
आज “फ्रेंडशिप-डे”, अर्थात मैत्रीचा दिवस. खरं तर मैत्रीला, मित्र-मैत्रीणी बनवायला विशेष असा कुठला दिवस लागतो, किंबहुना तो असावा असं कुणाला वाटत नसावं, परंतु तरीही ह्या दिवसाचे महत्व अबाधीत आहे. ऑगस्ट महीन्याच्या पहिल्या रविवारी येणारा हा दिवस सर्वांनाच बेधुंद करुन जातो.
आज ह्याच दिवसाच औचीत्य साधुन हा भुंगा, त्याच्या सर्व वाचकांना एक भेट देणार आहे.
“डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा” ब्लॉगवर प्रकाशीत झालेल्या सर्व मराठी कथा ई-पुस्तक स्वरुपात उपलब्ध करुन देत आहे, जेणेकरुन वाचक वर्ग ह्या कथा आपल्या संगणकावर उतरवुन घेऊ शकतील किंवा आपल्या मित्र-मैत्रीणींना ई-मेलद्वारे पाठवु सुध्दा शकतील.
ह्या कथा डाउनलोड करण्यासाठी इथे टिचकी मारा.
काही तांत्रीक अडचणींमुळे “जंगल-क्विन” कथा उपलब्ध होऊ शकली नाही. काही दिवसांतच ती सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येईल ह्याची रसिक-वाचकवर्गाने दखल घ्यावी ही विनंती.
तुम्हा सर्वांना मैत्री-दिनाच्या हार्दीक शुभेच्छा
सलामत रहे, दोस्ताना हमारा!!!
अनिकेत 🙂
Like this:
Like Loading...