डबल-क्रॉस (भाग १२)


डबल-क्रॉस (भाग ११) पासून पुढे >>

मोहित घाबरुन पटकन जागचा उठला आणि वेदनेची एक तीव्र कळ त्याच्या पायातून मस्तकापर्यंत गेली. शैलाची गोळी मोहितच्या गुडघ्यात घुसली होती आणि त्याच्या गुडघ्याच्या वाटीचा पार भुगा झाला होता. मोहीत जिवाच्या आकांताने ओरडला आणि खाली कोसळला. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या होत्या आणि त्या सहन न होऊन तो जोरजोरात ओरडायला लागला. त्या भयाण शांततेत मोहीतच ते किंचाळणं अधिकच भेसूर वाटत होते.

शैलाने पिस्तुलची नळी मोहितकडे वळवली, पण ह्या वेळी करण अलर्ट होता. त्याने शैलाचा हात सावकाश खाली केला.

शैला अजूनही भानावर आलेली नव्हती. तिचे डोळे विस्फारलेलेच होते, जोर-जोरात श्वास घेण्याने तिची छाती वेगाने खालीवर होत होती. तिच्या घश्यातुन तिच्याही नकळत ‘हम्म हम्म’ असा आवाज येत होता.

करणने सावकाश ते पिस्तुल काढून घेतले.

“जगायचं असेल तर तुझा आवाज बंद कर”, करण दबक्या आवाजात मोहीतला म्हणाला
“भेंचोद, इथे गुडघा फुटलाय माझा, हि साली हरामी.. हिने.. हिने गोळी घातलीय पायात माझ्या भेंचोद, स्वतःच्या पायात गोळी घालून मग दाखव शांत होऊन”, मोहितने दोन्ही हाताने आपला गुडघा दाबून धरला होता आणि त्यातून वाहणारे रक्त थांबवण्याचा तो असफल प्रयत्न करत होता.

 

मोहितचा चेहरा घामाने डबडबला होता. वेदना आणि भीतीने त्याचा चेहरा भेसूर भासत होता

“साला.. हिचे डोळे बघ कसे झालेत, .. सायको आहे का हि?”
“प्लिज.. मोहित.. जरा शांत बस …”, करण समजावणीच्या सुरात म्हणाला. खुद्द करणलाही शैलाची काही खात्री देता येत नव्हती
करण पटकन बेडरूम मधून एक बेडशीट घेऊन आला

“फाड हि आणि बांध घट्ट पायाला, तोपर्यंत मी हिला बघतो..”, असं म्हणून तो शैलाला घेऊन आतल्या खोलीत निघून गेला. शैलाला त्याने बेडवर बसवले, मग परत लिव्हिंग रुम मध्ये येऊन त्याने बार कॅबिनेट मधून स्कॉचचा एक लार्ज पेग बनवला, दोन बर्फाचे क्युब्स त्यात टाकले आणि परत शैलाकडे गेला.

शैलाने तोवर तिच्या पर्समधून कसलीशी एक औषधाची गोळी घेतली होती आणि ती बेसीनपाशी उभं राहून तोंडावर पाण्याचे सपकारे मारत होती.

“आर यु ऑलराइट?”, हातातला ग्लास शैलाला देत करण म्हणाला
“बेटर..”, शैला बेडवर बसली आणि तिने करणने आणलेला तो स्कॉचचा ऑन-द-रॉक्स पेग टॉप-टू-बॉटम संपवला
“नीड मोर?”
“नो”

बाहेरुन मोहितच्या कर्कश ओरडण्याचा अजूनही आवाज येत होता

“ह्याच काय करायचं?”, शैला मानेनंच बाहेर खुणावत विचारलं, “ही नोज टू मच. ह्याला सोडून देणं आपल्याला परवडणार नाही”
“आय नो, पण त्याला लगेच मारून टाकण्यात अर्थ नाही.. ऑलरेडी इथं शेखर आणि आता इशिताची बॉडी पडलेली आहे.. त्यात अजून ह्याची भर नको”
“हम्म, खरंय, पण मग?”
“मला थंड डोक्याने थोडा विचार करु देत.. “, खोलीत येरझाऱ्या घालत करण म्हणाला
“हो, पण हा असा ओरडत बसलाय, माझं डोकं उठलंय त्याच्या आवाजानं .. “, डोकं दोन्ही हाताने दाबून धरत शैला म्हणाली

“माझ्याकडे काही पेन-किलर गोळ्या आहेत..सकाळी मोहितने घेतल्या होत्या… आणि शेखरच्या काही झोपेच्या गोळ्या सुद्धा आहेत..”, अचानक आठवलं तसं शैला अगदी हळू आवाजात म्हणाली
“गुड आयडिया … “, करणने बाहेरून पटकन अजून एक स्कॉचचा पेग बनवून आणला. शैलाने तो पर्यंत गोळ्यांची पुड बनवली होती.

“जास्ती नाहीयेत ना झोपेच्या गोळ्या?”, करण
“डोन्ट वरी”, असं म्हणून शैलाने ती पूड त्या ग्लासमध्ये मिक्स केली

 

करण ग्लास घेऊन बाहेर मोहितपाशी गेला

मोहितच्या पायावर जणू गुडघा दिसतच नव्हता, तिथे केवळ एक मासाचा गोळा असल्यासारखं भासत होतं. मोहितने ती बेडशीट एव्हाना फाडून मांडीभोवती घट्ट गाठ मारून बांधली होती.

करणने ग्लास पुढे केला तसा मोहितने तो ग्लास पटकन ओढून घेतला आणि गटागटा पिऊन टाकला

“आय नीड डॉक्टर.. प्लिज.. मी कुणाला काही बोलणार नाही.. प्लिज.. “, मोहीत म्हणाला
“येस .. येस .. मी करतो फोन, यु टेक रेस्ट, बॅटरी डाऊन आहे, मी करतो फोन चार्ज झाला कि”
“त्या वेडी पासून लांब रहा, आय एम टेलिंग यु..”, मोहित शैला नाहीए ना ह्याची खात्री करत करणला म्हणाला

करणने मोहीतला सावकाश सरकवत एका कोपऱ्यात न्हेलं आणि त्याला जमिनीवर आडवं केलं, आणि तो पुन्हा बेडरुम मध्ये आला.

काही मिनिटं मोहितच्या विव्हळण्याचा, शैलाला शिव्या घालण्याचा आवाज येत राहिला आणि मग काही वेळाने त्याच्या आवाजाची तीव्रता कमी होत गेली. साधारण अर्ध्या तासात मोहीत झोपून गेला

करणने एकवार मोहीत झोपल्याची खात्री केली आणि मग तो शैला होती त्या बेडरुममध्ये आला

 

“टू मेनी प्रॉब्लेम्स.. आधी शेखरच्या बॉडीचं काय करायचं हा प्रश्न होता, त्यात आता अजून इशिताच्या बॉडीच भर. हे कमी म्हणून कि काय, त्यात हे किडनॅपिंगचं नवीनच लफडं. संदीपला शेखरचा फोन नाही गेला तर तो अलर्ट होईल..”

करण खोलीत येरझाऱ्या घालत स्वतःशीच बोलत होता

“शैला, तुम्ही गेल्यानंतर ते परत येईपर्यंत काय काय झालं ते सगळं नीट, कसलाही तपशील न गाळता सांग.. ”

शैलाने पहिल्यापासून सगळा वृत्तांत करणला सांगायला सुरुवात केली .

“म्हणजे संदीप पैसे द्यायला तयार आहे जर शेखरशी त्याचं बोलणं झालं तर.. बरोबर?”, मध्येच शैलाला थांबवत करण म्हणाला
“माहीत नाही, म्हणजे तसं तो स्पष्ट काही बोलला नाही. शेखरशी बोलणं झाल्यावर पुढंच बघू एवढंच तो म्हणाला..”
“बरं.. पुढे?”

शैलाच पुढचं बोलणं त्याने शांतपणे ऐकून घेतले

 

“मोठ्ठा प्रॉब्लेम झालाय एकूण..”, खुर्चीत रेलून बसत डोक्यावरुन हात फिरवत करण म्हणाला.. “आता शेखरचं कुठुन बोलणं घडवून आणणार संदीपशी.. आणि नाही फोन केला तर संदीपला संशय येईल.. ”

“तुला काय वाटतं? संदीपने पोलिसांना कॉन्टॅक्ट केला असेल? का तो सहज पैसे देऊन टाकेल?”, शैलाने विचारले
“नाही, मला नाही वाटत इतक्यात त्याने पोलिसांना फोन केला असेल. ही मस्ट बी बँकिंग ऑन मी.. मी इथे आहे तर परिस्थती हॅण्डल करेन हा विश्वास असेल त्याला. उद्या शेखरशी बोलणं झाल्यावर कदाचित तो काही हालचाल करेल.. शेखरशी बोलणं झालं तर् .. ”

करण आणि शैला दोघेही विचारात गढून गेले, पण कुणालाच काही सुचेना.

“कधी फोन करायचाय संदीपला?”, वैतागून करणने विचारले
“उद्या”
“ठीके, आहे आपल्याकडे अजून थोडा का होईना वेळ आहे विचार करायला. त्याआधी इशिताच्या बॉडीचं काहीतरी करायला हवं.. तू तिला मारायला नको होतंस शैला…”
“का? ती तुझी गर्लफ्रेंड होती म्हणून? आणि मला सांग, तिने विचार केला असता का गोळी मारताना?”
“नाही तसं नाही, पण आता आपल्या हातून खरोखरंच एक गुन्हा घडलाय, शेखरचा मृत्यू एक अपघात होता हे सिद्ध होऊ शकेल, पण इशिताचा???.. कदाचीत नाही.. ”
“एनीवेज, ते नंतर बघू.. आधी इशिता आणि मोहीतच काय करायचं ते ठरवाव लागेल .. ”

“इशिताला आपण तिकडे ती केबिन आहे ना.. तिकडे खड्यात पुरुन टाकू.. मोहीत बाबत मात्र घाई नको करायला.. त्याला कुठे वापरता येते का बघू. नाहीच काही तर शेखरच्या खुनाचा आरोप त्याच्यावर ढकलायची काहीतरी अरंजमेण्ट करु.. ”
“ठीके, पण तो उठला कि परत ओरडा-आरडी सुरु करेल मग?”

“एक मिनिट, तू खाली एक तळघर आहे म्हणाली होतीस, हॉल मधून रस्ता आहे.. “, थोडा विचार करुन करण म्हणाला
“हो आहे.. गुड आयडीया, खाली कितीही तो ओरडला तरी त्याचा आवाज येणार नाही… ”

दोघेही हॉलमध्ये आले. शैलाने फायर-प्लेसच्या शेजारी भितीतले एक छोटे कपाट वाटेल असे दार उघडले आणि करणला खाली तळघरात जायचा रस्ता नजरेस पडला.

“ठीके.. न्हेऊयात खाली?”, करणने संमती दर्शवत विचारले
“हो, पण मला वाटतं आधी इशिताला तिकडे न्हेऊन पुरुन टाकु?”, शैला म्हणाली
“का?”
“बाहेर बघ..”, शैला बाहेर बोट दाखवत म्हणाली
बाहेर कुंद हवा पडली होती. नावालाही वारा नव्हता.

“कुठल्याही क्षणी जोरदार पावसाला सुरुवात होईल आणि मग इशिताला बाहेर घेऊन जाणं अवघड होईल. तसाही हा झोपलाय, आपण आधी तिला पुरुन येऊ?”
“मेक सेन्स..”, असं म्हणून करण पुन्हा बेडरुम मध्ये गेला आणि येताना एक मोठी बेडशीट घेऊन आला

“झोळी करु ह्याची, न्यायला सोपं पडेल”
शैलाने मान डोलावली, आपल्या मोकळ्या सोडलेल्या केसांची पोनी बांधली आणि मग करण आणि शैलाने इशिताची बॉडी बेडशीटवर ठेवली.

“खड्डा खणायला आहे काही फावडे, कुदळ वगैरे?”
“नाहीए, पण शेखर बागकाम करायला छोटी खुरपं वगैरे वापरायचा.. ते चालेल?”, शैला विचार करत म्हणाली
“नाही, त्याने वेळ खूप लागेल.. अजून काही?”, करण इकडे तिकडे बघत म्हणाला

“तू थांब मी बघतो आजूबाजूला..”, असं म्हणून करण बंगल्याच्या मागच्या बाजूला गेला. पण शैला म्हणाली ते खरंच होतं, सहजतेने खड्डा खणता येईल असं काहीच अवजार आजूबाजूला नव्हतं.

करणने आपला मोर्चा कुंपणाकडे वळवला. लोखंडी जाळी लोखंडी रॉड्सला गुंडाळलेल्या प्रकारातले ते कुंपण होते. ती जाळी तोडून वेगळी केली तर ते लोखंडी रॉड्स कामास येऊ शकत होते.

करणने एक मोठ्ठा दगड उचलला आणि त्या जाळीवर प्रहार करायला सुरुवात केली. बराच वेळ प्रहार केल्यावर हळू हळू त्या जाळीचे टोक त्या लोखंडी रॉड पासून सुट्टे होऊ लागले. एव्हाना शैला सुद्धा त्याच्या मदतीला आली होती. दोघांनी खूप प्रयत्न करुन अखेर एक रॉड मोकळा केला.

 

आता दुसरं संकट पुढे उभं होतं. त्या रॉड्सचं बेस जमिनीत सिमेंटमध्ये रोवलेला होता.

करणने सगळी ताकद लावून तो रॉड जमिनीतून बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण तो रॉड काही जागचा हलायचा नाव घेईना. करण पुरता घामाघूम झाला होता. पण दुसरा पर्यायही नव्हता.

करणने संतापून त्या रॉडला जोरात लाथ घातली.. “भेंचोद.. निघ ना साल्या…. ”
“करण प्लिज.. चिडून काही होणार नाहीए…”, करणला शांत करत शैला म्हणाली.
दोघांनी मिळून पुन्हा तो रॉड हलवून हलवून जमिनीतून बाहेर काढायचा प्रयत्न केला. पण तो रॉड जमिनीत चांगलाच घट्ट बसला होता

शैलाने बरोबर घेतलेले माती खुरपण्याचं खुरपं घेतलं आणि त्या रॉडच्या बाजूने खड्डा खणायला सुरुवात केली. काम वेळखाऊ होते, पण शेवटी तो रॉड सिमेंटच्या बेससकट जमिनीतून थोडा मोकळा झाला.

करणने पुन्हा तो रॉड हलवून हलवून जमिनीतून शेवटी बाहेर ओढला. त्याने तो रॉड उचलून बघितला, खाली सिमेंटचा बऱ्यापैकी मोठ्ठा गोळा असल्याने एकट्याने उचलला जात असला तरी तो बराच जड होतं होता.

“ह्यांनी खड्डा नाही खणता येणार.. खूप जड आहे..”, करण निराश होत म्हणाला
“पण दुसरा पर्याय नाहीए करण, आपण दोघे मिळून करु .. चल..”

शेवटी हो नाही, हो नाही करता करता करण आणि शैला तो रॉड घेऊन पुन्हा व्हरांड्यात आले.
“एक मिनिट थांब, मी किल्ली घेऊन येते”, शैला म्हणाली
पावसाचे बारीक पण टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली होती

“सोड ना, तो कै उठणार नाहीए, चल लवकर”, करण घाई करत म्हणाला
करणने तो रॉड इशिताच्या वरच बेडशीटवर टाकला आणि दोघांनी इशिताला ठेवलेल्या बेडशिट्सची दोन टोक पकडून बाहेर पडले.

 

इशिताला उचलून त्या केबिनपर्यंत जाईपर्यंत दोघांनाही चांगलीच धाप लागली होती.
केबिनपाशी पोहोचताच शैलाने जमिनीवरच बसकण मारली

“शिट्ट, उगाच ऐकलं तुझं करण, सरळ पोलिसांना फोन केला असता तर हि वेळ आली नसती. एक गोष्ट लपवायला दुसरं, दुसरं लपवायला तिसरं असला प्रकार चाललाय सगळा”, शैला संतापाच्या सुरात म्हणाली

“गप्प बस, माझं ऐकलंस म्हणूनतरी आज अजूनही आपण मोकळे आहोत.. थोडं डोकं वापरलं तर अजूनही सर्व काही आपल्या हातात आहे.. तुझं ऐकलं असतं तर आपण आत्ता तुरुंगात असतो.. “, करण शैलावर खेकसत म्हणाला

दोघेही श्वास नियमित होईपर्यंत जमिनीवर बसून राहिले, परंतु हातात फार वेळ नव्हता आणि पावसाची रिपरिपहि सुरु झाली होती. करणने थोडी भुसभुशीत जमीन शोधली आणि खोदायला सुरुवात केली

पहिल्या दोन तीन घावातच करणच्या लक्षात आले, हे काम जितके अवघड वाटले होते त्यापेक्षा कित्तेक पटीने अधिक कठीण होते. तो जड रॉड उचलण्यातच बरीचशी शक्ती वाया जात होती आणि त्यामुळे त्याचा जमिनीवरचा आघात म्हणाव तीतका परिणामकारक ठरत नव्हता.

पाऊणतासाच्या अथक प्रयत्नानंतरही जेमतेम एखादं दुसरं रोपट लावण्याइतपतच खड्डा तयार झाला होता.

“धिस वोन्ट वर्क, आपल्याला किमान दोन फूट बाय पाच फूट तरी खड्डा हवाय, ह्याच वेगाने जात राहिलो तर रात्र होईल”, करण वैतागून म्हणाला

करणने तो रॉड फेकून दिला आणि झाडाला टेकून खाली बसला.

“मग आता काय करायचं? नदीत सोडून देऊया का?”, शैलाने अधिरतेने विचारले
“नको, एक तर बॉडी पाण्यात बुडणार नाही, उगाच वहावत दुसऱ्या कुठल्या किनाऱ्यावर गेली आणि कुणाच्या नजरेस पडली तर नसती पंचाईत”

 

काही काळ शांततेत गेला आणि मग अचानक शैलाला काहीतरी आठवले

“करण, रामुकाकांनी ना कुठेतरी एक झाडांच्या खतासाठी खड्डा बनवला होता. आम्ही इकडे राहायचो तेंव्हा सगळा ओला कचरा ते कुठल्याश्या खड्यात पुरायचे..”
“गुड.. व्हेरी गुड… कुठे?”
“कुठे ते मला कसं माहीत असणार, मी थोडी न त्यांच्याबरोबर जायचे कचरा घेऊन..”
“बंगल्याच्या मागे होता का?”
“नाही, इकडेच यायचे कुठेतरी ह्या केबिनच्या आजूबाजूला”
“चल मग शोधू तो”

दोघंही नव्या जोमाने उठले. काही वेळ शोधा शोध केल्यावर केबिनच्या थोडं मागे कचऱ्याच्या दुर्गंधीचा वास तीव्र होऊ लागला आणि काही अंतरावर अखेर ती जागा सापडली.

करण ने नाकाला रुमाल बांधला आणि खड्यातून तो अर्धवट जिरलेला कचरा उकरून काढायला सुरुवात केली. खड्डा पूर्ण रिकामा झाल्यावर अखेर करणच्या चेहऱ्यावर थोडेसे हास्य पसरले. अगदी हवा तितका मोठा नसला तरी इशिताची बॉडी कशीबशी मावू शकेल इतपत तो खड्डा नक्कीच मोठा होता.

पुन्हा करण आणि शैला केबिनपाशी गेले, इशिताची बॉडी ओढत ओढत त्या खड्यात आणून टाकली आणि वरुन बाकीचा कचरा आणि माती लोटून टाकली.

“हुश्श.. डन .. ”
“येस्स.. डन”

करण आणि शैलाने एकमेकांना टाळी दिली

 

पावसाने आता बऱ्यापैकी जोर धरला होता. दोघंही जण आधी घामाने आणि आता पावसाच्या धाराने निथळून निघाले होते.

ओला झालेला टी शर्ट शैलाच्या अंगाला घट्ट चिकटून बसला होता आणि आधीच आकर्षक असलेली शैलाची फिगर उठून दिसत होती, तर करणचे हाताचे, मानेवरचे स्नायू श्रम करून टरारून फुगले होते. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांबद्दलचे आकर्षण, ओढ स्पष्ट दिसून येत होती.

करणने शैलाला आपल्या जवळ ओढले आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले
“उम्म्म..”, त्याला दूर लोटत शैला म्हणाली, “सगळा कचऱ्याचा वास येतोय तुझ्या अंगाला, जा आधी घरी जाऊन आंघोळ कर.. ”
“मागच्या वेळेला राहिलंच आपलं, केबिन आहे आणि आपल्या तिघांशिवाय इथं कोणीच नाही..”, शैलाला परत जवळ ओढत करण म्हणाला
“तिघं?”
“हो मग.. तू मी आणि इशिता..”, करण हसत हसत म्हणाला
“जा मग, घे तिलाच केबिन मध्ये, आय निड अ हॉट वॉटर शॉवर .. “, असं म्हणून शैला बंगल्याकडे पळाली, करणंही तिच्या मागोमाग धावला

 

करण बंगल्यापाशी पोहोचला तेंव्हा शैला दारातच उभी होती.. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती..

“शैला.. काय झालं?”
“मोहीत… ”
“मोहीत? काय झालं मोहीतला..”, शैलाला बाजूला ढकलून करण आतमध्ये शिरला

जिथे मोहित झोपला होता ती जागा आता रिकामी होती.
करणने घड्याळात नजर टाकली, त्यांना बाहेर पडून २ तास होऊन गेले होते

“शिट्ट.. आतमध्ये बघू कुठे आहे का?”, असं म्हणून करण आतल्या खोल्यामध्ये बघायला गेला
शैला अजूनही थिजून दारातच उभी होती

काही वेळाने करण बाहेर आला.. “मोहित आत नाहीए

“तो फार लांब नसेल गेला.. आधीच त्याला चालता येत नाहीए, त्यात हा पाऊस, चल शोधू आपण. उजव्या बाजूला नदी आहे, मागे बंगल्याचं कुंपण आणि नदीच. फक्त डावीकडूनच रस्ता आहे.. मला नाही वाटत तो हाय-वे पर्यंत पोहोचला असेल..

“हे तुझ्यामुळे झालं करण, मी चांगलं दाराला कुलूप लावून आले असते तर तो बाहेर गेला नसता”, शैला चिडून म्हणाली
“हो, पण मी तुला दार उघड टाकून ये नव्हतो म्हणालो, निदान दाराला कडी तरी लावायचीस बाहेरून..”
शैलाने काहीतरी बोलायला तोंड उघडले, पण हि वेळ भांडण करण्याची नाही हे तिच्या लक्षात आले

करण आपली रिव्हॉल्व्हर घ्यायला आतमध्ये गेला आणि त्याच्या लक्षात आले कि त्याची रिव्हॉव्हलर सुद्धा गायब आहे.

“शैला.. तुझी रिव्हॉव्हलर आहे तुझ्याकडे?”
“का? तुझी कुठे गेली?”
“माहीत नाही, आतमध्ये नाहीए, कदाचित मोहित..”
“व्हेरी गुड, म्हणजे आता ह्या आधीच पाऊस त्यात अंधारून आलेले आणि आपण ज्याला शोधतोय तो कुठे लपलाय माहित नाही.. कदाचित तो आपल्याला बघू शकत असेल.. तुझी रिव्हॉल्व्हर घेऊन.. कधी कुठून गोळी येऊन लागेल काही भरोसा नाही.. “, शैला परत संतापून म्हणाली

“हे बघ, तुला यायचं नसेल तर तू घरीच थांब, मी जातो शोधायला”
“आय होप करण, ऑल धिस एंड्स सुन .. “, शैला करणच्या नजरेला नजर मिळवत म्हणाली
“लेट्स गो देन.. ”
“करण .. मोहीत जर पोलिसांपर्यंत पोहोचला तर आपला खेळ खल्लास.. ”
“डोन्ट वरी, तो फार लांब नसेल गेला, वुई विल कॅच हिम.. चल…”

शैलाला जवळ जवळ ओढतच करण बाहेर पडला.

थोड्याच वेळात त्यांनी तो पूल पार केला आणि ते जंगलाच्या रस्त्याला लागले

“मला वाटत नाही मोहित ह्या पायवाटेने गेला असेल.. त्याला आधीच चालता येत नाहीए, तो वेगाने नाही जाऊ शकणार. अर्थात त्याला आपण पकडले जाऊ ह्याची खात्री असणार, मला वाटतं तो समोरच्या झाडीतून गेला असेल..”, करण पायवाटेच्या कडेने वाढलेल्या झाडाकडे बोट दाखवत म्हणाला

त्याने शैलाकडून तिची रिव्हॉलव्हर घेतली आणि दोघे जण त्या दाट झाडीत शिरले.

 

ह्या सगळ्या घटनाक्रमापासून दूर, पण काही अंतरावरच एका खोलीमध्ये जिमी, रितू आणि रोशन एकमेकांचा हात पकडून उभे होते.

“ऑल सेट?”, जिमीने विचारले
“येस्स.. ऑल सेट”, रोशन आणि रितू एकदमच म्हणाले
“आता इथून माघार नाही.. बरोबर?”
“येस्स.. बरोबर..”

जिमीने आपला केसांचा फुगा सोडला तसे त्याचे मानेच्याही खालपर्यंत रुळणारे केस मोकळे झाले. टेबलावरचे एक रबर उचलून जिमीने ते केस एकत्र बांधून टाकले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच, खुनशी चमक झळकत होती

“जिमी.. नो ब्लड बाथ राईट?”, रोशनने काहीसे घाबरत विचारले
“डोन्ट वरी, ह्याची गरज मला कधीच पडली नाही, नुसतं बघितला तरी लोक थरथर कापतात..”, ड्रॉवर मधून आपला ६” चा चाकू काढून जॅकेटच्या खिशात ठेवत जिमी म्हणाला

“ऑल द बेस्ट गाईज..” दोघांनाही मिठी मारत रितू म्हणाली

“रोशन.. स्वतःची काळजी घे.. तुला माहितीच आहे तो जिमी कसा आहे.. अगदीच वेळ पडली तर डोन्ट हेजिटेट.. मी तुझी वाट बघतेय..”, जिमी बाहेर पडला तस रितू हळूच रोशनला म्हणाली

थोड्याच वेळात जिमी आणि रोशन त्याच्या जुनाट कावासाकी बाईकवर बसून निघाले कॅनबेरा नावाच्या कॅसीनोच्या दिशेने..

इट वॉज अ बिग डे फॉर देम….

 

[क्रमशः]

84 thoughts on “डबल-क्रॉस (भाग १२)

      1. स्वप्नील महाजन

        अहो विसरलाय काय पोस्ट करायला

        Reply
  1. Nupur

    Tq so much sir … for so far this part but love ur stories so wait krna to bnta hi hai …. Best 1 this also 👏🏻👍🏻

    Reply
  2. Tanuja

    खूप वेळानंतर पण मस्तच हा भाग सुद्धा
    आणि शेवटी पुन्हा नवीन ट्विस्ट👍

    Reply
      1. सखी थरवळ

        आत्ता पर्यंत च्या सगळ्याच कथांप्रमाणे ही सुद्धा खूपच मस्त आहे, एकबसणी सगळे भाग वाचून काढले मी आणि नवीन भाग ज्या संथ गतीने तुम्ही पोस्ट करताय त्यावरून अनुमान लावता आलय की पुढील भागही नक्कीच उशीरा पोस्ट होईल पण तरीही विचारते कधी पोस्ट कराल नवीन भाग?

        Reply
  3. Rohit

    १२ वा भाग टाकण्याबद्दल धन्यवाद…👍. करण आणि शैलाची जोडी शेवटपर्यंत जीवंत ठेवा.

    Reply
  4. दत्ता उतेकर

    जबरदस्त.. और इसप्रकार कहाणी में नया ट्वीस्ट..👌👌

    Reply
    1. Sushma sonawane

      Khup chhan ahe pan,khup vel lavata , pl thod lavkar upload kara, ani tumche likhan khup chhan ahe

      Reply
  5. उन्मेष

    हुsssश!!!

    एका दमात अशी स्टोरी वाचायला जाम मजा येते….
    याला आधाशीपणा म्हणता येईल…पण… लय छोटी पोस्ट केली राव त्यात अजुन एक ट्विस्ट …
    उममssहा…

    लवकर पोस्ट करा राव आता…

    Reply
  6. Piyu

    नेहमी प्रमाणे अप्रतिम……. पण आता पुन्हा वाट पाहावी लागणार……….

    Reply
    1. Mahadev Patil

      अनिकेत राव?? काय आहात कुठे??? तुमचा एक ब्लॉग आहे … विसरलात का??? स्टोरी टाकाल च पण किमान रिप्लाय तर द्या.. hope all is fine … Reply plz…I hate one sided communication..😢

      Reply
    1. उन्मेष

      इतक्या दिवस वाट पहायला लावल्यावर हळू कशी वाचायची??🤔

      Reply
  7. Dinesh

    After waiting for a long time, 12th post and a new twist in it also it will have to wait for the 13th post again. Can the next post be bigger? Thanks!!

    Reply
  8. Bhagyavardhini Deshmukh

    पुढे काय होईल याची तर उत्सुकता आहेच…पण plzzz story एकाच वेळी पूर्ण वाचायला मिळाली तर बर होईल…आणि नेहमिप्रमानेच स्टोरी वाचतना आलेला thrill तसाच राहील…soooo wating for next part…i hope लवकरच येईल तो…

    Reply
  9. Akshay

    Khupach chan , pan jara lavkar lavkar bhag aale tr chan hoil , yach story vr focus kara jast ….tumch lekhan mhanje mla tr tyavar ekhada movie kadhava as vatnyasarkh aahe. Very very nice

    Reply
  10. Prathamesh jadhav

    सर किती वेळ चातका सारखी वाट पहायची आम्ही
    लवकर येऊंदे की भाग…

    Reply
  11. उर्मिला

    खूपच छान.पण खूप वेळ लावलेला पुढचा भाग पोस्ट करायला उस्तुकता वाढत चाललीय.next part लवकर टाका

    Reply
    1. vaikhari

      अप्रतिम कथा अनिकेत I am a big fan of your literature plz keep writing आणि शक्य तितक्या लवकर पुढील भाग post करा

      Reply
  12. Rohit

    बहूतेक २०२० उजाडणार वाटतं…लवकर टाका ना प्लीज पुढचा भाग…

    Reply
  13. Charu Doiphode

    Hi Aniket,
    अप्रतिम कथा I am a big fan of your literature plz keep writing, today I have read 5 to 12 part of your story, after a long time back.

    Reply
    1. उन्मेष

      अनिकेत राव?? काय आहात कुठे??? तुमचा एक ब्लॉग आहे … विसरलात का??? स्टोरी टाकाल च पण किमान रिप्लाय तर द्या.. hope all is fine … Reply plz…I hate one sided communication..😢

      Reply
  14. Shrikant kulkarni

    Dada ur genius bhava purn tod fod ch karun takali na tu. Aj ly divsani blog bgitla n sagle kam sodun purn divas sotry vachli bhava nako itak best lihit jau kamdhande sodun detin lok tujya stories sathi

    Reply
  15. Minakshee Narayankar

    I think Ramukaka must be having a major role…
    I read all 12 parts in single day today…
    your stories are good but you post very late Aniket Sir
    its been more than 5 months.
    who is gimme, roshan, ritu.
    please post fast reply atleast when will you post
    thank you!
    big fan of yours as I read ishq and alavani too

    Reply
  16. Sayali

    Plz yar kup vel zala mi vat pahtiye roj check krte aj takal next part plz lavkar taka .. Tumhi chan lihta vat pahayla kahi vatat nhi pn etka vel zala ki sagl visrun jate n thrill pn nighun jat …kup vat pahtiye mi plz aniket next post plz

    Reply
  17. सखी थरवळ

    आत्ता पर्यंत च्या सगळ्याच कथांप्रमाणे ही सुद्धा खूपच मस्त आहे, एकबसणी सगळे भाग वाचून काढले मी आणि नवीन भाग ज्या संथ गतीने तुम्ही पोस्ट करताय त्यावरून अनुमान लावता आलय की पुढील भागही नक्कीच उशीरा पोस्ट होईल पण तरीही विचारते कधी पोस्ट कराल नवीन भाग?

    Reply
  18. Rohit Umesh Kulkarni

    अनिकेतसर, १३ वा भाग प्लीज लवकरात लवकर टाकावा अशी नम्र विनंती आहे. रिप्लाय तरी द्या…

    Reply
    1. अनिकेत Post author

      अरे .. काय वेगळा रिप्लाय देणार मी, आधीच १० वेळा सांगितले तर आहे वरती कि सध्या वर्कलोड खूप जास्ती असल्याने ब्लॉग लिहायला वेळ नाहीए, हा प्रोजेक्ट संपला आणि वेळ मिळायला लागला कि घेईन पुढचे भाग लिहायला.. नाईलाज आहे 😦

      पुन्हा पुन्हा, प्रत्येकाला वेगळे तरी काय सांगणार म्हणून केला नाही रे रिप्लाय, गैरसमज नसावा

      Reply
      1. Piyu

        Thanx for this reply वेळ लागूदे पण आता story संपूर्ण टाका please……

        Reply
        1. Raj

          देवा,
          डोळे मिटण्याआधी ही कथा पूर्ण वाचायला मिळाली म्हणजे माझ्या ह्या जन्माचे सार्थक होईल.
          पण एका वर्षाला एक भाग येऊ लागला तर कसं होणार?

          किती अंत आता पाहशी अनिकेता ?
          .
          .
          sorry
          .
          just kidding.
          plz lavkar yeu dya ho pudhil part
          .

          Reply
  19. sunita

    अनिकेतसर, 16 वा भाग प्लीज लवकरात लवकर टाकावा अशी नम्र विनंती आहे.

    Reply

Leave a reply to Nupur Cancel reply