डबल-क्रॉस (भाग ८)


डबल-क्रॉस (भाग ७) पासून पुढे >>

करणला काय करावं काहीच सुचत नव्हते. आयुष्यात पहिल्यांदाच तो इतका ब्लँक झाला होता. सर्व संवेदना जणू गोठल्या होत्या, मती गुंग झाली होती. शैला मात्र लगेचच भानावर आली होती. समोर काय घडलंय हे तिच्या लक्षात आले होते आणि ती जोर जोरात किंचाळत रडत होती.

“फक, व्हॉट हॅव आय डन.. शिट्ट, शेखर.. शेखर.. डॅम.. आय एम डेड नाऊ…. फक.. फsssक …”

बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजात तिचा आवाज दबून जात होता तरीही तिचं किंचाळणे करणला असह्य होत होते.

“शैला, प्लिज शांत बस, मला विचार करू दे”, करण कपाळावरुन हात फिरवत म्हणाला

शैला आपल्याच रडण्या-ओरडण्यात मग्न होती. पुन्हा पुन्हा ती शेखरला हलवून जागं करण्याचा प्रयत्न करत होती

“गेट अप शेखर, प्लिज गॉड्स-सेक वेक अप प्लिज… ”

“शैला, प्लिज शांत हो, शेखर इज डेड.. तुझ्या ओरडण्याने तो उठून बसणार नाहीए”

“शेखर, उठ शेखर.. तुझं .. तुझं पुस्तक अपूर्ण आहे, हजारो, करोडो लोक तुझ्याकडे नजर लावून बसली आहेत.. हे बघ.. मी.. मी तो चार्जर घेऊन येते.. चिकन पीस.. काय ज्युसी आहेत, तुला आवडतात तसे, प्लिज उठ”

करणंच डोकं भणभणायला लागलं होतं. तो तणतणत शैलापाशी गेला आणि पुढचा मागचा विचार न करता त्याने शैलाच्या मुस्काटात ठेवून दिली.

शैलाचे अर्धवट बांधलेले केस त्या आघाताने चेहऱ्यावर येऊन विसावले. शैला मटकन खाली बसली.

“लुक ऐट हीम शैला, लूक..”, शेखरचा हात हातात धरत करण म्हणाला, “ही इज डेड बाय टू अवर्स नाऊ..”

करणला अचानक स्वतःच्याच बोलण्याचे आश्चर्य वाटले. त्याने परत शेखरचा हात हातात घेतला, त्याच्या कपाळाला हात लावला.

“धिस इज इन्सेंन”, करण स्वतःशीच बडबडला आणि मग त्याने कोपऱ्यात बसलेल्या शैलाला दंडाला धरुन उभे केले आणि म्हणाला, “शैला नीट आठव.. तू शेखरच्या खोलीत कधी आलीस? कधी मारलस तू शेखरला?”

शैलाच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते.

“शैला.. काय विचारतोय मी, तू शेखरच्या खोलीत कधी आलीस?”

“नाही, मला काहीच आठवत नाहीए…”, डोळे पुसत शैला म्हणाली, “आणि काय फरक पडतो, मी शेखरला मारलंय हेच सत्य आहे.. वुई शुड कॉल पोलीस, मी विक्रमला फोन करते” असं म्हणून शैला खोलीतून बाहेर जायला वळली.

“थांब शैला, डोन्ट मूव्ह”, करण जवळ जवळ ओरडलाच , “तुझ्या पायाला सगळं रक्त लागलंय, घरभर ठसे उमटतील, दोन मिनटं थांब”
“काय फरक पडतो, पोलिसांना फोन तर करावाच लागेल”
“हो, पण दोन मिनिटं थांब, हे बघ.. शेखरचा हात बघ..”, शैलाला मागे ओढून शेखरकडे ढकलत करण म्हणाला

शैलाने शेखरचा हात काही क्षण हातात धरला.

“काही वेगळं वाटलं?”, करणने विचारले
“नाही.. का?”
“त्याचा हात बघ.. किती गार पडला आहे”
“ऑफकोर्स करण, शेखर इज डेड नाऊ, अर्थात त्याची पूर्ण बॉडीच गार असणार”

“बरोबर, पण इतकी?”
“म्हणजे? काय म्हणायचंय तुला करण?”

“हे बघ, मी ह्या खोलीत आलो तेंव्हा तू शेखरवर चाकूने वार करत होतीस, समजा शेखर त्यावेळी मेला किंवा समज फार तर अर्धा तास आधी. मला इथे येऊन अर्धा तास झाला. ह्याचा अर्थ शेखरला मरून जास्तीत जास्ती एक तास झाला असला पाहिजे. बरोबर??”
“बरोबर.. मग?”
“मग??.. कमॉन शैला, एका तासात शरीर इतके गार नाही पडत, थोडी तर धक असते शरीराला, थोडे तरी कोमट लागायला नको शरीर?”

“करण, मला काळात नाहीए तुला काय म्हणायचंय, प्लिज स्पष्ट बोलतोस का?”
“बोलतो.. दोन गोष्टी, एक तर तू शेखरवर निदान एक तास तरी वार करत होतीस.. अर्थात शेखरच्या बॉडीकडे बघून तसे वाटत नाहीए. तू तासभर त्यावर वार केले असतेस तर एव्हाना त्याच्या बॉडीची चाळणी व्हायला हवी .. ”
“.. आणि दुसरी गोष्ट??”

“दुसरी गोष्ट अशी कि शेखरला तू नाही, दुसऱ्या कोणीतरी मारलंय.. ”
“काय बोलतोयेस तू करण, माझ्याव्यतिरिक्त इथे दुसरं म्हणजे तूच आहेस.. तुला असं म्हणायचंय, तू मारलस शेखरला??”
“नाही शैला, मला म्हणायचेय आपल्या दोघांव्यतिरिक्त ह्या घरात अजून कोण तरी आहे.. “, शेखर कानोसा घेत म्हणाला

“करण प्लिज.. प्लिज मला घाबरवू नकोस, आधीच खूप घाबरलीय मी. आपण.. आपण पोलिसांना फोन करु”
“शैला, पोलिसांना फोन करून काय होणार? इथे प्रथमदर्शी सरळ सरळ दिसतेय तुझ्या हातून खून झालेला. त्यांच्या दृष्टीने हि ओपन-अँड-शट केस आहे.”

“करण, तुला माहिते ना, मी मुद्दाम नाही केले.. मगाशी .. मगाशी आपण बाहेरून आलो.. शेखरने मला मारलं.. तेच डोक्यात होतं माझ्या… करण, पोलिसांना इंफॉर्म करावंच लागेल ना? उलट नाही केलं प्रॉब्लेम होईल.. विक्रम आमच्या ओळखीचे आहेत, ते नक्की हेल्प करतील”, शैला बोलत होती

“वेडेपणा करू नकोस, आत्ता परिस्थती अशी आहे कि कोणी तुला हेल्प करू शकणार नाही?”
“का?”, डोळे मोठ्ठे करत शैलाने विचारले

“का काय? तूच विचार कर, शेखरची ती इन्शोरन्स पॉलिसी, त्यात तू ५०% भागीदार… पॉलिसी काढून महिना पण नसेल झाला.. आपण इथे ह्या निर्जन स्थळी येतो.. इथे येऊन किती दिवस झाले? फक्त २.. आणि दुसऱ्या दिवशी रात्रीच शेखरचा ‘खून’ होतो.. एक अधिक एक करायला पोलिसांना असा कितीसा वेळ लागणारे. पोलिसच काय, कोणीही हेच म्हणेल कि पैश्यासाठी तू शेखरचा खून केलास.. ”

“पण करण, तू आहेस ना पुरावा.. तुला माहिते मला झोपेत चालण्याचा आजार आहे.. तू स्वतः अनुभवले आहेस ते.. आपण बाहेरून आलो तेंव्हा जे घडले तेंव्हाही तू तेथे होतास.. आणि मी.. मी शेखरने मारत होते, तेंव्हाही तू तेथे होतास.. तू बघितले असशीलच ना मी झोपेत होते..”, शैला

करण काहीच बोलला नाही

“शिवाय तू तर त्या इन्शोरंन्स कंपनीचाच एजंट आहेस, तूच तशी साक्ष दिलीस तर प्रश्नच संपला. उलट आपण पोलिसांना उशिरा फोन केला तर त्यांना संशय येईल..”, शैला

“वेडी आहेस तू, इतकं साधं वाटतं का तुला सगळं? तो संदीप.. इतक्या सहजी मान्य करेल हे? इन्शोरंन्स कंपनीचा १ रुपया तो सोडणार नाही, इथे करोडो रुपयांचा प्रश्न आहे. उलट तो मला ह्या प्रकरणात गुंतवायचा प्रयत्न करेल. तुझं आणि माझं अफेअर होते आणि आपण दोघांनी मिळून हा मर्डर प्लॅन केला असे म्हणेल तो..”, करण

“ह्यॅ, असं कसं म्हणेल तो? दोन दिवसात कुणाचं अफेअर होतं का असं?”, शैला करणला उडवून लावत म्हणाली

तिच्या त्या वाक्याने क्षणभर करण दुखावला गेला, क्षणभर त्याला वाटलं कि शैलाच्या मनात आपल्याबद्दल काही नसेलच तर कशाला हिला मदत करुन स्वतःला अडकून घ्या? करेनाका पोलिसांना फोन.

“बरं मग? तु काय करायचं म्हणतोयेस?”

करणने तोंडावर हात ठेवून तिला शांत बसायची खूण केली.

 

“तू इथेच थांब, अज्जीबात हलू नकोस”, सावकाश आवाजात करण शैलाला म्हणाला आणि मग हलकी हलकी पावलं टाकत करण खोलीच्या बाहेर पडला.

बाहेर सर्वत्र मिट्ट काळोख होता. करण पावलांचा आवाज न करता स्वतःच्या खोलीत गेला, ड्रॉव्हर मधून त्याने आपले रिव्हॉल्व्हर उचलले आणि तो खोलीच्या बाहेर आला. भिंतीचा आधार घेत घेत तो हळू हळू पुढे सरकत होता. प्रत्येक चार पावलांवर थांबून तो कानोसा घेई आणि मग पुढे चाले. कुठल्याही क्षणी अंधारातून कोणीतरी अंगावर झेप घेईल अशीच भीती करणला वाटत होती.

सावकाश सरकत तो पहिल्यांदा हॉल मध्ये आला. बराच वेळ तो भिंतीला टेकून आजूबाजूची चाहूल घेत शांत उभा राहिला. मनाची पूर्ण खात्री होईपर्यंत न हलता करण भिंतीला खेटून स्तब्ध उभा राहिला हॉलमधून कसलाच आवाज येत नव्हता. हॉलमध्ये नक्की कोणी नाही ह्याची खात्री झाल्यावर तो मुख्य दरवाज्यापाशी आला. दरवाजा आतूनच बंद होता.

पुन्हा हळू हळू सरकत तो आधी शैलाच्या बेडरूम मध्ये आणि मग किचन मध्ये गेला. पण संपूर्ण घर रिकामे होते.

 

रिव्हॉल्व्हर खिश्यात ठेवून तो पुन्हा शेखरच्या खोलीत आला.

शैलाने त्याला भुवई उडवून काय झालं? विचारले

“घरात कोणी नाहीए.”, करण म्हणाला
“मग? म्हणजे हा खून मीच केलाय ना?”
“बघू आपण, आत्ता अंधारात काहीच दिसत नाहीए आणि कोणी असेलच आत किंवा बाहेर, तर घरातले दिवे लावून मला आपली हालचाल त्यांना दिसू द्यायची नाहीए”
“बर, मग आता काय करायचं म्हणतो आहेस?

“शैला, हे बघ, जे झालं तर वाईटच झालं. पण आता शेखर परत येणारे का? पोलिसांना फोन करुन तू तुरुंगात जाशील, माझे करीअर बरबाद होईल आणि इन्शोरंन्स चे पैसेही कुणालाच मिळणार नाहीत”

“इफ वुई प्ले इट राईट तर साप भी मरा और लाठी भी ना टुटी होऊ शकेल”
“म्हणजे?”
“म्हणजे आपण शेखरच्या मृत्यू कॅश करू शकलो तर इन्शोरंन्स चे पैसे आपल्याला मिळतील आणि उरलेले आयुष्य आपण दोघे एकत्र घालवू शकु”
“करण अरे समोर माझा नवरा मरुन पडलाय, आणि तो खून मी केलाय हे सरळ सरळ दिसतेय आणि तू कसले प्लॅन करतो आहेस? उलट आपण पोलिसांना फोन केला, माझा डॉक्टर माझ्या आजाराविषयी जाणून आहे, आज ना उद्या ते कोर्टात सिध्द होईलच कि हा खून जाणून बुजून झालेला नाहीए. उलट आपण तसं नाही केलं तर नसते गोत्यात येऊ”

“ही एक आयती संधी चालून आलीय आपल्याला. आपण फक्त आपलं डोकं ताळ्यावर ठेवून वागायचंय. शैला.. ट्रस्ट मी”
“आर यु शुअर करण? कारण एकदा का आपण हे पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केला की मग मात्र आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मी तर अडकेनच, पण तू सुद्धा अडकशील नाहक ह्यात”

“आय एम शुअर… सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शेखरच्या बॉडीच काहीतरी केलं पाहिजे” म्हणत करणने इतरत्र नजर टाकली. उत्तर त्याच्या समोर होते. फ्रोजन फूड स्टोअर करून ठेवायला असलेला मोठ्ठा फ्रिजर समोरच होता
“शैला, आपण शेखरला तात्पुरतं इथे, ह्या फ्रिजर मध्ये, ठेवूया.. दॅट विल किप हिज बॉडी सेफ फ्रॉम डीकंपोजिंग ओके?”

शैलाने काही न बोलता मान डोलावली

“आत्तापर्यंत जे झालं ते झालं, इथून पुढे आपण जे काही करू त्यात आपल्या हातांचे ठसे उमटता काम नयेत. घरात हँडग्लोव्ह्ज आहेत?”, करण
“नाही.. ”
“ओके. निदान पॉलिथिन बॅग्स?”
“हो असतील.. “असं म्हणून शैलाने शेजारच्या कपाटाकडे बोट दाखवले.

करणने खिश्यातुन रुमाल काढला आणि तो हातात धरून ते कपाट उघडले. थोडीफार शोधाशोध केल्यावर एका ड्रॉव्हर मध्ये त्याला दोन-चार प्लॅस्टिकच्या पिशव्या सापडल्या. करणने दोन आपल्या हातात घातल्या आणि दोन शैलाकडे दिल्या.

शैलाने त्या पिशव्या हातात घातल्या आणि तो मोठ्ठा फ्रिजर उघडला.

“शैला, खाण्याचे काही पदार्थ असतील तर ते बाहेर काढून ठेव, आपल्याला इथे किती दिवस काढावे लागतील सांगता येत नाही.”, शेखरचा देह बेडवरुन हळू हळू पुढे ओढत करण म्हणाला.

शैलाने काही न बोलता आत मध्ये खाण्याचे असेल नसेल ते बाहेर काढून टेबलावर ठेवले आणि मग दोघांनी मिळून शेखरचा तो बोजड देह ओढायला सुरुवात केली. वाटलं होतं त्यापेक्षा शेखर ओढायला अधिकच जड होता. त्यात हातातल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या सारखा सटकत होत्या. दोघांनीही तो देह मोठ्या मुश्किलीने उचलला, त्या फ्रिजरमध्ये कोंबला व फ्रिजरचे दार लावून टाकले.

दोन मिनिटांतच करण आणि शैला घामाने चिंब भिजून गेले होते. धापा टाकत दोघेही बेडच्या किनाऱ्यावर बसले.

“आता?”, शैलाने दम खात विचारले.
“वुई हॅव टू क्लीन धिस मेस..”, जमिनीवर साठलेले रक्त आणि रक्ताने माखलेले बेडशीट दाखवत करण म्हणाला, “मी किचन मधून फरशी पुसायचा आणतो, तू बेडशीट्स वगैरे काढून कोपऱ्यात ठेव..”

शैलाने आपले केस बांधले आणि कामाला लागली. करणने किचनमधून फरशी पुसायचे फडके आणले आणि तो जमिनीवर सांडलेले रक्त पुसू लागला. समोर इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त बघून दोघांनाही शिसारी येत होती. शैलाने तर दोन-तीनदा अगदी घश्याशी आलेली उलटी मोठ्या कष्टाने थांबवली होती.

जवळ जवळ दोन-तीन तास न थांबता, न बोलता दोघंही कामं करत होते. शेवटी मनासारखं स्वच्छ झाल्यावर दोघेही भिंतीला टेकून खाली बसले.

“निदान मानवी नजरेने तरी इथलं स्वच्छ झालंय. पण पोलीस आणि त्यांच्याकडची कुत्री काही सेकंदात हे बिंग उघड करतील. पण अर्थात ते पुढचं पुढे..”, करण जणू स्वतःशीच पुटपुटला
“करण.. तुला खरंच वाटतंय इथे अजून कोणी आहे किंवा होतं? का तुलाही वाटतंय हा खून मीच केलाय?”
“माहित नाही शैला, आत्ता काहीच सांगता येणार नाही. एकतर आत्ता डोकंही चालत नाहीए आणि शरीरही पूर्ण थकून गेलय. उद्या उजाडल्यावर आणि घराची नीट पाहणी केल्यावरच नक्की काय ते सांगता येईल.”, करण

“उद्याचा दिवस खूप मोठ्ठा असणारे, खूप सारं थिंकिंग आणि खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यासाठी आपलं शरीर आणि मन ताजतवानं असणं गरजेचं आहे. आपले सगळे कपडे, ह्या हातातल्या पिशव्या, फडकी आणि ह्या बेडशीट्स सगळं एका कोपऱ्यात रचून ठेवू, स्वच्छ आंघोळ करु आणि जी काय लागेल तितकी झोप काढू. उद्या सकाळी पहिल्यांदा ह्या कपड्यांची विल्हेवाट लावून टाकू, मग बाकीचं सगळं. ओके?”

“ओके”, असं म्हणून शैलाने कसलाही विचार न करता आपले सर्व कपडे उतरवले आणि कोपऱ्यातल्या त्या ढिगाऱ्यात फेकून दिले व ती तिच्या खोलीत अंघोळीला निघून गेली.
करणनेही मग आपले कपडे त्या ढिगाऱ्यात फेकले आणि तो आपल्या बेडरूममध्ये आंघोळीला निघून गेला

 

करण आपल्या बेडवर पडला तेंव्हा त्याच्या डोळ्यासमोर दिवसभराचा घटनाक्रम झरझर सरकत होता, आणि त्यातील प्रत्येक ऍक्शनसाठी करायची रिऍक्शनही त्याच्या डोक्यात तयार होत होती.

देअर इज नो मास्टर प्लॅन, देअर इज नो परफेक्ट क्राईम. करण हे जाणून होता. आपल्या व्यवसायात त्याने ह्याचा अनेकदा अनुभव घेतला होता आणि म्हणूनच तो घडलेली प्रत्येक गोष्ट आणि नंतर करायच्या प्रत्येक कृतीचा अनेक पैलूंनी विचार करत होता.

पैसा महत्वाचा होताच.. असतोच, पण पैश्याबरोबर करणला शैलाही हवी होती. वॉज शी वर्थ द रिस्क ऑफ करण इज टेकिंग? निदान करणच्या दृष्टीने तरी त्याचे उत्तर हो, असेच होते.

विचार करता करताच करणला कधीतरी झोप लागली.

 

खरंच त्या घरात त्या दोघांव्यतिरिक्त अजून तिसरं कोणी होतं ज्याने शेखरचा खून केला होता? का शैलाच्या हातून नकळत शेखरचा मृत्यू ओढवला होता? पैसा आणि शैलाच्या हव्यासापोटी करणने काही वाकडे पाऊल उचलले होते. का? का? हा सगळा एक बनाव होता जो शैलाने घडवून आणला होता आणि जाणूनबुजून शेखरचा खून केला होता. प्रश्न अनेक होते ज्याची उत्तरं ‘डबल-क्रॉस’चे पुढचे येणारे भागच देऊ शकणार होते.

करण म्हणाला ते खरंच होते. उद्याचा दिवस बिग-डे होताच, पण फक्त तो त्यांच्यासाठीच नाही तर अजून कुणासाठीतरी सुद्धा. नियतीने करण आणि शैलासाठी काहीतरी वेगळेच योजून ठेवले होते. अनपेक्षित, ज्याची कदाचित करणच्या मनात तयार होत असलेल्या प्लॅनमध्ये खिजगणतीलाही जागा नव्हती.

 

[ क्रमशः ]

34 thoughts on “डबल-क्रॉस (भाग ८)

  1. anil

    kaay rao aniket sir …. evadhya divas wait karayala lavala aani evadha lahan part send kela ka….ye to bahut na insafi hai …sir…,🤔😗😗

    Reply
    1. अनिकेत Post author

      I break the parts on logical ending, as per the chapters / sections. If something different is to happen, it will happen in next part and not partially here and partially in next. If you see initial first parts, they are double the size of this one.

      Reply
  2. दत्ता उतेकर

    खूप छान..👌👌 बघू पुढे करण कसा स्वतःला वाचवतो ते..

    Reply
  3. Nupur Jadhav

    Thank for posting this very short part…it was as expected, Karan will be siding Shaila and cleaning all the stuff.. introducing new murderer could be more elongated and thrilling…this new angle is explained so weakly it doesn’t even make some space for curiosity for next part.. i guess you should concentrate on your current fav. Paris series, just get done with it first so you can give in your full energies in this series…
    all the best for next part.

    Reply
    1. अनिकेत Post author

      Let me be very clear Nupur. I don’t entertain suggestions and advices about story or blog. I don’t write as per what people would like to read. I write what i think and i will continue to do that. I will decide where to concentrate and where not. So absolutely no thanks for your advice.
      And frankly i don’t think so you are capable enough to understand the small things that are hidden in it that makes a lot of room for curiosity and thrill.

      Reply
  4. Amit

    “ही इज डेड बाय टू अवर्स नाऊ..” सिक्रेट इथेच दडलंय बहुतेक

    Reply
  5. Manjushri

    Hi aniket sir. Mastach hota ha part pan khup wait karayala lavlat. Tumchya stories khupach chhan astat. I liked it very much. Next part lavkar post kara. Waiting for ur reply.

    Reply
  6. Nilesh Patil

    awsome…. mast next kadhi ? mala vatal khup divsani 2 3 part yetil…
    but very interesting and lihan apratim ahe tumach
    ..

    Reply
  7. Tanuja

    कसलाच अंदाज बांधता येत नाहीये,कोण कोणाला डबल क्रॉस करेल काय माहीत??
    नेक्स्ट पार्ट पण असाच सस्पेन्स असणार👍

    Reply
    1. अनिकेत Post author

      hahaha, ag aahet kahi mahabhag jyanna wattay sagla as expected aahe aani kahich twist nahie, sagla as expected aahe, aani plot khup weak aahe… asto bwa IQ khup jasti kahi wela 🙂

      Reply
  8. Prasad

    Sir tumach nav khar ‘twistmaster’ thevayla pahije
    Kay twist deta…
    Jabardastch…..
    Waiting for next twist…..

    Reply
  9. aparna

    hi…ani sir… tumchya stories khup chan astat….me pan tumchi fan ahe…..part 8 sathi khup vat pahili… pan ata khup interesting hot ahe story… plz pudhcha part lavkar post kara….

    Reply
  10. Pingback: डबल-क्रॉस (भाग ९) – डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

Leave a reply to Sonal Cancel reply