लॉटरी..


परवा सकाळी मेलबॉक्स उघडला आणी समोर दिसणारी मेल बघुन थक्कच झालो. अहो दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही तर चक्क लंडनमधील एका प्रतिथयश लॉटरी कंपनीच्या अधीकाऱ्याची होती. त्या सदगृहस्थाने मला कळवले की मला GBP 5,000,000.00 लॉटरी लागली आहे. म्हणजे नक्की किती ते मी अजुन कॅलक्युलेट करतोच आहे पण तो मोठ्ठा आकडा बघुनच मला भोवळ यायला लागली. आणि विषेश म्हणजे कुठल्याही प्रकारचे लॉटरीचे तिकिट स्वतःचे पैसे घालवुन विकत न घेता लॉटरी लागल्याचे ऐकुन मला आनंदाला पारावारच राहीला नाहीये. मी एकटाच हर्षावायु झाल्यासारखा हासत सुटलो.

लगोलग त्यांनी मागीतलेली माहीती भरून पाठवुन दिली (बॅक अकाऊंट नं. सोडुन :-)) पण त्यानंतर एक दिवस झाला, दोन झाले, चांगला आठवडा होऊन गेला पण काही खबर-बातच नाही.. काय राव?? दिल तोड दिया ना??? 😦

तुमसे जुदा होकर मुझे दुर जाना है


सालाबादाप्रमाणे या वेळेस परत एकदा मी माझा ब्लॉग बदलत आहे. अर्थात ह्या वेळेस मी आधीच्या ब्लॉग वर खुपच जास्ती वेळ टिकुन होतो.  तसं बदलाचे कारण विशेष नाही, परंतु मला अत्यंत महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे मित्रांच्या सुचना, अभिप्राय ते या ब्लॉग वर येत नव्हते. कारण हे की त्याच्यावर जे लोक signed users नाहीत ते अभिप्राय लिहु शकत नाहीत असले मुर्खासारखे फिचर होते.

मला सांगा एखादी कमेंट  टाकायला कशाला कोण रजिस्टर करेल? झालं माझ्या ही गोष्ट डोक्यात शिरली आणी ठरवलं. बस्स. अजुन मुर्खाचा बाजार म्हणजे तिकडचे माझे पोस्ट इकडे एक्स्पोर्ट पण करता येत नाहीयेत 😦 तर आजपासुन त्या ब्लॉगला टाटा.

आजपासुनचा माझा पत्ता हाच.