लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ११)


भाग १० वरुन पुढे>>

निराश होऊन जोसेफ बाहेर पडला. काही क्षणांपुर्वी त्याच्याकडे सर्वकाही होते, परंतु आता!!.. काहीच उरले नव्हते. सर्व काही संपले होते. करोडपती बनवणारा प्लॅन सुरु व्हायच्या आधीच संपला होता.

बाहेर पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या गाडीकडे त्याचे एकवार लक्ष गेले. “नैना डिक्कीमध्ये काय करत असेल? काय विचार चालु असतील तिच्या डोक्यात?”, विचारांचा कल्लोळ डोक्यामध्ये माजला होता.

तो जसा रोशनीशी वागणार होता, तस्सेच रोशनी त्याच्याशी वागली होती. परंतु तरीही त्याच्या मनात कुठेतरी रोशनीने आपल्याला समजुन घ्यायला हवे होते. त्याच्या मनात तिच्याबद्दल असलेले प्रेम जाणुन घ्यायला हवे होते. सोनीच्या खुनाचा आरोप येउ नये म्हणुनच त्याने हे पाऊल उचलले होते. अर्थात त्यासाठी स्वतःचा खुन करुन घेण्याइतपत कोणीच मोठ्यामनाचे नसते आणि रोशनीने तेच केले होते, जे कदाचीत दुसर्‍या कोणीही केले असते.

गाडी गावाबाहेर पडली होती. सर्वत्र अंधारबुड्डुक्क होता. जोसेफला तो काळोख पाहुन ख्रिसची आठवण झाली. त्याने एकवार गाडीच्या आरश्यातुन मागे पाहीले. मागे कुठलीच गाडी नव्हती. निदान सध्यातरी त्याच्या मागावर ख्रिस नव्हता.

“तो तुझ्या आजुबाजुलाच असेल.. कदाचीत तुला जाणवणारसुध्दा नाही.. पण तो असेल…”, नैना म्हणाली होती..

जोसेफच्या कपाळावरुन घामाची एक रेघ ओघळत गेली. त्याने गाडीचा वेग जरा कमी केला आणि मागच्या सिटावर नजर टाकली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे आणि सुदैवाने ते सिट रिकामेच होते.

जोसेफचे मन ख्रिसच्या विचारानेच भरलेले होते. त्याचा काटा कसा काढायचा हाच मोठ्ठा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्याला मारणे जास्त जरुरीचे होते कारण तो जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत जोसेफला दुहेरी धोका होता. एक- जर त्याने जोसेफवरच हल्ला केला तर, आणि दोन त्याने रोशनीचे काही बरेवाईट केले तर. दोन्ही पैकी काहीही झाले तरी जोसेफच्या दृष्टीने ते वाईटच होते. विचार करुन करुन जोसेफचे डोके भणभणायला लागले.

शेवटी जोसेफने गाडीचा वेग कमी केला आणि पुढे मागे गाड्या नाहीत हे पाहुन त्याने गाडी एका कडेला घेतली. तो गाडीतुन खाली उतरला आणि गाडीच्या डीक्कीपाशी गेला. आपल्याकडच्या चावीने त्याने डीक्की उघडली. आतमध्ये अंगाचे मुटकुळे करुन पडलेली नैना होती. दार उघडताच ती संभ्रमीत होऊन बाहेर आली.

“काय झालं जोसेफ? रोशनी कुठे आहे?”, इकडे तिकडे बघत नैना म्हणाली.

“सांगतो, सगळं सांगतो. ति येईल.. बसं पुढे..” असं म्हणत जोसेफ पुन्हा ड्रायव्हींग व्हिलवर जाऊन बसला.

नैना शेजारी बसताच जोसेफने गाडी सुरु केली आणि तो ठरलेल्या ठिकाणी जाउ लागला.

जोसेफने ठरलेल्या सुळक्याजवळ येताच गाडीचा वेग पुन्हा कमी केला आणि त्याच क्षणी त्याला गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात समोर हातामध्ये रिव्हॉल्व्हर घेउन उभा असलेला ख्रिस दिसला…
“ऑफकोर्स…, मला वाटलंच कसं की नैना एकटी असेल आणि तिला सहज मारता येईल.. शुध्द मुर्खपणा झाला हा…” जोसेफने मनोमन विचार केला.

त्याने गाडीचा वेग अजुन कमी केला. गाडी ख्रिसच्या जवळ गेली तसा दात विचकुन हसणार्‍या ख्रिसचा भयावह चेहरा दिव्यांच्या प्रकाशात उजळुन निघाला..

“हाच तो ख्रिस जो कधी समोर नसुनही सदैव जोसेफच्या मनात घर करुन होता. हाच तो ख्रिस जो त्याच्या आणि नैनाच्या मध्ये उभा ठाकला होता. हाच तो ख्रिस ज्याने जोसेफच्या डोक्यावर लोखंडी पहारीने प्रहार केला होता….” जोसेफ चवताळुन उठला.. “आत्ता नाही तर कधी?? मी नाही मारले तर तो मारेल..” दात ओठ खात जोसेफ उद्गगारला.

त्याने अचानक गाडीच्या ऍक्सीलेटरवर जोरात पाय दाबला. २.३लिटर क्षमतेचे बि.एम.डब्ल्यु कुपचे इंजीन क्षणार्धात पुर्ण क्षमतेने ख्रिसच्या अंगावर धावुन गेले. अचानक अंगावर आलेल्या गाडीने काहीसा बेसावध ख्रिस गडबडुन गेला. त्याने धाडकन रिव्हॉल्व्हरमधुन गोळी झाडली. ती गाडीची काच फोडुन जोसेफच्या शेजारुन सुसाट निघुन गेली.

गोळी झाडल्याचा आवाज आल्याने जोसेफ खाली वाकला आणि त्यामुळे गाडी रस्ता सोडुन वाकड्या रस्त्याने समोरच्या झाडावर जोरात जाऊन धडकली.

जोरदार धडकेने गाडीच्या डॅशबोर्डवरील एअरबॅग्ज फुटुन बाहेर आल्या. जोसेफ सिट आणि त्या बॅगच्या मध्ये अडकुन गेला. तो सावरतो नं सावरतो तो पर्यंत गाडी पुन्हा हालु लागली. अगदी हळु, परंतु एका ठोसमार्गाने गाडी पुढे जात होती.

जोसेफने मोठ्या मुश्कीलीने सिट-बेल्ट काढला आणि एअरबॅग्ज मधुन सुटका करुन घेतली. मग त्याने शेजारी पाहीले. ख्रिसच्या गोळीने नैनाच्या कपाळाचा वेध घेतला होता. निस्तेज चेहरा, उघडे डोळे आणि कपाळातुन वाहणारे रक्त पाहुन नैना गतप्राण झाली आहे हे जोसेफला वेगळे सांगायची गरज नव्हती.

गाडीने एव्हाना वेग घेतला होता आणि रस्ता सोडुन गाडी डोंगर-उतारावरुन दरीच्या दिशेने निघाली होती. जोसेफने पटकन दार उघडले आणि बाहेर उडी मारली. काही क्षणच आणि गाडी त्या डोंगराचा उतार पार करुन मोठ्या दरीत कोसळली होती.

जोसेफने मागे वळुन पाहीले, ख्रिस तेथे कुठेच नव्हता. क्षणार्धात तो त्या काळ्याकुट्ट अंधारात अदृश्य झाला होता.

जोसेफला हाताला आणि पायाला प्रचंड खरचटले होते आणि त्याला असह्य वेदना होत होत्या. अंधारात चाचपडत तो पुढे जाऊ लागला तोच त्याच्या मानेवर जोरदार पहाडी हाताचा फटका बसला. तडमडत जोसेफ खाली पडला. क्षणार्धात स्वतःला सावरुन तो उभा राहीला परंतु तो पर्यंत एक जोरदार बुक्का त्याच्या पोटात बसला. कळवळत जोसेफ पुन्हा खाली कोसळला. त्याच्या डोळ्यापुढे अंधेरी पसरली. डोळे उघडायचा प्रयत्न करत असतानाच लेदरच्या बुटांची एक जोरदार लाथ त्याच्या तोंडावर बसली आणि जोसेफ बेशुध्द झाला.

************************************************

जोसेफला जाग आली तेंव्हा त्याला जाणवले की कुठल्याश्या गाडीतुन त्याला कुठे तरी न्हेण्यात येत होते. त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते. बाहेर बर्‍यापैकी फटफटायला लागले होते.

जोसेफ डोळे मिटुन अंदाज घेउ लागला.

“ख्रिस, तु ह्याला मारलेस एवढे जोरात, हा मेला बिला तर नाही ना?” ख्रिस ड्रायव्हिंगसिटवर बसुन गाडी चालवत होता तर त्याच्या शेजारी बसलेला एक इसम ख्रिसला विचारत होता.

“नो बड्डी.. जेंह्वा मी एखाद्याला बेशुध्द करतो तेंव्हा तो बेशुध्दच होतो. तो नक्कीच मेलेला नाही अजुन २०-२५ मिनिटांमध्ये येईल शुध्दीवर. तसेही बॉसने सांगीतले आहे की जोसेफ जिवंत पाहीजे. त्याला मरण्यापुर्वी कळायला हवे की तो का आणि कसा मरतो आहे ते..”, ख्रिस दात विचकत म्हणाला..

“बॉस?? कोण हा बॉस??”, जोसेफ विचार करत होता.

“बाकी.. त्या नैनाच्या डोक्यात मस्त गोळी घातलीस तु.. राईट ऑन स्पॉट..”, तो शेजारचा इसम म्हणत होता..

“…म्हणजे?? .. ख्रिसने नैनाला जाणुन बुजुन मारले?? पण का??? मला तर वाटलं तो एक अपघात होता.., ति गोळी नैनाला चुकुन लागली..”, जोसेफ मनोमन विचार करत होता.

गाडी दोन चार वळणं घेउन एका अरुंद बोळात शिरली आणि काही अंतर पार करुन एका वेअर-हाऊसपाशी येऊन पोहोचली.

ख्रिस आणि पाठोपाठ तो इसम खाली उतरला. ख्रिसने एकवार जोसेफच्या मानेवर हात ठेवुन त्याची नस तपासली. मग गाडीचे दार उघडले आणि त्याने आणि त्या दुसर्‍या इसमाने जोसेफला बाहेर ओढले आणि उचलुन त्या वेअर-हाउसच्या दिशेने जाऊ लागले.

जोसेफ एव्हाना पुर्णपणे शुध्दीवर आला होता. त्याचे डोके आणि पोटं सॉल्लीड ठणकत होते. परंतु जोसेफ मोठ्या मुश्कीलीने शांत राहीला होता.

ते दोघे जण जोसेफला आतमध्ये घेउन गेले आणि एका कोपर्‍यात त्याला फेकले. त्यानंतर जवळच असलेल्या एका खांबाला टेकुन त्याला बसवले आणि अजुन एका मोठ्या दोरखंडाने त्याला बांधुन टाकले.

थोड्यावेळानंतर जोसेफने आपण शुध्दीवर येत आहोत दाखवण्यासाठी हलकेच हालचाल केली आणि जरासा कहणला.. तसे त्या इसमाने ख्रिसला जोसेफकडे बोट दाखवुन तो शुध्दीवर येत असल्याची जाणिव करुन दिली.

जोसेफने हळुवार डोळे उघडले. ख्रिस आणि तो इसम कुणाचीतरी वाट बघत होते. जोसेफला शुध्दीवर आलेला बघुन ख्रिसने पुन्हा एकदा आपले दात विचकले. त्याच वेळेस बाहेर एक गाडी थांबल्याचा आवाज आला.

“हा जो कोणी आला आहे. तोच ह्याचा बॉस असणार”, हे जोसेफने एव्हाना ताडले होते.

जोसेफ त्या व्यक्तीची वाट बघत शांतपणे बसुन राहीला.

दुरवरचे वेअर-हाऊसचे दार उघडले गेले आणि बाहेरच्या त्या प्रखर प्रकाश्याच्या पार्श्वभुमीवर आतमध्ये येणार्‍या त्या व्यक्तीची आकृती जोसेफला दिसु लागली.

जोसेफने हलकेच हातांची हालचाल केली. त्याच्या बांधलेल्या हातांना पॅंन्टच्या मागच्या खिश्यात ठेवलेला मोबाईल लागला. त्याने हलकेच तो मोबाईल बाहेर काढला आणि त्याचा एक नंबरचे बटन दाबुन धरले. एक नंबर जो शॉर्ट-की डायल म्हणुन त्याने रोशनीच्या नंबरला जोडलेला होता जो दाबताच रोशनीचा नंबर फिरवला गेला.

ती आकृती जवळ जवळ येत गेली तसा अविश्वासाने जोसेफ हळु हळु ताठ बसत गेला. ती व्यक्ती जोसेफच्या समोर येऊन उभी राहीली. जोसेफचे डोळे विस्फारले गेले आणि नकळत तो उद्गगारला.. “मेहता सर?? तुम्ही????”

“आश्चर्य वाटले??” मेहता म्हणाले..

मग ते ख्रिसकडे वळुन म्हणाले, “ऑल ओके?”

“येस्स बॉस..ऑल ओके.. नैनाला मी स्वतः गोळी घातली आणि ती गाडी त्यानंतर दरीत ढकलुन दिली. प्लॅननुसार गाडीत रोशनी असणारच होती. गाडी दरीत कोसळुन बेचीराख झाली आणि त्यापाठोपाठ रोशनी सुध्दा..”, ख्रिस म्हणाला..

“वेल डन..” ख्रिसचा दंड थोपटत मेहता म्हणाले.. आणि मग जोसेफकडे वळत म्हणाले..”काय आहे ना जोसेफ, पैसा फार महत्वाचा असतो रे.. ही असली रोशनी एन्टरप्रायझेसची फुटकळं कामं करुन इतका पैसा नाही ना मिळत. खरा पैसा मिळतो असली मार्केटने..” असं म्हणत मेहतांनी पांढर्‍या रंगाची पावडर असणारी पिशवी बाहेर काढली.. “माहीती आहे काय आहे हे? हेरॉईन, कोकेन, ब्राऊन शुगर.. जे म्हणतात ना तेच हे.. ह्यातुनच पैसा मिळतो सगळा..

पण मध्ये माझी खुप्प मोठ्ठी कन्साईनमेंट बॅंकॉकला पकडली गेली रे.. खुप्प नुकसान झाले बघ. इंटरनॅशनल धंद्यामध्ये नुकसान वगैरे कोणी ऐकत नाही बघ. एखाद्याने पैसा पुरवला की त्याला माल हा ठरलेल्या वेळात पोहोचवाच लागतो. माझा इतका मोठ्ठा लॉस झाल्यावर मी अडचणीत आलो. नविन माल पुरवायचा तर पुन्हा इतक्या कमी अवधीत इतका पैसा उभा करणं थोडं कठीण होते रे.

रोशनीला मारले तिच्या नावावर असणारे इंन्शोरंन्सचे कोट्यावधी रुपये मला मिळाले असते. त्यापैश्यावर मला माझा माल पुरवणे सोप्पे होते. पण काम व्यवस्थीत होणे जरुरीचे होते. तिचा खुन झाल्यानंतर सर्व पुराव्यांनीशी आरोप दुसर्‍या व्यक्तीवर सिध्द होणे आवश्यक होते. मग हा प्लॅन तयार झाला.

गरज होती ती एखाद्या बकर्‍याची. मग ख्रिसने छोट्याश्या पिग-रोशनीच्या स्टाफची खाजगी माहीती काढायला सुरुवात केली. नैना आणि तिचा भिकारी-फकीर बॉय-फ्रेंन्ड आमच्या दृष्टीने योग्य बकरे होते. नैना तश्शी हुश्शार आणि स्मार्ट आहे, पण तिचा एकच प्रॉब्लेम होता.. “शी गॉट हॉट पॅन्ट्स..” एका कॅसीनो मध्ये ख्रिसने तिला आपल्या जाळ्यात आणि नंतर बिछान्यात ओढले. ख्रिसच्या उन्मत्त, रांगड्या प्रेमवर्षावात नैना भिजुन गेली. ख्रिसने तिला हळु हळु आपल्या बाजुने ओढुन घेतले आणि मी बनवलेला प्लॅन त्याने बनवला आहे असे सांगुन करोडो रुपायांची भुरळ घातली.

अपेक्षेप्रमाणे नैना आणि त्यानंतर तु ह्या भुरळीस बळी पडले आणि तुमचा प्लॅनचा खेळ सुरु झाला. प्लॅन तुम्ही एक्झीक्युट करत होतात, पण त्याची सर्व सुत्र माझ्या हातात होती. तुम्ही दोघंही माझ्या हातातले बाहुले होतात.

काल रात्री तुझे आणि रोशनीचे बोलणे ख्रिसने बाहेरुन लपुन ऐकले. तिच्या व्हिडीओ कॅमेरामध्ये चित्रीत झालेली तुझी आणि नैनाची ’ब्ल्यु-फिल्म’ आणि तुमचा प्लॅन माझ्या दृष्टीने तिजोरीची चावी होती. रोशनीच्या मृत्युनंतर तुला त्यात अडकवणे मला सोप्प झालं. नैनासारख्या व्होअरला जिवंत ठेवणं धोक्याचे होते. उद्या ती चुकुन उलटली असती त्यामुळे ऐनवेळेस तिला संपवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

तुला जिवंत ठेवुनसुध्दा मला धोका पत्करायचा नाही. त्यामुळे तुला सुध्दा मारुन टाकीन. तुझा मृत्यु हा पश्चातापाने झालेली आत्महत्या दाखवण्यात येईल. रोशनीला मारताना तुझ्या हातुन नैनासुध्दा मारली गेली. जिच्यासाठी तु पैश्याच्या मागे लागलास, तीच जिवंत नाही ह्या घटनेचा तुला मोठ्ठा धक्का बसला आणि तु आत्महत्या केलीस.

रोशनीच्या वकिलांकडे सर्व पुरावा माझ्या पिग-कन्येने पोहोचवला आहेच. त्यामुळे रोशनीच्या खुनाची केस लग्गेचच बंद होऊन जाईल आणि मलासुध्दा माझे पैसे मिळतील.

ऑल विल बी हॅपी एन्डींग… सो.. गुड बाय मि.जोसेफ..” असे म्हणुन मेहतांनी बंदुक जोसेफवर रोखली.

जोसेफ पहिल्यांदा हळु हळु आणि नंतर मोठमोठ्यांदा हसु लागला.

जोसेफला हसताना बघुन मेहतांना आश्चर्य वाटले..”का?? काय झालं हसायला???”

“सांगतो..ऐका. तुमच्या ह्या प्लॅनमध्ये एक छोटी गडबड झाली. ह्या राक्षसी ख्रिसने आमचे बोलणे अर्धवटच ऐकले. त्याला त्या सिडीबद्दल कळताच तो तुम्हाला फोन करायला गेला बहुदा.. परंतु नेमके त्याचवेळेस काही घटना घडल्या ज्या तुमच्या दुर्दैवाने ख्रिसला माहीत नव्हत्या.

मला ख्रिसच्या सदैव आजुबाजुला असण्याची जाणीव होती. तसा तो मला कध्धीच दिसला नाही, पण तो आहे हे धरुनच मी आजपर्यंत वावरत आलोय.

रोशनीला मी शेवटची रिक्वेस्ट केली.. तिला ख्रिसबद्दल सांगीतले आणि केवळ एक नाटक म्हणुन इथे चक्कर येऊन पडण्याचे नाटक करायला सांगीतले. रोशनीने माझी शेवटची इच्छा म्हणा हवं तर, परंतु ते मान्य केले.

कदाचीत ख्रिस जेंव्हा परत आला तेंव्हा काही उश्या मी एका कापडांत गुंडाळत होतो. ख्रिसला वाटले काही तरी करुन मी रोशनीला बेशुध्द केले आणि कापडात गुंडाळुन गाडिच्या मागच्या सिटवर ठेवले आहे.

प्रत्यक्षात गाडीत रोशनी नव्हतीच मेहतासाहेब, रोशनी अजुनही जिवंत आहे. माझी रोशनी अजुनही जिवंत आहे. हे खरं आहे कि आधी केवळ पैश्यासाठी मी तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले परंतु आज जेंव्हा मी इथे मरणाच्या दारात उभा आहे तेंव्हा मला जाणिव आहे की ते प्रेम आता नाटक नाही. मी रोशनीवर मनापासुन प्रेम करतो. तिच्याकडे पैसा असो किंवा नसो..

इतकेच नाही, तर आत्ता तुम्ही हे सर्व जे काही बोललात ते तुमची मुलगी रोशनी तिच्या फोनवर ऐकते आहे.. हा बघा माझ्या खिश्यात असलेला फोन.. जो आत्ता रोशनीच्या फोनला जोडला गेलेला आहे मेहतासाहेब.. ऑल इज नॉट सो वेल्ल..!!”

मेहतांच्या चेहर्‍यावरील हास्याची जागा आता त्राग्याने, संतापाने घेतली होती.

त्यांनी संतापाने ख्रिसकडे आणि त्या शेजारच्या इसमाकडे पाहीले.

“यु.. लुझर्स..” असं म्हणुन त्याने पहीली गोळी ख्रिसच्या शेजारी उभ्या असलेल्या त्या माणसावर झाडली.. तो इसम जागच्या जागी कोसळला.

मग मेहतांनी आपली बंदुक ख्रिसकडे वळवली.. “मुर्ख माणसा.. हे काय करुन ठेवलेस तु?? इतके साधे सोप्पे काम तुला करता आले नाही?? तु मरण्याच्याच लायकीचा आहेस”, असे म्हणुन मेहतांनी दुसरी गोळी झाडली. पण ह्यावेळेस दोन गोळ्यांचे आवाज आले. एक मेहतांनी झाडलेली गोळी आणि एक ख्रिसने.

दोघांच्याही गोळ्या एकमेकांना लागल्या आणि दोघेही खाली कोसळले..

****************************************************

जोसेफ इस्पीतळातल्या बेडवर निपचीत पडला होता. बरगड्यांची दोन हाड मोडली होती आणि किरकोळ दुखापती होत्या. त्याच्या समोरच रोशनी उभी होती.

“आय एम रिअली सॉरी मॅडम”, जोसेफ म्हणाला..”कदाचीत तुमचाच काय ह्यापुढे कुणाचाही माझ्यावर विश्वास बसणार नाही असा विश्वासघातीपणा मी केला आहे आणि त्याची शिक्षा मला मिळणार आहेच. परंतु तरीही सांगु इच्छीतो की मी तुमच्यावर मनापासुन प्रेम केले, करतो आहे आणि ह्यापुढेही करतच राहीन. शक्य झालं तर मला माफ करा. तुमच्या डिव्होर्सपेपर्सवर तुरुंगातुनच सही करुन पाठवुन देण्याची व्यवस्था मी करीन…”, जोसेफ साश्रुनयनांनी बोलत होता..”आय लव्हड यु फॉर अ व्हेरी डिफरंट रिझन विच वॉज नॉट लव्ह.. पण आता मी तुमच्यावर प्रेम करतो त्याचे फक्त आणि फक्त एकच कारण आहे.. निर्मळ प्रेम..”

रोशनी दोन पाउलं पुढे सरकली..”आय ट्रस्ट यु जोसेफ..तुझ्यावर कुठलेही आरोप होणार नाहीत ह्याची व्यवस्था मी केलेली आहे. कदाचीत इतरांच्या दृष्टीने मी जे करते आहे तो शुध्द मुर्खपणा असेल.. पण अर्थात ह्यालाच तर प्रेम म्हणतात ना? प्रेमात मुर्खपणा व्हायचाच नाही का?

आय लव्ह यु टू जोसेफ…आय लव्ह यु..” असे म्हणत रोशनी त्याला बिलगली….

[समाप्त]

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १०)


भाग ९ पासुन पुढे >>

“गुड मॉर्नींग डार्लींग..” जोसेफने डोळे उघडले तेंव्हा चक्क समोर नाईट-ड्रेसमध्ये रोशनी चहाचा ट्रे घेउन उभी होती.

खिडकीतुन येणार्‍या कोवळ्या सुर्यप्रकाशात पांढर्‍या सिल्कचा नाईटड्रेस घातलेली रोशनी क्षणभर जोसेफला एखाद्या छोट्याश्या परीसारखी भासली.

“गुड मॉर्नींग डीअर..”, उठुन बसत जोसेफ म्हणाला

“चल पटकन तयार हो, आणि दिवसांतली कामं संपवुन टाक..”, रोशनी म्हणाली..

“का? काय झालं?”, जोसेफ

“अरे का काय? संध्याकाळी जायचे आहे ना पार्टीला संध्याकाळी. मला कुठलीही कारणं नक्को आहेत बरं का..”, लटक्या रागाने रोशनी म्हणाली…”आयुष्यात मी खुप पार्टीज मिस्स केल्या आहेत, पण आता तु बरोबर असताना त्याच पार्ट्या मी खुप एन्जॉय करते आहे..” केसांची बट कानामागे सारत रोशनी म्हणाली.

“हो डिअर, मी प्रयत्न करीन.. नक्की जाऊ आपण..”, जोसेफ

*********************************************

दिवसभर जोसेफचे कामापेक्षा घड्याळाकडेच लक्ष होते. दिवस मावळतीकडे सरकु लागला तसा जोसेफ बैचेन होऊ लागला. त्याच्या वागण्यातला बदल त्याच्या एक दोन सहकार्‍यांनी हेरला सुध्दा..”काय रे जोसेफ? तब्येत बरी नाही का?”, एकाने विचारले होते, पण जोसेफने त्याचे बोलणे हसण्यावारी न्हेले.

संध्याकाळ झाली तशी जोसेफ ऑफीसमधुन बाहेर पडला. सेक्युरीटीकडुन रोशनी आधीच ऑफीसमधुन बाहेर पडल्याचे त्याला कळले तसे त्याने गाडी सरळ घराकडेच घेतली.

जोसेफ घरी पोहोचला तेंव्हा रोशनी जवळ जवळ तयारच होती.

जोसेफ सावकाश चालत बेडरुममध्ये जाऊन बसला.

“अरे!!, बसलास काय? चल ना, आवर लवकर, एक तर आधीच उशीरा आलास..”., आवरता आवरता रोशनी म्हणाली.

जोसेफ काही नं बोलता नुसता बसुन राहीला होता. खरं तर त्याला सुध्दा रोशनीबरोबर जायची फार इच्छा होती. तिच्याबरोबर पार्टीत मिरवणं, मोठ्या मोठ्या लोकांशी ओळखी करुन घेणे ह्यात त्याला मज्जा वाटत होती. लोकांकडुन मिळणारे ऍटेंशनची त्याला सवय होत होती. त्यामुळे विनाकारण रोशनीचे मन मोडणे त्याला जिवावर येत होते. परंतु त्याचा नाईलाज होता. नैना-ख्रिसने त्याला जाळ्यात अडकवले होते आणि त्यामुळे त्याच्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय उरला नव्हता.

“काय झालं? आवर ना रे..”, रोशनी वैतागुन म्हणाली..
“हो आवरतो.. आत्ताच आलो आहे ऑफीसमधुन..”, असं म्हणत तो उठला आणि किचेनमध्ये गेला. फ्रिजमधुन त्याने फ्रेश लाईम ज्युसचा कॅन काढला, दोन ग्लास भरले. मग हळुच रोशनीच्या गोळ्यांचा ट्रिपल डोस त्यात टाकला आणि तो परत बेडरुममध्ये आला.

“घे ज्युस पी..” असे म्हणत त्याने गोळ्या घातलेला ज्युसचा ग्लास रोशनीकडे दिला आणि तो परत खुर्चीत डोळे मिटुन ज्युसचे घोट घेत आरामात पडुन राहीला.

“जोसेफ!!.. काय झालं? आवरतो आहेस ना?”, ज्युसचा रिकामा ग्लास टेबलावर ठेवत रोशनी म्हणाली.

जोसेफने डोळे उघडुन एकवार रोशनीचा ज्युसचा ग्लास रिकामा असल्याची खात्री केली आणि मग

“काय कटकटं आहे तुझी?.. मला वाटतं तु जा एकटी, माझा मुड नाहीये आज.”, जवळ जवळ ओरडतच जोसेफ म्हणाला..

“एss!, काय रे, आपलं ठरलं होतं ना?, मग मुड नसायला काय झालं?” जोसेफच्या गळ्यात हात टाकत रोशनी म्हणाली.

“प्लिज रोशनी, स्टॉप धिस. माझा मुड नाहीये सांगीतले ना, तु जा..”, जोसेफ
“मी एकटी नाही जाणार, तु पण चल बरोबर..फार तर थोडे उशीरा जाऊ..”, रोशनी

“तुला एकदा सांगीतलेले कळत नाही का?”, जोसेफने हातातला काचेचा ज्युसचा ग्लास जोरात खाली आपटला, जेणे करुन तो आवाज बाहेरील लोकांना ऐकु जाईल.. “.. उगाच डोकं नको खाऊ माझं.. जा तु..”

रोशनीने त्याला खुप मनवायचा प्रयत्न केला पण जोसेफ ऐकतच नव्हता, उलट प्रत्येक वेळेस तो मोठ्या आवाजातच तिला उत्तर देत होता. रोशनी मात्र शांत होती आणि ह्याचेच जोसेफला राहुन राहुन आश्चर्य वाटत होते. शेवटी बर्‍यापैकी वेळ ओरडा-आरडी केल्यावर जोसेफ तणतणत बाहेर पडला. जाताना त्याने एकवार रोशनीकडे पाहीले..

“ही शेवटची वेळ..तिला जिवंत पहाण्याची..”,मनोमन जोसेफ उद्गगारला.

पार्कींगमधुन त्याने गाडी काढली आणि सुसाट वेगाने तो बाहेर पडला. रहदारीतुन गाडीचा योग्य वेग राखत तो जेथे नैना भेटणार होती तेथे गेला.

नैना त्याची वाटच बघत होती.

जोसेफ पोहोचताच ती म्हणाली, “सगळं ठिक?”
“हम्म..” जोसेफ म्हणाला आणि त्याने नैनाला गाडीची डिक्की उघडुन दिली. नैना शरीराचे मुटकुळे करुन डिक्कीत जाऊन बसली.

जोसेफने दार लावले आणि त्याने गाडी परत माघारी, घराकडे घेतली.

मागच्या गेटमधुन गाडी त्याने आतमध्ये घेतली. एकवार त्याने खोलीकडे नजर टाकली. बेडरुममधला दिवा बंद होता. रोशनीची गाडी अजुनही पार्कींगमध्येच होती ह्याचा अर्थ ती अजुनही घरातच होती आणि एव्हाना गोळ्यांच्या अतीडोसामुळे नक्कीच शुध्द हरपुन खोलीमध्ये पडलेली असणार.

जोसेफला मनोमन वाईट वाटत होते. हे सगळं अश्याप्रकारे संपायला नको होते. रोशनी त्याच्या मनामध्ये भरली होती. एखाद्याला त्याच्या लाडक्या पत्नीबद्दल जे जे भाव असतील ते ते सर्व जोसेफच्या मनामध्ये होते.

जोसेफ सावकाशपणे घरात शिरला. अंधारात चाचपडत तो बेडरुमपाशी पोहोचला. त्याने दार उघडले. “आय एम सो सॉरी रोशनी.. मी तुला फसवलं, तुझ्या प्रेमाला, तुला धोका दिला.. शक्य झालं तर माफ कर..” असंच काहीसं मनोमन बोलत तो आतमध्ये शिरला. हळुवारपणे पावलं टाकत तो बेडपाशी आला. त्याने चाचपडतच बेडवर रोशनी कुठे आहे हे तपासायला सुरुवात केली. पण रोशनीचा कुठेच पत्ता नव्हता.

“आयला.. ही गेली कुठं.. कदाचीत मध्येच कुठे चक्कर येऊन पडली की काय?”, असा विचार करत जोसेफ बेडपासुन बाजुला झाला..

“कुणाला शोधतो आहेस जोसेफ?? मला????”, रोशनीचा धिरगंभीर आवाज जोसेफच्या कानावर पडला..

अंधारलेल्या एकाकी स्मशानात अचानक समोर कुणीतरी यावं तेंव्हा जसं दचकायला होईल, तस्सेच जोसेफ दचकला आणि तो मागे वळला.

त्याचवेळी दिव्यांच्या प्रकाशाने खोली उजळुन निघाली. दिव्यांच्या प्रकाशात जोसेफने पाहीले बेडरुमच्या दारातच, हातात .३२ ची मॅग्नम रिव्हॉल्व्हर घेऊन रोशनी उभी होती.

****************************************************

ख्रिसने एकवार हातातल्या घड्याळात पाहीले.

“अजुन १५-२० मिनीटं आणि ’ते’ कुठल्याही क्षणी इथे येतील”, लोटस हिल्सवरील एका मोठ्या खडकाच्या आडोश्याला उभ्या असणार्‍या ख्रिसने मनोमन विचार केला.

जोसेफवर तो काय किंवा नैना काय विश्वास ठेवायला तयार नव्हते. रोशनीबद्दल त्याच्या मनात निर्माण झालेला बदल दोघांनीही अचुक हेरला होता. वेळ-काळ साधुन तो आपल्याला मार्गातुन हटवायला पुढे मागे पहाणार नाही ह्याची त्यांना खात्री होती आणि त्यामुळेच नैनाला एकटीला नं सोडता ख्रिससुध्दा तेथे आधीपासुनच दडी मारुन बसला होता.

जोसेफने ऐनवेळेस काही दगा-फटका करायचा प्रयत्न केल्यास ख्रिस त्याला योग्य तो धडा शिकवण्यासाठी सज्ज होता. परंतु त्या वेळेस त्याला रोशनी-जोसेफ मध्ये काय घडते आहे ह्याची यत्किंचीतही कल्पना नव्हती.

****************************************************

“मलाच शोधत होतास ना जोसेफ?”, रोशनीने अजुनही पिस्तुलची नळी जोसेफवरच रोखलेली होती.

“अं..नाही.. म्हणजे हो…”, चाचरतच जोसेफ म्हणाला.. “ही.. ही बंदुक! कश्याला रोशनी?”
“नको?? मग मी मला तुझ्या हवेली करु?? मारण्यासाठी??”
“काय बोलती आहेस तु रोशनी? मी तर उलट तुला सर्प्राईझ द्यायला आलो. मी विचार बदलला रोशनी. चल जाऊ आपण पार्टीला.. माफ कर मगाशी मी जरा उगाचच जास्ती चिडलो होतो..”, सारवा-सारव करत जोसेफ म्हणाला
“पार्टीला? अरे मग नैना गाडीच्या डिक्कीत बसुन काय करणार?? तिला पण घ्यायचे का बरोबर?”, रोशनी भुवया उंचावत म्हणाली.

त्या थंडगार संध्याकाळीसुध्दा जोसेफला घाम फुटला..

“तु काय बोलते आहेस रोशनी? मला काहीच कळत नाहीये!!”, जोसेफ.

“बरं.. मग मी दाखवतेच तुला काही तरी.. बस इथे..” खुर्चीकडे बोट दाखवत रोशनी म्हणाली.

जोसेफ आज्ञाधारकपणे खुर्चीत बसला.

रोशनीने बेडसमोरचा आपला ४२” एल.सी.डी चालु केला आणि डि.व्ही.डी. प्लेअरमध्ये एक सि.डी. सरकवली.

टिव्हि. वर एका अलीशान बेडवर एकमेकांच्या प्रेमात मग्न असलेले एक तरूण-तरूणी दिसत होते. ते दुसरे-तिसरे कोणी नसुन आपण आणि नैना आहोत हे कळायला जोसेफला फार वेळ लागला नाही. अस्वस्थपणे तो खुर्चीत सरकुन बसला. पुढील काही मिनीटं दोघांची कामक्रिडा आणि त्यानंतर नैना आणि जोसेफने आखलेला रोशनीच्या खुनाचा प्लॅन हे सर्व काही त्या सि.डी.मध्ये होते.

“कुणाचा प्लॅन ऐकतोस तु जोसेफ? त्या मुर्ख नैनाचा? इतकी वर्ष माझ्याबरोबर काम करुन सुध्दा तिला इतकं साधं लक्षात नाही की माझा पुर्ण बंगला सि.सि.टी.व्ही कॅमेराखाली आहे. अर्थात माझी बेडरुमचे टेप्स इतर कुणाकडे नसतात. ती प्रायव्हसी मी जपते आणि म्हणुनच तु आत्तापर्यंत मोकळा होतास. ह्या टेप्स पप्पांनी पाहील्या असत्या तर तु ह्या जगातुन केंव्हाच गेला असतास जोसेफ.

माझी तुझ्यावर नजर वगैरे ठेवायची बिल्कुल इच्छा नव्हती पण गडबडीत कॅमेरा चालुच राहीला. अमेरीकेला जाताना मी बंद करायचं पुर्णपणे विसरुनच गेले..

परत आल्यानंतर अचानकच कॅमेरा चालुच असल्याचे लक्षात आले. मग म्हणलं बघु तरी, मी नसताना तु कसे दुःखात दिवस काढलेस!!, म्हणुन पाहीलं तर पहिल्या दिवशीच मला ’हे’ बघायला मिळालं.

खुःप दुःख झालं मला जोसेफ. तु सुध्दा इतरांसारखाच निघालास, ह्याच जास्त वाईट वाटलं.”

“रोशनी.. प्लिज माझ ऐक.. मी नाही म्हणतं जे झालं, तु जे पाहीलेस ते खोटे आहे म्हणुन. पण माझ्यात खरंच बदल झालाय रोशनी. मी खरंच तुझ्यावर प्रेम करायला लागलोय. मला तुला मारण्याची अज्जीब्बात इच्छा नाही रोशनी.. पण..” असं म्हणुन जोसेफने ते जे.के प्रकरण, सोनीचा खुन ह्याबद्दलचे सर्व रोशनीला सांगीतले.

“आय पिटी यु जोसेफ.. पण मला तुझ्याबद्दल आता काहीच वाटत नाही. तु ह्या प्रकरणातुन कसं बाहेर पडायचं तो तुझा प्रश्न आहे. यापु्ढे तुझा आणी माझा काहीही संबंध नाही जोसेफ. दोन चार दिवसांत तुला घटस्फोटाचे पेपर्स मिळतीलच पण त्यानंतर रोशनी एन्टर्प्रायझेसच्या कुठल्याही व्यवसायात तुझा काडीचाही संबंध किंवा हक्क रहाणार नाही.

तुला आत्ताही माझ्या खुनाच्या प्रयत्नाखाली तुरुंगात टाकु शकते जोसेफ. मेहतांचे नाव आहे तेवढे मोठ्ठे की त्या नावाखाली दबुन कुठलाही न्यायाधीश तुला ५-७ वर्ष तुरुंगात डांबुन ठेवेल. पण मी तसे करणार नाही. कारण मला बदला घ्यायचा आहे. तुम्हा सर्वांचा!! आता मी काय सांगते ते निट ऐक –

सगळ्यांत पहीले तु नैनाचा खुन करायचास. आजच रात्री!!! तुझ्यासाठी हे फार अवघड काम नाही. नैना बाहेरच्या गाडीत डीक्कीत बंद आहे. ज्या ’लोटस हिल्स’ वरुन तुम्ही मला मारणार होतात त्याच हिल्स वरुन नैनाचा मृत्यु होइल जोसेफ.

दुसरे.. नैनाच्या मृत्युनंतर ख्रिस चवताळेल. तो तुला किंवा मला मारण्याचा प्रयत्न करेल. तुझ्या आयुष्याबद्दल मला काडीचीही किंमत नाही जोसेफ. पण मला माझ्या आयुष्याची आहे. आणि म्हणुनच ख्रिसपासुन मला वाचवण्याचे काम तुझे.. तुला करावेच लागेल ते.

ह्या सि.डी.ची एक कॉपी माझ्या पत्रासह एका बंद पाकीटात माझ्या वकिलाकडे केंव्हाच पोहोचलेली आहे. ते पाकीट माझ्या अकाली, अपघाती किंवा खुनाने झालेल्या मृत्युनंतर वकिलसाहेब फोडतील. त्या पत्रामध्ये मी माझ्या मृत्युला जबाबदार माझा पती जोसेफ ह्यास धरण्यात यावे असे स्टेटमेंट दिलेले आहे. सोबतच्या सि.डी.मध्ये तु आणि नैनाने केलेला खुनाच्या प्लॅनचा पुरावा आहेच. त्यामुळे तुला माझा अकाली / अपघाती भासणारा मृत्यु होऊ नये असे वाटत असेल तर ख्रिसपासुन वाचवण्याची जबाबदारी तुझी जोसेफ.

माझी एकच इच्छा होती जोसेफ, माझ्यावर कोणी प्रेम करावे तर ते माझ्यावर करावे, माझ्या संपत्तीवर नाही. मी तुला म्हणाले होते “लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह..” मला मरणाचे भय नाही. आयुष्य जगण्यातला सगळा आनंदच मी आता हिरावुन बसले आहे. पण एक लक्षात ठेव माझ्या मृत्युनंतरही तु सहीसलामात ह्यातुन सुटु शकणार नाहीस.

ऑल दे बेस्ट जोसेफ..नैना तुझी वाट बघते आहे.. गो ऍन्ड किल हर..!!”

 

काय होणार पुढे? जोसेफ ह्यातुन सहीसलामत सुटणार का? रोशनी, नैना, ख्रिस की जोसेफ स्वतः. कुणाकुणाचा बळी जाणार? वाचत रहा “लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह..”चा शेवटचा भाग ११

[क्रमशः]

भाग ११>>

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ९)


भाग ८ वरुन पुढे >>

“जे काही करायचे आहे ते १०-१५ मिनीटांमध्ये उरकायला हवे. जास्त वेळ कुठे जाता येणार नाही. रोशनीने विचारले तर काय उत्तर देणार..” फॉर्च्युन कॅसीनोमध्ये जाताना जोसेफ विचार करत होता.

चेहर्‍यावर तिरपी टोपी ओढुन आणि गळ्याभोवती एक जाडसा मफलर गुंडाळुन जोसेफने आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी काहीही झालं तरी तो रोशनीचा नवरा होता.. त्याची लायकी असो वा नसो, तो रोशनी एन्टरप्रायझेसचा एक हिस्सा होता आणि असे असताना एका चिल्लर कॅसीनोमध्ये त्याचे असणे मिडीयाच्या किंवा इतर कुणाच्या नजरेसमोर येणे धोक्याचे होते. जोसेफने धोका पत्करला होता, पण त्याचा नाईलाज होता.

इतरत्र न घुटमळता जोसेफ सरळ वरच्या मजल्यावरील रुम नं १०३ मध्ये आला. जोसेफच्या दृष्टीने जे.के. म्हणजे कोणीतरी एक पोरगेल असा प्ले-बॉय किंवा अगदीच झालं तर ३०-३२शीतला तरूण असावा जो तरूणींना फसवुन, आपल्या पौरुषत्वाच्या अमलाखाली त्यांचे सिक्रेट्स काढुन घेउन त्यांना ब्लॅकमेल करत असावा. दोन चार झापडा दिल्या आणि जरा दम भरला तर सुतासारखा सरळ होईल ह्या विचाराने जोसेफ खोलीपाशी आला.

खोलीचे दार उघडेच होते. जोसेफ सावध पावलं टाकत आतमध्ये आला. आत संपुर्ण अंधारच होता. खोलीत कुणाचीच चाहुल लागत नव्हती. आपल्याकडे एखादे छोटे पिस्तुल असते किंवा निदान एखादे हत्यार, तर बरं झालं असतं असा एक विचार जोसेफच्या मनामध्ये तरळुन गेला.

त्याने अंधारातच चाचपडत काही वस्तु हाताला लागते आहे का ह्याचा तपास करायला सुरुवात केली. सुदैवाने जवळच त्याला एक लोखंडी रॉड सदृष्य काहीतरी हाताला लागले.

“अगदी काहीच नसण्यापेक्षा हे ठिक!!”, असे म्हणुन जोसेफने ती वस्तु उचलली आणि तो अंधारात पुढे सरकु लागला.

खोलीचे पडदे लावलेले होते. खिडकी बाहेरुन येणार्‍या चंद्राचा प्रकाशात ते पडदे उजळुन निघाले होते. त्या पार्श्वभुमीवर खोलीत कोणी उभे असलेच तर त्याची काळी आकृती दिसुन आली असती. परंतु गोल नजर फिरवुनसुध्दा त्याला कोणीच दिसेना.

म्हणजे एक तर खोलीत कोणीच नव्हते किंवा जे कोणी होते ते खाली खुर्चीत अथवा सोफ्यावर बसुन जोसेफच्या हालचालीची वाट पहात होते.

“आपण जे.के.च्या बाबतीत ओव्हर-कॉन्फिडंट तर झालो नाही ना?” असा एक दुबळा विचार जोसेफच्या मनात चमकुन गेला. इथे अंधारात घुटमळत फिरण्यात अर्थ नाही, असा विचार करुन तो हळुवार भिंतीकडे सरकला. चाचपडतच त्याने दिव्यांच्या बटनांचा स्विचबोर्ड शोधला आणि बटन दाबले.

लाईटच्या प्रकाशाने खोली उजळुन निघाली आणि समोरचे दृष्य बघुन जोसेफ जागच्या जागी थिजुन गेला.

समोरच्या बेडवर एक तरूणी अस्ताव्यस्त स्थीतित मृत अवस्थेत पडली होती. तिच्या डोक्यातुन रक्ताचा पाट वाहत जमीनीवर पसरला होता आणि जोसेफ त्यामध्येच उभा होता. त्याचे लक्ष हातातल्या लोखंडी रॉडकडे गेले जो त्या तरूणीच्या रक्ताने माखला होता. ह्याच रॉडने त्या तरूणीचा खुन झाला होता हे कुठलंही शेंबड पोरगं सांगु शकले असते. भिंतीवर दिव्याच्या बटनांचा शोध घेताना लागलेले रक्ताने माखलेले जोसफच्या हाताचे ठसे विखुरले होते. हा सर्व प्रकार पाहुन जोसेफ भांबावुन गेला. त्याने तो रॉड टाकुन दिला आणि तो सावकाश त्या तरूणीपाशी गेला. हळुवार त्याने त्या तरूणीचा चेहरा वळवला आणि नकळत त्याच्या तोंडुन उद्गगार बाहेर पडले…”सोनी!!!”

आश्चर्याचा, भितीचा तो धक्का सावरत होता तोच त्याला मागे हालचाल जाणवली. जोसेफ पटकन मागे वळला. त्याच्या मागे नैना आणि ख्रिस उभे होते.

“नैना .. तु…?? हा काय प्रकार आहे?? जे.के. कुठे आहे??”, जोसेफ म्हणाला..

“ओव्व….. पुअर बेबी…बिच्चार्‍याची एक्स..एक्स.. न जाणो कितवी एक़्स गर्लफ्रेंड इथे मरुन पडली आहे आणि बिच्चारा जे.के. नामक कुठल्या व्यक्तीला शोधतोय..” नैना म्हणाली..

जोसेफ आळीपाळीने एकदा नैना-ख्रिसकडे तर एकदा सोनीकडे बघत होता.

“..कोण जे.के. रे जोसेफ? मला तर अश्या नावाचं कोणीच माहीत नाही. मी आणि ख्रिस इथे आलो तेंव्हा आम्ही पाहीलं की तु तुझ्या ह्या गर्लफ्रेंडचा खुन केला आहेस.. कारण ती तुला कुठल्यातरी कारणावरुन ब्लॅकमेल करत होती. तुझ्यासमोर रोशनी आणि तिच्या संपत्तीची हाव होती. सोनीने जे काही गुपीत होते ते व्यक्त केले असते तर कदाचीत तुला सगळ्यावरच पाणी सोडावे लागले असते, अर्थात जे तुला नको होते.

तिने तुला गप्प रहाण्याबद्दल पैसे मागीतले आणि ते देण्यासाठी तुला भेटायला इथे बोलावले. तु इथे आलास आणि तिचा निर्घुणपणे खुन केलास.”, नैना

“हे साफ खोट आहे..तु मला जे.के.बद्दल सांगीतलेस म्हणुन मी इथे आलो. मी सोनीचा खुन नाही केला.. तुम्ही.. तुम्हीच मारलंत तिला..” जोसेफ रागाने थरथरत म्हणाला..

“होss?? आम्ही मारले? सांगुन बघ पोलीसांना. सोनी तुझी एकेकाळची प्रेमीका होती हे तु नाकारु शकत नाहीस जोसेफ. पोलीस ते शोधुन काढतीलच. ह्या रॉडवर, भिंतीवर तुझ्याच हाताचे ठसे आहेत जोसेफ, त्याचे काय करशील.. खोलीभर तुझ्या बुटांचे ठसे आहेत, त्याचे काय करशील?? घरात तुला पकडायला आलेले पोलीस बघीतल्यावर रोशनीला काय वाटेल जोसेफ?? तु निर्दोष सुटलास तरी तुला वाटते रोशनी नंतर तुझ्याशी संबंध ठेवेले???”, नैना..

“का?? का केलेस तु असे..?”, जोसेफ

“जोसेफ!!.. हा ख्रिस आहे ना, फार वाईट्ट माणुस आहे बघ. त्यानेच माझ्या डोक्यात हे भरवले की तु म्हणे रोशनीच्या प्रेमात वगैरे पडला आहेस आणि तु आम्हा दोघांना डच्चु देऊ शकतोस. तसेही तुझे रोशनीशी लग्न झाले आहे… मग आम्ही बिचारे काय करु शकलो असतो..

मग त्यानेच सोनीला इथे आणले. बिच्चारी! तु भेटणार म्हणुन कित्ती खुश होऊन इथे आली होती.. पण तु भेटायच्या आधीच….” असं म्हणत रोशनीने आपले बोट वरती केले..

“त्यामुळे आता एक तर तुरुंगात जायची तयारी ठेव.. नाही तर शहाणा हो, आणि आपला प्लॅन पुर्णत्वास न्हेण्याचे बघ..”. नैना

“काय मुर्खपणा आहे..!! कोण कुठला तो ख्रिस, त्याच्या बोलण्यावर तु विश्वास ठेवतेस?? तुला वाटलेच कसे मी असं करेन म्हणुन??”, जोसेफ सारवासारव करत म्हणाला..

“असुही शकेल.. तसे असेल तर उत्तम. पण मला रिस्क घ्यायची नव्हती. तेंव्हा रोशनीला हटवायचे काम ह्या आठवड्यातच करायचे, नाही तर तुला ह्या खुनात कसे अडकवायचे ते ख्रिस योग्य प्रकारे जाणतो…”

“..पण.. पण ह्या पुराव्यांचे??”, जोसेफ भिंतीकडे हात दाखवत म्हणाला..

“त्याची काळजी तु नको करुस…ते सर्व सांभाळायला ख्रिस समर्थ आहे.. फक्त एक आठवडा जोसेफ.. एका आठवड्यात काम पुर्ण झालं पाहीजे, नाहीतर काय होईल हे वेगळे सांगायला नकोय..” गंभीर होत नैना म्हणाली आणि तेथुन बाहेर पडली.

जोसेफने एकवार ख्रिसकडे बघीतले. त्याचे नरभक्षक वाघासारखे डोळे जोसेफकडेच रोखुन पहात होते.

जोसेफसुध्दा लगेच घाई-घाईत बाहेर पडला.

*********************************************

जोसेफ आपल्या लायब्ररीमध्ये डोक्याला हात लावुन बसला होता. व्हिस्कीचे दोन-चार पेग रिचवुनसुध्दा त्याला ह्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता.

उद्या जर खरंच मला ह्या प्रकरणात गोवले तर रोशनी माझ्यावर कित्ती विश्वास ठेवु शकेल. पहिल्यापासुनच तिच्या डोक्यात हे आहेच की जो-तो तिच्यावर नाही, तर तिच्या पैश्यावर प्रेम करतो. अश्यातच ह्या खुनाच्या प्रकरणात मी अडकलो तर??

आणि समजा तिने दाखवला विश्वास, सुटलो निर्दोष, तरी नैना आणि ख्रिस गप्प बसणार नाहीत.

नैनाला मार्गातुन दुर करायला कदाचित वेळ लागणार नाही. पण तो आडदांड काळाभिन्न ख्रिस? त्याचे काय? त्याला कसा उडवणार?

ख्रिस खरंच महाभयंकर माणुस आहे. पुढे-मागे तो माझा खुन करायलासुध्दा मागे-पुढे पहाणार नाही. त्यापेक्षा योग्य मार्ग हाच आहे की प्लॅन-अनुसार रोशनीचा खुन करायचा. नैना आणि ख्रिसला त्यांचा हिस्सा देउन मोकळे करायचे आणि उरलेला पैसा आपलाच आहे.

जोसेफला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. फक्त एक आठवडा आणि त्यातच त्याला रोशनीचा खुन करायचा होता. प्लॅन सगळा ठरलेला होता. फक्त तारीख ठरवायची होती.

जोसेफने टेबलावरचे कॅलेंडर चाळले आणि तारीख आणि वार ठरवला.. येत्या शनिवार..

त्या दिवशी रोशनीला संध्याकाळच्या फारश्या अपॉंईंट्मेंट्स नव्हत्या. शनिवारी संध्याकाळी रोशनीला आणि जोसेफला एका पार्टीचे आमंत्रण होते. रोशनीला त्या पार्टीला जायचेच होते आणि ’शनिवारी संध्याकाळी वेळ ठेव’ असे जोसेफला अनेकदा बजावुन सुध्दा झाले होते.

“हीच संधी साधता येईल..”, जोसेफ विचार करत होता..”काही तरी फालतु कारणं सांगुन आपण पार्टीला येऊ शकत नाही असे रोशनीला सांगुन बघायचे. बोलता बोलताच तिला प्रेमाने औषधाच्या गोळ्या घातलेला ज्युस प्यायला लावायचा. ती पहील्यांदा प्रेमाने हट्ट करेल. त्यावरुन आपल्यात भांडण घडवुन आणायचे आणि घरातुन निघुन जायचे आणि ठरल्याप्रमाणे थोड्यावेळाने परत यायचे.

येताना ठरलेल्या ठिकाणावरुन नैनाला बरोबर घ्यायचे. नैना गाडीच्या डीक्की मध्ये लपुन बसेल. ती घरात येऊन रोशनीचा ड्रेस घालेल. रोशनी त्यावेळेस गुंगीत असेल. तिला गाडीच्या डिक्कीत टाकायचे आणि गाडीत लपुन बसायचे. नैना गाडी घेउन सरळ ’लोट्स हिल्स’ वर येईल. तिथे रोशनीला गाडीच्या ड्रायव्हींग सिट वर बसवुन गाडी ढकलुन द्यायची.

त्यानंतर लगेचच पार्टीचे ठिकाण गाठायचे. बोलता बोलता पार्टीला यायचा आपला मुड नव्हता आणि त्यामुळेच रोशनीबरोबर आपले भांडण झाले होते. परंतु नंतर आपला विचार बदलला आणि रोशनीला पार्टीत सर्प्राईझ द्यायला आपण आलो असे दोन-चार लोकांना सांगुन द्यायचे. मात्र रोशनी तेथे पोहोचणारच नाही. थोड्यावेळ वाट बघुन रोशनी सापडत नाही म्हणुन पोलीस कंम्लेंट करायची. नंतर जे होईल ते बघता येईल..”

जोसेफच्या मनात सगळा प्लॅन तयार होता.

*************************************************

रोशनीचा खुन करायचा हाच एक मार्ग त्याच्या डोळ्यासमोर असला तरीही त्याने सर्व पर्याय खुले ठेवले होते. ऐनवेळेस संधी मिळालीच तर तो नैना आणि ख्रिसला मारुन टाकायला मागे पुढे पहाणार नव्हता.

जोसेफचे कामातुन लक्षच उडाले होते. एकीकडे रोशनीच्या वागण्यातला बदल, तिचे बदलेले रुप त्याला आकर्षीत करत होते, तर दुसरीकडे नैना आणि खिसचा खुनशी चेहरा त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता.

एक एक दिवस पुढे सरकत होता आणि शेवटी तो दिवस उजाडलाच.. शनिवार….

 

असे म्हणतात, ’नं करत्याचा वार शनिवार’. शक्यतो प्लॅन केलेली कामं शनिवारी करण्याचा प्रयत्न केला तर ती पुर्णत्वास जात नाहीत, असा एक रुढी समज आहे. जोसेफ-नैनाच्या बाबतीत काय होणार? रोशनीच्या खुनासाठी निवडलेला दिवस- शनिवार त्यांच्यासाठी अपशकुनी ठरणार का? कोण जिंकणार? कोण हारणार? वाचत रहा “लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह” भाग-९

[क्रमशः]
भाग १०>>

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ८)


भाग ७ पासुन पुढे>>

पुढचे काही दिवस जोसेफसाठी स्वर्गसुखाचे होते. हातामध्ये सत्ता आणि संपत्ती दोन्ही होती.

रोशनीच्या महालातला राजेशाही थाट तो पुर्णपणे अनुभवत होता. प्रोजेक्टचे काम व्यवस्थीत चालु होते. जोसेफला पुर्ण स्वतंत्रता असल्याने स्वतःला हवे तसे, हवे तेंव्हा बदल तो करवुन घेत होता. सारे काही सुरळीत चालु होते, पण त्याच्या सुखाला गालबोट लागले ते रोशनीच्या एका फोन मुळे..

“जोसेफ, मी एक आठवडा लवकरच येत आहे. इथली सर्व कामं मी लवकर संपवली आणि तुला भेटायला मी आतुर आहे. कधी एकदा तुला भेटते असे झाले आहे बघ..”

जोसेफ दुःखानेच “हम्म” म्हणाला..

“तुला माझ्या येण्याने आनंद नाही झाला जोसेफ?”, रोशनी

“झाला ना, खुप झाला, प्रत्येक दिवस मी मोजुन काढतो आहे रोशनी..” जोसेफ आवाजावर नियंत्रण ठेवत म्हणाला..

“ठिक आहे तर मग.. मी पुढच्या शुक्रवारीच येते आहे.. तु येशील ना एअरपोर्टवर मला घ्यायला?”

जोसेफला ’हो’ म्हणण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.

***************************************

’शिकागो’ वरुन येणारे डेल्टा एअरलाईन्सचे विमान धावपट्टीवर उतरल्याची घोषणा झाली आणि जोसेफने एक दीर्घ श्वास घेतला..

“अश्या रीतीने जेमतेम एक महीन्याचे स्वातंत्र्य, आनंद संपुष्टात आले..” जोसेफने मनोमन विचार केला.

’आजच हिला घरी घेऊन जाताना मारुन टाकता आले असते तर कित्ती बरं झालं असतं!’ असाही एक विचार त्याच्या मनात तरळुन गेला. ’आज नाही तर नंतर कधी ना कधी तिचा खुन करायचा आहेच.. मग कश्याला इतके दिवस वाट पहायची?’ जोसेफ खाली मान घालुन विचार करत होता इतक्यात त्याच्या कानावर आवाज आला –

“हाय जोसेफ!!.. कसा आहेस”, रोशनीचा आवाज ऐकुन जोसेफ ताडकन उठुन उभा राहीला.. त्याने समोर बघीतले

समोर जेमतेम २६-२८ वर्षाची एक तरूणी उभी होती. उंची साधारण पाच फुट, मध्यम बांधा, डस्की कंम्प्लेक्शन, प्रचंड आत्मविश्वासाने चमचमणारे डोळे, शरीरावर योग्य ठिकाणी योग्य कर्व्हज, चेहर्‍यावर कधीच न दिसलेली एक मोठ्ठी स्माईल..

काहीतरी बोलण्यासाठी उघडलेले जोसेफचे तोंड उघडेच राहीले..

“काय झालं जोसेफ? मला बघुन आनंद नाही झाला?”, रोशनी

“रोशनी??.. व्हॉट.. आय मीन.. तु,.. अशी….. म्हणजे…” जोसेफला काही सुचतच नव्हते..

“माफ कर जोसेफ, मी तुला आधी सांगीतले नाही. मला तुला सरप्राईज द्यायचे होते. कशी दिसते आहे मी?”, रोशनी

“गॉर्जीयस..तुफान..”, जोसेफला अजुनही डोळ्यावर विश्वास बसत नव्हता..

“पण.. पण हे कसं..?? म्हणजे..”, जोसेफ

“लिपोसक्शन सर्जरी केली रे..” रोशनी म्हणाली.. “माझं काही काम वगैरे नव्हते अमेरीकेला. तिकडे गेले आणि सरळ तिन आठवडे दवाखान्यातच काढले बघ. लिपोसक्शनने शरीरातली सर्व अतीरीक्त चरबी काढुन टाकण्यात आली. पायावर सुध्दा मी उपचार केले.. निदान आता मी निट चालु तरी शकते. दोन आठवड्यातच मी खरं तर पुर्ण बरी झाले. पण मग पहीले सर्व जुने कपडे.. एकही परत नाही आणला.. सगळे नविन खरेदी.. कम्प्लीट मेकओव्हर..” रोशनी बोलत होती…

जोसेफची नजर रोशनीच्या महागड्या ज्वेलरी आणि अंगाबरोबर बसलेल्या टाईट आउटफिट्स वरुन फिरत होती.

“तु माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याबद्दल प्रथमच प्रेम वाटु लागले. माझ्या आयुष्यातला एकटेपणा दुर पळाला. सर्व जग सुंदर दिसु लागलं. मला हे आधी सुध्दा करता आले असते जोसेफ, पण मग मला लोकांच्या खर्‍या आणि खोट्या नजरा कश्या कळल्या असत्या? कोण माझ्यावर प्रेम करतं आणि कोण पैश्यावर हे सुध्दा समजले नसते.

तु माझ्यावर प्रेम केलेस जोसेफ, माझ्या संपत्तीवर नाही. मी जशी होते तसे तु मला स्वीकारलेस. माझं जग तुझ्या येण्याने पुर्णपणे बदलुन गेले. ह्या सुंदर जगात मला फक्त एकच कमतरता जाणवत होती ते म्हणजे माझे बेढब कुरुप रुप. जे तुझ्या नजरेला खुपले नाही ते मला खुपायला लागले आणि मग मला सुध्दा सुंदर दिसण्याची ओढ निर्माण झाली. बस्स.. हीच एक प्रेरणा होती ज्यामुळे आज एक नविन रोशनी तुझ्या समोर उभी आहे..”

जोसेफला काही बोलायला शब्दच सुचत नव्हते. रोशनी नुसती शरीरानेच नाही तर वागण्याने सुध्दा बदलली होती. तिच्या वागण्यातला तो एक प्रकारचा एकलकोंडेपणा, स्वतःला रिझर्व्ड ठेवणे कुठल्याकुठे गेल्यासारखे वाटत होते. आज एका नविन व्यक्तीमत्वात, एका नविन रुपात रोशनी त्याच्या समोर उभी होती…

“पण!!.. तरीही..”

“काही बोलु नकोस जोसेफ..आजपासुन एका नविन आयुष्याची ही सुरुवात आहे आपली..लेट्स मेक लव्ह जोसेफ.. आय एम डाईंग फॉर दॅट मोमेंट..”, जोसेफला थांबवत रोशनी म्हणाली..

रोशनी जोसेफला बेडमध्ये एका वेगळ्याच विश्वात घेउन गेली होती. इतक्यावर्ष मनामध्ये, शरीरामध्ये साठुन राहीलेली प्रेम करण्याची भावना, इच्छा ज्वालामुखीसारखी उफाळुन बाहेर पडली होती आणि ह्या प्रेमरसात जोसेफ पुर्णपणे भिजुन गेला होता. आजपर्यंत अनेक तरूणींना त्याने बिछान्यामध्ये ओढले होते, पण रोशनीबरोबरचा हा अनुभव त्याच्यासाठी त्या सर्वांपेक्षा सरस होता

रोशनीचे नविन रुप पाहुन सारेच जण हरखुन गेले. बेढब, जाड-जुड, एकलकोंडी, खडुस चेहर्‍याच्या रोशनीच्या जागी एक मध्यम बांध्याची, हसतमुख, सर्वांशी मिसळणारी हीच का ती रोशनी असाच प्रश्न सर्वांच्या चेहर्‍यावर होता. आणि जोसेफ? त्याला तर स्वर्ग दोन बोटं उरला होता. सत्ता, अमाप संपत्तीच्या जोडीने त्याला एक स्वरुप पत्नी मिळाली होती.

“काय गरज आहे मला आता रोशनीला मारण्याची?”, जोसेफच्या मनामध्ये एक विचार तरळुन गेला..”ही सत्ता संपत्ती माझीच आहे आणि नंतरही माझीच होणार आहे. जे रोशनीच्या मृत्युनंतर मला मिळणार होते ते आत्ता सुध्दा माझ्याकडेच आहे. मग अश्या ह्या हॉट झालेल्या आपल्या सोन्याची अंडी देणार्‍या कोंबडीला का बरं मारायचे?”.. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु होते.. “नैना माझे असं काय वाकडं करु शकणार आहे?.. आणि केलेच काही तर तिला आयुष्यातुन उठवायला असा कितीसा वेळ लागणार आहे!!

…किंवा.. तिने काही करायच्या आधीच जर तिला आपण उडवले तर..???????”

*************************************************

रोशनीला येऊन महीना उलटुन गेला होता. जोसेफ आणि रोशनी ’डिस्कव्हरींग लव्ह इन देअर लाईफ’ प्रमाणे आनंदात बुडुन गेले होते. जोसेफला सुध्दा हळुहळु रोशनी आवडु लागली होती. तिच्यात अचानकपणे झालेला हा बदल इतरांप्रमाणेच जोसेफसाठी सुध्दा सुखःद होता. नैनाला तर जोसेफ विसरुनच गेला होता.

सोशलायझींग, एकत्र बाहेर फिरणे, जेवणं, सिनेमा ह्या सर्वांमध्ये तो पुर्णपणे हरवुन गेला होता

एके दिवशी तो आपल्या केबीनमध्ये काम करत बसला होता तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला. मोबाइलवर नैनाचा नंबर बघुन काही क्षण तो दचकलाच. शेवटी इकडे तिकडे बघुन त्याने फोन घेतला..

“बोल नैना, काय काम आहे. आपले ठरले होते ना मोबाईलवर फोन करायचा नाही..”, जोसेफ

“जोसेफ, आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये.. महत्वाचे काम आहे..”, नैना

“नैना मुर्खपणा करु नकोस, मी नाही येउ शकत आत्ता.. काय काम आहे बोल.. नाही तर मी नंतर फोन करतो..”, जोसेफ

“नाही जोसेफ.. अतीशय महत्वाचे काम आहे, आत्ताच्या आत्ता निघुन ये मी वाट बघतेय..”, असे म्हणुन नैनाने फोन ठेवुन दिला.

जोसेफने मनोमन नैनाला शिव्या दिल्या आणि तो नैनाच्या घरी पोहोचला..

नैनाच्या घराचे दार उघडेच होते. जोसेफ आतमध्ये आला तेंव्हा नैना हॉलच्या एका कोपर्‍यात गुडघे पोटाशी घेउन बसली होती. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता.

“काय झालं नैना, एनी प्रॉब्लेम?”, जोसेफ

जोसेफला बघताच नैना जागेवरुन उठली आणि धावत धावत येऊन जोसेफला बिलगली.

“आय एम सॉरी जोसेफ.. आय एम रिअली सॉरी ..!!”, डोळे पुसत पुसत नैना म्हणाली.

“काय झालय नैना?”, नैनाला सोफ्यावर बसवत जोसेफ म्हणाला..

“एक मोठ्ठा प्रॉब्लेम झालाय जोसेफ..मला खरंच माफ करं..”, नैना..
“काय झालं काय आहे? जरा निट सांगशील का?”, जोसेफ वैतागुन म्हणाला.

“काल रात्री ’फॉर्च्युन कॅसीनो’ मध्ये मी गेले होते. तेथे माझी ओळख जे.के. नामक एका तरूणाशी झाली. त्याने मला ड्रिंक्स ऑफर केली. गप्पांच्या नादात मला कधी जास्त झाली लक्षातच नाही आले. त्याच्याबरोबर तो मला रुम मध्ये घेउन गेला.

ही वॉज सो गुड जोसेफ..मी कधी वाहवत गेले कळलेच नाही. कधीतरी बोलताना नशेमध्ये मी बोलुन बसले की मी आता खुप श्रीमंत होणार आहे आणि तेंव्हा मी त्याला खुप सार्‍या ड्रींक्स ऑफर करेन. तसेच त्याला आपला प्लॅनपण सांगुन टाकला..

आज सकाळी मला त्याचा फोन आला होता. तो.. तो ब्लॅकमेल करतोय जोसेफ.. तो म्हणाला दोन दिवसांत त्याला २५ करोड रुपये हवे आहेत नाहीतर तो आपला प्लॅन रोशनी आणि पोलिसांना सांगेल…. आय एम सॉरी जोसेफ.. खरंच मला कळलच नाही माझ्या हातुन हे असे कसे झाले..”

जोसेफला काहीच कळेना काय बोलावे. आत्ता कुठे त्याच्या आयुष्याची सुरुवात झाली होती.

“मुर्ख आहेस तु नैना.. बेवडे.. हजार वेळा सांगीतले आहे तुला स्वतःवर ताबा ठेव म्हणुन..”, जोसेफ

नैनाच्या डोळ्यातुन अजुनही पाणी वाहत होते..

“..आणि कुठुन देणार आपण एवढे पैसे..”, डोक्यावर हात ठेवत जोसेफ म्हणाला..

“तु काढु नाही शकणार का.. तुझ्याकडे कंट्रोल आहे ना सध्या..” नैना
“आहे.. पण इतके पैसे नाही काढता येणार.. खास करुन रोशनी इथे असताना. काय सांगु तिला कश्याला हवे आहेत?”, जोसेफ

“प्लिज काही तरी कर जोसेफ.. आपण सगळे नाही तर तुरुंगात जाऊ.. प्लिज काही तरी कर..”
“काय करु? तु असा मुर्खपणा करुन बसलीस..”, जोसेफ

“नाहीच का तुला पैसे काढता येणार जोसेफ”, चिंतीत चेहर्‍याने नैना म्हणाली..

“..कोण आहे हा जे.के? मी फोन करु का त्याला? काही मुदत नाही का वाढवुन मिळणार?”, जोसेफ

“नाही जोसेफ, तो ऐकण्याच्या मनस्थीतीत नाहीये.. इतका जमुन आलेला आपला प्लॅन असा तुटुन नको जायला जोसेफ.. प्लिज कर काही तरी”, नैना

“तुझा तो ख्रिस कुठे गेला? त्याला सांग ना.. त्याला म्हणाव त्या जे.के ला जरा दम भर आणि नाहीच ऐकले तर पत्ता कट करुन टाक त्याचा..”, जोसेफ
“तो इथे नाहीये ना.. तो बॅंकॉकला गेलाय. कमीत कमी चार दिवस लागतील. जे काही करायचे ते आपल्यालाच करावे लागेल..”, नैना

“ठिक आहे बघतो मी काय करायचे ते. त्या जे.के. ला माझ्या भाषेत समजावुन सांगतो.. ऐकेल तो. सांग मला, कुठे भेटेल तो?”, जोसेफ..

“आज रात्री फॉर्च्युन कॅसीनो.. रुम नं १०३, १०.३० वाजता…”, नैना.

 

कोण आहे हा जे.के.? सुरळीत चाललेल्या प्लॅनमध्ये मधुनच कुठुन उगवला? काय होणार रात्री १०.३० वाजता फॉर्च्युन कॅसीनो मध्ये? जोसेफच्या मनात काय आहे? आपल्या प्लॅननुसार तो रोशनीचा खुन करणार? का रोशनीच्या प्रेमात पडत चाललेला जोसेफ आपली एकेकाळची प्रेमीका नैनाला मारुन टाकणार? वाचत रहा ’लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह’…………

[क्रमशः]

भाग ९>>

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ७)


भाग ६ पासुन पुढे>>

दिवसेंदिवस रोशनी जोसेफच्या नाटकी प्रेमाच्या जाळ्यात ओढली जात होती. प्रत्येक गोष्टींत त्याचे इतरांपेक्षा असलेले वेगळेपण रोशनीला जाणवत होते.

म्हणजे.. एकदा तिने जोसेफला फोन केला तेंव्हा तो ’हेल्पलाईन’ मधील मुलांबरोबर खेळत होता..फोन वर तो म्हणाला होता..’नाऊ दॅट आय एम अर्नींग वेल, आय वॉंट टु डु समथींग फॉर दीज लिटील ऍन्जल्स..’ आणि रोशनी मनोमन हासली होती.

एकदा रोशनीने त्याला ऑफीसमध्ये बोलावले होते आणि तरीही तो चक्क ३० मिनीट उशीरा, हातातले काम संपवुन आला होता. केवळ रोशनीची मर्जी संपादण्यासाठी नाटकीपणे तिचे शब्द झेलणार्‍या माणसांपेक्षा ह्या वेळेस जोसेफ तिला खुप वेगळा वाटला होता.

रोशनीबरोबर त्याचा वावर नेहमी कॉन्फीड्न्ट, सेल्फ रिस्पेक्ट जपणारा असायचा. मात्र त्याच्यापेक्षाही मोठ्या पोस्टवर असणारी माणसं आदर नसतानाही उगाचच हाजी-हाजी करत रोशनीभोवती फिरायची. जोसेफला पाहुन रोशनी मनोमन म्हणायची, ’इफ़ आय एम टु गेट मॅरीड, आय वॉंट माय ह्जबंड जस्ट लाईक जोसेफ, विथ अ हेड हेल्ड हाय, अ मॅन विथ सेल्फ प्राईड ऍन्ड सेल्फ रिस्पेक्ट, यट केअरींग.. नॉट फॉर मनी, बट फॉर पिपल्स..’

रोशनीच्या त्या एकाकी जिवना जोसेफच्या रुपाने एक नविन पहाट उगवली होती. तिच्या वागण्यात, बोलण्यात खुप फरक पडला होता.. निदान जोसेफबरोबर तरी. त्याच्याबरोबर ती स्वतःला खुप मोकळे फिल करत होती.

शेवटी एके दिवशी तिने जोसेफला घरी बोलावले आणि फारसे आढेवेढे नं घेता सरळ सरळ लग्नाची मागणीच घातली..

“पण मॅम.. आपल्या दोघांमध्ये खुप मोठ्ठी दरी आहे. तुमच्या मागे ’रोशनी एन्टरप्रायझेस’ आहे. माझ्याकडे काय आहे? तुम्ही माझ्यादृष्टीने खरंच एक उत्कृष्ठ बॉस आहात आणि तुमच्याबरोबर काम करणं हा माझ्यासाठी एक फार सुंदर अनुभव ठरत आहे..”, जोसेफ नम्रपणे म्हणाला..

“कमॉन जोसेफ!, लग्नानंतर ’रोशनी’ आणि ’रोशनी एन्टरप्रायझेस’ तुझीच तर होणार आहे. मग कुठे उरते दरी? माझ्यादृष्टीने माणसाला महत्व आहे, त्याच्या भौतीक मालमत्तेला नाही. आपल्या दोघांचे वैचारीक पातळीवर सुर जुळले आहे, मग मन जुळायला कितीसा वेळ लागणार?

आजपर्यंत अनेकांनी माझ्यावर प्रेम दाखवले, पण त्या प्रेमामागे त्यांचे माझ्या पैश्यावरील प्रेमच दिसत होते. त्यांच्या नजरेत मला प्रेम कमी आणि संपत्तीची लालसाच जास्त दिसली. तुला ते गाणं माहीती आहे जोसेफ.. ’लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह?’ बास्सं.. माझी तेवढीच अपेक्षा आहे, आणि ती अपेक्षा मला तुझ्याकडुन पुर्ण होइल ह्याची खात्री आहे.

हो म्हण जोसेफ..मला अजुन काही नको. आजपर्यंत मी आयुष्य एकटीनेच जगले आहे. हा इतका पैसा असुनही तो कधी अनुभवला नाही. आणि त्याची आजपर्यंत कधी गरजही वाटली नाही. पण आज वाटते आहे. मला माझे उरलेले आयुष्य आनंदाने घालवायचे आहे आणि त्या आयुष्यात तु असशील तर मला खुपच बरं वाटेल.. प्लिज जोसेफ..”

जोसेफची शांतता रोशनीला सलत होती. श्वास घेणे सुध्दा तिला जड होऊ लागले. लाचारपणे ती जोसेफच्या उत्तराची वाट बघत होती.

रोशनीच्या “उरलेले आयुष्य” ह्या शब्दाला जोसेफ मनोमन हासला.

“यु आर डिसगस्टींग, यु आर अग्ली, यु आर जस्ट अ रिच फॅट पिग”, हे किंवा असेच काही तो म्हणणार होता, पण शेवटी तो म्हणाला,..”येस रोशनी..! लेट्स गेट मॅरीड”

*************************************

रोशनी आणि जोसेफचे लग्न जोसेफच्या विनंतीनुसार अगदी साधेपणाने, रजिस्टर पध्दतीने झाले. अर्थात जोसेफला कोणत्याही प्रकारची प्रसिध्दी नको होती हा स्वार्थ होताच.

लग्न झाले आणि रोशनी म्हणाली,

“जोसेफ.. मला खुप वाईट वाटते आहे, पण तुला सांगावेच लागेल… मला निदान एक महीन्याकरता तरी अमेरीकेला जावे लागणार आहे. खरंच कामच तसं महत्वाचे आहे. मी शक्य तितका टाळण्याचा प्रयत्न केला पण आय एम रीअली सॉरी.. मला जावंच लागेल..” चेहरा पाडुन रोशनी म्हणाली..

“ओह..नो..रोशनी.. आत्ताच तर आपलं लग्न झालं आहे, कित्ती स्वप्न पाहीली होती मी.. ४-५ दिवस ह्या गर्दीपासुन आपण खुप लांब, कुठे तरी गेलो असतो…”, जोसेफ निराशेचा स्वर आणत म्हणाला..

“आय नो.. जोसेफ.. माझी पण तिच इच्छा होती.. पण खरंच रे, नाही टाळता येणार.. जावंच लागेल मला, प्लिज तु चिडु नकोस..” रोशनी म्हणाली..

“नाही गं, चिडत वगैरे काही नाही. मला का कळत नाही कामाचे महत्व. तु निर्धास्तपणे जा, मी तुझी वाट पाहीन..” रोशनीचा हात हातात घेत जोसेफ म्हणाला.

लग्नाच्या रात्री तिच्याबरोबर झोपायचा विचारही त्याच्या अंगावर काटे आणत होता. रोशनीच्या ह्या निर्णयाने तो प्रचंड खुश झाला होता. ’चला एक महीना तरी कटकट नाही..’, रोशनीला एअरपोर्टला सोडुन येत असतानाच तो मनाशीच म्हणाला.

“आपल्या” अलिशान मोटारीतुन घरी परतत असतानाच त्याचा मोबाईल किणकिणला..

“जोसेफ.. नैना बोलतेय..”.. कित्तेक दिवसांनंतर नैनाच्या आवाजात तो पुर्वीचा मधाळ मादकपणा होता…

“बोला.. काय कामं काढलंत..?” जोसेफ…

“बिच्चारा जोसेफ.. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासुनच एकटं रहावं लागणार..”, खट्याळ स्वरात नैना म्हणाली..

“काय तु पण?? बरं झालं उलट ती गेली ते…आता ह्या अलिशान महालात निदान पुढचा एक महीना तरी मीच..” गाडी रस्त्याच्या कडेला घेत जोसेफ म्हणाला..

“हम्म.. आणि जर मी तुझी साथ द्यायला ’तुमच्या’ लग्नाच्या पहिल्या रात्री आले तर?” नैना..
“व्हॉट?”.. काहीसा दचकतच जोसेफ म्हणाला..

“येस जोसेफ.. आय मिस्स यु सो मच.. आय वॉट टु मेक लव्ह विथ यु.. आणि ते पण त्या कुत्रीच्या बेडमध्ये.. इट विल बी नथींग लाईक इट.. माय फॅन्टसी समज हवं तर.. पण तिच्याच घरात, तिच्याच बेड वर, तिच्याच नवर्‍याबरोबर प्रेम करण्यात मला जे सुख मिळेल ना जोसेफ.. पुढचे सर्व आयुष्य मी तिला बघुन मनोमन हासेन ह्या रात्रीचा विचार करत..”, नैना बोलत होती.

“अगं पण, तिथे सेक्युरीटी असते, कुणी पाहीलं तर?”, जोसेफ काळजीच्या स्वरात म्हणाला..

“अरे य्यार.. तुझ्यापेक्षा तिचे घर मला जास्त माहीती. त्याची काळजी तु सोड. आणि तसेही तिच्या सर्व गाड्या काळ्या काचेच्या आहेत. तु मला पिक-अप कर. गाडी नेहमीच्या जागी न लावता, मागच्या गेटकडुन पुढे गेल्यावर एक गार्डन आहे तिकडे लाव. रोशनी बर्‍याच वेळेला.. जेंव्हा तिची कुणालाच भेटायची इच्छा नसते, किंवा आलेल्या गेस्टना चुकवायचे असते तेंव्हा गाडी तिकडेच लावते. त्या बाजुला कुणी नसते..रात्री तर नक्कीच नाही..” नैना म्हणाली.. “मी वाट बघतेय जोसेफ.. मला व्हिक्टोरीया सर्कलला पिक-अप कर..” असं म्हणुन नैनाने फोन ठेवुन दिला.

*************************************

रोशनीच्या त्या रॉयल बेडवर नैना आणि जोसेफ एकमेकांना बिलगुन पहुडले होते.

“वॉव, व्हॉट अ फन राईड इट वॉज..”, नैना म्हणाली…”त्या रोशनीला कळालं नं हे, तर मला कच्चे खाईल ती..” स्वतःशीच हसत ती म्हणाली, “बिच्चारी, लग्न झालं नाही की लग्गेच जावं लागलं तिला आणि ते पण थोडे थोडके नाही, एक महिन्यासाठी..

असो..रोशनी इथे नसताना तिचे वकील.. मि. फर्नांडीस ह्यांना एकदा भेटुन घे. त्यांच्याशी ओळख करुन घे. त्यांना सांग रोशनीची विमा पॉलीसी काढायची आहे. त्यांना दाखवुन दे की तुझे रोशनीवर कित्ती प्रेम आहे. ते इथे असतानाच रोशनीला एकदा फोन कर, तिच्याशी गोड गोड बोल. तसेच त्यांच्याकडुन इतर काही माहीती जसे रोशनीचे काही मृत्युपत्र आहे का?, इतर लिगल बाबी काय आहेत वगैरे जाणण्याचा प्रयत्न करुन घे..”

“येस.. डार्लींग.. आपका हुकुम सर आखोंपर..”, जोसेफ म्हणाला..

“आता पुढचा प्लॅन.. रोशनीला टपकवायचा. अतीशय धुर्तपणे आपल्याला हे करावं लागणार आहे. कुणाला जरासासुध्दा संशय येता कामा नये. तिचा मृत्यु पुर्णपणे अपघाती वाटला पाहीजे, नाहीतर संशयाची सुई पहीली तुझ्याकडेच येईल. एक रस्त्यावरचाअ मेकॅनिक रोशनीचा नवरा होतो काय, दोन महीन्यात तिचा मृत्यु होतो काय आणि तोच कफल्लक मेकॅनीक रातोरात करोडपती होतो काय..”.. नैना..

“हम्म, बरोबर आहे तुझं म्हणणं.. बर सांग आता, काय प्लॅन आहे?”, जोसेफ

“वेल.. फुल प्रुफ प्लॅन अजुनही तयार होत नाहिये.. माझा विचार चालु आहे.. पण ढोबळ मानाने असा विचार आहे..

हे बघ… रोशनी डिप्रेशनची शिकार आहे. एखादी मनाविरुध्द गोष्ट झाली की तिला मध्येच नैराश्य येते. डॉक्टरांनी तिला नैराश्यावर काही गोळ्या दिलेल्या आहेत. परंतु त्या गोळ्यांचे अतीसेवन ड्रग्सचा परीणाम करते.

त्या दिवशी कुठल्याश्या छोट्या गोष्टींवरुन तुझ्या आणि रोशनीमध्ये भांडण होईल, आणि तेच भांडण बघता बघता वाढत जाईल. तु ह्याची काळजी घ्यायचीस की तुमच्यातले हे भांडण घरातील गडी माणसे आणि इतर शक्य तेवढी लोकं ऐकतील.

तुमचे भांडण झाले की तु तणतणत मुख्य गेटातुन बाहेर पडशील. परंतु गाडी एका ठिकाणी लपवुन तु परत येशील.. कुणाच्याही नकळत आणि मागच्या गेटमधुन तु परत घरी येशील. भांडण सुरु व्हायच्या आधी तुला तुमच्या बेडरुम मध्ये रोशनीसाठी असलेल्या पाण्याच्या जग मध्ये, ज्युसमध्ये किंवा आणखी कश्यातही जे ती झोपण्याआधी खाईल, किंवा पिईल त्यात तिच्या गोळ्या टाकुन ठेवायच्या.

साधारणपणे एक तासाने तु बेडरुम मध्ये येशील. ह्या गोळ्यांच्या ओव्हरडोसने रोशनी गाढ झोपली असेल. तिला उचलुन तिच्याच गाडीत बसवुन तु पुन्हा बाहेर पडशील. आज जसे इतरांच्या नकळत मी आतमध्ये आले, तसेच त्यादिवशी सुध्दा असेन. मागच्या सिटवरच रोशनीला गाडीत ठेवुन तु तिच्या शेजारी लपुन बसशील. मी ड्रायव्हींग सिटवर रोशनीचाच कुठलातरी ड्रेस घालुन बसेन. आपण गाडी वेगाने मुख्य गेटातुन बाहेर काढु. गेटवरील गार्ड रोशनीला गाडी घेउन जाताना पाहेल.

तिला घेउन आपण लोटस-हिल च्या घाटात जायचे. रात्रीच्या वेळेस हा घाट पुर्ण सुनसान असतो. तेथेच तिला ड्रायव्हींग सिटवर बसवुन ती गाडी आपण घाटात ढकलुन द्यायची. बस्स.. रोशनी खतम..” टाळी वाजवत नैना म्हणाली..”शवतपासणीमध्ये रोशनीला गोळ्यांचा ओव्हरडोस झाला आणि त्यामुळे एका अवघड वळणावर आलेल्या ग्लानीमुळे गाडी दरीत कोसळली आणि तिचा अपघाती मृत्यु झाला हे स्पष्ट होईल..”

“वॉव, दॅट्स ब्रिलीयंट…जिनीयस आहेस तु…” जोसेफ म्हणाला..

“अर्थात ह्यात काही खाच-खळगे आहेत जे पुर्ण करायचे आहेत.. जसे की तुझ्यासाठी अलेबी.. तु घरी नव्हतास तर मग रोशनीचा अपघात झाला तेंव्हा कुठे होतास? ह्याचा पुरावा. त्यावेळेस तु दुसर्‍याठिकाणी देखील असणे गरजेचे आहे, आणि तु तेथे होतास, ह्याचा पुरावा देखील असणे गरजेचे आहे. ह्या मुद्याला एकदा का उत्तर सापडले की आपला प्लॅन रेडी-टु-गो..”, घड्याळात बघत नैना उठुन बसत म्हणाली..

समोरच्या आरश्यात बघत आपले केस एकसारखे करत नैना म्हणाली.. “चल मला जायला हवे..”

नैनाच्या लांबलचक उघड्यापाठीकडे बघत जोसेफ म्हणाला…”इतक्यात कुठे चाललीस डीअर.. हनीमुनची रात्र आहे, इतक्या लवकर थोडी नं पहाट होणार..” आणि तिला पुन्हा एकदा आपल्या बाहुपाशात ओढुन घेतले..

[क्रमशः]

भाग ८ >>

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ६)


भाग ५ पासुन पुढे>>

..”मला माफ करा हं..मला जरा लवकर निघावं लागेल, एक महत्वाची मिटींग ठरते आहे.. तुम्ही चालु ठेवा..” मेहता फोन वरचे बोलणे आटोपल्यावर म्हणाले..

“ओ.के. डॅड, थॅक्स वेळ काढल्याबद्दल..” रोशनी

“माय प्लेझर डिअर.. बाय द वे, मी तुझी गाडी घेउन जाऊ का? मी ड्रायव्हरला काही कामांसाठी पाठवले होते.. पण आत्ता मला निघावेच लागेल. तो आला की मग तु माझी गाडी घेउन जा..”, मेहता

“नो प्रॉब्लेम डॅड.. घेउन जा तुम्ही गाडी..” रोशनी चिअरफुल चेहर्‍याने म्हणाली.. “आणि तुमच्या गाडीला उशीर झाला तरी हरकत नाही, मि.जोसेफ सोडतील मला”

“ऑलराईट देन, आणि गुड न्युज जोसेफना तुच दे.. अफ़्टर-ऑल तुच त्याची बॉस आहेस.. नाही का?” मेहता जागेवरुन उठत म्हणाले..

“ओ.के. डॅड..”, रोशनी

“सो लॉग देन.. गुड बाय..” असं म्हणुन मेहता तेथुन बाहेर पडले..

..च्यायला हा बेबी एलिफंट बसायचा का आपल्या गाडीत?“, जोसेफने क्षणभर विचार केला.. पण त्याच वेळेला त्याला दोन गोष्टींची जाणीव झाली एक म्हणजे रोशनीने त्याच्यावर दाखवलेला विश्वास आणि दोन म्हणजे प्रथमच त्याला रोशनीबरोबर एकांतात मिळालेला वेळ. “ही संधी सोडुन चालणार नाही..” तो मनोमन उद्गारला

“सो!!. व्हॉट्ज़ द गुड न्युज”, चेहर्‍यावर उत्सुकता दाखवत जोसेफ म्हणाला..

“वेल.. डॅड वॉंट्स यु टु हॅन्डल द कंम्प्लीट प्रोजेक्ट विथ मी..इथुन पुढे तु मला डायरेक्ट रिपोर्ट करशील..”, रोशनी

“वॉव..फॅन्टास्टीक..” जवळ जवळ जागेवरुन उठतच जोसेफ म्हणाला..”थॅंक्यु सो मच..”

“यु डीझर्व्ह इट जोसेफ. व्यक्तीशः मला सुध्दा आनंद झाला आहे. तुझ्या मध्ये ते पोटेंन्शिअल आहे, एनर्जी आहे, आणि प्रवाहाविरुध्द काही करण्याची इच्छा पण आहे. ’रोशनी एन्टरप्राईज’ ला तुझ्यासारख्याच लोकांची आवश्यकता आहे..”, रोशनी

पुढचा जवळ जवळ एक तास रोशनी आणि जोसेफ बोलत होते. बोलण्याचा विषय बहुतेक वेळा ऑटोमोबाईल हाच होता. परंतु दोघांनाही ह्या चर्चेतुन घेण्यासारखे बरेच काही होते. जोसेफला स्वतःला आपण रोशनीशी इतक्यावेळ बोलतो आहोत ह्याचे आश्चर्य वाटत होते. इतक्यावेळ बोलल्यानंतर निदान तिच्याबद्दल वाटणारी किळस, घृणा तरी जोसेफच्या मनातुन कमी झाली होती. वैचारीक पातळीवर तरी निदान दोघांचे सुर चांगले जुळले होते

जोसेफने घरी सोडताना रोशनी म्हणाली, “थॅक्स जोसेफ फॉर ए वन्डरफुल इव्हनिंग. खुप वर्षांनी मी इतके बोलले असेन. आज खरंच खुप मोकळे मोकळे वाटते आहे.”

“माय प्लेजर”, असे म्हणुन जोसेफ निघुन गेला..आणि ह्यावेळेस तो हे शब्द खरंच मनापासुन म्हणाला होता..

जोसेफची गाडी दुर गेल्यावर पाठीमागे लांबवर थांबलेल्या गाडीतुन काळाभिन्न ख्रिस बाहेर आला आणि खिश्यातुन फोन बाहेर काढुन त्याने नैनाचा नंबर डायल केला.

*************************************************

पुढचा महीना जोसेफसाठी कमालीचा व्यस्त गेला. रोशनीने त्याला अक्षरशः कामात मग्न करुन टाकले होते आणि जोसेफसुध्दा मनापासुन कामात बुडुन गेला होता. ऑटोमोबाईल हे त्याचे आवडते क्षेत्र होते आणि प्रथमतःच त्याला एवढ्या मोठ्या पातळीवर ह्या क्षेत्रात काम करायला मिळत होते. कित्तेक उपकरणे, वाहनांचे महागडे पार्टस, साधन-सामग्री जी त्याने फक्त ऐकली होती, वाचली होती ती त्याला आता प्रत्यक्षात पहायला मिळत होती, हाताळायला मिळत होती. रोशनीने त्याचे बहुतेक सर्व निर्णय उचलुन धरले होते त्यामुळे त्याला त्याच्या कामात हवा तो मोकळेपणा मिळाला होता. ह्या सर्व कामात आपला मुळ उद्देश जणु तो विसरुनच गेला होता.

कार्यालयातुन परतायला त्याला रोजच १२- १२.३० वाजत होते. त्या दिवशी सुध्दा तो असाच उशीरापर्यंत काम करत होता.

शरीरातले स्नायु आखडले तसे जोसेफला थकल्याची जाणीव झाली. त्याने डेस्कवरील उरलेले काम आटोपले आणि तो बाहेर पडला.

रस्तावर तुरळकच वर्दळ होती. त्यामुळे गाडीच्या आरश्यात गेले बर्‍याच काळापासुन मागे असलेली एक गाडी त्याचे लक्ष वेधुन घेत होती. ती गाडी जोसेफच्या गाडीशी वेग राखत येत होती. पहिल्यांदा जोसेफने दुर्लक्ष केले पण नंतर नंतर मात्र ती गाडी आपला पाठलागच करत आहे ह्याची त्याला खात्रीच पटली.

त्याने आपल्या गाडीचा वेग कमी केला आणि रस्त्याच्या कडेला उभी केली. मागची गाडी सुध्दा काही अंतर ठेवुन थांबली होती.

जोसेफ गाडीतुन खाली उतरला आणि त्या गाडीच्या दिशेने जाऊ लागला. त्या गाडीच्या काचा काळ्या असल्याने आतमध्ये कोण आहे ह्याचा काहीच अंदाज येत नव्हता.

त्याने गाडीच्या खिडकीच्या काचेवर टकटक केले.

गाडीची काच हळु हळु खाली जाऊ लागली आणि त्याच वेळेस त्याच्या मानेच्या आणि डोक्याच्या मध्ये कसल्यातरी लोखंडी जाड वस्तुचा वार झाला.

जोसेफ खाली कोसळला. कोसळताना गाडीच्या हळुवार उघडणार्‍या खिडकीच्या काचेच्या मागे त्याने नैनाचा चेहरा पाहीला आणि त्याच वेळेस त्याच्या डोळ्यासमोर अंधेरी आली.

***************************************

जोसेफला जाग आली तेंव्हा तो स्वतःच्या घरातच होता. त्याचे डोके जबरदस्त ठणकत होते. तो डोक्यावर हात धरुन सावकाश उठुन बसला. रात्रीच्या प्रसंगाचा विचार करत असतानाच स्वयंपाक घरातुन नैना कॉफीचा कप घेउन बाहेर आली.

नैनाला बघीतल्यावर त्याची तळपायाची आग डोक्यात गेली. ताडकन तो उठुन नैनाच्या दिशेने जाऊ लागला, पण त्याच वेळेस नैनाच्या मागुन येणारा ख्रिस त्याच्या नजरेस पडला आणि त्याची पावलं जागच्या जागी थिजली.

“ह्याचा अर्थ काय समजायचा मी नैना?”, तडफडत जागेवर बसत जोसेफ म्हणाला..

“कॉफी घे..” नैना थंड स्वरात म्हणाली.

“ह्याच अर्थ काय नैना?”, जोसेफ परत म्हणाला..

“ह्याचे दोन अर्थ.. एक, तुला तुझ्या कामाची जाणीव करुन द्यायची. तुला तेथे नोकरीला तुझे ज्ञान पाजळायला लावलेले नाही जोसेफ, नाही रोशनी एन्टरप्रायझेसचा प्रॉफीट करुन द्यायला. हा फटका पुढचा महीनाभर तरी तुला तुझ्या कार्याची आठवण करुन देईल. आणि दुसरा, तुझ्यावर झालेला वार हा रोशनीवर कितपत होतो ते पहायचे. तुझ्या भडवेपणाचा तिच्यावर काही उपयोग झाला आहे का नाही ते पहाण्याचा..”, नैना म्हणाली.. “असो.. तुला फार दुखत असेल ना रे.. मी म्हणले होते ख्रिसला जरा हळुच मार म्हणुन..पण त्याचा हळु म्हणजे ना!!… तु आता जरा चार दोन दिवस आरामच कर. ऑफीसला जाऊच नकोस. बघुयात तुला नं भेटुन ती बेबी एलीफंटची चलबिचल होते की नाही ते..”

जोसेफला अजुन काही विचारायचे होते, पण त्याचे शब्द बाहेर पडायच्या आधीच त्याला सोडुन नैना बाहेर पडली आणि पाठोपाठ ख्रिस..

*************************************************

नैनाने आपले पत्ते योग्य वेळेस, योग्य ठिकाणी टाकले होते आणि ह्याचा प्रत्यय नैनाला जोसेफ कार्यालयात न येऊन दोन दिवसांतच आला.

सकाळी नैना आपल्या डेस्कवर कामात मग्न होती त्यावेळेस इंटरकॉम खणखणला..

“नैना..”
“येस मॅम..”
“मि.जोसेफ आले आहेत ऑफीसला?”
“नो मॅम, दोन दिवस झाले ते आले नाहीत ऑफीसला”
“काही फोन?”
“नो मॅम..”
“………..”

“प्लिज फोन करुन विचार, काही अर्जंट मिटींग्स आहेत, त्यांचे इथं असणे आवश्यक आहे.”
“ओ.के मॅम..” असं म्हणुन नैनाने फोन ठेवुन दिला.

त्यानंतर जवळ जवळ ३० मिनीटांनी तिने रोशनीला फोन लावला. नैनाच्या डेस्कवरुन आलेला फोन ३-४ रिंग्ज् वाजल्याशिवाय रोशनी उचलत नसे, पण ह्या वेळेस पहिल्याच रिंगमध्ये रोशनीने फोन उचलला..

“मॅम, मि.जोसेफवर चोरीच्या प्रयत्नात असलेल्या काही चोरट्यांनी हल्ला केला..”
“ओ माय गॉड, इज ही ऑल राईट?”
“येस मॅम.. ते ठिक आहेत. थोडी डोक्याला दुखापत झाली आहे, पण ही इज ऑल राईट. दोन दिवसांनी येतील ते ऑफीसला आणि वेळवर कळवु न शकल्याबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे..”

दोन क्षण शांततेत गेले आणि मग रोशनी म्हणाली..

“नैना, जोसेफ कुठे रहातात तुला माहीत आहे?”
“येस मॅम, ऑफीस रेकॉर्ड्समध्ये त्यांचा पत्ता आहे. आणि तो भाग मला माहीत आहे..”
“ठिक आहे तर, दुपारी शक्य असेल तर आपण जाऊ त्यांच्याकडे. यु..नो.. ही इज आवर की-रिसोर्स फॉर द ऑटोमोबाईल प्रोजेक्ट.. ”
“येस मॅम.. आय अंडरस्टॅन्ड..”

रोशनी आत्ता तिच्या घरी असती तर तिने दोन-चार उंच उड्या मारल्या असत्या, किंवा जोरजोरात ओरडली असती. परंतु तिने आपल्या मनावर ताबा ठेवला आणि मोबाईलवर लगेच जोसेफला फोन लावला.

***********************************************

रोशनीला दारात उभे पाहुन जोसेफने चेहर्‍यावर उसने आश्चर्य आणले.

“मॅम!!!… तुम्ही.. इथे??”
“काय झालं मि.जोसेफ?”
“काही नाही मॅम, परवा घरी परतायला उशीर झाला होता, येताना गाडी पंक्चर झाली.. झाली काय, केली गेली. वाटेत खिळे टाकुन ठेवले होते. मी उतरुन चाक बदलतच होतो तेवढ्यात बाजुच्या झाडीतुन चार-पाच भुरटे चोर आले आणि त्यांनी मला मारहाण केली..”
“पोलीस कंम्प्लेंट केलीत मि.जोसेफ?”
“नाही मॅम, तसे फार काही चोरीला नाही गेले..”
“अहो पण.. एक मिनीट..” असे म्हणुन रोशनीने पर्समधुन मोबाईल काढला.. “मी ए.सी.पींना फोन लावते आहे, दे बेटर शुड लुक इन्टु इट..” आणि ती नंबर फिरवु लागली..

“इट्स ओके मॅम.. तसेही त्या चोरट्यांनी चेहर्‍यावर काळे बुरखे घातले होते, त्यांचे चेहरे मी नाही पाहु शकलो, त्यामुळे पोलिस-केस करुनही फारसा उपयोग नाही होयचा..” असं म्हणत जोसेफने रोशनीच्या मोबाईलवर होत ठेवला आणि असे करत असतानाच आपल्या हाताचा जाणुन-बुजुन रोशनीच्या हाताला स्पर्श होईल ह्याची काळजी त्याने घेतली.

रोशनीला तो एक स्पर्श सर्वांगावर गुलाबी काटे फिरवुन गेला.

“जोसेफ.., यु डोंन्ट अंडरस्टॅन्ड हाऊ इंम्पॉर्टंट यु आर टु मी!..,, आय मीन टु रोशनी एन्टरप्रायझेस.. प्लिज टेक केअर..” असं म्हणुन रोशनी तेथुन बाहेर पडली.

एक क्षण तिने मान वर करुन जोसेफ किंवा नैनाकडे पाहीले असते तर त्यांच्या चेहर्‍यावर उमटलेली हास्याची एक क्षीण लकेर तिच्या तिक्ष्ण नजरेने टिपली असती. परंतु म्हणतात ना, प्रेमात माणुस आंधळा होतो.. रोशनी.. तिच्याच नकळत ती जोसेफच्या प्रेमात पडली होती..

[क्रमशः]
भाग ७>>

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ५)


भाग ४ पासुन पुढे>>

रोशनी आपल्या डेस्कवर विचार करत बसली होती. लहानपणापासुनचा तिचा भुतकाळ तिच्या डोळ्यासमोरुन सरकत होता.

रोशनीने तिच्या आईला पाहीलेच नव्हते. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे ’सि’सेक्शनने रोशनीला ऑपरेशन करुन साडे-सात महीन्याची असतानाच बाहेर काढण्यात आले. रोशनीची आई फार दिवस जगु शकली नाही आणि रोशनीने बाहेरचे जग निट बघायच्या आधीच तिला सोडुन गेली.

’प्रि-मॅच्युअर’ असल्याने रोशनीला निओनॅतल केअर मध्ये महीनाभर रहावे लागले. चेहर्‍याला मास्क लावुन फिरणारे डॉक्टर्स-सिस्टर्स आणि आजुबाजुचे हिरवे पडदे हेच तिचे जग होते. पुर्ण दिवस भरल्यावर तिला घरी सोडण्यात आले. बाकीची शरीर सिस्टीम रिकव्हर झाली, पण जन्मजात एका पायाला अधुपण आले.

म्हणायला रोशनीच्या महालात माणसांचा राबता होता परंतु रोशनीवर माया करणारे कोणीच नव्हते. आपल्या लाडक्या मालकीणीच्या मृत्युस ही सावळी, लंगडी महामायाच कारणीभुत आहे अश्या काहीश्या बुरसटलेल्या विचारांनी नोकरवर्गाने सुध्दा तिच्यावर आपला जिव ओवाळुन टाकला नाही. मेहतांसमोर सर्वजण रोशनीच्या मागे-पुढे करत. परंतु त्यांच्या मागे मात्र रोशनी त्यांच्या लेखी अस्तीत्वातच नव्हती.

रोशनी मोठी होत गेली आणि तिचे जग संकुचीत गेले. आपल्या बेढब रुपाला बुजुन ती बाहेर पडेनाशी झाली. तिचा स्वभाव एकलकोंडा होत गेला. मेहता आपल्याच कामात मग्न होते. त्यांच्याकडे रोशनीसाठीच काय, स्वतःसाठीसुध्दा वेळ नव्हता.

लहानपणापासुनच प्रेमाला पारखी झालेली रोशनी मनोमन प्रेम काय आहे हे माहीत नसतानाही खर्‍याप्रेमासाठी तरसत राहीली.

परीकथांमध्ये असलेला राजकुमार एकदिवशी खरंच येईल आणि मलासुध्दा ह्या मोहमयी, खोट्या जगापासुन दुर घेऊन जाईल असा दृढ विश्वास तिला वाटत होता. उंच, गोराप्पान, देखणा, ज्याच्या मनात प्रत्येक गोष्टीसाठी प्रेम भरलेले असेल. तो श्रीमंत नक्कीच नसेल. कुठलाही श्रीमंत माणसाच्या मनात प्रेम अस्सुच शकत नाही. त्यांच्या मनात फक्त लोभ, लालसा आणि संपत्ती एवढेच असते. .. पण तो येईल, एक दिवस नक्कीच येइल. रोशनी मनोमन विचार करायची आणि स्वतःच लाजुन हसायची.

दिवसांवर दिवस, महीने आणि वर्ष होत गेली आणि रोशनीचा ’राजकुमार’ गोष्टींवरील विश्वास उडत गेला. तिच्या आयुष्यात समोर फक्त सेल्स-लोक, बिझनेस पार्टनर्स, चॅरीटीसाठी हात पसरवणारेच आले. रोशनीला पाहील्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील बदलेले भाव रोशनीने ओळखले होते. घृणा, तिरस्कार किंवा दया/माया. आणि ह्यातील कुठल्याही गोष्टीचा रोशनीला प्रचंड राग होता.

रोशनी सज्ञान होत गेली आणि तिला एका गोष्टीची जाणीव झाली की आपला कडे रुप नसले तरी आपल्याकडे पैसा आहे आणि ह्या पैश्याच्या तालावर आपण जगाला नाचवु शकतो.

**********************************

“तिन आठवडे झाले जोसेफ, काहीच प्रोग्रेस नाहीये. काय ठरवले आहेस तु? काय प्लॅन आहे तुझा?” नैना हताशपणे हवेत हात फिरवत जोसेफशी बोलत होती.

“मी तरी काय करु नैना? मी एक सुपरवायझर आहे. काही कारण नसताना रोशनीला भेटणे केवळ अशक्य आहे मला. जॉईन झाल्यानंतर मी तिचे तोंड सुध्दा पाहीले नाहीये..”, जोसेफ म्हणाला..

“तुझाच मुर्खपणा तो!, एवढ्यासाठी मी ड्रायव्हरच्या पोस्टसाठी फेव्हरेबल होते. अगदी रोज नसले तरी तुझी तिची गाठभेट बर्‍याच वेळा झाली असती. पण आता ह्याच गतीने आपला प्लॅन पुढे सरकत राहीला तर मला काही होप्स दिसत नाही येत..” नैना म्हणाली.

“मग आता काय करायचे?” जोसेफ

“सध्या तरी आपल्या हातात काहीच नाही. केवळ वाट पहाणे आणि योग्य संधीची वाट पहाणे..”, नैना

जोसेफ आणि नैनाला हवी ती संधी नंतर दोन आठवड्यांनी चालुन आली.

जोसेफ काम करत असलेल्या फ्लोअरचा मॅनेजर जेकोबे सुट्टीवर होता आणि त्या दिवशी आलेल्या कन्साइंन्मेंटसाठी काही कागदपत्रांवर रोशनीच्या सह्या आवश्यक होत्या. तसेही रोशनीकडे जायला फारसे कोणी तयार नसायचे, त्यामुळे जोसेफने जेंव्हा ह्या सह्या घेउन येण्याची तयारी दर्शवली त्यावेळेस कोणीच त्याला विरोध केला नाही.

जोसेफ कागदपत्रांची ती फाईल घेउन रोशनीच्या केबीन मध्ये गेला. मागच्या वेळेस जेंव्हा शेवटचे पाहीले होते अगदी तस्सेच आजही रोशनी त्याच जागी बसली होती, जसे काही इतक्या दिवसांत ती जागची हालली सुध्दा नसावी.

जोसेफने सर्व कागदपत्रांवर तिच्या सह्या घेतल्या आणि तो जाण्यासाठी वळला. मग काही क्षण विचार करुन तो म्हणाला..

“मॅम, तुमच्याशी काही मिनीटं बोलायचे होते..”
“कश्याबद्दल??”
“आपल्या ऑटो-प्रोजेक्टबद्दल..”
“काही अडचण आहे का?”
“नाही.. एक सजेशन आहे..”
“टॉक टु युअर फ्लोअर मॅनेजर..”
“नाही मॅम.. मला वाटते ते सजेशन तुमच्याशीच बोललेले जास्ती योग्य ठरेल…”
“आय होप, यु वोंट वेस्ट माय प्रेशीयस टाईम..”
“ऍब्स्युलेटली नो मॅम..”
“ठिक आहे, उद्या सकाळी ११.३०”

हीच ती संधी आहे. जोसेफ स्वतःशीच म्हणाला. मेक ऑर ब्रेक..

दुसर्‍या दिवशी जोसेफ ११.३० ला रोशनीच्या केबीनमध्ये हजर होता. फिक्कट क्रिम कलरचा शर्ट, बारीक स्ट्राईप्सची ब्लॅक पॅंन्ट, स्वच्छ पॉलीश केलेले ब्लॅक लेदर शुज, जेल लावुन व्यवस्थीत बसवलेले केस आणि मंद दरवळणारा परफ्युम

आत्मविश्वासपुर्वक पावलं टाकत तो केबीन मध्ये आला.

जोसेफला पाहुन पहिल्यांदा..पहिल्यांदा रोशनीच्या हृदयामध्ये एक बारीक कळ येऊन गेली..
“राजकुमार..” रोशनी स्वतःशीच म्हणाली.. “उमदा, देखणा तरूण, मितभाषी, गोराप्पान जणु काही एखाद्या गोष्टीच्या पुस्तकातुनच उतरला असावा…”

“गुड मॉर्नींग मॅम!!”, आपल्या चेहर्‍यावरील हास्य कायम ठेवत जोसेफ म्हणाला.

फार कमी लोकांच्या चेहर्‍यावर रोशनीशी बोलताना जेन्युइन हास्य असे. एक तर ते हास्य खोटे.. ओढुन-ताणुन आणलेले असायचे, नाही तर त्याला कुत्सीतपणाची लकेर असायची. परंतु जोसेफच्या त्या हास्यामध्ये एक आपुलकेपणा होता, मैत्रीपुर्ण भाव होते, एक सच्चेपणा होता.

“गुड मॉर्नींग”.. रोशनी म्हणाली.. “बोलं.. काय काम आहे..”

“मॅम आपला जो शोअरुमचा दुसरा प्लोअर-प्लॅन आहे जो आपण सर्व प्रकारच्या हाय-टेक ऍक्सेसरीज साठी राखुन ठेवला आहे तो माझ्यामते आपण तिसर्‍या प्लोअरला शिफ्ट करावा”
“जोसेफ, आपल्या शोअरुमला तिसरा प्लोअर नाहीये..”
“येस मॅम.. आय नो.. आपण वाढवु आणि ऍक्सेसरीज तिसर्‍या फ्लोअरला शिफ्ट करु”
“बरं.. आणि मग दुसर्‍या फ्लोअरला आपण काय करावं असं तुम्हाला वाटतं?”
“टेस्ट राईड सेक्शन”..
“टेस्ट राईड? काय डोकं फिरलं आहे का तुमचं जोसेफ?”
“मॅम प्लिज, ऐकुन तर घ्या!. आपल्या शोअरुमचे क्षेत्रफळ इतकं मोठ्ठ आहे की एक आतमधुन गोल चक्कर जरी मारली तरी ती एक-दोन किलोमीटर नक्की होईल.

दुसर्‍या मजल्यावर आपण एक टेस्ट ट्रॅक बनवु जो पुर्ण गोलाकार फेरी मारेल. हा ट्रॅक संगणकाद्वारे नियंत्रीत असेल. केवळ काही बटनांच्या सहाय्याने आपण ह्या ट्रॅकला कधी चढ तर कधी उतार, कधी खड्डे तर कधी गुळगुळीत, कधी पावुस-पाण्याने घसरडा झालेला तर कधी वेड्यावाकड्या वळणांचा मध्ये परावर्तीत करु शकतो.

आलेल्या ग्राहकाला त्याची आवडती गाडी एकाच ठिकाणी सर्व परीस्थीतीमध्ये चालवुन बघता येईल.

इतकेच नव्हे तर काही मॉडेल्ससुध्दा आपण संगणकनियंत्रीत ठेवु शकतो. कित्तेक लोकं नविन, शिकाऊ असतात किंवा काही लोकांच्या गाड्या ड्रायव्हरनियंत्रीत असतात. अश्या लोकांना गाडी न चालवुन सुध्दा गाडीत बसल्याचा फिल मिळु शकतो.

भारतातील ह्या प्रकारचे हे पहीलेच शोअरुम ठरेल, तसेच ह्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे अनेकजणांचा चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय सुध्दा ठरेल. लोकांचा ओघ वाढल्याने अनेक कंपन्यांच्या गाड्या आपल्याबरोबर डिलर-शिप करायला उत्सुक असतील. आपल्याकडे चॉईस आला तर आपण आपल्याला पाहीजे त्याच कंपन्यांबरोबर टाय-अप करु शकतो किंवा इतरांकडुन अधीक पैसासुध्दा आकारु शकतो..”

“मला वाटतं तुम्ही जरा रिऍलिस्टीक व्हावं जोसेफ.. एक तर हा सर्व खर्चीक भाग आहे आणि दुसरे म्हणजे अश्या सुविधा आपल्याला उपलब्ध करुन द्यायला..”

“..आहेत.. जपानमध्ये ’मोशी-कार्स’ नावाची एक कंपनी आहे जी त्यातल्या त्यात स्वस्त दरात अश्याप्रकारचे ट्रॅक्स निर्माण करुन देते.”.. रोशनीचे वाक्य मध्येच तोडत जोसेफ म्हणाला..

“त्यांच्या संगणक-स्थळावरुन मी काही माहीतीच्या, दरांच्या आणि इतर लोकांच्या रिव्ह्युज च्या प्रिंट्स काढल्या आहेत. तुम्ही एकदा ह्यावरुन नजर फिरवु शकता.

खर्चीक म्हणाल तर मला नाही वाटत ’रोशनी ऍन्टरप्राइज’कडे इतका कमी पैसा आहे. आणि कुठलीही बॅक हसत हसत आपल्याला लोन देऊ करेल इतकं नाव तर नक्कीच ’रोशनी ऍन्टरप्राइजचे’ आहे. तुम्ही आपल्या फायनांन्शीअल कन्सलटंट बरोबर बोलुन फायदा/तोटा बघुन घ्यालच. पण मला खात्री आहे, हा ऑप्शन आपल्याला तोट्यात नक्कीच घेउन जाणार नाही”

जोसेफने आपल्याकडील प्रिंट्स रोशनीच्या समोर ठेवल्या आणि तो तेथुन बाहेर पडला.

“ईफ़.. धिस क्लिक्स..” त्याने विचार केला.. “देअर वोंट बी एनी टर्निंग बॅक”

************************************************

पुढचा एक आठवडा रोशनीकडुन काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परंतु दुसर्‍या आठवड्याचेही काही दिवस असेच गेले आणि जोसेफच्या आशा कमी कमी होऊ लागल्या.

आणि शुक्रवारी दुपारी त्याच्या डेस्कवरचा फोन वाजला.

“हॅलो?”
“मि.जोसेफ?, रोशनी हिअर.. आज संध्याकाळी तुम्ही काही करता आहात का?”
“माझा?.. नो!, नॉट ऍट ऑल..”
“गुड. मी तुमचा टेस्ट ट्रॅकचा प्लॅन डॅडशी डिस्कस केला कारण ह्या प्लॅनसाठी बजेटपेक्षा मोठ्या प्रमाणात पैश्याची आवश्यकता आहे आणि चेअरमनच्या नात्याने मला तो त्यांच्याकडुन मंजुर करुन घेणे आवश्यक होते.

डॅडना तुझा प्लॅन खुप आवडला आहे आणि त्यावर अधीक चर्चा करण्यासाठी संध्याकाळी भेटायचे आहे. तेंव्हा ९.३० वाजता ’हॉटेल ग्रिन-वुड्स’ मध्ये डिनरसाठी या”

“दॅट्स ग्रेट, आय विल बी देअर..”
“…..”
“बाय द वे.. हा प्लॅन तुम्हाला कसा….”

परंतु जोसेफचे वाक्य पुर्ण व्ह्यायच्या आतच फोन बंद झाला होता.
*************************************************

मेहतांबरोबरची मिटींग छान झाली. जोसेफच्या कल्पना आणि प्लॅन्समुळे स्वतः मेहता आणि रोशनी दोघेही भारावुन गेले होते. रोशनीतर कधी नव्हे ते एखाद्या लहान मुलीसारखी ए़क्साईट झाली होती. कधी एकदा आपले हे फॅन्सी शोअरुम पुर्ण होतेय असे तिला झाले होते.

जोसेफ हॉटेलमध्ये आला तेंव्हा कमालीच्या तणावाखाली होता. पण मेहतांच्या दिलखुलास वागण्याने त्याच्या मनावरील दडपण कमी झाले.

“रोशनी अगदीच काही वाईट नाही”, जोसेफ विचार करत होता..”लुक्स वाईज.. येस..बट शी गॉट ब्रेन्स.. नो वंडर, मेहतांनी ऑटोमोबाईल प्रोजेक्ट निर्धास्तपणे रोशनीवर सोपवला होता.

व्हॉट अ वेस्ट..काही दिवस…ऍन्ड देन.. आय हॅव टु हुक हर.. ऍन्ड देन.. आय हॅव टु किल हर..”

[क्रमशः]
भाग ६>>