Tag Archives: मराठी स्टोरी

डबल-क्रॉस (भाग २०)


भाग १९ पासून पुढे >>

करणला एका कडक कॉफीची गरज होती. आत्ता ह्या वेळी बेल मारुन कोणी कॉफी आणून देईल ह्याची श्वाश्वती नव्हती. शेवटी स्वतःच जाऊन आणावी म्हणून तो खोलीच्या बाहेर आला.

समोरच्याच बाकड्यावर देशपांडे अंगाचं मुटकुळं करुन गाढ झोपला होता.

संदीपला त्याची दया आली. त्याने हलवून देशपांडेला जागे केले.

“देशपांडे, अहो अवघडून जाल असे झोपून..”

संदीपने देशपांडेला खरं तर करणवर लक्ष ठेवायला इथे थांबवले होते आणि नकळत त्याला कधी डोळा लागला त्याच त्यालाच कळले नव्हते.

तो कसनुसं हसत उठून बसला.

“चला,कँटीनला चला, चहा कॉफी घेतली कि बर वाटेल”, करण
“अरे तुम्ही नका खोलीच्या बाहेर पडू, हवं तर मी घेऊन येतो..”, देशपांडे उठून बसत म्हणाला

“अहो सरकारी दवाखाना आहे हा.. कोण बघतंय इथे पेशंट खोलीत आहे का बाहेर फिरतोय.. चला.. तेव्हढेच माझे पाय पण जरा मोकळे होतील.

रात्रीचे अडीच वाजून गेले होते, सर्वत्र सामसूमच होती. कँटिनही किरकोळ लोक सोडली तर रिकामेच होते.

करणने दोन कॉफी घेतल्या आणि तो देशपांडेपाशी टेबलावर येऊन बसला

“माफ करा, उगाच माझ्यामुळे तुम्हाला रात्रभर इथे बसावं लागलं”, करण
“नाही तसंच काही नाही, पण संदीपने आधीच सांगितले असते तर निदान घरी जाऊन सांगून आलो असतो. बायकोने बनवलेले जेवण वायाच गेले ना..”
“बरोबर आहे.. मी समजू शकतो.. कोण असतं घरी?”

देशपांडे ने आपला मोबाईल चालू करून आपल्या फॅमिलीचा.. बायको दोन मुलांचा .. फोटो दाखवला.

“देशपांडे.. तुम्ही घरी जाऊन निवांत झोपा, इथली काळजी करू नका, मला काही लागणार नाहीए.. आणि ह्या औषधांनीही सारखी झोपच येतेय. आता झोपलो कि सकाळी ८-९ शिवाय काही मी उठत नाही “, करण

“नको नको.. उगाच संदीप सरांना कळाले तर?”
“अहो आहे कोण इथे संदीपला सांगायला?.. उद्या सावकाशीत सकाळी नाष्टा करुन ह्या परत.. इथे असं अवघडून झोपण्यापेक्षा बायकोशेजारी झोप आरामात.. काय?”, डोळे मिचकावत करण म्हणाला

“पण..”
“पण नाही आणि बीण नाही,.. हे बघा पावणे तीन वाजलेत.. साडे तीनला जरी घरी पोहोचलात तरी चार तास चांगली झोप मिळेल”, हातातल्या घड्याळातली वेळ दाखवत करण म्हणाला..

देशपांडेचीही तिच इच्छा होती, फक्त संदीपच्या भीतीपोटी तो उगाच का कु करत होता..
करणने स्वतःहूनच जायची विनंती केल्यावर तो हि फारसे आढेवेढे न घेता जायला तयार झाला..

“धन्यवाद करण..”, खुर्चीतून उठत देशपांडे म्हणाला.. “फक्त संदीपला कळणार नाही ह्याची..”
“त्याची काळजीच करु नका, हे फक्त आपल्यातच.. चला मला पण आता मस्त झोप आलीय.. “. आळस देत करण म्हणाला

देशपांडेने कॉफी पटकन संपवली आणि तो खुर्चीतून उठून उभा राहिला..

“उद्या नाष्टयाला घरुन पोहे घेऊन येतो.. इथलं नका खाऊ, बायको मस्त पोहे बनवते.. दाणे कोथिंबीर खोबरं वगैरे टाकून आणतो..”, देशपांडे जाण्यासाठी निघाला

करणनेही कॉफी संपवली आणि तो पण उठून उभा राहिला..

“बाय द वे..”, अचानक काहीतरी आठवल्यासारखं देशपांडे म्हणाला.. “घड्याळ आवडलं ना तुम्हाला?”
“घड्याळ?” न समजून करण म्हणाला
“हां .. ते तुम्ही घातलेय ते.. “, करणच्या हातातल्या घड्याळाकडे बोट दाखवत देशपांडे म्हणाला..
“ओह हे.. हो चांगले आहे.. माझ्या मैत्रिणीनेच मला गिफ्ट केले होते ते.. “

“माहीत आहे मला.. इशिता ना?”
“हो.. तुम्हाला कसं माहीती?”
“कसं म्हणजे काय? मीच तर आणून दिले होते तिला.. “
“काय? तुम्ही? कसं? म्हणजे मी नाही समजलो..”
“कसं म्हणजे काय? संदीप सरांनीच सांगितले होते मला.. हे जीपीएस असलेले मॉडेल आणून इशिताकडे द्यायला.. “

करणला हा मोठ्ठा धक्का होता.. पण त्याने चेहर्यावरुन तसे काही दर्शवले नाही

“अच्छा अच्छा, थँक्स.. छानच आहे घड्याळ.. “
“बरं चला येतो मी, सकाळी ८.३० पर्यंत येतो मग.. “, असे म्हणून देशपांडे तिथून निघून गेला..

 

करण आपल्या खोलीत येऊन बसला..
संदीपने हे जीपीएस असलेले घड्याळ मागवले होते? मग इशिता का खोटं बोलली कि तिने ह्या घड्याळात जीपीएस बसवले ..

नुसते एकावर एक प्रश्नच करणच्या डोक्यात साचत होते ज्याची उत्तर लवकरात लवकर मिळणे गरजेचे होते.

सर्वात प्रथम शैला.. तिला भेटणे गरजेचे होते. देशपांडे आता इथे नसल्याने त्याला बाहेर पडून सकाळच्या आत परत येणे शक्य होते. फक्त प्रश्न एकच होता आणि तो म्हणजे शैला ज्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती होती, ते शहराच्या दुसऱ्या बाजूला होते. तिथपर्यंत चालत जाणे शक्य नव्हते आणि रिक्षा किंवा टॅक्सीसाठी करणकडे पैसे आजिबात नव्हते.

थोडा विचार केल्यावर करणला एक उपाय सुचला. करणंच ऑफिस.. टेबलाच्या एका खणात तो नेहमी २००-४०० रुपये लपवून ठेवत असे, अगदीच गरजेच्या वेळी उपयोगी म्ह्णून. त्याचे ऑफिस तसे फारसे लांबही नव्हते. भरभर चालत गेला तर अर्ध्या पाऊण तासात तो सहज तेथे पोहोचु शकला असता.

करणने खोलीचे दार उघडून बाहेर नजर टाकली. व्हरांड्यात सामसूम होती.

बेडच्या कडेला लावलेला औषधांचा चार्ट करणने एकदा नजरेखालून घातला. रात्री कुठलेही इंजेक्शन, गोळी लिहिलेले नव्हते. त्यामुळे रात्री व्हिजिटला डॉक्टर, सिस्टर येण्याची शक्यता कमी होती.

करणने धोका पत्करायचा ठरवले. त्याने बाथरुमचा दिवा चालू केला, खोलीत अंधार केला आणि रुमचा दरवाजा उघडून बाहेर पडणार इतक्यात त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. हातातले घड्याळ. कोण जाणो, संदीप जीपीएसवरून त्याच्यावर लक्ष ठेवून असेल?

करणने ते घड्याळ काढून टेबलावर ठेवून दिले आणि तो बाहेर पडला.

हॉस्पिटलच्या रिसेप्शनपाशी फुल राडा चालू होता, कुणाचे नातेवाईक गचकले होते आणि तेथे रडारड, डॉक्टरला शिवीगाळ चालू होती. सेक्युरिटी त्यातच मग्न होती. नशिबाने त्याला कोणीच आडवले नाही. करण झपझप पावलं टाकत बाहेर पडला आणि ऑफिसच्या दिशेनं निघाला.

 

शॉर्टकट्स घेत अर्ध्या तासातच करण ऑफिसपाशी पोहोचला. सावकाश जिने चढत तो ऑफिसपाशी आला. तसेही त्याच्या ऑफिसमधून चोरून न्हेण्यासारखे काही नव्हते, त्यामुळे दाराजवळच्या झाडाच्या कुंडीतच लपवून तो ऑफिसची एक ज्यादाची किल्ली ठेवत असे. करणने नेहमीच्या जागी हात घातला पण तिथे किल्ली नव्हती. करणने दोन-तीनदा निट बघितले, परंतु नक्कीच तिथे किल्ली नव्हती आणि त्याचं कारण करणच्या लगेचच लक्षात आलं.

ती किल्ली त्या कुंडीखाली नव्हती, त्याच्या ऑफिसच्या दाराच्या उघडलेल्या कुलुपाला होती.

ऑफिसचं कुलूप कोणी उघडले? कोण येऊन गेले ह्याचा करण विचार करत असतानाच दार उघडले गेले आणि एक व्यक्ती बाहेर आली. अनपेक्षितपणे समोर दुसरी व्यक्ती बघून दोघांनाही धक्का बसला.

करणने त्या व्यक्तीला पकडायचा प्रयत्न केला, पण ती व्यक्ती करणच्या हाताला हिसका देऊन पळाली .. काही पावलंच आणि अचानक एक वेदनेची एक लहर त्या व्यक्तीच्या अंगातून गेली आणि अस्पष्टसे कह्णत ती व्यक्ती जिन्याचा आधार घेऊन खाली बसली.

करणने पटकन त्या व्यक्तीला पकडले, पण ह्या वेळी त्या व्यक्तीने प्रतिकाराचा कुठलाही प्रयत्न केला नाही.

करण त्या व्यक्तीला घेऊन ऑफिसमध्ये गेला, दिवा लावला आणि ऑफिसचे दार लावून घेतले.

समोरच्या त्या व्यक्तीला, मोहीतला, बघून करणला पुन्हा एक आश्चर्याचा धक्का बसला..

“मोहीत .. तू इथे???”

मोहीत डोळे बंद करून भिंतीला टेकून उभा होता. पाठीत मारलेल्या त्या स्क्रू ड्रायव्हरच्या जखमेतून आलेली तीव्र कळ शमेपर्यंत तो भिंतीला टेकून उभा राहीला आणि मग शांतपणे तिथल्याच खुर्चीवर टेकून बसला.

“माझं पत्र मिळालं ना तुला?”, कसंनुस हसत मोहीत म्हणाला
“पत्र? कुठलं पत्र”, दुसऱ्या खुर्चीवरची धूळ झटकून मोहितसमोर ठेवत करण म्हणाला
“इतक्या लवकर विसरलास हितचिंतकाला??”
“ओह.. ते पत्र तू पाठवलं होतंस? तुझ्यामुळे मी त्या दवाखान्यात..”
“सॉरी.. ते करण भाग होतं.. विक्रमने तुला सोडलं नसतं ..”
“पण का? तू माझ्या मदतीला का आलास? तुला तर शैला मारुन टाकणार होती.. आणि त्या.. त्या दिवशी तू अचानक कुठे गायब झालास?”
“सांगतो.. सगळं सांगतो… ” असं म्हणून मोहितने हातातली बॅग करणला दिली..
“हि त्या पेट्रोल पंपावरची कॅश.. साडे-सहा लाख होते एकूण.. मी २ लाख कडून घेतले, बाकीचे तुझ्या ऑफिस मध्ये ठेवायला आलो होतो.. तिथे त्या फार्म हाऊसवर हि बॅग असुरक्षित होती. कुणाच्या हाती लागली असती किंवा पावसात भिजून सगळीच वाया गेली असती म्हणून मीच जाऊन घेऊन आलो.. “

“पण.. पण तू तिथे पोहोचलासच कसा? तिथे तर अजून पोलीस असतील ना?”
“सांगतो म्हणालो ना.. तू मला बोलून देशील तर ना.. “

“ओके सॉरी.. बोल.. ” खुर्चीवर बसत करण म्हणाला.. “फक्त माझ्याकडे वेळ कमी आहे, कसही करून मला सकाळी सातच्या आत हॉस्पिटल मध्ये पोहोचायचंय आणि अजून एक दोन काम शिल्लक आहेत.. “

“तुझी काम तुला नंतर पण करता येतील.. आधी मी काय सांगतोय ते नीट ऐक..” असं बोलून मोहीत बोलू लागला..

“माझी ओळख तर त्या दिवशी इशिताने करुन दिली होतीच.. मी सुपारी घेऊन खून करतो.. ऑफकोर्स, माझ्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस.. मी दिसतो तसा नाहीए .. आणि हाच माझा सेलिंग पॉईंट आहे, लोकांना सांगूनही खरं वाटत नाही की हे माझं प्रोफेशन असेल..

तर.. मी आणि इशिता वेअर गोइंग स्टेडी .. ऐषारामात जगता येईल इतपत पैसा मिळत होता.. पण एकदा नशिबाचे फासे उलटे पडले.. एका मोठ्या सुपारीत माझ्याकडून गडबड झाली.. चुकून दुसरीच व्यक्ती मारली गेली.. सुपारीचे पैसे मिळाले नाहीतच उलट साला नाव खराब झालं.. नवीन काम मिळेना.. मार्केट मधून पैसे उचलले होते ते परत करायचे वांदे झाले…

त्याच वेळी इशिताला संदीपकडून काम मिळाले. दोन-चार दिवसातच सगळी गोम लक्षात आली आणि आम्ही दोघांनी संदीपला डबल-क्रॉस करायचा प्लॅन केला. तुझ्या घड्याळामुळे तुझ्यापर्यंत पोहोचणे सोपे होते. आम्हाला वाटलं काम अगदीच सोप्प आहे. शैला आणि शेखरकडून आम्ही काहीच प्रतिकार अपेक्षित केला नव्हता. प्रश्न फक्त तुझाच होता. मला वाटलं होईल काम. २-३ दिवस फक्त तुम्हाला डांबून ठेवायचे, संदीपकडून पैसे काढायचे आणि गायब व्हायचे. तसंही आम्ही मागितलेले पैसे संदीपसाठी फार नव्हते. प्लॅन अगदीच सोपा वाटत होता. पण.. शैलाने अनपेक्षितपणे प्रतिकार केला आणि होत्याचे नव्हते ते झाले..”

इशिताच्या आठवणीने मोहित काही काळ भावुक झाला..

मोहितने आपली एका बाजूची पॅन्ट वर केली.. जिथे शैलाने गोळी मारली होती.. तो गुडघा.. ती जखम अजूनही ओली होती..

“मला नाही वाटत ह्यापूढे मला नीट चालता येईल.. पेन-किलर इंजेक्शनवर सध्या तरी जगतोय, पण मला सर्जरीची गरज आहे.. तेही लवकरच .. म्हणून मी थोडे पैसे काढून घेतलेत.. आय होप यु वोन्ट माईंड.. “

करणने संमतीदर्शक मान हलवली..

“थँक्स.. त्या दिवशी तू मला स्कॉच बनवून दिलीस .. मला पूर्ण खात्री होती त्यात काहीतरी घातलेले असणार.. मी अंदाज बांधला झोपेचे औषधच असणार.. मला मारायचे असते तर ते तुम्ही आधीच केले असते .. सो मी ती स्कॉच शेजारच्या कुंडीत ओतून दिली..

मिशनवर असताना मी नेहमीच बरोबर स्ट्रॉंग पेन-किलर्स गोळ्या आणि इंजेक्शन्स बाळगतो.. कधी गरज पडेल सांगता येत नाही. मॉर्फीनच नाव ऐकलं असशीलच तू? मोस्टली आर्मीमध्ये वापरतात मेजर इन्जुरीजना तात्पुरता आराम वाटावा म्हणून…. गरज पडलीच तर ऑन-द-रन १-२ दिवस लपून राहता येईल असे सामान नेहमीच माझ्या बॅग मध्ये असते. मी पटकन एक शॉट घेतला आणि झोपेचे सोंग घेत पडून राहिलो.

तुम्ही इशिताची बॉडी घेऊन बाहेर गेलात आणि मी बाहेर पडायचा प्रयत्न करायला उठलो. एक तर दार बाहेरुन बंद होते आणि दुसरे म्हणजे ह्या पेन-किलरच्या भरवश्यावर मी कितपत पुढे जाऊ शकेन ह्याची खात्री नव्हती.. शिवाय तुम्ही किती लांब आहात ह्याची काहीच कल्पना नव्हती.. मी बाहेर पडायला आणि तुम्ही समोर यायला एकच वेळ आली तर..? मग मी घरातच दुसरा मार्ग शोधायला सुरुवात केली आणि शोधा शोध करताना मला तो तळघरात जायचा रस्ता सापडला ..”

“तळघरात?”, करण आश्चर्याने म्हणाला आणि मग त्याची ट्यूब पेटली.. शैलाने त्याला तो बंद दरवाजा दाखवला होता..
“येस्स राईट.. शैलाने दाखवला होता मला.. पुढे.. “

“मी पटकन त्या तळघरात घुसलो.. जाम अंधार होता.. काहीच दिसत नव्हतं.. मी अंधारात चाचपडत एका कोपऱ्यात गेलो.. कारच एक जुनं कव्हर पडलं होतं तिथे ते अंगावर घेतले .. थोड्या वेळातच मला गुंगी आली आणि मी बेशुद्ध पडलो .. “

शुद्ध आली तेंव्हा किती वेळ होऊन गेला होता ह्याची काहीच कल्पना नव्हती. काही मिनिट, काही तास का दिवस..

आपली लाईन कितीही वाईट असली तर एक चांगली गोष्ट असते ती म्हणजे आपण नेहमीच कुठल्याही गोष्टी साठी तयार असतो.. आपली बॉडी असतेच, पण नकळत आपले मन पण अश्या गोष्टींशी जुळवून घेणारे झाले असते. एक प्रकारचा अलर्टनेस फक्त शरीरातच नाही तर मनालाही असतोच.. आणि त्यामुळे मी अचानक सावध झालो.

… माझ्याशिवायही अजून कोणतरी त्या तळघरात होते. बारीकच हालचाल होती.. पण होती हे नक्कीच ..”

करण सावध होऊन बसला..

आधी वाटलं कि शैला किंवा तूच मला शोधत तळघरात आलात कि काय? पण माझा अंदाज चुकीचा होता हे लगेचच माझ्या लक्षात आले. तुम्ही असतात तर असे अंधारात नसता फिरलात.. शिवाय त्या व्यक्तीच्या चालण्याच्या आवाजावरुन ती व्यक्ती कोणतरी वजनदार असावी असे वाटत होते. सावकाश तळघराच्या पायऱ्या चढत ती व्यक्ती तळघराच्या दारापाशी गेली असावी.. तिथे थांबून बहुदा ती व्यक्ती बाहेर तुम्ही बोलत असाल ते ऐकत होती. पाच दहा मिनिट थांबून ती व्यक्ती परत जायला निघाली. जाताना त्या व्यक्तीने एक अगदी बारीक टॉर्च लावला होता.

बघता बघता ती व्यक्ती आणि टॉर्चचा तो उजेड दिसेनासा झाला.. आणि मग.. लांब कुठेतरी एक अगदी बारीकसा खुट्ट आवाज झाला आणि मग शांतता ..

त्या तळघरात यायचा बाहेरुनही एखादा रस्ता आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही.

मी सावकाश उठलो आणि तळघराच्या दरवाज्यापाशी आलो.. बाहेरुन तुम्हा दोघांशिवाय अजून दोघांचे आवाज येत होते.. जिमी आणि रोशन..

ती व्यक्त्ती गेली आहे ह्याची खात्री पटल्यावर मी सावकाश सावकाश सरकत तळघराच्या जिन्यापाशी येऊन बसलो. तिथे मला तुमचं बोलणं अस्पष्ट का होईना ऐकू येत होते. कुठलासा पेट्रोल पंप लुटायचा प्लॅन चालू होता. तुमच्या बोलण्यातून कळले कि तो कोण इन्स्पेक्टर विक्रम एकदा येऊन गेला होता आणि परत येण्याची शक्यता होती. जे काही चालू होते सगळेच विचित्र होते. मी ठरवले कि तिथे अजून जास्ती वेळ थांबण्यात अर्थ नाही.. उगाच कश्यात तरी अडकण्यापेक्षा तिथून निघालेले बरं .. तसही मला बाहेर जायचा मार्ग सापडला होता.

मी बाहेर पडायला मागे वळलो आणि पुन्हा मला त्या तळघरातल्या व्यक्तीच्या पावलांचा आवाज येऊ लागला.. मी अगदी जिन्याखालीच होतो.. बारीकसा आवाज झाला असता तरी माझं काही खरं नव्हतं.. मी श्वास रोखून बसून राहीलो. ती व्यक्ती येताना काहीतरी सामान घेऊन आली होती.. बहुदा लोखंडी काहीतरी.. जड ..

ती व्यक्ती माझ्या समोरच जिन्यावर बसून होती..

छातीत सॉल्लिड धडधडत होते. वाटत होते हृदयाचे ठोके तर नाही ना त्याला ऐकू जाणार?

“पण नशिबाने तसे काही घडले नाही. त्या व्यक्तीच लक्ष घरातून येणाऱ्या आवाजाकडेच लागले होते. बऱ्याच वेळ कानोसा घेतल्यावर शेवटी कसलीशी खात्री पटताच ती व्यक्ती तळघराचे दार उघडून घरात घुसली.. क्षणार्धात धाडकन गोळीचा आवाज आला आणि पाठोपाठ कुणाच्यातरी पडण्याचा.. पाठोपाठ दुसऱ्या माणसाची प्रचंड वेदनेची किंकाळी आणि मग सर्व शांत..

आधी वाटलं तुला पण ठोकलं काय..

तळघराचे दार उघडेच होते.. त्यामुळे मला सर्व स्पष्ट दिसत होते आणि ऐकू येत होते.. थोड्या वेळाने ती व्यक्त्ती तळघराच्या दाराशी आली.. सोबत शैला होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलेही भीतीचे भाव नव्हते. ते दोघे जण एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या बोलण्यात तुझं नाव आलेलं ऐकलं.. पेट्रोल पंप वगैरे ऐकलं .. त्यावरून बहुदा तूच तो पेट्रोल पंप लुटायला गेला असणार असा अंदाज बांधला..

शैला त्याला स्वतःला मारण्याबद्दल सांगत होती..

आय एम टेलिंग यु करण .. ती बाई ठार वेडी आहे.. तिच्या नादी लागू नको ..

“तू बघितलंस त्या माणसाला?”, करणने मोहीतला मध्येच थांबवत विचारले

“हो बघितले.. काळाभिन्न होता तो, शरीर कमावलेले होते एखाद्या बॉडीबिल्डर सारखे. मानेपर्यंत आलेल्या केसांचा छोटा पोनी बांधला होता.”, मोहित आठवून त्याचे वर्णन करत होता..

“ओके, मग पुढे?”
“मग त्यांनी तळघराचे दार लावून टाकले आणि बाहेरून कडी लावली. बहुदा ती व्यक्ती आता आत येणार नव्हती..”

माझी सॉल्लिड फाटली होती.

मी मागे वळलो आणि सावकाश सावकाश अंदाज घेत पुढे जात राहिलो आणि शेवटी मला बाहेर पडायचा तो मार्ग सापडला.

“बाहेर कुठे निघाला तो तळघरातला रस्ता?”
“साधारण तो जो पूल आहे ना त्याच्या पुढे झाडांमध्ये एका ड्रेनेज पाईप लाईनला तो रस्ता मिळतो तिथून बाहेर निघालो. बाहेर आल्यावर आपल्या पंटर लोकांना फोन केला. मिट्ट काळोख होता बाहेर. गुडघा, पाठ सगळं ठणकत होते. डास, जखमेवर माश्या बसून अजून वाट लागली होती. एकदा वाटलं जावं पळून इथून कुणाच्या फंदात न पडता. पण साला तुझ्यासाठी जीव अडला. त्या दिवशी तू मध्ये पडला नसतास तर शैलाने नक्की ठोकले असते मला. शिवाय तू इशिताचा फ्रेंड. ती कधी बोलली नाही मला, पण तिला तू आवडत होतास हे नक्की.. “

काही क्षण शांतते गेले..

“पंटर लोक कार घेऊन न्यायला आले.. एकाला तिथेच फार्म-हाउसपाशी थांबवला .. आणि दुसऱ्याल पिटाळलं पेट्रोल पंपावर.. तुझ्या मागे.. मी दवाखान्यात होतो तेंव्हा त्याने फोनवरून तिकडे झालेला राडा कळवला.

मला असे वाटत होते कि तू ती कॅश घेउन फार्म-हाऊसवर आलास की तो काळ्या तुला पण ठोकणार.. म्हणून मी लगेच पोलिसांना फार्म-हाउसची टीप दिली. नशिबाने कारच्या डिक्कीत काही फेक करंसी पडली होती, तीच घेऊन तुझ्या नावाने एकाला पाठवला स्टेशन वर..

पोलीस फार्म-हाउसवर पोहोचले, पण तो काळ्या साला आधीच सटकला होता.. किंवा तळघरात तरी लपून बसला होता.”

“फेक करंसी? पण पोलिसांना कळेलच कि. माझ्या मागे येतील कि ते मग..”
“डोन्ट वरी . जशी ती बॅग पोलीस स्टेशनला पोहोचली, तशीच ती गायब पण झालीय. बसलेत सगळे मामू लोक शोधाशोध करत आणि एकमेकांवर आरोप करत..” हसत हसत मोहीत म्हणाला

करणला मोहितचे किती आणि कसे आभार मानावेत हेच लक्षात येत नव्हते. कोण जाणे, कदाचित मोहीतला जे वाटले ते खरे पण असू शकत होते. पेट्रोल-पंपावरून परत आल्यावर तो जो कोणी होता त्याने करणला पण मारून टाकले असते.

“मोहीत .. तू अजून काय सांगू शकशील त्या तळघरातल्या माणसाबद्दल?”
“सॉरी बॉस .. अधिक काहीच माहित नाही. तळघरातल्या अंधारात त्याच्याबद्दल काहीच कळत नव्ह्ते. जे काही २-४ मिनिटं तो मला दिसला तेव्हढच..”
“नो वरी .. तुला नसली तरी शैलाला नक्कीच त्याची माहिती असणार.. “, करणने भिंतीवरच्या घड्याळात नजर टाकली ४.३० वाजले होते. करणकडे अजून दोन तास होते.

“चल मला निघायला हवं.. अपोलो हॉस्पिटल.. शैलाला भेटायला हवे. “
“अपोलो हॉस्पिटल? तिथे जाऊन काय करणार, शैला नाहीए तिथे.. तिला तीच्या घरी हलवलंय.. “
“घरी? कुणी? आणि का? ती तर सिरीयस कंडिशन मध्ये आहे ना?”
“बरोबर.. पण ह्या श्रीमंत लोकांना काय अवघड आहे? कसली कसली यंत्र तिच्या घरी न्हेलीत, शिवाय २४ तास नर्स, डॉक्टर आहे… दारात ऍम्ब्युलन्स उभी आहे इमर्जन्सी साठी.. “
“पण घरी का?”
“संदीपने हलवलंय तिला घरी.. अपोलो हॉस्पिटल मध्ये म्हणे तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. घरी सेक्युरिटी दिलीय, सर्व व्यवथा चोख आहे.. “
“संदीप?? पण त्याला काय घेणं शैलाशी?”
“ते आता फक्त संदीपचा जाणो.. “, मोहित हात हवेत उडवत म्हणाला

“तसंही तू शैलाला भेटून काय उपयोग, तिची मेमरी गेली ना म्हणे?”, मोहित पुढे म्हणाला
“काय माहित.. मला तर तिचं सगळंच नाटकी वाटतं.. आणि तू म्हणतोस तसं तो काळ्या आणि शैला एकमेकांना ओळखत होते.. शिवाय शैलानेच त्याला तिला मारायला सांगितले होते.. मला तर आता खात्रीच आहे कि हे सगळं नाटक आहे.. “
“पटतंय मला, पण ह्याची खात्री कशी करणार? शिवाय तू दवाखान्यातून उघड तिच्या घरी तर जाऊ शकत नाहीस, निदान उद्याचा दिवस तुला डिस्चार्ज मिळे पर्यंत तरी..

“बरोबर. मी नाही जाऊ शकत पण.. “, मोहितकडे हसून बघत करण म्हणाला…
“नो.. नाही.. नेव्हर.. आपलं कर्ज इथे उतरलं आहे.. तुला शक्य तेव्हढी मदत केली.. आता तू तुझ्या मार्गे, मी माझ्या.. तुला आधीच सांगितले होते.. परत सांगतोय.. तू ह्या भानगडीत पडू नकोस, हे तुझे साडे चार लाख.. उद्या डिस्चार्ज मिळाला की इथून बाहेर पड. निघून जा इथून.. “, मोहीत खुर्चीतून उठत म्हणाला
“येस.. तुझे उपकार आहेतच माझ्यावर पण प्लिज.. हे शेवटच काम समज .. प्लिज.. “
“नाही करण .. मला नाही पडायचंय ह्याच्यात.. मला माझा गुडघा ठीक करायचाय आणि इथून सटकायचंय.. उगाच भरीस नको पाडूस मला.. “
“जिने इशिताला मारलं, तिला इतक्या सहज सोडून द्यायचं मोहित?”, अचानक गंभीर होत करण म्हणाला

इशिताचे नाव ऐकताच मोहीत स्तब्ध झाला.. “आपल्या धंद्यात असे इमोशनल होऊन चालत नाही करण .. पण ठीके.. हे लास्ट.. बोल काय करू शकतो?”
“उद्या शैलाच्या घरी जा.. “
“इतकं सोपं वाटलं तुला? तुला आधीच सांगितले बाहेर सेक्युरिटी आहे.. “
“सोपं असतं तर कुणालाही सांगितले असते मी.. मला माहिती आहे तू करू शकशील.. फक्त एकदा तिच्या समोर जा.. बघ ती तुला ओळखतीय का.. त्यावरूनच कळेल हे मेमरी लॉस खरंच आहे का नाटक.. हे नाटक असेल तर बाकीचं माझ्यावर सोड.. तू तुझ्या मार्गे, मी माझ्या मार्गे.. “

करणने शेख-हॅंड्ससाठी हात पुढे केला..

मोहीतने थोडा विचार केला आणि करणशी हातमिळवणी करत म्हणाला.. “डन ..!!!”

 

दुसरा दिवस करणसाठी संयम बाळगण्यातच गेला. मोहीत गेला असेल का शैलाच्या बंगल्यावर, त्याची भेट झाली असेल का? का गेटवरुनच परत पाठवले असेल? शैला खरंच आजारी असेल का हे सगळे एक नाटक असेल?

एक ना दोन, अनेक प्रश्नांनी करणच्या डोक्यात घर केले होते.

मोहीतने करणला भेटायला हॉस्पिटलवर येण्यापेक्षा किंवा फोनवर बोलण्यापेक्षा, संध्याकाळी करणला डिस्चार्ज मिळाल्यावर रात्री उशिरा इथेच करणच्या ऑफिसवर भेटायचे ठरले होते. त्यानुसार डिस्चार्ज मिळताच करण तडक ऑफिसवर गेला. रात्री १२-१ पर्यंत तरी मोहीत येणार नव्हता. तेव्हढ्या वेळात त्याने सुरुवातीपासून जे काही घडलं ते सगळं खरं खरं संदीपच्या एका कॅसेट मध्ये रेकॉर्ड करुन ठेवले. अर्थात त्यात त्याने मोहीतने तळघरातून पाहिलेला तो माणूस, शैलाशी त्याची असलेली ओळख वगैरे वृतांत वगळला होता.

मोहितशी बोलल्यावर आणि शैलाबद्दल कळल्यावरच संदीपला सगळं खरं सांगायचं का दुसरं काही हे ठरवून तो दुसरी कॅसेटही रेकॉर्ड करणार होता आणि मग त्याचप्रमाणे दोन पैकी एक कॅसेट संदीपला देणार होता.

साधारण रात्री १२.३० ला मोहीत करणच्या ऑफिसवर आला.

“बोल काय झालं? भेट झाली? कसा गेलास आतमध्ये? कशी आहे शैला?”, मोहीत खुर्चीवर बसायच्या आधीच करणने प्रश्नांचा भडीमार चालू केला

“भेट झाली.. “, मोहीत खुर्चीत बसत म्हणाला
“आत कसा गेलास.. ?”
“सोप्प होतं, अपोलोमधून आलोय सांगितले, शैला मॅडमसाठी लावलेल्या एका मेडीकल इंस्ट्रुमेंट्सच्या बॅटरी बदलायच्या आहेत म्हणल्यावर सोडले.. “
“सही… शैला बोलली काही? तिने ओळखले तुला?”
“एक नंबरची डामरट बाई आहे ती.. मी गेलो तेंव्हा जागीच होती.. क्षणभर माझ्याकडे बघितले आणि मग दुसरीकडे नजर वळवली. चेहऱ्यावर जराही ओळखीचे भाव नव्हते.”, मोहीत
“ओह.. म्हणजे संदीपकडून ऐकले ते खरं आहे तर? खरंच तिचा मेमरी लॉस झालाय म्हणायचं.. “
“नाही.. ते सगळं नाटकच आहे..”
“कश्यावरुन?”
“तिने चेहऱ्यावरून जरी नसले दाखवले तरी शेजारची मेडिकल इंस्ट्रुमेंट्स खोटं बोलणार नाहीत. ज्या क्षणी तिने मला बघितले त्या क्षणी त्या मॉनिटरवर तिचे हार्ट-बिट्स वाढल्याचे स्पाईक्स दिसले.. पल्स का काय ते.. भले काही सेकंद असेल पण तिने मला ओळखले होते ह्यात तिळमात्र शंका नाही.. “, मोहीत स्वतःच्या हुशारीवर खुश होत म्हणाला

करण खुर्चीतून उठला आणि त्याने रेकॉर्डर मधली ती कॅसेट काढून मोहीतला दिली.. “ह्यात जे काय घडलं, जसं घडलं, सगळं जसच्या तसं रेकॉर्डेड आहे.. उद्या मला काही झालंच तर ही रेकॉर्ड आणि तळघरातला तुझा अनुभव कसंही करुन विक्रमपाशी पोहोचव “

“ए बाबा.. मला नको ह्यात अजून ओढूस .. हे शेवटची मदत मला म्हणाला होतास, म्हणून आणि इशितासाठी म्हणून केली.. आता तू तुझ्या मार्गे आणि मी माझ्या.. “

“नक्कीच.. पण हि कॅसेट मला माझ्याकडे नकोय.. ती सुरक्षित रहायला हवी..
तू म्हणाला तसं ही शैला दिसती तशी नाहीए. ह्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. शेखरचा मृत्यू जरी हार्टफेलने झाला असेल तरी शैलाकडून घडलेले ते कृत्य एक अपघात होता असे वाटत नाहीए, तिने ते कृत्य त्याला जाणून-बुजून ठार मारण्यासाठीच केले असणार… तो काळ्या .. त्याचा शोध लावायला हवा.. पण तो मुख्य सूत्रधार असेल असे वाटत नाही. शैला आणि तो काळ्या बरोबर ह्यात अजून कोण तरी नक्कीच सामील आहे.. आणि तेच मला शोधून काढायचं आहे.. “

“ऑल द बेस्ट, जे करशील ते जपून कर .. “, असं म्हणून मोहीतने करण कडून ती कॅसेट घेतली आणि तो निघून गेला….

[ क्रमशः ]

इश्क – (भाग २८-बोनस)


भाग २७ पासून पुढे>>

कबीरच्या मनाची स्थिती सांगता येण्यापलीकडची झाली होती. एका बाजुला राधाला गमावल्याचं दुःखं होतं तर दुसरीकडे उर्वरीत पूर्ण आयुष्यभर लाभणार्‍या रतीच्या साथीचं सूख.

कबीरला हा क्षण अजरामर करायचा होता. त्याच्या ह्या विचीत्र वागण्याचा जितका त्रास त्याला झाला होता तितकाच नक्कीच रतीला ही झालेला होता ते तो जाणून होता.

पण कसं?
काय करावं?

त्याला काहीच सुचत नव्हतं.

तो डोळे मिटून स्टेअरींगवर डोकं ठेवुन बसला होता इतक्यात खिडकीच्या काचेवर टकटक झाली म्हणुन त्याने दचकून डोळे उघडुन बघीतले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

समोर राधा उभी होती.

“राधा.. तु??”, दार उघडून बाहेर येत कबीर म्हणाला..
“हो.. मी आले परत…”
“परत???? म्हणजे???”, कबीर संभ्रमात पडत म्हणाला..
“घाबरु नकोस.. परत म्हणजे तशी नाही परत आलेय मी.. परत म्हणजे.. मी उतरले पुनमच्या गाडीतुन आणि परत आले.. काही सुचलं नसेल ना? रतीला कसं प्रपोज करायचं?”

कबीर कसनुसं हसला..

“मला माहीती होतं.. डोंन्ट वरी.. मी हेल्प करते तुला…”
“तु? तु कशी हेल्प करणार मला..”
“हे बघ.. टुरीझम इंडस्ट्रीमध्ये एक गोष्ट शिकले मी.. लोकांना त्यांच्या मुळ ठिकाणी जायला जास्ती आवडतं.. किंवा असं ठिकाणं जेथे त्यांच्या आठवणी असतात… तुझ्या बाबतीत..तुझी आणि रतीची पहीली भेट..”

“मला सांग.. तुझी आणि रतीची पहीली भेट कुठे आणि कशी झाली?”
“अं.. मॅरीएट मध्ये.. टॉप-फ्लोअरला, ‘पाशा’ रेस्तॉरंट आहे.. तेथे…”
“चं.. असं अर्धवट नाही.. मला सगळ हवंय पहील्यापासुन.. तिने काय घातलं होतं.. कुठे बसला होतात.. सगळं.. बारीकसारीक तपशील हवेत…”
“ओके.. सांगतो..”, असं म्हणुन कबीरने तो प्रसंग जश्याच्या तसा राधाला ऐकवला..

“पिवळी लिलीची फुलं.. अं.. मॅनेज होउ शकतील.. कॅंम्पमध्ये एक फ्लॉवरीस्ट आहे.. रात्रभर चालु असतो तो.. तिनं काय घातलं होतं म्हणालास? मरुन रंगाची साडी?? अं मला वाटतं.. तो त्यांचा ड्रेस-कोडंच असावा.. मॅरीएटचा.. ना?”
“मला काय माहीती.. मी थोडं नं तेथे काम करतो.. पण.. मला कळत नाहीए.. तुझ्या डोक्यात काय शिजतेय??”

“थांब रे.. डिस्टर्ब नको करुस…”

राधा आपल्याच विचारात मग्न होती, तर कबीर अस्वस्थपणे इकडून-तिकडे येरझार्‍या घालत होता..
“गॉट इट.. चल.. मॅरीएटला जाऊ आपण..”, गाडीत बसत राधा म्हणाली..

“मला कळलं असतं तर…”, पण राधाने चिडून कबिरकडे बघीतलं तसं कबीर काही न बोलता गाडीत बसला.
“ठिके.. नाही विचारत.. पण हे सगळं तु का करतीएस..? इतकं चांगलं नसतं अगं कुणी ! आत्ताच आपला ब्रेक-अप झालाय आणि तु माझ्यासाठी.. रतीसाठी हे सगळं प्लॅन अरतीएस..”

“मग काय झालं..? हे बघ.. मी जेंव्हा इटलीवरुन परत आले.. परत कश्याला.. तिकडे असतानाच तु जे फोटो पाठवत होतास.. त्यावरुनच मला कळत होतं की तुझ्या-आणि रतीमध्ये काही तरी आहे.. पण मी काय केलं?? कसलाही विचार न करता मी घुसले मध्ये तुमच्या दोघांच्या.. आणि तु ही वेड्यासारखा तिला सोडुन आलास माझ्या मागे.. खरं सांगू? रती नसती ना.. तर कदाचीत मी तुला लग्नाचं विचारलंही नसतं.. पण तिला तुझ्याबरोबर.. तुला तिच्याबरोबर बघुन खूप जेलस फिल झालं.. वाटल्ं.. आजवर जो इतके दिवस आपल्या मागे होता.. आज तो दुसर्‍या कुणाबरोबर.. ”

राधा काहीवेळ शांत झाली आणि मग एक दीर्घ उसासा घेऊन म्हणाली, “आपलं मन.. आपलं हृदय एक वेगळंच रसायन आहे रे.. ते कधी, कसं वागेल कुणीच सांगू शकत नाही ना..
तु मला गोकर्णला पोलिसांच्या तावडीतुन सोडवलंस.. तेंव्हा मी तुला म्हणाले होते.. ‘आय ओ यु अ बिग थिंग..’ आज समज मी त्याची परतफ़ेड करतेय..”

“राधा.. कदाचीत मी तुला समजण्यात कमी पडलो.. कधी कधी वाटायंच, तु खूप सेल्फ़ीश आहेस.. दुसर्‍याचा विचार न करता.. स्वतःला हवं ते, हवं तसं करणारी राधा.. पण आज तु मला खोटं ठरवंलस.. इतका त्याग.. कुणीच कुणासाठी करत नाही…”

“सेल्फ़ीश..? आहेचे मी.. पण आपण प्रेम करतो तेंव्हा फ़क्त स्वतःचा विचार काय कामाचा? अनुराग आणि माझ्या नात्यांत आम्ही दोघांनीही फ़क्त आपला-आपलाच विचार केला.. काय साध्य केलं आम्ही? काहीच नाही.. आज तुझा चेहरा बघ.. रात्री एक वाजता सुध्दा रतीकडे जायचं आहे ह्या विचारानेच किती खुश दिसतो आहेस तु.. तुझा हा आनंदच तर मी माझ्या प्रेमात जिंकलाय आज.. मग सेल्फ़ीश कशी नाही मी? आपण दोघं एकत्र असतो तर हा आनंद किती दिवस राहीला असता? अं..”

कबीर काही नं बोलता राधाकडे बघत होता..
काही क्षण शांततेत गेल्यावर त्याने बोलण्यासाठी तोंड उघडले, पण राधा आधीच त्याला म्हणाली.. “प्लिज काही बोलु नकोस. मला माहीती आहे.. तु काय बोलणारेस..आणि आत्ता मला अजुन रडायची आज्जीब्बात इच्छा नाहीए.. सो लेट्स गो..”

कबीरने गाडी मॅरीएटकडे वळवली…

“ओके.. सो फ़र्स्ट थिंग फ़र्स्ट.. आपल्याला बघायचं आहे की मरुन साडी मॅरीएटचा ड्रेसकोड आहे की नाही..”, राधा फोनवर काही तरी शोधता शोधता म्हणाली.. “त्यासाठी आपल्याला आधी मॅरीएटला जावं लागेल.. तो पर्यंत मी पिवळ्या लिलींचा बंदोबस्त करते…”

रात्रीचा मोकळा रस्ता.. त्यात कबीर अंगात वारं भरल्यासारखा उत्साहाने भरलेला होता. १२०च्या वेगाने तो पंधरा मिनिटांतच तो मॅरीएटपाशी पोहोचला..

“गाडी बाहेरच लाव, आपल्याला लगेच जायचं आहे..”, गाडीतुन उतरत राधा म्हणाली..
“ओके..” असं म्हणून कबीरने कार रस्त्याच्या कडेलाच उभी केली आणि दोघंही पोर्चमधुन आतमध्ये आले.

रिसेप्शनला नाईट-ड्युटीसाठी दोन तीन तरुण मुली त्या दिवशी रतीने घातली होती तश्शीच मरुन रंगाची साडी नेसुन बसल्या होता..

“दे टाळी..”, हात पुढे करत राधा म्हणाली..
“आता तरी सांगशील प्लिज.. विचार करुन करुन डोकं भणभणायला लागलेय..”, कबीर म्हणाला..
“सांगते.. आपण रतीला इकडे बोलवायचं आहे आत्ता…”, राधा रिसेप्शनकडे जात म्हणाली..

“आत्ता? अगं वेडी झालीएस का? रात्रीचा दीड वाजत आलाय..” मनगटातलं घड्याळ राधाच्या डोळ्यापुढे नाचवत कबीर म्हणाला.
पण राधाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती रिसेप्शनला गेली..

“एक्सक्युज मी..”, टेबलावर आपली नेल-आर्टची बोटं वाजवत राधा म्हणाली..
“येस मॅम? हाऊ मे आय हेल्प यु?”, यांत्रीकी आवाजात समोरच्या तरुणीने विचारलं..
“अं.. तुमचं पाशा रेस्तॉं.. कधी पर्यंत चालु असतं..?”
“सॉरी मॅम.. इट्स क्लोज्ड नाऊ..”
“अं.. मिडनाईट बफ़े.. असतो ना चालू पण?”
“हो.. असतो चालू… पण १२-१च वेळ आहे त्याची…”
“अं.. फ़क्त तासाभरासाठी.. नाही का चालू करता येणार..”
“सॉरी मॅम.. किचन पण बंद झालं..”
“ठिके.. पण निदान कॉफ़ी.. चॉकलेट केक.. इतपत तरी मिळु शकेलच की..”
“सॉरी मॅम..”

“अं.. तुम्ही रतीला ओळखता?”
“रती? डे-शिफ़्टला असते ती ना? हो.. म्हणजे अगदी जवळची ओळख नाही.. पण माहीती आहे…”
“कुल.. तो मागे उभा आहे.. तो दिसतोय..?” कबीरकडे बोट दाखवत राधा म्हणाली..
“हम्म.. कोण आहे तो?”
“ही इज अ वेल नोन रायटर..कबीर.. आत्ताच त्याचं पुस्तकाचा पहीला भाग येऊन गेला.. इश्क..”
“रिअल्ली… येस्स.. मी वाचलं नाहीए ते पुस्तक.. पण ऐकलंय..”, एस्काईट होऊन ती तरूणी म्हणाली.. “बरं मग..?”
“तुम्ही जर पाशा एक तासभर चालु ठेवलंत.. तर त्याच्या पुस्तकाच्या पुढच्या भागाचं पब्लीकेशन तो मॅरीएटमध्ये करेल. बघा.. कित्ती पब्लीसीटी होईल…”
“पण.. त्याचा पाशाशी काय संबंध? आणि रतीचं काय?
“ही इज गोईंग टु प्रपोज रती टुनाईट..पाशामध्ये..”

“आत्ता? इतक्या उशीरा” वॉव्व.. हाउ रोमॅन्टीक अ‍ॅन्ड थ्रिल्लींग.. पण पाशामध्ये का?”
“आता ते सगळं तुला पुस्तकाचा पहीला आणि नंतर पब्लीश होणारा दुसरा भाग वाचल्यावर कळेल.. आणि नावं काय तुझं?” छातीला लावलेल्या छोट्याश्या बोर्डवरचं नाव वाचण्याचा प्रयत्न करत राधा म्हणाली..
“रोहीणी..”
“रोहीणी, इफ़ यु हेल्प हीम नाऊ.. तुझं नाव येईल त्या पुस्तकात.. धिस मोमेंट इज द क्लायमॅक्स.. अ‍ॅन्ड यु आर गोईंग टु प्ले अ व्हेरी इंपॉर्टंट रोल इन इट…”

राधाने योग्य जागी तिर मारला होता… रोहीणी विचारात पडली…

“मॅम.. मला परमीशन घ्यावी लागेल… आणि इतक्या रात्री आत्ता सरांना फोन करणं..”
“अगं कश्याची परमीशन? तुला फ़क्त चार दिवे लावायचे आहेत टेरेसवरचे.. थोड्या कॅन्डल्स.. दॅट्स इट.. कॉफ़ी.. चॉकलेट केक… हु केअर्स…”

“ओके डन मॅम.. हु केअर्स… आय विल अ‍ॅरेंज..”
“गुड.. आता दुसरं काम.. रतीला आत्ता फोन करायचा इथल्याच नंबरवरुन आणि मी सांगते ते सांगायचं.. ओके?”
“येस्स मॅम..”

रोहीणीला एकुणच तो क्लायमॅक्स प्रसंग.. आपली महत्वाची भुमीका वगैरे आवडलं होतं.. ती राधा जे सांगेल ते सगळं करायला तयार होती..

राधाने तिला सगळं समजावुन सांगीतलं आणि मग ती कबीरकडे गेली आणि म्हणाली.. “रती येईल.. तोपर्यंत आपण ते पिवळी लिली घेऊन येऊ.. चल..”

राधा आणि कबीर बाहेर पडले तेंव्हा रोहीणी रतीचा नंबर फ़िरवत होती.

रती झोपायचा अतोनात प्रयत्न करत होती, पण काही केल्या झोप लागतच नव्हती. शेवटी कॉफ़ी करावी म्हणुन ती अंथरुणातुन उठली तोच तिचा फोन वाजला.
मॅरीएटचा नंबर बघुन तिला आश्चर्यंच वाटलं..

“हॅल्लो?”
“हॅल्लो.. रती ना? मी रोहीणी बोलते.. मॅरीएट डेस्क..”
“हा रोहीणी.. काय झालं? इतक्या रात्री फोन केलास…”
“सॉरी यार.. तुझी झोपमोड केली.. पण कामच तसं महत्वाचं आहे…”
“हम्म.. इट्स ओके.. बोल..”
“रती.. अगं आत्ता सरांचा फोन आला होता.. इथे पाशामध्ये एका मराठी मुव्हीचा सिन शुट होणारे.. १०-१२ लोकांचा क्रु येणारे… तर तुला यावं लागेल इकडे .. जास्त वेळ नाही.. एक तासभर तरी..”
“आत्ता.. ?? अगं नाही जमायचं.. अर्धवट झोप झालीए…”
“सॉरी यार.. बट कान्ट हेल्प.. सर पण निघालेत यायला.. ते म्हणाले.. निट सपोर्ट करा त्यांना.. पाशा पण चालु केलंय आत्ता..”
“शट्ट यार.. काय मुर्खपणा आहे.. थांब मी बोलते सरांशी..”
“त्यांची बॅटरी डाऊन आहे.. ते ऑन-द-वेच आहेत.. म्हणुन तर मी केला नं फोन… प्लिज.. तु ये ना.. नेमकी मेरी पण ऑफ़ आहे आज.. मी कॅब बुक करते तुझ्यासाठी.. तुझं आवरुन होईपर्यंत येईल घरापाशी…”

रतीला तशीही झोप येत नव्हती.. शुटींगवगैरे तेव्हढीच करमणुक होईल म्हणुन ती तयार झाली..

“हे बघ.. आणि रेग्युलर आपला ड्रेसच ए हा.. मरुन साडी घालुन ये… बाय फ़ॉर नाऊ.. आणि खरंच सॉरी…”
“नो प्रॉब्लेम डिअर… कॅबचा नंबर एस.एम.एस. कर.. बाय..”

रतीने खोलीतला लाईट लावला.. तोंडावर पाणी मारुन फ़्रेश झाली आणि हलकासा मेक-अप करुन ती तयार झाली..
रतीच्या खोलीतल्या आवाजाने तिच्या आईला जाग आली होती.. ती वरती खोलीत काय गडबड बघायला आली..

“झोप आई तु.. काही विशेष नाही.. मी जरावेळ ऑफ़ीसला चालले आहे..”, असं म्हणुन रतीने तिला थोडक्यात कल्पना दिली. तोपर्यंत कॅब दारापाशी येऊन थांबली होतीच..

“काळजी करु नकोस.. मी येते २ तासात.. झोप तु.. बाय..”, असं म्हणुन रती घराबाहेर पडली..

“दादा.. जरा फ़्रेश द्या की फुलं..”, कबीर त्या फ्लॉवरीस्टशी वाद घालत होता..
“अहो. फ़्रेशच आहेत.. हे घ्या.. हे काढुन.. ही दोन घालतो झालं?”

इतक्यात राधाचा फोन वाजला..

“रती निघालीए घरातुन.. कॅब मध्ये आहे..”, रोहीणी..
“मस्त.. फ़ार भारी काम केलंस तु.. आता ते वरचं…”, राधा
“येस्स.. लोकांना लावलंय कामाला.. बट यु बेटर हरी अप.. रती २० मिनीटांत पोहोचेल…”
“येस्स.. निघालोच आम्ही..”, असं म्हणुन राधाने फोन ठेवुन दिला..

“कबीर.. चल.. रती निघालीए घरुन..”, कबीरला घाई करत राधा म्हणाली
“अगं हो.. पण ही फुल..”, कबीर..
“हायपर नको होऊस कबीर.. छान आहेत फुल… दादा.. एक मस्त रिबीन लावुन टाका फुलांना…”, असं म्हणुन राधाने पैसे दिले आणि फुलांचा गुच्छ घेऊन कबीरला ओढत गाडीत बसवले..
“चल लवकर.. तुमच्या मॅडम पोहोचायच्या आधी आपल्याला पोहोचायचं आहे..”

कबीरने गाडी वळवली आणि तो वेगाने मॅरीएटकडे निघाला..

कबीर-राधा पोर्चमध्ये पोहोचले तेंव्हा रोहीणी अस्वस्थपणे येरझार्‍या घालत होती…
“हाऊ मच मोर टाईम”, राधाने धावत धावतच जाऊन तिला गाठलं आणि विचारलं..
“जस्ट जि.पी.एस. चेक केलं.. जास्तीत जास्त ५ मिनिटं.. पोहोचतीच आहे कॅब..”, रोहीणी म्हणाली..
“ओके.. चल वरती बघु काय काय झालंय..”, राधा

कबिरला काहीही सुधरत नव्हते.. झपाटल्यासारखा तो नुसता राधाच्या मागुन चालत होता.

तिघेही जणं लिफ़्टने अकराव्या मजल्यावरच्या टेरेसवर पोहोचले..

रंगेबीरंगी मंद दिव्यांच्या माळांनी पाशाचा टेरेस प्रकाशला होता..
बरोब्बर तेच टेबल जिथे रती आणि कबीर पहील्यांदा भेटले होते ते सजवले होते.. दोन कॅंन्डल टेबलावर लावलेल्या होत्या..

“टेबलाची जागा हीच आहे ना?”, राधाने विचारले..
“येस.. येस्स. हीच जागा..”, कबीर मान डोलावत म्हणाला..

इतक्यात रोहीणीच्या वॉकी-टॉकीवर मेसेज आला.. “रोहीणी.. रती आलीए.. काय करु?”

रोहीणीने प्रश्नार्थक नजरेने राधाकडे बघीतले.
“वरती यायला सांग…”, राधा खुणेनेच म्हणाली..

रोहीणीने तिला थंम्ब्स अपची खुण केली आणि तिने रतीला वर पाठवायला सांगीतले..

“ओके… कबीर.. तु इथे लपुन बस.. रती आली की आम्ही तिला इथे बसायला सांगणारे… आणि आम्ही निघुन गेलो की इट्स ऑल युअर्स.. तुला जे काय करायचं ते कर ओके..”, राधा भराभरा बोलत होती..
“राधा प्लिज.. मला तु हवीएस इथे.. तु.. तु थांब ना इथेच लपुन..”, कबीर म्हणाला..
“अरे वेडा एस का.. मला नाही बघायचंय तुमचं प्रणय.. आम्ही आपलं जातो… आणि हो.. रतीला कळता कामा नये.. मी इथे होते.. ओके??” रोहीणी आणि कबीरकडे बघत राधा म्हणाली…
“पण राधा…”
“गो…उद्या मला फोन करुन सांग काय झालं..मी पळतेय घरी.. बाय अ‍ॅन्ड ऑल-द-बेस्ट”,.. टेरेसच्या लिफ़्टपाशी लिफ़्ट थांबल्याचा आवाज आला तसं राधा कबीरला दुसरीकडे ढकलत म्हणाली… आणि स्वतः सर्व्हीस लिफ़्टकडे निघुन गेली..

कबीर थोड्याश्या अंधारलेल्या कोपर्‍यात उभं राहुन बघत होता. लिफ़्टचा दार उघडुन रती टेरेसवर आली तसं त्याच्या अंगावर सरसरुन एक काटा आला…. त्या थंडीतही त्याचे कान.. हात.. पाय गरम झाले..

“रोहीणी.. बोल.. काय सिन आहे..”, रतीने रोहीणीला विचारले..
“हम्म.. २० मिनिटांत टीम पोहोचतेय त्यांची.. इथे टेरेसवरच करणारेत शुट… अं.. त्यांनी फ़्लोवर प्लॅन पाठवलाय तसं इथे मांडणी करायची आहे.. बरं झालं तु आलीस रती..मला सॉल्लीड टेंन्शन आलं होतं..”, रोहीणी म्हणाली..
“टेंन्शन? तु तर उगाचच हसती आहेस.. असं वाटलं मला…”
“हसतीए? नाही.. कुठे.. तेच.. टेंन्शनमुळे हसतीए..”, इकडे तिकडे बघत रोहीणी म्हणाली..
“वेअर्ड.. बर कुठे आहे फ़्लोअर प्लॅन..”
“डॅम्न.. मी डेस्कवरच विसरले.. एक मिनीट बस इथेच मी घेऊन येते…”
“आता तु कश्याला जातेस खाली.. वॉकीवर मेसेज दे ना…”
“नको.. कुणाला माहीत नाहीए.. कुठे ठेवलाय.. आलेच ५ मिनिटांत…”
“ओके..”

असं म्हणुन रती ज्या दिशेला कबीर लपला होता तिकडे तोंड करुन बसली..

“अं.. इकडे नाही.. इकडे बस…”, विरुध्द खुर्चीकडे बोट दाखवत रोहीणी म्हणाली..
“काय चाललंय.. इथे काय आणि तिथे काय..”, वैतागुन उठुन दुसर्‍या खुर्चीवर बसत रती म्हणाली..

रतीची आता कबीरकडे पाठ होती..

रोहीणीने हळुच अंदाजाने कबीरच्या दिशेने ऑल-द-बेस्टची खुण केली आणि ती लिफ़्टने निघुन गेली..

त्या टेरेसवर आता रती आणि कबिरशिवाय दुसरं कोणीच नव्हते.. अकराव्या मजल्यावर असल्याने रात्रीच्या वेळी सुटलेल्या बेफ़ाम वार्‍याचा आवाज कानांत भरत होता…
रती आपले केस निट करण्यात मग्न होती.

कबिर दबक्या पावलांनी.. फुलांचा तो गुच्छ पाठीमागे लपवत.. त्याचा आवाज येणार नाही याची काळजी घेत रतीच्या अगदी जवळ गेला..
कबिरचं ह्रुदय सॉल्लीड धडधडत होते..

कबीर रतीच्या अगदी जवळ गेला आणि म्हणाला… “रती..”

रती खाड्कन दचकुन उभी राहीली.. कबीरला समोर बघुन तिला काही सुचेचनाच…
“कबिर?? तु इथे??”

कबीरने पाठीमागे दडवलेला तो पिवळ्या लिलींचा गुच्छ तिच्या समोर धरला आणि म्हणाला.. “एकदा इथेच.. तु मला अश्याच पिवळ्या लिलींचा गुच्छ भेट म्हणुन दिला होतास आठवतंय? हेच टेबल होतं ना ते??”

रतीचे डोळे विस्फ़ारले होते..

कबीर आपल्या गुडघ्यांवर ओणवा झाला..

“नो.. कबिर.. प्लिज..स्टॉप.. निट उभा रहा.. काय करतोएस..”, दोन पावलं मागे सरकत रती म्हणाली..
“तेच.. जे मला खूप आधी करायला हवं होतं..”, कबिर..
“नो कबीर.. यु आर आऊट ऑफ़ युअर माईंड.. हे.. हे सगळं.. तु घडवुन आणलएस? इथे काही शुटींग वगैरे नाहीए.. हो ना?”
“हम्म..”
“धिस इज इन्सेन.. कबीर.. प्लिज उठ आणि घरी जा.. ४ दिवसांनी तुझं राधाबरोबर लग्न आहे.. विसरलाएस का?”
“लग्न आहे नाही.. होतं…”, कबीर रतीच्या जवळ जात म्हणाला..
“होतं? म्हणजे.. कबीर.. तु लग्न मोडुन आलएस?”, रती चिडून म्हणाली..
“नाही… राधा आणि मी एकमेकांच्या संमतीने मोडलेय..”, कबीर
“का? वेडे आहात का तुम्ही?.. राधाचा नंबर दे…आत्ताच्या आत्ता.. काही लग्न मोडलं वगैरे नाहिए..”, मोकळे केस बांधत रती म्हणाली..

फोनसाठी पुढे केलेला रतीचा हात कबीरने सावकाश खाली केला.. मग दुसर्‍या हाताने.. तिने बांधलेले केस हळुवारपणे परत मोकळे सोडले..
“केस बांधत नको जाऊस प्लिज.. अशीच छान दिसतेस..”

“अरे काय चाल्लय.. कबीर लग्न काय खेळ आहे का रे.. असं कसं मोडलंत…”
“आज नसतं मोडलं तर कधी ना कधी मोडलंच असतं रती.. ट्रस्ट मी.. मी एकट्याने नाही मोडलं.. खरं तर.. राधानेच स्वतःहुन विचारलं मला तसं…”
“कधी?”

मग कबीरने काही तासांपुर्वी घडलेला किस्सा तिला ऐकवला…

रती कबीर बोलत असताना टेबलावर डोक्याला हात लावुन बसली होती..
“मग आता मी का? राधा नाही म्हणली तर मी.. आणि मी समजा नाही म्हणले तर? मग परत राधा? की मोनिका? की तिसरं अजुन कोणी…”

कबिर रतीच्या समोर बसला…
“रती…माझ्याकडे बघ… काय दिसतंय तुला?”
“काहीच नाही.. कित्ती अंधार आहे इथे..”, कसंबसं हसत रती म्हणाली..

“मग तु नाही.. आता फ़क्त आणि फ़क्त तुच रती.. मला माहीत नाही मला काय झालंय.. राधा मला आवडायची.. आवडते.. पण तिच्याबरोबर मी आयुष्य नाही घालवु शकत.. मी खुप भरकटलो.. वाट्टेल ते निर्णय घेतले.. खुपजण घेतात.. पण कधीतरी आपल्याला जाणीव होतीच ना खर्‍या प्रेमाची…”, कबीर..
“हो? मग ही अशी अचानक कशी बुवा जाणीव झाली तुला?”, रती
“तु ते तंत्र-मंत्र शिकुन आलीस बहुतेक विपश्यनेला जाऊन.. तेंव्हापासुन जादु झालीए माझ्यावर… तु नसताना मी किती तडपलोए.. तुझ्यासाठी कित्ती आसुसलोय हे कदाचीत कुणीच जाणु शकणार नाही…”

“कश्यावरुन तु उद्या परत निर्णय बदलणार नाहीस?”, रतीने विचारले
“तुला शंका येण सहाजीक आहे.. मी वागलोच आहे तसा.. पण तु वेळ घेऊ शकतेस.. पाहीजे तितका.. मी थांबेन तुझ्यासाठी.. तु माझी पाहीजे ती परीक्षा घे.. फ़क्त नाही म्हणु नकोस प्लिज…”

कबीर पुर्णपणे भावनाविवश झाला होता.. बोलताना त्याचा आवाज कापरा झाला..
तो रतीसमोर मान खाली घालुन उभा राहीला..

रतीने त्याच्या हनुवटीला धरुन त्याचा चेहरा सरळ केला आणि म्हणाली.. “तु मला इतकं तडपवलंस.. मग मी लगेच हो म्हणायचं का?”
कबिर काहीच बोलला नाही..

“कबिर.. राधाला दुखावलं नाहीस ना रे?”, रतीने विचारले
“बिलीव्ह मी रती.. म्युचुअल निर्णय आहे हा.. हवं तर उद्या तु राधाशी बोल उद्या आणि मग निर्णय घे..”
“नाही त्याची आवश्यकता नाही.. माझा विश्वास आहे तुझ्यावर… मी.. हो म्हणेन.. पण एका अटीवर…”
“मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत..”, कबीर क्षणाचाही विलंब न करता म्हणाला..
“अरे.. ऐक तरी आधी…”
“हम्म.. बोल..”
“लग्नानंतर नावं बदलतात ना तुमच्यात पण..”
“हम्म.. का?”
“लग्नानंतर मला पण माझं नाव बदलायचं आहे.. रती नाव बदलुन राधा…चालेल?”

कबीरचे डोळे मोठ्ठे झाले…

“राधा कबीरची नाही झाली असं होता कामा नये.. राधा ही कबीरचीच होती.. मला माहीती आहे.. तु तिला कधीच विसरणार नाहीस.. आणि विसरु पण नकोस.. मलाही विसरायचं नाहीए.. आज तिने माझं आयुष्य मला परत दिलेय.. राधा-कबिर.. हेच नाव योग्य आहे.. बदलशील माझं नाव?”

कबीरने रतीला घट्ट कडकडुन मिठी मारली..

“ए.. आधी प्रपोज कर निट.. “, कबीरला बाजुला ढकलत रती म्हणाली

कबिरने तो दिलेला फुलांचा गुच्छ हातात घेतला आणि पुन्हा गुडघ्यावर ओणवा उभा राहीला..

“अरे.. ती मगाशीच दिलीस ना फुलं? परत तेच गिफ़्ट.. कधी सुधारणार तु…”
“श्शsss…” कबीरने तिला शांत बसायची खुण केली..

“रती…”
“येस्स.. आय लव्ह यु.. आय लव्ह यु… आय लव्ह युssssss……”, मोठ्यांदा ओरडत रती म्हणाली..
रात्रीच्या त्या शांत अंधारात रतीचा तो आनंदाने भारलेला आवाजात आसमंतात भिनुन गेला…

कबीरने हातातली ती फुल हवेत उंच उडवली आणि रतीला मिठीमध्ये घेतले…

तिघांच्या ही डोळ्यांतुन अश्रुंच्या धारा लागल्या होत्या.. रती, कबीर आणि ह्या दोघांपासुन अनभिज्ञ, दुर अंधारात सर्व्हिस-लिफ़्टच्या कोनाड्यात लपुन हे दृश्य पहात असलेल्या राधाच्या…

[समाप्त]

इश्क – (भाग २७)


भाग २६ पासुन पुढे>>

“वुई-आर गेटींग मॅरीड…”, फुल्ल एनर्जीने राधा पुन्हा एकदा म्हणाली, पण रोहन आणि मोनिका शॉक लागल्यासारखे आधी एकमेकांकडे तर एकदा कबीर-राधाकडे बघत होते.
“आर यु नॉट हॅप्पी?”, राधा काहीसे चिडून रोहनला म्हणाली..

“येस.. येस.. वुई आर.. पण हे कधी ठरलं?”, रोहन..
“आत्ता.. जस्ट.. काही मिनीटांपुर्वी…”, कबीर..
“पण राधा.. तुच लग्नाला तयार नव्हतीस ना.. तुला तुझं करीअर.. तुझं स्वातंत्र्य.. तुझ्या टर्म्स अ‍ॅन्ड कंडीशन्स…!”, रोहन
“वुई विल वर्क इट आऊट.. कॉम्प्रमाईज तर करावं लागेलचं ना.. थोडं मला.. थोडं कबीरला.. पण आम्ही दोघंही त्यासाठी तयार आहोत..”, कबीरचा हात हातात घेत राधा म्हणाली..
“पण.. तु आधी तर पुर्ण विरोधातच होतीस ना?”, मोनिका..
“होते.. आता नाही.. सो?”,खांदे वाकडे करत राधा म्हणाली.. “थिंग्स चेंज.. पिपल चेंज.. प्रायोरीटी चेंज..”
“तु आई-बाबांशी बोललास कबीर?”, रोहन..
“नाही..अजुन तरी नाही.. बोलेन मी..लवकरच..”, कबीर
“आणि ते तयार नाही झाले तर..”, मोनिका..
“हॅंग ऑन… आम्हाला आमच्या लग्नात काही प्रॉब्लेम दिसत नाहीत.. मग तुम्हीच का एव्हढे हायपर होताय..?”, काहीसं त्रासीक होत राधा म्हणाली..

मोनिकाने काही तरी बोलण्यासाठी तोंड उघडलं.. पण रोहनने हळुच तिचा हात दाबुन तिला गप्प केलं..

“हो.. ते ही खरं आहे म्हणा.. गुड.. वुई आर हॅप्पी फ़ॉर यु..”, रोहन खुर्चीतुन उठत म्हणाला.. “एनीवेज.. कॅरी ऑन.. आम्ही निघतो…”
“अरे पण तुम्ही एव्हढं घाई-गडबडीने आलात कश्याला होतात..”, कबीरने विचारलं..
“अं.. हं… आम्ही पिक्चरला जायचं का विचारायला आलो होतो.. पण जाऊ देत आता.. ऑलरेडी उशीर झालाय.. अन ट्रॅफ़ीकमधुन जाईपर्यंत शो सुरु होऊन जाईल…”, रोहनने हळुच मोनिकाला निघायची खुण केली..

दोघंही जायला निघाले तसं कबीरही उठला आणि त्याने रोहनला मिठी मारली..

“आय होप यु नो व्हॉट यु आर डुईंग..”, रोहन हळुच म्हणाला आणि मग राधाला बाय करुन तो आणि मोनिका बाहेर पडले..

                                                                                **********************

 

“सो?”, रोहन आणि मोनिका गेल्यावर राधा कबीरच्या मिठीमध्ये समावत म्हणाली.. “शेवट मिळाला तर तुला तुझ्या पुस्तकाचा…”
“फायनली…”, कबीर हसत हसत म्हणाला..

“आपलं आयुष्य कित्ती डायनामीक असतं नै? सकाळी उठलो तेंव्हा विचार तरी केला होता का की आजचा दिवस असा संपेल..”, कबीर म्हणाला..
“एक्झाक्टली.. मला असंच आयुष्य आवडतं कबीर.. अनप्लॅंन्ड.. असं आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर आपल्याला वाटलं पाहीजे पुढे काय असेल.. आणि आयुष्याने पण आपल्याला असं प्रत्येक वेळी नविन नविन सर्प्राईज दिलं पाहीजे. असं चार चौघांसारखं प्लॅन करुन.. कणाकणाने झिजत मला नै जगायचंय कबीर.. होप तु समजुन घेशील मला..घेशील ना?”, राधा
“आता ठरलंय न आपलं.. दोघांनीही कॉम्प्रमाईज करायचं.. मग झालं तर.. जमेल आपल्याला पण..”, कबीर
“कबीर..”, अचानक काही तरी आठवल्यावर राधा कबीरच्या मिठीतुन बाजुला झाली आणि म्हणाली.. “मला तुझी ती मैत्रीण आहे नं.. रती.. तिला भेटायचंय..”
“रतीला? का?”
“कबीर.. तिला आवडतोस तु.. आय जस्ट वॉंन्ट टु मेक शुअर की आवर डिसिजन इज नॉट हर्टींग हर..”
“काहीही.. अगं आम्ही दोघं मित्रं आहोत चांगले..”
“असेल.. तुझ्या दृष्टीने असेल.. पण तिच्या नाही.. एक स्त्री दुसर्‍या स्त्रीच्या डोळ्यात बघुन तिच्या मनात काय चालंलय ते ओळखु शकते. ती जेंव्हा तुझ्याकडे बघते ना.. तिची नजरंच सगळं बोलुन जाते..शी लव्हज यु…”
“हो गं.. काय डोळे आहेत यार तिचे…”
“एय… माझ्यासमोर दुसर्‍या मुलीची तारीफ़ काय करतोस..? शर्म कर शर्म..”, कबीरला फटके मारत राधा म्हणाली

कबीरच्या मेंदुने.. त्याच्या डोक्याने राधाचं ते वाक्य सहज धुडकावुन लावलं होतं.. पण त्याच्या हृदयाचा हळुच.. नकळत.. एक ठोका चुकुन गेला होता..

“बरं.. ते सोड.. मी आई-बाबांना फोन करुन सांगू आपल्याबद्दल..?”, कबीर
“ए.. नको इतक्यात?”
“का? त्यात काय झालं.. उद्या सांगायचं ते आज.. ते खूप खुश होतील..”
“नको ना कबीर.. मला भिती वाटते..”
“भिती? कसली?”
“त्यांना आपला हा निर्णय नाही आवडला तर..”
“वेडी आहेस का? असं काहीच होणार नाही.. आणि बाबांनी तर माझं पुस्तक सगळं वाचलंच आहे नं.. त्यांना माहीते सगळं आपल्याबद्दल..”,असं म्हणुन कबीरने बाबांना फोन लावला..

                                                                                **********************

 

“रोहन.. आपण आता काय करायचं रे…”, बाहेर गाडीत बसल्यावर मोनिका म्हणाली..
“हो ना.. पण काही तरी केलंच पाहीजे.. कारणं हे लग्न झालं तर कबीर.. राधा आणि रती कुणीच खुश रहाणार नाही हे नक्की..”, रोहन
“पण काय? काय करायचं?”
“मला वाटतं आपल्याला रतीला भेटायला हवं.. तिच्यासाठी दहा दिवस वाट बघत थांबणं मुर्खपणाचं ठरेल..”
“पण अरे.. तिथुन सोडत नाहीत बाहेर..माहीते ना..”
“माहीती आहे.. पण प्रयत्न तर करायला हवा.. तु एक काम कर ना.. कसंही करुन तिच्या घरुन.. त्या विपश्यना केंद्राचा पत्ता घे.. उद्या दोघंही आपणं जाऊ तिथे..ओके?”
“ठिक आहे.. पण आत्ता काही तरी खाऊया का..? मला सॉल्लीड टेंन्शन आलंय, अन म्हणुन भुक पण लागलीए..”, मोनिका पोटावरुन हात फ़िरवत म्हणाली..
“मला पण..”, असं म्हणुन रोहनने गाडी रेस्तॉरंटकडे वळवली..

“सर.. सर.. प्लिज लिसन..खरंच खूप्पच अर्जंन्सी आहे, म्हणुन तर आलो नं आम्ही.. आम्हाला पुर्ण कल्पना आहे.. दहा दिवस कुणालाही भेटू नाही शकत.. पण आम्हाला रतीला भेटणं खूप्पच महत्वाचं आहे..” रोहन रिसेप्शनवरच्या एका टकलू, हडकुळ्या माणसाला सांगत होता..
“मला माफ़ करा.. पण ते शक्य नाहीए.. ह्याची पुर्ण कल्पना आम्ही आधी दिलेली असते. आत्ताशीक दोनच दिवस झालेत आणि दिक्षार्थी आत्ता कुठे स्वतःशी समरुप होऊ पहात आहेत.. तुमच्या भेटण्याने त्यांचे…”
“सर.. मला माहीत आहे.. पण इतकी अर्जंन्सी असल्याशिवाय इथे येऊ का आम्ही? फ़ॅमीली एमर्जंन्सी आहे..तुम्ही..रतीला विचारुन बघा..ती नाही म्हणाली भेटायचं तर आम्ही निघुन जातो…”, रोहन
“तुम्ही कोण त्यांचे? आणि फ़ॅमीली एमर्जंन्सी आहे तर तिचे आई-वडील का नाही आले मग?”
“नाही येऊ शकले ते.. नाही येऊ शकत आहेत.. तीच तर एमर्जंन्सी आहे.. प्लिज..”

शेवटी काहीसं अनीच्छेनेच तो गृहस्थ आतमध्ये गेला.

साधारणपणे १५ मिनिटांनंतर रती बाहेर आली. रोहन आणि मोनिकाने प्रथम तिला ओळखलेच नाही. पांढरा रंगाचा पायघोळ झगा, मोकळे सोडलेले केस, कपाळाला चंदनाचा टिळा.. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तिच्या चेहर्‍यावर पसरलेले कमालीचे शांत भाव.

रोहन आणि मोनिकाला पाहुन ती किंचीत हसली आणि काही नं बोलता दोघांना बाहेर बागेत चलायची खुण केली.

बागेत गेल्या-गेल्या रोहनने सरळ मुद्यालाच हात घातला.. “रती.. कबीर आणि राधा..लग्न करताएत..”
पण रतीच्या चेहर्‍यावरची रेषाही हालली नाही, जणु तिला ह्याची कल्पना होती.. किंवा हे असे काहीतरी होणार हे तिला अपेक्षीतच होते.

रती काहीच बोलली नाही..

“तुला शॉक नाही बसला?”, मोनिकाने आश्चर्याने विचारले..

रतीने मानेनेच नाही अशी खुण केली..

“तुला काहीच विचारायचे नाहीए? हे कधी झालं? कसं झालं? वगैरे?”

“ही ईमर्जंन्सी होती तुमची?”, किंचीत हसत, विषयाला बगल देत, रती हळु आवाजात म्हणाली..
“हो.. आणि तुला आत्ताच्या आत्ता हे सोडुन आमच्याबरोबर यावं लागेल..”, रोहन
“का?”
“का काय? वुई हॅव टु स्टॉप देम गेटींग मॅरीड.. डोंन्ट यु लव्ह कबीर?”

“आय डु..”, दोन क्षण शांततेत गेल्यावर रती म्हणाली…
“मग? तु इथे बसुन काही होणार नाहीए..”, मोनिका
“मला जायला हवं.. मी आठ दिवसांनी आले की बोलु.. तुम्ही निघा आता..”, असं म्हणुन रती माघारी वळली.

रोहनने निराशेने हात हवेत उचलले आणि तो म्हणाला.. “रती.. प्लिज आल्यावर मला फोन कर…”
रतीने मागे न बघताच हाताने थम्ब्स-अपची खुण केली आणि ती आतमध्ये निघुन गेली.

                                                                                **********************

 

“आय एम सो हॅप्पी रोहन…”, टेबलावर हाताची बोटं वाजवत कबीर म्हणत होता.. “आज पहील्यांदा मी राधाला घरी घेऊन गेलो होतो आई-बाबांची भेट घालून द्यायला..”
“हम्म..”
“आई फ़ारसं काही बोलली नाही, पण बाबा छान बोलले. आई पण बोलेल हळु हळु..”
“रती पाहीजे होती आत्ता…”
“का?”
“का काय? राधाशी तिची भेट घालुन दिली असती ना..”
“का?”
“तु असा तुसड्यासारखा का वागतो आहेस रोहन..? गेले काही दिवस बघतोय मी..”, कपाळाला आठ्या घालत कबीर म्हणाला..
“हम्म.. जाऊ देत ना.. कश्याला उगाच आपल्यात वितुष्ट तुझ्या पर्सनल गोष्टींमुळे.. मी ठरवलंय..लेट्स बी प्रोफ़ेशनल..”
“पण का? झालंय तरी काय?”
“कबीर.. तुला काहीच वाटत नाही? इतका बेजबाबदार कसं वागु शकतोस तु? आधी मोनिकाला सोडलंस..”
“एक मिनीट.. मी मोनिकाला सोडलं नाही.. आणि पुढे काही बोलायच्या आधीच सांगतो.. मी राधालाही सोडलं नव्हतं.. इन्फ़ॅक्ट आम्ही एकमेकांना ऑफ़ीशली कधी अ‍ॅक्सेप्टच केलं नव्हतं..”

“आणि रती? तिच्याबरोबर डेटींग करत नव्हतास तु? आणि आता राधा काय परत आली…”
“हम्म.. मान्य आहे.. मान्य आहे मी रती बरोबर डेटींग केलं.. बट इट वॉज जस्ट अ प्लेन, सिंपल, फ़्रेंडली डेटींग.. मी कधीच तिला मिस-युज नाही केलं.. कधी आम्ही दोघांनी एकमेकांना शारीरीक दृष्ट्या जवळ नाही केलं..”
“आणि मानसीक दृष्ट्या? तु कधीच तिच्यात मनाने गुंतला नव्हतास?. बरं तुझं सोड, ती.. ती गुंतली असेल तुझ्यात तर?”
“हे बघ रोहन.. मी तिला कधी तशी हिंट दिली नव्हती.. मला ती आवडली होती.. कुणालाही आवडेल.. मला वाटतं ते एक तात्पुर्त आकर्षण होतं.. प्रेम नाही..”
“मग आता कशाला तुला रती हवीय? कश्याला तुला तिची आणि राधाची भेट घालुन द्यायचीय? काय प्रुव्ह करायचंय तुला?”
“ठिक आहे..तुला वाटत असेल मी भेटू नये.. तर तसंच.. नाही भेटणार मी तिला.. खुश?”, असं म्हणुन कबीर तेथुन रागाने निघुन गेला..

                                                                                **********************

 

कबीर, राधा, रोहन आणि मोनिका एका संध्याकाळी कॅफ़े मध्ये बसले होते.
“बोल कबीर.. कश्याला बोलावलंस आम्हाला इथे?”, कॉफ़ीचा सिप घेता घेता रोहन म्हणाला..
“पुढच्या २६ तारखेला आम्ही लग्न करतोय..”, कबीरला थांबवत राधा म्हणाली..
“२६? वॉव्व.. अलमोस्ट महीनाच राहीला की..”, रोहन..
“कॉंन्ग्राट्स.. कार्यालय वगैरे पण मिळालं?”, मोनिका
“अं.. नाही.. आम्ही साधंच करणारे लग्न.. रजीस्टर्ड.. म्हणजे.. ह्याला साग्रसंगीत.. मोठ्ठं लग्न करायची इच्छा आहे..”, राधा
“असणारंच, पहीलंच लग्न आहे नं त्याचं..”, राधाचं वाक्य मध्येच तोडत मोनिका म्ह्णाली..

राधाला त्या वाक्यातली खोचं लक्षात आली तशी ती काही क्षण गप्प झाली..

“सॉरी.. रिअल्ली सॉरी.. आय डिडंन्ट मिन्ट इट.. मी आपलं सहज बोलुन गेले..”, मोनिका
“नो.. इट्स ओके.. फ़ॅक्ट आहे.. की माझं लग्न झालंय आधी.. सो नो हार्ड् फ़िलिंग्स.. एनिवेज.. तर पुढच्या शनीवारी आम्ही एक पार्टी थ्रो करतोय सगळ्या फ़्रेंड्ससाठी.. यु बोथ आर इन्व्हायटेड.. संध्याकाळी ८.३० ला आहे.. एरीआ-५१मध्ये.. बुझ.. फ़ुड.. डान्स.. सगळं आहे..”, राधा नॉर्मल होत म्हणाली..
“मस्त.. येऊ आम्ही नक्की..”, मोनिका
“कबीर.. तु रतीला सांगीतलंस का?”, राधा
“अरे हो.. रोहन.. रती आली का परत? कधी येणार होती?”, कबीर
“आली असावी.. परवाच येणार होती खरं.. मी फोन पण केला होता तिला.. पण तिचा फोन बंदच येतोय…”, रोहन
“थांब आपण मेरीएटला लावु फोन.. डेस्कवर असेल ती…”, असं म्हणुन कबीरने तिचा डेस्कचा नंबर फ़िरवला..

दोन रिंग वाजल्या आणि पलीकडुन तोच ओळखीचा.. मधुर.. मनावर शहारे आणणारा आवाज कबीरच्या कानावर पडला…
“गुड इव्हनींग .. मेरीएट.. मे आय हेल्प यु?”

कबीर काहीच बोलला नाही..

“हेल्लो.. मे आय हेल्प यु?”, पलीकडुन रतीने परत विचारले..
“येस.. येस, यु कॅन हेल्प मी..”, राधा आपल्याकडेच बघते आहे हे लक्षात येताच कबीर सावरुन म्हणाला..

रतीने बहुदा कबीरचा आवाज ओळखला होता.. ती काहीच बोलली नाही..

“रती.. कुठे आहेस तु? केंव्हापासुन तुला भेटण्याचा प्रयत्न करतोय…कबीर बोलतोय..”, कबीर..
“ओ हाय कबीर..कबीर.. वर्क-लाईनवर नको बोलुयात? मी नंतर फोन करते…”, रती
“ओके ओके.. नो प्रॉब्लेम.. हे बघ.. रोहन नंतर तुला फोन करुन काय ते सांगेल.. भेटुच आपणं लवकर.. पण प्लिज तुझा फोन चालु कर.. बाय देन..”, असं म्हणुन कबीरने फोन बंद केला…

“काय रे? काय झालं?”, राधाने अधीरतेने विचारलं
“अगं ती कामात आहे.. नंतर बोलते म्हणाली…”
“पण मग रोहनचं काय म्हणालास…”, राधा
“मी म्हणलो.. रोहन सांगेल मग सगळं पार्टीचा व्हेन्यु वगैरे.. रोहन तु कर तिला फोन आणि नक्की यायला सांग..”
“अरे पण तुच का नाही करत आहेस फोन नंतर.. रोहनला कश्याला..”

कबीर जागेवरच जरा इंपेशंटली इकडुन तिकडे हालला..

“अरे बोल ना?”
“अगं काही नाही.. समहाऊ मला वाटलं तिला माझ्याशी बोलायचं नाहीए.. म्हणुन म्हणालो.. सोड ना, रोहन तु सांग रे तिला नक्की..” असं म्हणुन कबीरने तो विषय तिथेच संपवला…
                                                                                **********************

 

पार्टीला राधाच्या ऑफ़ीसमधले काही तर कबीरच्या ओळखीतले काही लोक हजर होते. कबीर नेव्ही-ब्ल्यु रंगाचा पार्टी-वेअर शर्ट-ट्राऊझर घालुन होता, तर राधाने स्ट्रॅपलेस, काळ्या रंगाचा वन-पिस घातला होता.

काही लोकं ड्रिंक्स घेण्यात मग्न होते तर काही जणं डी.जे.च्या तालावर थिरकत होते.

कबीर स्कॉचचा ग्लास घेऊन गार्डनमध्ये उभा होता.

“कबीर.. आत चल ना.. सगळे आपल्याला डान्सला बोलावताएत..”, राधा बाहेर येऊन कबीरला म्हणाली..
“येस्स.. आलोच.. अजुन रोहन आला नाहीए.. तो आला की येतोच मी..”
“अरे येईल तो.. तु बाहेर थांबल्याने लवकर येणारे का? फोन करुन विचार कुठे आहे…”
“अर्ध्या-तासापुर्वी केला होता फोन.. जस्ट रतीच्या घराजवळ पोहोचतच होता तो तिला पिक-अप करायला..”
“म्हणजे ऑन-द-वे आहे.. येईल मग तो चल तु आत..”, असं म्हणुन राधा त्याला हाताला धरुन आतमध्ये घेऊन गेली.

दोघांना आत आलेले बघताच सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला..

“हिअर कम्स द लव्ह-कपल…”
“डिजे.. मस्त रोमॅंन्टीक सॉंग लाव एखादं..”
“कम-ऑन राधा.. वुई वॉंन्ट बोथ ऑफ़ यु ऑन द फ़्लोअर…”

डिजे ने पेप्पी सॉंग बदलुन शांत गाणं चालु केलं तस कबीरने राधाचा हात धरला आणि दोघं जण डिस्कवर नाचण्यासाठी उतरले. मंद संगीताला साजेशी लाईट्ची योजना मंद करण्यात आली. ए/सीचे तापमान आणखी खाली उतरवले गेले.

कबीरने राधाच्या कमरेखाली हात धरुन तिला जवळ घेतले आणि दोघंही जण त्या मदहोश करणार्‍या संगीताच्या चालावर नृत्य करण्यात मशगुल झाले. हळु हळु बाकीची लोकं ही त्यांच्या जोडीदाराला घेऊन नृत्यात सामील झाली.

राधाचं लक्ष विचलीत झालं ते कबीरची तिच्याभोवतीची पकड किंचीतशी सैल झाली ते जाणवुन. तिने कबीरकडे बघीतलं.. कबीरचं तिच्याकडे लक्ष नव्हते, तो दाराकडे बघत होता. राधाने वळुन मागे बघीतलं.. दारात रोहन आणि मोनिकाबरोबर रती उभी होती.

कबीरने तिघांना बघुन हात केला आणि मग तो आणि राधा त्या तिघांजवळ गेले.

“तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन..”, रती चेहर्‍यावर नेहमीचं हास्य आणत म्हणाली..
“थँक्स रती फ़ॉर कमींग..”, कबीर
“माय प्लेझर… यु गाईज कॅरी ऑन.. आम्ही बसतो इकडे..”, रती कोपर्‍यातल्या सोफ़्याकडे हात करत म्हणाली..
“व्हॉट बसतो.. चला .. डान्स करु..”, राधा रतीला ओढत म्हणाली..
“अं. नको.. सगळे कपल्संच आहेत.. मी एकटी काय करु..”, रती डान्स-फ़्लोअरकडे बघत म्हणाली…
“ओह.. मग मोनिका-रोहन.. तुम्ही तरी चला…”, राधा
“नको.. आम्ही थांबतो रती जवळ.. यु कॅरी ऑन..”, रोहन म्हणाला
“अरे. इट्स ओके.. खरंच.. आय् एम फ़ाईन.. जा तुम्ही..”, रोहन आणि मोनिकाला ढकलंत रती म्हणाली..

रतीला एकटीला सोडून जायला कबीरही काहीसा अनत्सुकच होता, पण त्याला राधाबरोबर काही बोलता येईना. शेवटी काहीश्या जबरदस्तीनेच रोहन आणि मोनिका, राधा आणि कबीर बरोबर डान्स करायला गेले आणि रती कोपर्‍यातल्या सोफ़्यावर बसली.

पाच एक मिनिटांचाच डान्स झाला असेल तोच राधाची बॉस, अवंतिका आली, तसं राधाने कबीरची तिच्याशी ओळख करुन दिली आणि तिला ड्रिंक्स वगैरे सर्व्ह करायला तिच्याबरोबर बार-काऊंटरला निघुन गेली.

कबीरने रती बसली होती तिकडे नजर टाकली.. रतीच्या शेजारच्या खुर्चीवर एक काळा ब्लेझर घातलेला सहा फुट उंच तरुण बसला होता.
कबीरने राधाकडे बघीतले.. ती अजुनही अवंतिकाबरोबर कोपर्‍यात गप्पा मारण्यात मग्न होती.

कबीर तडक रती बसली होती तिकडे गेला..

“मी डिस्टर्ब तर नाही ना करत आहे?”, कबीर त्या तरुणाला उद्देशुन म्हणाला.
“ओह… नॉट अ‍ॅट ऑल..”, कबीरकडे बघुन तो तरुण म्हणाला आणि मग रतीला म्हणाला..”हे माझं कार्ड… कॉल मी समटाईम…”

“कोण होता तो?”, तो तरुण गेल्यावर कबीर म्हणाला..
“माहीत नाही..”, सहजतेनेच रती म्हणाली.. “मला एकटीला बसलेलं पाहुन डान्सला विचारायला आला होता..”

कबीरने पहील्यांदाच रतीला जवळुन पाहीले.

गडद लाल रंगाचा स्लिम-फ़िट वनपिस तिने घातला होता, टेबलावर सफ़ेद-पांढर्‍या रंगाची महागडी टोट्टे बॅग ठेवली होती. केस, पिना लावुन एकाबाजुने मोकळे सोडले होते.

“वेगळीच दिसते आहेस तु खूप…”, रतीचा चेहरा निरखत कबीर म्हणाला..
“वेगळी म्हणजे?”
“म्हणजे तसं सांगता येणार नाही.. पण.. असा एक ग्लो आहे चेहर्‍यावर तुझ्या.. मे बी.. तुझ्या त्या विपश्यनेचा इफ़ेक्ट असेल..”
“असेलही..”
“बाकी.. कशी आहेस?”
“मी मस्त एकदम… आल्या आल्या कामाला जुंपलं.. दहा दिवसांच राहीलं होतं न काम..”

“आय होप.. वुई आर स्टिल फ़्रेंड्स..”, काही क्षण शांततेत गेल्यावर हात पुढे करत कबीर म्हणाला..
“ऑफ़कोर्स..”, रतीने कबीरशी हात मिळवला.. तसा पुर्वीचाच तो करंट कबीरच्या नसा-नसांतुन वहावत गेला..

रतीचा धरलेला हात सोडुच नये असं त्याला वाटत होतं, पण राधा त्याला शोधत येताना दिसली तसा त्याने हात सोडुन दिला..
“मला खुप बोलायचंय तुझ्याशी.. का? आणि काय? माहीत नाही.. पण तु अशी दहा दिवस गायब होतीस ना, तेंव्हा मी खूप मिस्स केलं तुला..”, कबीर गडबडीत म्हणाला आणि मग मागे सोफ़्याला टेकुन बसला. थोड्याच वेळात राधा पण तेथे येऊन बसली..

“तु इथे आहेस होय.. तुला तिकडे शोधतेय मी..” असं म्हणुन तिने वेटरला खूण केली तसा वेटर टकीला शॉट्सने भरलेला एक ट्रे घेऊन आला..

राधाने तो ट्रे टेबलाच्या मध्यावर ठेवला आणि एक शॉट गटकुन टाकला…

“हम्म.. चालु करा.. कुणाची वाट बघताय…”, असं म्हणुन राधाने दुसराही शॉट उचलला..
“नो.. इट्स ओके.. आय डोंन्ट वॉंन्ट”, रती म्हणाली..
“का? घेत नाहीस?”
“नाही घेते ना.. आज नकोय…”
“ए.. चल नाटकं नको करुस.. घे….”, राधा हातातला शॉट पुढे करत रतीला म्हणाली..
“अगं नकोस असेल तिला.. दे मी घेतो..”, असं म्हणुन कबीरने तो शॉट घेतला…

थोड्याच वेळात रोहन आणि मोनिका सुध्दा त्यांच्याबरोबर येऊन बसले.. तो पर्यंत राधाने ५-६ शॉट्स संपवले होते..

“काय प्लॅन मग लग्नाचा..?”,रतीने विचारले..
“विशेष काही नाही.. साधंच करायचं असं मी तरी म्हणतेय.. रजीस्टर्ड.. आणि मग स्विझर्लंडला हनीमुन.. माझ्या्तर्फ़े कबीरला गिफ़्ट..”, कबीरच्या मांडीवर थोपटत राधा म्हणाली..
“वॉव.. दॅट्स ग्रेट…”, रती

राधाला एव्हाना दारु चढायला लागली होती..

“रती.. तसं कबीरला विचारलं आहे मी.. बट जस्ट वॉंन्ट्स टु चेक विथ यु अलसो.. मी आणि कबीर लग्न करतोय.. यु आर ओके विथ इट ना…?”
रतीने कबीरकडे बघीतलं आणि म्हणाली…”नाही.. आमच्यात तसं काही नाहीए.. हो ना कबीर?”

कबीरने तिची नजर चुकवली आणि आपलं लक्ष नाही असं दाखवलं..

“आणि तसंही.. कबीर तुझ्याशी लग्नाला तयार झालाय.. ह्याचाच अर्थ त्याचं तु्झ्यावरच प्रेम आहे माझ्यावर नाहीए.. नाही का?”
“येस्स.. कबीर लव्हज मी.. आय लव्ह हिम..” अडखळत राधा म्हणाली..

चौघांच्या तासभर गप्पा चालु होत्या. ह्या काळात रतीने अनेकदा कबीरला तिच्याकडे बघताना बघीतलं. दोघांची नजरानजर होताच कबीर नजर चुकवुन दुसरीकडे बघायचा, पण थोड्यावेळाने परत रती त्याला तिच्याकडे बघताना पकडायची.

एव्हाना.. बरीचशी लोकं पांगली होती.

अवंतिका.. राधाची बॉस तिला बाय करायला आली तेंव्हा राधाला धड उभं ही रहाता येत नव्हते..
कबीरचा हात धरुन ती कशीबशी उभी राहीली..

“थॅंक्स अवी फ़ॉर कमींग…”, अवंतिकाला मिठी मारत राधा म्हणाली..
“कबीर.. आय थिंक यु शुड ड्रॉप हर होम.. जास्तं झालंय तिला.. शी विल पास आऊट..”, हळुच अवंतिका कबीरला म्हणाली आणि मग राधाला ‘बाय’ करुन निघुन गेली.

“कबीर.. प्लिज वॉशरुमपर्यंत चल.. मला.. मला उलटी होतेय..” घश्यावरुन हात फ़िरवत राधा म्हणाली..
कबीरने तिला हाताला धरुन उभं केलं आणि तो तिला वॉशरुममध्ये घेऊन गेला..

“मला कळत नाही, कबीर ने काय बघीतलं हिच्यात.. गॉड ब्लेस देम..”, रोहन निराशेने डोकं हलवत म्हणाला..
“एनिवेज.. चला आपण खाऊन नि्घुयात का?”, रती सोफ़्यावरुन उठत म्हणाली…

तिच्या म्हणण्याला संमती देत रोहन आणि मोनिका सुध्दा उठले आणि बफ़ेमध्ये प्लेट घेऊन गेले.

थोड्यावेळाने कबीर आला आणि म्हणाला.. “हे गाईज.. मी राधाला घरी सोडुन परत येतो ओके..?”
“का रे? काय झालं?”, रोहन
“अरे.. तिला चक्कर करतेय.. मळमळतय खुप.. मी येतो पट्कन सोडुन ओके..वेट फ़ॉर मी..”, कबीर
“आणि तुझं जेवण? काही खाल्लंस का?”, रतीने विचारलं..
“अं.. नाही.. पण एनिवेज.. तुम्ही आहात ना?”, कबीर
“कबीर.. इट्स ऑलरेडी ११.. १२ पर्यंत आलास तर ठिके.. नाही तर नंतर भेटु .. खुप्पच लेट होईल रे..”, मोनिका म्हणाली..
“ओके नो वरीज.. बाय देन..”, असं म्हणुन कबीर निघुन गेला..

“वेडी आहे का ही राधा? म्हणजे आपण पण ड्रींक करतो, पण इतकं?”, मोनिका वैतागुन म्हणाली..
“तरी नशीब कबीरचे आई-बाबा नव्हते इथे..”, रोहन म्हणाला..

तिघांनी थोडं फ़ार खाल्लं आणि बाहेर पडले.

“काय करायचं? थांबायचं का कबिरसाठी? ११.४५ झालेत..”, रोहनने घड्याळात बघत विचारलं
“आय थिंक लेट्स गो.. मला नाही वाटत तो येईल इतक्यात तिला सोडुन..”, मोनिका म्हणाली.. “तु कशी आली आहेस रती?”
“ओला कॅब.. मी करते बुक.. येईल ५ मिनीटांत..”, रतीने आपला मोबाईल काढला आणि ओला-कॅबचे अ‍ॅप उघडले..
“मोना, तु थांब हिच्याबरोबर, मी कार घेऊन येतो पार्कींगमधुन”, असं म्हणुन रोहन कार आणायला गेला..

“आहे कॅब?”, मोनिकाने विचारलं..
“२० मिनिट्स .. बट इट्स ओके.. मी आत थांबते..”, रती म्हणाली.. इतक्यात समोरुन कबीरची कार येऊन थांबली..
“सॉरी.. सॉरी.. मला उशीर झाला..”, गाडीतुन घाई-घाईने उतरत कबीर म्हणाला.. “चला आत चला.. निवांत बसु आता..”

तोच रोहनही पार्कींगमधुन कार घेऊन आला

“आम्ही निघतोय अ‍ॅक्च्युअली..”, मोनिका म्हणाली..
“का? थांबाकी थोड्यावेळ..”, कबीर
“नाही जातो अरे..थोडं कामाचा पण बॅकलॉग आहे.. रात्री बसावं लागणार आहे..”, मोनिका म्हणाली..

“व्हॉट अबाऊट यु?”, रतीला कबीर म्हणाला..

“मी ओला-कॅब केलीए बुक.. येईलच ५-१० मिनिटांत..”, रती

“चलो बाय देन..”, मोनिका कारमध्ये बसत म्हणाली.. रोहननेही गाडीतुनच बाय केलं आणि दोघं निघुन गेले..

नक्की काय बोलायचं दोघांनाही सुचेना त्यामुळे, दोन मिनीटं कबीर आणि रती इकडे-तिकडे बघत उभे राहीले.
“कॅब येईपर्यंत एक-एक ड्रिंक्सचा राऊंड?”, कबीरने रतीला विचारलं..
“ड्रिंक्स.. नको.. डोकं भणभणलंय खरं ती गाणी, थंड ए/सी ने..”, रती म्हणाली…
“ओके.. मग कॉफ़ी घे, बरं वाटेल थोडं..”, कबीर..
“कॉफ़ी? इथे बारमध्ये?”, रती हसत हसत म्हणाली..
“हो.. तेही आहेच म्हणा.. स्टार-बक्सला जाऊ.. येतेस..”, कबीर आशेने रतीकडे बघत म्हणाला
“मी कॅब केलीए बुक अरे.. नंतर जाऊ कधीतरी..”, रती
“ए.. कॅबचं काय कौतुक आहे.. ती कॅन्सलही करता येते..”, कबीर

रती काहीच बोलली नाही..

“मी सोडतो तुला घरी..उशीर होणार असेल तर..”, कबीर
“नाही उशीरचा काही प्रॉब्लेम नाही.. आई-बाबा इंदोरलाच गेलेत लग्नाला, घरी कुणीच नाहीए..”, रती
“मग झालं तर.. कर कॅन्सल कर कॅब ..” कबिर
“ओके..पण मग कारने नाही.. चालत जाऊ स्टार-बक्सला ओके?”, रती
“अगं? ५ कि.मी. तरी असेल..”, कबीर..

रतीने डोळे मोठ्ठे करुन कबिरकडे बघीतलं..

“ओके.. ओके.. डन..”, कबीरने गाडी रस्त्याच्या कडेला निट लावली आणि तो रतीबरोबर चा्लत निघाला..

 

“रात्रीचा रस्ता कित्ती वेगळा वाटतो नै? दिवसभर नुसता गोंधळ, गाड्या.. पोल्युशन, माणसांची गर्दी.. आणि आत्ता बघ ना.. सगळं शांत, निर्जन..”, रती म्हणाली
“हो, खरंय…”, कबिर..
“आठवतं.. त्या दिवशी पिटर मला रस्त्यात सोडुन गेला होता.. मग तु आलास आणि नंतर आपण लॉंग-ड्राईव्हला गेलो होतो.. तेंव्हा पण असंच मस्त वाटत होतं नै..”, रती म्हणाली..

पण मग तिला अचानक लक्षात आलं तेंव्हाचा कबिर आणि आत्ताचा कबिर वेगळा आहे.. आता तो दुसरा कुणाचातरी झाला होता..
तिने विषय बदलला..

“सो.. शेवट मिळाला ना पुस्तकाचा? घे आता लिहायला पुढचा भाग.. माझ्यासारखे वाचक वाट बघत आहेत पुढच्या भागाची”, रती
कबिर अचानक हसायला लागला..

“का? काय झालं हसायला..?”, रतीने गोंधळुन विचारले
“यु वोन्ट बिलीव्ह.. राधा पण हेच म्हणाली होती..शेवट मिळाला ना पुस्तकाचा..”
“हो मग, बरोबरच आहे..”
“हम्म खरं आहे.. पण असा पुस्तकासाठी पर्फ़ेक्ट एन्डींग नाही वाटते”, कबिर
“का? ‘पर्फ़ेक्ट एन्डींग’च तर आहे की.. तुला जी आवडली.. जिच्यासाठी तु दर-दर भटकलास.. तिच्यासाठी वेडा-पिसा झालास.. ती तुला मिळाली.. अजुन वेगळा शेवट काय पाहीजे?”, रती
“हो पण बघ ना.. असं नाहीए की मीराला नायक आवडत नव्हता.. पण तरीही ती त्याला एकट्याला सोडुन निघुन जाते. का? कारण तिला स्वतःचं असं आयुष्य हवं असतं, आयुष्याकडुन तिच्या काही वेगळ्या अपेक्षा असतात.. आणि म्हणुनच तर पहीलं घर सोडुन ती आलेली असते नं. पुढे जेंव्हा त्यांची भेट होते.. तेंव्हा पण ती कन्फ़ेस करते की तिचं सुध्दा प्रेम आहे म्हणुन.. पण तेवढ्यापुरतंच.. तिला जायचंच नाहीए ह्या रिलेशनशीपध्ये पुढे.. मग अचानकच तिला साक्षात्कार होतो की तिला आयुष्यात कोणीतरी हवंय बरोबर.. आता ती तयार आहे अ‍ॅडजस्टमेंट्स करायला.. पण कश्यावरुन तिचा निर्णय पुन्हा बदलणार नाही? कश्यावरुन ती पुन्हा निघुन जाणार नाही? कश्यावरुन दोघांच्या आयुष्यात अपेक्षीत असलेली अ‍ॅडजस्टमेंट् फ़क्त नायकाच्याच वाट्याला येईल?” कबीर एकावर एक प्रश्न निर्माण करत होता..

“कबीर..”, रतीने कबीरला चालता चालता थांबवले.. “हे प्रश्न तुझ्या पुस्तकातल्या नायकाला पडलेत की पर्सनली तुला पडलेत?”
“कदाचीत दोघांनाही…”, रतीकडे बघत कबीर म्हणाला..
“कबीर.. आयुष्यात कुणीच पर्फ़ेक्ट नसतं.. हे तर पटतय नं तुला?”
“हम्म..”
“नात्यामध्ये अ‍ॅडजस्टमेंट् असतेच.. असायलाच हवी.. मग ती त्याने करायची? का तिने करायची हा प्रश्न जर उपस्थीत होत असेल तर तो इगो आहे.. आणि इगो कुठल्याही रिलेशनला घातकच असतो..”
“मान्य.. पुर्ण मान्य.. पण म्हणुन फ़क्त एकच जण अ‍ॅडजस्टमेंट् करत राहीला आणि दुसरा त्याचा गैरफ़ायदा घेत राहीला तर?”
“मग तु हे सगळं लग्न व्हायच्या आधीच का नाही क्लिअर करुन घेत? एकमेकांकडुन असलेल्या अपेक्षा जर आधीच समजुन घेतल्या तर ते बरं नाही होणार? हे जे काही प्रश्न तुला पडलेत तेच तु राधाला का नाही विचारलेस?”
“मला.. मला भिती वाटते?”
“काय?”, रती पुन्हा चालता चालता थांबली
“हो.. मला भिती वाटते..”, कबीर पुन्हा.. पण जरा स्पष्टपणे म्हणाला..
“कसली?”
“राधाची..”
“कमॉन कबीर.. अरे भिती काय वाटायची?”, डोळे मोठ्ठे करत रती म्हणाली..
“हो म्हणजे.. ह्यावरुन आमच्यात भांडणं झाली आणि ती मला सोडुन गेली तर?”
“कबीर.. अरे…”, रतीला पुढे काय बोलावं हेच सुचेना.. “अरे.. अश्या छोट्या छोट्या गोष्टींवरुन कोणी सोडुन जातं का कुणाला? आपलं सहजीवन आहे, एकमेकांमधले गैरसमज आधीच दुर करुन घ्यायला हवेत नं? का ते असे कुठेतरी अडगळीत दडवुन ठेवायचे.. न सोडवता..”
“बरोबर.. असं कुणी कुणाला सोडुन जाणार नाही .. पण राधा? तिची काही गॅरेंन्टीच नाही गं.. राधा म्हणजे ना अशी एक सुबक, नाजुक वस्तुसारखी आहे.. जी दुरुनच बरी वाटते.. हातात घेतली आणि तुटुन गेली तर अशी भिती वाटावी अशी..”
“अशक्य आहेस तु.. कसं व्हायचं तुझं..”, मान हलवत रती म्हणाली..

मान हलवताना, तिचे मोकळे सोडलेले केस एका खांद्यावरुन दुसर्‍या खांद्यावर मोकळेपणाने हिंदकाळात होते.. तिच्या हातातले चंदेरी रंगाचे ब्रेसलेट केस सावरताना त्या काळ्याभोर केसांवर उठुन दिसत होते. तिचे गोरे गोरे पाय, नाजुक कंबर.. तिने लावलेल्या पर्फ़्युमचा सुगंध कबीरला मदहोश करत होता.

 

स्टार-बक्सचं दार उघडताच स्ट्रॉंग कॉफ़ीचा सुगध दोघांच्या नाकात शिरला.. दोघांनीही एकाचवेळी दीर्घ श्वास घेऊन तो सुगंध श्वासामध्ये भरुन घेतला.

दोघांनीही ऑर्डर दिली आणि मग बाहेरचा रस्ता दिसेल अश्या मोठ्या काचेपाशी कप घेऊन दोघंही बसले.

“रती…”, बराच वेळ शांततेत गेल्यावर कबीर म्हणाला..
“हम्म..”, कॉफ़ीचे घोट घेताघेता रती म्हणाली..

“एक विचारु?”
“विचार की..”
“डोंन्ट गेट मी रॉंग..ओके..”
“बापरे.. काय विचारणार आहेस असं?”

“त्या दिवशी.. तुझ्या घरी.. तुझ्या खोलीत.. तो एक मोमेंट होता.. तुला असं वाटत होतं की आपण दोघं…”
“हम्म..”, कबीरकडे न बघता रती म्हणाली..
“मग बोलली का नाहीस काही?”
“तु का नाही मला जवळ घेतलंस?”, रती कबीरच्या डोळ्यात बघत म्हणाली..
“मी.. मी कन्फ़्युज्ड होतो.. मलाच कळत नव्हतं मला कोण हवंय.. तु? का राधा?.. आणि मग मला असं वाटलं.. तेंव्हा आपण एकत्र आलो.. अन नंतर समजा मी आणि राधा एकत्र आलो.. तर तुला उगाच फ़सवलं असं होईल.. सो…”

रतीने कप खाली ठेवला आणि ती जोर-जोरात हसायला लागली…

“शट-अप रती.. हसायला काय झालं?”, कबीर चिडून म्हणाला
“फ़सवल्यासारखं काय होईल अरे…”, रतीला अजुनच जोरात हसायला आलं…
“हो मग.. मी तेंव्हा तुला मिठी मारली असती आणि नंतर…”

फ़िस्स… रती हसु दाबायचा प्रयत्न करत होती.. पण पुन्हा एकदा ती अजुनच जोरात हसायला लागली…

“खरंय हो कबीर तुझं.. उगाच मी तुझ्यावर फ़ौजदारी दावा वगैरे दा्खल केला असता.. मला मिठी मारल्याबद्दल कलम क्रमांक सो अ‍ॅन्ड सो अंतर्गत जज-साब इसे कडी-सेक-कडी सजा दी जाये… अशक्य.. केवळ अशक्य..”, असं म्हणुन रती पुन्हा हसायला लागली

हसुन हसुन हसुन तिच्या डोळ्यातुन पाणी यायला लागले…

सहन होईना म्हणुन ती ख्रुचीतुन उठली आणि दारात जाऊन उभी राहीली…

“जस-साब..ध्यान से देखीये इस दरींदे को.. समाज मै दहशत मचाने वाला ये मासुम चेहरा एक दरींदे को छुपाए रख्खा है ।” रती स्वतःशीच बोलत होती.

कबीर खुर्चीतुन तडक उठला, रती जेथे उभी होती तेथे गेला, तिला हाताला धरुन मागे फ़िरवले आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले..

रतीने प्रतिक्षीप्त क्रियेने कबीरला दुर ढकलायचा प्रयत्न केला, पण कबीरच्या घट्ट मिठीतून ती स्वतःची सुटका करु शकली नाही…

काही सेकंद.. आणि मग कबीरने तिला दुर लोटले आणि म्हणाला.. “शिक्षा भोगायचीच असेल तर निरपराध होऊन भोगण्यापेक्षा गुन्हा करुन भोगलेली काय वाईट..” असं म्हणुन तो पुन्हा जागेवर जाऊन बसला.

थोड्यावेळाने रतीसुध्दा पुन्हा तिच्या जागेवर बसली..

कॉफ़ी संपेपर्यंत दोघंही काहीच बोलले नाहीत…

“निघुयात?”, कॉफ़ी संपल्यावर कबीर म्हणाला..
“हम्म..”

कबीरने बिल भरले आणि दोघंही बाहेर पडले. कारपर्यंत येईपर्यंतच काय, पण नंतर रतीच्या घरापर्यंतही कुणीच काही बोलले नाही.

“चलो देन.. बाय..”, कारचं दार उघडत रती म्हणाली..
“रती..”, कबीर.. “मला तुला परत भेटायचंय..”
“का?”
“देअर इज समथींग बिटवीन टु ऑफ़ अस.. आय डोंन्ट नो व्हॉट इट इज..बट आय कॅन फ़िल इट.. अ‍ॅन्ड आय वॉंट टु सी.. आय वॉंन्ट टु नो व्हॉट इट इज.. भेटशील?”, कबीर
“कबीर.. ईट्स नॉट राईट.. तु आणि राधा.. बोथ आर कमीटेड.. तुम्ही जगजाहीर केलंय.. तुला असं माझ्याबरोबर फ़िरताना कुणी बघीतलं तर.. ते बरोबर नाही दिसणार..”, रती
“विकडे ला भेटु.. सधारण शंभर एक किलोमीटर वर आमचं फ़ार्म-हाऊसचं काम चालू आहे.. बरंचसं झालय पूर्ण, तिकडे जाऊ आपण, जवळपास छोटे-मोठे रेस्टॉरंट्स, बार आहेत.. ओके?”
“पण कबीर…”
“बरं, असा विचार करं, मी साईट-व्हिजीटला चाललो आहे.. राधा, रोहन, मोनिका सगळे कामात आहेत, मला एकट्याला जायचा कंटाळा आलाय.. एक मैत्रीण म्हणुन तर तु येऊ शकतेसच की बरोबर.. इट्स जस्ट अ डे विथ मी ओके?
“ओके..”, थोडा विचार करुन रती म्हणाली..
“कुल.. मग बुधवारी सकाळी सात वाजत येतो मी घरापाशी तुला पिक-अप करायला..”
“नको..घरापाशी नको, कदाचीत आई-बाबांना आवडणार नाही ते.. मी मेसेज करते तुला कुठे भेटायचं ते..”, असं म्हणून रती निघून गेली.

कबीरनेही गाडी वळवली आणि तो घराकडे वळला.

रतीला असं गुपचूप, लपून-छपून भेटायचंय ह्या विचारानेच त्यांच हृदय दुप्पट वेगाने धडधडत होते.. आणि कदाचीत रतीचेही..
                                                                                **********************

 

बुधवारी सकाळी रती आणि कबीर निघाले तेंव्हा आकाश काळ्या पावसाळी ढगांनी काळवंडुन गेले होते.

“आज कोसळणार बहुतेक..”, रती आकशाकडे घत म्हणाली
“नक्कीच.. कारण फ़ार्महाऊस असं डोंगरात आहे वरती.. सो इथे नसला तरी, तिथे नक्कीच असणार..”, कबीर म्हणाला
“राधा बरी आहे का आता?”
“माहीत नाही.. असेल..”
“म्हणजे? तुम्ही भेटला नाहीत नंतर..?”, रतीने आश्चर्याने विचारले
“नाही.. ती बिझी आहे ऑफ़ीसमध्ये.. कोणतरी डेलीगेट्स येणार होते…”
“ओह.. बरं बरं..”

कार थोडी गावाबाहेर आल्यावर रतीने ए/सी बंद केला आणि कारच्या खिडक्या खाली केल्या तसं थंड हवेचा झोका आतमध्ये शिरला..

“सॉल्लीड गार आहे नै बाहेर…”, रती
“हे घे.. हे घाल गळ्यात..”, आपल्या गळ्यातला मफ़लर काढुन रतीला देत कबीर म्हणाला..
“थॅंक्स..”,असं म्हणुन रतीने तो मफ़लर गुंडाळला..

रतीने आपले बांधलेले केस मोकळे सोडले आणि खिडकीतुन येणारा वारा केसांमध्ये गुंफ़ून गेला.

“नको.. प्लिज नको…”, अचानक कबीर म्हणाला
“का? काय झालं?”
“अपनी इन जुल्फ़ों को इस तरहं से ना लहंरा दें ऐ जालीम, इनकी घनी छटाओं को देख कर कही ये बादल ना शरमा जाएं…”, कबीर हसत हसत म्हणाला..
“अरे व्वा.. एकदम शायरी वगैरे..”
“अगर आप जैसी हसीना साथ मै हो तो…”

“ए हॅल्लो.. तु फ़्लर्ट करतोएस का माझ्याशी…”, रती कबीरला थांबवत म्हणाली..
“बरं राहीलं.. तुला नसेल आवडत तर…”
“मी कुठं म्हणलं मला आवडत नाही….”
“बरं.. आर्ची मॅडम..”, असं कबीर म्हणाला आणि दोघंही हसायला लागले…

रतीने टेप चालू केला… लग जां गले… गाणं चालू होतं..

हमको मिली हैं आज, ये घड़ियाँ नसीब से
जी भर के देख लीजिये हमको क़रीब से
फिर आपके नसीब में ये बात हो न हो
फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

रतीने अर्थपूर्ण नजरेने कबीरकडे बघीतले…

“सस्सं… शायद इस जनम मै मुलाकात हो न हो… काटां आला अंगावर…”, कबीर हातावरुन हात फ़िरवत म्हणाला…

 

काही वेळातच ‘व्हिसलींग वूड्स’ पाटी असलेल्या मोठ्या गेटमधून गाडी आतमध्ये शिरली…

“वॉव्व.. काय मस्त एरीआ आहे रे..”, रती सभोवताली बघत म्हणाली..
“हे तर काहीच नाही.. आपलं फ़ार्म-हाउस तिकडे वरती आहे बरंच डोंगरावर.. तिथून व्ह्यु बघ कसला भारी आहे..”, कबीर डोंगराकडे बोट दाखवत म्हणाला…
“आपलं?”
“हां.. म्हणजे.. आपलं.. आम्ही संस्थानीक आपलं असंच म्हणतो..”, कबीर हसत म्हणाला..

पंधरा मिनीटांच्या ड्राईव्ह नंतर कबीर त्याच्या फ़ार्महाऊसवर पोहोचला.. बरंचसं बांधकाम पूर्णत्वास आलेलं होतं.

“धिस इज सिरीयसली गुड..”, रती म्हणाली..
“आय नो.. हे पुर्ण झालं ना की मी तर विचार करतोय इथंच येऊन रहावं.. एकदम शांत.. पुस्तक लिहायला परफ़ेक्ट आहे एकदम..”
“राधाला दाखवलंस हे?”
“नाही अजुन.. पण मला नाही वाटत तिला आवडेल.. तिला अश्या हॅपनींग जागा लागतात.. इथली शांतता बोचेल तिला…”, कबीर
“जे काय आहे ते आहे.. आता तुम्ही अ‍ॅडजस्टमेंट्स करणार.. त्यावरंच तुमचं नात बेतलेलं आहे म्हणल्यावर…”
“टॉंन्ट होता का हा?”, कबीर रतीकडे रोखून बघत म्हणाला..

रती काहीच बोलली नाही..

दोघांनीही मग फ़ार्म-हाऊसची पहाणी केली.. कबीरने त्याची ड्राईंग-रुम रतीला दाखवली.. दोघांनीही इंटेरीअर कसं करता येईल, काय वेगळं ठेवता येईल यावर चर्चा केली.
“ए इथे ना.. तो जुन्या काळचा रेकॉर्डर मिळतो नं तो ठेव…”
“इथे मी त्या लाइट्सच्या माळा लावून घेणार आहे.. तुझ्या खोलीत होत्या ना, तश्या.. मला खूप आवडलं ते..”
“भिंतीला काय करणार आहेस.. ते नविन म्युरल्सचा प्रकार आलाय बघ.. असं पुस्तकांचे म्युरल्स करुन घे एका कॉलमला भारी दिसेल.. लेखकाचं घरं वाटलं पाहीजे..”
“आणि किचेनला काय करु..?” कबीरने अर्थपूर्ण नजरेने रतीकडे बघीतले..
रतीला त्याच्या प्रश्नाचा रोख लक्षात आला.. “ते आता मी कसं सांगू.. ते राधाला विचार नं.. ती असणारे किचेन मध्ये..मी थोडं नं असणारे… उगाच मी सांगायचे आणि तिला नाही आवडलं तर…”, रती गालातल्या गालात हसत म्हणाली..

रतीने जमीनीवर पडलेला एक विटेचा तुकडा उचलला आणि भिंतीवर K हार्ट R असे लिहीले.

“R?”
“R फ़ॉर राधा..”
“हो हो.. खरंच राधाच.. पण मग असं अर्धवट कश्याला? पूर्ण राधाचं लिही नं..” काहीसं चिडून कबीर म्हणाला

“ओके.. अ‍ॅज यु विश..” असं म्हणून रतीने तिथे ‘राधा’ लिहीले आणि ती बाहेर निघुन गेली..
“जळल्याचा वास येतोय काही तरी.. हे कामगार लोकं ना.. सगळा कचरा पेटवुन देतात इथे..”, मुद्दाम रतीच्या जवळुन बोलत जात कबीर म्हणाला..

“ए चल.. भूक लागलीए.. खाऊयात का काही तरी?”
“येस, चल्ल, इथे पुढेच एक मस्त हॉटेल आहे..”

दोघंही बाहेर पडले..

थोडं चालुन पुढे गेल्यावर अचानक रती म्हणाली.. “ओह शट्ट…”
“काय झालं?”
“पुढे बघ.. तुझे आई-बाबा…”

कबीरने समोर बघीतलं.. समोरुनच त्याचे आई-बाबा येत होते. त्यांनीही कबीर-रतीला बघीतलं.. मागे वळुन लपायला ही जागा नव्हती..

“अरे बाबा.. तुम्ही इथे?”, कबीर नॉर्मल साऊंड करत म्हणाला..
“हो.. कंटाळा आला होता.. आणि हवा पण मस्त होती.. म्हणलं तुझ्या आईला घेऊन जावं फ़िरायला.. तु कसा इथे?

“पण तु कसा इथे?”
“सहजच, आलो होतो किती काम झालंय ते बघायला..”
“राधा नाही आली?”
“अं.. नाही.. तिला काम होतं.. आम्ही दोघंच येणार होतो.. पण ऐन वेळी तिला काम आलं.. म्हणुन मग हिला घेऊन आलो..”, कबीर म्हणाला..

“तु रती ना?”, कबीरची आई रतीकडे बघत म्हणाली..
“हो.. आई.. अं.. काकु..”, रती
“चालेल गं.. आई म्हणालीस तरी चालेल..”

समहाऊ.. कबीरची आई रतीला बघुन खुश वाटत होती..

“चला.. आम्ही रेस्टॉरंट मध्ये चाललोय.. येताय?”, कबीर म्हणाला..
“हो.. चला..”, कबीरचे बाबा म्हणाले.. आणि चौघही रेस्टॉरंटमध्ये आले..

चौघंही छान गप्पा मारत होते..

“कबीर.. चल जरा बाहेर जाऊ..”, कबीरचे बाबा म्हणाले..

दोघंही बाहेर आले.
“काय झालं?”, कबीर..
“अरे काही नाही.. ड्रींक्स करायचा मुड होता.. तुझ्या आईला आवडत नाही नं सकाळी ड्रींक्स घेतलेली.. म्हणुन इथे बाहेर घेऊ गपचुप..”

दोघांनी दोन स्मॉल पेग्स घेतले..

“आई आज सॉल्लीड मुड मध्ये आहे नै..”, कबीर म्हणाला.. “रतीशी चांगलं जमत आईचं..”
“कबीर.. स्टॉप-इट..”, कबीरला थांबवत बाबा म्हणाले.. “मला माहीतीए तुला काय म्हणायचंय.. कबीर.. आपण तशी लोकं नाहीओत.. तुझं आणि राधाचं लग्न ठरलेय, तुम्ही दोघांनी मिळुन, विचार करुन ठरवलेय…. आणि तिला दुखवुन, ते ठरलेलं लग्न मोडुन तु रतीशी लग्न केलेलं मला आवडणार नाही..”
“पण बाबा.. एकदा घडलेली चुक.. खुप पुढे जायच्या आधीच सुधारलेली काय वाईट?”
“चूक? तुला आत्ताच चूक वाटतेय ती? कबीर आधी मोनिका.. मग राधा.. आता रती आवडतेय का तुला? कधीतरी स्वतःच्या निर्णयावर ठाम रहा तु.. कश्यावरुन उद्या तुला अजुन तिसरीच कोणी आवडणार नाही.. ग्रो अप नाऊ.. कॉलेजमधला मुलगा नाहीएस तु थिल्लर प्रेमं करायला…”
“ओके.. चुक असं नाही.. पण बाबा असं कधी कधी होतं ना.. आपण एखाद्या रस्त्याने आपण चालत असतो.. चालत चालत, अंदाज घेत आपण बरंच पुढे जातो.. आणि मग जाणवतं, अरे हा तो रस्ता नाहीचे जिथे आपल्याला जायचंय.. हे तेंव्हाच कळतं ना जेंव्हा आपण त्या रस्त्याने पुढे जातो.. रस्त्याच्या सुरुवातीला नाही कळत.. मग तेंव्हा काय करायचं? चालत राहीचं? माहीती असुनही की आपण चुकीच्या रस्त्याने चाललोय..?”, कबीर..

कबीरचे बाबा काहीच बोलले नाहीत, त्यांनी पेग संपवला आणि कबीरची वाट न बघता ते निघून गेले..

कबीर परत येताना गाडीत शांतच होता..
“काय झालं कबीर? मुड का ऑफ़ आहे?”, रतीने विचारायचा प्रयत्न केला, पण कबीरने ‘काही नाही’ म्हणुन तो विषय तिथेच संपवला…

                                                                                **********************

 

घरी परतल्यावर दोन दिवसांनी रतीने रोहनला फोन केला..

“बोला रती मॅडम.. आज चक्क आम्हाला फोन? काय काम काढलंत?”, रोहन
“ए.. काय रे.. कामा शिवाय फोन करु नये का मी तुला?”, रती
“नाही.. तसं काही नाही.. पण आत्ता काम तर काही तरी नक्कीच असणारे.. हो ना?”
“हम्म.. अरे मला सॉल्लीड गिल्ट कॉन्शीअस आलाय… अं.. कबीर काही बोलला का तुला बुधवारचं?”, रती
“नाही.. का? काय झालं?”
“मग त्या दिवशीच्या पार्टीच्या नाईटचं?”
“नाही.. काहीच नाही.. काय केलत आता?”
“चं.. नाही रे.. काही केलं नाही.. असं फोन वर नाही बोलता येणार सगळं.. भेटूयात का? तु मी आणि मोनिका फ़क्त.. कबीर नकोय..”
“हम्म.. भेटू.. उद्या कधी पण चालेल.. कबीर दिवसभर नाहीए.. कुठे तरी जाणारे..”
“हो? कुठे?”
“माहीत नाही, काही तरी काम आहे म्हणला बुवा.. मी पण जास्ती नादी नाही लागत त्याच्या..”
“बरं.. उद्या संध्याकाळी भेटू.. जर्मन बेकरी चालेल?”
“डन.. संध्याकाळी ७.३० ला भेटु मग..मी मोनिकाला पण सांगतो..”
“बाय देन..”
“बाय..”

 

ठरल्या वेळेला रती, रोहन आणि मोनिका जर्मन बेकरीमध्ये भेटले.. पट्कन जे सुचेल ते ऑर्डर देऊन टाकली. खाण्यात तसाही कुणाला उत्साह नव्हता. रोहन आणि मोनिकाला तर कधी एकदा रतीला भेटतोय आणि काय घोळ झालाय हे जाणून घेतोय असं झालं होतं..

“हम्म.. बोल पट्कन.. काय झालं..”
“कबीरने त्या दिवशी पार्टीच्या रात्री.. तुम्ही गेल्यानंतर काय झालं ह्याबद्दल काहीच सांगीतलं नाही का तुला?”, रतीने विचारलं..
“अगं नाही बाई.. काहीच बोलला नाही तो.. काय झालंय…”, रोहन
“त्या दिवशी तुम्ही गेलात.. आणि मग कबीर म्हणाला कॉफ़ी घेऊयात का स्टार-बक्सला…”, असं म्हणुन रतीने तो सगळा किस्सा इत्युंभुत.. जश्याच्या तसा.. कोण-कुणास-काय म्हणाले तत्वावर मोनिका-रोहनला सांगीतला…

“आईशप्पथ..कबीरने किस केलं तुला… वॉव..सो रोमॅंटीक..”, मोनिका म्हणाली..
“च्यायला त्या कबीरच्या.. एकावेळी दोन दगडांवर पाय ठेवून उभा आहे..”, रोहन वैतागुन म्हणाला..
“बरं.. मग बुधवारचं काय म्हणत होतीस?”, रोहन
“हम्म.. तर मग आम्ही बुधवारी परत भेटलो..”

एव्ह्ढ्यात त्यांची ऑर्डर आली.. प्लेट मांडुन, सर्व्ह करुन वेटर जाई पर्यंत रती थांबली…

“हम्म पुढे.. बुधवारी तुम्ही भेटलात.. कधी.. कुठे?”
“सकाळी ७ वाजता..” हसत हसत रती म्हणाली…
“हम्म.. आग दोनो तरफ़ से लगी है..”, मोनिका
“ए.. मोना.. तुझे फ़िल्मी डायलॉग्स बंद कर.. आणि मध्ये बोलु नकोस.. रती.. कंटीन्यु.. ७ वाजता भेटलात.. सकाळी.. मग..”, रोहन
“हां.. तर मग..”, असं म्हणुन रती तो पुर्ण दिवस कथन केला..

टेबलावरचं खाणं गार होऊन गेलं, पण कुणीही एक घास खायचा कष्ट घेतला नाही, किंबहुना कुणाला त्याचे भानही नव्हते..

“रोहन, मला सॉल्लीड गिल्टी फ़िल होतेय रे.. मी असं त्याला भेटायला नको होते..आणि मी असं भावनेच्या भरात बरंच काही बोलुन गेले.. उगाच त्याच्या मनात काही नसेल ना रे आले…”, रती..
“गप्प बस.. गिल्टी काय वाटायचेय त्यात.. त्याने बोलावले होते तुला.. तु गेलीस.. इट्स दॅट सिंपल..”, रोहन

“नाही रे.. बहुतेक कबीरच्या बाबांना आवडलं नाही, माझं तिथे त्याच्याबरोबर असणं.. ते बाहेर जाऊन बहुतेक कबीरला काहीतरी बोलले नंतर त्याचा मुड खुप ऑफ़ होता.. मी विचारलं त्याला ’काय झालं?’, पण काहीच बोलला नाही.. तु बघ ना काही कळतंय का काय झालं..”, रती काळजीने म्हणाली…
“पण मी कसं विचारणार.. त्याने मला काहीच सांगीतलं नाहीए.. तुम्ही त्या दिवशी भेटल्याचं…”, रोहन

इतक्यात रोहनचा फोन वाजला…

“राधाचा फोन..”, आश्चर्यचकीत आणि हायपर होत रोहन म्हणाला…
“हाय राधा.. बोल काय म्हणतेस..”, रोहन
“रोहन.. भेटायचंय मला.. आत्ताच्या आत्ता.. भेटू शकतोस?”
“अं.. का गं काय झालं? मी बाहेर आहे आत्ता..”
“कुठे आहेस? मी जास्त वेळ नाही घेणार..”
“आम्ही जेवायला आलोय बाहेर.. मी, मोनिका.. रती..”
“ओह ग्रेट.. रती पण आहे नं.. बरं झालं. मी येते.. कुठे आहात तुम्ही..”
“जर्मन बेकरी.. पण काय झालं काय?”
“येते मी दहा मिनीटांत.. आल्यावर बोलु ना..”, असं म्हणून राधाने फोन बंद केला..

“राधा येतीय..”, फोन ठेवल्यावर रोहन म्हणाला
“का? काय झालं?”, मोनिका आणि रती एकदमच म्हणाल्या..
“काय माहीत काय झालं.. आत्ताच्या आत्ता भेटायचंय म्हणाली..”, रोहन

“ठिके.. चला आपण खाऊन घेऊ तोपर्यंत..”, असं म्हणुन तिघांनी ऑर्डर केलेलं खायला सुरुवात केली..

म्हणल्याप्रमाणे बरोब्बर दहा मिनिटांतच राधा तेथे पोहोचली.

“हाय गाईज..”, हॅन्डबॅग टेबलावर ठेवत राधा म्हणाली..
“नमस्ते वहीनी..”, रोहन हसत हसत म्हणाला..”बोला काय खाणार..?”

वहीनी म्हणताना मुद्दाम त्याने हळुच रतीकडे बघीतलं. रतीने त्याला एक खूनशी लुक दिला.

“ए.. श्शी.. वहीनी काय? एकदम १० वर्षांनी म्हातारं झाल्यासारखं वाटलं.. राधाचं ठिक आहे हं.. आणि खायला नकोय काही.. एक आईस्ड टी सांगते..”, असं म्हणुन तिने ऑर्डर दिली..
“बरं झालं, तुम्ही सगळे इथेच भेटलात…”, राधा
“काय झालं? एकदम गडबडीत भेटायचं म्हणालीस म्हणुन विचारलं..”, रोहन

“सांगते.. आज मी आणि कबीर दिवसभर बाहेर गेलो होतो..”
“अरे व्वा.. सहीच की.. कुठे?”, रोहन
“त्याचं नविन फ़ार्म-हाऊस बनतंय.. व्ह्सिअलींग वुड्स मध्ये.. तिकडे गेलो होतो..”

लगेच हळुच रोहन-मोनिका-रतीची एक चोरटी नजरा-नजर झाली..

“अच्छा, तरीच सकाळपासुन कबीर गायब होता… कुठे आहे कुठे तो मग आत्ता.. त्याला पण घेऊन यायचंस ना..”, रोहन
“नाही.. नको.. तो नसतानाच मला जरा बोलायचं होतं.. बोलु का मी पुढे??”
“ओके ओके.. बोल..”
“हम्म.. तर आम्ही दोघं तिकडेच गेलो होतो.. बोलता बोलता सहज म्हणाला.. लग्नानंतर आपण इकडे यायचं का रहायला? आता मी दहा वेळा त्याला सांगीतलंय.. मला एका जागी सेट नाही व्हायचंय.. त्यात इतक्या लांब शहरापासुन कसं शक्य आहे?”
“मग? तु नाही म्हणालीस का?”
“नाही.. मी तसं काहीच बोलले नाही.. मग तो मला इंटेरीअर वगैरे काय करायचं ते विचारत होता.. मला एक तर त्यातलं फ़ारसं कळत नाही, आणि मला विचाराल तर.. मला वाटतं खरी लाईफ़ घराच्या बाहेर आहेत.. चार भिंतीच्या आत नाही.. मग त्या निर्जीव भिंतीवर काय पैसे खर्च करायचे पाण्यासारखे.. मी म्हणले तसं त्याला.. तर मला म्हणाला तु खुप ब्लंट आहेस..”

“अजुनही अश्या काही बारीक-सारीक गोष्टींवरुन आमचे खटके उडाले.. म्हणजे प्रेम करतो रे तो माझ्यावर खूप.. त्याने ना त्याच्या ड्राईंग रुममधल्या भिंतीवर विटेने कबीर लव्हज राधा असं लिहीलं होतं.. हाऊ क्युट ना..”

पुन्हा एकदा रोहन-रती-मोनिकाची नजरानजर झाली.. तिघांनाही माहीती होतं की ते कबीरने नाही, रतीने लिहीलं होतं.

“सो क्युट..”, मोनिका मुद्दाम म्हणाली..
“हो नं.. आय मीन.. त्याला मी आवडते ह्यात शंकाच नाही, मलाही तो नक्कीच आवडतो.. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी तो माझ्याबरोबर असावा असं मला वाटतं.. बट सिरीयसली.. लग्नासाठी ही एकच गोष्ट पुरेशी आहे का?”

तिघांचेही डोळे एकदम मोठ्ठे झाले.. पण राधाचं लक्ष नव्हतं.. ती बोलण्यात मग्न होती..

“लग्नाच्या आधीच आमच्यात डिफ़रंन्सेस आहेत.. जसं जसं लग्न जवळ यायला लागलंय.. तसं तसं मला असं सफ़ोकेट झाल्यासारखं वाटतंय.. असं वाटतं.. कबीरशी लग्न हा माझा योग्य निर्णय तर आहे ना? त्याला जे आयुष्य अपेक्षीत आहे.. ते मी देऊ शकेन ना?.. काय वाटतं तुम्हाला.. आम्ही हा योग्य निर्णय घेतलाय ना?”, राधाने आळीपाळीने तिघांकडेही बघीतलं..

बराचवेळ शांततेतच गेला..

“मला वाटतं योग्य निर्णय आहे.. तुम्ही दोघंही एकमेकांना हवा आहात.. तुमचं दोघांचही एकमेकांवर प्रेम आहे.. तु नेहमीच कबीरच्या मनात होतीस.. रहाशील.. मला वाटतं रिलेशनशीप मध्ये सगळ्यात महत्वाच काय असतं तर ते एकमेकांवर असलेल घट्ट प्रेम.. जर ते असेल तर बाकीच्या गोष्टी दुय्यम आहेत.. मला वाटतं.. तुम्ही थोडी मॅच्युरीटी दाखवलीत तर तुमच्यातले हे डिफ़रंन्सेसही नाहीशे होतील..”, अनपेक्षीतपणे रती म्हणाली.. “आणि माझं मत विचारशील तर मला तुम्ही दोघंही आनंदी हवे आहात…”

मोनिकाने हळुच टेबलाखालुन रतीला एक लाथ मारली..

“थॅंक्स रती.. खुप छान वाटलं ऐकुन.. मला कळत नाहीए.. मी खुप ओव्हर-रिअ‍ॅक्ट होतेय की काय… आजचा दिवस इतका वाईट गेला ना आमचा.. आय थिंक ही शुड अंडरस्टॅंड यार.. मी नाही राहू शकत इतक्या दुर असं एकांतवासात..”, राधा
“डोंन्ट वरी.. सगळं ठिक होईल..”, रती
“थॅंक्स यार.. आणि रती.. मला थोडी शॉपींगला हेल्प करशील प्लिज.. यु नो ना.. माझ्याबरोबर माझ्या नात्यातलं असं कोणीच नाही.. ऑफ़ीसमधलं रिलेशन इतके पण जवळचे नाहीत की मी त्यांच्याबरोबर शॉपिंग वगैरे करेन..”, राधा
“व्हाय नॉट.. नक्की..”, रती

“सर.. एक स्किम चालु आहे.. तुमचा सेल्फ़ी काढुन आमच्या पेजवर अपलोड करा.. १०% डिस्काऊंट आहे..”, एक वेटर टेबलापाशी येत रोहनला म्हणाला..
“अरे व्वा.. व्हाय नॉट….या रे.. इकडे सगळे..”, असं म्हणुन रोहनने आपल्या मोबाईलमधुन एक ग्रुप-फ़ोटो काढला

“ओके देन.. यु गाईज कॅरी ऑन.. मी पळते…आणि मला प्लिज व्हॉट्स-अ‍ॅप करा हा फ़ोटो”

टेबलावरचा आईस्ड-टी संपवला आणि बॅग उचलुन राधा निघुन गेली..

 

राधा गेल्या गेल्या रोहन आणि मोनिका दोघंही रतीकडे वळले.

“मुर्ख आहेस का तु? चांगली संधी होती तुला.. उलट तिला सांगायला हवं होतंस कि हा निर्णय चुकीचा आहे.. तुम्ही दोघं अनुरुप नाही एकमेकांना वगैरे.. ते राहीलं बाजुला .. आणि तु..” रोहन चिडून म्हणाला..
“नाही तर काय.. एव्हढी साधी नको राहूस रती तु..”, मोनिका
“कुल डाऊन गाईज.. आय एम नॉट अ बिच.. अ‍ॅन्ड आय डोंन्ट वॉंट टु.. मला कुणाच्या लग्न मोडण्याचं कारण नाही बनायचंय..”, रती
“अगं पण.. तुला आवडतो ना कबीर. मग? जर का त्यांच लग्न व्हावं असं वाटतंय.. तर कश्याला गेलीस मग त्या दिवशी कबीर बरोबर.. स्पष्ट दिसतंय की कबीर आज राधाला तिथे का घेऊन गेला ते.. तो सरळ सरळ कंपेअर करतोय राधाला तुझ्याशी..”, मोनिका
“पण आम्ही जस्ट भेटलो होतो.. ते पण तो म्हणाला म्हणुन..”, रती
“राईट.. आणि किती दिवस हे असं भेटणं चालणार? राधापासुन लपवुन.. कबीरचं लग्न होईपर्यंत? का त्यांच्या पहील्या वाढदिवसापर्यंत?? का त्यांना मुल-बाळ होईपर्यंत??’, रोहन..
“रोहन.. कबीरचं अजुन लग्न झालेलं नाहीए.. सो भेटायला काय हरकत आहे..?”, रती
“खरंय.. पण त्याने त्याचा निर्णय बदलला आहे का? तो म्हणाला का की रती माझं तुझ्यावरंच प्रेम आहे.. माझा निर्णय चुकलाय.. मी राधाला सांगतो मी तुझ्याशी नाही.. रतीशी लग्न करतोय.. म्हणाला का तसं तो..”, रोहन

रती काहीच बोलली नाही

“बरं त्याचं नाही तर नाही.. तु तर बोललीस का? उलट त्याच्या भिंतींवर कबीर लव्हज राधा लिहुन आलीस.. कमाल आहे तुझी..”

“रोहन मी प्रेम करते कबीरवर.. आणी जरी तो माझ्यावर प्रेम करत असेल, तरी हे ही खरं आहे की तो राधावरही प्रेम करतो.. आणि मला त्याचं प्रेम त्याच्यापासुन हिरावुन घ्यायचं नाहीए.. त्याला आम्हा दोघींमधलं कोण हवंय हे त्याला ठरवु दे.. त्याचा निर्णय त्याला घेऊ दे.. कदाचीत माझ्यावर नसेलही प्रेम त्याचं, राधाला त्याच्यापासुन दुरावुन मला त्याला दुःखी नाही करायंचंय रोहन..”, रती

“रती.. कबीर खरंच मुर्ख आहे.. तो स्वतःहुन कुठलाही स्टॅंन्ड घेणार नाही.. तो तुला प्रपोज करणार नाही.. तु त्याला विचारणार नाही.. राधा त्याला सोडणार नाही.. कबीर आयुष्यात जे घडेल तसे त्या फ़्लो मध्ये जात रहातो.. प्रवाहाविरुध्द पोहायची धमक नाही त्याच्यात. तो काहीही बदल करणार नाही.. दोन आठवड्यांत त्यांच लग्न होईल रती.. कळतंय का तुला मी काय म्हणतोय???”, रोहन पोटतिडकीने म्हणत होता..

“रोहन मला वाटतं.. आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे आता..”, मोनिका
“नाही मोनिका.. कुणी काही करायची गरज नाहीए.. तुम्हाला माहीते.. मी ते विपश्यनेला गेले होते ना.. तिथे एक गोष्ट आम्हाला शिकवली.. आपल्याला जर एखादी गोष्ट खरंच हवी असेल ना.. तर ती गोष्ट आपण ना युनिव्हर्सकडे मागायची.. अगदी मनापासनं.. आणि मग ती गोष्ट आपल्याला मिळवुन देण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावते. मी रोज सकाळ संध्याकाळ युनिव्हर्सकडे कबिरला मागतेय..”, रती म्हणाली..

“अ‍ॅज यु विश..”, मोनिका म्हणाली.. “आय होप.. जेंव्हा तु जागी होशील तेंव्हा खूप उशीर झालेला नसेल.. लेट्स गो रोहन..”

रतीने बिल भरलं आणि तिघंही जण बाहेर पडले.
                                                                                **********************

 

रात्रीचे १२.३० वाजुन गेले होते. कबीर झोपेत बुडुन गेला होता इतक्यात त्याचं दार वाजलं.

कबीर चरफडत उठला.. घड्याळात वेळ बघीतली.. इतक्या रात्रीचं कोण आलं असेल असा विचार करत त्याने दार उघडलं..

दारात राधा उभी होती.

“राधा.. तु? इतक्या उशीरा? ये आत ये…”, कबीरने दार पुर्ण उघडलं..
राधाने दारु प्यायलेली होती. अडखळत अडखळत ती हॉलमध्ये आली आणि तिने सोफ़्यावर स्वतःला झोकुन दिले..

“झोपला होतास कबीर..”, अडखळत तिने विचारलं..
“हे घे.. पाणी पी आधी..”, कबीरने फ़्रिजमधुन गार पाण्याची बाटली आणली आणि ग्लासमध्ये पाणी भरुन राधाला देत म्हणाला.
“झोपला होतास का? माझी झोप उडवुन?’, राधाने परत विचारलं..
“हम्म.. झोपलो होतो.. बोल.. काय झालं?”
“हे बघ…”, राधाने आपला मोबाईल सुरु केला आणि कबीरसमोर धरला.. मोबाईलवर रोहन-राधा-रती आणि मोनिकाचा तो हॉटेलमध्ये काढलेला ग्रुप फोटो होता..

“आज संध्याकाळी मी भेटले ह्यांना.. सहजच..”, राधा म्हणाली..
“अरे व्वा.. मस्त की..”, कबीर.. “पण मला सोडुन का भेटलात? मला सांगीतलं असतं तर मी पण आलो असतो की..”
“तु तर भेटतच असतोस रे.. म्हणुन नसेल सांगीतलं..”, कसनुस हसत राधा म्हणाली..
“छे गं.. म्हणजे रोहन भेटतो.. तु भेटतेस.. पण मोनिका आणि रती.. नाही भेट होतं जास्ती…”, कबीर..
“म्हणजे? तु रतीला भेटलाच नाहीस इतक्यात?”
“नाही.. आपल्या पार्टीला जी भेट झाली तिच शेवटची.. का? असं का विचारलंस..?” थोडंस चाचपुन कबीर म्हणाला

राधाने तो फ़ोटो रतीवर झुम केला आणि म्हणाली.. “निट बघ कबीर.. रतीचा ड्रेस बघ.. तिच्या गळ्यात बघ काय आहे.. हा तोच मफ़लर आहे ना जो मी तुला गिफ़्ट केला होता.. आपल्या लग्नाच्या पार्टीला?”

कबीर काहीच बोलला नाही…

“कधीपासुन चालु आहे तुम्हा दोघांचं?”, राधा
“तसं काही नाहीए राधा.. उलट ती मला नेहमी समजावतेच की राधाशी जुळवुन घे.. लग्नानंतर सगळं ठिक होईल वगैरे..”, कबीर
“तेच तर मला कळत नाही.. आज मला पण ती तेच म्हणाली.. पण मी तुला आधी पण म्हणाले होते.. आत्ता पण म्हणतेय.. शी लव्हज यु.. तिचं प्रेम आहे तुझ्यावर.. स्पष्ट दिसतं तिच्या चेहर्‍यावर विशेषतः तेंव्हा जेंव्हा ती तुझ्याबद्दल बोलत असते..”, राधा

“राधा प्लिज..तुला जास्तं झालीए.. आपण नंतर बोलुयात का?”, कबीर.. “तु एक काम कर.. इथेच झोप.. उद्या सकाळी निवांत बोलु..”
“नाही कबीर.. उद्या नाही.. तुला उतरवायला आज इतकी प्यावी लागली.. आजच सगळं बोलु दे.. आत्ताच..”

कबीरने पंखा चालु केला आणि तो राधाच्या समोरच्या खुर्चीत बसला..

“कबीर.. अगदी खरं खरं सांग.. प्लिज.. आय नो.. यु लव्ह मी.. पण रती.. तुला रती पण आवडते ना? प्लिज आता खोटं नको बोलुस..”
“हम्म.. आवडते..”
“माझ्यापेक्षाही जास्त?”
“माहीत नाही.. खरंच माहीत नाही.. जेंव्हा तु समोर असतेस तेंव्हा मी तुझाच असतो.. पण ती समोर आली की मला कळत नाही मला काय होतं.. वेडा होऊन जातो मी तिच्यासाठी..”, कबीर खाली मान घालुन म्हणाला..

टेबलावरचा पाण्याचा ग्लास घेण्यासाठी राधा उठायला गेली, पण तिचा तोल गेला तसा तिला सावरायला कबीर खुर्चीतुन उठु लागला, पण राधाने त्याला थांबवले. सोफ़्याचा आधार घेऊन तिने पाण्याचा ग्लास उचलुन ओठाला लावला..

“कबीर.. तुला वाटतंय की आपण लग्न करुन चुक करतोय? मला वाटतं तसं.. ह्याचा अर्थ असा नाही होत, की मी तुझ्यावर चिडलेय.. किंवा तु मला आवडत नाहीस, पण.. लग्न.. आणि आपण दोघं.. ह्या बाबतीत मला वाटतंय आपण भिन्न विचारांचे आहोत.. आपलं खरंच जमेल एकत्र लग्नानंतर?”

कबिर काहीच बोलला नाही.

“ओ लेखक.. अहो बोला आता जरा..”, राधा म्हणाली
“मान्य आहे आपले विचार, आपली मतं अगदी विरुध्द टोकाची आहेत.. पण आत्ता तु जे बोललीस ना, तेच अगदी तंतोतंत माझ्या मनातही आहे..”, कबीर..
“तु माझ्याशी.. किंवा मी तुझ्याशी नवरा-बायको म्हणुन कितपत जुळवुन घेऊ शकु माहीती नाही..”, राधा म्हणाली..

काही वेळ शांततेत गेला…

“मोडुयात लग्न?”, काहीश्या अस्पष्ट आवाजात राधा म्हणाली..
कबीरने अविश्वासाने तिच्याकडे बघीतले

“राधा.. हे बघ.. हा निर्णय असा तडकाफ़डकी नको घ्यायला.. तु पण आत्ता भानावर नाहीएस.. उद्य..”
“मी पुर्ण भानावर आहे कबीर.. तु तुझा निर्णय सांग.. हे बघ, मला वाईट वगैरे आज्जीबात वाटणार नाही.. मला वाटतं राधा नावालाच शाप आहे.. तिला हवं असलेलं प्रेम तर मिळालं.. पण ती त्याची कधीच होऊ शकली नाही.. सो इट्स ओके..”

कबीरने खुप वेळ घेतला आणि मग म्हणाला.. “राधा.. आपण लग्न नको करुयात.. पुढे जाऊन एकमेकांना दुखावण्यापेक्षा.. आत्ताच…” पण बोलताना कबीरचा आवाज कापरा झाला होता..

“वेडा रे वेडा तु..”, सोफ़्यात सावरुन बसत राधा म्हणाली.. “तुला तो दुनियादारी सिनेमातला डायलॉग आठवतो?”
“कुठला?”
“तोच.. हातात कॅडबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही… बच्चूच आहेस तू.. खरंच बच्चू आहेस तु कबीर…” असं म्हणुन राधा उठुन उभी राहीली
“कुठे निघालीस राधा?” कबीर तिला थांबवत म्हणाला..
“घरी.. आता इथे थांबुन काय उपयोग..”
“मी.. मी येतो सोडायला..”
“नको कबिर.. खाली पुनम थांबलीय.. तिला घेऊनच आले होते बरोबर.. माझी नको काळजी करुस.. तु जा रतीकडे.. सांग तिला.. तु तिचाच आहेस म्हणुन..”, राधा दार उघडत म्हणाली..
“अगं.. पण झोपली असेल ती आत्ता…”
“तिची झोप उडली असेल रे.. चार दिवसांवर लग्न आलं आपलं.. जागीच असेल ती.. खरंच गोड मुलगी आहे.. आणि तुला डिझर्व्ह करते.. पण एक मात्र नक्की..”, राधा
“काय?”
“देव न करो.. पण पन्नाशीनंतर तुम्ही एकत्र नसलात.. तर माझी आठवण काढ.. निदान तेंव्हा तरी आपल्याला लग्नाची गरज भासणार नाही.. कबीर-राधा.. तेंव्हा तरी एकत्र येतील.. चलो येते मी.. आणि आता जास्ती उशीर न करता.. लग्न करुन टाक.. इश्कच्या पुढचा भागाचे पुस्तक नक्की वाचेन मी..”

“राधा..”, कबीर म्हणाला.. “जायच्या आधी एक मिठी??”
“शुअर…”

राधाने कबीरला घट्ट मिठी मारली.. दोघांच्याही डोळ्यांतुन आश्रुंच्या धारा लागल्या होत्या.. पण त्या दुःखाबरोबरच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन सगळ्यांचंच आयुष्य सावरल्याचा, सगळ्यांनाच हवं ते मिळाल्याच्या आनंदाच्या ही होत्या.

कबीरला बाय करुन राधा निघुन गेली.

थोड्यावेळाने खाली गाडी चालु झाल्याचा आवाज आला आणि ती गाडी तेथुन निघुन गेली.
पुन्हा सर्वत्र सामसुम झाली.

कबीर बराच वेळ सुन्न होऊन बसला होता. जे काही घडलं त्याच्यावर त्याचा अजुनही विश्वास बसत नव्हता.. पण जे घडलं ते सर्वदृष्टीने तिघांच्याही भल्याचंच होतं ह्याची त्याला मनोमन खात्री होती. त्याला अपेक्षीत असलेल्या चौकोनी आयुष्याच्या बंधनात राधा नावाच वादळं कधीच थांबुन राहीलं नसतं.. ते वादळ असंच मोकळं दर्‍या-खोर्‍यांतुन, पर्वतांतुन.. समुद्रांवरुन घोंघावत राहायला हवं तरच त्याचं मार्दवी सौदर्य अनुभवता येणार होतं.

कबिरने तोंडावर पाण्याचा शिडकावा केला.. कपडे बदलले आणि मोबाईल चालु केला..
व्हॉटस-अ‍ॅपवर रतीचं लास्ट सिन १० मिनीटांपुर्वीचंच होतं.
राधा म्हणाली होती ते खरंच होतं तर..

कबीर खाली गाडीत येऊन बसला आणि स्वतःशीच म्हणाला.. “स्टे-अवेक रती.. आय एम कमींग टु टेक-यु अवे…”

[क्रमशः]

इश्क – (भाग २६)


भाग २५ पासून पुढे>>

“रोहन.. मी जरा रतीच्या घरी चाललो आहे..”, टेबलावरुन कारची किल्ली उचलत कबीर म्हणाला
“घरी? का रे? काय झालं?”, रोहन
“अरे दोन दिवस झाले.. तिचा फोन बंद येतोय, व्हॉट्स-अ‍ॅपपण लास्ट-सीन दिन दिवसांपूर्वीचेच आहे..”, कबीर
“कबीर..”, कबीरला थांबवत रोहन म्हणाला.. “मला वाटतं ती अपसेट असेल.. त्या दिवशी तु तिला एकटीला सोडुन राधाच्या मागे निघुन गेलास…”
“अरे पण मी आलो ना परत.. आलो तेंव्हा निघुन गेली होती ती.. मी काय करणार मग?”, रोहनचं वाक्य तोडत कबीर म्हणाला..
“हम्म.. पण मला वाटतं..”

पण कबीर त्याच्या बोलण्याची वाट न बघता निघुन गेला होता.

 

रतीच्या घराचं दार रतीच्या आईनेच उघडलं..

“काकु.. रती आहे घरी?”, कबीर
“नाहीए..”
“अं.. कुठे गेलीए.. तिचा फोन पण बंद येतोय दोन दिवसांपासून..”, कबीर
“विपश्यनेला…”
“विपश्यनेला?? कधी येईल..”, अचंबीत होत कबीर म्हणाला…
“दहा दिवसांनी येईल..”
“काय संन्यास वगैरे घेतीय की काय?”, हसत हसत कबीर म्हणाला खरा, पण रतीच्या आईच्या चेहर्‍यावरचे गंभीर भाव बघुन तो गप्प बसला..
“पण मग फोन?”
“फोन बंदच असतो दहा दिवस… ती आली की सांगेन तु येऊन गेलास ते..”, जवळ जवळ दार लावतच तिची आई म्हणाली..
“बरं.. ठिके.. येतो काकु..”.. पण त्याचे शेवटचे शब्द बंद दारावर आपटुन परत आले..

कबीरने कार चालु केली आणि रोहनला फोन लावला..
“बोल रे.. काय झालं? भेटली रती?”, रोहन
“नाही रे.. च्यायला ती दहा दिवस कुठे तरी विपश्यनेला गेली आहे..”, कबीर
“असं अचानक? काही बोलली पण नाही..”
“हो ना.. फोन पण बंद असेल म्हणे दहा दिवस…आणि तिची आई.. तिची आई तर माझ्याशी असं बोलत होती जणू मी कोणी दारावर आलेला सेल्समन आहे.. आतमध्ये सुध्दा नाही घेतलं.. काय झालं असेल रे?”

कबीर बोलत होता तेंव्हा त्याच्या फोनवर दुसरा फोन येत होता…

“रोहन एक मिनीटं हं.. कुणाचा तरी फोन येतोय…”, कबीरने रोहनला होल्डवर ठेवुन मोबाईल-स्क्रिनवर कुणाचा फोन आहे ते बघीतला.
दुसरा फोन राधाचा होता..

“रोहन.. मी तुला नंतर फोन करतो.. राधाचा फोन आहे..” असं म्हणुन कबीरने लगेच रोहनचा फोन कट केला आणि राधाचा फोन घेतला
पलीकडुन राधाचा मुसमुसण्याचा आवाज येत होता..

“हॅल्लो कबीर.. दोन मिनीटं वेळ आहे का?”, पलीकडुन राधाचा हलका आवाज येत होता..
“राधा? काय झालं? आवाज का तुझा असा येतोय??”, कबीर
“अनुरागने डिव्होर्स पेपर्स पाठवलेत..”, राधा मुसमुसत म्हणाली..
“अरे व्वा.. मस्तच की.. हेच तर तुला हवं होतं ना? मग रडायला काय झालं?”, कबीर
“हो रे.. पण त्याने डिव्होर्सची कारण फारच घाणेरडी दिली आहेत.. म्हणे मी तिकडे गोकर्णला…”, राधाने बोलता बोलता पॉज घेतला..
“हे बघ राधा… सोड ना.. डिव्होर्स हा नेहमीच ब्लेम-गेम असतो.. लिव्ह-इट…तुला जे पाहीजे ते मिळालंय ना?.. सो टेक इट अ‍ॅन्ड मुव्ह ऑन..”, कबीर
“हम्म.. फ़िलींग सो लोनली यार…इफ़ पॉसीबल, घरी येऊ शकतोस का? जस्ट कपल ऑफ़ ड्रिंक्स आणि मग गेलास तरी चालेल..”, राधा
“शुअर, व्हाय नॉट.. येतोच अर्ध्या तासात..”, असं म्हणुन कबीरने फोन ठेवुन दिला..

गाडी गेअर मध्ये टाकुन मुख्य रस्त्यावर येतो नं येतो तोच रोहनचा पुन्हा फोन आला. कबीरने फोन ब्ल्यु-टूथला टाकला आणि गाडीला गती दिली..

“काय म्हणत होती राधा?”, रोहन
“अरे गोची झालीए.. मी तिच्याकडेच चाललोय..”, रोहन
“का? काय झालं?”
“अरे त्या अनुरागने डिव्होर्सचे पेपर्स पाठवलेत तिला आणि कारणं काही भलती सलती दिलीत म्हणुन रडत होती बिचारी…”
“बिचारी?”
“हो मग.. एकटीच ए ती घरी.. मी येतो पट्कन जाऊन..”
“हे बघ कबीर.. माझं ऐकशील तर नको जाऊस आत्ता तिच्याकडे..”, रोहन समजावणीच्या सुरात म्हणाला.
“का?”
“अरे का काय? एकतर ती एकटी आहे घरी.. बिचारी.. त्यात दुःखी.. त्यात तु पण रती भेटली नाही म्हणुन अपसेट आहेस..”, रोहन
“तुला म्हणायचंय काय नक्की..”
“मला काय म्हणायचंय हे तुला नक्की कळतंय कबीर.. भावनेच्या भरात काही तरी होऊन बसेल.. तिला फोन करुन सांग नंतर येतो म्हणुन..”
“अरे काय? लहान ए का मी.. चल नंतर बोलतो तुझ्याशी..”, असं म्हणुन कबीरने फोन बंद केला..

रोहनने चिडुन दोन क्षण फोनकडे बघीतले आणि मग रतीचा नंबर फिरवला, परंतु जसं कबीर म्हणाला होता त्याप्रमाणे फोन स्विच्ड-ऑफ़ येत होता. पुन्हा एकदा प्रयत्न करुन त्याने फोन बंद केला.

त्याला काय करावं सुचत नव्हतं.. मग त्याने मोनिकाला फोन लावला..

“बोल शोनु.. काय करतोएस..”, मोनिका नेहमीच्याच मिस्कील टोन मध्ये म्हणाली..
“अरे सोड ते शोनु बिनु.. त्या कबीरला आधी फोन लाव आणि थांबव त्याला..”, रोहन
“का? काय झालं?”, मोनिका

रोहनने जेव्हढं भर-भर सांगता येईल तेव्हढं सांगीतलं आणि मग म्हणाला.. “मोना, कबीरला तु ओळखतेस आणि मी ही.. त्याला राधा अजुनही आवडते.. आणि कदाचीत राधाला पण तो.. आत्ता दोघंही एकटे आहेत.. अपसेट आहेत.. मला वाटतं..त्या दोघांनी असं घरी एकटं भेटणं योग्य नाही.. आय मीन.. मला तरी वाटतंय की कबीर आणि रती एकत्र यावेत.. असं असताना…”

“हम्म.. आलं लक्षात.. तु म्हणतोस ते बरोबर आहे.. मी बघते बोलुन कबीरशी..”, असं म्हणुन मोनिकाने फोन बंद केला आणि कबीरचा नंबर फिरवला..

 

“कबीर.. कुठे आहेस?”, मोनिका
“अं.. बाहेर आहे जरा…”
“बाहेर? बाहेर म्हणजे कुठे?”
“ड्राईव्ह करतोय.. बोल ना..”
“कामात आहेस का?”
“हं.. मी राधाकडे चाललोय.. नंतर बोलुयात का?”
“अं.. नको..ऐक ना.. जरा महत्वाचं बोलायचं होतं…”
“…”
“कबीर.. ऐकतोएस.. का?”
“मोनिका हे बघ.. आपण जरा नंतर बोलुयात ओके..?” असं म्हणुन कबीरने फोन बंद केला आणि स्विच्ड ऑफ़ करुन टाकला.

 

कबीरचा फोन बंद बघुन मोनिकाने रोहनला फोन केला..

“रोहन्या.. अरे तो ऐकतचं नाहीए, बंद करुन टाकलाय फोन त्याने..”
“च्यायला ह्या कबीरच्या.. बरं तु कुठे आहेस आत्ता?”
“मी स्टुडीओमध्येच आहे..”
“शूट चालु ए का?”
“नाही.. जस्ट एडीटींग करतेय पिक्सचं..”
“बरं ऐक.. मी निघतोय इथनं.. तुझ्या इथे येतो.. तुला पिक-अप करतो आणि आपण थेट राधाच्या घरी जाऊ.. ओके?”
“हम्म.. ओके.. मी स्टूडीओ लॉक करुन खाली थांबते..”
“ओके.. बाय देन..”
“बाय…”

रोहन ऑफ़ीस बंद करुन मोनिकाकडे जायला निघाला तेंव्हा कबीर राधाच्या बिल्डींगच्या पार्कींगमध्ये गाडी लावत होता.

 

राधाने कबीरसाठी दार उघडले तेंव्हा ती अगदीच अवतारात होती. केस मोकळेच आणि अस्ताव्यस्त होते, डोळे आणि नाकाचा शेंडा रडुन लाल झालेला दिसत होता. हातामध्ये दोन-तिन टिश्यु पेपर्स चुरगळलेले धरलेले होते.

“यु ओके?”, कबीरने आत येत विचारले
“हम्म… सॉरी.. घरात जरा पसारा आहे..” सोफ़्यावरचे कपडे, पुस्तकं उचलत राधा म्हणाली..
“इट्स ओके.. बोल काय झालं..?”

राधाने काही न बोलता चॉकलेटी इन्व्हलोपमधील डिव्होर्सची नोटीस कबीरच्या हातात दिली.

कबीर सोफ़्यावर बसला आणि त्याने सुरुवातीपासुन शेवटापर्यंत ती नोटीस वाचुन काढली..

“खूप सॅड आहे हे राधा.. अनुरागसारख्या रिस्पॉन्सीबल आणि रिस्पेक्टेड माणसाकडुन तरी हे अपेक्षीत नव्हतं..”, नोटीस वाचुन झाल्यावर कबीर म्हणाला..
“बघ की..डिव्होर्ससाठी तर आम्ही दोघंही तयार होतो.. मग असे खोटे, खालच्या पातळीला जाऊन आरोप कश्याला करायचे?”, राधाचे पुन्हा डोळे भरुन आले होते.. “आणि सॅड पार्ट म्हणजे ही नोटीस त्याने माझ्या घरच्या पत्यावर पाठवली होती.. हे.. हे सगळं वाचुन माझ्या आई-वडीलांना काय वाटलं असेल कबीर??”
“हे बघ राधा.. तु आधी शांत हो.. मी पेग बनवतो.. काय बनवु?”, कबीर सोफ़्यावरुन उठत म्हणाला..
“अ‍ॅन्टीक्वेटी ९०.. ऑन द रॉक्स..”, राधा म्हणाली..

कबीरने कपाटातुन व्हिस्कीची बॉटल काढली आणि दोघांसाठी दोन पेग बनवले..

“अनुराग आणि मी दोन वर्ष एकत्र होतो कबीर.. इतकं तर त्याला कळायला हवं ना की मी इतक्या खालच्या पातळीला जाईन का? तिकडे गोकर्णमध्ये मी काय त्या हिप्पी लोकांबरोबर झोपायला रहात होते का? एम आय अ बिच कबीर??”, राधा मुसमुसत म्हणाली..
“राधा.. मी म्हणालो ना तुला.. इट्स ऑल ए ब्लेम गेम.. त्याला फ़क्त हे सिध्द करायचंय की तो सही आहे.. तु चुक आणि म्हणुन हा डीव्होर्स होतोय..”, कबीर राधाला समजावणीच्या सुरात म्हणाला..

राधाने आपला पेग संपवला आणि दुसरा बनवला..

“मान्य आहे कबीर.. पण हे सगळं मी मुकपणे मान्य करु का? तेथे सेशन्स-कोर्टात डिव्होर्सच्या आधी माझे आई-बाब पण बरोबर असणार.. त्यांच्यासमोर मी म्हणु की हे खरं आहे? आणि जर का हे अमान्य केलं.. तर त्या केसला पुन्हा फाटे फुटतील.. खर्‍या-खोट्याची शहानीशा करण्यासाठी वकील आपल्या बाह्या सरसावुन पुढे सरकतील.. आणि न जाणो पुढचे कित्तेक महीने हेच चालु राहील…”

राधाने आपला दुसरा पेगही एव्हाना संपवला आणि तिसरा भरला..

“राधा.. सांभाळुन.. डोन्ट ओव्हरड्रिंक ओके?”, कबीर

पण राधाचं त्याच्याकडे लक्षचं नव्हतं.. ती स्वतःशीच जणु बोलत होती.. तिने तिसरा पेगही बॉटम्स-अप केला. व्हिस्कीचा तो गरम पेग तिच्या घश्याला जाळत गेला. तिच्या कपाळावर आठ्यांच एक जाळं पसरलं.. तिने ग्लास टेबलावर आपटला आणि चेहर्‍यावर कोसळणारे केस सांभाळत ती खुर्चीकडे सरकली आणि तिचा तोल गेला.

“राधा.. सांभाळ..”, कबीर पट्कन सोफ्यातुन उठला, त्याने राधाला खांद्याला धरुन सोफ़्यावर बसवले..

राधाने दुःखाने आपले डोळे बंद केले होते..

“कबीर.. खरंच आयुष्याचे निर्णय घेताना मी चुकलीए का रे?”
“नाही राधा.. आपण आपल्या आयुष्याचे मालक असतो ना? मग आपले निर्णय आपण सार्थ ठरवायचे असतात.. ते चुकले तर मार्ग बदलायचा, पण जे आपल्याला हवंय ते साध्य करुन घ्यायचंच..”
“कित्ती छान बोलतोस तु कबीर.. हम्म.. लेखक आहेस नं म्हणुन असं बोलु शकतोस.. पण माझं काय? माझे विचार म्हणजे फ़क्त कचराच असतो सगळा..”

राधा सोफ़्यावर थोडीशी कलंडुन कबीरच्या खांद्याला टेकुन बसली..
कबीरच्या ह्र्दयाची धडधड कमलीची वाढली होती..

“मी नेहमीच फ़क्त आणि फ़क्त माझाच विचार केला कबिर.. मला काय हवंय, इतरांसाठी कधीच वागले नाही.. पण आता वाटतंय.. ह्यामुळेच मी आज एकटी आहे.. मन मोकळं करावं..कुणाचा सल्ला घ्यावा असं कोणीच नाही रे माझ्या आयुष्यात.. असं वाटतंय कंटाळा आलाय ह्या एकटेपणाचा.. आज तिशीत असतानाच ही परीस्थीती.. पुढे जाऊन तर काय होईल मग?.. असं वाटतं.. असं वाटतं की कोणी तरी हवं सोबतीला..”

तिने अचानक डोळे उघडुन कबीरकडे बघीतलं…

“आठवतंय.. त्या दिवशी बिचवर मी तुला काय म्हणाले होते?”
“काय?”
“आय.. लव्ह.. यु.. कबीर.. असंच म्हणाले होते ना…”
“हम्म..”
“आय स्टील लव्ह यु कबीर.. आय वॉंट यु इन माय लाईफ़… नॉट जस्ट फ़ॉर सम टाईम.. बट फ़ॉर लाईफ़-टाईम…. होशील तु माझा???”

कबीर ह्या अनपेक्षीत धक्याने बधीर होऊन गेला..

“किस मी डीप कबीर… आय वॉंन्ट टु लिव्ह इन धीस मोमेंट.. प्लिज कीस मी..”, राधाने डोळे बंद केले….

कबीरला आपल्या शरीरातल्या नसां-नसा फुट्तील की काय असं वाटत होतं…

“राधा.. मला वाटतं तु शुध्दीत नाहीएस.. आपण नंतर बोलुयात का?”
“कमऑन कबीर.. इट्स जस्ट ३ पेग्स.. मी इतकी पण कमकुवत नाहीए.. पुर्ण शुध्दीत आहे मी.. हे बघ..” असं म्हणुन राधा सोफ़्यावरुन उतरुन कबीरसमोर उभी राहीली.. “बघ.. मी सरळ उभी आहे नं..”

“हम्म…”

अचानक राधा आपल्या गुडघ्यावर वाकली आणि कबीरचा हात हातात घेऊन म्हणाली.. “लेट्स गेट मॅरीड?”

 

रोहन आणि मोनिका संध्याकाळच्या ट्रॅफीकमधुन धरपडत राधाच्या घरापाशी पोहोचले…

“शिट्ट रोहन.. एक तास लागला आपल्याला…”
“हम्म.. नॉट टु वरी.. कबीर आहे बघ अजुन..”, पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या कबीरच्या गाडीकडे बोट दाखवत रोहन म्हणाला.
“हो रे.. चल पट्कन..”

लिफ़्टसाठी न थांबता दोघंही चारमजले चढुन राधाच्या घरापाशी पोहोचले आणि त्यांनी बेल वाजवली..
बर्‍याच वेळानंतर राधाने दार उघडले..

“ओह हाय रोहन.. हा मोनिका..”, दोघांना दारात बघुन आश्चर्यचकीत होत राधा म्हणाली..
“कबिर आहे?”, रोहन
“हो.. आहे नं.. का? काय झालं?”

रोहनचा आवाज ऐकुन कबीरही आतमधुन बाहेर आला..

रोहन आणि मोनिका दोघंही कबीरचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होते..

“रोहन? काय झालं.. ये नं आतमध्ये ये…”, दोघांना आतमध्ये घेत कबिर म्हणाला..

दोघंही आतमध्ये आले..

“कॉफ़ी घेणार?”, राधाने विचारलं..
“अं.. नाही नको…”, मोनिका
“अगं घे.. मी टाकतंच होते.. बसा मी येतेच दोन मिनिटांत..”, असं म्हणुन राधा आतमध्ये गेली..

“इकडे कसे काय आलात दोघं?”, कबीरने रोहन आणि मोनिकाला विचारलं..
“कबीर.. एव्हरीथींग ऑलराईट?”, रोहनने विचारले..
“हो.. अ‍ॅबस्युलेटली? का?”, कबीर
“नाही तु म्हणालास ना मगाशी.. गोची झालीए.. राधा रडतीए वगैरे…”, रोहन
“हम्म. मगाशी ती डिस्टर्ब्ड होती.. पण एव्हरीथींग इज ऑलराईट नाऊ..”, कबीर हसत हसत म्हणाला..

रोहन पुढे काही बोलणार एव्हढ्यात राधा कॉफ़ीचे कप घेऊन बाहेर आली.

कॉफ़ी पिताना रोहन आणि मोनिका दोघांनीही एक गोष्ट नोटीस केली की कबीर आणि राधा एकमेकांकडे बघुन मधुनच हसत होते.. तर दोघांच्या काहीतरी खाणाखूणा चालल्या होता..

शेवटी न रहावुन रोहनने विचारले… “तुमच्या कानगोष्टी चालणार असतील.. तर आम्ही जाउ का?”
“नाही रे.. सॉरी.. प्लिज बस..”, कबीर रोहनला थांबवत म्हणाला..

“अ‍ॅक्युचली.. इट्स टु अर्ली.. पण आम्हाला तुम्हा-दोघांना काहीतरी सांगायचंय..”, राधा कबीरकडे बघत म्हणाली..
“काय झालंय..”, रोहन आणि मोनिकाने एकमेकांकडे चिंतीत नजरेने बघीतले आणि विचारले..

एक मोठ्ठा पॉज घेऊन राधा म्हणाली.. “वुई आर गेटींग मॅरीड…”

[क्रमशः]

पिक्चर अभी बाकी है दोस्तो.. पुढचा भाग शेवटचा …

इश्क – (भाग २५)


भाग २४ पासुन पुढे >>

कबीरची झोप मोडली ते केंव्हापासुन वाजणार्‍या फोनच्या आवाजाने. आदल्या दिवशी रात्री नातेवाईकांचा सगळा गोतावळा लग्नासाठी येऊन थडकला होता. सगळ्यांना भेटून, गप्पा-टप्प्पांमध्ये कबीरला झोपायला मध्यरात्र उलटुन गेली होती. त्याने घड्याळात बघीतले, ८च वाजत होते.

काही सेकंदांनी पुन्हा फोन वाजु लागला.

वैतागुन त्याने फोन उचलला…

“कबीर.. ए कबीर.. अरे झोपलाएस का?”, पलीकडुन राधा फोनवर ओरडत होती..
“राधा? हा कुठला नंबर आहे तुझा…?”, कबीर राधाचा आवाज ऐकताच खडबडुन जागा झाला..
“काय करतो आहेस?”, त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन राधा म्हणाली..
“झोपलोए.. सकाळी झोपेतच असतात बहुतेक लोकं..”
“पेपर बघीतलास आजचा?”, राधा
“मी झोपलोय म्हणलं तर! झोपेत वाचेन का पेपर…”
“बरं बरं.. व्हेरी गुड.. एक काम कर, पट्कन एम.जी.रोड वर ये.. तुला काही तरी दाखवायचंय..”
“राधा.. अगं मी अजुन बेडमध्येच आहे.. वेळ लागेल मला.. काय काम आहे बोल नं..”
“ते तु इथे आल्याशिवाय कसं सांगू? ये पट्कन, मी वाट बघतेय.. मार्झोरीन समोर थांब..”, असं म्हणुन कबीरला बोलायची संधी न देता राधाने फोन बंद करुन टाकला..

“काय मुलगी आहे ही.. अशी एकदम गायब होते.. एकदम कुठुन तरी अवतरते.. काही कॉन्टेक्स्ट नाही.. एम.जी.रोडला ये म्हणे…”, चरफडत आणि स्वतःशीच बडबड करत कबीर अंथरुणातुन उठला आणि फ़्रेश व्हायला बाथरुममध्ये गेला..

 

कबीरने एम.जी.रोडच्या कॉर्नरला पोहोचताच राधाला फोन केला. काही वेळातच राधा कुठुनतरी धावत धावत येऊन कबीरच्या समोर येऊन थांबली..

“पाहीलंस?”, राधा
“काय?”, गोंधळुन कबीर म्हणाला..
“चं.. अरे ते बघ ना समोर…”, समोरच्या एका जाहीरातीच्या फलकाकडे बोट दाखवत राधा म्हणाली..

समोर ‘स्ट्रॉबेरी ट्रॅव्हल्स’च्या जाहीरातीचा फ़लक होता.. आणि जाहीरातीत राधाचा मोठ्ठा फोटो.. “कम व्हिजीट युरोप” वगैरे म्हणत..

“ऐल्ला.. तु मॉडेलींग वगैरे चालु केलेस की काय?” कबीर डोक्याला हात लावत म्हणाला..
“अरे नाही.. मी मागच्या आठवड्यात इटलीवरुन परत आले.. ऑफ़ीसमध्ये गेले तेंव्हा अवंतिका.. माझी बॉस आणि अ‍ॅड एजंसीची हेड समीरा.. दोघींचा काहीतरी वाद सुरु होता.. टुरीझमचा सिझन सुरु होतोय आणि आम्हाला युरोप मार्केट करायचं होत.. त्यासाठी आधीच खूप उशीर झाला होता आणि त्या दिवशी फोटो-शुट होतं आणि ती मॉडेल कुठे तरी गायब झाली होती.. तिचं म्हणे ब्रेक-अप झालं आणि ती डिप्रेशन मध्ये गेलीय वगैरे वगैरे काहीतरी चालु होतं..”, राधा सांगत होती..
“मग?”, कबीर..
“समीराने अजुन दोन-तिन मॉडेल्सचे फोटो आणलेले.. पण अवंतीला एकतर कुठले आवडले नाहीत.. आणि त्या लगेच अव्हेलेबल पण नव्हत्या.. अजुन १-२ दिवस शुट पुढे जात होतं.. मी कॉलेजच्या दिवसांत काही असेच फोटो काढले होते..गुगल-ड्राईव्हवर होतेच ते अपलोड केलेले.. ते दाखवले अवंतीला.. तर तिला आवडले.. कदाचीत अगदीच मनाप्रमाणे नसतील.. पण दुसरा पर्याय पण नव्हता.. समीराने पण मान्यता दिली मग काय.. लगेच त्याच दिवशी दुपारी शुट-ड्न.. थोडं फोटो-शॉप एडीटींग, प्रिटींग करुन एका आठवड्यात.. हिअर आय एम..”, समोरच्या फलकाकडे हात दाखवत राधा म्हणाली..
“धन्य आहेस तु.. कधी कुठे काय करशील तुलाच माहीत…”, कबीर
“अरे इथेच काय.. अजुन बर्‍याच ठिकाणी लागतील हे बोर्ड्स.. आज सगळ्या लिडींग पेपर मध्ये पण अ‍ॅड आहे आमची..”, राधा अभिमानाने बोलत होती..आणि कबीर डोळ्याची पापणीही न हलवता तिच्यातला तो खळाळता उत्साहाचा झरा न्हाहाळत होता.

“कबीर..”, अचानक गंभीर होत राधा म्हणाली.. “त्या दिवशी तु प्रसंगावधान राखुन गोकर्णमध्ये मला वाचवलं नसतंस तर कदाचीत मी आजही कोर्टाच्या फ़ेर्‍यांमध्येच अडकले असते.. माझं हे नविन आयुष्य केवळ तुझ्यामुळे.. थॅंक्स अ लॉट वन्स अगेन..”

बोलता बोलता राधाने कबीरच्या हातावर हात ठेवला..

“..आणि म्हणुनच मी तुझ्यासाठी काही तरी करायचं ठरवंलय..”
“आता काय करते आहेस…”, कबीर
“मी ना.. ह्या अ‍ॅड चे पैसे नाही घेतले..”
“माझ्यासाठी?”
“ऐक तर…. ते पैसे मी घेतले नाहीत.. त्या ऐवजी.. ह्या महीना अखेरीस आम्ही स्विझरलॅडला चाललो आहोत.. ८ दिवसांसाठी.. आणि तु येतो आहेस आमच्याबरोबर..”
“म्हणजे?”
“अरे म्हणजे.. त्या पैश्यांऐवजी मी तुझ्यासाठी स्विसची टुर बुक केलीय…”
“व्हॉट??? आणि म्हणजे तुला एव्हढे पैसे मिळत होते त्या अ‍ॅडचे..”
“नाही रे.. पण हे बघ.. टुरची कॉस्ट जी आम्ही जाहीरात करतो ती अर्थात मार्जीन धरुन असते.. खरी कॉस्ट कमीच असते.. शिवाय मी एम्प्लॉई.. थोडा डिस्काऊंट मिळवला.. ते केलंय मी अ‍ॅडजस्ट.. पुढच्या आठवड्यात मी सांगेन ते डॉक्युमेंट्स दे.. तुझा व्हिसा टाकु लगेच प्रोसेसिंगला…ओके?”
“हम्म ठिक आहे..”
“बरं चल.. ब्रेक-फ़ास्ट केला आहेस?”
“नाही.. कार्यालयातच करेन..”
“कार्यालयात?”

अचानक कबीरला आठवले आज लग्न आहे.. त्याने घड्याळात नजर टाकली.. ९ वाजुन गेले होते.. १०.३० ला त्याला रतीला घेऊन कार्यालयात पोहोचायचे होते..

“ओह डॅम्न.., राधा मला जायला हवं..”, कबीर
“का? काय झालं?”
“अगं.. लग्न आहे श्रेयाचं.. माझ्या चुलत बहीणीचं.. मी अजुन तयार पण नाही… मला आवरायचंय.. रतीला पिक-अप करायचंय..मेलो मी..”, कबीर
“रती? रती कोण?”, रतीच नाव ऐकताच राधा सावध झाली..

कबीरला काय बोलावं सुचेना..
“रती.. अं फ़्रेंड आहे माझी…”
“ओह तीच का ती.. तु फोटो पाठवला होतास त्यात तुझ्या शेजारी होती ती?”
“हम्म तिच..चल पळतो मी..”
“एssss उर्मट.. तुझ्या बहीणीचं लग्न आहे आणि मला इन्व्हाईट पण नाही?”
“अगं तु नव्हतीस इथे.. मग मी काय करणार..?”
“पण आता आहे ना?”
“ओह येस.. ये ना मग…”
ये ना मग?? हे असं इन्व्हाईट.. नको त्यापेक्षा.. जाऊ देत.. असं बळंच नको..स्वतःहुन म्हणाला असतास तर विचार केला असता..”
“ए आता उगाच नाटकं नको करुस.. खरंच ये.. उशीर झाला ना.. गडबडीत सुचलं नाही.. ये नक्की वाट बघतोय.. पत्ता पाठवतो व्हॉट्स-अ‍ॅपवर..”, असं म्हणुन कबीर निघुन गेला..

 

कबीर रतीकडे पोहोचला तेंव्हा ११ वाजुन गेले होते.. एव्हढ्या वेळात दहा वेळा रतीचा फोन येउन गेला होता.. आणि कबीर फ़क्त आल्यावर बोलु एव्हढंच बोलत होता..
कबीर रतीच्या घरी पोहोचला तेंव्हा रती पार्कींगमध्ये येऊन थांबली होती.

गुलाबी रंगाचा त्यावर सोनेरी रंगाची नक्षी केलेला घागरा-चोली तिने घातला होता, पायात किंचीत हाय-हिल्स असलेले चंदेरी रंगाचे चमचमते सॅंन्डल्स, ड्रेसला साजेसा गालावर फ़िक्कट गुलाबी रंगाची छटा असलेला मेक-अप तिने केला होता. डोळ्यात हलकेसे काजळ आणि आयलायनरने डोळ्यांच्या रंगवलेल्या कडांमुळे आधीच सुंदर असलेले तिचे डोळे अधीकच सुंदर भासत होते.

हातातल्या डझनभर बांगड्या आणि खांद्यावरुन पाठीमागुन हातांवर गुंडाळलेली ओढणी सांभाळत रती गाडीमध्ये बसली..

“कशी दिसतेय?”, रती..
“सिंड्रेला…”, कबीर नकळत बोलुन गेला…
“अं?”
“खूप मस्त दिसतेस..”
“चं.. काय रे.. लेखक आहेस ना तु..? काही तरी मस्त कॉम्लीमेंट दे की.. काय आपलं तें तेच नेहमीची वाक्य..”, हसत हसत रती म्हणाली..
“बरं.. मग लिहुनच पाठवीन रात्री व्हॉट्स-अ‍ॅप वर.. आत्ता निघुया?”
“हो चला.. आधीच उशीर झालाय… ए.. पण का उशीर झाला एव्हढा?”

कबीरने गाडी सुरु केली आणि तो स्विझरलॅड-ट्रिप चा भाग वगळुन राधाच्या भेटीबद्दल रतीला सांगीतले..

“ती पण येतीय लग्नाला..”, शेवटी कबीर म्हणाला

रती काहीच बोलली नाही, पण तिला राधाचं लग्नाला येणं समहाऊ आवडलं नसावं असं कबीरने ताडलं..

 

कबीर कार्यालयात पोहोचला तेंव्हा बराच उशीर झाला होता, पार्कींग केंव्हाच भरुन गेले होते. कबीरने रस्त्यावरच गाडी लावली आणि रतीला घेऊन तो आतमध्ये गेला.

“अहो काय शेठ.. किती उशीर?”
“कबीर अरे काय? किती वाजले..सकाळी ब्रेकफ़ास्टला येणार होतास…”
“काय रे ब्रो? कित्ती वाट पहात होते सगळे तुझी?”

एक ना अनेक.. कबीरवर उशीरा आल्याबद्दल प्रश्नांचा भडीमार चालु होता. कबीर मात्र तडक रतीला घेऊन आई-बाबांकडे गेला.

“आई- बाबा.. ही रती.. रती.. हे माझे आई-बाबा..”, कबीरने एकमेकांशी ओळख करुन दिली..

रतीने खाली वाकुन दोघांना नमस्कार केला..

“गोड आहेस गं..”, रतीच्या ह्नुवटीला धरत कबीरची आई म्हणाली.
कबीरने हळुच बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघीतले आणि बाबांनीही हसत हसत हळुच छान आहे अशी खुण केली.

आई आणि रतीला थोड्यावेळ गप्पा मारायला सोडुन कबीर बाहेर खुर्च्यांवर येऊन बसला.
थोड्यावेळाने रतीपण त्याच्या शेजारी येउन बसली.

अधुन मधुन कबीरच्या नात्यातले कोण-ना-कोण येऊन जात होते. कबीर त्यांची आणि रतीची ओळख करुन देत होता.. पण त्याचे लक्ष मात्र घड्याळाकडे आणि कार्यालयाच्या दाराकडे लागुन राहीले होते. मनातुन कुठेतरी त्याला राधा यायला हवी होती, तर दुसरे मन राधा नाही आली तर बरेच होईल असेही म्हणत होते.

नवरा मुलगा आणि नवरी मुलगी शेवटचे विधी संपवुन कपडे बदलायला गेले होते.
“तुम्हा मुलींची खरंच कमाल असते हां.. बघ ना.. श्रेयाचंच.. एक-दोनदा काय भेटले, एकमेकांना पसंद केलं आणि लगेच लग्न? बरं तर बरं.. असा एकदम देश सोडुन त्याच्या घरी जाणार रहायला..”, कबीर म्हणत होता..
“मला नाही वाटत ह्यामध्ये दिवसांनी काही फ़रक पडतो. कधी कधी एका भेटीतही समोरचा आपल्याला अगदी जवळचा वाटतो.. कधी कधी कित्तेक महीन्यांच्या भेटीतही नाळ जुळत नाही..”, रती
“हो बरोबर आहे.. पण आता माझं आणि मोनाचं बघ.. दोघं एकमेकांना इतकं चांगलं ओळखत होतो, एकमेकांच्या प्रेमात होतो.. एकत्रही रहायला लागलो होतो.. पण अचानक सगळं बिघडलं.. इतक्या टोकाला गेलं की..”
“कबीर.. आपण शेवटी माणसं आहोत.. रोबोट्स नाही, एकदा प्रोग्रॅम केले की लाईफ़-लॉग ठरवल्याप्रमाणे वागतील. कितीही, काहीही झालं तरी परीस्थीतीनुसार लोकं थोडीफ़ार बदलतातच.. स्वाभावीक आहे ते..”
“म्हणजे.. तुला म्हणायचंय मोना बरोबर होती, मी चुक?”
“नाही, तसं मला म्हणायचं नाहीये. माझा मुद्दा हा आहे की लग्न, नाती जमणं हा जसा नशीबाचा एक भाग आहे तसा एकमेकांशी जुळवुन घेण्याचाही. त्यामध्ये एकमेकांना किती दिवसांपासुन ओळखतो हा मुद्दा दुय्यम आहे..”

कबीरने बोलता बोलता सहज समोर बघीतले, दाराआडुन त्याचे आई-बाबा कबीर-रतीकडे बघत होते. कबीरची नजरानजर होताच दोघंही पट्कन आत निघुन गेले..

“म्हणजे तुझा लग्न-संस्थेवर विश्वास आहे तर…”, कबीर
“अर्थात. मला लग्न करायला.. आपलं घर सोडुन दुसर्‍याच्या घरी जाऊन नवीन सुरुवात करायला, नवीन नाती जोडायला खूप आवडेल..”, रती

कबीर पुढे काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला.

राधाचा फोन होता..

“कबीर.. बाहेर ये ना.. मी गेटपाशी आहे…”
“हो आल्लोच..”, असं म्हणुन कबीर राधाला रिसीव्ह करायला बाहेर गेला.

रतीने नकळत आपला ड्रेस निट केला, मोबाईलच्या कॅमेरात पाहुन केस निट केले आणि उगाचच मोबाईलवरचे मेसेजेस बघण्यात मग्न होऊन गेली.

थोड्याच वेळात कबीर राधाला घेऊन रती बसली होती तेथे आला.

“रती.. मिट राधा… राधा .. ही रती..”, कबीरने दोघींची एकमेकांशी ओळख करुन दिली..
“हाय राधा…”, रती म्हणाली..
“हाय रती.. यु आर ब्युटीफुल..”, शेजारची खुर्ची ओढुन त्यावर बसत राधा म्हणाली..
“थॅंक्स.. बट यु आर गॉर्जीयस..”, रती

दोघीही हसल्या..

“सो.. सकाळी गडबडीत बोलता आले नाही.. हाऊ वॉज इटली..”, कबीर..
“इटली.. वॉव.. ऑस्समच आहे एकदम.. आम्ही खुप फ़िरलो.. आर्ट फ़ेअर्स, म्युझीअम्स..फ़ोटोग्राफ़ी एक्झीबिशन्स.. रेस्तॉरंट्स.. नेपल्सचे समुद्र किनारे तर अमेझींग आहेत.. यु शुड डेफ़ीनेटली व्हिजीट…”, राधा बोलत होती
“वॉव.. मस्त राधा.. सही लाईफ़ आहे तुझी.. मज्जा नै मस्त मस्त ठिकाणं फ़िरायला मिळतात..”, रती म्हणाली..
“हम्म..पण मी स्ट्रगल करुन ही लाईफ़ मिळवली आहे.. त्यासाठी कित्तेक गोष्टी सोडल्या आहेत, कित्तेक लोकांची मनं दुखावली आहेत.. कबीर नोज बेटर.. ना कबीर..”, राधा कबीरकडे बघत म्हणाली..

तिघं जण बोलत असताना तिकडुन कबीरची आई चालली होती.. राधाला बघुन ती परत आतमध्ये गेली आणि तिने कबीरच्या वडीलांना बाहेर बोलावलं..

“अहो, एक मिनीटं बाहेर या..”
“का? काय झालं..?”
“अहो..ती रती-कबीरबरोबर बसलीए ती.. ती राधा आहे का?”

कबीरच्या वडीलांनी त्याच्या आईला कबीरशी फोनवर झालेलं बोलणं सांगीतलं होतं..
कबीरच्या वडीलांनी हळुच डोकावुन बघीतलं..

त्यांनी राधाला टीव्हीवर बघीतलं होतं तेंव्हा ती खूप वेगळीच दिसत होती. पण साधारण चेहरा ओळखीचा वाटला तसे ते म्हणाले..
“हो बहुतेक.. तिच आहे ती..”
“अहो पण.. मग ती इथे कश्याला आलीय? कबीर आणि रती कित्ती छान दिसत आहेत एकत्र.. ही कश्याला उगाच मध्ये तिथे?”
“आता मला काय माहीत.. कबीरनेच बोलावले असेल तिला..”
“काय करावं ह्या मुलाचं..”, डोक्याला हात लावुन त्याची आई निघुन गेली.

इकडे तिघांच्या गप्पा चालु होत्या तेव्हढ्यात एक आज्जीबाई डुलत-डुलत राधापाशी आल्या आणि म्हणाल्या.. “अगं.. पेपरात ती जाहीरात आलीय त्यातली ती मुलगी तुच का?”

राधा हसली आणि म्हणाली.. “हो आज्जी मीच ती..”
“एक.. सेल्फ़ी काढू का तुझ्याबरोबर..” असं म्हणुन त्या आज्ज्जीबाईंनी राधाबरोबर एक-दोन फ़ोटो काढुन घेतले आणि त्या निघुन गेल्या.

आणि थोड्याच वेळात ती बातमी इतरत्र पसरली.. काही क्षणातच राधा सेलेब्रेटी झाली.. कोण ना कोण येऊन तिच्याबरोबर फ़ोटो काढुन घेत होते. शेवटी राधाच एका ग्रुपबरोबर फोटो काढायला तेथुन निघुन गेली..

“कबीर.. अरे तुझी गाडी कुठेय?”, कबिरचे बाबा एव्हाना तेथे आले होते..”
“बाहेरचं आहे.. आत पार्कींग नाही मिळालं..”, कबीर..
“व्हेरी गुड.. एक काम कर ना श्रेया आणि तिच्या नवर्‍याला देवदर्शनाला घेऊन जायचंय.. जवळंच आहे इथे.. पण त्यांच्या गाडीच्या मागे कोणतरी गाडी पार्क करुन गेलंय.. जातोस?”
“हो.. जातो की.. त्यात काय एव्हढं..” असं म्हणुन रतीला दोन मिनिटांत येतो सांगुन कबीर बाहेर पडला.

 

कबीर गेल्यावर रती एकटीच राहीली होती. मोनिकाचं महत्वाच फोटोशुट असल्याने ती आली नव्हती तर रोहन त्याच्या आज्जीची तब्येत बिघडल्याने दोन दिवसांपुर्वीच गावी गेला होता. त्यामुळे ते दोघंही नव्हते.

थोड्यावेळाने राधा रती शेजारी येऊन बसली..

“कबीर कुठे गेला?”, राधा..
“अं तो बाहेर गेलाय ते देवदर्शन करायला गाडी घेऊन गेलाय, येईलच १५ मिनीटांत”.. रती
“ओह ओके..”

एक विचीत्र संवादाची पोकळी दोघींमध्ये निर्माण झाली होती. काय बोलावं कुणालाच सुचेना.. अचानक दोघीही एकदमच म्हणाल्या..

“तु आणि कबीर…”

मग दोघीही हसल्या.. अर्थात त्यामुळे दोघींमध्ये निर्माण झालेलं टेंन्शन थोडं कमी झालं..

“नाही.. तसं काही नाहीए आमच्या दोघांत.. मी आणि कबीर एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत..”, राधा म्हणत होती..”कबीर माझ्याबरोबर माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात होता.. तो तेंव्हा नसता.. तर आज मी इथे नसते.. आय ओ हीम ए बिग थिंग.. पण खरंच आमच्या दोघांत तसं काही नाहीए.. इन्फ़ॅक्ट माझं तसं कुणाबरोबरंच काही नाहीए…”, हसत हसत राधा म्हणाली..

“का?”,रती
“म्हणजे मला माझं आयुष्य असं मोकळेपणाने जगायचंय.. मला असा कोणीतरी हवाय जो मला रिस्ट्रिक्ट करणार नाही.. तर मला मोकळीक देईल.. मला माझं आयुष्य जसं मला हवंय तसं जगु देईल..”, राधा

“माझ्या बाबतीत अगदी उलटं आहे..”,रती म्हणाली.. “उलट मला असा कोणीतरी हवाय जो सतत माझ्या आजुबाजुला असेल..जो मला दिवसांतुन पन्नास वेळा फोन करेल.. मी कुठे आहे, काय करतीएस विचारेल.. मला ना, अश्या सुखद बंधनात कायमंच अडकुन रहायला नक्कीच आवडेल..”
“मग तुझं आणि कबीरचं नक्की जमेल.. तो अगदी तुझ्यासारखाचं आहे..”, राधा
“खरंच?”, रती एकदम आनंदाने बोलुन गेली.

काही क्षण दोघी एकमेकांकडे पहात होत्या. शब्द नसले तरीही तो मुक संवाद खुप काही बोलुन गेला. रतीच्या डोळ्यांमध्ये कबीरसाठी असलेलं प्रेम राधा स्पष्ट पाहु शकत होती.

“बरं चलं, मला निघायला हवं..”, अचानक राधा म्हणाली
“अं? अग आत्ता तर आलीएस ना.. अजुन लग्न पण नाही लागलंय..”, रती
“हो गं, पण खरंच थोडं महत्वाचं काम आहे..”
“पण कबीर येईपर्यंत तरी थांब.. त्याला भेटुन जा नं..”, रती
“नाही नको.. त्याला सवय आहे माझ्या अश्या अचानक निघुन जाण्याची.. तो नाही काही बोलणार.. चल.. भेटु परत कधी..”, असं म्हणुन राधा तेथुन निघुन गेली.

 

पाचंच मिनिटांत कबीर आला..

“हे काय.. राधा कुठेय?”, कबीर ची नजर राधाला शोधत होती..
“जस्ट गेली ती..”, रती म्हणाली..
“म्हणजे?”
“तिला काही तरी महत्वाचं काम होतं म्हणुन गेली ती..”, रती
“अरे अशी कशी गेली.. थांबवायचं नाहीस का तु तिला..”, कबीरचा आवाज अचानक वाढला.. इतका की आजुबाजुला बसलेली लोकं त्यांच बोलणं थांबवुन कबीर आणि रतीकडे पाहु लागली
“कबीर.. मी म्हणले तिला.. कबिरला भेटुन जा.. तिने ऐकलं नाही, यात मी काय करणार..”, कबीरच्या अचानक वाढलेल्या आवाजाने रती भांबावुन गेली..
“मला फोन तरी करायचास ना..”
“मी का तुला फोन करु.. राधा तुझी मैत्रीण आहे, माझी नाही. तिने तुला फोन करायला हवा होता.. तिला वाटलं नाही करावासा.. तु मला का सांगतोएस हे..”

“किती वेळ झाला जाऊन…”
“पाचच मिनीटं…”, रती दुसरीकडे बघत म्हणाली..

कबीर धावत धावत राधा दिसतेय का बघायला बाहेर पळाला..
कबीर दिसेनासा होईपर्यंत रती त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात राहीली, मग तिने आपली पर्स उचलली, कार्यालयाच्या बाहेर आली, आणि रिक्षात बसुन निघुन गेली.

 

राधा पुनमच्या आलिशान फ्लॅटमधील प्रशस्त टेरेसमध्ये डोकं धरुन बसली होती.
“काय घेणार? थंड बिअर आणु?”, पुनमने विचारलं
“श्शी नको.. कडवट होईल तोंड.. स्मर्नऑफ़ चालेल आणि ऑन-द-रॉक्स प्लिज…”, राधा
“ओके..”, पुनम हसुन परत आत गेली आणि येताना दोघींसाठी दोन लार्ज पेग्स आणि चिप्स घेऊन परतली
“सो अ‍ॅज आय अंडरस्टॅंड.. तुला कबीर आवडतो.. कबीरला तु आवडतेस.. पण रतीला पण कबीर आवडतो.. मग.. मग तुला रती आवडते का?”, पुनम गोंधळुन म्हणाली..
“ओह कमऑन पुनम.. मला कश्याला रती आवडेल…”, राधा वैतागुन म्हणाली..
“सॉरी.. सॉरी.., पण मग तुम्ही दोघं एकमेकांना आवडताय, तर प्रॉब्लेम कुठे आहे? तुला कबीर हवाय? का नकोय?” पुनम
“मला कबीर हवाय पुनम.. पण माझ्या टर्म्स वर.. म्हणजे त्याला जशी मी हवीय तशी मी होऊ शकत नाही हे नक्की.. तो अ‍ॅडजस्ट करायला तयार असेल तर.. आय मीन लुक.. दर वेळेस मुलींनीच का अ‍ॅडजस्टमेंट करायची? त्यांच्यासाठी आपण आपली लाईफ़-स्टाईल.. आपलं करीअर त्यांच्या सोईने करायचं का? कबीर तसाही लेखकच आहे.. तो घर सांभाळायला तयार असेल तर..”

“खरं आहे तुझं.. पण आपली भारतीय मेंटालीटी बदलायला वेळ लागेल राधा.. आणि तो तयार असला तरीही त्याच्या घरच्यांच्याही काही अपेक्षा असतीलच ना एक सुन म्हणुन..”, थोडा विचार करुन पुनम म्हणाली..
“तेच तर.. कबीर ने ते ठरवावं पहीलं.. त्याला बायको हवीए का आई-वडीलांसाठी सुन..”, राधा
“तु कबीरशी बोलली आहेस ह्या विषयावर? आय मीन त्याला कधी क्लिअरली सांगीतलं आहेस की तुला पण तो आवडतो.. तु त्याच्याबरोबर एकत्र राहु शकतेस.. पण तुझ्या ह्या काही अटी आहेत वगैरे..”, पुनम
“नाही..”
“मग मला वाटतं तु त्याच्याशी हे सर्व बोलावंस.. पण हे बघ, हे असं एकदम अंगावर नको जाऊ त्याच्या तुझ्या अटी वगैरे घेऊन.. त्याला तुझ्याबाजुने करुन घे..त्याला इन्व्हॉल्व्ह कर तुझ्यात आणि मग बोल..”
“म्हणजे नक्की काय करु?”, राधा..
“इमोशन्स राधा इमोशन्स.. त्याला इमोशनल कर.. त्याच्यासमोर तु गरीब-बिचारी.. अबला..एकटी वगैरे आहेस हे भासव.. तुला त्याची गरज आहे हे त्याला इंडायरेक्टली जाणवुन दे.. मग बघ.. तो स्वतःहुन त्याचा खांदा तुला रडायला पुढे करेल..”, पुनम..
“पुनम्.. यु बिच..कसली आहेस अगं तु..”, राधा हसत हसत म्हणाली..
“सगळे पुरुष एकसारखेच असतात अगं.. दिसली दुःखी स्त्री.. की कर खांदा पुढे.. ट्राय इट.. आणि ऑल-द-बेस्ट..”

राधाने ग्लास बॉटम्स-अप केला आणि ती तेथुन बाहेर पडली..

[क्रमशः]

मंडळी, तुमच्या ढीग-भर प्रतीक्रिया,अपेक्षा, सजेशन्स ने खूप मज्जा आली.. प्रत्येकाचे कथेबद्दलचे, कबीर, रती,राधाबद्दलचे विचार वाचुन मस्त वाटलं. खरं तर ह्याच भागात कथा संपली असती, संपवता आली असती.. पण अजुनही परफ़ेक्ट-ऐंडींग सापडत नाहीए.. सो शेवट पुढच्या भागात.. तो पर्यंत जरा विचार करायला ही वेळ मिळेल.. तोपर्यंत तुमची मतं, प्रतिक्रियांचा ओघ असाच चालु राहुद्या..

भेटुयात पुढच्या आणि कथेच्या शेवटच्या भागात..

– अनिकेत

इश्क – (भाग २४)


भाग २३ पासुन पुढे>>

“अशक्य आहे अरे हे सगळं.. असं कसं कोण करु शकतं..”, कबीरने आदल्या रात्रीचा किस्सा ऐकवल्यावर रोहन म्हणाला..
“हो ना अरे.. रात्रीचं असं निर्जन रस्त्यावर सोडुन गेला निघुन सरळ, काही वेडं वाकडं झालं असतं तर?”, कबीर
“नंतर काय केलंत मग? कुठे फ़िरलात?”, रोहन
“खोपोलीपर्यंत जाऊन आलो न मग.. सॉल्लीड भुक लागली होती, खरं तर मस्त धाब्यावर जाऊन जेवायचा विचार होता, पण एक तर रात्रीची वेळ, त्यात हिचे असे तोकडे कपडे.. एकट्याने ढाब्यावर जायची हिम्मत होईना.. मग फ़ुड-मॉलला हादडलं…”
“बरं केलं तिने ब्रेक-अप केला पिटरशी..तु तर खुशचं असशील..”, रोहन

“हो.. पण अरे.. मला थोडं असं इम्मॅच्युअर बिहेव्हिअर वाटलं तिचं.. आय मीन.. पिटरने जे केलं ते चुकीचंच होतं.. पण असं तडका-फ़डकी ब्रेक-अप म्हणजे..”, कबीर थोडा विचार करुन म्हणाला.

“म्हणजे काय अरे? कोण सहन करेल असला फ़ालतुपणा.. आणि तुला काय माहीत ह्या एका गोष्टीमुळेच तिने ब्रेक-अप केले असेल.. कदाचीत आधीपासुनच्या अनेक गोष्टी असतील साठलेल्या मनात.. हे एक कारण झालं.. एव्हढंच..”, रोहन

“असेलही.. पण ती थोडी अल्लड, इम्मॅच्युअर वाटते मला..”,कबीर
“आणि तु काय फ़ार मॅच्युअर वगैरे समजतोस का स्वतःला.. स्वतःचच बघ काय चाललंय.. आधी मोनिकाला सोडलंस..”
“एक मिनिटं, मी नाही मोनिकाला सोडलं.. तिनेच सोडलं होतं मला..” रोहनचं वाक्य तोडत कबीर म्हणाला..
“बर नंतर राधा…”
“ते ही मी नाही.. आधीच क्लिअर करतो.. ती नाही म्हणाली..”, कबीर..
“अरे हो.. मी कुठे म्हणालो तु ब्रेक-अप केलेस.. पण राधा मनात असतानाच..आता तुला रती पण आवडतेय..”
“मग? तुझं म्हणणं आहे.. एकदा राधा आवडली.. की मला कुणीच आवडु नये.. आणि राधा तर नाही म्हणालीय मला..मग काय मी तिची वाट बघत.. आयुष्यभर एकट्याने बसायचं का? माझ्याकडे का बोटं दाखवता..? तुम्हा कुणाला एक असताना दुसरी आवडत नाही का? नॅचरल आहे ते..”
“बर.. बरं.. ओके.. चिडु नकोस..जाऊ दे तो विषय.. आज संध्याकाळी एका पब्लीशरबरोबर मिटींग आहे.. ४.३० ला वगैरे.. कन्फ़र्म करु ना?”
“हम्म.. कर फ़ायनल..”, लॅपटॉपमध्ये डोकं खुपसत कबीर म्हणाला..

 

चार-पाच दिवसांनी, साधारणपणे बुधवारी रतीचा कबीरला फोन आला..

“शनिवारी सकाळी काय करतोएस?”, रती
“काही विशेष नाही..का?”
“घरी येतोस?”
“तुझ्या?”
“हो.. मग कुणाच्या?”
“का?”
“अरे सहज.. आपण एकमेकांना इतके दिवस ओळखतोय.. मी जनरली बोलवते माझ्या मित्र-मैत्रीणींना घरी…”
“ओके.. येतो.. ११.३० ठिक आहे?”
“चालेल, मी वाट बघते…”

 

ठरल्यावेळेप्रमाणे कबीर रतीच्या घरी पोहोचला. डेनिमची शॉर्ट आणि फ़िक्कट गुलाबी रंगाचा टी-शर्ट अश्या साध्या घरातल्या ड्रेसमध्येच रतीने दार उघडले.
“गुड मॉर्नींग..” चेहर्‍यावर गोड हास्य पसरवत रती म्हणाली.. “वेल-कम..”

कबीरने हातातल्या पिवळ्या फुलांचा बुके रतीच्या हातात दिला.

हॉलमध्ये रतीचे आई-बाबा सुध्दा बसलेले होते.
“वेल-कम यंग मॅन..”, रतीचे बाबा सोफ़्यावरुन उठुन कबीरशी हास्तांदोलन करत म्हणाले.

कबीर खुर्चीवर बसेपर्यंत रती पाणी घेऊन आली.

“कबीर .. तुझी ओळख करुन देते.. हे माझे आई-बाबा.. आणि आई-बाबा.. हा कबीर..”, रतीने एका वाक्यात दोघांची एकमेकांशी ओळख करुन दिली.
“सॉरी कबीर.. आम्ही काही तुझी पुस्तकं वाचलेली नाहीत.. पण रतीकडुन खूप ऐकालंय त्याबद्दल.. खुप काही काही सांगत असते.. सिम्स लाईक यु आर अ गुड ऑथर..”, रतीचे बाबा म्हणाले.

“थॅंक्यु सर..”, कबीर कसंबसं म्हणाला…
“कबीर, रतीने त्या रात्रीबद्दल सांगीतलं.. थॅंक्स टु यु.. तु तेथे पोहोचलास…”
“ओह नॉट अ बिग डील, माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी ही तेच केलं असतं..”
“एनीवेज.. रती.. जा तुझी रुम दाखवं कबीरला…”

“काय ओ बाबा.. रुम काय दाखवं.. तो काय मला लग्नासाठी बघायला आलेला मुलगा आहे का?”
“नाही का? मग बघं आता…”, रतीचे बाबा हसत हसत कबीरला म्हणाले.. तसं रतीने सोफ़्यावरची उशी बाबांना फ़ेकुन मारली आणि कबीरला घेऊन तिच्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत घेऊन गेली.

रतीची खोली अगदी तिच्यासारखीच होती, एकदम कलरफ़ुल. गडद निळ्या रंगांच्या भिंती, पुर्व-दिशेकडे उघडणारी मोठ्या काचेच्या तावदानांची खिडकी, त्यावर लटकलेले गुलाबी, पर्पल रंगाचे ड्रिम-कॅचर.. पानं,फुलं, पक्ष्यांच्या स्टिकर्सने रंगलेल्या भिंती, एका बाजुला पुस्तकांची मोठ्ठीच्या मोठ्ठी रॅक, रंगीत-फ़्रेश फुलदाणी, पिसांची रंगीत पेनं, टेडी-बेअर्सने सजलेला रायटींग-डेस्क, एका भिंतीवर एल.ई.डी.लाईट्सची माळ आणि मधोमध चिकटवलेले अनेकविवीध फोटो.. पायाखाली मऊ-मऊ कार्पेट.. एखाद्या स्वप्नील जगात गेल्यासारखा कबीर त्या खोलीत हरखुन गेला.

“मस्त सजवली आहेस खोली..”, कबीर रॅकमधील पुस्तकं न्हाहाळत म्हणाला..
“थॅंक्स.. बसं ना..”, खिडकीशेजारील खुर्चीकडे हात करत रती म्हणाली..

“गाणी लाऊ? कुठली आवडतात तुला?”, रती
“माझं असं काही विशेष आवड-निवड नाहीए.. काहीही चालतं.. अगदी मेटॅलीका-हार्ड-रॉक पासुन.. मराठी शास्त्रीय संगीतापर्यंत…तुला?”, कबीर..
“अं.. मी खूप चुझी आहे गाण्यांच्या बाबतीत.. पण त्यातल्या त्यात जगजीतची गझल्स.. मराठी नाट्य/शास्त्रीय संगीत, हिंदीमध्ये शक्यतो अरजीत सिंगच.. बाकी पार्टीजमधला धांगडधिंगा तेव्हढ्यापुरता बरा वाटतो.. कट्यारची लावु गाणी?”, रती..
“व्वा.. का नाही.. घेई छंद लाव.. फ़ार भारी ए..”
“रतीने ड्रॉवरमधुन कट्यारची सिडी काढली आणि प्लेअरमध्ये ढकलली..”

गाणं सुरु होईस्तोवर रतीच्या आईने सरबंत आणि खाण्याचे पदार्थ आणुन ठेवले..

“रती.. मी आणि बाबा.. मार्केटमध्ये जातोय.. आणि मग बाहेरच जेऊन नाटकाला जाऊ म्हणतोय.. चालेल ना तुला?”, रतीच्या आईने विचारलं..
“हो आई.. चालेल…”, रती..
“कबीर… जेऊनच जा.. रती चांगला स्वयंपाक बनवते.. सकाळपासुन स्वयंपाक-घरातच होती बघ…” असं म्हणुन, खोलीचं दार लावुन तीची आई निघुन गेली…

शंकर-महादेवनच्या स्वर्गीय सुरांनी खोलीचा कोपरां-कोपरा मधुर होऊन गेला होता. गाणी संपेस्तोवर अर्धा-पाऊण तास कसा निघुन गेला कळालेच नाही. कबीर वेळ-काळ-स्थळ सगळं विसरुन गेला होता. डोळे मिटुन तो ती गाणी ऐकण्यात रममाण होऊन गेला होता. इतकं शांत त्याला गेल्या कित्तेक महीन्यांत.. वाटले नव्हते. हा केवळ गाण्यांचा प्रभाव होता? की रतीची त्या खोलीतली त्याला लाभलेली साथ ह्याच्या त्याला पत्ता लागेना..

त्याने डोळे उघडले तेंव्हा तळहातावर हनुवटी टेकवुन रती त्याच्याकडेच हसत बघत होती.

“काय झालं?”, भानावर आल्यावर कबीर म्हणाला..
“काही नाही.. कुठेतरी हरवला होतास तु…”, रती
“खरंय गं.. काय गाणी आहेत मस्त… खरंच मी हरवलो होतो कुठेतरी…”, कबीर..

“आई-बाबा गेले?”, काही वेळ शांततेत गेल्यावर कबीर म्हणाला..
“केंव्हाच…”, रती अजुनही कबीरकडेच बघत होती…

काय होत्ं तिच्या नजरेत? काय म्हणायचं होतं तिला? तिचे ते टप्पोरे डोळे कबीरला खुणावत होते.. पण काय? कश्यासाठी?

“कबीर.. एक विचारु?”, रती
“हो.. विचार की…”, कबीर..
“पण त्यातुन काही अर्थ काढु नकोस हं.. सहजचा प्रश्न आहे.. सहजच, पण खरं खरं उत्तर दे..”
“बापरे.. काय विचारणार आहेस असं?”

“..तु मोनिकाबरोबर लिव्ह-ईन मध्ये रहात होतास?”
“हम्म..”
“कधी तिच्याबरोबर सेक्स..”
“हो.. पण खरं तर मला नाही वाटत त्यात रोमांन्स असा काही होता.. इट वॉज वन ऑफ़ दोज क्रेझी नाईट्स.. रोमॅन्सची माझी व्याख्या खुप वेगळी आहे..”, कबीर
“म्हणजे कशी..”
“म्हणजे असं मुसळधार कोसळणार्‍या पावसात हातात हात धरुन फ़िरणं… कडाडणार्‍या विजा.. सोसाट्याच्या वार्‍यात एकमेकांना किस्स करणं मला जास्ती पॅशनेट वाटतं..”, कबीर..
“मग मोनिकाबरोबर रहाताना असा कोसळणारा वारा.. कडाडणार्‍या विजा आल्या नाहीत का कधी?”, हसत हसत रतीने विचारलं..

कबीर नुसताच हसला…
“आणि राधाबरोबर?”, अचानक गंभीर होत रती म्हणाली…
“नाही..”, क्षणाचाही विलंब न करता कबिर म्हणाला.
“पण कधी तसं वाटलं तरी असेल ना?”, रती..
“पण तु हे का विचारते आहेस..?”, कबीर..
“आधी उत्तर दे…”
“नाही वाटलं.. पण तेंव्हा मुसळधार पाऊस.. कडाडणार्‍या विजा असत्या तर…”.. कबीर अचानक थांबला..
“तर काय कबीर?”
“एनिवेज.. जाऊ देत तिचा विषय…”, कबीर थोडासा अनकंफर्टेबल होतं म्हणाला..

“बरं, चल, जेऊयात? तुला न जेवता सोडलं तर आई रागावेल मला..”, तोंड फ़ुगवुन रती म्हणाली..
“आई रागावेल का?”, कबीर गालातल्या गालात हसत म्हणाला..
“हो..”
“आणि तु? तु नाही रागावणार?”, रतीच्या नजरेला नजर देत कबीर म्हणाला..
“बघं बरं.. मी रागावले ना.. तर मला मनवताना तुला ब्रम्हांड आठवेल..”

कबीरने खिडकीतुन बाहेर बघीतलं.. मे महीना संपत आला होता आणि आकाशात काळ्या ढगांचे पुंजके अधुन-मधुन डोकावत होते. अश्याच एका ढगाने आग ओकणार्‍या सुर्याला झाकुन बाहेर मळभ आणला होता…

“मुसळधार पाऊस येणार बहुतेक…”, काही मिनिटांपुर्वीच्याच मुसळधार-पावसाचा संदर्भ घेत कबीर म्हणाला..

रतीला त्याच्या बोलण्यातला अर्थ कळाला आणि ती खळखळून हसली..

“मग काय होतं कबीर.. मुसळधार पाऊस आला तर?”, रती अजुनही खोलीच्या दारातच थांबली होती..
“धरणं भरतात.. सगळीकडे हिरवं गार होतं..”, कबीर
“आणि..”
“आणि.. उन्हाळ्याची गर्मी जाऊन सगळीकडे सुखद गारवा होतो..”
“ते जाऊ देत.. तुला काय होतं कबीर?”

रतीच्या आवाजातला कंप कबीरला जाणवत होता..

कबीर रतीच्या जवळ जाऊन थांबला. त्याच्या शरीराचा स्नायुं-स्नायु रतीला बाहुपाशात समावुन घेण्यासाठी आसुसलेला होता. त्याने एक पाऊल पुढे टाकले असते तरी रतीने त्याला थांबवले नसते. पण ह्यावेळी त्याला रतीबद्दल शंभर-टक्के स्वतःकडुन खात्री हवी होती. त्याला रती आवडत होती हे शंभर टक्के खरं होतं.. पण त्याच्या मनातुन राधा गेलेली नव्हती हे ही तितकेच खरं होतं आणि तो रतीला कुठल्याही प्रकारे फ़सवु इच्छीत नव्हता.

मोठ्या कष्टाने त्याने स्वतःला सावरले..

“एनिवेज.. चल जेऊयात.. खुप भुक लागली आहे..”, कबीर..

रतीने अविश्वासाने वळुन एकवार कबीरकडे पाहीले आणि मग ती जेवायचं वाढायला स्वयंपाक-घरात निघुन गेली.

 

कबीर घरी परतला तेंव्हा त्यच्या मनामध्ये विचारांचे काहुर उठले होते.

“आपण केलं ते बरोबर केलं का?”
“रतीला काय वाटलं असेल?”
“आपण एक चांगली संधी गमावली का?”
“पण रती काय संधी नाहीए.. आत्ता भावनेच्या भरात काही करुन तिला भविष्यात दुखावायची आज्जीबात इच्छा नव्हती.”
“आपण असं स्वतःला थांबवले ह्याचे एकमेव कारण राधा आहे का? आपण अजुनही तिच्यावर प्रेम करतोय? अजुनही तिच्या परत येण्याची वाट बघतोय? का? कश्यासाठी?”

एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात थैमान घालत होते. त्याची तंद्री भंगली ती फ़ोन वाजण्याचा आवाजाने.
कबीरच्या बाबांचा फोन होता..

“हा बाबा.. बोला..”, कबीर..
“कबीर.. ह्या मंथ-एंडला मी आणि तुझी आई येतोय तिकडे..”
“अरे व्वा.. का? सहज?”
“नाही अरे.. श्रेयाचं (कबीरच्या चुलत बहीणीचं) लग्न ठरलंय”
“ऑं? कधी? आणि इतक्या लगेच?”
“हो अरे.. तिचा होणारा नवरा संगणक क्षेत्रातला आहे.. अमेरीकेत असतो तो.. त्याला जास्तं सुट्टी नाहीए, अनायसे इथेच होता.. भेटीगाठी झाल्या.. दोघंही एकमेकांना पसंद पडले आणि असं तडकाफ़डकी लग्न करायचं ठरलंय..”
“पण मग बाकीचे…?”
“सगळेच येतोय.. बसेस केल्यात दोन-तिन.. आम्ही तुझ्या घरीच येऊ…”
“ओ्के…”

“कबीर!!”
“हां बाबा..”
“एव्हरीथींग ऑलराईट..?”, कबिरच्या आवाजात लग्नाचा किंवा सगळ्या नातेवाईकांना भेटण्याचा कसलाच उत्साह नव्हता..
“हम्म.. एव्हरीथींग ऑलराईट..”
“कबीर.. मी बाप आहे तुझा… काय झालंय..एखादी मुलगी वगैरे…”
“हम्म.. पण एक नाही दोन..”, कबीर कसंनुसं हसत म्हणाला..
“अरे बापरे… मला वेळ आहे आत्ता.. बोलायचंय?”

पुढच्या दहा-पंधरा मिनिटांत कबीरने बाबांना राधा आणि रतीबद्दल सगळं सांगुन टाकलं..

“मलाच कळत नाहीए.. मला कोण जास्ती आवडतं.. राधा? का रती? आणि राधा आवडत असेल.. तरीही.. तिच्या मनात काय आहे काही कळत नाहीए.. ती परत येईल.. नाही येणार.. ह्याचाही काही भरवसा नाही.. आणि समजा, ती येणार नाही म्हणुन रतीला आपलंसं केलं..आणि राधा समोर आली तर.. तर काय होईल हे सुध्दा मला ठाऊक नाही..”, कबीर…

“हे बघ कबीर.. माझं तरी असं मत आहे की आपण पळत्याच्या मागे न लागता.. जे हातात आहे तेच गोड मानुन घ्यावं.. राधाची न्युज आम्हीपण टी.व्ही. वर पाहीली होती.. अर्थात शेवटचा निर्णय सर्वस्वी तुझा आहे…”

“एक काम कर.. लग्नात रतीला पण घेऊन ये.. जमेल?”
“हो.. येतो घेऊन.. ठेवु फोन मग?”
“हम्म.. चल बाय.. आणि उगाच देवदास होऊन बसु नकोस.. पुस्तकाच्या पुढच्या भागावर काम चालु करं, इथे सगळे विचारायला लागलेत पुढचा भाग कधी येणार म्हणुन..”, कबिरला चिअर-अप करत त्याचे बाबा म्हणाले…

“मी लाख लिहीन हो पुढचा भाग.. पण शेवट मलाच सापडत नाहिए त्याचं कायं?..”, कबीर स्वतःशीच म्हणाला आणि त्याने फोन ठेवुन दिला.

 

नेपल्समध्ये काढलेले अनेक सुंदर सुंदर फोटो पोस्ट करण्यासाठी राधाने बर्‍याच दिवसांनी फ़ेसबुक उघडलं..
पहील्या काही पोस्ट स्क्रोल केल्यानंतर एका फोटोपाशी राधा घुटमळली. रतीने तिचा कबीरबरोबर काढलेला एक सेल्फ़ी फ़ेसबुकवर कबीरला टॅग करुन पोस्ट केला होता.

“कोण आहे ही रती? आणि कबीर तिच्या बेडरुममध्ये काय करतोय..?”, तो फ़ोटो एन्लार्ज करुन बघत राधा स्वतःशीच म्हणाली..

“दाल मै कुछ काला है..” मागुन लॅपटॉपवरचा तो फोटो बघत पुनम म्हणाली..
“चुप गं चुडैल.. काही काला वगैरे नाहीए..”, राधा
“कमऑन राधा.. यु आर अ वुमन.. रतीच्या चेहर्‍यावरचे.. डोळ्यातले भाव बघुनच तु सांगु शकतीस.. कश्याला फ़सवतेस स्वतःला..”, पुनम
“एनिवेज.. आपण चाललोच आहे इंडीयात मंथएंडपर्यंत… गेल्यावर कळेलच खरं काय आणि खोटं काय…”, राधा..
“आणि समजा हे खरं असेल.. तर काय? आणि खोटं असेल.. तर काय?”, पुनम
“माहीत नाही..”, राधा..

“अ‍ॅक्सेप्ट इट राधा.. तुला कबीर आवडतो.. आणि तु चक्क जळती आहेस.. त्याला दुसर्‍या मुलीबरोबर बघुन.. हो ना?”
“असेल.. पण पुनम, माझ्या स्वप्नांचं काय? माझ्या आयुष्याकडुन ज्या अपेक्षा आहेत त्याचं काय? मी कबीरला ‘हो’ म्हणुन एक तर त्याच्या.. किंवा माझ्या आयुष्याला न्याय देऊ शकणार नाही हे खरं आहे ना? आणि कॉम्प्रमाईज करुन त्यावर बेतलेली रिलेशनशीप मला नकोय..”
“विचार कर राधा.. निट विचार कर.. अजुन दोन आठवडे आहेत तुझ्या हातात.. इंडीयात आपण परत जाऊ तेंव्हा एकदाचा काय तो सोक्ष-मोक्ष लावुन टाक.. इस्स पार.. या उस्स पार.. तु स्वतःही त्यात अडकली आहेस.. आणि कदाचीत कबीरही..”

राधाने लॅपटॉप बंद केला आणि डोळे मिटुन टेबलावर डोकं ठेवुन राधा विचारात गढुन गेली…..

[क्रमशः]

इश्क – (भाग २३)


भाग २२ पासून पुढे>>

नेपल्सच्या आकाशातली निळाई कमी होऊन गडद लाल, गुलाबी, केशरी रंगांची मुक्तहस्ते उधळण झाली होती. दिवसभर मवाळपणे तळपणारा सुर्य़ मावळतीकडे झुकला होता. समुद्रकिनारी जाणार्‍या रस्त्याच्या काही किलोमीटर आधी असलेल्या अरुंद रस्त्यांच्या कडेने उभारलेल्या कॅफेंमध्ये बाहेर रस्त्याच्या कडेला लावलेल्या खुर्च्यांवर बसुन राधा पुनमबरोबर ग्रिल्ड सॅंन्डविच आणि कॉफी घेत होती. बरोबरची ट्रिप आदल्या रात्रीच परतली होती आणि ती आणि पुनम, अवंतीकाने सांगीतल्याप्रमाणे महीना दोन महीने तेथे थांबुन रेकी करणार होत्या.

“राधा.. तो शेफ़ बघ नं.. कसला हॉट आहे ना?”, पुनम आतल्या काऊंटरकडे बोट दाखवत म्हणाली..
“हो ना अगं.. नाही तर आपल्या इथले.. दोन-चार सन्माननीय अपवाद सोडले तर…”
“तो बघतोय मगाच पासुन तुझ्याकडे…”, राधाला चिडवत पुनम म्हणाली..”चल बोलुयात त्याच्याशी..”
“गप गं.. उगाच काय बोलायचं..”
“चल तर.. त्यात काय होतंय.. मे बी.. एखादी वाईनची बॉटल देईल तो..कॉम्लमेंटरी..”, पुनम राधाला ओढत म्हणाली..
“नको.. जा तुच.., मला खुप भूक लागलीय… मला एक पास्ता घेऊन ये येताना…”

शेवटी पुनम एकटीच निघुन गेली.

राधाने मोबाईल उचलला आणि मेसेज बघत असतानाच तिला कबीरने पाठवलेला फोटो दिसला. रोहन आणि मोनिकाला ती चेहर्‍याने ओळखत होती, पण कबीरच्या शेजारी बसलेली ती मुलगी, रती, कोण हे काही तिला उमजेना.

कबीरच्या ऑफ़ीसमध्ये कोणी मुलगी असल्याचे तिच्या ऐकीवात नव्हते. कबीरला बहीण असल्याचेही तो कधी काही बोलला नव्हता.

“राधा.. तुझं नाव विचारत होता तो…”, टेबलावर पास्ताची डिश ठेवत पुनम म्हणाली..
“हम्म..”
“अगं हम्म काय? फ़िदा आहे बहुतेक तुझ्यावर तो.. संध्याकाळी बिचवरच्या शॅक्समध्ये डिनरला भेटायचं का विचारत होता..”
“ओके..”
“बरं, तुला विचारायचं राहीलं, तुला पास्ता रेड सॉस मधला हवा होता का व्हाईट?”, राधासमोर पास्ताची डीश ठेवत पुनमने विचारलं
“हम्म..”
“एsssss.. मी वेडी आहे का एकटीच बडबडायला? काय ते फोन मध्ये डोकं खूपसुन बसली आहेस.. आण तो फोन इकडे…” असं म्हणुन पुनमने राधाच्या हातातला फोन काढुन घेतला.

राधाच्या मोबाईलवरचा तो फोटो पाहुन पुनमने विचारलं, “कुणाचा फोटो आहे हा?”
राधाने काहीच न बोलता पास्ताची डीश पुढे ओढली, पण तिचं खाण्यात लक्षच नव्हतं, चमच्याने ती पास्ता नुसताच इकडे तिकडे करत बसली होती.

“राधा.. काय झालंय? का डिस्टर्ब झालीस एकदम? ह्या फोटोशी काही संबंध आहे का त्याचा?”
“अगदीच असं काही नाही.. सोड ना, खूप मोठ्ठी कहाणी आहे ती..”, राधा..
“मग आपल्याला आता उद्या सकाळपर्यंत तरी काय काम आहे?.. आय एम ऑल ईअर्स..”

“ठिक आहे.. आधी हा पास्ता संपवु, मस्त कॉफ़ी ऑर्डर करु आणि मग तुला सगळं सांगते..”
“बरं.. ह्या शेफ़चं काय करायचं? त्याला आजच्या ऐवजी उद्या संध्याकाळी भेटू म्हणुन सांगते.. ओके?”
“हम्म ओके…”

पुनम त्या शेफ़शी बोलायला निघुन गेली

राधाने कबीरचा मेसेज उघडला.. तिला काय रिप्लाय करावा काहीच सुचत नव्हतं.. उघड उघड “ही मुलगी कोण?”, असं विचारणंही तिला बरोबर वाटेना..

तिने फ़क्त “थंब्स अप.. मस्त दिसताय तुम्ही सगळे..”, एव्हढाच मेसेज पाठवुन दिला

 

राधा आणि पुनमच्या गप्पा संपल्या तेंव्हा संध्याछाया जाऊन अंधार पडला होता. त्या गल्लीचं तर रुपडंच पालटुन गेलं होतं. सर्व रेस्तॉरंट्स रंगेबीरंगी दिव्यांच्या माळा आणि मंद दिव्याच्या प्रकाशाने उजळली होती. काही ठिकाणी सिस्टीमवर तर काही ठिकाणी चक्क लाईव्ह बॅड्स संगीत वाजवत होते.. बिकीनी मध्ये फ़िरणार्‍या ललना आता रात्रीच्या वन-पिस पार्टीवेअर्समध्ये आपापल्या बॉय-फ़्रेंड्स, नवर्‍यांबरोबर फ़िरत होत्या.

“हम्म.. तर असं आहे सगळं…” थोडा वेळ शांततेत गेल्यावर पुनम म्हणाली.. “बट यार.. ग्रेट आहेस तु.. खरंच मानलं तुला.. स्वप्नांचा पाठलाग कसा करावा हे तुझ्याकडुन कुणी शिकावं…”
“जिंदगी बडी होनी चाहीए, लंबी नही.. हो ना? मला त्या त्या वेळेला जे वाटलं ते केलं.. त्याचे भविष्यात काय परीणाम होतील ह्याचा विचार सुध्दा केला नाही..”, राधा
“पण मग हा जो कोणी कबिर आहे, त्याचं काय? तुला तो आवडतो? का नाही?, नाही म्हणजे त्याचा दुसर्‍या मुलीबरोबरचा फोटो बघुन तु डिस्टर्ब झालीस म्हणुन विचारतेय..”, पुनम
“मी स्वतःच खूप कन्फ़्युस्ड आहे त्याच्या बाबतीत.. म्हणजे.. तसा तो चांगला आहे.. मला कधी कधी त्याच्याबद्दल फ़िलिंग्स वाटल्याही.. पण कदाचीत माझं ध्येय स्पष्ट होतं..मला रिलेशन्सच्या भानगडीतच पडायचं नव्हतं.. त्यामुळे त्याच्याबद्दल इतका.. आणि त्या दृष्टीने कधी विचारच केला नाही..”
“पण त्याला तु आवडतेस.. ना?”
“दोनशे टक्के..”, हसत हसत राधा म्हणाली..

“तुझ्याजागी मी असते ना, तर कदाचीत मी निदान विचार करायला वेळ तरी घेतला असता.. लगेच नक्कीच नाही नसते म्हणले.. म्हणजे तुझ्याकडुन जे ऐकले त्यावरुन तरी साधा-भोळा वाटतोय.. दिसायला ही क्युट आहे.. आणि मुख्य म्हणजे तुझ्यावर प्रेम करतोय.. त्या प्रेमाखातर त्याने अख्खं एक पुस्तक लिहीलंय..”, पुनम
“अगं पण आम्ही दोघं दोन वेगवेगळे ध्रुव आहोत. तो अगदीच साधं, निरस आयुष्य जगणारा.. मला असं सतत काहीतरी नविन, रोमांचक लागतं. कधी मला अस्ं वेड्यासारखं भटकावंस वाटतं.. कधी वाटतं एखादा रॉक बॅंड जॉईन करावा.. कधी वाटतं दुर कुठेतरी निर्जन ठिकाणी तंबु ठोकुन रहावं.. तो ह्यातलं कध्धीच काही करणार नाही..”

“बरोबर आहे तुझं.. पण मला वाटतं तु फ़क्त वर्तमानकाळाचाच विचार करतेस.. भविष्याच्या दृष्टीने कधी विचार केलाएस..म्हणजे.. आज तुला जे करावंस वाटतंय ते तु करु शकतेस कारण तुझं शरीर तुला साथ देतंय.. तुझं मन खंबीर आहे.. तुझ्यात पोटा-पाण्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची धमक आहे.. पण..”
“कुठ्लं भविष्य पुनम.. उद्या कुणी बघीतलाय.. त्या उद्यासाठी आजचं आयुष्य निरस.. बोअरींग करायचं.. आणि तो उद्या आलाच नाही तर? कुणी सांगावं मी प्रवास करणारं एखाद्या प्लेन-क्रॅश होईल, रस्त्याने जाताना एखादा ट्रक उडवेल.. हार्ट-अ‍ॅटॅक येईल.. काहीही होऊ शकतं ना..”, पुनमचं वाक्य तोडत राधा म्हणाली..
“पण तो उद्या येणारंच नाही.. असंही नाही ना.. समजा तो उद्या आला तर? तर काय करशील?”, पुनम..
“एनीवेज.. हे कोंबडी आधी की अंड असं झालं.. जाऊ देत.. आपण ह्या सुंदर संध्याकाळी कश्याला उगाच फिलॉसॉफीकल गप्पा मारतोय.. चलं.. सोड.. ह्या फोटोचं काय करु ते सांग..”

“हे बघ.. मला वाटतंय, त्याने हा फोटो तुला मुद्दाम पाठवलाय.. तु त्याला तिच्याबद्दल आत्ता काहीच विचारु नकोस.. बघु काय करतोय..”, पुनम म्हणाली..
“बरं..आता काय करायचं? जेवायला तर मला आत्ता आज्जीबात भूक नाहीए..”, राधा
“चल.. नाईट-आऊट्स साठी रेकी करु अजुन..”, पुनम
“नको प्लिज.. खूप झालंय आज काम.. त्यापेक्षा ड्राईव्ह-इन ला जाऊयात का.. ओपन स्क्रिन थिएटर्स आहेत.. मस्त कार मध्ये बसुन पिक्चर टाकु एखादा..”, राधा
“नको गं.. तिकडे सगळे कपल्स असतात.. आपण दोघी..”
“मग काय झालं.. विचारलं तर सांगु लेस्बो आहोत.. चल.. निर्लज्जं सदा सुखं..”, पुनमला उठवत राधा म्हणाली…

दोघींनी बिल भरले आणि कारमध्ये बसुन डाऊनटाऊनच्या रस्त्याला वळल्या..

 

राधाचा रिप्लाय बघुन कबीरचं मन खट्टू झालं.. त्याची अपेक्षा होती की राधा रतीबद्दल विचारेल.. पण तिने तसं काहीचं केलं नव्हतं. कबीरने तो विषय तेथेच सोडुन दिला. राधानेही नंतर तो विषय मनातुन काढुन टाकायचं ठरवलं.

 

एके दिवशी रोहन आणि कबीर ऑफ़ीसमध्ये गप्पा मारत बसले होते.

“सो.. काय म्हणतीय रती.. आजकाल जोरदार भेटताय तुम्ही एकमेकांना.. हम्मं?”, रोहन
“रती.. खूपच मस्त आहे ती ह्यात वादच नाही. तिच्याशी गप्पा मारायला लागलं की वेळेचं भानंच रहात नाही. विषय कुठलाही चालतो अरे आम्हाला.. आणि आम्ही कश्यावरही तासंतास बोलु शकतो..”, कबीर
“हात्तीच्या.. म्हणजे अजुन तुमचं गप्पांमध्येच अडकलं आहे.. मला वाटलं.. पुढे काही तरी घडलं असेल..”, रोहन
“अरे खरंच आहे तिचा बॉयफ़्रेंड तो कोण पिटर का कोण.. मध्ये बोलताना मध्येच कधीतरी त्याचा विषय निघाला होता.. तिच्या बोलण्यावरुन तरी वाटत नाही, ती खोटं बोलत असेल असं…”
“बरं.. एक काम करु चलं.. खरंच एक पिक्चरचा प्लॅन करु.. आपण चौघं.. आणि त्या पिटरलापण बोलावु.. बघु तरी तो खरंच कोणी असेल तर येईल.. नसेलच कोणी तर रती काहीतरी कारण सांगेल.. काय बोलतोस?”, रोहनने शक्कल लढवली.

“ठिक आहे चल.. तु म्हणतोएस तर.. पण आपल्याला एकदम शेवटच्या शो ला वगैरे जावं लागेल, ११.३० वाजता वगैरे.. पिटरची ड्युटी असते ना बाऊंसरची…”
“आय एम ओक विथ इट.. तु बोल रतीशी आणि तिकीटं काढुन टाक…”

 

ठरल्याप्रमाणे सिनेमाचा प्लॅन ठरला. पिटरला बोलावण्याबाबत रती म्हणाली, “तो वेळेवर सुटला ड्युटीवरुन तर येईल.. त्याला लेट हो असेल तर नाही जमायचं.. सो तिकिट्स आधी नको काढुस..ऐन वेळी काढु…”

कबीर मनोमन खुश झाला होता. मनात कुठेतरी त्याला रोहनचं बोलणं खरं वाटु लागलं होतं. रती नक्कीच फ़ेकतेय.. कोणी पिटर वगैरे नाहीए.. ऐनवेळी सांगेल त्याला उशीर होतोय निघायला म्हणुन… अशी आशा मनात धरुन तो थिएटरमध्ये पोहोचला होता.

रोहन आणि मोनिका आधीच पोहोचले होते.

थोड्याच वेळात रती पण पोहोचली. ह्यावेळी फ़क्त कबीरच नाही, तर रोहनसुध्दा तिच्याकडे पहात राहीला.. आणि रोहनच का.. थिएटरमधले बरेच तरुण तिच्याकडे बघत होते.

ऑलीव्ह रंगाचा.. आणि त्यावर रंगीत मोठ्या फुलांचा पॅटर्न असलेला स्लिव्हलेस फ़्रॉक तिने घातला होता. केस मोकळे सोडले होते आणि केसांची एक बाजु छोट्या पिन्स लावुन घट्ट बसवली होती. चंदेरी रंगाचे कानातले छोटेसे झुमके तिच्या गोर्‍या वर्णावर चमकुन दिसत होते. पायातल्या ग्लॅडीएटर स्टाईल्सच्या सॅन्डल्स तिच्या नाजुक पायांभोवती नक्षी करुन बसल्या होत्या. रती जवळ येताच एक मंद परफ़्युमचा सुगंध कबीरच्या नाकात शिरला.

“लुकींग ब्युटीफ़ुल..”, नकळत कबीर म्हणाला..
“थॅंक्स..”, रती..
“पिटर येणार आहे ना?”, रोहनने विचारलं.
“काय माहीती आता काय करतोय.. मी मगाशी फोन केला होता तर त्याने उचलला नाही.. बघु थोड्यावेळ वाट नाहीतर आपलं आपण जाऊ..”, वैतागुन रती म्हणाली

१०-१५ मिनीटं शांततेतच गेली.. कबीर मनोमन प्रार्थना करत होता की हा कोण जो पिटर आहे तो येउच नये.. तो अस्तीत्वातच असु नये… पण कबीरची प्रार्थना व्यर्थ ठरली कारण तेव्हढ्यात रतीचा फोन वाजला…

“हुश्श.. बरं झालं वेळेवर आलास.. कित्ती वेळ अरे…”, रती फ़ोनवर बोलत होती..
“हो मला माहीते.. तु कामावर होतास.. ..बरं सॉरी.. आता आपण फोनवर भांडत बसणारे का?… हम्म ये.. आम्ही फ़र्स्ट लेवलवर आहोत…”, रती
“आला बाबा एकदाचा..”, फोन ठेवल्यावर रती म्हणाली.

कबीरच्या हृदयातली धडधड वाढत होती. प्रत्येक सेकंदागणीक त्याची अस्वस्थता वाढत होती.

थोड्याच वेळात एक बलदंड शरीरयश्टीचा तरुण त्यांच्यात येऊन मिसळला. साधारण ६ फुटाच्या जवळपास असलेली उंची.. गोरापान.. आखुन रेखुन केलेली दाढी, जेल लावुन घट्ट बसवलेले स्पाईक्स.. कानात चमचमणारा डायमंड स्टड.. एकुणच आकर्षक व्यक्तीमत्व होतं. रती त्याच्यासमोर एखाद्या बाहुलीसारखी भासत होती.

“गाईज.. धिस इज पिटर..”, रतीने सर्वांशी ओळख करुन दिली..
रोहनची आणि कबीरची नजरानजर झाली…

“सो कुठला मुव्ही बघतोय आपण?”, पिटरने विचारलं…
“लास्ट विकला तो एक रोम-कॉम लागलाय.. फ़ार मस्त आहे म्हणे तो…”, रती म्हणाली..
“ए प्लिज.. उगाच सेंन्टी वगैरे नको हा.. त्यापेक्षा आज रिलीज झालेला तो झोंबी मुव्ही बघुयात…”, पिटर..
“ए नको रे.. फ़ार ब्लड-शेड असते झोंबी मुव्हीज मध्ये.. ह्या दोघी घाबरतील उगाच…”, कबीर म्हणाला..
“घाबरायला काय लहान आहेत का? दर वेळी आपणच का अ‍ॅडजस्ट करायचं त्यांच्या आवडीचे मुव्ही बघुन…?”, पिटर..

कबीरने सगळ्यांवरुन नजर फ़िरवली.. कुणीच काही बोलले नाही.. शेवटी त्याने नाईलाजाने तिकीटं काढली..

सिनेमा त्याच दिवशी रिलिज झाल्याने बर्‍यापैकी गर्दी होती.. त्यामुळे सर्वांना एकाच रांगेत तिकीट्स मिळाली नाहीत. चार तिकिटं एका रांगेत.. आणि दोन समोरच्या रांगेतली होती…

कबीरने ती दोन तिकीट्स रती-पिटरला दिली, आणि तो, रोहन आणि मोनिका त्यांच्याच मागच्या रांगेत बसले.

सिनेमा अपेक्षेप्रमाणे फ़ालतु… किळसवाणाच होता.. थिएटर किंकाळ्या, गोळ्यांचे आवाज.. हाणामार्‍या.. टेंन्शन.. ब्लड-शेड्सने भरुन गेले होते. कबीरचे तर सिनेमाकडे लक्षच नव्हते. तो सतत समोर बसलेल्या रती-पिटरकडेच बघत होता.. अर्थात रतीलाही तो सिनेमा आवडलेला नव्हताच. पिटर मात्र सिनेमाचा मनसोक्त आनंद घेत होता. काही भयाण प्रसंगांमध्ये रती डोळे झाकुन पिटरला बिलगत होती ते पाहुन तर कबीरचा अधीकच जळफ़ळाट होत होता.

सिनेमामध्ये झोंबिंची एक मोठ्ठी लाट शहरावर आक्रमण करुन जाते तो सिन सुरु होता आणि सिनेमाचा हिरो तलवार, बंदुक जे सापडेल त्याने सपासप झोंबिंना मारत होता. कुणाचं डोकं फुटत होतं.. कुणाचं पोट फुटुन आतुन आतडी बाहेर येत होत्या.. रतीला तो सिन असह्य झाला आणि ती उठुन बाहेर पडली.. पण जाताना तिने कबीरकडे एक कटाक्ष टाकला.

कबीरने काही सेकंद थांबुन पिटरचा अंदाज घेतला.. तो सिनेमात पुर्णपणे रममाण झाला होता. शेजारुन रती निघुन गेल्याचेही त्याला भान नव्हते ते पाहुन कबीरही हळुच बाहेर पडला.

रती बाहेर कॉफ़ी काऊंटरपाशी कॉफ़ी घेत होती.. कबीरला येताना पाहुन तिने अजुन एक कॉफ़ी ऑर्डर केली..

“हॉरीबल मुव्ही ना..?”, रती
“हम्म..”
“आय एम सॉरी.. उगाच आमच्यामुळे संध्याकाळची वाट लागली तुमच्या.. उगाच आलो आम्ही.. त्यापेक्षा तुम्ही दुसरा एखादा सिनेमा बघीतला असतात..”
“ए प्लिज.. इट्स ओके… एक वेगळा अनुभव..”, हसत हसत कबीर म्हणाला..
“माझ्या आणि पिटरच्या आवडी-निवडी खुप वेगळ्या आहेत.. त्यामुळे आमच्या बहुतेक डेट्सचे रुपांतर भांडणातच होते..”, कसंनुस हसत रती म्हणाली.. “पण तो चांगला आहे.. मुडमध्ये असतो तेंव्हा खुप काळजी घेतो माझी.. त्याच्याबरोबर खुप सेफ़ वाटते मला..”

कबीरला अचानक राधाची आठवण झाली. त्यालाही जाणवलं की आपलं आणि राधाचं पण अस्संच आहे.. दोघांच्याही आवडी निवडी दोन टोकांच्या. जर कधी राधा-कबीर दोघं एकत्र आलोच तर आपलं पण अस्संच होईल का? भांडणंच जास्ती?

दोघं बाहेरच गप्पा मारत बसले होते.. दहा मिनिटं झाली असतील तोच पिटर बाहेर आला..
“ए.. तु इथं काय करतीएस..”, काहीसा चिडुन आणि मग कबीरकडे संशयाने बघत पिटर म्हणाला..
“पिटर..प्लिज.. अरे कसला बोअरींग आहे मुव्ही तो… मी नाही बघु शकत अजुन..”
“मग काय झालं.. मी नाही तुझे रडके मुव्हीज बघत?”
“कुठे बघतोस.. लास्ट टाईम आपण नटसम्राटला गेलो होतो तर अर्ध्यातच निघुन गेलासच की मला एकटीला सोडुन तिथे..”
“मग काय… म्हातार्‍यांचे सिनेमे बघायचं वय ए का आपलं… बरं एनिवेज.. चल जाऊ यात आपण..”
“कुठे?”

“अगं, रॉनीचा फ़ोन आला होता.. ‘हार्ड-रॉक-कॅफ़े’ मध्ये पार्टी आहे.. तिकडे जायचंय..”, पिटर
“आणि सिनेमा?”
“जाऊ देत.. मी नंतर डाऊनलोड करुन बघेन.. चल..”
“अरे पण इतरांच काय.. तुझ्यासाठी ते तो सिनेमा बघताएत ना..?”

एव्हाना रोहन आणि मोनिका पण बाहेर आले होते..

“कुठे कोण बघतंय.. सगळेच तर बाहेर आहेत…”, पिटर..
“प्लिज रे.. मला बोअर होतो तुमचा तो ग्रुप.. तुम्ही नुसते पित बसता…”
“मग तु घे ना कोल्ड्रींक.. तेथे मसाला दुध मिळत नाही..नाही तर तेच दिले असते तुला..”, मोठ-मोठ्यांदा हसत पिटर म्हणाला.. पण रती हर्ट झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.. “ओके ओके.. सॉरी.. चल जाऊ यात? बाय गाईज..”

“बरं निदान घरी जाऊन चेंज तरी करते.. हे असे छोटे कपडे घालुन येऊ का तिकडे..?”
“त्यात काय झालं..? इथं आली होतीसंच की..”
“अरे पण थिएटर आणि हार्ड-रॉक मध्ये काही फ़रक ए की नाही.. त्यात तेथे सगळे तुझे मित्र असे बघतात की..”
“चल गं..मी आहे ना.. बघतो मी कोण काय म्हणतंय..”
“रती.. तुला पाहीजे तर.. माझं स्पोर्ट्स जॅकेट घेऊन जा बरोबर..”, आपलं जॅकेट काढुन रतीला देत कबीर म्हणाला..
“थॅंक्स..”, असं म्हणुन रती नाईलाजाने सगळ्यांना बाय करुन पिटरसोबत बाहेर पडली.

“आता काय करायचं?”, दोघं निघुन गेल्यावर कबीर म्हणाला..
“हो ना.. आम्हाला काही तो उरलेला सिनेमा बघण्यात उत्साह नाहीए.”, मोनिकाकडे बघत रोहन म्हणाला..
“हो.. त्यापेक्षा जेवायला जाऊया कुठेतरी..”, मोनिका
“एक काम करा.. तुम्ही दोघं जा जेवायला.. मी उगाच कश्याला मध्ये.. आधीच आपली संध्याकाळ बोंबललीए..”, कबीर
“ए.. मध्ये काय त्यात.. तु काय नविन आहेस् का आम्हाला?”, रोहन
“तसं नाही रे.. पण खरंच जा तुम्ही दोघं.. मला तशीही फ़ारशी भूक् नाहीए”, कबीर..
“नक्की? नाही तर खरंच आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीए तु आलास तर..”, मोनिका

मोनिकाची मनोमन इच्छा होती की कबिरने बरोबर यावं.. कबीर तिच्या मनातले भाव तिच्या डोळ्यात वाचु शकत होता..आणि म्हणुनच त्याला जायचं नव्हतं.. मोनिका आता रोहनची होती.. आणि कबीर त्यांच्याबरोबर असता तर कदाचीत मोनिका पुर्णपणे रोहनकडे लक्ष देऊ शकली नसती असा काहीसा विचार त्याच्या मनात आला.

“खरंच नक्की.. जा तुम्ही..”, कबीर

एकमेकांचा निरोप घेऊन तिघेही बाहेर पडले.

 

कबीर घरी आला, बुट कोपर्‍यात भिरकावले आणि तो बेडवर सुन्नपणे बसुन राहीला.. साधारण १० मिनिटंच झाली असतील तो त्याचा मोबाईल नविन मेसेज-साठी किणकिणला.

रतीचा मेसेज होता.

“कॅन यु पिक-मी अप फ़्रॉम कोरेगांव पार्क.. सिनेमा हॉलमध्ये नसशील आणि बिझी नसशील तर प्लिज कॉल..”
कबीरने लगेच फ़ोन लावला..

“कुठेस कबीर..?”, काहीशी मुसमुसत रती म्हणाली..
“घरीच आहे.. का? काय झालं..?”, कबीर..
“प्लिज मला पिक-अप करतोस का? मी कोरेगाव-पार्कला आहे..”
“हो करतो.. पण पिटर कुठे आहे?”
“तो मला सोडुन गेला इथेच रस्त्यात.. ते नंतर बोलते.. पण प्लिज पटकन ये.. मी एकटीच आहे इथे..”, रती

कबीरने घड्याळात नजर टाकली.. १२.३० होऊन गेले होते. कोरेगाव-पार्क, शहराबाहेरचा तसा निर्जन भाग होता.. ह्यावेळ रती अशी एकटीच रस्त्यावर.. ते पण अश्या कपड्यात… त्याच्या काळजात धस्स झालं..

“रती.. हे बघ.. अशी रस्त्यावर एकटी नको थांबुस.. आजुबाजुला काही आडोसा आहे का?”
“नाहीए.. काहीच नाहीए इकडे.. मोकळा रस्ता आहे..”, रती.. “थांब एक मिनीट.. तिकडे पुढे.. श्शी.. सुलभ शौचालय आहे..”, कसंसं हसत रती म्हणाली..
“व्हेरी गुड.. तेथे आत जाऊन थांब.. मी लग्गेच येतोय..”, कबीर
“श्शी.. वेडा आहेस का.. अरे पब्लिक टॉयलेट आहे ते.. काही तरी काय.. किती घाण असेल तेथे..”, रती
“हे बघ रती.. मी लगेच पोहोचतोय.. अशी रस्त्यावर एकटी नक्को थांबुस प्लिज ऐक.. मला व्हॉट्स-अ‍ॅपवर तुझं लोकेशन पाठवं.. तु आत थांब. मी निघालोय…” असं म्हणुन कबीर लगेच बाहेर पडला.. जाताना दोन-तिन पर्फ़्युमच्या बाटल्या बरोबर घेतल्या आणि त्याने गाडी वेगाने रतीच्या दिशेने वळवली..

रात्रीची वेळ असल्याने रहदारी तुरळक होती. २० मिनिटांत कबीर तेथे पोहोचला.. कबीरला बघताच रती धावत धावत आली आणि त्याला बिलगली..
“मी.. मी.. आतमध्ये उलटी केलीय..”, रती रडत रडत म्हणाली..
“ईट्स ओके.. इट्स पर्फ़ेक्टली ओके..”, तिची पाठ थोपटत कबीर म्हणाला..

त्याने गाडीतुन पाण्याची बाटली आणि पर्फ़्युम्स तिला दिले.. रडुन रतीच्या आयलायनर्सची वाट लागली होती.. गालांवर काळे ओघळ पसरले होते. केस विस्कटले होते.

रती जरा नॉर्मल झाल्यावर कबीरने तिला गाडीत बसवले आणि त्याने गाडी माघारी वळवली.

“काय झालं?”, कबीर..
“नेहमीप्रमाणे आमची भांडणं झाली.. मला नव्हतं जायचं कबीर त्याच्या त्या मित्रांच्या ग्रुपमध्ये.. त्यात तो तुमच्याशी जे वागला त्याचा मला राग आला होता… आमचं दोघांचही भान सुटलं.. मी म्हणलं चिडून त्याला.. सोड मला इथंच.. तर त्याने खरंच मला गाडीतुन उतरवलं आणि निघुन गेला…”, रती..
“काय मुर्खपणा आहे हा… मग? काय केलंस तु?”, कबीर..

रतीने आपला मोबाइल चालु केला आणि त्यातला सेंन्ट फ़ोल्डरमधला एक मेसेज उघडुन कबीरसमोर धरला..

“पिटर.. आय एम ब्रेकींग-अप विथ यु.. प्लिज उद्यापासुन माझ्या समोर येऊ नकोस..”

तो मेसेज पाहुन कबीरचे डोळे चमकले तसं रती म्हणाली.. “मी तुझ्यामुळे त्याच्याशी ब्रेक-अप केलंय असं समजु नकोसं हा…”
“छे.. मी कुठं तसं म्हणालो..”, कबीर..

रतीने कबीरच्या गाडीतल्या डॅशबोर्ड्सवरील पॅनलकडे नजर टाकली.
“काय झालं?”, कबीर
“पेट्रोल किती आहे बघतेय..”, रती
“आहे बरंच.. का?”, कबीर…
“जिकडे फ़िरवायची आहे गाडी तिकडे फ़िरव.. मला आत्ता आज्जिब्बात घरी जाण्याचा मुड नाहीए..”, असं म्हणुन रतीने गाण्यांचा आवाज वाढवला, सिट-बेल्ट लावला आणि सिट थोडं मागे करुन ती डोळे झाकुन आरामशीर बसली..

“युअर विश.. माय कमांड मॅम..ड्रायव्हर कबीर अ‍ॅट युअर सर्व्हीस..”, असं म्हणुन कबीरने गाडी सिटी-एक्झिटला वळवली..

[क्रमशः]

मंडळी, कथा आता शेवटाकडे झुकलेली आहे. जसे पुढे काय होणार? कबीरला कोण मिळणार ह्याबाबतीत तुम्ही उत्सुक आणि संभ्रमात आहात.. तसंच काही अंशी मी सुध्दा आहे. जरी मी शेवट ठरवलेला असला तरीही अजुन त्याबाबतीत मी १००% शुअर नाहीए. कळत नाहीए की राधा-कबीर..की रती-कबीर.. 🙂
तुम्हाला काय वाटतं? काय होणार? काय व्हायला पाहीजे?

मान्य आहे, कथेला उशीर होत आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व.. पण वेळ हे एक जसे कारण आहे.. तसंच दुसरं कारण मला शेवट परफ़ेक्ट करायचा आहे त्यासाठी प्रसंग, पात्र ह्यांची जुळवाजुळव कशी करावी ह्याबद्दल थोडा अधीक विचार करायला लागतोय.. सो.. थोडं समजुन घ्यावं ही विनंती..

बाकी तुमच्या प्रतिक्रिया चालु राहु देत.. अधीकाधीक छान-छान लिहायला लागणार मोठ्ठं प्रेरणास्थान म्हणजे तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया आहेत..

धन्यवाद
– अनिकेत

इश्क – (भाग २२)


भाग २१ पासून पुढे

“काय म्हणतेय तुझी कोका-कोला गर्ल?”, रोहनने ऑफिस मध्ये येताच कबीराला विचारले
“कोका-कोला गर्ल?”
“अरे तिच रे ती, त्या दिवशी तुझ्याबरोबर होती ती”
“कोण? रती का?”
“हां , रती”
“मग कोका-कोला गर्ल काय?”,
“अरे तू ती कोका-कोलाची जाहिरात नाही पाहिलीस का? सिद्धार्थ मल्होत्रा वाली.. त्यातली ती काउंटरवरची मुलगी, रती अगदी तशीच दिसते की”, रोहन
“हो रे… तरीच मी विचार करत होतो, कुठे तेरी बघितल्यासारखे वाटतेय हिला”

“बरं बोल, विचारलस का तिला? भेटायला तयार आहे का ती?”
“हो, हो विचारलं ना, पुढच्या विकेंडला चालेल म्हणाली.. आपण संध्याकाळी भेटू शकतो”
“लै भारी, मी लग्गेच मोनिकाला सांगतो, खूप मज्जा येईल आपण सगळे भेटलो की…”,

“अरे पण मग तु एव्हढा उदास का?”
“रतीचा बॉयफ़्रेंड आहे….”, रोहनची नजर टाळत कबीर म्हणाला.
“कोण म्हणलं?”
“तिच म्हणाली स्वतः.. ती म्हणाली की जनरल भेटायचं असेल तर येते.. पण इट्स नॉट अ डेट.. आय हॅव अ बॉयफ़्रेंड..”
“काय नाव बॉयफ़्रेंडचं?”
“पिटर..”
“पिटर.. काहीही.. मला नाही वाटत.. फ़ेकत असेल ती..”
“अरे नाही खरंच.. मॅरीएटमध्ये तो म-या-मी पब आहे ना.. तेथे बाऊंन्सर आहे म्हणे…”
“हॅ.. फ़ेकतेय ती..”
“अरे पण का? का फ़ेकेल?”
“का म्हणजे..? अरे ती ओळखतेच किती तुला? २-४ भेटींमध्येच आपण तिला डेट साठी विचारतोय.. ती बॅक-फुटवर जाणारच ना.. जगातल्या ९९% मुली पहील्यांदा हेच सांगतात…”
“मला नाही वाटत.. तिच्याकडे बघुन वाटलं नाही तेंव्हा ती खोटं बोलत होती…”
“तिने फोटो दाखवला दोघांचा?”
“असं कसं मी सरळ विचारु.. दोघांचा फ़ोटो दाखवं..”
“बरं असु देत.. सध्यातरी येतेय म्हणलीय ना.. मग बघु पुढचं पुढे..”…

असं म्हणून रोहन तेथून निघून गेला

 

रोहन गेल्यावर काबिरचे मन पुन्हा राधाकडे वळले. आजूबाजूला लोकं असताना, कामात असताना कबिर राधाला विसरून जायचा, पण एकटेपणात मात्र नकळतच त्याचे मन पुन्हा राधाच्या विचारात गुंगून जायचे

“कश्याला फोन केला असेल राधाने?”
“मी फोन घ्यायला हवा होता का?”
“फोन घेतला नाही म्हणून राधाने काय विचार केला असेल?”
“परत तिला कॉल -बैक करावा का?”

एक ना अनेक विचार त्याच्या मनात घोळत होते.

शेवटी मोठ्या प्रयत्नाने त्याने राधाला फोन करायचा विचार मनातून काढून टाकला.

 

नेपल्समध्ये येऊन राधाला दोन आठवडे उलटुन गेले होते. राधासाठी हा अनुभव खुपच थ्रिलींग होता. पर्यटकांबरोबर फ़िरता-फ़िरता तिचेही मस्त फ़िरणे होत होते.

एके दिवशी संध्याकाळी साईटसिईंग वरुन रुमवर परतत असतानाच अवंतीचा.. राधाच्या बॉसचा फोन आला..
“हॅल्लो मॅम…”, राधा..
“ए.. मॅम काय.. अवंतीच म्हण.. इतकी मोठी आहे का मी?”
“ओके.. अवंती..”, हसत राधा म्हणाली..
“कशी काय चालली आहे टुर? टीम कडुन सहकार्य मिळतयं ना व्यवस्थीत..”
“खूप मस्त.. सगळी टीम छान आहे.. मी नविन आहे तर मस्त सांभाळुन घेतात.. खूप शिकायला मिळतंय..”
“आणि नेपल्स? आवडलं का?”
“म्हणजे काय? ऑसम्मच आहे.. ४ दिवसांनी ही टुर संपतेय, पण असं वाटतंय, इथुन परतुच नये कधी..”
“नेकी ऑर पुछ पुछ.. वेल.. थोड्या काळासाठी मी तुझा तिथला स्टे वाढवु शकते अजुन.. दोन महीन्यांसाठी..”
“वॉव.. रिअली? कसं काय?”
“अगं.. नेपल्सला खुप मस्त एन्कॉयरी मिळत आहेत.. एक लेडीज-स्पेशल टुर करायची म्हणतेय.. थोडी मोठी बॅच असेल साधारण ५० जणांची.. तर तु आणि पूनम.. दोघी तिथेच थांबा.. आणि थोडं अजुन हॉटेल्स शोधा.. इतकं लार्ज बुकींग आहे.. थोडं डिस्काऊंट वगैरे बोलुन घ्या आणि आयटेनिअरी प्लॅन करा लेडीज-स्पेशलसाठी नेहमीच्या टुरपेक्षा वेगळं काय देता येईल वगैरे..”
“मस्तच.. साऊंड्स इंटरेस्टींग आणि पूनम सारखी सिनीअर ऑपरेटर असेल बरोबर तर काहीच प्रश्न नाही..”
“गुड गुड… मी पूनमशी बोलते तसं.. ही टुर संपली की आपण तिघी एक स्काईप-कॉल घेऊ मग, आणि बाकीचं प्लॅन करु.. ओके?”
“ओके.. अवंती.. अ‍ॅन्ड थॅंक्यु सोssss मच.. धिस मिन्स अ लॉट टु मी…”
“बाय राधा.. टेक केअर…” असं म्हणुन अवंतीने फोन ठेवुन दिला..

फोन ठेवल्यावर राधाने एक उंच उडी मारुन झालेला आनंद व्यक्त केला आणि पूनमशी बोलायला ती तिच्या रुमकडे गेली.

 

कबिरने ठरल्याप्रमाणे व्हॉट्स-अ‍ॅपवर चौघांचा ग्रुप बनवला होता. त्यामुळे प्रत्यक्ष नसली तरीही, अप्रत्यक्ष का होईना, रतीची इतरांशी ओळख झालेली होती.
शुक्रवारच्या संध्याकाळी ‘प्रोव्होक’ हॉटेलमध्ये डिनरला भेटायचं चौघांचं.. कबीर, रती, रोहन आणि मोनिकाचं.. ठरलं. हॉटेल शहरापासुन थोडं लांब असल्याने सगळ्यांनी कबीरच्या कारमधुन जायचा प्लॅन केला.

कबीरने सगळ्यांना पिक-अप केले आणि साधारण नऊच्या सुमारास सर्वजण रेस्तॉरंटमध्ये पोहोचले.

“तु मेरीयटमध्ये आहेस कामाला तर कित्तेक सेलेब्रेटी दिसत असतील नै”, मोनिकाने रतीला विचारले..
“हो..भरपुर.. खूप लोकांची ये जा असते तेथे..”
“आणि आय.पी.एलच्या टीम्स पण तेथेच असतात ना?”, रोहन
“हो.. माझा विराट बरोबर सेल्फ़ी आहे..”, असं म्हणुन रतीने आपल्या सेल मधला तिचा फ़ोटो सगळ्यांना दाखवला..
“सो लकी यार…”, मोनिका
“आणि वरती तो म-या-मी लाऊंज.. तेथे पण बर्‍याच पेज-थ्री पार्टीज असतील नै?”, रोहनने मुद्दाम म-या-मीचा विषय काढला तसा त्याची आणि कबीरची नजरानजर झाली.
“हो.. पण म्हणजे तो पब जरा टीन-एज किंवा थोड्या यंग लोकांसाठी आहे.. सो सेलेब्स पेक्षा त्यांची पोरं दिसतात जास्ती…”
“आणि मग फुल्ल दंगा होत असेल.. कसं आवरतात ह्या लोकांना..?”, रोहन जाणुन बुजुन बाऊंन्सर्स आणि त्या योगाने पिटरचा विषय निघतोय का हे पहात होता, पण तेवढ्यात स्टार्टर्स आले आणि तो विषय तेथेच थांबला.

चौघांचं खाणं-गप्पा चालु होत्या तेंव्हा कोपर्‍यातल्या टेबलवर बसलेला एक तरुण मुलगा सारखं त्यांच्याकडे बघत होता. शेवटी बर्‍याच वेळानंतर तो उठला, कबीरपाशी आला आणि म्हणाला.. “सर.. तुम्ही ‘इश्क’ पुस्तकाचे लेखक कबीर का?”
“हो..”, कबीर इतरांकडे बघत म्हणाला..
“सर.. तुमचं ते पुस्तक मला खूपच्च आवडलं.. मी कॉलेजमध्ये सगळ्यांना दिलं माझं वाचुन झाल्यावर.. सगळ्यांना खुप्पच आवडलं…”
“वेल.. थॅंक्यु..” आपल्या आवाजातली एस्काईटमेंट दाबुन ठेवत कबीर म्हणाला…
“सर.. पुढे काय होतं मिराचं? पुस्तकाचा पुढचा भाग येणार आहे ना? कधी येईल?”
“काम चालु आहे.. लवकरच मी अनाऊंन्समेंट करेन…”
“प्लिज सर.. लवकर येउ द्या त्याचा पुढचा भाग.. आम्ही सगळे वाट पहातोय..”
“नक्कीच नक्कीच..” कबीरला रतीसमोर त्याला मिळणारे प्रेम, प्रसिध्दी फ़ार फ़ार मोठ्ठे वाटत होते..
“सर.. एक सेल्फ़ी मिळेल?”
“शुअर.. व्हाय नॉट?”

कबीरने आपले स्पोर्ट्स जॅकेट निट केले आणि केसांमधुन एक हात फ़िरवला. कबीरबरोबर एक सेल्फ़ी घेऊन तो तरुण निघुन गेला…

“माय माय.. आपल्याबरोबर पण एक सेलेब आहे बरं का..” रती हसत हसत म्हणाली..
“प्रश्न आहे का?”, शर्टची कॉलर निट करत कबीर म्हणाला..
“ए पण खरंच.. काय झालं पुढे मला पण खूप उत्सुकता आहे.. कुठे आहे सध्या राधा?”

राधाचा उल्लेख झाला तसा कबीर काही क्षण खायचं थांबला.. आणि मग म्हणाला.. “माहीत नाही..”
“माहीत नाही? अरे पण मग तुझं पुस्तक पुढे कसं जाणार? का पुढची सगळी गोष्ट काल्पनीकच…”, रती
“हो रे कबीर.. खरंच बरेच दिवस झाले, तुझ्याकडुन राधाबद्दल काही ऐकलं नाही.. आहे कुठे ती?”, रोहन
“अरे खरंच माहीत नाही, तिने फोन नाही केला आणि मी पण…”, कबीरने राधाचा येऊन गेलेल्या फोनबद्दल कुणालाच काही सांगीतले नव्हते..

“मला राधाला बघायचंय.. कुणाकडे आहे तिचा फोटो?”, रती

सगळ्यांनीच नकारार्थी माना डोलावल्या..
“ए काय रे तुम्ही लोकं.. कबीरने इतकं मस्त वर्णन लिहीलंय मिराचं पुस्तकात.. मला बघायचीय खर्‍या आयुष्यात मिरा दिसते कशी…”
“आम्ही भेटलोय सगळे तिला.. पण फोटो असा नाहीए कुणाकडे…”, रोहन

“पण व्हॉट्स-अ‍ॅपवर असेल ना ती.. डीपी तरी असेलच की तिचा…”, रती सोडायलाच तयार नव्हती

कबीरने नाईलाजाने फोन काढला आणि राधाचा डीपी उघडला..

“वेलकम टू नेपल्स, इटली”, अश्या साईनबोर्डसमोर राधाचा फोटो होता…
“आई-शप्पथ.. ही इटलीला कधी गेली?”, आश्चर्याने कबीर उद्गारला..
“बघु बघु…”, असं म्हणुन रतीने फोन कबीरच्या हातातुन काढुनच घेतला..”वॉव्व.. शी इज प्रिटी यार.. लकी यु..”, कबीरच्या खांद्याला आपल्या खांद्याने ढकलत रती म्हणाली..
“ए, आपला ग्रुप फोटो काढुन पाठवं ना तिला..” अचानक मोनिका म्हणाली.. तिच्या मनात अजुनही राधाबद्दल थोडी जेलसी, थोडा राग होता. समहाऊ आपण अजुनही कबीरच्या आजुबाजुला आहे हे तिला राधाला दाखवायचं होतं..
“कश्याला उगाच.. माझा काही कॉन्टॅक्ट नाहीए तिच्याशी..”, कबीर
“असं कसं.. पुस्तकाची हिरॉईनना ती.. आणि रिअल-लाईफ़ मध्ये पण…”
“मोना प्लिज…”, तिचं वाक्य तोडत कबीर म्हणाला.. रतीसमोर त्याला राधा आणि त्याच्या लाईफ़-बद्दलचा उल्लेख टाळायचा होता. जे काही घडलं होतं तो भूतकाळ होता.. आणि तो आता मागे सारुन कबीर नविन मार्ग शोधत होता
“बरं बरं ठिके.. पण फोटो पाठवायला काय हरकत आहे.. तुझा संपर्क नसेल तिच्याशी तर निदान ह्यामुळे होईल तरी..”, रती.

दोघीही ऐकायला तयार नव्हत्या.. त्यामुळे शेवटी नाईलाजाने त्याने सगळ्यांचा एक हॅप्पी फोटो काढुन राधाला व्हॉट्स-अ‍ॅप केला..

 

दहा वाजुन गेले तसे डीजे ने धांगडधींगा गाणी बंद केली आणि सॉफ़्ट, रोमॅन्टीक गाणी चालु केली..
“वॉव.. काय मस्त गाणी लागली आहेत..लेट्स डान्स..”, मोनिका म्हणाली..
“ए.. नाही .. निघुयात.. घरी आई-बाबा वाट पहात असतील.. साडे अकरा वाजतील घरी जाईस्तोवर..”, रती

रोहन, मोनिका आणि कबीरला हे अभीप्रेत होते. त्यांनी प्लॅनच त्याप्रमाणे बनवला होता..

“ओह.. बरं मग मी आणि मोनिका थांबतो.. कबीर तु सोड तिला घरी..”, रोहन आधी ठरल्याप्रमाणे म्हणाला..
“अरे पण.. तुम्ही येणार कसे घरी मग?”, कबीर
“त्यात काय एव्हढं.. ओला-कॅब बोलावतो ना आम्ही.. काहीच प्रॉब्लेम नाहीए.. खरंच जा तुम्ही, आम्ही थांबतो अजुन थोड्यावेळ..”, रोहन

रती आणि कबीरला थोडा एकांत मिळावा ह्या दृष्टीने त्यांनी आधीच हे प्लॅन करुन ठेवले होते. मला बाराच्या आत घरी परतायचे आहे हे रतीने त्यांना सांगीतले होते, त्यावरुनच त्यांनी मुद्दाम लांबचे हॉटेल निवडले होते.

“ओके देन.. बाय.. एन्जॉय…”, कबीर..
“बाय गाईज…”, रतीने पण दोघांना बाय केले आणि ती कबीरबरोबर बाहेर पडली.

आधीच शहराबाहेरचे हॉटेल.. त्यात शेजारुन वाहणारी नदी.. त्यामुळे हवेत चांगलाच गारठा पसरला होता.

“आय एम सॉरी.. माझ्यामुळे तुला लवकर निघावं लागलं…”, रती
“इट्स ओके.. तसेही मी थांबुन काय केले असते तेथे..”, कबीर

चालता चालता रती अचानक थांबली.

“तुझ्यात आणि राधात खरंच काही नाही?”, रती
“नो.. खरंच काही नाही.. आमच्या संपर्क पण काहीच नाही नंतर..”
“पण का कबीर.. मला माहीतीए तु वेडा आहेस तिच्यासाठी.. तिचे हसणे, बोलणे, तिचे कानामागे केस अडकवताना हळुच तुझ्याकडे बघणे..तिचा तो बासरीचा टॅट्टू.. सगळ्यासाठी.. तुझ्या लेखनातुन ते जाणवते कबीर. तु तिला कध्धीच विसरु शकणार नाहीस.. गो फ़ॉर हर.. खरंच सांगतेय..”, रती कबीरच्या डोळ्यात डोळे घालुन पहात म्हणाली..

कबीर गाडीत बसेपर्यंत काहीच बोलला नाही.

“रती.. आर यु हॅप्पी?”, गाडी सुरु केल्यावर तो म्हणाला..
“म्हणजे? ऑफ़कोर्स आय एम हॅप्पी..”
“नाही म्हणजे.. असं सॅटीसफ़ाईड अबाऊट लाईफ़.. आयुष्याकडुन आपल्याला जे जे हवंय ते सगळं मिळालय.. किंवा मिळतंय.. त्या टाईप्स हॅप्पी?”
“कबीर.. आय एम नॉट इव्हन थर्टी.. हे असं आयुष्याबद्दल मी आत्ताच कसं बोलु..? मी अजुन आयुष्य बघीतलंच कुठे आहे…? बट एनीवेज.. विषय चांगला बदललास..”, हसत हसत रती म्हणाली

कबीर हलकेच हसला आणि गाडी पार्कींगमधुन बाहेर काढुन घराकडे वळवली..

 

काय असेल रतीच्या मनात.. हा जो कोण तिचा बॉयफ़्रेंड आहे म्हणतीय पिटर.. तो खरंच असेल? का फ़क्त तिने रोहन म्हणतो तशी थाप मारली असेल?
कबीरबरोबर फोटोमधली ही नविन मुलगी बघुन राधा कशी रिअ‍ॅक्ट होईल?
कबीरच्या मनात काय चालु असेल?

एकमेकांत गुंफ़लेली ही पात्र आणि त्यांची नात्यांची गुंतागुंत सुटेल का अजुनच वाढत जाईल..?

वाचत रहा.. इश्क भाग-२३ 🙂

[क्रमशः]

इश्क – (भाग २१)


भाग २० पासुन पुढे>>

“काय रोहन शेठ.. कशी होती कालची संध्याकाळ?”, रोहन ऑफ़ीसला येताच कबीर म्हणाला..
“मस्त.. कबीर.. तु खरंच चिडला नाहीस ना?”, रोहन
“नाही अरे.. मी का चिडु? खरंच मला आनंद झाला.. तुम्ही दोघंही अनुरुप आहात एकमेकांना..”
“आम्ही ठरवलं होतं तुला सांगायचं.. पण समहाऊ योग्य अशी वेळच मिळत नव्हती..”
“असु दे अरे.. तुम्ही दोघं खुश आहात ना.. मग झालं…”
“बरं आमचं जाऊ देत.. तुझं बोल.. तुझी संध्याकाळही चांगली गेलेली दिसतेय.. ती बरोबरची छानच होती.. रती ना?”, रोहन
“हम्मं.. खरंच छान आहे अरे ती.. इतकी मस्त बोलते ना.. खरं तर तिनेच माझी संध्याकाळ छान बनवली..”, असं म्हणुन कबीरने त्या संध्याकाळबद्दल रोहनला सांगीतलं..

“तुला आवडलीय ती .. हो ना?”, कबिरकडे बघत रोहन म्हणाला..
“मला काय.. मला सगळ्याच आवडतात…”, कसंनुसं हसत कबीर म्हणाला..”पण खरंच, कुणालाही आवडावी अशीच आहे ती…”
“मग कसली वाट बघतो आहेस.. हो पुढे बिनधास्त.. राधाला विसरुन जा.. तिने तिच्या आयुष्याचा मार्ग निवडला आहे.. आणि तिचा आणि तुझा मार्ग कधी एकच असेल असं मला तरी वाटत नाही..”

“हो रे.. पण राधा जातच नाही मनातुन.. काय करु…?”
“थोडा मिक्स हो लोकांमध्ये.. रतीशी संपर्क वाढव.. राधा म्हणजे जग नव्हे.. जग खुप सुंदर आहे कबीर.. आज प्रेमात पडल्यावर माझ्या हे लक्षात आलेय.. इथे कोणी कुणासाठी थांबत नसतं..”
“खरं आहे.. रती म्हणाली आहे तसंही.. पुन्हा भेटुया…”
“अरे व्वा.. ए मग एक भारी आयडीया आहे.. लेट्स हॅव अ डबल-डेट..”, खुर्चीतुन आनंदाने उठत रोहन म्हणाला..

“म्हणजे?”
“अरे म्हणजे.. मी-मोनिका.. तु आणि रती.. मस्त जाऊ ना एखाद्या छानश्या रेस्तॉरंटला.. मज्जा येईल…”
“चालेल भेटुया.. पण रतीला असं एकदम विचाराणं बरोबर दिसणार नाही.. मी तिला आधी इनफॉर्मली भेटतो.. आणि मग तेंव्हा विचारेन..”
“डन देन.. सांग मग कधी.. कुठे ते…”

 

कबीरला वाटलं होतं, रती फोन करेल, पण ४ दिवस वाट पाहुनही तिचा फोन नाही आला.. शेवटी कबीरनेच तिला फोन लावला..
“हाsssssय कबीर…कसा आहेस??”,रती म्हणाली..

रतीच्या आवाजामध्ये एक फ्रेशनेस होता.. उत्साहाचा खळाळता झरा होता…

“मी मस्त…कुठे गायब आहेस..?”, कबीर
“मी कुठे गायब.. तुच गायब आहेस.. म्हणलं आज फोन करशील.. उद्या करशील..”
“हो का? बरं बरं.. सांग कधी भेटुया?”
“कश्याला?”

रतीच्या प्रश्नाने कबीर एकदम स्टंप्ड झाला..
“ओके ओके.. सॉरी.. मस्करी केली रे.. मी संध्याकाळी ७.३० नंतर मोकळी होते.. उद्या भेटुया?”
“चालेल.. पण पाशा नको.. ह्यावेळेस माझं कार्ड-पेमेंट असेल.. परवडणार नाही पाशा..”, हसत हसत कबीर म्हणाला..
“बरं..तसं असेल तर मग मला थोडा उशीर होईल..”
“का?”
“का काय अरे.. मी साडी घालुन येऊ का तुझ्याबरोबर दुसरीकडे.. इथे पाशामध्ये चाललं असतं..”
“ओके.. ९.३०?”
“१० ला भेटु.. हायवे वर रंगला-पंजाब नावाचा ढाबा आहे.. मस्त असतं पंजाबी.. आणि उशीराच सुरु होतो तो.. चालेल?”
“पळेल.. भेटु उद्या..”
“बाsssssय…”

फोन ठेवल्यावर कबीर स्वतःशीच विचार करत होता.. किती सहज एकरुप झालो आपण हिच्याशी.. असं वाटतंय खुप वर्षांपासुनची ओळख आहे..हिच्याशी बोलायला लागलं की सगळं टेन्शन खल्लास होऊन जातं. असं खुप स्पेशल वाटतं… रोहनच्या म्हणण्याचा विचार करावा का? राधाला विसरुन… पण रतीबद्दल तरी काय माहीती आहे आपल्याला? कश्यावरुन ती सिंगल असेल? कदाचीत असेलही तिच्या आयुष्यात कोणी. पण मग तसं असतं तर ती बाहेर जेवायला यायला लगेच तयार झाली नसती.. कदाचीत आढे-वेढे घेतले असते..

शट्ट.. एक गोष्ट कधी सरळ घडत नाही आपल्या आयुष्यात..

कबिर स्वतःवरच चरफडला..

 

रंगला पंजाब ढाबाच्या थिमनी सजलेलं एक रेस्तॉं होते. कबीर नेहमीच्याच वापरातले कपडे घालुन आला होता.. निळ्या रंगाची जिन्स आणि पांढर्‍या रंगाचा शर्ट. तर रतीसुध्दा नेहमीच्याच पेहेरावात होती. गुलाबी रंगाची स्लॅक, गुलाबी रंगाच्याच फ्लॉवरी प्रिंटेड पॅटर्नचा स्लिव्हलेस कुर्ता, केसांना गुलाबी रंगाची रिबिन आणि हातात भरपुर बांगड्या.

“हॅल्लो..” दोघांनी एकमेकांना ग्रीट केलं
“टेबल घ्यायचं? का ह्या बाहेर मांडलेल्या कॉट्स?”, कबीरने विचारलं
“कॉट्स.. एनीटाईम.. टेबलवार तर आपण नेहमीच जेवतो..”, गार्डनमधल्या एका कॉटवर बसकण मारत रती म्हणाली..
“आधी ऑर्डर करु आणि मग गप्पा मारु.. खुप भुक लागलीय…”, कबीर मेन्युकार्ड चाळत म्हणाला..

“एस्क्युज मी.. लिकर-चं कार्ड…”, वेटरला हात करत कबीर म्हणाला..
“ए.. लिकर काय.. त्यापेक्षा जलजीरा घेऊ.. अरे फार मस्त मिळतं.. भारी चॅट-मसाला आणि खारी बुंदी वगैरे टाकुन देतात..”, कबीरला थांबवत रती म्हणाली..

कबीरला रतीचं मनातल्या मनात हसूच आलं. आयुष्यात कधी ड्रिंक्स म्हणुन आपण जलजीरा घेऊ असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, पण रतीखातर त्याने ते मान्य केलं. बाकीची ऑर्डर देऊन झाल्यावर रती म्हणाली..

“कबीर.. तुला काहीतरी दाखवायचं होतं…”
“हम्म.. दाखवं की..”
“चिडणार नाहीस ना?”, पर्सध्ये हात घालत रतीने विचारलं..
“ते काय आहे त्यावर अवलंबुन आहे..”,हसत हसत कबीर म्हणाला.

रतीने पर्समधुन कबीरचेच पुस्तक बाहेर काढले..

“हे काय? माझंच पुस्तक काय मला दाखवतेस…”, कबीर आश्चर्याने म्हणाला..
“अरे एक मिनिटं.. हे बघ..”, पुस्तक उलट करुन मागचं पान दाखवत रती म्हणाली

कबीरने उत्सुकतेने पुस्तकाच्या मागच्या पानावर नजर टाकली. जिथे त्याचा फोटो छापला होता तो भाग रती त्याला दाखवत होती. रतीने त्या फोटोला पेनने दाढी-मिश्या काढल्या होत्या..

“हे काय? ऑफ़ीसमध्ये वेळ जात नव्हता म्हणुन असले उद्योग करतेस का तु?”
“अरे.. चं.. निट बघ ना.. छान दिसतेय तुला दाढी.. म्हणजे अशी फ़ार नाही.. पण थोडी खुरटी.. मस्त रफ़ लुक दिसेल की तुला…”, रती पुन्हा फोटोकडे बोट दाखवत म्हणाली

रतीने त्याचा.. त्याच्या लुकचा विचार केला हा विचारच कबीरला सुखावणारा होता..

“खरं का?” आपल्या हनुवटीवरुन हात फिरवत कबीर म्हणाला
“हे बघ.. तसंही तुझा ब्रेक-अप झालाय नं.. मग असा ब्रेक-अप झाल्यावर लुक चेंज करायचा असतो अरे..आणि अशी दाढी वगैरे तर म्हणजे अगदीच साजेसा होईल..”

कबीर काहीच बोलला नाही..

“ओके सॉरी.. तु हर्ट झाला असशील तर.. पण मी ही अशीच आहे.. प्रत्येक गोष्टीत काहीतरी पॉझीटीव्ह शोधणारी.. एकदम ऑप्टीमिस्टीक.. बरं ब्रेक-अपचं जाऊ देत.. पण खरंच चांगली दिसेल तुला थोडी-खुरटी दाढी.. ट्राय तर करुन बघ..”, रती समजावणीच्या स्वरात म्हणाली.

“बरं बघु.. मी पण तुझ्यासाठी काही तरी आणलंय..”,खिश्यातुन एक छोटी डब्बी काढत कबीर म्हणाला..
“अरे व्वा.. सुधारलास की.. मी म्हणलं मागच्या वेळेसारखा हात हलवतच येतोस की काय?”, त्याच्या हातातुन ती ड्बी घेत रती म्हणाली..

रती ती डबी उघडत असताना कबीर तिच्याकडे निरखुन बघत होता.. एखाद्या निरागस मुलीसारखी प्रचंड उत्सुकता तिच्या चेहर्‍यावर होती. क्षणाक्षणाला तिच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते..

रतीने ती डबी उघडली.. आतमध्ये केशरी आणि मोरपंखी रंगाच्या शेड्सचे दोन नेलपेंट्स होते…

“वॉव.. मिक्स-अ‍ॅन्ड मॅच.. लव्ह्ड इट…”, रती दोन्ही रंग निरखुन बघत म्हणाली
“तु आणलेस?”
“म्हणजे काय?”
“म्हणजे.. तु दुकानात जाऊन आणलेस.. आपले आपले..?”
“हो.. सेंन्ट्रलला गेलो होतो.. तिथुन आणलेत..बिल दाखवु का???”
“नको नको.. राहु देत.. ए पण मस्तच आहेत…”

दोघांच्या गप्पा चालु असतानाच ऑर्डर आली…
टेबलावर खाण मांडुन वेटर गेल्यावर रती म्हणाली.. “कबीर मला मोनिका.. आणि राधा दोघींबद्दल ऐकायचं आहे.. सांग ना मला सगळं…”
“का? तुला का सांगु मी?”, कबीर
“म्हणजे काय.. तुझ्या पुस्तकातली पात्र आहेत ती.. आणि मी ती कॉन्टेस्ट-विनर आहे.. त्या दिवशी आपलं बोलणं पुर्ण झालं नाही.. मला अजुन जाणुन घ्यायचं आहे त्या दोघींबद्दल.. म्हणजे रिअल-लाईफ़मध्ये त्या दोघी कश्या आहेत.. अगदी पुस्तकात लिहीले आहे तसेच का?”
“ओय.. झालं ती पार्टी संपली तिथेच.. आता कसलं विनर आणि कसलं काय? तेंव्हाच विचारायचं होतंस..”,
“फटके देईन हा कबीर.. नाटकं करु नकोस.. निट सांग पहील्यापासुन.. खाऊन देणार नाही नाहीतर मी तुला…”, डोळे मोठ्ठे करत रती म्हणाली…
“ओके.. ओके.. सांगतो…” असं म्हणुन कबीरने मोनिकाच्या भेटीपासुन सगळं सांगायला सुरुवात केली

 

इटलीमधील नेपल्सच्या एअरपोर्टवर राधाने पाय ठेवला तेंव्हा ती प्रचंड रोमांचीत झाली होती. गेले काही महीने.. किंबहुना काही वर्ष तिच्यासाठी वाईटच ठरली होती. अनुरागशी लग्न झाल्यानंतर काही महीन्यातच तिच्या स्वप्नांचा चक्काचुर झाला होता. गोकर्णमधुन ती थोडक्यात वाचली होती, त्यावेळेस अनुरागची आणि नंतर कबीरची मदत झाली नसती तर ती एव्हाना एकतर पोलिस-स्टेशनमध्ये किंवा पोलिस-स्टेशनच्या चकरा मारण्यात अडकली असती.

पण ह्या सगळ्यांतुन जाउन राधा आता सावरली होती.. स्वतःच्या पायावर उभी राहु पहात होती. मोठ्या कष्टाने तिने स्वतःसाठी नोकरी.. करीअरचा मार्ग निवडला होता. आपला आनंद कुणाजवळतरी व्यक्त करावा असं तिला राहुन राहुन वाटत होतं. लगेज चेकआऊट करुन बाहेर आल्यानंतर तिने फोनमधील कॉन्टॅक्ट्सवरुन नजर फिरवली. परंतु कुणाला फोन करावा असं तिला कुणी सापडतचं नव्हते. आई-बाबा, अनुराग, जवळचे मित्र-मैत्रीणी सगळ्यांनीच तिच्याशी संबंध तोडुन टाकले होते. कॉन्टॅक्ट्स स्क्रोल करताना ती कबीरपाशी येऊन थांबली.

गोकर्णवरुन परतल्यानंतर तिने कबीरला फोनच केला नव्हता आणि त्याने सुध्दा परत संपर्क करण्याचा प्रयत्न केला नव्हता. नविन नोकरी.. इटलीचा व्हिसा आणि आता नेपल्समध्ये प्रवेश ह्याबद्दल तिने कबीरला काहीच सांगीतले नव्हते.

कंपनीने राधाला फोनवर इंटरनॅशनल-रोमींग चालु करुन दिले होतेच, शिवाय फॅमीलीसाठी काही फोन मोफ़त करण्याची सुविधाही दिली होती.

तिने घड्याळात नजर टाकली, इटलीतील वेळेनुसार संध्याकाळचे सात वाजले होते, त्यानुसार भारतात साधारण रात्रीचे १०.३० वाजुन गेले असतील असा तिने विचार केला.

“काय करत असेल कबीर? करावा का त्याला फोन..? आपण इटलीतुन फोन करतो आहोत हे मोठ्ठे सप्राईज असेल? की मी फोन केला हेच त्याच्यासाठी सर्प्राईज असेल?”
शेवटी ‘दोन मिनिटं बोलायला काय हरकत आहे.. नसेल मोकळा तो तर नाही घेणार फोन…’ असा विचार करुन राधाने मोबाईलवर कबीरचा नंबर लावला..

 

“पण मग आता राधा आहे कुठे सध्या?”, कबीरचे बोलुन झाल्यावर रतीने विचारले
कबीर काही बोलणार एव्हढ्यात त्याचा फोन वाजला..

“नेम द एन्जल अ‍ॅन्ड एन्जल अ‍ॅपीअर्स…”, मोबाईल रतीला दाखवत कबीर म्हणाला..

राधाचा फोन बघुन रतीच्या चेहर्‍यावरील क्षणभरासाठी का होईना बदललेले भाव कबीरने टिपले.

“घे ना फोन..”, रती म्हणाली
“नको.. जाऊ देत..”, कबीर फोन सायलंट मोडवर करुन परत खिश्यात ठेवत म्हणाला..
“का? अरे घे.. एक महीन्याने फोन करतेय ना ती..”
“म्हणुनच नको.. आज आपली डेट..” आणि कबीर एकदम थांबला..
“ओह.. ही डेट होती का?”, काहीसं हसत रती म्हणाली…
“दॅट रिमाईंड्स मी.. रोहन म्हणत होता की आपण चौघ भेटुयात कुठेतरी.. म्हणजे आपण दोघं आणि तो आणि मोनिका.. व्हॉट से?”
“अं.. रोहन म्हणतोय ना.. मग मी रोहनला सांगते हो की नाही ते.. “, पुन्हा एकदा हसत रती म्हणाली..
“तु काय नेहमी माझी खेचायलाच बसलेली असतेस का? बर मी विचारतोय तुला.. जायचं का?”, कबीर खजील होत म्हणाला..
“मला चालेल… पण मी दोघांनाही फारसं ओळखत नाही रे.. एक काम कर ना, व्हॉट्स-अ‍ॅपवर एक ग्रुप बनव आपला चौघांचा.. म्हणजे जरा ओळखपण होईल..”
“वोक्के… चल निघुयात?”
“चलो…”

दोघंही बिल भरुन हॉटेलमधुन बाहेर पडले..

 

कबीरच्या फोनवर राधाचा चार मिस्ड-कॉलनंतर पाचव्यांदा फोन वाजत होता.

[क्रमशः]

इश्क – (भाग २०)


भाग १९ पासुन पुढे>>

कबिर मेन्यु-कार्ड बघण्यात मग्न होता तेंव्हा त्याच्या समोर एक नेपाळी किंवा तत्सम दिसणारी एक मुलगी येऊन उभी राहीली. तिच्या हातामध्ये पिवळ्याधम्मक लिली फुलांचा एक मोठ्ठा गुच्छ होता.

कबिरने प्रश्नार्थक नजरेने रतीकडे बघीतलं.

रती हसत उभी राहीली आणि तिने तो गुच्छ त्या मुलीकडुन घेऊन कबिरच्या पुढे धरला.. “हे घे.. तुझ्यासाठी…”
“अगं गेस्ट तु आहेस, मी नाही..”, उठुन उभं रहात कबीर म्हणाला..
“घे रे.. एका मोठ्या लेखकाला भेटतेय.. एव्हढं तर करायलाच हवं ना?”
“ओहो… मोठ्ठा लेखक म्हणे… थॅंक्स.. मस्त आहेत फुलं..”, आधी रतीकडे आणि मग त्या मुलीकडे बघत कबीर म्हणाला..

“थॅंक्यु सर..मॅडमने सांगीतलं होतं, फुलं चांगलीच हवीत.. आजचा स्पेशल डे आहे…”, ती मुलगी हसत हसत म्हणाली..
“हॅना…ssss”, डोळे मोठ्ठे करुन रती तिला म्हणाली..
“.. आणि मॅडम असं पण म्हणाल्या की सर्व्हीस निट हवीय आणि कुणाचा डिस्टर्बन्स नकोय…”, हॅना म्हणाली..
“ए.. गधडे, चोमडे, मॅडम काय गं? जा तुझी कामं कर, शिफ़्ट संपली नाहीए तुझी.. बघते तुला उद्या…”
“ओके मॅडम…”
“आणि सॅमला पाठव, अ‍ॅपीटायझर्स ऑर्डर करायची आहेत…”

“तुझ्याबरोबरच असते का हॅना?”, ती गेल्यावर कबिर म्हणाला..
“हो.. आम्ही एकत्रच जॉईन झालो इथे.. एक वर्ष झालं आता…पण..फ़ारच बडबड करत होती आज…. बघतेच तिला आता उद्या…” काहीसं फणकारुन रती म्हणाली
“ए, पण रिअल्ली थॅंक्स फ़ॉर द फ्लॉवर्स..”, कबिर फुलांना न्याहाळत म्हणाला..

एव्हढ्यात वेटर ऑर्डर घ्यायला आला…

“ड्रिंक्स मध्ये काय घेणार?”, कबिरने रतीला विचारले..
“सॉरी.. मी ड्रिंक्स घेत नाही..”,रती म्हणाली..
“रिअल्ली?”
“हम्म.. पण तु कर ऑर्डर…”
“प्लिज.. एका सुंदर मुलीसमोर बसुन एकटा दारु ढोसण्याइतपत मी बेवडा नाहीए, आणि तेव्हढे संस्कार आहेत अजुन माझ्यावर.. तु नाही तर मी पण नाही..”

दोघांनी मिळुन पुढची ऑर्डर दिली आणि मग रती म्हणाली.. “सो पुस्तकाबद्दल आपण बोलत होतो… आपण कुठे होतो?”
“आपण बॉबी बद्दल बोलत होतो..”, कबिर
“बॉबी..”
“हम्म.. तु तो डायलॉग मारलास ना..प्यार मै सौदा वगैरे.. तिथे..”
“ओह हा…आठवलं..”

“एक मिनीट, पण त्याआधी, मला जाणुन घ्यायचं आहे.. लकी ड्रॉची विनर कोण आहे? कशी आहे? मला तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही..”, कबिर तिला थांबवत म्हणाला
“अम्म.. मी कशी आहे! एका वाक्यात सांगायचं तर ‘खुद की फेव्हरेट हुं!”, थोडीशी स्वप्नाळू आहे, स्वप्न बघायला खुप आवडतात, सिनेमे बघायला, पुस्तक वाचायला आवडतात… प्रेमावर गाढ विश्वास आहे.. कधी अजुन कुणाच्या रिअल-लाईफ़मध्ये प्रेमात नाही पडले.. पण जेंव्हा पडेन तेंव्हा त्यानेच प्रपोज करावं वगैरे जुनाट विचार बाजुला सारुन सरळ प्रप्रोज करेन.. किंबहुना.. मला प्रपोज करायला मिळावं ही एकमेव अपेक्षा मला प्रेमाच्या बाबतीत आयुष्याकडुन आहे.. अम्म.. करीअर वगैरे फ़ारसं मला भावत नाही.. त्यापेक्षा मस्त लग्न करुन संसार थाटायला मला खुप आवडेल.. ज्याच्याशी मी लग्न करेन ना कबिर.. तो खरंच खुप लक्की असेल.. खुप छान घर सांभाळेन मी त्याचं. इथे हॉटेलमध्ये कधी कधी जास्त वेळ थांबुन इथल्या शेफ कडुन मी स्वयंपाकही शिकतेय.. आय डोंन्ट ड्रिंक.. आय डोंन्ट स्मोक.. मी एकदम परफ़ेक्ट हाऊसवाईफ़ असेन…”

रती स्वतःबद्दल भरभरुन बोलत होती, आणि कबिर मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता.

“थोडक्यात सांगायचं ना.. तर तुझ्या पुस्तकातल्या त्या मीराच्या अगदी विरुध्द आहे मी. स्वतःच्या नवर्‍याला सोडुन, सारखं स्वातंत्र्य स्वातंत्र्य हवंय म्हणुन स्वातंत्र्य मिळत नसतं.. नातेवाईकांच्या गोतावळ्यात, स्वतःच्या मुलांबरोबर, नवर्‍याबरोबरही आपण आपलं स्वातंत्र्य जपु शकतो..”

“एक्स्झाक्टली..”, कबिर एक्साईट होऊन म्हणाला..
अचानक रतीने कबिरच्या डोळ्यात डोळे घालुन बघीतलं आणि म्हणाली.. “कबिर.. तुझं हे पुस्तक.. सत्य घटनांवर आधारीत आहे ना? कदाचीत.. तुझ्याच आयुष्यात घडुन गेलेल्या?”

रतीच्या त्या प्रश्नाने कबिर पुरता गोंधळुन गेला.. त्याला काय बोलावं तेच सुचेना..”असेलही.. कदाचीत नसेलही..”, शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला..
“मला माहीते कबीर.. मीरा सोडुन गेल्याचं दुःख तुझ्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसतं आहे.. पुस्तकाचा शेवट जेथे झाला त्यानंतर पुढे काही घडलं का नाही, ते मला माहीत नाही.. पण मीरा तुझ्या आयुष्यात नाहीए हे नक्की.. हो ना?”

“काहीही हं रती..”, कबिर ओढुन ताणुन हसत म्हणाला.. “मी एक लेखक आहे.. आणि लेखकाने लिहीलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या आयुष्यात घडलेली असेलच असं काही नाही..”
“प्रत्येक गोष्ट नक्कीच नाही..पण ही असेल असं समहाऊ मला वाटतंय.. आणि म्हणुनच तु अजुनही मीराला शोधतो आहेस.. कदाचीत ती इथे नसेल तर तिला इतरांमध्ये.. कदाचीत माझ्यामध्येही शोधत असशील…हो ना?”

वेटर ऑर्डर घेऊन आला तसा तो प्रश्न तेथेच अर्धवट राहीला..

“एनीवेज.. माझं सोड.. आपण पुस्तकाबद्दल बोलुयात?”, ऑर्डर टेबलावर मांडुन वेटर निघुन गेल्यावर कबीर म्हणाला..
“जशी तुझी इच्छा, तुला तुझं वैयक्तीक आयुष्य, तुझी प्रायव्हसी जपायचा पुर्ण अधीकार आहे..”
“हम्म…”, आपल्या प्लेटमध्ये ऑर्डर वाढुन घेत कबीर म्हणाला..

“मग.. तु पुढच्या पार्टवर काम सुरु केलंस?”, काही वेळ शांततेत खाल्यावर रती म्हणाली
“तसा थोडा विचार केलेला आहे.. पण अजुन लिहायला अशी सुरुवात केली नाही.. तुला काय वाटतं? काय व्हायला हवं पुढे?”?
“अम्म.. म्हणजे कथेचा जो नायक आहे.. त्याबद्दल पुर्ण माहीती नाही पुस्तकात.. म्हणजे हे बघ.. शेवटी आपल्या भारतीय संस्कृतीत.. प्रेम जमलं की त्याच्या शेवट बहुतांशी लग्नातच होतो.. कथेच्या नायकाची मीराकडुन तिच अपेक्षा आहे का? पुस्तकात म्हणल्याप्रमाणे मीराचे आधी लग्न झालेले आहे.. नायक ह्यासाठी तयार आहे का? त्याच्या घरचे हे लग्न मान्य करणार आहेत का?”
“नुसतं इतकंच नाही.. अजुनही असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत..”, कबीर स्वतःशीच बडबडला..
“दुसरी गोष्ट त्याच्या पहील्या गर्ल-फ्रेंडशी असलेलं त्यांच नात तुटलं.. जरी ते नातं, तिने तोडलं असलं तरी तु म्हणल्याप्रमाणे तिचं वागणं, तिची लाईफ़-स्टाईल आपल्या नायकालाही पटत नव्हतीच ना.. मग मीराचे हे स्वच्छंदी वागणं तो मान्य करेल.. तिच्याशी जुळवुन घेऊ शकेल?”
“आणि मीराचं काय? म्हणजे ती जर नायकाचं प्रेम ती स्विकारत नसेल तर नायकाने काय करावं?”, कबीर
“तु लेखक आहेस.. तुला माहीती पाहीजे..”, हसत रती म्हणाली…
“हो म्हणजे.. तुझं काय मत आहे?”

“अम्म.. मला वाटतं तिच्या पहील्या लग्नात ती दुखावली गेली आहे.. तिचा नात्यांवरचा, प्रेमावरचा विश्वास काहीसा ढासळला आहे.. मला वाटतं नायकाने तिला थोडी मोकळीक द्यावी. तो जितका तिच्या जवळ जायचा प्रयत्न करेल तितकी ती दुरावत जाईल. जर तिच्या मनात सुध्दा प्रेम असेल तर आज ना उद्या तिला ह्याची नक्की जाणीव होईल…”
“तुला वाटतं असं…?”, कबीर

रती बराच वेळ कबीरचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होती. कबीरला ते असह्य झालं आणि त्याने नजर दुसरीकडे वळवली.

 

नंतरचा वेळ मात्र त्यांनी पुस्तक सोडुन इतर विषयांवर गप्पा मारण्यात घालवला. मीराचा विषय निघाल्यावर कबीर काहीसा अपसेट झाला होता हे रतीने ताडले आणि मग तिनेच विषय बदलला. तिच्या मनमोकळ्या स्वभावाने कबीर पुन्हा जुन विसरुन तिच्या गप्पांमध्ये सामील झाला.

थोड्या-थोड्यावेळाने कोण-ना-कोणतरी सतत येऊन काही कमी नाही ना ह्याची खात्री करुन जात होते. रतीनेच खरं तर ती संध्याकाळ कबीरसाठी स्पेशल बनवली होती. शेवटी बिल भरुन झाल्यावर दोघंही बाहेर पडले.

“आता परत कामं? का आता घरी?”, कबीरने विचारलं.
“नाही आता घरी..”
“सोडु का घरी? कशी जाणारेस?”, कबीर
“माझी नॅनो आहे ना..”
“नॅनो..??”
“हो..का? चांगली आहे गाडी…”

दोघं गेटपाशीच गप्पा मारत उभे होते तोच कबीरच लक्ष गेटच्याच थोडं पुढे एका गडद-निळसर रंगाचा ब्लेझर, हातात फुल घेऊन उभ्या असलेल्या तरुणाकडे गेले आणि तो म्हणाला…”रोहन.. तु? इथे?”

कबीरला इथे बघताच रोहन पुरता गोंधळुन गेला.. काय करावं हे न समजुन तो जागच्या जागीच थिजुन उभा राहीला..

“कबीर.. तु? तु तर ब्ल्यु-डायमंडला जाणार होतास ना?”

एव्हाना रतीपण तिथे येऊन थांबली.
कबीरने रतीची आणि रोहनची ओळख करुन दिली.

“हो अरे.. पणे हिने ऐन वेळी बदलले.. पण तु काय करतो आहेस इथे.. आणि हातात फुलं वगैरे.. कोणी येणार आहे की काय?”, डोळे मिचकावत कबीर म्हणाला..
“हो म्हणजे.. नाही..”
“अरे असा बावचळल्यासारखा काय वागतो आहेस.. आहे तर आहे.. त्यात काय एव्हढं? माझ्यापासुन लपवत होतास ना.. पकडला कि नाही?”
“नाही रे.. अगदीच तसं काही नाही..”
“नाही कसं.. त्या दिवशीच मी राधाला म्हणालो होतो.. तु रात्री दीडवाजता ऑनलाईन दिसलास तेंव्हा.. कुछ तो गडबड है..”
“बरं, चल मी निघतो.. आत जातो आता..”
“अरे थांब.. जरा मला तरी बघु देत कोण आहे ती..”
“तुला काय बघायचंय.. तुला माहीते कोण आहे ती…”

“कबीर.. तु? इथे?”, कबीर पुढे काही बोलणार इतक्यात मागुन परीचीत आवाज आला..
कबीरने वळुन मागे बघीतले…त्याच्या समोर मोनिका उभी होती..

“ओह माय गॉड…”, कपाळाला हात लावत हसत कबीर म्हणाला.. “केंव्हापासुन चालु आहे हे…”
“कबीर.. प्लिज. चिडू नकोस.. ऐक..”, रोहन समजावणीच्या स्वरात म्हणाला..
“ए.. अरे चिडलो वगैरे नाहिए मी..आय एम रिअल्ली हॅपी फ़ॉर बोथ ऑफ़ यु…गो ऑन.. एन्जॉय.. तुमची संध्याकाळ आहे.. जा वेळ नका घालवु..”
“कबीर.. चिडला नाहीस ना…”,मोनिका
“वेडी आहेस का? मी कश्याला चिडू.. तुझं आयुष्य जगण्यास तु मोकळी आहेस.. रोहन खुप चांगला मुलगा आहे…जा पळा पट्कन…”, कबीर..
“आपण नंतर बोलु ह्या विषयावर..”, रोहन कबीरला म्हणाला आणि दोघंही बाय करुन निघुन गेले.

कबीर दोघंही नजरेआड होईपर्यंत त्यांच्याकडे बघत उभा होता..
बर्‍याचवेळानंतर त्याला रती अजुनही बरोबर असल्याची जाणीव झाली.. त्याने स्वतःला सावरले..

“इफ़ आय एम नॉट रॉग.. मोनिका तुझी एक्स-गर्लफ्रेंड राईट?”, रती म्हणाली..
“हम्म..”, काहीस थांबुन कबीर म्हणाला..
“हम्म.. जसं पुस्तकात लिहीलं आहे तसं.. आणि जर तुझी एक्स-गर्लफ्रेंड आहे.. तर मीरा पण आहे… हो ना…”

कबिरला खोटं बोलण्याचा काहीच मार्ग सापडेना..
त्याने काही न बोलता.. नुसती मान हलवली…

“आणि लास्ट-बट-नॉट-द-लिस्ट.. ही राधा.. म्हणजेच मीरा.. हो ना?”

कबीर जमीनीकडे बघत उभा होता.. म्हणुन किंचीत कमरेत खाली वाकुन रतीने त्याच्या चेहर्‍याकडे बघत विचारलं…

कबीरच्या मनात असंख्य भावनांचा कल्लोळ उडाला होता..राधा कुठे होती हे त्यालाच ठाऊक नव्हते.. आणि मोनिका आता ऑफ़ीशीअली त्याच्या आयुष्यातुन निघुन गेली होती. असं नाही की.. त्याला मोनिका त्याच्या आयुष्यात परत हवी होती.. पण तरीही.. काही क्षणापर्यंत त्याची होती… रोहनबरोबर तिला पाहुन त्याला पहील्यांदा आपल्या एकटेपणाची जाणीव झाली…

“शुड वुई जस्ट से बाय?”, खालीच बघत कबीर म्हणाला..
“हम्म.. ओके.. पण मला परत भेटायचंय तुला.. भेटशील?”
“ओके..”
“बाय देन.. टेक केअर कबीर..”, रती म्हणाली..

कबीर काही न बोलता माघारी वळला….

[क्रमशः]