नविन गुगल मॅप्स


नविन गुगल मॅप्स पाहीले आहे? अप्रतीम. दुसरा शब्दच नाही. काय बनवले आहे राव ते. यामधील बेस्ट ‘फिचर’ म्हणजे ‘स्ट्रीट व्ह्यु’. म्हणजे अमेरीकेमधील एखादा पत्ता ‘maps.google.com’ या संकेतस्थळावर जाउन टाईप करा. त्यानंतर डाव्या बाजुला कोपऱ्यात एक पिवळ्या रंगातील माणसाच चित्र दिसेल त्याला ड्रॅग करुन त्या पत्यावर ठेवा. झाले. त्या पत्यावरील ठिकाण तुम्हाला जसेच्या तसे दिसु लागेल. एवढेच नाही तर तुम्ही त्या ठिकाणाच्या पुढे/मागे, डावीकडे/उजवीकडे, वर/खाली सुध्दा बघु शकाल. थोडक्यात तुम्ही अक्षरशः त्या पत्यावर उभे राहील्यावर जे दिसते तेच तुम्हाला १००० मैल लांबुन सुध्दा दिसु शकते.

अर्थात हे रिअल-टाइम नाही आहे, पण तरीही कौतुकास्पद आहे. याचा वापर कसा करावा याच्या अधीक माहीतीसाठी वरील व्हिडीओ बघा.

यावरुन अजुन एक गोष्ट आठवली. साउथ-अफ्रीका, केनीया मधील जंगलातील बऱ्याच ठिकाणी वेब-कॅमेरे बसवले आहेत जसे पाणवठे, किंवा झाडीच्या जागा. हे कॅमेरे रिअल-टाइम आहेत. म्हणजे जंगलात त्या कॅमेराच्या समोर एखादा हत्ती, वाघ, सिंह किंवा कुठलाही प्राणि आला की लगेच तो आपल्याला दिसु शकतो. खुप मस्त मज्जा येते बघायला. फक्त संयम बाळगायला हवा. दर वेळी कुणीतरी दिसेलच ही आशा करण्यात काही अर्थ नाही. घरबसल्या जंगल-सफारीचा आनंद मात्र यामुळे आपल्याला घेता येतो.