जिमी दार उघडून बाहेर आला आणि थंड हवेच्या एका झुळकीने त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. खरंतर काही वेळेपूर्वीच तो दोनदा बाहेर येऊन गेला होता. एकदा बाहेर किती पोलीस आहेत ते बघायला आणि एकदा हुसेनला फोन लावायला. पण त्यालाही आता किमान अर्धा तास होऊन गेला होता. त्यावेळी फक्त दोन हवालदार होते, पण आता? आता कश्यावरुन फक्त दोनच हवालदार असतील? कदाचित एव्हाना पोलिसांची एखादी तुकडी जागा धरून बसली असेल, कदाचित एखादा स्नायपरचा नेम एव्हाना जिमीच्या डोक्यावर असेल?
जिमीनी अनेक एन्काउंटर च्या बातम्या वाचल्या होत्या, खोपडी उडालेले अनेक गुन्हेगारांचे फोटो पहिले होते.
जिमी पटकन जमिनीवर आडवा झाला. पाठोपाठ आलेल्या करणनेही त्याचे अनुकरण केले.
काही वेळ शांततेत गेला. कुठूनही कसलीच हालचाल होत नाहीए ह्याची खात्री झाल्यावर जमिनीवरून सरपटत आधी जिमी आणि पाठोपाठ करण पुढे सरकू लागले. जिमी करणच्या नजरेच्या टप्यात होता. करणच्या हातात रिव्हॉल्व्हर होती. एक गोळी आणि जिमी जागच्या जागी खलास झाला असता. पटकन मागे वळून करण घरात शिरला असता, तर काय होते आहे हे रोशनला कळायच्या आतच त्यालाही ठोकता आले असते.
परंतु गोळीच्या आवाजाने ते दोन हवालदार आले असते तर? तर त्यांनाही संपवण्यावाचून करणकडे दुसरा कुठ्लाही मार्ग राहिला नसता. शिवाय असे अचानक ठरवलेले इम्पल्सिव्ह प्लॅन किती प्रचंड धोकादायक ठरू शकतील ह्याची करणला कल्पना होती. अर्धा रस्ता संपल्यावर जिमीने करणला थांबायची खूण केली आणि तो पुढे सरकू लागला. त्या दोन हवालदारांचे दबक्या आवाजातले गप्पांचे आवाज करणलाही ऐकू येत होते. एका हवालदाराने पेटवलेल्या सिगरेटचे लालबुंद टोक त्याने ‘कश’ घेतल्यावर दिसून येत होते.
जिमीच्या दृष्टीने अर्थात ते फायद्याचेच होते. नाहीतर अंधारात त्या हवालदारांचा पक्का ठावठिकाणा ओळखणे तसे अवघड होते.
करण अंधारात गप्प पडून राहीला. त्याचे मन एव्हाना त्या पेट्रोल पंपापाशी पोहोचले होते जिथे त्याला त्याच्या आयुष्यातली पहीली रॉबरी करायची होती. सगळाच खेळ ‘जर-तर’ चा होता. जिमीवर त्याचा काडीभरही विश्वास नव्हता. आठवड्याभराच्या रेकीवर त्याने बनवलेल्या प्लॅनवर करणला डोळे झाकुन विश्वास ठेवणे आणि तो अंमलात आणण्याचे धाडस एकटवणे जड जात होते.
करणची तंद्री भंगली ते थोड्या अंतरावर झालेल्या आवाजाने. अनपेक्षितपणे तो आवाज जिमीचा होता. कोणतरी.. बहुदा जिमीच.. झुडपात कोसळला होता. पण काही क्षणांतच त्याने एक जोरदार शिवी हासडली आणि मग पूर्णपणे शांतता झाली.
काय घडलेय ह्याचा अंदाज बांधणे अवघड जात होते. करण अजूनही जमिनीवरच पडून राहीला. थोड्या वेळाने एक व्यक्ती करणला त्याच्या दिशेने चालत येताना दिसली. तू जिमीच होता.
‘काम झाले’, जिमी आपलं डोकं चोळत म्हणाला
‘गुड’, करण कपडे झाडत उभा राहीला, ‘दोघंही बेशुद्ध झालेत ना?’
‘नाही, एकच..’
‘आणि दुसरा.. ??’
‘दुसरा, मेला बहुतेक … ‘
‘मेला? तू पोलिसाला मारलस? शुद्धीवर आहेस ना?’
‘साला काय करणार? तो पांडू लैच तरणा बांड निघाला. साल्याने त्याचा दंडुका घातला डोक्यात. सगळा जग गोल फिरला डोळ्याभूती, आपणच बेशुद्ध होणार होता, वाईच वाचलो, मग काय मला मारावा लागला सूरा त्याला… ‘
‘अरे पण आपलं ठरलं होतं ना, दोघंही जिवंत पाहीजेत..’
‘ठरलं हुत ना, साला तू तिथे असता तर काय केले असते? पकडलो गेलो असतो मी तर इथे येऊन त्याने तुझी पण मारली असती .. ‘
करण जिमीच्या मागोमाग ते दोन हवालदार पडले होते तिथे गेला. जिमीने खिश्यातुन छोटा टॉर्च काढला. टॉर्चच्या प्रकाशात तो मरून पडलेला हवालदार दिसत होता. जिमीने त्याचा व्यवस्थित गळा चिरला होता. जिमीच्या डोक्यातूनही रक्ताचा एक बारीक ओघळ येऊन त्याच्या चेहऱ्यावर विसावला होता. टॉर्चच्या त्या अर्धवट प्रकाशात जिमीचा चेहरा अधिकच भेसूर दिसत होता. कदाचीत तो म्हंणतो त्याप्रमाणे प्रतिहल्यादाखल जिमीने सुरा मारलाही असेल, पण मारायचाच तर निदान त्याला जखमी करण्यापुरता तरी मारायला हवा होता. इथे जिमीने त्या हवालदाराला ठार मारण्याच्या हेतूनेच प्रतिहल्ला केल्याचे स्पष्ट दिसत होते.
‘पोलीस मरायला नको होता’, करणच्या डोक्यात विचार चमकून गेला. एकदा का पोलिसांच्या हे लक्षात आले कि ते अधिक चवताळून उठतील. शिवाय त्यांचा सहकारी मारला गेलाय ह्याचा अर्थ एन्काऊंटर करायचा मार्ग ओपन होता. हल्ला प्रथम आपल्या बाजूने झाला होता. अर्थात ह्यावरून जिमीला काहीच बोलण्यात अर्थ नव्हता.
‘तू दोघांनाही त्या केबीन मध्ये न्हेऊन टाक, ही बॉडी इथे उघड्यावर रहात कामा नये.. आणि प्लिज.. निदान दुसरा तरी आपल्याला जिवंत हवाय.. ओके?’
जिमीने काही न बोलता नुसतीच मान डोलावली.
‘चल, तुझी बाईक कुठेय दाखव’
१५ मिनिटांनंतर करण जिमीच्या बाईकवरून हायवेवरून निघाला होता. त्या कच्या रस्त्याने मुख्य डांबरी रस्त्याला येताना त्याचे हृदय दुप्पट वेगाने धडधडत होते. इथे पोलिसांची गाडी असली तर? त्यांनी त्याला अडवल्यावर काय काय आणि कसे सांगायचे ह्याचा विचार करायचा का त्या पेट्रोल पंपाचा? शिवाय खिश्यात रिव्हॉल्वर होती. पोलिसांना सापडली तर पुढे काय?
त्या फार्म-हाऊस च्या आजूबाजूला आधीच दोन डेड-बॉडीज होत्या.. शेखरची आणि इशिताची. आणि आता त्यात तिसरी, त्या हवालदाराची भर पडली होती.
‘त्या दोन्ही हवालदारांना केबीन मध्ये टाकून जिमी एव्हाना फार्म-हाऊस वर परत गेला असेल.. कदाचित शैलाची लक्तर तोडायलाही सुरुवात केली असेल…’
करणच्या डोक्यात संतापाची एक तीव्र सणक येऊन गेली. क्षणभर त्याला वाटलं, फिरावं मागे आणि ठोकावे त्या जिमी आणि रोशनला. अर्थात हे फक्त विचारातच शक्य होते. जिमी डोक्याने कमी असला तरी घातक होता. त्याच्यावर वार करणाऱ्यांचं काय होते हे करणने काही क्षणांपूर्वीच बघितले होते.
करणने लगेचच तो विचार मनातून काढून टाकला आणि घड्याळात नजर टाकली, १२.१५ वाजून गेले होते. त्या पेट्रोल पंपापाशी जायला करणला किमान तासभर जाणार होता. करणला कसंही करुन तो कॅश घेऊन येणार ट्र्क यायच्या आधी पोहोचायचे होते.
पण करणचे नशीब चांगले होते, त्याला बाहेर कुठेही पोलीस दिसले नाहीत. करणने शक्य तितक्या वेगाने बाईक पळवायला सुरुवात केली.
साधारणपणे १. १० ला करण त्या पेट्रोल-पंपापाशी पोहोचला. रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश तसा मंदच होता. करणने बाईक वळवून एका अंधाऱ्या कोपऱ्यात उभी करून ठेवली.
रस्त्यावर आणि पेट्रोल पंपावर सामसूमच होती. जिमीच्या म्हणण्याप्रमाणे कॅश घेऊन येणारा ट्रक १ वाजता येतो. करणला १० मिनिटं उशीर झाला होता. त्यामुळे ट्रक येऊन गेला आहे कि अजून यायचा आहे ह्याचा काहीच अंदाज येत नव्हता. कॅश लुटायला आत जावं आणि कॅश नसेलच तर? किंवा नेमकं त्याच वेळेला तो ट्रक आला तर?
करणने थोडा वेळ वाट पाहायचे ठरवले.
हवेत गारवा असूनही करणला घाम फुटला होता. शेवटी तो काही कोणी क्रिमिनल नव्हता. दरोड्याच्या बातम्या आणि काही टीव्ही वरील मालिका किंवा सिनेमे सोडले तर त्याचा तसा दरोड्याशी काही संबंधीही नव्हता. गेल्या दीड – दोन दिवसांत जे काही घडले होते, आणि घडत होते ते करणने कधी त्याच्या दुःस्वप्नात सुद्धा पहिले नसेल. त्याच्या नजरेसमोर तीन खून घडले होते, स्वतःच्या हाताने त्याने आपल्या सो-कोल्ड गर्लफ्रेंडचा मृतदेह पुरला होता, एका उच्चभ्रू, हॉट शैलासारख्या स्त्री ला त्याने नग्नावतारात पहिले होते, जिमीसारख्या खतरनाक माणसाबरोबर राहूनही तो अजून तरी जिवंत होता आणि आता हे सर्व कमी म्हणून कि काय, खिशात बंदूक घेऊन तो एक पेट्रोल-पंप लुटायला आला होता.
करणने घड्याळात नजर टाकली १.३० वाजला होता. त्याची चुळबुळ सुरु झाली. प्रत्येक मिनिट महत्वाचा होता. इन्स्पेक्टर विक्रम शांत बसून राहणाऱ्यातला नक्कीच नव्हता. इतक्या वेळात त्याचा प्लॅन नक्कीच तयार झाला असेल.. कोण सांगो तो एव्हाना फार्म-हाऊसवर येऊन धडकला ही असेल आणि जेंव्हा त्याला कळेल करण इथे, पेट्रोलपंपावर दरोडा टाकायला आलाय.. त्याने बिनतारी यंत्रणेवरून संदेश पाठवून काही पोलीस करणच्या मागावर पाठवलेही असतील.
करण विचारात गढला असतानाच एक ट्रक त्या पेट्रोल पंपात शिरला.
करण सावध झाला आणि अंधारातूनच त्याने पेट्रोल पंपावर घडणाऱ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली.
ट्र्क डिझेलच्या पंपावर जाऊन उभा राहिला तसे ट्र्क मधून तीन पंचवीस-तिशीतली पोरं उड्या टाकून उतरली. एकाने डिझेल भरायला सुरुवात केली तर बाकीची दोघं ट्र्क च्या मागच्या बाजूने आत चढली. एव्हाना पंपाच्या केबिनमधून एक साधारण त्याच वयोगटातलं एक पोरगं बाहेर आलं. सोनेरी रंगाने रंगवलेल्या केसांचा फुगा, अंगात जर्किन, जीन्स आणि चालताना जणू हार्दिक-पंड्याचाच भास व्हावा, तो हि ट्र्क च्या मागच्या बाजूला जाऊन उभा राहीला.
आत चढलेल्या त्या दोन पोरांनी एक ट्रँक बाहेर ओढली आणि तिघे मिळून ती ट्रँक केबिनमध्ये घेऊन गेले.
१५ मिनिटांत तो ट्र्क आला तसा निघूनही गेला.
करणने चेहरा झाकायला बरोबर एक रुमाल आणला होता. केवळ डोळे, नाक आणि तोंडापाशी कापून त्याने छिद्र पडली होती, बाकी सगळं चेहरा झाकला जात होता. पंपावर सीसीटीव्ही असण्याची शक्यता होती आणि म्हणूनच सावधगिरी साठी त्याने हा उपाय योजला होता.
त्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर टाकली. दोन्ही कडून लांब लांब पर्यंत कोणतीच गाडी दिसत नव्हती. करणने खिश्यातुन आपली रिव्हॉल्व्हर बाहेर काढली, सेफ्टी-लॅच उघडले आणि तो दबक्या पावलांनी पंपावर गेला. एकवार त्याने कोणी कुठे झोपलेले नाहीए ना खात्री केली आणि तो त्या काचेच्या केबिन पाशी आला. मगाशी ट्रक मधून आलेली ती ट्रँक कोपऱ्यातच ठेवलेली होती. तो पोरगा फोन समोर धरून कुणाशीतरी बोलण्यात मग्न होता.
करणने एक दीर्घ श्वास घेतला आणि दाराला जोरात लाथ घालून तो आत मध्ये शिरला.
आतला तो पोऱ्या पूर्णपणे बेसावध होता. अचानक चेहरा झाकून आत शिरलेल्या त्या इसमाला पाहून तो धाडकन उठून उभा राहिला. करणच्या हातातली ती रिव्हॉल्व्हर त्या पोरावरच रोखलेली होती.
‘तुला उडवायला मला २ सेकंदही लागणार नाहीत, जिवंत रहायचं असेल तर जास्ती शहाणपणा नाही..’, करणला आपल्याच थंडपणे आलेल्या आवाजाचे आश्चर्य वाटले आणि जिवात जीवही आला.
‘ती ट्रँक उघड..’, करण
‘माझ्याकडे किल्ली नसतेय त्याची, सकाळी मालक येऊन उघडतात..’, तो पोऱ्या म्हणाला
‘ए, माझ्याशी होशियारी नाही, गप्प किल्ली दे नाहीतर ठोकतो तुला.. ‘, करण
‘मी परत तेच सांगतोय, माझ्याकडे नाय किल्ली त्याची, तुम्ही तपास इथे. सकाळी मालक येतात त्यांच्याकडे असते…’
करणला ती ट्रँक उघडणे भाग होते. ती घेऊन बाईकवरुन जाणे केवळ अशक्य होते.
‘आण इकडे ती ट्रँक.. ‘, करणने त्या पोराला दरडावले
तो पोरगा कोपऱ्यात गेला आणि ती ट्रँक ओढत आणून करणच्या समोर ठेवली. ट्रँक ला कुलूप चांगले जाडजूड होते. हातोड्याने किंवा एखाद्या कटावणीने तुटेल असे वाटत नव्हते. कुलूप पटकन उघडायचा एकच मार्ग करणला दिसत होता.
तो पोरगा ज्या खुर्चीवर बसला होता त्यावरची उशी उचलून त्याने रिव्हॉल्व्हरला लावली आणि कुलुपावर नेम धरून फायर केली. पण नाही म्हणलं तरी गोळीचा आवाज झालाच आणि अचानक कुठल्यातरी मुलीच्या किंकाळीचाही आवाज आला. आवाज कुणाचा होता हे समजायला करणला काही सेकंद लागली. तो मुलगा बहुदा त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर व्हिडीओ कॉलवर होता.
काही सेकंद, फक्त काही सेकंद करण बेसावध झाला आणि तो पोरगा पटकन त्याच्या टेबलाच्या दिशेने पळाला.
करणला हे समजायला वेळ लागला नाही की तो मुलगा कदाचित टेबलापाशी असलेल्या सेफ्टी अलार्मच बटन दाबायला जात आहे. प्रतिक्षिप्त क्रियेने करणने पटकन रिव्हॉल्व्हर उचलली आणि गोळी झाडली. त्याने गोळी झाडली होती पायाच्या दिशेने, पण अलार्मच बटन दाबायला तो मुलगा खाली वाकायला आणि करणने गोळी झाडायला एकच वेळ आली. गोळी त्या मुलाच्या मस्तकात शिरली. एखादा फुगा फुटावा तसं त्याचं डोकं फुटलं आणी तो जागच्या जागी जमिनीवर कोसळला.
फोनवरुन ती मुलगी अजूनही किंचाळत होती, त्यातून अजून एक-दोन वेगळे आवाजही येत होते. करणने तो फोन उचलला, काही क्षण त्याची आणि त्या मुलीची नजरानजर झाली आणि मग करणने फोन बंद करून टाकला.
त्या मुलीने दोन गोळ्यांचे आवाज ऐकले होते, कदाचित खाली कोसळणाऱ्या तिच्या बॉयफ्रेंडच्या आवाज तिने ऐकला होता. हातात रिव्हॉल्व्हर घेतलेला एक मास्कड-मॅन तिने बघितला होता. काय झाले ते तिला नक्कीच कळले असेल आणि कदाचित ती पोलिसांना फोनही लावत असेल. एक क्षणही वाया घालवून चालणार नव्हते.
करणने ती ट्रँक उघडली, आतमध्ये दोन हजारच्या नोटांची कैक बंडल होती. जिमी म्हणाला ते खरंच होते. ती कॅश नक्कीच २-४ लाखांपेक्षा जास्ती होती.
करणने पटापट जेवढी बसतील तितकी बंडल्स आपल्या सॅक मध्ये भरली आणि तो बाहेर पळाला.
थोड्या अंतरावर लपवून ठेवलेल्या आपल्या बाइकवर त्याने उडी टाकली, किल्ली बाइकलाच लावलेली होती. सॅक पाठीला अडकवून त्याने किक मारली आणि फुस्स.. इंजिन कडून काहीच रिस्पॉन्स नाही.
करणच्या छातीत धस्स झाले. दुसरी किक.. तिसरी कीक … गाडीचं सुरु होईना
करणला दरदरून घाम फुटला.
त्याने बाईक आडवी केली आणि परत किक मारली पण …
रात्रीच्या त्या गारठ्यात ती जुनाट बाईक गारठली होती. अचानक करणला आठवले, जिमीने त्याला बाईक देताना तो चोक ओढून बाईक चालू करून दिली होती. अंधारात चडफडत करणने शोधाशोध केल्यावर अखेर इंजिनच्या बाजूला असलेला तो चोक सापडला. चोक देऊन किक मारायला सुरुवात केल्यावर पाचव्या-सहाव्या किकला बाईक सुरु झाली.
करणने गाडीवर टांग टाकली आणि तो फार्म-हाऊसच्या दिशेने वेगाने निघाला.
केवळ पाचच मिनिटांच्या फरकाने पोलिसांच्या दोन जीप वेगाने त्या पेट्रॉल-पंपावर शिरल्या होत्या….
करणचं डोकं भणभणायला लागले होते. त्याने त्या पोऱ्याला जाणूनबुजून गोळी मारलेली नव्हती, ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होती. आणि त्यावेळी सुद्धा त्याने भान राखून गोळी पायाच्या दिशेने मारली होती, पण तो पोरगा अगदी त्याच वेळी खाली वाकला आणि गोळी पाया ऐवजी त्याच्या डोक्यात घुसली होती.
कारण, परिस्थिती काहीही असो, करणच्या हातून गंभीर गुन्हा घडला होता. आतापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये तो फक्त शैलाचा साथीदार होता. शेखर काय किंवा इशिता काय, किंवा तो हवालदार काय, एकालाही त्याने साधे नखही लावलेले नव्हते.
एकदा त्याच्या डोक्यात विचार आला, जावे असेच इथून पळून, परत त्या फार्म-हाऊस वर न जाता. बरोबर ६-७ लाख रुपये होते. निदान काही महिने तरी तो सहज लपून राहू शकला असता. पुढचे पुढे.
परंतु, हा विचारही जास्ती धोकादायक होता. तो तिथे पोहोचला नाही तर जिमी कसा रिऍक्ट करेल काही सांगता येत नव्हते. उलट आता सर्वस्वी करणवर अवलंबून होते. कदाचित तो हुसेन तिथे येऊन पोहोचलाही असेल, कदाचित त्यांनी ठरवलेला प्लॅन यशस्वीही ठरेल. कदाचित शेखरच्या पॉलिसीची रक्कम मिळाल्यावर, झाल्या घडामोडी मागे ठेवून, तो आणि शैला एकत्र, ऐषोआरामात जीवन घालवूही शकतील.
करणने बाईक कच्या रस्त्यावरून आतमध्ये वळवली, झाडी पार करून तो त्या ब्रिजपाशी आला आणि समोरचं दृश्य बघून त्याचा श्वासच रोखला गेला, हृदय बंद पडतेय कि काय असे त्याला वाटू लागले, भोवतालचे सगळे जग गोल फिरतंय आणि आपण आता खाली कोसळणार असेच त्याला वाटत होते.
त्या फार्महाऊसच्या समोर पोलिसांच्या ५-६ जीप्स आणि एक ऍम्ब्युलन्स उभी होती.
करण जागच्या जागी थिजल्यासारखा उभा होता. इच्छा असूनही त्याला हालचालच करता येत नव्हती. काही वेळ गेल्यावर त्याला परिस्थितीची जाणीव झाली. त्याच्या पाठीवर नुकतीच पेट्रोलपंपावरुन लुटून आणलेली कॅश होती. अगदीच पुराव्यासहीत तो आयाता पोलिसांच्या हातात अलगद सापडला असता. पटकन त्याने ती बॅग काढली आणि दूर झाडीत फेकून दिली.
त्याने आजूबाजूला नजर टाकली. शैला, जिमी, रोशन पैकी कोणीच दिसत नव्हते. विविध जीप्स मधून वॉकी-टॉकी वरचे रिले-मेसेजेस चे आवाज येत होते. टपावरच्या लाल-निळ्या चमचमणाऱ्या दिव्यांनी बाजूचा परिसर उजळून निघाला होता.
There was no turning back.
इथून पळून गेला असता तर पोलिसांना अधिकच संशय आला असता. पुढे जाऊन काय झालं आहे हे बघितल्याशिवाय काहीच कळणार नव्हते.
करणने बाईक कडेला लावली आणि जड पावलं टाकत तो फार्महाउस मध्ये शिरला.
आतले दृश्य अजूनच भयंकर होते. हॉल मधले सगळे सामान अस्ताव्यस्त पसरले होते, जणू काही एखादे वादळ येऊन गेले आहे. कोपऱ्यात २ वॉर्ड-बॉय शैलाला उचलून स्ट्रेचर वर ठेवत होते. केवळ त्या घरात एकच स्त्री होती, शैला, म्हणून ती ओळखू येत होती, नाहीतर तिची अवस्था अतिशयच बिकट दिसत होती. बहुदा केसाला धरून ओढल्यामुळे काही केस मुळापासून निघून आले होते आणि डोक्याची स्किन दिसत होती. चेहरा रक्ताने भरलेला होता, गालावरची स्किन लक्तर निघाल्यासारखी लटकत होती. कपडे फाटलेले होते, हाताची २-३ बोट उलट्या बाजूला वळलेली होती.. आणि तिच्या बाजूला.. तिच्या बाजूला गळा चिरल्यासारखा दिसणारा जिमी डोळे उघडे ठेवून गतप्राण झाला होता.
रोशन?
करणने इतरत्र बघितले, खिडकीशेजारच्या खुर्चीवर रोशनही हातात रिव्हॉल्व्हर धरुन मरुन पडला होता. बहुदा त्याने स्वतःहूनच डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती.
करणला कसं आणि काय रिऍक्ट करावं हेच कळत नव्हते. हे सगळे कसं आणि का घडले ह्याची त्याला काहीच कल्पना नव्हती. हे सगळे घडले तेंव्हा तो इथे नव्हता. अर्थात जेंव्हा पोलीस त्याला प्रश्न विचारातील “तू कुठे होता?” तेंव्हा काय उत्तर द्यायचे हे लवकरात लवकर ठरवणे त्याला क्रमप्राप्त होते कारण त्याच्याकडे फार कमी वेळ होता.. किंवा नव्हताच..
“हॅल्लो करण…”, करण विचारात असतानाच त्याच्या खांद्यावर हात पडला…
त्या हाताच्या पकडीवरून आणि त्या आवाजावरुन मागे असलेला इसम इन्स्पेक्टर विक्रम आहेत हे त्याला कोणी वेगळ्या माणसाने सांगायची गरज नव्हती…
[क्रमशः]
Bapare …… He kahi tari bhaltch jaal….. Thanx for the part but sir plz as soon as posible next prt taka i know tumi busy asta…. Tumcha vel kadhun tumi lihita… Pn 1 year vat pahili jawal jawal……
Thanks Piyu, I always try to post at the earliest, pn der veli nahi jamat.. i know kadhi kadhi khoop late hoto.. extremely sorry for that..
Khtrnak ch n bho
Excellent writing dada
Jbrdast turning aanla story la
Thanks for this Amazing part
Pudhchya bagachi wat bgtoy
Kdkkkk🔥
🙂 Thanks Shrikant
Forgot to add in the post, but a BIGGG thanks to all who stayed with me and the story. It was late, but you all kept your interest in it, kept me pinging on whatsapp, FB, emails.
You all kept me thinking for the next part always..
Bosss tumchi writing amazing y
Late zal pn tumchya stories chya next part
Chi wat baghnyat bi lay moth thrill y
Angar hai dada teri writing 🔥🔥
Oh thanku thanku
वाचल्यावर बाकीचा reply,😘😘😍
waiting for the reply from critique
Commenting, I would say that I am not big enough to blame it, but I will talk about what I really like in this part
या आधीच्या भागात अन या भागाच्या स्टारटिंग ला हुसेन चा उल्लेख वाचून मला हुसेन ची इन्ट्री होईल असं वाटलं होतं. पण थँक्स की जी झाली नाही त्यामुळं थोडीशी पात्रांची गर्दी झाल्याचा फील आला असता. आणी जिमीच्या हातुन हवालदार चा जो मर्डर झाला त्याविषयी थोडा अंदाज होता. आणी पेट्रोल पंपावर झालेला इंसिडेंट पण चॅन जुळुन आला. पण एंडींग चा राडा वाचुन मनात थोडासा पिक्चर तयार झाला की करणं ती कॅश घेऊन तिथुन बाहेरच्या बाहेर कलटी मरेल पण तो आत गेला न आतला सिन म्हणजे टर्निंग राव superb काटा च आला अंगावर. पण थोडं एक सांगावं वाटलं शैलजाच्या हलत च्या वर्णना मध्ये जे थ्रिल भरली तसच थोडं विस्तृत वर्णन जिमी अन रोशन च्या बॉडीस च झालं असत तर अजुन खुप थ्रिलर वाटलं असत.
बाकी हा पार्ट खुप च अमेझिंग इंटरेस्टिंग न जबरी होता.
Best luck for future writing dada
🔥🔥🔥💐💐😍😍😍😍
वाचत असताना माझा च श्वास अडकला होता अजूनही वाटतय की मी च काहीतरी करून आलीये,,हे एकाच रात्री घडवणं गरजेचं होतं का,,बाहेर उजेड असूनही ती रात्र अनुभवतेय अस वाटतय,,
एकदमच क्लास सुरुवात झालीये
ahh.. thank you sooo much Tanuja for this wonderful comment..
तुफान लिहिलंय सर तुम्ही. श्वास अगदी रोखून धरला होता वाचता वाचता.
🙂 Thank you soo much
khupch anpekshit aani extreme twist aala aahe story madhe… aata pudhe karan hi bhayanak situation kashi handle krtoy hyachi prachand ustukta aahe. Khup thrill anubhavayla milale.. waiting for next episode…
🙂 Keep guessing
unexpected, really amazing, next part lavkar taka please
Hi aniket…
Thanks for continued…
Mala vatle ata hi story kayam aadhich rahil…😄
N e ways magcha part parat n vachta sagli link perfect julun ali…☺️ Lihitana evdha gap zalyas avghad hot nahi ka?? Ek sahaj v4 dokyat ala..😊
Hote na, mala parat sagle wachave lagte.. kon kuthe aahe, kit wajlet, aadhi kiti wajlet hote.. kunach kay tharl hoote, kon kay karat hote… esp suspense/thriller story la choti pn chuk houn chalat nahi na
baryachda lihayla mala mhanunch vel lagto.. its not like im just typing it.. lot of thought process lagte.. tevda vel, mood asla terch next part jamun yeto
पुढचा भाग लवकर टाका.
अप्रतिम 1no.👌भारी जमलंय पुढचा भाग लवकर पोस्ट करा. उत्सुकता वाढत चाललेय.
Dhanyawaad
bapre…. ala ekdacha bhag.. ani to pn jabardast turning point gheun.. bhari lihilay.. next part lavkr ana pls..
:-).. hussh..
aata thamb jara, next part yaychi ghai karu nakos g
This part is such thrilling turn …. Tharvlelya plan nusar sgle hoil as vichar astana evdha danger turn…Seriously unexpected…..just one request yoh sir as soon as possible plz publish next part…..N you are going awsm 😊
🙂 Thanks
ekach number evdhya mahinyanchya pratikshech fal ..mala 10 divas ushira aajach baghitl ..bhannat hota likhan ..wachtana aksharsha aapan tithe aahot ki kaay as watayla lagla hot ..sunder ..ata next post lavkr yevu dya ..nahi tal link lagnyasathi magche 3 bhaag parat wachayla laagtaat ..
Thank you soo much Sheetal
Pingback: डबल-क्रॉस (भाग १८) | डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा