मागच्या आठवड्यात सोसायटीमधील काही मित्रमंडळी आणि चिल्लीपिल्ली घेऊन मल्हारगडाचा छोटा ट्रेक करून आलो त्याची काही क्षणचित्रं –
माहिती स्रोत – विकिपीडिया [ https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1 ]
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून ‘मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे.
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली.
गडावर जाण्याच्या वाटा –
पुण्याहून: पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाट संपल्यावर काही वेळाने डावीकडे झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो. तेथून २ कि.मी.वर झेंडेवाडी आहे. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगररांगांमध्ये दिसणाऱ्या ‘ण’ आकाराच्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत गेल्यावर समोरच आपल्याला मल्हारगडचे दर्शन घडते. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. झेंडेवाडी फाट्यापासून खिंड पार करून किल्ल्यावर जायला साधारणपणे दीड तास लागतो.
सासवडहून: सासवड पासून ६ कि.मी.वर ‘सोनोरी’ हे गाव आहे. या गावाला दिवसातून तीन वेळा बस जाते. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो. सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यास अर्धा-पाऊण तास लागतो. डोंगराच्या सोंडेवरूनही गडामध्ये प्रवेश करता येत असला तरी मनोऱ्याच्या बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते
सर्व छायाचित्र मोबाईलमधून टिपलेली –
Khupach chan photo alet
All🤗,,,👌👌👌
वाट्त नाहीये मोबाईल फोटोग्राफी आहे
khup mast alet photos aniket sir tumchi photography pn khup chan ahe mi pahile ahe adhichya blog mahe mulanche ani Paris madhle….
Khup sunder photo’s ahet 👌👌👌👌❤️