेट लॉस्ट”, असं म्हणून तो संतापाने फणफणत आपल्या खोलीत निघून गेला
करणला आपली चुक लक्षात आली. त्याने थोडं संयमाने घ्यायला हवं होतं, पण मनात कुठेतरी शेखरने शैलावर उगारलेला हात त्याला झोंबला होता आणि त्या रागातूनच त्याने शेखरवर हात उचलला होता. अर्थात आता पश्चाताप करूनही उपयोग नव्हता, आणि वेळही निघून गेली होती.
त्याने शैलाकडे बघितले. काही क्षण दोघांची नजरानजर झाली आणि मग शैला काही न बोलता दुसऱ्या खोलीत निघून गेली.
“शिट्ट शिट्ट शिट्ट.. “, करण स्वतःशीच चरफडला.. संदीपला हे आवडणार नव्हते. हातची चांगली नोकरी तर गेली असतीच, पण संदीपने त्याच मार्केटमध्ये नाव खराब केले असते तर आधीच डबघाईला आलेला त्याचा गुप्तहेरीचा धंदा कायमचा बसायलाही वेळ लागणार नव्हता.
बाहेर पावसाचा जोर अधिकच वाढला होता, बाजूच्या शेडवरच्या पत्र्यावर पावसाचे टपोरे थेंब ताड-ताड आवाज करत आपटत होते. करणने कपाटातली व्हिस्की काढली आणि दोन स्मॉल ऑन-द-रॉक्स पेग रिचवले आणि तो आपल्या खोलीत गेला. ओले झालेल्या कपड्यांनी त्याला थंडी वाजू लागली होती. कपडे बदलले आणि तो तडक अंथरुणात शिरला.
शेखरसाठी करण एक नोकर असला तरीही मुळात त्याचा पेशा नोकराचा नव्हता. त्याने आपला इमान शेखरकडे गहाण टाकला नव्हता नोकरीसाठी. तो इथे एक गुप्तहेर म्हणूनच आला होता आणि त्यासाठी तो शेखरच्या हातचा मार सहन करायला तयार नव्हता.. शैला समोर तर नाहीच नाही.
शेखरच्या मुस्काटात बसल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव करणला आठवले आणि त्याला क्षणभर बरच वाटलं. आपण केलं ते योग्यच केलं. पुढे जे काय होईल ते बघून घेऊ, पण लाचारी सहन करायची नाही असा काहीसा विचार करून त्याने खोलीतला दिवा मालवून टाकला.
रात्री कधीतरी उशिरा त्याला झोप लागली, पण कदाचित काही तासांसाठीच. अचानक तो झोपेतून ताडकन उठून बसला. आपल्याला जाग का आली असावी ह्याच त्याला आश्चर्यच वाटलं. त्याने घड्याळात नजर टाकली. सकाळचे ५ वाजून गेले होते. पाऊस अजूनही जोरात कोसळत होता. त्याने खोलीतून नजर फिरवली. पण खोली रिकामीच होती.
आपल्याला जाग का आली असेल ह्याचे उत्तर त्याला काही केल्या सापडेना. म्हणावं तर त्याला काही स्वप्नही पडलेले आठवत नव्हते. करणचा आपल्या सिक्स्थ-सेन्स वर पूर्ण विश्वास होता. जाग आली आहे म्हणजे त्याला कारणही काहीतरी असणारच होते. करण सावकाश आपल्या बेडवरुन खाली उतरला आणि खोलीच्या दाराला कान लावून उभा राहिला.
बाहेरून कसलाच आवाज येत नव्हता.
करण काही मिनिटं अंदाज घेत तिथेच उभा राहिला आणि मग खात्री पटल्यावर हळूच खोलीचे दार उघडून बाहेर आला. हॉलमध्ये सर्व सामसूमच होते. पण करणच्या मनाचे समाधान होतं नव्हते. तो भिंतीचा आधार घेत, चाचपडत शैलाच्या खोलीपाशी आला आणि त्याने हलक्या हाताने दार ढकलले. पण दरवाजा आतून बंद होता.
करणने दरवाज्याला कान लावून कानोसा घ्यायचा प्रयत्न केला, पण बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजामुळे कसलाच अंदाज बांधता येत नव्हता.
करण पुन्हा भिंतीला धरून हळूच स्वयंपाकघरात गेला, टेबलावरचा एक चमचा उचलला आणि पुन्हा शैलाच्या खोलीपाशी आला. दाराच्या त्या मुठी-वजा-कुलुपात चमच्याचे पात्तळ टोक घुसवले आणि हळूच उजवीकडे फिरवले. २-४ प्रयत्नांनंतर ‘कट्ट’ असा आवाज आला आणि दरवाजा उघडला गेला.
करणला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता, आधीच त्याची नोकरी पूर्णपणे धोक्यात आली होती. काही सेकंद कसलीही हालचाल न करता तो आहे तेथेच उभा राहीला आणि मग दबक्या पावलांनी त्याने शैलाच्या खोलीत प्रवेश केला.
शैलाच्या पर्फ्युमचा मंद सुगंध खोलीभर पसरला होता.
करण स्वतःशीच हसला आणि माघारी जायला वळला खरा, पण काही सेकंदच. शैलाच्या पर्फ्युमचा सुगंध जरी त्या खोलीत असला तरी शैला त्या खोलीत नव्हती. त्या खोलीत करणशिवाय कोणीच नव्हते. करणला न बघताच क्षणार्धात त्या गोष्टीची जाणीव झाली. तो हळूच शैलाच्या बेडपाशी आला. बेड रिकामाच होता. बाथरुममध्येही अंधारच होता.
“शेखर.. “, करणच्या मनात पहिला विचार शेखरचाच आला. तो वेगाने शैलाच्या खोलीच्या बाहेर आला आणि व्हरांडा ओलांडून शेखरच्या खोलीपाशी आला. खोलीचे दार उघडेच होते.
“नक्की काय प्रकार असेल?”, करण स्वतःशीच अंदाज बांधायचा प्रयत्न करत होता, “एक तर ह्या दोघांमधले भांडण मिटले असेल आणि शैला शेखरच्या खोलीत झोपायला आली असेल.. किंवा… .. किंवा.. ”
करण हळूच खोलीत शिरला. कुणाचातरी वेगाने श्वास घेण्याचा आवाज करणला स्पष्ट ऐकू येत होता, त्या आवाजाबरोबरच त्या बेडला नाजूक दणके बसल्याचाही आवाज येत होता.
क्षणभर करणला वाटले कि शेखर आणि शैला बेडवर एकमेकांसोबत..
क्षणभर तेथून पटकन निघून जावे असेही शेखरला वाटले..
त्याने धोका पत्करायचा ठरवले. करणने अंदाजानेच हात आजूबाजूला फिरवला. हाताजवळच्या एका टेबलावर एक काचेची फुलदाणी करणला जाणवली. करणने अगदी हळूच त्या फुलदाणीवर अंगठीने टक-टक वाजवले.
पण तो आवाज येतंच होता. करणने दिव्याचे बटन दाबले, खोली क्षणार्धात उजळून निघाली आणि समोरचं दृश्य बघून करणं थिजून गेला.
समोरच्या त्या किंग-साईज बेडवर शेखरचा निष्प्राण देह पडला होता आणि शेजारी शैला झोपेतच .. अजूनही त्याच्या पोटात हातातल्या चाकूने वार करत होती.
“शैला sssss”, करण जोरात ओरडला तसा शैलाच हात हवेतल्या हवेत थांबला आणि तिने डोळे उघडले
काही क्षण तिच्या डोळ्यात कोणतेच भाव नव्हते. करणकडे बघत असूनही ती जणू काही कुठेतरी शून्यात बघत होती. मग काही वेळाने तिच्या डोळ्यात ओळख दिसली. तिने दचकून इतरत्र पहिले आणि मग तिचं लक्ष बेडवरच्या मृत शेखरकडे गेले.
शेखरच्या पोटाला जणू एक मोठं भोक पडलं होत आणि त्याच्या पोटातली आतडी बाहेर लोंबायला लागली होती. शैलाचे हात, कपडे रक्ताने माखले होते. क्षणार्धात शैलाचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला. जणू काही हातात एखादा साप दिसावा तसं तिने हातातल्या चाकूकडे बघितले आणि मग तिने तो चाकू फेकून दिला.
तिचे डोळे करणच्या मनात काय चालू आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते..
“करण .. मी.. मी..”, असं म्हणून ती धावत आली आणि तिने करणला घट्ट मिठी मारली.. “मी मुद्दाम नाही केले हे करण.. प्लिज हेल्प मी.. प्लिज …”
करण मात्र अजूनही शॉक बसल्यासारखा जागच्या जागी थिजून उभा होता.
[ क्रमशः ]
शेखर (Ethe ‘Karan’ asel na) हळूच खोलीत शिरला. कुणाचातरी वेगाने श्वास घेण्याचा आवाज करणला स्पष्ट ऐकू येत होता,
……..khup mast story
thanks.. changed 🙂
mala vatlch hot… karan jevha shekhar ne shaila la ek kanakhali vajvali tevhach vatal…… but nakki kahani mai twist hai….. ho na aniket sir?… ata navin valan….. next post plz jamel titkya lavkar…..
yess.. kahani mein twist to hai hi pakka 🙂
mst navin valan alay khup vel lavlat pn tevdhich interesting ahe
as vatat sampuch naye kadhi mstch….
next part lavkr post kara n thank u so much mst vatal vachun mood ekdam fresh zala
Thank you so much Jayshree
Khupach mast challiye story
Khupach mast challiye story
Awesome going ………….karan the hero failed in his main mission ………………like all marvel hero in “Avengers: Infinity War”…………looks like coming post will be tempting to see why kattappa killed bahubali……….
lol… yes, one interesting part is why, bt the next question is now what? Its very clear that its a muder and done by Shaila. Police turungat tilach taknar.. karan la chalel he? aata pudhe kay???
I guess Karan will find the way…………………I mean he should find the solution as he is the hero of this story…….Now his main thinking should be save sheila, get the insurance money and plan a world trip with her 😉
😱😱😱😱😱😱 Kya baat he… Yeh to trailer he.. Picture Abhi Baaki he na Aniket sir… 👍👍👍
Shekhat cha murder !!!!!!!!! te Pun evdhya lavkar???? evdha jabardast twist asel asa vatla navta…….
ani karan nahi tondavr control ani nahi hatavar………
going at good speed (Y)
Khupch Mast
pudcha bhag lavkr patva
aatvdyatun Ek Asa tari patva…
Mast zala ha bhag pan yeudya lavkar pudhcha
Mastach. Kharach aniket ekdum bhari twist anlat storyadhe. Ata pudhcha part vachayachi excitement ajunach vadhli. Ekdum solid.
Thank u so much Manjushri 🙂
Khup chnaan hota 7th part pan… Next part lawkar taka aniket sir…
Thanks a lot g
ITKAYA LAVKAR APEKSHIT NAVHATE ANY WAYS POST KHUP USHIRA AALI NEXT POST LAVKAR DYAL ASHI APEKSHA AAHE SHAILA ANI KARAN CHYA PRANAYACHA SHEVAT SHEKHAR CHYA KHUNAT HOIL ASE VATLE HOTE BUT YOU ARE GENIUS STORY GATIMAN KELI
Keep guessing whatz next..
वाचता वाचता भाग कधी संपला, ते कळलेच नाही ………
भाग मस्त रंगत चालला आहे……
पुढचा भाग पटकन टाका ………
Hehe.. thanks
ekdumch bhari turning ……ata karan kay idea karto he bghychy….jane kya hoga age…
Keep guessing.. let’s see who can guess correctly whatz ahead..
Aniket dada….I don’t get 1 part…. Shaillachi room atun lock hoti….Mg shaila shekharchya room madhe kashi kai geli tyala marayla🤔
Aniket dada….I don’t get 1 part…. Shaillachi room atun lock hoti….Mg shaila shekharchya room madhe kashi kai geli tyala marayla🤔
Reply
Ag te dararach lock mahit nai ka tula? Atun to khatka press krun dar lavl ki lock hote, kuthlyahi hotel la maximum lock ashich astat
क्षणभर तेथून पटकन निघून जावे असेही शेखरला वाटले..
येथे पण शेखर च्या जागी करण हवे होते.
Khup divas vaat pahavi lagali
Pan avdla ha navin twist…
Ky turning points ahet ya story mdhe🙈🙈..ek no👌 eagerly waiting for next 😅
mast chalaliye story. mala watatay shaila sarv drama kartey, aadhich sleep walk Karun background banaun thevli tine 😀
… waiting eagerly for the next part 🙂
Ashwini
Ata tr shekhar mela mg insurance company ky krel..? Karan ch job ch ky hoil…? Sandip ani karan ch bhandan hoil ka…? Kay hoil sir…
Lavkr next part plzzz
Ata tr shekhar mela mg insurance company ky krel..? Karan ch job ch ky hoil…? Sandip ani karan ch bhandan hoil ka…? Kay hoil sir…
Lavkr next part plzzz
मस्तच पुढील भागाच्या प्रतीक्षेत
सहाव्या भागात करण ने गेस केलं होत तेच घडलं आता यामध्ये जिमी आणि रोशन याला करण अडकवणार कि शैला करण ला अडकवून डबल क्रॉस करणार कि करण शैला ला डबल क्रॉस करणार हे पाहणे इंटरेस्टिंग असणार
Aniket sir plz plz lavkr next part post Kara… Nahitar mala raag ala na tr shekhar sarkhi avastha hoil tumchi… Hehe joking sir pN plz khup aturta ahe atta.
Mastch Navin twist alay storymadhe….dam exited about next part….
जितकं सरळ हे दिसतंय तितकं ते सरळ नसणारच
ह्याची खात्री आहे मला
ह्या आधीचा अनुभव असा आहे की स्टोरीच्या एन्ड पर्यंत तू डोक्यावरचे केस उपटायची वेळ येईपर्यंत कळू देत नाही की स्टोरी कोणता टर्न घेईल
But I love surprises!!!!
So keep going
मला तर स्टोरी वाचतांना अस वाटत होतं रूम मध्ये करणं च्या मागे दरवाजात मी पण उभी आहे🤣🤣🤣
Wow .. disty titk sop nahiye he… Nkkich ajun twist asnar hyat….
Waiting for next part
Khup chhan challi aahe story… next part kadhi yenar???
Next part kadhi
On Thu, May 3, 2018, 11:18 AM डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा wrote:
> अनिकेत posted: “डबल-क्रॉस (भाग ६) पासून पुढे >> १५-२० मिनिटांतच पावसाने
> रौद्र रूप धारण केले. बादल्या बादल्या भरून पाणी काचेवर एकदम ओतावे तस
> गाडीच्या विंडशिल्डवर पाणी पडत होते. करणने व्हायपर्स पूर्ण वेगात चालू केले
> पण त्याचा म्हणावा तास उपयोग होत नव्हता. अनोळखी र”
>
Awesome…khup maja yetey…pn ya storymadhe sandipcha pn kahitari major role asel…mnj shaila n sandip milalele astil…next partchi aaturtene vaat pahtoy.
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे अनिकेत सर plz लवकर पोस्ट करा….
आता धीर नाही धरू शकणार….
सबr का फल मीठा होता है पर इतना भी मीठा ना हो की daibetes हो जाये
Sorry friends, i was on vacation to Paris last 10-12 days so next part ajun chalu nahi kela lihayla.. so ushir hote aahe.. keep hanging.. will post at the earliest..
Its very difficult to hanging, but no option. Anyways enjoy your vacation……….
Wow Aniket sir also share your paris vacation pic and experience……………………but first update PART 8 waiting ..
Nakki Piyu
तरीच म्हणलं…काय विसरले का काय साहेब…??
😉😉
प्रावसातले किस्से वाचायला आवडेलच.. पण आधी कथा…😁!!!
arrey.. vicharu nakos.. bharpur kisse aahet 😉
Hi Anikit Enjoying your vacation ? pls post New part ASAP.
Bhag 8 Yenr ahe ki nahi ??? ka hach ” The Enfd ” Ahe ????
nakki yenar ahe….. 8 nahi tr sampurn katha yein pn kiti bhagat asel he fakt Aniket sir sangu shakti..
Thanks Piyu for the clarification. Vasihu, plz stop being sarcastic.. if u r reading my posts about Paris, i’ve clearly mentioned that the story will continue after these posts.. thanks
Aniket sir, khupch chan…
Plz next part lavkr post kara na…
Khupch interesting ahe….nehmisarkhe😉
Waiting for next post…
Sorry for that …:( But i m really egar to read the next post … n ha mi paris che poet read aadhi kelya navthe 7 post ch mi late read keli n so mla vatl mazakdun kahi miss tr nhi na jhal… mhnun
Jhopet chalu shakte.
Means Shaila ne khup practice keleli aahe jhopet chalnyachi
.
Everything is planned
Sir plz next part lavkr yeudet …
Pingback: डबल-क्रॉस (भाग ८) – डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा
Mitraa… Double cross cha shevat Kay??…
Hahaha.. are asa kasa direct shevat sangu? mg excitement kashi rahanar? aani khar sangu ter shevat me pn ajun tharavla nahie, jas, je suchel, tase lihitoy 🙂
Hi… Next part kadhi yenar?
खूप छान आहे हि कथा भाग 13 लवकर पाठवा