Tag Archives: सानिया

सानियाने शोएबसाठी घेतलेला उखाणा


सानिया आणि शोएबचा अनेक अडचणींवर मात करुन एकदाचा ’निकाह’ पार पडला. सानियाचे फोरहॅन्ड्स आणि शोएबचे स्केवर-ड्राईव्ह अनेक दिवस बातम्यांमध्ये झळकलेच. अर्थात ही ब्रेकींग न्युज वेगळी आहे. आत्ताच सुत्रांकडुन हाती आलेल्या बातम्यांमध्ये सानियाने शोएबसाठी कोणता उखाणा घेतला ह्याची माहीती ब्रेक झाली हाच उखाणा ब्लॉगच्या वाचकांसाठी –

चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे,
चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे,
घास भरवते मरतुकड्या, तोंड कर इकडे

तुमच्याकडेही काही उखाणे असतील जे सानियाने शोएब साठी घेतले असतील किंवा तुम्हाला वाटते ती घेऊ शकली असती, तर ते प्रतिक्रियेमध्ये जरुर कळवा.

जिओ-टि.व्ही ने बनवलेला सानिया-शोएब वरचा हा व्हिडीओ पाहीलात का? नसल्यास इथे टिचकी मारुन पाहु शकता.